farmers life in Marathi Motivational Stories by ankit ingle books and stories PDF | कर्मा रिटर्न

Featured Books
Categories
Share

कर्मा रिटर्न

  दैनंदिन जीवनमधे काही उतार आणि चढ़ाव ही येत राहतात आणि हेच उतार चढ़ाव माणसाला काहीतरी नवीन शिकावण्याचा प्रयत्न हे करत असतात पण आपण त्या पासून काहीतरी हे शिकून जीवनमधे बदल केला पाहिजे. 

जेणेकरून माणसाने त्याच्या जीवनामध्ये झालेल्या चुका ह्या पुनः होऊ नये आणि आपला वेळ त्याच चुका पुनः करण्यात वेळ हा वाया जाणार नाही '

 


देव हा प्रतेकाला हिरा  म्हणून जन्माला आणत नसतो पण प्रतेकाला हिरा बनण्याच्या संधि मात्र देत असतो त्या संधीचे रूपांतर आपण आपल्या जीवनाला योग्य आकार देण्यासाठी केला पाहिजे . 

देव हा प्रतेकाची कठीण परीक्षा हे घेत असतो परंतु आपण आलेल्या प्रतेक अडचणीचे रूपांतर हे चांगल्या संधीमद्धे केले पाहिजे. 

यावरच आज मी काही गोस्ट किंवा उदाहरण तुम्हाला देणार किंवा सांगणार आहे. 

 

 

 

तर ही गोस्ट मी तुम्हाला सांगायला सुरुवात करतो . 

              

                   मी एक सर्व साधारण कुटुंबामधला तुमच्यातलाच एक व्यक्ति आहे. माझे इय्यता १ ली ते १० पर्यंतचे शिक्षण हे गावातील सरकारी शाळेमध्येच झाले . 

११ वी आणि १२ वी साथी मी तालुक्या ठिकाणी हे माझे अॅडमिशन केले १२ पर्यन्त माझे जीवन हे फार आनंदात गेले . पन  जशी माझी १२ वी संपली  तेव्हा पासून घरची  परीस्थिति ही थोडी -थोडी खराब होऊ लागली नंतर मी कामाला जाऊन शिक्षण सुद्धा करू लागलो  त्या नंतर शाळेमध्ये मी हुशार होतो परंतु कामामुळे शाळेतले लक्ष हे कमी होऊ लागले . 

पन कामाला गेल्या शिवाय दूसरा पर्याय हा नव्हता माझ्या घरीची ३ एकर जमीन होती पण  बाबांकडून ती  वयामानाणे पुरेपूर जमिनीची मशागत व्हायची नाही त्या कारणांमुळे योग्यरित्या ती जमीन पिकायची नाही आणि जमीनिमधून पाहिजे तसे पीक हे व्हायचे नाही. त्या मुळे  घरची परिस्थिति हे हालाकीची होत चालली होती त्या मुळे  मला हे कंपनी ,शेतात ,मजुरी करायला जायला लागायचे . 

मग घरचे शेत हे घरापासून ४ ते ५ किलोमीटर दूर होते आणि आमच्या कडे जाण्यासाठी फक्त पैदल वाट होती कारण घरी  ना सायकल किंवा मोटसायकल ही नव्हती त्या मुळे पैदल जायला हे १ तास लागायचं आणि यायला १ तास लागायचा पण आमच्या काकाकडे ही मोटरसायकल होती मग एककेदिवसी अचानक शेतामद्धे महावीतरण वाले  शेतामद्धे वीज जोडणी साथी आले व मला लवकर शेतात जायचे होते बाबांना घेऊन मग  मी माझ्या काकुकडे गेलो . मोटरसायकल ची चाबि  मांगायला काकाहे ऑटो चालवायला गेले होते . मग काकू म्हणाल्या की मोटरसायकल ची चाबि मांगली काकू म्हणाल्या तुझ्या काकांनी मोटरसायकल ची चाबि  ऑटो सोबत घेऊन गेले आहे एवढे बोलून काकूंनी मोटरसायकल ची चाबि देण्यास मनाई केली 

मग माझे बाबा आणि मी माझ्या शेतात जाण्यासाठी पैदल जाण्याचे ठरवले आणि पैदल जाण्यास सुरुवात केली आणि माझ्या मनामध्ये त्या क्षणापासून एक जिद्द निर्माण झाली की आपल्याला पन मोटरसायकल घ्यायची आहे 

👍

मग काय जिद्द मनाची मेहनत हाताची आणि साथ देवाची..           !

