कोकणातील त्या उंचपुऱ्या पर्वतरांगेवर दोघे एकमेकांसमोर उभे ठाकले होते. हिरवीगार चादर पांघरलेली झाडीsss त्यातून खळखळ करत वाहणारी नदी तेथील शांतता भंग करत होती. ते दोघे मात्र अजूनही एकमेकांच्या नजरेत पाहत होते.
" प्लीज तू ती बंदूक खाली कर, निदान माझं ऐकून तरी घे.. तू समजतोस तसं मी काहींचं केलं नाहीये, प्लीज माझ्यावर विश्वास ठेवं. मी प्रेम करते तुझ्यावर.. "ती काकूळतीला येऊन सांगू लागली
"प्रेमsss आणि तू?? खोटंsss साफ खोटंsss मला माहितेय तू माझ्यासोबत प्रेमाचं नाटकं करत होतीस. तूझा मूळ उद्देश तर तुझं काम करून घेण हा होता. खरं सांग मला.. याच कामासाठी आली होतीस ना तू??"
"ऐक ना माझं..."
"मला हों की नाही मध्ये उत्तर हवयं..."तों ओरडत म्हणाला तसं ती जागीच स्तब्ध झाली. तों तिचं काहींचं ऐकायला तयार नव्हता. तों म्हणतोय ते खरं असलं तरी ते अर्धसत्य होतं. ती त्याच्यावर मनापासून प्रेम करत होती, अगदी वेड्यासारखं प्रेम करत होती..
"मला उत्तर हवयंsss"तों जोरात ओरडला तसं ती भानावर आली..
"याच कामासाठी आली होतीस ना तू??"त्याने तिच्यावर डोळे रोखत विचारलं तसं तिने मान खाली घातली
"तुझ्यासारख्या गद्दारांना माझ्या आयुष्यात जागा नाही... चालती हों माझ्या नजरेसमोरून.. परत जर तुझं हे मनहूस तोंड घेऊन आलीस तर माझ्याइतकं वाईट कुणी नसेल.. मी समर्थ आहे हे सगळं निस्तरायला.. तू मला कमी समजून खूप मोठी चूक केलीस" तों त्याची हिंस्त्र नजर तिच्यावर रोखत म्हणाला. त्याची नजर पाहून त्याच्याकडे जाणाऱ्या तिची पावलं जागीच गोठली.
" प्लीजsss मला समजवायची एखादीतरी संधी देss प्लीज मी तुला सगळं सांगते.. "ती त्याला हात लावायला पुढे आली तसं त्याने तिचा हात झिडकारला...
"माझ्यापासून लांब रहायचं हाsss"तों रागा रागात डोंगर उतरू लागला.. त्याला सगळं असह्यय होत होतं.. ती त्याला समजवत त्याच्या मागे मागे येत होती पण तों तिचं ऐकून घ्यायच्या मनःस्थितीत नव्हता.
"तू माझ्या मागे मागे करणं बंद कर नाहीतर हातातल्या बंदूकीने उडवून टाकेल तुला..."तों मागे वळत म्हणाला.. त्याचा भयंकर संताप होतं होता..
"एकदा माझं ऐकून घे, मग मी इथून निघून जाते..."
"नाही ऐकून घेणार मी, चालती हों इथून..."
"नाही जाणारsss एकतर तू माझं ऐकून घे नाहीतर मी या कड्यावरून स्वतःला झोकून देईल."
"मरायची हौस आहे तर मर..."
"नक्की?? माझ्या जाण्याने तुला काहींचं फरक पडणार नाही??"ती डोळ्यात अश्रू आणत म्हणाली
"ए चलsss तुम्हा शहरातल्या पोरीचं माहितेय मला, नाटकी कुठल्या.."
"मी शेवटचं विचारतेय तुला??"ती त्या कड्यावर उभं राहत म्हणाली
"खड्यात जांsss तू मेलीस तरी मला काही फरक पडणार नाही.."तों तिरस्कारयुक्त स्वरात म्हणाला.. त्याने मागे पहायची तसदी देखील घेतली नाही...
"ठीक आहेsss तूझा माझ्यावर विश्वास नाहीये ना, नको ठेवूसss पण मी इतकंच सांगेल की मी तुझ्यावर खूप प्रेम केलंय.. अगदी जीवापाड प्रेम केलंय. माझ्या आयुष्यात येणारा पहिला आणि शेवटचा पुरुष आहेस तूsss आय लव्ह यू रुद्राक्षssss आय लव्ह यू सो मचं..."असं म्हणतं तिने डोळे बंद करून घेतले आणी स्वतःला त्या कड्यावरून खाली झोकून दिलं...
तिची आर्त किंकाळी त्या दरीत घुमली तसं तों मागे वळला.
"शिवाक्षीssss" तों पळत त्या कड्याकडे धावलाsss त्याच्या काळजात धस्स झालं...
"शिवाक्षीssss"त्याने जिवाच्या आकांताने तिला हाक मारली.. पण ती हाक ऐकायला ती होतीच कुठे... "शिवाक्षीssss" तों कडा उतरायला जाणार इतक्यात त्याला मागून कुणीतरी धक्का मारला तसं तों दरीत कोसळला... कोसळताना त्याने मागे वळून पाहिल.. मागे उभ्या असलेल्या व्यक्तीला पाहून त्याचे डोळे विस्फरले... कारणं समोर शिवाक्षी उभी होती... ती त्याच्याकडे पाहून छद्दीम हसत होती... त्या ही क्षणी त्याच्या मेंदूत विचार चमकला.. शिवाक्षी समोर आहे तर मग ती कोण?? पण पुढे विचार करण्याआधीच त्याचं शरीर खाली असणाऱ्या विशाल दगडावर आदळल...
क्रमश :