‘लग्नाला दोन वर्षे झाली पण हा माणूस काही मला अजूनपर्यंत कळला नाही, काय याच्या मनात असते काय माहीत?’ असा विचार पाठमोऱ्या नितीन कडे बघत नयन करत होती.
‘आत्ता पर्यंत मूड बरा होता हिचा, अचानक का रागाने उसळली ही काय माहीत? स्त्रियांच्या मनाचा थांग कोणाला लागत नाही हेच खरं’,असा विचार नितीन करत बसला.
खरंच नवऱ्याला बायकोच्या मनातलं आणि बायकोला नवऱ्याच्या मनातलं कळलं असतं तर किती चांगलं झालं असतं. बायको नि म्हणायच्या आत नवऱ्याने ती गोष्ट पूर्ण केली असती किंवा नवऱ्याने काही सुचवण्या आधीच बायकोने एखादं काम पूर्ण केलं असतं, तक्रारी ला जागाच नसती.
भांडण झाल्यामुळे नितीन आणि नयन एकमेकांशी दिवसभर बोललेच नाही, आणि रात्री न बोलताच ते झोपून गेले पण झोपताना दोघांनीही देवाला प्रार्थना केली.
‘हे देवा मला ह्या नितीन च्या मनात काय आहे ते कळू दे म्हणजे आमचे गैरसमज होणार नाहीत.’
‘हे देवा ह्या नयन च्या मनातले विचार मला कळू दे म्हणजे मी त्यानुसार वागीन जेणेकरून आमच्यातील कलह टळतील’
दुसऱ्या दिवशीची सकाळ काही औरच होती,देवाने दोघांचीही कळकळीने केलेली प्रार्थना ऐकली होती.
"व्वा मस्त वास येतोय,काय केलं नाश्त्याला?",नितीन कुतूहलाने म्हणाला.
"वास शेजारून येतोय,मी अजून काही केलं नाही बस करतेच पाच मिनिटात पोहे",नयन
‘वाटलंच होतं मला पोह्याशिवाय काय करणार ह्या नयन बाई, आमची मुलगी फार सुगरण आहे हो काय मोठ्या दिमाखात सांगितलं होतं हिच्या आईने. व्वा रे सुगरण बाई! येऊन जाऊन पोहे, आता हिला जर काही म्हटलं तर मारक्या म्हशी सारखी अंगावर धावून येईल’
हे सगळं नितीन च्या मनातलं नयन ला कळलं पण हे नयन ला कळलं हे मात्र नितीन ला नाही कळलं.
नयन ला कळलं असून तिने ते चेहऱ्यावर काही दिसू दिलं नाही,तिने आलेला राग आवरला, आणि दहा मिनिटात नितीन पुढे नाश्त्याची डिश ठेवली.
"अरे व्वा शिरा! मला फार आवडतो,पण तू तर पोहे करणार होतीस न",नितीन आनंदाने म्हणाला.
"हो करणार होती पण म्हंटल नेहमी नेहमी काय पोहे करायचे म्हणून शिरा केला",नयन ने हसत म्हंटल.
शिरा खाऊन नितीन लोळत पेपर वाचू लागला,नयन घरकामात जुंपली. कामं करकरून थकल्यावर तिने बघितलं नितीन अजूनही लोळतच होता तिने मनात म्हंटल
‘छान आहे, मी मजुरासारखं मरमरून काम करायचं आणि हा गाढवासारखा मस्त लोळणार,लग्ना आधी हा म्हणे मी खूप पुरोगामी विचारांचा आहे, बायकांनी काम करायचं आणि पुरुषाने नुसतं बसायचं मला मुळीच पटत नाही. तर असा आहे तुझा पुरोगामी पणा लबाडा!’
हे तिच्या मनातलं ऐकून नितीन धडपडत उठला आणि केरसुणी घेऊन डायरेक्ट घर झाडायला लागला.
नयन ला आश्चर्य च वाटलं.
"अरे अचानक कामाला लागलास?",नयन
"हो तू एकटीच किती काम करणार न ,त्यात मोलकरीण आठ दिवसाच्या सुट्टीवर आहे म्हणून म्हंटल थोडी करावी मदत",नितीन
दुपारचे जेवण आटोपल्यावर नितीन नयन ला म्हणाला,
"संध्याकाळी माझ्या मित्राच्या लग्नाचा वाढदिवस आहे त्याने आपल्याला बोलावलंय तेव्हा तिथे जाऊ आपण सात वाजेपर्यंत तयार राहा"
संध्याकाळी ही साडी नेसू की ती नेसू , हा दागिना घालू का तो दागिना घालू , हे हेअरस्टाईल करू की ती असे अनेक प्रश्न विचारून नयन नि नितीन ला भंडावून सोडले.
