Flaxseed? in Marathi Cooking Recipe by Vrishali Gotkhindikar books and stories PDF | अंबाडीची भाजी?

Featured Books
  • Wisps of Smoke - 38

    Wisps of Smoke (A love, romantic, psychological and paranorm...

  • NAVORA

    NAVORAPrologue — A Flower That Became a DreamSometimes, a bu...

  • The Story of Navaratri

    Navaratri is a nine-day Hindi festival celebrated throughout...

  • Specialz

    "Here you go- master" Yomi sets the cup of tea on the paper...

  • Price Tag on Passion

    The rain lashed against the French windows of Mayur’s pentho...

Categories
Share

अंबाडीची भाजी?


अंबाडीची भाजी (अळणी) खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्यात जीवनसत्वे आणि खनिजांचे प्रमाण जास्त असल्याने ती आरोग्यासाठी खूप चांगली आहे.

अंबाडी भाजी खाण्याचे फायदे:

हृदय निरोगी ठेवते:अंबाडीमध्ये ओमेगा-3 आणि ओमेगा-6 फॅटी ऍसिड असतात, जे हृदयासाठी खूप चांगले असतात. ते रक्तवाहिन्या स्वच्छ ठेवतात आणि हृदयविकार होण्याचा धोका कमी करतात.

उच्च रक्तदाब कमी करते:अंबाडीमध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे रक्तदाब कमी होण्यास मदत होते.

वजन कमी करण्यास मदत करते:अंबाडीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे पोट भरलेले राहते आणि वजन कमी होण्यास मदत होते.

खराब कोलेस्ट्रॉल कमी करते:अंबाडीमध्ये असलेले आवश्यक फॅटी ऍसिड खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात.

रोगप्रतिकारशक्ती वाढवते:अंबाडीमध्ये अँटिऑक्सिडंट्सचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि अनेक आजारांपासून संरक्षण मिळते.

त्वचेसाठी चांगली:अंबाडीमध्ये जीवनसत्वे आणि अँटिऑक्सिडंट्स असतात, जे त्वचेला निरोगी ठेवतात आणि वृद्धत्वाची प्रक्रिया कमी करतात.

पाचन सुधारते:अंबाडीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठता कमी होते.

डोळ्यांसाठी चांगली:अंबाडीमध्ये जीवनसत्व ए चे प्रमाण जास्त असते, जे डोळ्यांसाठी खूप आवश्यक आहे.

शारीरिक ऊर्जा वाढवते:अंबाडीमध्ये आवश्यक पोषक तत्वे असतात, ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि थकवा कमी होतो. 

अंबाडीची भाजी नियमितपणे खाल्ल्याने अनेक आरोग्य फायदे मिळतात. त्यामुळे आपल्या आहारात अंबाडीचा समावेश करणे आवश्यक आहे.

असे गुगल सांगते

🌿 अंबाडीची भाजी बरेच लोकांना खूप आवडते

🌿 खरेतर लग्नापूर्वी मला ही भाजी फारशी आवडत नसे

माझी आई ही भाजी शिजवुन पिळून पीठ लावुन वरती लसणाची चरचरीत फोडणी देऊन करीत कोरडी करत असे

वडील त्यावर अगदी ताव मारत असत😋

मला मात्र ही भाजी केली की सोबत गुळांबा लागत असे 😀

मग कुठे चाखत माखत जेवण होई😀

🌿 लग्नानंतर मात्र  सासुबाईंनी केलेली  ही भाजी जेव्हा पहिल्यांदा पानात पडली

तेव्हा मुकाट खावी लागली होती कारण

(तेव्हा गुळांबा वाढायला आई समोर नव्हती.. शिवाय पानात काही टाकायचे नाही हे पण वळण होतें)

त्या दिवशी सासुबाईंनी ही भाजी त्यांच्या पद्धतीने केली होती

जी मला अतिशय आवडली

आणि मग कायमच आवडू लागली

सासुबाई ही भाजी इतकी चविष्ट करीत की त्यांच्या हातची ही भाजी खायला त्यांचे दिर किंवा इतर नातेवाईक आवर्जून येत असत

त्या सुध्दा ही भाजी भरपूर प्रमाणात करीत

शेजारी पाजारी लोकांना वाटीत अथवा डब्यात घालुन देत..