 

 

 

२ ते ३ महीने सतत आई आणि बाबा भाऊ आणि मी चउघाने घुप मेहनत करून पैसे जमा केले आणि पैसे जमा करून एक जुनी १० हजार रुपयाची मोटरसायकल ही विकत घेतली 

या वरून एकच गोस्ट ही सांगायची असे वाटते ते म्हणजे 

जेव्हा माणसाची पारीस्थिति ही खराब असते तेव्हा कोन्हीही त्याला त्या वाईट काळामध्ये साथ देत नाही सघे संबंधी हे फक्त नावासाठी असततात जेव्हा माणसाचा वाईट वेळ  येतो तेव्हा त्या वेळेला तोंड ते स्वत लाच द्यावे लागते . हे त्याचे उत्तम उदाहरण आहे . 

 

 


एक व्यक्ति पैदल चालण्या पासून ते स्वताच अस्तित्व कसे निर्माण करतो आणि त्याच्या वाट्याला आलेल सुख आणि दुख याची कहाणी या लेखामध्ये सांगितली आहे 

 

 

 

       आणि या पूढील कहाणी लवकरच ..!

 

 

 

मोटरसायकल घेतल्यानंतर एक गोष्ट पक्की ठरवली –
"आता थांबायचं नाही, जिथं पोहचायचं आहे तिथं पोचायचं – कष्टाच्या रस्त्यानं."

त्या जुन्या मोटरसायकलने शाळा, काम आणि शेत – सगळीकडे मी फिरू लागलो.
दिवसा कंपनी, रात्री अभ्यास… आणि सुट्टीच्या दिवशी – पूर्ण वेळ शेतात.

ते दिवस खूप कठीण होते. ना पुरेसं झोपायला मिळायचं, ना स्वतःसाठी वेळ.
पण त्या कष्टांनी मला खूप काही शिकवलं –
"स्वतःवर विश्वास ठेवला, की अंधारातही वाट सापडते."


हळूहळू परिस्थिती बदलू लागली…

शेतीत थोडं यश मिळायला लागलं. थोडं तंत्रज्ञान शिकून शेतीत नवे प्रयोग केले.
कमीत कमी पैशांत, जास्त फायदा कसा होईल यावर अभ्यास केला.
कंपनीत अनुभव वाढत गेला, लोक ओळखायला लागले, आणि मी शिक्षणही पूर्ण केलं.

मग एक दिवस असा आला –
जिथं मी शेतात ट्रॅक्टर चालवत होतो – आणि तो ट्रॅक्टर माझाच होता.


मला आठवतंय, जेव्हा लोक म्हणायचे,

"ह्या परिस्थितीतून कुणी बाहेर येऊ शकतं का?"

मी फक्त हसलो… कारण मी परिस्थिती बदलली नव्हती,
मी स्वतः बदललो होतो.

माझं सांगणं एवढंच –
परिस्थिती काहीही असो,
जर मनात जिद्द असेल,
मेहनत हातात असेल,
आणि देवावर विश्वास असेल –
तर कोणतीही वाट अशक्य नाही.

पुढचं स्वप्न अजून मोठं आहे… पण यावेळी मी तयार आहे.
कारण एकदा जमिनीवर चालणारा माणूस उभा राहिला की,
आता तो आकाशाकडे बघतो – उंच भरारी घेण्यासाठी!


 

…पुढची कहाणी लवकरच!