आयुष्यात भेटलेल्या आणि चटका लावून गेलेल्या या दोन मुली
1) गुलाबी ..ती एक छोटी गोड मुलगी असेल चार पाच वर्षाची नेहेमी माझ्या घराजवळून जात असे बरोबर बहुधा तिची आजी असावी समोरच्या कॉलनीत रहात होती ती सुंदर गोरा रंग भूरें कुरळे केस ..अगदी लडी लडी ने कपाळावर झेपावणारे डोळे काळे आणी भुरे ..अशा मिश्रणाचे आणी गोल गोल टप्पोरे ..एकाच गाला वर एक छान खळी. गालात लपलेले आणी अगदी अपरे असे छोटे नाक नाजूक शी हनुवटी ..आणी या साऱ्या लवाजम्याला दृष्ट लागू नये म्हणून की काय हनुवटी खाली असणारा छोटांसा तीळ...तीचे नाव गायत्री होते ..पण मी मनातून तीला “गुलाबी “म्हणत असे रोज संध्याकाळी फिरायला जाताना मला तिची हाक असे “दीदी ..चल ना फिलायला माजा हात पकल मग तु हलवनाल नाय मला खूप हसू येत असे .तिची आजी पण कौतुकाने हसत असे कधी एखादे चोकलेट मी पण तीला देई मग तर ती इतकी ..क्युट..स हसत असे ..की बस ..!हळू हळू ओळख वाढून तिची आजी आणी मी एक दोन वाक्ये बोलू लागलो अधुन मधून ती आमच्या बागेत पण खेळायला येवू लागली .मला नेहेमी एक नवल वाटे की तिची आई किंवा वडील दोघेही नेहेमी बाहेर जात असत पण ती कधी त्यांच्या बरोबर नसे कायम ती आणी तिची आजी हीच जोडी !!तीचे आई वडील पण दिसायला बरे होते पण एकंदर पाहिले की ती कोणा सारखीच दिसत नव्हती .मला वाटले कधी कधी मुले आई वडीला ,,पेक्षा वेगळी असतात दिसायला तसेच काहीस् असेल बहुधा !ती अशीच आमच्या बागेत खेळत असताना एकदा मात्र मी तिच्या आजीला विचारलेच ..आजी ही तिच्या आई वडिलांच्या मागे नाही वाट्ते लागत बाहेर जायला ?कधी दिसत नाही कुठे जाताना त्यांच्या बरोबर आजी एकदम सहज म्हणाल्या अग ही काही त्यांची मुलगी नाहीये ..म्हणजे ते तीचे काका काकु आहेत का ..मग आई वडील कुठे आहेत तीचे ??अग तीला आई वडील नाहीयेत ..अग माझ्या भाची ची आहे ही मुलगी ..भाचीचे लग्न झाले आणी माझी बहीण वारली तीचे यजमान तर आधीच एका अक्सिडेंट मध्ये मृत्यू पावले होते भाचीच्या नवऱ्याला एड्स सारखा दुर्धर आजार होता ..त्या आजाराची लागण तीला पण नंतर वर्ष भरातच झाली या मुलीचा जन्म झाला ..आणी लगेच च थोड्या दिवसात दोघे त्या आजारात मृत्यू पावले मग भाचीच्या सासू सासऱ्यांनी कमनशिबी म्हणून हिला स्वीकारायला नकार दिला ..मग मीच घेवून आले हिला इकडे ..आणी करते आता सांभाळ हिचा .!2) रेश्मा .. रेश्मा माझ्या घराशेजारी राहायला येवून वर्ष झाले छान सडसडीत बांधा सावळा पण सतेज .रंग धारदार नाक .डोळे काळे भोर आणी चमकदार केस छान लांब आणी दोन वेण्यात गुंतवलेले शाळेचा ड्रेस असो वा इतर कोणते पण कपडे रुपडे अगदी खुलून दिसत असे पाचव्या इयत्तेत शिकणारी रेश्मा खुपच चुणचुणीत होती वडील वकील .आणी आई गृहिणी .पण घरात ती एकटी मुलगी असल्यामुळे खूप खूप लाडकी.. घरात आजी आजोबा काका आणी आत्या पण आहेत तीचे लाड करायला त्यामुळे थोडी” चढेल “..पण होती मना विरुध्द काही ही झालेले खपत नसे बाई साहेबांना काही काही वेळा तीचे हटट पुरवताना घरचे सगळे च जेरीस येत असत अशा वेळेस मला वाटे कीती हे लाड अशाने एक दिवस लाडाने वेडी होईल की काय ही ..रेश्माला पण आपले हटट सर्व कडून पुरवून घेताना एक विचित्र आनंद मिळत असे असे काही जरी असले तरीही मुलगी मात्र खरेच गोड होती ..अभ्यास नृत्य ..खेळ .वक्तृत्व अगदी सगळ्यात अव्वल होती ती मला वाटे कदाचित या मुळे च घरचे लोक तिच्या या खोडी कडे दुर्लक्ष करीत असावेत असाच एक दिवस रेशमाचा वाढदिवस आला सगळे घर आठवडा भर तिच्या वाढदिवसाची जय्यत तयारी करीत होते जणू काही एखादा मोठा सण .आला असावा वाढदिवसाचा मेन्यू .तीचे कपडे .आमंत्रणे ..अगदी जोरदार काम चालु होते ..रेश्मा पण जाम आनंदात होती मावशी माझ्या वाढदिवसाला यायचे असे चार दिवस आधीच तीचे आमंत्रण होते तीच्या आईने पण त्या दिवशी सकाळीच मला सांगितले ताई यायचे बर का संध्याकाळी संध्याकाळी शेजारचे घर नुसते दणाणून गेले होते मी पण वेळेवर गेले तिच्या साठी एक सुंदर “टेडी घेवून पाहून अगदी खुष झाली रेशमाची स्वारी ..!!नंतर मग यथासांग केक कापणे ..आणी मग तिच्या सर्व दोस्त मंडळी समवेत ..खाद्य पदार्थांचा समाचार ..घेणे मी पण स्वयपाक घरात तिच्या आईला डिश भरून देण्यात मदत करत होते सोबत गप्पा पण चालू होत्या आमच्या ..मी म्हणाले कीती छान दिसतेय आज रेश्मा ..आणी दंगा पण खूप चाललाय मला तर तीला पहिल्या वर तिच्या साठी एक गाणे म्हणावेसे वाटू लागले कोणते हो ताई ?..रेशमाच्या आईने हसून विचारले तेच हो वाढदिवस स्पेशल ..‘तुम जियो हजारो साल सालके दिन हो पचास हजार “माझे बोलणे ऐकताच अचानक रेशमाच्या आईला हुंदका फुटला मी विचारले ..काय झाले वाहिनी ..अहो ताई हजार साल काय घेवून बसला हे वर्ष तरी निघेल की नाही शंका रेशमाची आई आता हंमसा हमशी रडू लागली ..मी तर चकित च झाले ..म्हणजे काय हो वाहिनी ??ताई काय सांगू तुम्हाला रेश्माला ब्लड क्यांसर आहे ..डॉक्टर नी सांगितलेय कोणत्या ही दिवशी हिचा मृत्यू येवू शकतो म्हणून तर आम्ही तिचा कोणताच शब्द खाली पडू देत नाही ..दुर्दैवाने तिच्या मृत्युच्या दिवसाची आम्हाला वाट पहावी लागतीय आणी या भयंकर गोष्टीचा सामना करताना आंम्ही सारे रोज कणा कणाने मरतो आहोत ..हे ऐकून मी पण हतबुद्ध झाले ..!!