कदाचित सखी या शब्दात खूप मोठा आर्थ सामावलेला आहे. आयुष्याच्या या अथांग समुद्रात खूप लोक भेटत जातात. ज्या प्रमाणे अनेक नद्या समुद्राला मिळत राहतात आपल्या सोबत नवीन गोष्टी घेऊन येत असतात. आगदी चांगले वाईट खूप प्रकार आहेत त्या मध्ये. या सगळ्या प्रवासा मागे पडलेली अनेक प्रश्नांचे उत्तर आपल्याला अनुभवातून भेटत असतात. या सगळ्या मध्ये काही व्यक्ती आपल्याला प्रिय असतात. मात्र त्या मधला एक व्यक्ती मात्र आगदी प्रिय होऊन जातो. एखाद्य रंगा प्रमाणे, येवढे रंग आहे पण त्याच रागाचे कपडे किंव्हा वस्तू आपल्याला खूप आवडतात. म्हणून तो रंग , ती वस्तू आपल्याला खूप म्हणजे फारच खूप आवडते ती वस्तू किंव्हा तर व्यक्ती भेटली की आपला आनंद आगदी गगनात मावेनासा होतो.
मनी दाटल्या लाख भावना
तू सोबती असताना!!
आंधरल्या स्वप्नांना
तू शितल झळाळी असताना!!
सहस्त्र रगंतूनी तो रंग हा वेगळा
डोळ्याच्या कोपऱ्यातून मज वाटतो आपला!
भेदूनी साऱ्या सृष्टी मनी सांज गुंपला
होणूनी त्या सवे पाखरांचे गीत मनी गुंजला!!
भेटला मज तो आता भाव मनी सजला
घेतला मी तुझ्या सोबती श्वास हा मोकळा!!!
***
कदाचित ती व्यक्ती भेटली की आपण सगळं ओझ आगदी त्याच्या शिरावर टाकून देतो. खूप काही बोलणं असतं. ते आपण समजून घेणाऱ्या माणसा समोर व्यक्त करतो. श्री कृष्णाच्या कृष्णलीले मध्ये आपण डोकावून पाहिलं की समजेल सखी या शब्दाचं सामर्थ्य. सखी या शब्दा मध्ये मनाचं एक रहस्य आहे.
न बोलता समोरच्याच मन ओळखण्याची क्षमता ही सखी मध्ये असते. '''''आंधरलेल्या रात्रीस, तू साथ चांदण्याची ! """"
अशीच असते , ती सखी !
सखी ..... सोबत एकाट्याची !
सखी...... सोबत भटक्या मनाची!
सखी...... उन्हात नवा गारवा!
सखी...... नवी आशा मनाची!
सखी..... झरा थंड पाण्याचा!
सखी.... म्हणजे कधी न तुटणारी मैत्री!
खूप काही बोलता येत. ज्याला जसा आनुभव आला तसा त्याने त्याचा उल्हेख केव्हा. मन केव्हा कोणाला मोजता आलंय का. मन आगदी अखाद्य फुलपाखरा प्रमाणे आल्हाड तर हिऱ्या पेक्षा ही कठीण आहे.
समोरच्याच्या भावनांचा विचार करणं म्हणजेच समोरच्याला ओळखन म्हणता येईल.
आगदी लहान पण पासून मी तिला पाहत आलोय. आगदी निराळी होती . स्वच्छंदी मनाची ! गोड स्वभाव!
खुप दिवसांनी आम्ही भेटलो होतो आगदी योगा योग! बाजारात फिरता फिरता समोर आली. आगदी डोळे ३६० डिग्री विस्पतले. जशी होती तशी होती, मी दिसताच तिचा चेहरा फुलून गेला. लहान पणी आम्ही सोबत खूप मस्ती करायची. दिवस भर माझ्या मागेच असायची. थोड कुणी काही बोललं की लगेच माझ्या कडे मला येऊन सांगायची. आज ही ती मी दिसताच क्षणी आगदी धावत माझ्या जवळ आली. तिचा चेहरा आगदी आनंद नाचत होता.
"".
एक प्रकारे ती माझी लहानपणीची मैत्रीण होती. तिच्या लग्न नंतर आम्ही पहिल्यांदा भेटलो होतो. खुप बदलली होती. तिच्या चेहऱ्यावर मला एक न सुटणार कोड दिसत होत.
""भावनांच्या गावा मध्ये शब्द भेटला नाही!
आश्रुंच्या च्या त्या ओढ्या मध्ये बांध जिराला नाही!
पाणी कमी ना कधी समुद्राला
पण तहान मिटण्या काळवा भेटला नाही!""
चेहऱ्यावर विलक्षण आनंद होता. ते स्मित हास्य जणू शुक्राची चांदणी असल्याचं भासत होत. खूप काही मनात दिसत मात्र चेहऱ्यावर वेगळच होता. चेहऱ्यावरचा आनंद डोळ्यातून अश्रू याच्या मधला बंधन काही समजून येत नव्हतं खरं तर डोळे हा माणसाचा चरित्र असतो आणि या डोळ्यांतून वेगळेपणा दिसून येणं म्हणजेच माणसाच्या मनात काहीतरी वेगळा परिणाम असतो. तोच परिणाम आज तिच्या डोळ्यांत मला दिसत होता.
