Bhaji - 1 in Marathi Cooking Recipe by Vrishali Gotkhindikar books and stories PDF | भजी - भाग 1

Featured Books
  • ഡെയ്ഞ്ചർ പോയിന്റ് - 15

    ️ കർണ്ണിഹാരയെന്ന ആ സുഗന്ധ പുഷ്പം തന്നിൽ നിന്നും മാഞ്ഞു പോയിര...

  • One Day

    ആമുഖം  "ഒരു ദിവസം നമ്മുടെ ജീവിതം മാറുമെന്ന് ഞാൻ എപ്പോഴും വിശ...

  • ONE DAY TO MORE DAY'S

    അമുഖം

    “ഒരു ദിവസം നമ്മുെട ജീവിതത്തിെ ഗതി മാറ്റുെമന്ന് ഞാൻ...

  • ഡെയ്ഞ്ചർ പോയിന്റ് - 14

    ️ കർണ്ണിഹാര ചോദിച്ച ചോദ്യത്തിന് വ്യക്തമായ ഒരു ഉത്തരം കണ്ടെത്...

  • One Day to More Daya

    Abu Adam: ശാന്തമായ വനത്തിനു മീതെ സൂര്യൻ തൻ്റെ ചൂടുള്ള കിരണങ്...

Categories
Share

भजी - भाग 1

🎋भजी 🎋🎋भजी म्हणजे अगदी सर्वांचा आवडता  पदार्थ...!. भजी आवडत नसलेला कोणी जगात असेल असे मला नाही वाटत  !!एकवेळ आंबा न आवडणारा भेटेल पण भज्याला नाही म्हणणारा कोणीच नसणार ..😃🎋पावसाळी  हवामानात भजी खाणे म्हणजे भन्नाट अनुभव!!!!जो प्रत्येक जण घरी किंवा बाहेर घेतोच 😋 🎋नाव वेगळे असेल पण भारतभर मिळणारा प्रकार आहे हा. !!!साउथला बोंडा म्हणतील, नॉर्थला पकोडे म्हणतील पण भजी असतीलच. 🎋भज्याचे पीठ म्हणजे भज्याची जान जान सलामत तर भजी पचास..😀 असे म्हणायला हरकत नाहीं  कधी पातळसर कालवलेले पीठ,तर कधी घट्ट ,तर कधी मध्यम .. कधी बेसन तर कधी भाजणी.कधी मिक्स... असंख्य चवीचे असते हे भज्यांचे पीठ ...कधी कोणी या पीठात ओवा घालतील तर कधी कोणी झणझणीत लाल तिखट डबल घालतील नाहीतर भरड कुटलेली मिरी घालतीलपीठ आणि मसाला प्रमाण योग्य जमायला हवे बास..पीठ मात्र नीट भिजवायचे इतकीच अट.!मग मात्र काय झकास चव येते खरपूस तळलेल्या भज्यांना!🎋मात्र प्रत्येक प्रकारची भजी करताना पिठ  भिजवायची वेगळी पद्धत असते 🎋मिरची भजी करताना त्यात थोडा सोडा घातला जातो म्हणजे छान फुगीर बनतात आणि लुसलुशीत पण होतात ..बटाटा भजी करताना बटाटा थोडा पातळ काप करणे जरूर असते शिवाय पीठ पण थोडे पातळ आणि तेलाचे कडक मोहन घालून भिजवायचे म्हणजे ही भजी छान कुरकुरीत होतात आणि टम्म फुगतात मग नुसत्या मिरची अथवा टोमाटो सॉस सोबत पण मज्जा येते    🎋पीठ भिजवुन झाले की एकदा तळहातावर दोन थेंब घेवून चव मात्र बघायची आणि मग सुरू घाणा टाकणं..🎋भज्यांसाठी सर्वात अधिक पसंती असते कांदा भजीला  कांदा भजी म्हणजे भज्यांचा राजा. कधी कांद्याची चकती चकती तळायची ,तर कधी पाकळ्या वेगवेगळ्या करून खेकडा भजी करायची.तर कधी कांद्याचे तुकडे करून ...सोबत हिरवी तळलेली मिरची मात्र हवीच ...!! 