Amla Purana in Marathi Cooking Recipe by Vrishali Gotkhindikar books and stories PDF | आवळा पुराण

Featured Books
Categories
Share

आवळा पुराण

माझ्या बागेत आवळ्याचे झाड आहे निसर्गाची देणगी म्हणा अथवा देवकृपा🙏..ऑक्टोबर _ नोव्हेंबर.. आणि एप्रिल_ मे महिना असा वर्षातून दोन वेळ त्याचा बहर असतो खरे म्हणजे तुळशीच्या लग्नापासून आवळे मिळू लागतातया सिझनला आवळ्याचे बरेच प्रकार करतातअनेक जण एकत्र येऊन वेगवेगळे पदार्थ घेउन येऊन आवळी भोजन सुद्धा केले जातेआयुर्वेदात आंबट- गोड -तुरट चवीच्या या आवळ्याला पृथ्वीवरचे सर्वश्रेष्ठ फळ मानले जाते.रोज निदान एक तरी आवळा खावा असे म्हणतात आवळ्याचे शरीराला खुप फायदे आहेतकेस काळे राहणेडोके शांत राहणेसदा उत्साहित वाटणे.. असे बरेचवार्धक्य पळवून लावण्यासाठी याचे सेवन करतात  बागेतल्या आवळ्याच्या झाडाचा जवळ जवळ..पन्नास ते साठ किलो इतका आवळा निघतोयाची उत्तम निगा छाटणी वगैरे काम "अहो"निगुतीने करतात ❤️आप्तेष्ट मित्र मैत्रीणी..आला गेलं या सत्समा वाटून, आपण भरपूर पदार्थ करून खाऊन सुध्दा इतका आवळा संपणे अशक्य आहेत्यामुळे एका गरजू माणसाला हे झाड मी दान केले आहेआवळे तयार झाले की तो स्वतः येऊन  झाडावर चढून काढून विकायला नेतो व त्यांचे पैसे ही तोच घेतोआवळ्याचे झाड नाजुक असतेफांद्याही फार बळकट नसतात त्यामुळे हे आवळे काढणे थोड जिकिरीचे असतेचढून फांद्या काढताना त्या मोडायची शक्यता असते पण तो ते काम व्यवस्थित करतो त्याच वेळेस आम्हाला गरज आहे तेवढे आवळे आम्ही काढून घेतोमिस्टर आयुर्वेदिक डॉक्टर आहेत ते थोडा च्यवनप्राश तयार करतातघरच्या पुरता थोडा🟢 आवळा  जाम🟢मोरावळा 🟢आवळा लोणचे 🟢आवळा चटणी🟢आवळा किसून सुपारी🟢आवळा कँडी🟢 आवळा फोडीची सुपारी 🟢 आवळ्याचा रस  असे प्रकार करतोंत्यांचे वर्णन इथे देते 🟢 आवळा जामयासाठी प्रथम आवळे किसून घ्यावेजेवढे आवळे त्याच्या दीड पट साखर अथवा गुळ घ्यावाआंबट आवडत असल्यास हे प्रमाण कमी घेतलें तरी चालते.माझ्या कडे कोल्हापुरी उत्तम गुळाची काकवी होतीमी ती वापरली आहेआवळ्याचा कीस थोड्या तुपावर परतून घ्यावायानंतर त्यात गूळ घालावा व शिजायला ठेवावेप्रथम हे मिश्रण पातळ होतेंनंतर हळूहळू घट्ट होतेमिश्रण आटत आले की सात आठ लवंग काड्या व सुंठ पावडर घालावीयामुळे चव चांगली येते.घट्ट झाल्यावर खाली काढावेगार झाले की बरणीत भरावेबरणी फ्रिज मधे ठेवून लागेल तेव्हा काढून वापरावाब्रेड पोळी पराठा सोबत.. अथवा नुसता सुद्धा छान लागतो🟢 मोरावळासाहित्य आवळे एक किलो जितके किलो अवळे तितकाच गुळ  वेलदोडे पूड आवडीनूसारसुंठ पावडर आवडीनूसारसैंधव मीठ चिमूटभरकृतीसर्वप्रथम आवळे स्वच्छ धुवून, बुडतील इतके पाणी घालून एक रात्र पाण्यात भिजत ठेवावेत.नंतर दुसरे दिवशी आवळे पाण्यातून काढून स्वच्छ पुसून कोरडे करावेत व काटे चमच्याने सर्व बाजूला आतपर्यंत टोचून छिद्र पाडावीत.हे टोचलेले आवळे गरम पाण्यात घालून पाच दहा उकळून द्यावे. आता आवळे पांढरट दिसू लागतात.ते पाण्यातून निथळून काढावेत व गरम असतानाच गुळ किंवा साखर मिसळून घ्यावी.