bucket list in Marathi Motivational Stories by Vrishali Gotkhindikar books and stories PDF | बकेट लिस्ट

Featured Books
Categories
Share

बकेट लिस्ट

..मध्यंतरी एक ट्रेंड आला होता बकेट लिस्ट ओपन करायचा बकेट लिस्ट म्हणजे आपल्या मनात असलेल्या अपूर्ण इच्छा पूर्ण करणे कोणी कोणी मला मला पण विचारले होते काय आहे माझी बकेट लिस्ट?मग मी मनाशी विचार केले काय असेल आपली बकेट लिस्ट?मला खरोखर अशी कोणतीच इच्छा आठवेना जी अपूर्ण राहिली आहेलहानपणा पासुन आई वडिलांनी पूर्ण स्वातंत्र्य दिले आणि पूर्ण विश्वास टाकला त्यामुळे जे मनात आले ते ते त्या त्या वेळी करून टाकले  थोडया प्रयत्नाने हवी तशी आवडीच्या क्षेत्रातील नोकरी सुद्धा मिळाली नंतर लग्न झाले ..मनासारखा नवरा कुठेही देवाला नवस ना करता मिळाला याला नशीब समजा किंवा पूर्वसुकृत समजा माझ्या मतांचा आदर करणारा ,पूर्ण स्वातंत्र्य देणारा प्रेमळ उमदा जोडीदार आहे तो  !♥️एक हुशार शहाणा विचारी मुलगा पण  मला मिळाला ...🙂ऐहिक सुखाच्या ज्या ज्या गोष्टी होत्या जसे की घर ,गाडी ,दागिने, आरामशिर आयुष्य वगैरे हे सगळे आम्ही दोघांनी भरपूर कष्ट करून मिळवले कारण त्यावेळी फक्त संस्कार आणि चांगले विचार इतकीच वडिलोपार्जित इस्टेट जवळ होती . बाकीचे आपण कमवायचे होते.बाकी सासरी ,माहेरी, आजूबाजूला सगळीच माझ्या दैवदत्त गुणाचे,उत्साही स्वभावाचे कौतुक करणारी माणसे आहेतजोडलेली माणसे मित्र मंडळी सगळीच छान छान आहेत  .इतक्या वर्षांचे आयुष्य खरोखर चांगले गेले जे जे पाहिजे आणि मनात आले ते मिळत गेले मनात कोणतीच इच्छा अपूर्ण कधीच राहिली नाही ...कदाचित त्याला समाधानी, आनंदी, स्वभाव, कारणीभूत असेलआणि जोडीदाराची मौलिक साथ..किंवा कदाचित माझी जबरदस्त ईच्छा शक्ती मुळे आणि त्याला दैवी कृपेची जोड यामुळे या इच्छा पूर्ण झाल्या असतील..राहता राहिली गोष्ट आपल्या आवडत्या व्यक्तींना भेटण्याची तसे बरेच नट ,गायक ,खेळाडू ,लेखक आवडीचे होते .त्यातले उत्तम गायक म्हणजे रफीसाहेब आणि किशोरजी जे आधीच काळाच्या पडद्याआड गेले होते आशा भोसले पहील्या पासून आवडत होत्या अजूनही आवडतात केवळ त्यांच्याआवाजा मुळे नाही तर ज्या उमद्या स्वभावाने  त्यांनी त्यांच्या जीवनातील संकटांचा सामना केला ते वाचून एक आदर वाटतो .त्यांचा या वयात पण उत्साही स्वभाव ,आनंदी मन बघुन कौतुक वाटते .माझ्या आयडॉल आहेत त्या !!♥️त्यांनी नंतर लग्न केले ते पंचमदा तर जाम आवडायचे  मला ♥️आशा भोसले यांच्या एकदा पायाला हात लावावा, नमस्कार करावा 🙏 असे वाटे पण ते अशक्य होते ... सात आठ वर्षां पूर्वीची गोष्ट आहे..एकदा  माझा एक मित्र आशा भोसलेंच्या रेकॉर्डिंग साठी एका स्टुडिओत गेला होता त्याचा फोन मला आला मी आशाताई च्या सोबत आहे तुला त्यांचा आवाज फोनवर ऐकवतो फक्त ऐक ..आणि त्या स्टूडीओमध्ये आशा ताईंनी प्रत्यक्ष गायलेल्या काही ओळी त्याने मला फोनवर ऐकवल्या मी धन्य झाले ...!!तशीच एक कहाणी व पु काळे यांची ..माझे खुप आवडते लेखक होते ते .ध्यानी मनी नसताना एकदा आमच्या बँकेतल्या सहकाऱ्याचा फोन आला त्याच्याकडे वपु आले होतेभेटायचे असेल तर घरी या असा..तो पण त्यांचा जबर चाहता होता . आम्ही दोघेही नवरा बायको ताबडतोब त्यांना भेटायला गेलो ..खुप गप्पा केल्या ,त्यांनी आमचे फोटो पण काढले .अजून आहेत प्रिंट माझ्याकडेत्यानंतर त्यांचा माझा पत्र व्यवहार चालू राहिला ..अगदी त्यांच्या मृत्यू पर्यंत मी दर वाढदिवसाला पत्र पाठवत असे आणि ते सुंदर अक्षरात उत्तर देत.त्यांची पत्नी गेल्यावर त्यांनी तिच्यावर केलेल्या कवितांचे एक पुस्तक पण मला पाठवले होते .तसेच अनिल अवचट यांचे लिखाण आवडायचे त्यांची अनेक अनेक जुनी जुनी पुस्तके पण मी वाचली होती .एका कार्यक्रमात ते भेटले..मला तुमची पुस्तके खूप आवडतात असा मी त्यांना सांगितले..त्यांनी माझी कोणती पुस्तके आवडतात असे सहज विचारल्यावर मी सांगितले मला तुमचे “हमीद “(हमीद दलवाई यांच्यावर लिहिलेले )पुस्तक आवडले त्यांना नवल वाटले इतके जुने पुस्तक वाचल्याचे .कौतुक केले तेव्हा त्यांनी ..🙂अशा सगळ्या गोष्टी सुद्धा न मागता मिळाल्या मध्यंतरी कोरोना काळातून सगळ्या सुखरूप बाहेर पडता यावे अशी एक इच्छा देवापाशी व्यक्त केली होती ती सुद्धा पुरी झाली त्यामुळे बकेट लिस्ट अशी काहीच कधीच नव्हती आणि आताही राहिली नाही 😊.