लग्नगाठ - 1 in Marathi Love Stories by Neha Kadam books and stories PDF | लग्नगाठ - 1

Featured Books
  • آنکھ کی طرح جھیل

    جھیل جیسی آنکھیں میں جھیل جیسی آنکھوں کی گہرائیوں میں ڈوب گی...

  • Safar e Raigah - 7

    منظر ۔ اچھا تو تم ہسپتال تب سے جانے والے ہو تم بس ایک مُسافر...

  • شائستگی

       آنکھیں ہم آنکھیں ملنے نکلے ہیں۔ ہم کون سا...

  • Safar e Raigah - 6

    باب شاہمیر کی دنیا ہمیشہ سے ہی اس کے اسکول کی کتابوں اور پرا...

  • زندہ

    انتظار کر رہا ہے۔میرے نازک دل کو توڑ کر تم پوچھ رہے ہو میں ک...

Categories
Share

लग्नगाठ - 1

अखेरची मंगलाष्टकं झाली तसं सर्वांनी अक्षता टाकल्या. नंतर अनघा आणि अनय ने एकमेकांना वरमाला घातली. आणि टाळ्यांच्या गजराने मांडव गजबजला..... त्यानंतर गुरुजींनी पुढचे विधि उरकले..... एका तासानंतर सर्व विधि आटोपले आणि लग्नं कार्य समाप्त झाल्याचे गुरुजींनी सांगितले..... 
               लग्नं कार्य आटोपताच आलेल्या सर्व पाव्हण्यनी नवरा नवरीला आणलेले आहेर वैगरे दिले. नंतर नवरा नवरी सोबत बाकी नातेवाईक जेवले मग पाठवणीची वेळ आली.... 
                अंतराला थोडी भीती तर होतीच शिवाय लग्नाला च ती काका काकूंच्या जबरदस्तीने तयार झालेली तिला लवकर लग्न नव्हतं. करायचं तास तर पण लहानपणापासून आई गेल्या नंतर एकपण गोष्ट कधीच तिच्या मनासारखी झाली नव्हती... ती फकट काकू सांगेल तासच करायला लागायचं....कारण आई गेल्या नंतर बाबा नी तिची सर्व जबादारी काका काकू वार सोडून दिलेली..... फक्त महिन्याला तिचा वाटणीचे पैसे पाठवायचे.... बाकी ती खुश आहे का ?? तिला काही त्रास वैगरे नाही ना हे सर्व बघायला त्यांच्या कडे कधिच वेळ नव्हता कीवा त्यांना काहीच देणं घेणं नव्हत.   म्हणून ते कधिच तीला भेटायला ही येत नसत..... 
                काकुतर अनघा ल समजायला लागलं तास नोकरासारख राबवून घ्यायची. वरून तिच्यासाठी पाठवलेले ल्या पैशातून स्वतच्या मुलीचे शोवक पुरवायची मग उरलेलं सुरलेल असेल ते तिला घ्यायची... अनघा ल कधी कधी कशाला रोज च आई ची आठवण यायची.. रात्री रोज रडत रडत छा झोपायची ती.... आजूबाजूला अस कोण्ही नव्हत जे तिला प्रेम करेल... सर्व फकत् फायद्यासाठी वापर करायचे.... काका कधी कधी साईड घ्यायचे पण  घर काकुच म्हणून त्यानं जास्त काही बोलता येत नसे.... काकू ल तिला शिक्षणासाठी ही मनाई केलेली... पण जेव्हा काकांना समजला तेव्हा त्यांनी काकूला सांगितला जर अनघा शिकणार नसेल तर मी तिला नेऊन अनाथ आश्रमात टाकीन.... काकूला तिच्यासाठी येणारा पैसा भेटणार नाहि म्हणून नाईलाजाने काकू तयार झाली. अशाप्रकारे अनघाने शिक्षण पूर्ण केले ग्रॅज्युएशन कंप्लीट झाले तसं जॉब ल लागलेली... पण ते पैसे ही काकू घ्याची मग.... काका नी तिला सांगितला तुझ पगार येतो तो काकी ल देऊ नको... तुला ठेवत जा थोडे कधी तरी कमला येईल