जेव्हा अंबाडी खुप छान मिळत असे त्या सिझन मध्ये त्या  शेजारी असणाऱ्या त्यांच्या दोघा दिरांना आवर्जून जेवायला बोलावून घेत असत..

ते पण अशा बोलावण्याची वाट पाहत असत

अगदीं त्यांच्या जावांनी सुध्दा या भाजीतले बारकावे त्यांच्याकडून शिकून तीच पद्धत चालू ठेवली..

आमचे अहो तर ती भाजी चक्क नुसती कांदे पोह्या सारखी बशीत घेऊन खात असत 😀

मी पण ही भाजी सासूबाईंकडून शिकुन घेतली

पण प्रत्येक वेळी करताना त्यांच्या हातची चव मात्र आठवतेच...❤️

🌿 मी ही भाजी आवडीने खाते समजल्यावर आईला नवल वाटले

घरी ही मुलगी भाजी पानात घातलेली कशीतरी खात होती..... आणि आता आवडते म्हणते 😀😀😀

मग मी तीला ही त्यांच्या पद्धतीची भाजी खाऊ घातली...

तीला सुध्दा इतकी आवडली की तिने माझ्याकडुन शिकून घेतली...❤️

आणि ती सुद्धा त्या प्रकारे ही भाजी करू लागली..🙂

🌿 उन्हाळ्याच्या दिवसात अंबाडी खुप चांगली मिळते

लगेच  सासूबाईंच्या पद्धतीने ही भाजी केली ..

🌿 प्रथम अंबाडीच्या भाजीची पाने काढून बारीक चिरून घेतली

एका पातेल्यात ही भाजी बुडेल इतके पाणी घालून झाकण लावुन शिजवून घेतली

🌿 ही नावाप्रमाणेच आंबट असल्याने गार झाल्यावर

त्यातले पाणी काढून ती चांगली पिळून घेतली

🌿  पिळून घेतलेली भाजी बाजूला ठेवली

एक लहान वाटी तांदुळ व एक वाटी शेंगदाणे (काही ठिकाणी  डाळ पण घालतात) कुकर मध्ये कमी पाण्यात शिजवून घेतलें

(फार मऊ तांदुळ शिजवू नये)

🌿 गार झाल्यावर ते हाताने मोकळे करून घेतले

माझ्याकडे लाल तांदुळ होता त्यामुळे तो चांगला फडफडीत शिजला होता जसा या भाजीला आवश्यक आहे

🌿 एक मोठा कांदा चिरून घेतला

सात आठ लसूण पाकळ्या सोलुन घेतल्या

पातेल्यात थोडे जास्त तेल घालुन मोहरी हींग लसूण घालुन फोडणी केली

त्यात कांदा परतून घेतला

🌿 एका वाफेनंतर

शिजवलेले तांदुळ व शेंगदाणे घालून परत झाकण ठेवले एक वाफ आणली

नंतर पिळून ठेवलेली अंबाडी हातानी मोकळी करून घातली

हळद, तिखट, मीठ घालुन सर्व मिसळून घेतले

व ती त्या पातेल्यात घालून चांगली मिसळून परत झाकण ठेवून वाफ आणली

🌿 तयार भाजी खाली काढल्यावर परत एकदा तेलात मोहरी हिंग घालून लसणाच्या पाकळ्या लाल करून ती चरचरीत फोडणी भाजीवर ओतली.

🌿 खुप खमंग चरचरीत ही भाजी भाकरी सोबत छान लागते 😋