six month in Marathi Love Stories by Neha Kadam books and stories PDF | सहा महिने

Featured Books
Categories
Share

सहा महिने

मिस रीता डीलनुसार तुम्हाला सहा महिने माझी बायको व्हावी लागेल. नाही सर हे चुकीचे आहे. तुम्ही मला फसवून त्या कागदपत्रांवर सही घेतली आहे. मला हा करार कधीच मान्य नाही. तुम्ही मला न सांगता त्यावर सही घेतली आहे. मला हे लग्न नाही करतच आहे.
                      पण समोर बसलेल्या माणसावर मात्र काडीचा ही फरक दिसतं नव्हता.. तो चेअर वर एक पाय खाली आणि एक पाय वर घेऊन अगदी थाटात बसला होता. शिवाय रीता च्या एवढ्या विनवण्या आणि गिडगिड न्याचा चा ही त्याला काहिच फरक पडत नव्हता. तो तोंडात चींगम आणि चेहऱ्यावर हसू सोबतच अटीट्युड ठेऊन आरामात चेअर वार बसून हालत होता. मधेच हात डेस्क वार ठेवत त्या डॉक्युमेंट्स वरील सह्या रीता ला दाखवत होता.
                      रीता ने पहिलं आणि ती हात जोडून त्याच्या पायाशी बसून रडत होती... सर प्लिज सर मला खरंच नाही करायच हे डिल. प्लिज मला घरातून सर्व काय बोलतील? त्यांना काय सांगू मी? आणि तुम्हाला तर माहिती आहे ना काही दिवसात माझं लग्नं ही ठरलंय सर प्लिज मला ह्या सगळ्यात नाही अडकायच प्लीज सर.
                       रीता रडत होती. तिला काहीच समजतं नव्हत.. पण एवढा रडूनही. तो खुर्ची वरून उठला... आणि म्हणाला मिस रीता ह्याचा विचार तुम्ही करा काय सांगायचं घरी ते. कारण जरी आता तुम्ही माझी बायको असाल तरी ते फक्त कागदा पुरताच आहे नातं त्यामुळे माझ्या कडून काहीही एक्सपेक्ट करू नका. मी फक्त तुमचा बॉस आहे हा ह्या डिल क्या बदल्यात तुम्हाला किती पैसे हवेत काय तर मी तयार आहे द्यायला. आणि तो उठून बाहेर निघून गेला. त्याच्या वागण्यावरून त्याला अजिबात माणूसकी नाही असच दिसत होता.
           रीता मात्र भरलेले डोळे घेऊन तशीच बसून होती. कसंबसं स्वतःला सावरुन मग ती बाहेर आली. ऑफिस सुटायचा टाईम झाला होता. म्हणून तिने सगळ आवरलं. इतक्यात पुन्हा तिचा बॉस तिच्या टेबल जवळ येऊन म्हणाला. उद्या सकाळी ठरल्याप्रमाणे तुम्ही नाही आलात तर. तुमचं घर आहे ना त्यांचे अजून हफ्ते चालू आहेत ना ते जप्त करायला सांगून मी. तिला आता अजूनच धक्का बसला. जीव द्यायचा विचार करत होती. पण ती ला मारून ही चालणार नव्हत. गेल्या ५ वर्षापासून तिच्या वार जबाबदारी  होती... सावत्र का असेना पण तिची फॅमिली होती.  
            रीता काहीच न बोलता बॅग उचलून ऑफिस बाहेर पडली. बाहेर आलो तशी तिच्या मनात विचारांचं काहूर माजले होते. काय करावं? तास तर घरच्यांना तिच्या असण्याने कीव नसण्याने काहीच फरक नव्हता पडत. फक्त येणाऱ्या पैशावर घर चालत होत म्हणून तिला तेवढ्या पुरत आपला मानत होते. पण आता हे सगळं समजल तर मात्र तिला टोमणे खाऊन खाऊन मरण यातना भोगायला पडणार होत्या. सावत्र आई तर संधीच शोधत असायची रीता ची बदनामी करायची त्यामुळे ती तर गावभर रीता ने कसा त्या माणसाला फसवल हे ती अगदी ओरडून ओरडून सांगणार... शिवाय नमित शी ठरलेलं लग्न मोडल तर.... म्हणजे काय मोडणारच होत. कारण नामित तास तर नवीन पिढी च्या विचारांचं मुलगा होता. पण ते फक्त इतरांसाठी बायको कडून फक्त घर आणि संसार... त्यामुळे हे समजल्या नंतर तर हे लग्न मोडलीतच जमा होत. ती विचार करत करत चालत होती. 
रोड वरून येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांचं ही तिला भान नव्हत. तिला घरी जायची इच्छा ही नव्हती. कारण मुळात घरी जावून काय सांगायचं... कसं सांगायचं तिला काहीच नव्हतं समजत.
