Touch of rain?️ - 17 in Marathi Love Stories by Akash books and stories PDF | स्पर्श पावसाचा ?️ - 17

The Author
Featured Books
  • Do you Love Me - 1

    Episode 1: The First QuestionThe college campus was full of...

  • Beyond His Memory

    Once upon a time, in a small village, lived a young woman na...

  • Parents

    The Two LampsIn a small village near an ancient temple, ther...

  • Lakshmi Amma - 2

    Sumit had gradually accepted the strange comfort of being ca...

  • Specialz - 3

    S- Such a b- big amount!W- Why would master g- give me?This...

Categories
Share

स्पर्श पावसाचा ?️ - 17

पुण्याहून पेपर देऊन परत येताना आमच्या गाडीचं टायर अचानक पंक्चर झालं. आजारी आईमुळे वर्षा एकटीच माझ्यासोबत होती. मी टायर बदलायला खाली उतरलो, आणि ती गाडीतून उतरून माझ्याकडे पाहत उभी होती.

पावसाची हलकीशी सर वातावरणात थोडीशी थंडी आणत होती. मी टायर बदलून झाल्यावर आम्ही जवळच्याच एका छोट्याशा हॉटेलमध्ये थांबलो जेवायला. तिथे लाईट गेले होते, म्हणून हॉटेलवाल्याने मेणबत्ती लावली.

 हॉटेलचं वातावरण काहीतरी जादूई झालं होतं.

त्या छोट्याशा खोलीत मंद प्रकाशात मेणबत्त्या लुकलुकत होत्या. खिडकीबाहेर हलका पाऊस सुरू होता, आणि त्या शांततेला भेदत एक जुनं, सोज्वळ गाणं स्पीकरवर वाजत होतं — "लग जा गले..."

हे गाणं वर्षाला फार आवडतं, हे मला माहित होतं. ती डोळे मिटून ऐकत होती, आणि तिच्या चेहऱ्यावर एक स्वप्नाळू हास्य उमटलं होतं. त्या क्षणी ती इतकी सुंदर भासत होती की माझं संपूर्ण भान हरवलं.

तिच्या डोळ्यांत काही बोलणं होतं, जी तोंडून येत नव्हती, पण ती भावना स्पष्ट जाणवत होती. आणि मग...
तिनं माझ्या हातावर हात ठेवला.

तो स्पर्श कोमल होता, पण त्यामागचं प्रेम स्पष्ट होतं. मी काहीतरी बोलणार इतक्यात...

फोन वाजला — "तेजी कॉलिंग..."

मी फोन उचलला. तिकडून ती गडबडलेल्या आवाजात बोलली,
"आकाश... प्लीज... मला तुझी मदत हवी आहे. मी पळून जाणार आहे. लग्न करायचंय. तूच एकटाच आहेस ज्याच्यावर मला विश्वास आहे... माझ्यासाठी पहिल्यांदाच काहीतरी मागतेय... मदत करशील ना?"

मी सुन्न झालो. आवाजात तिचा निर्धार होता, पण आत कुठेतरी घालमेलही होती.

फोन कानाला ठेवून मी वर्षाकडे पाहिलं.
ती काहीही न बोलता, फक्त मला बघत होती. तिच्या नजरेत प्रश्न होते...


माझ्या मनात वादळ होतं.
तेजी, जी पहिल्यांदाच काही मागते आहे.
आणि वर्षा, जिला काहीच मागावं लागत नाही — तिचं प्रेम गप्पच, पण खरंखुरं.

मी काय बोलावं, कसं समजावं, काहीच सुचत नव्हतं.

तेजीचा कॉल संपला, पण माझं मन थाऱ्यावर येईना. डोक्यात विचारांचे वादळ चालूच होतं.
समोर वर्षा बसलेली होती. तिचा चेहरा हलकासा बदललेला… पण नजर अजूनही माझ्यावर.

"आकाश," तिनं हळू आवाजात विचारलं,
"काय झालं? तुझा चेहरा चिंतेने भरलाय… काही प्रॉब्लेम आहे का?"

मी काही क्षण तिच्याकडे पाहत राहिलो.
माझा अंतर्मन सांगत होतं की आज सांगून टाकावं सगळं. काही लपवायचं कारण उरलं नव्हतं.

