. तीला मी शेजीबाई म्हणते .खरे म्हणजे ती माझ्या शेजारी रहात नाही ती आमची घर मालकीण आहे .आमच्या खालच्या मजल्या वर राहणारी ...पण शेजीबाई ..असे म्हणले की जो एक “आपुलकीचा” आणी मैत्रीचा “फील” येतो ना तो तिच्या बाबतीत मला पहील्यापासुन जाणवत होता .त्या छोट्या गावात मला भेटलेली ती पहिली स्त्री होती .. अगदी पहिल्या भेटी पासून च तीने मला जीव लावायला सुरु केले होते जणु काही ती प्रथम दर्शनी माझ्या” प्रेमात” पडली होती भाड्याचे घर पाहायला म्हणून आम्ही तिच्या कडे गेलो ..तिने सुंदर अशा कॉफी ने आमचे स्वागत केलेसहज म्हणून पाहिलेले हे पहिलेच घर आम्हाला लगेच पसंत पडले दुसऱ्या दिवशी पासून आम्ही तीथे राहायला गेलो लगेच दुसऱ्या दिवशी पासून तीने सूत्र हातात घेतली पहिले काही दिवस आमची डब्याची सोय तीने करून दिली त्या गावात खुप म्हणजे खुपच .उन्हाळा असे..!! दिवसभर कामावर जायचे म्हणजे गार पाण्याची नितांत गरज भासे .लगेच दुसऱ्या दिवशी पासून माझ्यासाठी तिने दोन फ्रिजर मधल्या बाटल्या तयार ठेवल्या मी बाहेर निघाले की बाटल्या हातात घेवून लगेच ती येत असे मग मी कोणते कपडे दागिने घातले यावर थोडी चर्चा होई मी गाडीत बसून गाडी वळवून जाई पर्यंत मला टाटा करायला ती थांबत असे यथावकाश माझा संसार लागला माझ्याकडे फ्रीज पण आला. आता गार पाणी द्यायची तीला गरज उरली नाही पण टाटा मात्र ती रोज न चुकता करीत असे ..माझ्या वेशभूषेचे ..दागिन्यांचे कौतुक मात्र न चुकता होत असे .माझ्या प्रत्येक गोष्टीची तीला अगदी अपूर्वाई वाटत असे एखादे दिवशी माझे ऑफिसमधून आगमन होताचक्षणी तिचा मुक्काम माझ्याकडे पडत असे..मला नेट कसे वापरायचे ते शिकवा फेसबुक शिकवा असा तिचा आग्रह असे . मी तीला सगळे आनंदाने शिकवत असे .माझ्या फेसबुक मधले वेगवगळे फोटो ,कमेंट पाहताना तिच्या चेहेऱ्यावर नवलाई दाटून येत असेकधी एखादे दिवशी घरी आले की .शेजीबाई चहाचे कप घेवुन हजर असे..!हसून म्हणत असे दमला असाल ना म्हणून चहा आणला तुमच्यासाठी खरे तर आयता चहा मला पण प्यायला बरे वाटे !!!माझ्या छोट्या संसारातील प्रत्येक वस्तु विषयी तीला भारी उत्सुकता असे तसे ते गाव लहान असल्याने शहरातली कोणतीही वस्तु तीथे नवीनच वाटत असे !!मग ती मला म्हणत असे पण शहरात जाल तेव्हा हे आणाल का ??मी आनंदाने होकार देत असे .तिला आवडणाऱ्या बर्याच वस्तू मी तिच्यासाठी शहरातून आणून दिल्या तिच्या लहान मुलांसाठी शहरातून वेगवेगळ्या प्रकारचा खाऊ आणीत असे तेंव्हा तिची मुले एकदम खुश होत असत .दिवस असे छान चालले होते आणि एक वर्षांने आमची बदली झाली शेजीबाईला सोडून जायची वेळ बहुधा जवळ आली होती तीला जेव्हा हे समजले तेव्हातिच्या डोळ्यात तरळलेले पाणी तिच्या भावना सांगत होते !यानंतर काही दिवसातच आम्हाला सर्व सामान गोळा करून निरोप घ्यायची वेळ आली त्या दोन तीन दिवसात माझ्या लक्षात आले की शेजीबाई एकदाही मला दिसली नाही चौकशी केली असता कुठे गावाला गेली होती म्हणे मला थोडी चुटपूट लागली कारण असे न सांगता ती कुठेच जात नसे .नंतर ती आली तेव्हा आम्हाला दुसरे दिवशीच निघायचे होते मी संध्याकाळी तीचा निरोप घ्यायला गेले .तिने कुंकु लावुन साखर दिली मला पण तिचा चेहरा नाराज दिसत होता .आमचे जाणे तिने मनाला लाऊन घेतले होते या आमच्याकडे कधी ही ..फोन करीत राहा अशी दोन तीन पोकळ वाक्ये ..मी ही बोलले ..मला ही त्यातील “फोल पणा समजत होता ..पण नाईलाज होता ..जाणे तर भाग होते ..पुन्हा भेट कधी होईल .सांगता येत नव्हते आम्ही गाडीत जावून बसलो आणी गाडीने एक वळण घेतले ..शेजीबाईचा निरोप घेण्या साठी मी घराकडे पहिले पण दारात कोणीच नव्हते ..मला समजले रोज मला प्रेमाने निरोप देणारी शेजीबाई आज दारात येणार नव्हती निरोपाचा हा क्षण कदाचित तीला सहन होणारा नव्हता ..!--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------