                मग काकू क्या नकळ त तिने थोडे थोड करत स्वतःसाठी पैसे बँकेत ठेवले पण सहा महिनेच झालेले लागून आणि मध्येच लग्नासाठी मुलगा बघायला घेतलेला . म्हणून savings काही जास्तं करता आला नाही लग्नाला उभ राहायला लागला.... 
                अनघा च्य मनात खूप प्रश्न होते... ती जाताना डोक्यात विचार करत होती कसा असेल पुढचा प्रवास? आता तरी मनासारखं जगता येईल का ?? की तिकडे पण अखं आयुष असच काढायला लागेल... खूप प्रश्न आणि भिती घेऊन ती जात होती
               अनघा आणि अनयची गाडी एका घराजवळ येऊन थांबली.. घर तास चोटाच होता हॉल आणि किचेन लागून होता.. आणि एक अजून कोटी खोली होती... 
                अनघा ने माप ओलंडल आणि ती आतमध्ये आली .... जमलेली सर्व मंडळीं ही आप आपल्या घरी गेले तास तिकडे फक्त अनय अनघा आणि अनायची आई म्हणजे मनिषताई होत्या .... इतक्यात बाहेरून एक ३ वर्षाची गोडे मुलगी बोबडा बोलत बाबा बाबा करत आतमध्ये आली.... तिच्या बोलण्याने अनघा मात्र गोंधळी तिने विचारलं ह्या कोण?? तास अनय ही गोंधळला आणि म्हणाला ही आरवी माझी मुलगी..... अनघा ल स्वतच्या कानावर विश्र्वासच बसत नव्हता .... तिने पुढे काही विचारायच्या आधीच अनय म्हणाला तुम्ही असा का विचारता?? आई ने घरी येऊन सर्व गोष्टी सांगितलेल्या..... अंतराला अजूनच धक्का बसला तास ती सुन्न झाली धक्यानेच काही बसली.... आणि म्हणाली मला नाही सांगितला अस काही आहे ते.... अस बोल्याबरोबर अनय अजून च रागाने लाल झाला.... बाजूला असलेली खुची ल लाथ मारून त्यने आईला विचारलं...
                  हे सगळं काय आहे अस कस काय?? मनिषाताई घाबरत म्हणाल्या मी सांगितलेला तिच्या काकूंना.... त्या म्हणाल्या अमहला काहीच प्रॉब्लेम नाही.... हे ऐकून अनघा अजूनच सुन्न पडली....तिच्या बाबतीत काय चालू आहे हेच तिला समजतं नव्हत..
अनय चिडून मनिषताईना म्हणाला तू मला बोलली लग्नं कर म्हणून मी लग्नाला तयार झालेल. मला कोणाचंही लाईफ बरबात नव्हत करायचं... तू मला सांगितलेला जे सत्य आहे ते मी तिच्या घरच्या बरोबरच मुलीला ही सांगिन मग तू अनाघा ल का नाही सांगितलस....???
                  त्याने एक हात भिंती वार आपटत मनीषा ताई ना विचारले तास मनीषा ताई गप्प झाल्या त्यांच्याकडे काहीच उत्तर नव्हतं. त्या म्हणाल्या मला नव्हता माहीत तुला नाही माहित आहे ते .मला वाटलं काकूंनी तुला सांगितला असेल.... त्या अनघा जवळ जात बोल्या तास रागाने अनय बाहेर निघून गेला....
                   मनिशताई एवढं बोलत होत्या तरी अनघा तीच्यच विचारत होती... तिला काय बोलावं तेच समजत नव्हतं...शेवटी मानिषताई निघून गेल्या तेव्हा ती डोळे बंद करून पडली तिला सर्व समजत होता काकू लग्नाची घाई कशाला करत होती ते .... वरून लग्नात काही द्याला नको म्हणून असा मुलगा पहिलं ज्याची स्वतची काही तरी कमी असेल..... तिला चांगलं समजलेला तिच्या सोबत झालेली फसवणूक....
