...नुकतीच महाबळेश्वर वारी झाली(दर वर्षी एकदा तरी होतेच म्हणून वारी 😃😃)दहावी बारावी परीक्षा चालू असल्याचे सिझन अतिशय थंड होताआमच्या रिसॉर्ट मध्ये तीस पस्तीस रुममध्ये फक्त तीन ते चार कस्टमर होतेजवळपास सर्व हॉटेलमध्ये हीच स्थिती होती.. बाजार पेठेतील दुकानात तुरळक गर्दीखरेतर महाबळेश्वरला पाचगणी पासुन पुढे सगळीकडे सध्या रस्त्याची कामे सुरु आहेतबाजारपेठेतील रस्ता सुध्दा अर्धाच चालू आहेतरीही निवांत फिरता येत होतेइतकी कमी गर्दी आत्तापर्यंत नाहीं बघितली मीसिझन थंड होता म्हणून की काय सर्व फळांचे दर अतिशय स्वस्त होतेंStrawberry 🍓 with Cream तिथला खास प्रकार पहिल्या दिवशी खाल्ला पण त्यात क्रीम जास्त आणि स्ट्रॉबेरी आंबट...दुसऱ्या दिवशी मात्र बगीचा नावाच्या हॉटेलात भरपूर आणि गोड स्ट्रॉबेरी आणि आवश्यक असलेला खाल्ला स्ट्रॉबेरी शंभर रुपये किलो मिळालीअतिशय गोड लाल जर्द शिवाय विक्रेत्याने उभ्या उभ्याच आम्हाला ओंजळभर नुसती चव पाहायला म्हणून दिली होतीमलबेरी ,तुती, रासबेरी अशीच पन्नास रुपये बॉक्स ने मिळालीतिकडे रोज खात होतोचत्यामुळें विकत घेतलेल्या फळांचा घरी पोचताच ताबडतोब ज्युस केला रासबेरी ज्युसतुतीचा ज्युस तिथले आणखी एक मस्त फळ म्हणजे गुजबेरीसुंदर पिवळ्या धमक कागदी मुकुटात असलेले हे रसदार पिवळे फळ अतिशय चवीष्ट😋गोड असो अथवा आंबट रसदार आणि मन तृप्त करणारे🙂😃किती खाल्ले तरी समाधान होत नव्हते.हे फळ म्हणजे निसर्गाचा नजराणा म्हणता येईल ❤️ईथे पण विक्रेत्याने दोनशे रुपये तीन किलो दराने दिली शिवाय आग्रहाने भरपेट( पैसे ना घेता) तिथेच खायला घातली ती वेगळीचतीन दिवस या सगळ्या बेरी मनसोक्त खाल्ल्याशिवाय घरी भरपूर आणल्या 🍓 स्ट्रॉबेरी फळ अथवा गुजबेरी सोडुन बाकी सर्व नाशवंत असल्याने आधी स्ट्रॉबेरी आईस्क्रीम आणि अमूल क्रीम विकत आणले आणि स्ट्रॉबेरी क्रश विथ आईसक्रीम,स्ट्रॉबेरी विथ क्रीम, स्ट्रॉबेरी ज्यूस, रासबेरी ज्यूस हे सगळे प्रकार ताबडतोब घरी पण केले सजावटी ला पुदिना पाने होतीच सकाळी सहा ते साधारण नऊ पर्यंत तिथल्या दुकानांच्या दारात जवळपासचे शेतकरी आपल्या शेतातल्या भाज्या फळे घेउन बसतातदुकाने उघडे पर्यंत त्यांचा धंदा चालतो नंतर ते आणलेला माल संपवून पुन्हा गावाकडे चालू लागतात.कारण दुकाने उघडली की बसायला इथे जागा नसते .मोठ्या पानांची कढीलिंब पेंडी ..पंधरा रुपये.. (माझ्याकडे घरी झाड असल्यानं मी आणला नाही)लाल मुळा वीस रुपये पेंडी लाल गाजर वीस रुपये पेंडी मोठ्या पानांचा पुदिना पंधरा रुपये पेंडी छोटे चेरी टॉमेटो वीस रुपये किलोदोन किलो तीस रुपयाला घेतलें लेट्यूस पंधरा रुपये भारा 😃(आपण शहरात मॉल मध्ये सत्तर ऐशीला दोन डहाळ्या घेतो)चाळीस रुपयाला तीन भारे घेतलेंत्यांची भजी करून खायची मस्त होतात 😋😋हे सुध्दा लगेच खराब होते त्यामुळे आता येते दोन तीन दिवस नाश्त्याल भरपुर भजी खायची 😃🙂काजूच्या फळा सारखे दिसणारे लालचुटुक देशी सफरचंद (apple ber)अतिशय गोड वीस रुपयाला दोनविकणाऱ्या बाई ने वीस ला तीन दिली कणीस एक दहा रूपये ब्रोकोली.. वीस रुपये दोन गड्डेचार गड्ड्यांची केली खरेदी 😃शेतीचा माल विकायला आलेल्या जवळपासच्या खेड्यातील बायकांना पण लगबगीने घराकडे जायची गडबड होतीघरची कामे शेतीची कामे वाट पहात असणार .छोटे बटाटे वीस रुपये किलोथोडेसे घेऊ म्हटले तर तो माणूस म्हणाला हे सगळे पोते घेउन जा 😃काय करणार एवढे आम्हीं असे विचारले तर म्हणतो नुसते उकडून खा छान लागतो😋बटाटे वाल्या मामा ला शेतात जायची गडबड होती अडीच ते तीन किलो बटाटा पोत्या सकट पन्नास रुपयाला देऊन तो निघून गेला 😃अशी स्वस्ताईची कमाल होती अगदीं 😃😃आता या भरपूर आणलेल्या गोष्टी मित्र मैत्रिणी मध्ये वाटून टाकायच्यात्यांना पण घेऊ दे मजा 🙂🙂गंमत म्हणजे कपड्यांच्या दुकानात सलवार सूट चे कापड बरे दिसले म्हणून विचारले तरपूर्ण एम्ब्रॉइडरी केलेले डिझायनर सुटचे कापड त्याच्या अस्तर सलवार आणि दुपट्ट्या सहीत फक्तं हजार रुपयेपूर्ण शिवलेला तयार पलाझो सेट फक्तं सहाशे रुपये..मग काय खरेदी अपरिहार्य 😃हॉटेल्स सोडुन सगळीकडे अशी मनपसंत स्वस्ताई होती❤️❤️मी तर इतकी स्वस्ताई तिकडे कधीच पाहिली नाहीं🙂🙂बाकी जाम ,सरबते , 🍓 क्रश , किवी क्रश,चिक्की,फुटाणे ,शेंगदाणे वगैरे खरेदी दुकानात झालीदुकानात मात्र काहीच स्वस्त नव्हते जे असतील ते दर..🙂परत कोल्हापूरला येताना मेढा मार्गे रस्ता चांगला आहे म्हणून समजलेतिकडून आलोरस्त्यात रिटकवली नावाचे गावं लागतेत्या गावात मोठ्या प्रमाणावर फरसाण तयार होतेबरीच दुकाने आहेत इथे फरसाणची फरसाण आणि चिवडा दोन्ही पन्नास रुपये किलोचवीला दिलें होतें.. अतिशय चवदार होतें घेतलें दोन किलो घरगुती लाडू,मसाला, लोणची,वाळवणाचे पदार्थ, बेकरी प्रॉडक्ट किफातयशीर किमतीत मिळते..🙂अशी ही महाबळेश्र्वर वारी 🙂🙂ख ख खरेदी...आणि ख ख खादाडी 😃😃