लहान मुले म्हणजेदेवा घरची फुले असे म्हणतात खरच निरागस मुले ही देवाचं रूप वाटतात मला 😘मला मुले आवडतात आणि कोणतेही मुल त्याच्याशी हसुन चार शब्द बोलले की मला येवुन चिकटते ..हा माझा अनुभव आहे
करी मनोरंजन जो मुलांचे.. जडेल नाते प्रभूशी तयाचे.. असेही म्हणतात😊एकदा माझ्या कडे आलेले कोणतेही छोटे पिल्लू परत कितीही बोलावले तरी त्याच्या आई कडे सूद्धा जात नाही 😎याचा ही मला नेहेमीच प्रत्यय येतो .अगदी आमची नात नारायणी पण लहानपणी माझ्याकडुन तीच्या आई वडिलांकडे अथवा तिच्या रोजच्या सांभाळ करणाऱ्या मेड कडे पण जायला नाखुश असते !!!काय माहीत माझ्यात आणि त्यांच्यात कोणते असे घट्ट बंध जमतात .
. असेच एकदा अहमदाबाद येथे अक्षरधाम पाहायला गेले होते . ते सुट्टीचे दिवस असल्याने देवळात खुप गर्दी होती व्हरांड्यातून आम्ही चालत असता अचानक एक लहान मुल रांगत रांगत माझ्या पायात आले .काळे सावळे गुट्गुटित गोबऱ्या गालाचे कुरळ्या केसांच ते बाळ खुप गोड होते .😘माझ्या पायात आल्यामुळे मी पटकन खाली वाकुन त्याला उचललं .कडेवर घेतले आणि .कुठे चाललाय पिल्लू तू..असे हसुन म्हणल्यावर ते खुदकन हसले आणि मला बिलगले.!ना ओळख न देख .कुणाचे होते कोण जाणे...मी इकडे तिकडे त्याचे पालक शोधू लागले आणि मग पाचच मिनिटात त्याची आई त्याच्या मागे धावत आली कौतुकाने म्हणाली बघा हो कसा भरा भरा रांगतो आहे ..बघता बघता नजरेआड होतो ..ये बाळा माझ्याजवळ पण बाळ काही आईकडे जाईना.. काय रे मावशी ओळखीची झाली की काय ..? असे त्याची आई म्हणाली..पण काय झाल कोण जाणे बाळ अजिबात बघायला पण तयार नाही आईकडे ..किती बोलावले तरी तिच्याकडे बघायला तयार होईना...मग मात्र आश्चर्याची वेळ आई वर आली ..”कसा काय तुमच्याकडे इतका चिकटून आहे कुठले तरी जुने “नाते “दिसते तुमचे ..!!असे बोलून अखेर ती बाळाला ओढून माझ्या कडून घेवून निघून गेली ..
असाच अनुभव परवा दोन वेळ आला . आठ दहा महिन्याची छोटी मुलगी आई सोबत माझ्या रोजच्या बस मध्ये चढली .दोन मिनिटे तिची आई आणि मी बोललो असू ..असेच तुमचे मिस्टर काय करतात ?हीच नाव काय ?किती महिन्याची आहे वगैरे ..मी तिच्या आईला विचारले सुपर्णा नाव आहे तिचे समजल्या वर नुसते मी तिला हाक मारताच ती हात काढून माझ्याकडे हसत आली ..माझ्या बाजूच्या खिडकीतून पाहता पहाता आणि माझ्या कडे बघत माझ्या साडीच्या आत पोटावर हात ठेवून ती काही वेळातच शांत झोपी गेली ..तिचे भुरूभुरू उडणारे जावळ खुप मस्त वाटत होते ..चुकून कुठे बस थांबली की ती चटकन माझ्या पोटावरचे हात घट्ट करी ..खुप विश्वासाने माझ्या कुशीत झोपली होती ती ..तिची आई पण आश्चर्य करीत होती ..“अहो घरात दहा लोक आहेत त्यांच्यातल्या कोणा कडे ही “रमते “ही मात्र बाहेर कुणाच्या कडे कधी नाही जात ..आणि तुमच्या कडे एवढी कशी काय बर रमली ?मी फक्त हसले ...!!त्यानंतर माझा स्टॉप आल्यावर माझ्या कडून खेचून घ्यायला लागले तिच्या आईला. असेच दोन दिवसा पूर्वी माझ्या पुढच्या स्टॉप वर एक बाई तिच्या मुलासोबत चढली आणि माझ्या शेजारी बसली .छोट्या ने पहिल्याच हिस्क्यात माझा गॉगल काढुन घेतला आणि स्वारी तडक माझ्या मांडीवर आली ..नाव विचारले असता राजवीर नाव समजले ..काय म्हणतो राजवीर ? काय करतो पिल्लू तु ?अस नुसते म्हणायचा अवकाश ..खुदु खुदु हसायला पण लागला ..गप्पा करता करता त्याचा स्टॉप आला ...तर चक्क आईला टाटां करून रिकामा ..काय म्हणावे या मुलाला ..शेवटी जड मनाने त्याला त्याच्या आईकडे सोपवून निरोप दिला .
अशा गोष्टी घडल्या की नवल वाटते . पण माझ्यासारखे इतर अनेक लोकांना ही हा अनुभव येत असेल