"नयन मॅडम काहीही नेसा,कुठलाही दागिना घाला,कोणतीही हेअरस्टाईल करा तुम्हाला काय छानच दिसते सगळं",नितीन
"खरंच, आता सांग बरं मी कशी दिसतेय?",नयन उत्साहात म्हणाली.
"छान",नितीन म्हणाला आणि मनात म्हणाला,
‘छान काय छान! ध्यान दिसतेय तू नुसतं ध्यान!
काहीही कर जशी आहे तशीच दिसणार न, एवढा वेळ वाया घालवला मेकअप मध्ये, तिकडे जायला उशीर होतो त्याचं काहीच नाही हिला, आता मेकअप करून का अप्सरा दिसणार होतीस? कुब्जाच दिसणार होती न ढमाले’ असं मनातच नयन ला नितीन प्रश्न विचारू लागला.
हे सगळं नयन ला अर्थातच कळलं,
‘अस्सं का मी कुबजा का मग काय तुझे डोळे फुटले होते का कशाला लग्न केलं माझ्याशी’,असं नयन मनात म्हणाली आणि रागाने नितीनकडे बघू लागली.
नितीन टरकला,’ अरे हिला माझ्या मनातलं कळलं की काय की मला भास झाला, मला भासच झाला असेल कारण मला हिच्या मनातलं कळतेय हिला माझ्या मनातलं नाही कळत’ असा विचार करून त्याने सगळे विचार झटकले आणि नयन ला म्हंटल,
"चल लवकर उशीर होतोय आपल्याला"
दोघेही समारंभात पोहोचले, उत्सवमूर्तींना अभिनंदन करून झालं,गिफ्ट देऊन झालं, बफे मध्ये हातात थाळी घेऊन ते परिचित व्यक्तींशी बोलू लागले. बोलता बोलता नयन चं लक्ष नितीन च्या उत्सव मूर्ती मित्राकडे गेलं तिने मनात विचार केला,’पहा लग्नाला पाच वर्षे होऊनही हा किती प्रोपोर्षनेट आहे आणि हा बघा
आमच्या नीतीन चा तोरा, हाता पायाच्या काड्या आणि पोटाचा नगारा
अगदी कोयला मधल्या माधुरी सारखं झालं माझं, लग्नात होता शाहरुख आणि आता झाला अमरीश पुरी,काय ते दिसणं आणि काय ते हसणं’ असा विचार करून नयन नि नितीन कडे बघितलं तर तो तिच्याचकडे रागाने बघत होता.
नयन चमकली,’अरे याला आपल्या मनातलं कळलं की काय’असा क्षणभर विचार करून तिने तो विचार झटकून टाकला,’छे! शक्यच नाही,मला ह्याच्या मनातलं कळते याला नाही’
तेवढ्यात नयन ला तिची आत्येबहिण येताना दिसली.
"अगं सुषम तू इथे कशी?",नयन
"अगं ही तारा आहे न उत्सवमूर्ती ती माझी मैत्रीण आहे म्हणून आली मी पण तू इथे कशी?",सुषम
"अगं हा विजय आहे न उत्सवमूर्ती तो नितीन चा मित्र आहे म्हणून आम्ही दोघे आलो",नयन
सुषम नितीन शी बोलायला आली. तिच्याशी बोलताना नितीन मनात म्हणाला,’बघा ही सुषम, लग्नाला हिच्या आठ वर्षे होतील पण चवळीची शेंग जशीच्या तशी च आणि ह्या बघा नयन लग्नानंतर दोन वर्षात चवळी शेंगेचा लाल भोपळा कधी झाला कळलंही नाही’
आता मात्र नयन च्या संतापाचा कडेलोट झाला, भराभर पानातले पदार्थ खाऊन तिने संपवले, सुषम ला कोणीतरी तिच्या ओळखीच्या व्यक्तीने बोलावल्यामुळे ती ह्या दोघांचा निरोप घेऊन गेली.
"झालं का तुझं, जाऊ आपण आता घरी,माझं जरा डोकं दुखतेय",नयन नितीन ला म्हणाली.
