Social media Facebook is a boon in Marathi Short Stories by Vrishali Gotkhindikar books and stories PDF | सोशल मिडिया फेसबुक एक वरदान

Featured Books
Categories
Share

सोशल मिडिया फेसबुक एक वरदान

सोशल मिडिया

वीणा माझी जवळची मैत्रीण

रोज नाही पण अधून मधून भेटायचो

कधी फोन वर बोलणे ही व्हायचे

पण हल्ली खुप दिवस झाले माझी तीची भेट नव्हती

मीही अशाच काही माझ्या वेगवेगळ्या व्यापात गुंग होते

मग मीच केला फोन

तिच्याशी फोन वर बोलले तेव्हा समजले नुकतीच तिच्या सासुबाईंची  ब्रेस्ट कॅन्सरची सर्जरी झाली आहे

चार दिवस झाले त्यांना घरी आणले होते

म्हणुन मग त्यांना भेटायला घरी गेले

गेल्यावर त्यांची चौकशी केली

थोडेफार इकडचे तिकडचे बोलले

पण माझ्या लक्षात आले की तिच्या सासूबाई खुप चिडचिड करीत होत्या आणि आपला सगळा संताप वीणा वर काढत होत्या .

आल्या गेल्या समोर बिचारी वीणा खुपच “कानकोंडी"होत होती होती .

खरेतर पूर्वी त्यांचा स्वभाव खूप शांत आणि समजदार होता

वीणाचे आणि त्यांचे तर मैत्रिणीचे नाते असायचे

त्यामुळे मला त्यांच्या या वागण्याचे नवल वाटले

मी बाहेर आल्यावर वीणा म्हणाली

बघितलेस ना कशा करीत आहेत

ही ग मलाही नवलच वाटले मी म्हणले

“काय सांगु ग ....

अचानक असे दुखणे आल्यावर त्या पण डिप्रेस झाल्या

साहजिक आहे म्हणा ..

त्यात वयामुळे त्यांना सर्जरीचा पण थोडा त्रास झाला .

त्यामुळे कदाचित माझ्यावर सतत चिडतात ,

मी मात्र  सबुरीने वागते ग “.बोलताना तिच्या डोळ्यात पाणी आले .

मी हलकेच तिला थोपटले आणि थोडेसे बोलुन तिला शांत केले .

      कामाच्या गर्दीत खुप दिवस परत तिच्याकडे जायचे राहूनच गेले .

मग एक दिवस गेले तिच्याकडे .

वीणा हसून म्हणाली .

“काय ग खुप दिवसांनी आलीस ,ये ये .”

घरात देवापुढे मंद उदबत्तीचा वास होता ,

आणि सासूबाई च्या खोलीतून चक्क मराठी नाट्य संगीत ऐकू येत होते

एकंदर वातावरण प्रसन्न होते .

मी खुणेने तिला कसे काय असे  विचारले.

“चल चहा प्यायला त्यांच्या खोलीत जाऊया .”

मागचा अनुभव जमेस धरता मी बिचकत आत गेले .!

वीणाच्या सासूबाई अगदी प्रसन्न मनाने एक पुस्तक वाचत होत्या ,सोबत नाट्य संगीत ...

सर्जरीमुळे डोक्याला रुमाल बांधलेल्या तिच्या  सासूबाई माझ्याकडे बघून छान हसल्या

आणि मग मस्त गप्पा मारू लागल्या

मलाही बरे वाटले मीही रमले त्यांच्या सोबत

बोलता बोलता अधून मधुन त्या त्यांच्या स्मार्ट फोन मध्ये  पण लक्ष घालत होत्या .

    थोड्या वेळाने आम्ही बाहेर आलो .

मी  विचारले ,”इतका कसा काय ग फरक यांच्यात पडला ?,खुपच आनंदी वाटतात “

” ही सारी फेसबुक ची कृपा बर का !!”

.” ते कसे काय ?

    “तुला सांगु सासुबाईंची ही सर्जरी झाल्यापासून मी पण खुप अस्वस्थ  होते ग .

त्यांचा त्रास बघवत नव्हता आणि चिडचिड पण थांबत नव्हती .

मग  एक आयडिया डोक्यात आली .

मी त्यांचे फेसबुक वर खाते काढुन दिले .

आधी नकार घंटा होती त्यांची ..

मग हळू हळू रमायला लागल्या त्या .

बऱ्याच शाळेतल्या त्यांच्या गल्लीतल्या अनेक मैत्रिणी त्यांना हळुहळू फेसबुक वर भेटत गेल्या

काही ग्रुपवर पण त्या जोडल्या गेल्या

बरेचसे  कॅन्सर पिडीत फेसबुक वर पण आहेत .

हे मी नोटीस केले होते ..त्यांना पण ते दाखवुन दिले .

या स्त्रियांशी  फ्रेडशिप केल्यावर त्यांची  एकमेकात विचारांची देवाणघेवाण सुरु झाली

ब्रेस्ट कॅन्सर च्या पेशंटच्या वेदना आणि अनुभव जाणून घेता घेता

त्या एकमेकांच्या मैत्रिणी झाल्या .त्यानी  आपला असा एक ग्रुप पण केला .

या विश्वातील मैत्रिणींचा  त्रास आणि अडचणी पहाता त्यांना पटले की आपला त्रास त्या मानाने बराच सुसह्य आहे कारण त्यांना त्यांचा कॅन्सर पहिल्या स्टेजलाच समजला होता

या सर्जरीनंतर ची ट्रीटमेट, रीकव्हरी या संदर्भात एकमेकात देवाण घेवाण करतात

शिवाय सध्या एका सपोर्ट ग्रुप च्या पण त्या सक्रिय मेंबर आहेत फेसबुक वर

त्यातून नवीन पेशंटना मनोधैर्य देणे हे पण चालु असते.

वाहवा खुपच छान ग ..

किती सकारात्मक बदल झाला आहे त्यांच्या आयुष्यात..

.असे बोलुन मी तिचा निरोप घेतला

आणि या फेसबुकला मनोमन धन्यवाद दिले  !!