Facebook friends' experiences in Marathi Short Stories by Vrishali Gotkhindikar books and stories PDF | फेसबुक मित्रांचे अनुभव

Featured Books
Categories
Share

फेसबुक मित्रांचे अनुभव

ऋतु शब्दांचे हे कवितेचे पुस्तक एके वर्षी प्रकाशित झाले होते (ज्या मध्ये माझ्या पाच कविता होत्या )याचे प्रकाशन झाल्यानंतर त्याच्या प्रती मी माझ्या कवी मित्रांना स्वत कुरियर करून पाठवल्या ..त्यातच माझे एक रसिक जाणकार फेसबुक वर ओळख झालेले कविमित्र पण होते .मी ज्या कुरियर कडून पुस्तके पाठवत होते ती सर्व्हिस. दुर्दैवाने  त्यांच्या गावी नव्हती..त्यांना तर खूप इच्छा होती त्यांना हे पुस्तक मिळावे ..मग मी ते पोस्टाने स्वखर्चाने त्यांना माझे पुस्तक पाठवले.पण खूप दिवस गेले तरी त्यांना ते पुस्तक नाही मिळाले ..मला खूप वाईट वाटले ...मग त्यांना विचारले पुण्यात येवून तुम्ही प्रत घेता का ..?त्यांनी होकार दिला ..मग मी माझ्या पुण्यातल्या मित्रांचा फोन दिला त्यांना मधेच एकदा मी  पुण्यातून परताना त्यांची प्रत माझ्या त्या मित्राकडे ठेवली त्यांना पण योग्य त्या सूचना दिल्या ...पुस्तक मित्राने त्यांना दिलेतसे मला कळवले ..मध्यंतरी बरेच दिवस गेले ...मला पुस्तकाचा अभिप्राय त्यांच्याकडूनकाहीच समजला नाही .म्हणून मेसेज करून त्यांना विचारले ..तर ते म्हणाले पुस्तक मिळाले ..पण बाळासाहेबांचे (ठाकरे) निधन ..झाले मग मूड नाहीये पुस्तक वाचायचा ठीक आहे ..मी म्हणले ..जाऊदे ..नंतर वाचतील नंतर पंधरा दिवसांनी मेसेज केला..तर म्हणाले तुमचे पोस्टाने पाठवले होते ते पुस्तक आज मिळले मी खुष ..”.वा आता दोन पुस्तके झाली ..विचारले ..”कशा वाटल्या मग कविता “??महाशय उत्तरले ..”अजून वाचल्याच नाहीत ..”आता मात्र मी थक्क झाले !!!....महिना महिना पुस्तक मिळून पाच कविता वाचायला होत नाहीत ?कीती बिझी हा माणूस (फेसबुकवर मात्र ..कायम पडीक असतात ..)..तरी पण धीर करून विचारले ..”का हो का नाही वाचल्या “अहो वेळच मिळत नाही मला ...त्यांचे उत्तर ...!!तरीपण रेटून विचारले “..आता तर फेसबुकवर आहात ..पाच कविता वाचायला कीती वेळ लागतो ..?”फेसबुक वर मी काम करता करता असतो ....पण कविता वाचायला मला निवांत वेळ हवा  ...!!काय बोलणार यावर ..हसावे का रडावे ..का पश्चाताप करावा तेच समजेना मला .जेव्हा स्वतःच्या कविताचे पुस्तक मित्रांना आपण देतो तेव्हा एक माफक अपेक्षा असते की निदान कशा वाटल्या कविता इतके तरी सांगावे ....ते तर राहिले बाजुला ..माणसांना वाचायला पण वेळ मिळेना झालाय ...!!!आमचे आणी आमच्या कविताचे दुर्दैव ..दुसरे काय !!!असाच एक अनुभव ..एकदा फेसबुक वरील एका जुन्या मित्रांचा फेसबुक मेसेंजर वर मेसेज आला तुमच्या गावात तुमच्या नावाच्या हॉटेलला मी उतरलोय तुम्ही आहात का कोल्हापुरात?तसे हे खुप जुने माझे मित्र.. एक दोन वेळ भेट पण झालीय त्यांच्या गावी गेलो असता त्यांच्या घरी जेऊन खाऊन आलोय सुशिक्षित आणि चांगल्या वागणुकीचा माणूस.