             शेवटी एकदाची ती घरी आली. ती आली आणि फ्रेश व्हायला आतमध्ये गेली. तिला जेवायची इच्छा नव्हती. ती तशीच बसून विचार करत होती. विषय कसा काढायचा घरच्या जवळ ह्याचा विचार करत होती. शेवटी मनाशी पक्कं करून ती बाहेर आली मनोहर राव आणि नर्मदा ताई ना बोलवलं.. आणि म्हणाली... मला लग्न नाही करायचं आहे नमीत शी... तिच्या बोलण्याने मनोहर राव आणि नर्मदा ताई ना धक्काच बसला.... नर्मदा ताई पटकन म्हणाले का? पण तू लग्नाला नाही बोलतेस मग आता माझ्या विशाल च admission च काय? नमित राव तुझ्या शी लग्ना झाल्या नंतर विशाल च्या परदेशात शिकायला पैसे देणार आहे महिती आहे ना तुला? हो पण तुला आमचं सुख कधी बघतच नाही. ह्या घरचे हफ्ते पण ते भरणार आहेत.. तुला कधीच काही नाही वाटत पण. फक्त स्वतचं स्वार्थ दिसतो तुला. त्या रडून दाखवत होत्या. त्यांच्या बोलण्यातून काळजी तर दिसतच नव्हती... बस गप्प नर्मदा... आधी तिला विचार तरी काय प्रोब्लेम आहे ते? अहो काय नाही सगळी नाटक आहेत फक्त.. आज पर्यंत मी कधी तिला सावत्र नाही मानल. हिच्या साठी एवढा चांगल स्थळ आणलं. मोहनराव नर्मदा ला गप्प बसायला सांगितले. आणि रीता च्या जवळ जाऊन मायेने तिला डोक्यावरून हात फिरवत विचारले... 
                बाळा काय झालं? आणि अचानक तू का लग्नाला नकार देतेस. तास तर तुला कोणीही जबरदस्ती नाही आहे . पण तरी पण इतके दिवस झाले तेव्हा का नाही बोली? काही झालं का तुझा आणि नमित च .... रीता काहीच बोलायला तयार नव्हती.. ती फक्त रडत होती. तिला कस सांगाव ते समजत नव्हत आणि त्या वार सहज कोणी विश्वास ठेवेल अस पण तिला वाटत नव्हत... म्हणून ती म्हणाली की माझा प्रेम आहे. ते ऐकून तर अजून च दहक्का बसला ... तिच्या बाबा ना आणि नर्मदा ताई ला पण.. नर्मदा ताई तर लगेच उठल्या आणि येईल तास तिला मारत होत्या... आणि म्हणाला नालायक तोंड काळं केला असेल कुठेतरी जाऊन म्हणून च आता अशी बोलता आहे... खरं खरं सांग काय केलंस? किती दिवस झालेत.. तुझी आई गेली तेव्हाच तुला ढकलून द्यायला पाहिजे होत विहिरीत. म्हणजे आज ही वेळच आली नसती. 
                  रीता रडत होती. तिला आता जीव वार आला होता. ती हुंदके देऊन देऊन रडत होती. मोहनराव स्त्वध उभे होते. त्यांना काय करावं तेच समजतं नव्हत. पण रीता ला काहीही करून त्यांना सांगणं भाग होता. म्हणून ती म्हणाली... आम्ही उद्याच लग्न करायचं ठरवलं आहे देवळात. तिने सर्व सांगितलं.. आणि रूम मध्ये निघून गेली. तिने धाड करून दरवाजा लावून घेतला.
                 रीता रूम मधे बसून खूप रडत होती. ती खोट बोलली होती. पण तिच्या मनात विचार होते. सरांनी माझ्या सोबत अस का केलं असेल.. मी पण ना बघता पेपर साईन केले. ती देवाकडे बघत हात जोडत सांगत होती... देवा हे सगळं काय चालय माझ्या सोबत.. दरवेळेस मीच का ? खरच एवढी वाईट आहे का मी.. रडत रडत च ती झोपुन गेली..
                सकाळी जाग आली तेव्हा फ्रेश होऊन ती किचन मध्ये गेली.. नर्मदा ताई अजूनही आदळआपट करून राग व्यक्त करत होत्या. ती आली तास लगेच त्यानी तिला टोमणे मारायला सुरुवात केली. त्या मोहन रवाना म्हणत होत्या... मी बोलली तुम्हाला ही मुलगी एकदिवस आपल नाक कापेल बघा तेच झालं... पण तिला बघा काहीच नाही त्याचं... मॅडम मस्त चहा पितात... नर्मदा ताई च्या बोलण्याने तिला पुन्हा रडू आले म्हणून तिने ओतलेला चहा तसच ठेऊन आतमध्ये निघून गेली.
               आतमध्ये आली आणि दरवाजा लावला इतक्यात फोन वाजला तिने उचला तास समोरून आवाज आला. ठरल्ाप्रमाणे भेट नाहीतर ..... तिने हम करून उत्तर दिले आणि फोन कट झाला... मग तिला अजूनच अनावर झालं.. तिने फोन साईड ला फेकला आणि रडू लागली.
               पण काहीही करून तिला आता ते करणं भाग होत.. तिने पहिलं ११ वाजता आलेले १२ वाजता तिकडे पोचायचं होत.. ती कशी बशी रेडी झाली.. आणि बाहेर आली.. तिला नवरीच्या वेशात बघुन नर्मदा ताई ना अजूनच राग आला.. त्या मोहनराव ना म्हणाल्या बघा बघा एवढा करून तिने तुमचे आशीर्वाद सोडा पण परवानगी ही नाही विचारली.. म्हणजे नक्कीच तोंड शी...  मुलगा कोण आहे ते पण नाही सांगीतलं... इतक्यात बेल वाजली.. रीता दरवाजा खोलयला गेली... तिने डोअर ओपन केला. आणि म्हणाली सर तुम्ही....