🎋त्या खालोखाल पसंतीची असतात बटाटा भजीबटाटा जरा जाडसर चकत्या करून त्याची भजी तळली तर बेसनाच्या आवरणातील तेलाच्या खरपुस आंचेवर तळलेल्या या बटाट्याची किंचित गोडसर चव एकदम छान लागते 😋🎋 फ्लॉवरची भजी करायची असतील तर हातानीच इंच दीड इंच जाडीची फुले फुले वेगळी करून घ्यायची.मग भजी करायची  🎋भजी स्वरूपातील फ्लॉवर चा देठही मस्त लागतो.दिल्ली साईडला फ्लॉवर च्या दांड्याची खास भजी असतात जी लग्नकार्यात आवर्जून ती करतात .🎋माझा मित्र एकदा सांगत होता..दिल्लीला एक पेशावरी हॉटेल मध्ये त्याने चिकन पकोडा त्याने खाल्ला होता  चिकन पकोडा विथ पुदिना चटणी लई भारी कॉम्बिनेशन होते म्हणे 🙂🎋जाडी मोठी मिरची असेल तर फार काहीच करावे लागत नाही! मध्ये एक चीर देऊन direct पिठात! 🎋पानांची भजी हा सुद्धा एक "स्पेशल" भजी प्रकार आहे. पूर्ण पानांची भजी खावी तर मायाळूची. केनीच्या पानांची भजी एकदम फुलतात आणि कुरकुरीत होतात. हद्ग्याच्या फुलांची भजी पण छान कुरकुरीत होतात ओव्याच्या पानांची भजी खुसखुशीत होतातया भज्यांसाठी भिजवलेल्या पिठात थोडे जिरे हातावर चुरून घातले की फारच छान चव येते. अळूच्या पानांची सुध्दा बारीक चिरुन अळू वडी सारखाच मसाला घालून भजी मस्त होतात..🎋पालक भजी चिरून करतात आणि हाताएवढ्या अख्या पानांची सुद्धा करतात .कांदा, बटाटा, मिश्र डाळी काहीही पालक भजीत मिक्स करू शकतो🎋माझ्याकडे खाऊच्या म्हणजे विड्याच्या पानाचा वेल आहे.. त्याची भजी अप्रतिम होतात🎋 कलकत्याला एकदा मुगभजी खाल्लेली मला अजून आठवतात. रस्त्यावरचा एक विक्रेता मुगाच्या पिठाचे बोराएव्हढे गोळे  ओल्या फडक्यावर थापून तळत होता काही वेगळीच पण मस्त चव होती 😋 खुप गर्दी होती त्याच्याकडे. 🎋 भज्यासोबत कधी पुदिना चटणी असेल तर कधी चिंचेची चटणी असेल तर कधी टॉमॅटो सॉस, खोबऱ्याची किंवा दाण्याची चटणी..पण भज्यांची खरी दोस्ती जमते ती लसणाच्या चटणीसोबत 😋 एक तर बेसनावर आणि तळणीवर उतारा म्हणून लसूण उपयुक्त तर आहेच पण त्याशिवाय भज्यांची चव सावरून आणि सुधारून देण्यासाठी लसूण चटणीला पर्यायाच नाही🎋छान ओलसर गारवा आहे.बैठकीच्या खोलीत एका बाजूला मंद स्वरात जुनी अतिशय आवडती अशी . मदमस्त गाणी  आशा ,रफी ,किशोर सुरेल आवाजात गात आहेत..❤️गप्पांची मैफिल जमली आहे. समोर गरमा गरम भजी येत आहेत, आणि त्यासोबत कोरडी लसूण चटणीही! नंतर मसाला चहा!😋 और क्या चाहिये! हेच तर सुख म्हणायचे ..❤️  🎋आमची आजी साधी भजी सुध्दा खूप छान करायची. तिची पद्धत बघून  जरा मोठी झाल्यावर मीही तशी भजी करण्याचा प्रयत्न करीत असे  पण पीठ जास्त झाले म्हणून पाणी घाल ..😀पाणी जास्त झाले म्हणून पीठ घाल😀 अशा प्रयत्नात तशी भजी करायचे प्रयोग मात्र फसायचे  शिवाय आईच्या अपरोक्ष हे प्रकार केले असल्याने..आई बाहेरून  यायच्या आत आवरा आवर करावी लागायची ....