कवी प्रत्येकाच्या जीवनामध्ये अशी एक व्यक्ती येते की समोर येताना तिच्या किंवा त्याच्या चेहऱ्यावरचे अहवावरून त्याच्या मनामधून चाललेला आहे ते आपल्या लक्षात येतं कधी ते प्रत्येकाला समजत नाही परंतु ज्याला समजतं त्यांनी ते समजून घेणं महत्त्वाचं असतं परिणामी खूप काही गोष्टी आपल्याला टाळता येतात.
" सांग तुझ्या भावनांची सांगड कशी बांधावी
मनामधले शब्द कधीचे ओटी माळ कशी बांधावी "
कधी भावनांच्या विळखा एवढा मजबूत असतो की त्यामध्ये आपण स्वतः खूप अटकत जातो आणि आपण घेतलेला निर्णय कधी घेतला चुकतो.
' जसं दिसत तस नसतं ' जेव्हा परिस्थितीची जाणीव होते .
तेव्हा खूप दिवस निघून गेलेले असतात.
---- काय झालं सांगशील का? ( तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलून गेले)
काही नाही. ( नजर वळवून बोलून गेली.) नक्की नाही.
' समजणे वाले को इशारा काफी होता है"
सब नजर का खेळ है, मेरी जान ."
थोड का होईना तिचा तो सुंदर चेहरा गोड हसला.
जुन्या आठवणी पुन्हा ओठांवर येऊ लागल्या. काही वेळ कसा गेला. समजलंच नाही. जेव्हा सुब्राच लग्न झालं तेव्हा मी बाहेर होतो. तिचा स्वभाव अगदी तिच्या सारखा शुभ्र होता. दिसायला ही खूप सुंदर आगदी नक्षत्रावाणी.
तीच लग्न परंपरांनुसार वडिलांनी लावून दिलं होतं. आणि पुढचा मागचा विचार न करता त्यासाठी होकार दिला होता. कारण तिला आपल्या पायावर उभं राहायचं होतं. ते ठरवलं होतं, की जे पण होईल ते मी अगदी मेहनतीने उभा करेल. लग्नानंतर येते ना आपलं कॉलेज पूर्ण केलं. आणि एक छोटी नोकरी केली. दोघांचं अगदी व्यवस्थित चाललं होतं. तिने एक चांगला संसार उभा केला. आगदी तिला भेटून खूप छान वाटलं.
प्रेम म्हणजे जाणीव आपल्या व्यक्तीची,
जळणाऱ्या निखळ विस्तवाची!!
प्रेम म्हणजे विश्वास डोळ्यांतील अश्रुचां
मंद. जळणाऱ्या हृदयाचा
सुब्रा च्या मनात खूप काही होत. पण ती काही न बोलता. निघून गेली. खूप दिवसांनी सुब्रा आपल्या आई कडे आली होती. अचानक मी सुद्धा गावी गेलो होतो. आज मात्र तिचा चेहरा पूर्ण पाने कोमजलेला होता. हृदय किती मंद जळता पण त्या जळणाऱ्या हृदयाची आग एवढी भयंकर असते. ते मला आज दिसलं. खूप काही विचारल्या नंतर सांगितले की तिने सुसाईड केलं होतं. ज्या माणसांकडून आपण अशी अपेक्षा करू शकत नाही. ते झालं की किती त्रास होतो. याची मला जाणीव झाली.
सुब्रा आगदी हुशार होती कोणत्याही परिस्थितीत ती हार न मानणारी होती. खरं तर आपल्या वडिलांनी जो मुलगा बघितला तो आपला सर्वस्व आहे. याची जाणीव ठेऊन ती अगदी खूप काही सहन करत होती.
आपल्या नवऱ्या कडून आपल्याला जेवढ प्रेम भेटत त्या प्रेमामध्ये आपलं कौतुक ती मनात होती. पण काही गोष्टी अशा घडतात की आपली स्वप्न अगदी कागदाच्या होडी प्रमाणे तुटून जातात. काही दिवसा पूर्वी आपल्या नवऱ्याला लागलेली Rummy circle ची सवय एवढा सुंदर संसार तोडून टाकेल. याचा विचारही त्यांनी केला नाही.
प्रत्यक रात्र आगदी प्रेमाच्या प्रतिक्षेत अंथरुणात पडून जाईल, याचा तिला त्रास होत होता. आगदी संस्काराने वाढलेल्या सुब्रा ते सहन करत होती. या च्या प्रतीक्षेत आज ना उद्या सगळ ठीक होईल.
कधी दूर वाटे वरती रांग पाखरांची
मनी उभारते सांज ही ओढ घरट्याची!
घेउनी श्वास मोकळा एकदाचा
व्यथा वाटसरीच्या डोळ्यांची !!
पाणावल्या शब्दांची
ही भाषा भिजल्या डोळ्यांची!
का कुणा कळेना
ही ओढ हळव्या मनाची!!
निःशब्द भावनांची
व्यथा दाटल्या मनाची!
फिरुनी दाही दिशांची
गतिमंद पावलांची!!
अंधारल्या दिशांना
ओढ चांदण्याची!
येऊनी स्वार डोही झाला
ढगाळल्या पावसाची!!