सुगंधा माझ्या जुन्या ओळखीतील मुलगी होती माझ्या आजोळच्या गावची ..एका लहान गावातली ही मुलगी लग्न होऊन माझ्या शहरात आली शहरात आली तेव्हा एक दोन वेळ भेटली असेल नंतर तिनेही काही संपर्क ठेवला नाही आणि मी सुद्धा माझ्या व्यापात गर्क राहिले तिचा स्वभाव थोडा तुसडा असल्याने मीही ही गोष्ट फार मनावर नाही घेतली काही वर्षानी माझ्या समोरच्याच. चाळीत ती रहायला आली मग मात्र मला ती नेहेमीच दिसत असेतिला दोन मुले सुद्धा झाली होती पण तरीही तिच्यात कोणताच बदल झाला नव्हता.स्वभाव चिडचिडा ,नवीन गोष्टी स्वीकारायची इच्छा नाही त्यामुळे सतत नाराजी .!!तिच्यामुळे नवरा मुले नेहेमीच नाराज असत मला कधी ती समोर भेटली तर मनातली खदखद बोलून दाखवायची .मी खुप प्रबोधन करीत असे तिचे चांगला नवरा आहे, मुले आहेत जरा आनंदी रहात जा सतत चिडचिड बरी नव्हे पण फारसा फरक पडत नव्हता तिच्यात .
मध्यंतरी बरेच दिवस नोकरीच्या कारणाने मी शहराबाहेर होते घरी आल्यानंतर अचानक एकदम छान नाविन्यपूर्ण कपड्यात स्मितहास्य करणारी सुगंधा समोरआली खुप दिवसांनी ती दिसल्याने मी आधी ओळखलेच नाही आणि तिला पाहून चकित झाले .ती हसली माझ्याकडे पाहून आणि म्हणाली “ताई नवल वाटले न मला पाहून ?मी आता बदलले आहे स्वतःला..अग ते तर दिसतेच आहे पण हे सारे घडले कसे?अहो हा सारा सोशल मिडीया चा प्रभाव बर का “!ती म्हणाली सोशल मिडिया विषयी विपरीत ऐकायला मिळत असते कायम आणि तुझ्यात हा कसा बदल .?सुगंधा बोलु लागली ,”याची सुरवात झाली त्या दिवसापासून .....एक दिवस आमच्या नवरा बायकोच्या भांडणात माझ्या नवऱ्याने मला खुप सुनावले इतक्या वर्षातले कमी जास्त ऐकवले अगदी पार तुला अक्कल नाही इथपासून ते आजूबाजूच्या साध्या बायका कशा स्मार्ट राहतात आणि तु अजून कशी बावळट वागते इथपर्यंत .अगदी तुझ्यापुढे हात टेकले असे सुध्धा बोलला ,खुप रडले त्या दिवशी ..मग मी “चंग “बांधला स्मार्ट व्हायचा ,म्हणले इतके दिवस जे नाही घडले ते करूनच दाखवुमाझी पण बारावी झालेली आहे त्यामुळे इंग्रजीचा प्रश्न नव्हता सुरवात केली स्मार्ट फोन वापरण्या पासून मुलाना तयार केले मला फोन मधले सगळ शिकवायला आधी मुलांनी खुप थट्टा केली ,तुला येणारच नाही असे पण म्हणाली पण मीच हेका सोडला नाही ,घरात एक फोन नवऱ्याने मला पूर्वीचा घेवून दिलेला पडून होता तोच चालु केला आणि शिकले हळू हळू वापर करायला ..wats app ,फेसबुक ,गुगल अगदी you tube सुद्धा वापरू लागले शिकायचा आनंद तेव्हा मला मनापासून समजला.याच काळात नवरा गेला होता फिरतीवर बाहेरगावी..त्यामुळे त्याला माझ्या या नवीन शिक्षणाचे काहीच ठाऊक नव्हते .एक दिवशी त्यालाच मी wats app विडीओ call केला .तो तर खरोखर चकित झाला आणि खुप आनंद पण वाटला त्याला .बायको मधला हा बदल पाहून येताना एक छान साडी पण घेऊन आला .मैत्रिणींनी wats app च्या ग्रुप्स वर सामील करून घेतले मला wats app च्या एका ग्रुप वर एका फॅशन डीझाईन करणाऱ्या मैत्रिणीची गाठ पडली मला पूर्वी पासून या क्षेत्रात रुची होतीच शिवण येत होते आवडत होते घरी मशीन पण होते .माझे ,माझ्या मुलीचे किरकोळ कपडे मी नेहेमीच शिवत असे .त्या भेटलेल्या नव्या मैत्रिणी मुळे मी नवीन कपड्यांची कलाकारी शिकायला सुरवात केली .यासंबंधी इतर सगळी माहिती “गुगल दादा” कडून मी वेळोवेळी मिळवली .आता मला काही दुकानाकडून या कपड्यांच्या ऑर्डर्स पण मीळु लागल्यात .मी आनंदी उत्साही राहू लागल्याने घरी पण सगळे खुश आहेत .घरच्या कमाईत आता माझा पण हातभार लागला आहे .आणि हो या क्षेत्रात आल्याने मी स्वतः पण नवीन नवीन प्रकारचे कपडे वापरत आहे .सुगंधाचे बोलणे ऐकुन आणि प्रसन्न अशा तिला पाहून मला खुप समाधान वाटले .सोशल मिडिया चा इतका “सकारात्मक” विचार करणारी सुगंधा मला खुप भावली मी तिला म्हणाले..चल सुगंधा या गोष्टी साठी माझ्या कडून तुला मस्त कॉकटेल आईस्क्रीम .ती ही हसून चला म्हणाली आम्ही दोघी समोरच असलेल्या आईस्क्रीमच्या दुकानात शिरलो