त्यामुळे त्यांचा मेसेज पाहून मला पण आनंद झाला ..त्यांना भेटून त्यांना घरी घेऊन यावे व त्यांचा पाहुणचार करावा असे मी ठरवले मी सांगितले मी येथेच आहे भेटूया या की आमच्या घरीच..सुदैवाने त्याच आठवड्यात मी दोन दिवस रजा टाकली होती ..अनायासे रिकामीच होते मग भेट होईल त्यांची असे वाटले  ते उतरले होते त्या भागात मी काही कामा निमित्त निघाले होते मी त्यांना सांगितले मी तिकडेच येतेय येऊ का घ्यायला तुम्हाला ..तसे त्यांनी निरोप दिला मी गावात निघालोय देवीला माझा फोन नंबर होताच त्यांच्याकडे कधी मधी msg पण येत असत wats अप ला तरी देखील ते मात्र मला फेसबुकच्या मेसेंजर वरच मेसेज करीत होते मग मीच न राहवून त्यांनाफोन लावला म्हणाले बरे झाले तुम्ही आहात दोन दिवस ..तुमच्या सवडी प्रमाणे घरी जेवायला या कधीहीआम्ही दोघेही वाट पाहत आहोत (अहोंच्या पण ओळखीचे होते न ते )त्यांनी होकार दिला व फोन करतो असे म्हणाले तरी पण दुपारी पुन्हा फेसबुक मेसेंजर वर मेसेज ...आता जेवलो हॉटेल वर असा ..आता मी काहीच उत्तर दिले नाही.मी रीतसर आग्रहाचे आमंत्रण त्याना दिले होते व केव्हाही या असे बोलले होते गाडी घेऊन त्याना आणायला जायची पण माझी तयारी होती .त्यांनी पण फोन वर कळवावे अशी अपेक्षा (साहजिक आहे ना )होतीच यानंतर दुसरे दिवशी संध्याकाळ पर्यत निरोपाची वाट पाहिली ..पण निरोप नाहीच ..(नशीब काही तयारी नव्हती केली कारण मागल्या वेळी अशीच कोल्हापुरी जेवणाची खास तयारी केली होती आणि येणारा माणूस वेशी वरून परत गेला होता आणि तयार केलेले जेवण शेजारी पाजारी वाटायची पाळीआली होती ...तेव्हापासून थोड शहाणपण आले होते म्हणा!! )                    नंतर तिसऱ्या दिवशी त्यांच्या वाढदिवसाचे फोटो फेसबुक वर पाहिले तेव्हा लक्षात आले ते त्यांच्या गावी पोचलेत .जाताना कोणताही निरोप घेणे नाही ..फोन राहु दे फेसबुक मेसेंजर वर पण(नशीब काही तयारी नव्हती केली कारण मागल्या वेळी अशीच कोल्हापुरी जेवणाची खास तयारी केली होती आणि येणारा माणूस वेशी वरून परत गेला होता आणि तयार केलेले जेवण शेजारी पाजारी वाटायची पाळीआली होती ...तेव्हापासून थोड शहाणपण आले होते म्हणा!! )                    नंतर तिसऱ्या दिवशी त्यांच्या वाढदिवसाचे फोटो फेसबुक वर पाहिले तेव्हा लक्षात आले ते त्यांच्या गावी पोचलेत .जाताना कोणताही निरोप घेणे नाही ..फोन राहु दे फेसबुक मेसेंजर वर पण मेसेज नाहीच .मी येऊ शकलो नाही वगैरे काहीच नाही ..           त्यांच्या या वागण्याने मी थोडी चकित झाले ....तसे असे अनुभव खुप वेळा येत असतात पण हा माणूस चांगली रीतभात असलेला होता याने तरी असे करायला नको होते असे नक्कीच वाटले असो ....अशा अनुभवानेच जीवन समृद्ध होत असते ना ...!!आणि अशा अनुभवातून काही शिकायला पण मिळते ..शेवटी आयुष्य तर शिकण्या साठीच असते ना ....!!