‘झालं जरा मी चांगल्या मूड मध्ये आलो की बरोब्बर हिचं डोकं दुखते, चला आता काय पदरी पडलं आणि पवित्र झालं म्हणायचं दुसरं काय’, नितीन मनात म्हणाला
आणि उघडपणे म्हणाला," हो हो चला जास्त उशीर केला तर ट्राफिक लागेल असं म्हणून त्याने मित्राचा निरोप घेऊन कार चालवायला घेतली.
‘लाल भोपळा म्हंटल ते बरोबरच होतं माझं, बघा कशी रागाने फुगली टम्म लाल भोपळयासारखी’,असं नितीन ने मनात म्हंटल की लगेच नयन उघडपणे म्हणाली,
"काय रे, मी कुबजा, मी लाल भोपळा, मी म्हैस आणि तू कोण रे रेड्या"
" अरे बापरे म्हणजे तुलासुद्धा मनातलं कळत होतं वाटते",नितीन घाबरून म्हणाला.
"आणि जसं तू काहीच म्हंटल नाही. पोटाचा नगारा काय, गाढव काय, रेडा काय, त्यात कहरात कहर म्हणजे चक्क अमरीश पुरी म्हणायला ही कमी केलं नाही तू मला",नितीन तावातावाने म्हणाला.
असे भांडत भांडतच ते घरी आले. बऱ्याच वेळाने कसे तरी त्यांचे भांडण थांबले. आणि त्यांनी देवाला हात जोडले,
"हे देवा एकमेकांच्या मनातलं कळल्यावर आमचे भांडण कमी होतील असे आम्हाला वाटले म्हणून आम्ही तशी तुला प्रार्थना केली होती पण मनातलं कळल्यावर भांडण कमी होण्या ऐवजी वाढायलाच लागले तेव्हा आम्हाला परत पाहिल्यासारखे च कर. जय देवा", असे म्हणून ते झोपी गेले.
दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे नितीन-नयन ची दिनचर्या सुरू झाली.
"अगं ऐकलं का, आज दुपारी माझी काकू आणि आत्या येणार आहेत, जवळच त्यांचं काहीतरी काम आहे ते करून जाता जाता येणार आहेत त्या तासभर गप्पा मारतील आणि जातील",नितीन
हे ऐकताच नयन च्या कपाळावर आठ्या पडल्या तिने मनात म्हंटल,’येतील तासभर पण त्या तासाभरात टोमण्याची सेंच्युरी पूर्ण करतात की नाही बघा, टोमण्यां च्या फॅक्टऱ्या आहेत नुसते ह्याचे सगळे नातेवाईक’ ,असा विचार करून लगेच तिने नितीन कडे बघितलं तर तो मस्तपैकी शीळ घालत पेपर वाचत होता.
नयन ला हायसं वाटलं चला आता याला आपल्या मनातलं ऐकू येणार नाहीये,देव पावला.
फोनवर बोलून झाल्यावर नयन नितीन ला म्हणाली,"अरे आत्ता फोन आला होता,माझे काही नातेवाईक पुढच्या आठवड्यात येतील आपल्याकडे जास्त वेळ नाही,फक्त तास दोन तासांसाठी"
‘अरे बापरे! हिचे नातेवाईक म्हणजे संकटच, सारखी टकळी सुरू असते त्यांची ऐकून ऐकून कान कीट्ट होतात’,असा विचार करून चमकून त्याने नयन कडे बघितलं तर ती मस्त गाणं गुणगुणत कपड्यांच्या घड्या करत होती.‘लग्नाला दोन वर्षे झाली पण हा माणूस काही मला अजूनपर्यंत कळला नाही, काय याच्या मनात असते काय माहीत?’ असा विचार पाठमोऱ्या नितीन कडे बघत नयन करत होती.

‘अरे बापरे! हिचे नातेवाईक म्हणजे संकटच, सारखी टकळी सुरू असते त्यांची ऐकून ऐकून कान कीट्ट होतात’,असा विचार करून चमकून त्याने नयन कडे बघितलं तर ती मस्त गाणं गुणगुणत कपड्यांच्या घड्या करत होती.
‘हुश्श!, चला म्हणजे हिला आता माझ्या मनातलं कळणार नाही तर, देवच पावला’, असं मनात म्हणून नितीन ने हात जोडले.
ते म्हणतात ते योग्यच आहे
एकमेकांच्या मनातलं न कळलेलंच बरं
सगळंच जर लागलं कळू तर काय आहे खरं!!
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