मी खोल श्वास घेतला आणि हळूच बोलायला सुरुवात केली.

"वर्षा… तो कॉल तेजीकडून होता. ती घरातून पळून जाणार आहे... लग्नासाठी. मला म्हणाली, पहिल्यांदाच कोणाकडे काही मागतेय... आणि तिला माझी मदत हवी आहे.
आणि... वर्षा, मला हेही कबूल करायचंय की मी तिच्यावर प्रेम केलं होतं... अजून आहे कदाचित. पण हल्ली...
...हल्ली तुझ्याकडे पाहिलं की माझं मन शांत होतं."

मी एक क्षण थांबलो.

"तुझ्या डोळ्यांत जे प्रेम आहे, ते मला कधीच शब्दांत सांगितलं नाहीस... पण ते मी रोज अनुभवतो."

हे ऐकून वर्षाचा चेहरा थोडा गडद झाला. तिनं डोळे खाली झुकवले.
क्षणभर दोघंही गप्प झालो.

पण मग, तिनं माझा हात हलकेच पकडला. घट्ट.

"चल," ती म्हणाली, "आपण तेजीला मदत करू.
प्रेम म्हणजे फक्त मिळवणं नाही... कधी कधी त्यासाठी त्याग करावा लागतो.
मी तुझ्यासोबत आहे, आकाश."

तिच्या डोळ्यांत थोडंसं दुःख होतं, पण त्यापेक्षा जास्त होता विश्वास…
माझ्यावर, आणि माझ्या निर्णयावर.

त्या क्षणी मी समजलो — वर्षांचं प्रेम त्या जुन्या गाण्यासारखं होतं — शांत, शाश्वत, आणि अंतर्मनाला भिडणारं.
आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो जिथे त्यांनी याला सांगितले होते. ते तिथेच आमची वाट बघत उभा होते 
राज म्हणाला, “सगळी तयारी मी केली आहे. कोर्ट मॅरेजचं अपॉइंटमेंट घेतलं आहे. ती तारीखही फिक्स आहे. आम्ही दोघं आज रात्री ट्रेननं जाणार आहोत.”
तेजी म्हणाली, “आकाश, मला स्टेशनवर सोड. राजचा एक मित्र तिथं भेटणार आहे. त्याच्याकडे तिकिटं आहेत. त्याच्यासोबत आम्ही निघणार आहोत.”

मी काही बोललो नाही. फक्त मान हलवली.

गाडी स्टेशनच्या दिशेनं चालवायला सुरुवात केली. मनात फारसं काही उरलं नव्हतं, पण थोडा शांत वाटावं म्हणून रेडिओ लावला.
आश्चर्य म्हणजे रेडिओवर तेच जुने गाणं लागलं जे त्या हॉटेलमध्ये चालू होतं — जिथं माझ्या आणि वर्षाच्या मध्ये थोडा भावनांचा क्षण निर्माण झाला होता.

माझं लक्ष आरशात गेलं.

तेजी राजचा हात घट्ट धरून होती आणि त्याच्या खांद्यावर डोकं टेकवून डोळे मिटले होते. दोघंही एकमेकांमध्ये हरवलेले.
ते पाहून माझं मन खूप दुखावलं.

डोळे नकळत भरून आले.
लहानपणापासून ती मला आवडायची.
माझं तिच्यावर प्रेम होतं, पण कधी बोललो नाही.
आता जेव्हा ते तिचं प्रेम मी कोणाच्या तरी दुसऱ्याच्या हातात पाहिलं, तेव्हा मन सुन्न झालं.

एक क्षणासाठी वाटलं की गाडीचा एक्सिडेंट करून सगळंच संपवावं.

पण लगेचच विचार आला — की यांच्यात यांचा काय चुकलं?
राज आणि तेजी दोघांनाही माझ्या भावना माहिती नव्हत्या.
त्यांनी काही चूक केली नव्हती.

त्या क्षणी वर्षानं माझ्याकडे पाहिलं. माझे पाण्यानं भरलेले डोळे पाहून ती काहीच बोलली नाही. फक्त माझ्या हातावर हात ठेवून हलकेच थोपटलं.

ती समजू शकली — माझं मन, माझं दुखः