गव्हले आणि शुभकून in Marathi Cooking Recipe by Vrishali Gotkhindikar books and stories PDF | गव्हले आणि शुभकून

Featured Books
Categories
Share

गव्हले आणि शुभकून

गव्हleआणि गव्हल्याची खीरहा एक पारंपरिक पदार्थ आहे सणासुदीच्या जेवणात, धार्मिक कार्यक्रमात, श्रावणातल्या मंगळागौरीत, किंवा कोणत्याही देवाच्या  घरगुती प्रसादासाठी केलेल्या जेवणात या खीरीचे अतीशय महत्व आहेपानात  वाढलेली अगदी चमचा अर्धा चमचा असलेली ही घट्टसर खीर खाऊनच जेवायला सुरवात करायची असा पूर्वापार प्रघात आहेही खीर शकुनाची (शुभ) समजली जाते

  शुभकार्यासाठी केली जाणारी खीर नेहमी गव्हल्यांचीच असते. पूर्वी स्त्रिया घरीच असायच्या त्यामुळे गव्हले , शेवया वैगेरे सगळं घरीच केलं जात असे. लग्न मुंज अशा शुभकार्यासाठी करायचे गव्हले पाच सवाष्णीना मानाने बोलावून  त्यांच्या शुभहस्ते केले जात

मला गव्हले खीर फार आवडते लहानपणी घरी कोणताही कार्यक्रम असला की सर्वांच्या पानात वाढून झाल्यावर ही उरलेली खीर मी गट्टम् करीत असे 😀

आई कित्येक वेळा फक्तं माझ्यासाठी वाटीभर खीर मुद्दाम करीत असे आई नोकरी वाली असली तरी वेळात वेळ काढून गव्हले घरी करीत असेमाझ्या आजीची तर त्यात "मास्टरी"होती..सुबक देखणे आणि पांढरे शुभ्र गव्हले असत तिचे ❤️

मी पण त्यावेळी गव्हले करायच्या या कामात आईं आजी सोबत लुडबुड करीत असे 🙂हद्ग्याच्या खिरापतीत ही खिरापत सहसा चटकन ओळखली जात नसे एकदा माझ्या आईने माझ्या शाळेतील हदग्या साठी गव्हले भात करून दिला होता तो तर मैत्रीणीना अजिबात ओळखता आला नाही  😀आणि जेव्हा सगळ्या हरल्या आणि ही खिरापत सांगितलीतेव्हा ती ऐकून आणि नंतर खाऊन सगळ्या अगदी खुश झाल्या होत्या,❤️

माझ्या लग्नानंतर आई माझ्यासाठी पण थोडे गव्हले करून देत असेशिवाय या ना त्या कारणाने घरी जेवायला बोलावलं की गव्हल्याची खीर असेच..🙂आईच्या मृत्यूनंतर माझी वहिनी मला गव्हले करून देत असेती पण माझ्या आईकडून शिकून तयार झाली होतीकालांतराने तिच्या कुटुंबाचा पसारा वाढला तिने पण गव्हले करायचे बंद केले

मग कित्येक वर्षे असेच मावशा, आत्या आईच्या मैत्रीणी यांच्याकडून प्रेमाने आठवण ठेवून असे गव्हले घरी येत राहिलेकाळाच्या ओघात त्याही सर्व देवाघरी गेल्याया मे महिन्यात मला अचानक वाटले चला आपणच घरी गव्हले करू बघू जमतात का ते .. माझे गव्हले फार ठेंगणे ठुसके व सुबक नाहीं झाले (आई आजी सारखे सारखे तर नाहीच जमले)पण प्रथमच केले त्या मानाने ठीक झाले श्रावण महिन्यात नेवेद्यासाठी चांगली तयारी झाली होती

त्यावेळेस गव्हले वाळल्यावर पहिल्यांदा एक वाटीभर खीर करून देवाला नेवेद्य दाखवला होताखीरी साठी प्रथम दोन मोठे चमचे गव्हले तुपात मंद आचेवर भाजून घेतलेत्यात एक वाटीभर पाणी घालून चांगले शिजवले व गॅस बंद करून झाकणं ठेवलेपाच दहा मिनिटांनी गव्हले चांगले शिजून फुगून आले होतेपरत गॅस चालू करून त्यात दोन वाटया दुध, अर्धी वाटी साखर घालून खीर चांगली उकळून घेतलीखीर तयार झाल्यावर कोमट असताना त्यात थोडी वेलदोडे पावडर घातलीया खीरीला केशर ड्राय फ्रूट याची गरज लागत नाहीअत्यंत साधी सोपी तरीहि चविष्ट अशी खीर तयार होते

माझ्याकडे या वेळेस आणखी एक शुभ शकुन घडायचा होतापहिल्या सोमवारी संध्याकाळी मैत्रिणीचा फोन आला तिच्या मुलीची  मंगळागौर होतीतिच्या लग्नाला पाच वर्षे झाल्याने या वेळेस उद्यापन पण ठेवले होतें मला जेवायला आमंत्रण द्यायला तिने फोन केला होतासहज विचारले...काय ग तयारी झाली कातयारी तशी झालीय ग पण बघ ना नेमके उद्यापनाच्या वेळेसच शुभ शकुनाची खीर करायला गव्हले कुठेच नाही मिळालेत्यात हवा अशी कुंद...कुणाला करायला सांगावे तर वाळणार तरी कधीशेवटीं शेवयाची खीर करणार झालं...मी म्हणले अग इतकेच ना .माझ्याकडे आहेत गव्हले मी केले होते मे महिन्यात..हे ऐकून मैत्रीण एवढी खुश झाली...अग पण तू तुझ्या घरच्या पुरते केले असशील मला वाटीभर तरी लागतीलमंगळागौरी च्या मुली धरून पंचवीस तीस पान आहे माझ्याकडे मग काय शिल्लक राहणार तुझ्याकडे..?सगळेच संपुन जातील तू केलेले गव्हले

तिचे बोलणे ऐकून मी म्हणलेहे बघ एक वाटी गव्हले दिले तर काहीं फरक नाही पडणार मलामाझ्याकडे शास्त्रा पुरते गव्हले उरले.. खुप झाले हे ऐकून ती म्हणाली ठिक आहेपाठवते कुणाला तरी गव्हले न्यायलात्यावर मी म्हणालेअग कशाला कुणाला पाठवते .मीच येते सकाळी दस्तुरखुद्द खीर घेउन...ती आणखीनच खुश .वाहवा... मग तर उत्तमच...

अशा प्रकारे मी एक वाटीभर गव्हल्याची खीर तयार करून घेउन गेलेथोडी चारोळी होती घरी ती सुध्दा त्यात घातली

जेवणाचा कार्यक्रम उत्तम पार पडलासर्वांना खीर पुरली आणि आवडली सुध्दाकाहींनी परत मागून घेतलीशिवाय घरच्या पाहुण्या समोर माझ्या गव्हल्याचे कौतुक झाले ते वेगळेच..❤️असा घडला माझ्या गव्हल्याचा शुभ शकुन..