एक रात्र हे मिश्रण तसेच ठेवून द्यावे. दुसरे दिवशी गुुळ विरघळून पाणी सुटलेले असेल हे मिश्रण मंद गँसवर  ठेवावे व सतत ढवळत रहावे.गुळाचा पाक होईल व आवळे पारदर्शक दिसू लागतील वेलदोडे पूड व थोडे मीठ घालावे व गँस बंद करावा. हा  पाक दाट असावा अति घट्ट किंवा पातळ नको.गार झाल्यावर मोरावळा कोरड्या केलेल्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवावा. चार पाच दिवसांनंतर मोरावळा खाण्यायोग्य होतो. हा मोरावळा टिकावू आहेफ्रीज ला ठेवायची गरज नाही 🟢 आवळा लोणचे पाच आवळ्याच्या लोणच्याचे खालील प्रमाण मी घेतेएका आवळ्यात आठ फाकी असतात त्यासाठी एक मोठा चमचा बेडेकर मसालाथोडा लहान चमचा तिखटतितकीच मोहरी डाळअर्धा चमचा मेथी पावडरपाव चमचा हळददोन मोठे चमचे मीठ प्रथम कुकर ला आवळे वाफवून घ्याशिट्टी होण्यापूर्वी गॅस बंद करानाहीतर आवळे जास्तं शिजतीलगार झाल्यावर त्यातील पाणी बाजूला काढून ठेवाआवळ्याच्या बिया काढून हाताने त्याच्या फाकी हलकेच बाजुला करून घ्या या आवळ्याच्या फोडी बरणीत घालुन आवळे उकडलेले गार झालेले जे पाणी ठेवले आहे ते त्यात मिसळाआधी सांगितलेला प्रमाणातील सर्व मसाला यात चांगला मिसळून घ्याफोडणी साठी एक मोठा चमचा तेलमोहरीमेथी दाणे हिंगफोडणी करून गार झाल्यावर मगच त्यात तिखट घाला म्हणाजे चांगला रंग येतो लोणचे टिकावू नाहीचार पाच दिवसात खाऊन टाकावे🟢 आवळा चटणीदोन आवळेएक वाटी खोवलेले ओले खोबरेसाखरमीठजिरेएक मिरचीआल्याचा बारका तुकडाकोथींबीरहे सर्व मिक्सर ला वाटून घ्यावेवरून मोहरी हींग कढीपत्ता फोडणी द्यावी चविष्ट चटपटीत चटणी तयार होतेंप्रकार दुसराआवळे खिसून घ्यावेत्यात मीठ साखर चवीनुसारबारीक चिरलेली कोथींबीर घालुनवर थोडे तिखट घालून फोडणी देऊन कालवावे 🟢 आवळ्याची किसलेली सुपारीआवळे व त्याच्या पाव प्रमाणात आले मोठ्या किसणीने किसुन घ्यावेसैंधव मीठहिंग पुडहळद पुडया किसाला चांगलें चोळून घ्यावेमीठ थोडे जास्त असावेउन्हात सुपारी ठेवल्यावर मिठाचा अंश थोडा कमी होतोउन्हात ठेवताना ताटाला एखादे पातळ फडके झाकावेसाधारण तीन दिवसात सुपारी खडखडीत वाळतेनंतर प्लास्टिक पिशवीत घालून घट्ट झाकणाच्या बरणीत भरावीतोंडाला स्वाद आणणारी चविष्ट व पाचक सुपारी तयार होते 🟢 आवळा कँडीआवळे उकडून घ्यावेतत्याच्या बीया काढून फाकी वेगळ्या कराव्याया सर्व फाकी एका पातेल्यात घेउन त्या पुर्ण बुडतील इतकी साखर त्यात घालावीतीन दिवस हे पातेले झाकून ठेवावेया दरम्यान साखरेचे पाणी होऊन त्यात आवळे ते शोषून घेतील व त्याला गोडी येईल तीन दिवसांनी या फाकी काढून उन्हात वाळवून ठेवाव्यात्यातील साखरेचे जे पाणी राहतेते एका बाटलीत भरुन फ्रिज मध्ये ठेवावेसरबत करण्यासाठी वापरता येतेसरबत करताना मीठ घातले की झाले🟢 आवळा रसआवळ्याच्या फोडी बारीक चिरुन घ्यावेतसेच आले बारीक चिरावेदोन्हीं एकत्र मिक्सर मध्ये पाणी घालून छान पातळ सर बारीक करावेहा रस बर्फाच्या ट्रे मधे घालून फ्रिज मध्ये ठेवावाआयत्या वेळेस क्यूब काढून वापरता येते असे हे आवळा पुराण सुफळ संपुर्ण 😊