                       शेवटी ही रात्र ही तिने रडतच काढली. विचार आणि रडता रडता कधी डोळा लागला तीलच नहीं समजल.
                      सकाळी खिडकीतून आलेली हलकी सूर्य किरण डोळ्यावर पडली तशी  तिला जाग आली.... तिने डोळे उघडले आणि जवळच असलेल्या बागेतून कपडे घेतले आणि फ्रेश झाली.... बाहेर आली तशी पहिलं की मनिशाताई चाई बनवत होत्या... तिला काय सुचतच नव्हता.  मनीषा ताई पण थोड्या नाराज होत्या त्यांना पण काय बोलावं सुचत नव्हता....  
                     तरी त्यांनी अनघा ला चहा विचरला तिने त्यांच्या जवळ जात तुम्ही बसा मी घेते चहा अस बोली.... मनिशताईना थोडा बर वाटला.... पण त्यांनी तिला चहा उतरवू दिला नाही.... त्यांनी तिला बसायला सांगितलं आणि स्वतः चहा तिला आणून दिला... 
                    पहिल्यांदाच तिला कोणतरी चहा आणून दिलेला.... तिने त्यांच्या कडे पाहिलं तास त्यांचे डोळे भरून आलेले .... तिने त्यानं बसायला सांगितलं आणि चहा वीचरला त्या नाही म्हण्याल .... त्यानी लगेच हात जोडत तिची माफी मागितली तशी ती पुन्हा गोंधळली..... तिला काय बोलावं सुचत नव्हत तशी चूक तर तिच्या च घरच्यांची होती पण ती त्यांनाच काही बोलू शकत नव्हती.... तर ह्यांना काय बोलणार होती..?? तिला राग तर आलच नव्हता कोणाचं पण ती कोणाला माफ पण करू शकत नव्हती.... कारण शेवटी फसली तर फक्त तिच गेली होती....
                    तिने कसं बस मनिषताईन शांत केला ... नंतर चहाचा एक एक घोट घेत ती विचार करत होती. इतक्यात आर्वी आली .... ती ने सर्व खेळण्याचा पसारा करून एकटीच  खेळू लागली..... मधेच ती काही काही स्वतशीच बोलत होती... 
                    तिच्याकडे पाहताना तिला स्वतःच बालपण आठवलं तिला कधीच अस खेळायला नव्हता भेटलं....तिचा निरागस बालपण बघता बघता तिला अचानक आठवलं.... ती एवढं निरागस बालपण जगतेय कारण तिचा बाबा आहे तिच्या पाठी आणि आपण आपला तर कोणाचं नाही... हिची आई कुठे गेली असेल?? नशीब तिचा बाब खूप जीव लावतो तिला नाहीतर तिचा पण आपल्यासारखाच झालं असतं तर?? मग्न विचारत असतानाच तिला आर्वीच्या रडण्याचा आवाज आला... तशी ती भानावर आली..... आर्वी चालता चालता पडली तास तिला लागला.... म्हणून रडू आला... 
                    अनघा ने तिला उचलून खांद्यावर घेतला..आणि डोक्याला लागलेला हाताने चोळत थोडा शांत करत होती ..... डोक्यावर अनघाचा हात फिरतच थोड्या वेळाने ती शांत झाली ..... तास मग अनघा ने तिला मांडीवर झोपवून थोडा गरम पिशवीने शेकवल... तिला जेवण ही आज अनघा नेच भरवल... काही वेळाने डोकं शेकवता शेक्वता आर्वी अनघाच्या मांडीवर झोपून गेली... 
                     हे सर्व मनीषा ताई लांबूनच बघत होत्या....