Bhayan Wada - 1 in Marathi Horror Stories by प्रियंका कुलकर्णी books and stories PDF | भयाण वाडा - १

Featured Books
  • The Devil (2025) - Comprehensive Explanation Analysis

     The Devil 11 दिसंबर 2025 को रिलीज़ हुई एक कन्नड़-भाषा की पॉ...

  • बेमिसाल यारी

    बेमिसाल यारी लेखक: विजय शर्मा एरीशब्द संख्या: लगभग १५००१गाँव...

  • दिल का रिश्ता - 2

    (Raj & Anushka)बारिश थम चुकी थी,लेकिन उनके दिलों की कशिश अभी...

  • Shadows Of Love - 15

    माँ ने दोनों को देखा और मुस्कुरा कर कहा—“करन बेटा, सच्ची मोह...

  • उड़ान (1)

    तीस साल की दिव्या, श्वेत साड़ी में लिपटी एक ऐसी लड़की, जिसके क...

Categories
Share

भयाण वाडा - १

" वाडेगाव ..वाडेगाव " घंटीचा  टणटण असा आवाज करत कंडक्टर ने बस थांबवली..गाडी तशी रिकामीच होती .रात्रीची वेळ असल्याने फारसे प्रवासी गाडीत नव्हतेच. भल्या मोठ्या दोन बॅगा घेऊन प्रकाश आणि आरती हे दोघे उतरले.." साहेब ..इतक्या रातच्याला इथं कायले उतरता गावा बद्दल लई काय काय ऐकून हाय ..त्यात आज अमावस्या ..पावसापाण्याचे दिवस ..सोबत बाई माणूस..अन इथून गाव दोन कोसावर ,जंगलाचा रस्ता हाय म्हणून म्हणलं पुढं  मलकापूर एसटी स्टँड वर उतरा सकाळच्याले येऊन जाजा हिकडं" त्या दोघांना भयाण ठिकाणी उतरतांना बघून कंडक्टर बोलला.." नाही हो दादा ..आम्ही जातो नीट अन इथून जवळच आहे आमच घर एक कोसावर .पोहचू आम्ही अर्धा तासात"  प्रकाश" बरं ठीक हाय साहेब जपून जाजा " अस बोलून कंडक्टर आणि ड्रायव्हर बस घेऊन पुढे निघून गेले..आता त्या भयाण रस्त्यावर प्रकाश आणि आरती दोघेच होते..रात्रीचे जवळपास बारा वाजत आले होते..वाडेगाव च्या त्या बस स्टॉप वर चिटपाखरूही नव्हते.बस स्टॉप कसला एक लहानसा थांबा होता .त्याच्या आजूबाजूला दोन तीन टपऱ्या होत्या ज्यायावेळी बंद होत्या.गाव आत जवळपास दोन किलोमीटर अंतरावर होते. प्रकाश पेशाने शिक्षक होता आणि त्याची आठ दिवसांपूर्वी वाडेगाव ला बदली झाली होती. उद्या त्याला शाळेवर तातडीने रुजू व्हायचे होते म्हणून तो दुपारीच त्याच्या पूर्वीच्या गावावरून वाडेगाव ला यायला निघाला होता पण वाटेत बस बिघडल्याने पोहचायला  इतका उशीर झाला. चार पाच दिवसांपूर्वी प्रकाश इथे येऊन राहण्याकरिता घर पाहून गेला होता .घर कसल भला मोठा वाडाच होता .वापरायला लागणार आवश्यक त्या वस्तू,भांडीकुंडी तिथे उपलब्ध असल्याने सोबत फक्त कपड्यांच्या दोन बॅगा आणि आवश्यक तितक्या वस्तू सोबत आणल्या होत्या. तो वाडा तिथून एक किलोमीटर अंतरावर होता. रात्रीची वेळ तिथपर्यंत पोहचायला काही वाहन ही नव्हतं म्हणून चालत चालत जायच ठरवतात.आरती प्रकाश ची बायको वर्षभरापूर्वीच दोघांचे लग्न झाले होते.    " प्रकाश आपण उगाच निघालो रे आज.उद्या सकाळी निघालो असतो तर बर झालं असत .तो कंडक्टर पण म्हणतं होता समोरच्या स्टॉप वर उतरा आपण ऐकायला पाहिजे होत त्यांच." आरती ही खूप घाबरलेली असते.." तुला सकाळ पासून म्हणतोय लवकर निघू पण तूझ सुरू च हे घेऊ दे ते घेऊ दे.सकाळी निघालो असतो तर किती वेळच पोहचलो असतो. भरीस भर वाटेत बस खराब झाली.आत चालत जाण्याशिवाय आपल्या कडे काही पर्याय नाही ." प्रकाश वैतागून बोलतो..दोघेही चालायला लागतात.हातात जड बॅगा ,रस्त्यावर अंधार, वाटेत घनदाट जंगल आणि पावसाच्या पाण्याने कच्च्या पायवाटेवर झालेला चिखल हे सगळं पार करून प्रकाश आणि आरतीला त्यांच्या घरापर्यंत पोहचायच होत. आरती मनातून घाबरलेली होती.. प्रकाश मात्र धीट होता. चालत चालत जंगलाची पायवाट लागते.चिखलामुळे दोघांना भरभर चालता येत नव्हतं. दोघांच्याही मोबाईलची बॅटरी संपल्याने एक छोटा टॉर्च घेऊन दोघे चालत असतात.घनदाट जंगल ,तो जंगली किड्यांचा, पशु पक्ष्यांचा येणार भयंकर आवज त्या भयाण शांततेत थरकाप उडवणार होत.   आरतीला सतत वाटतं होतं की आपला कोणी तरी पाठलाग करत आहे पण मागे वळून बघायची तिची हिंमत होत नव्हती.पायतुडवत दोघे चालत असतात पण खूप वेळ चालून अजूनही त्यांचे घर आलेले नव्हतं.."प्रकाश ! मला खूप भीती वाटतेय रे.सगळं कसं विचित्र वाटतय मला .खूप गूढ आणि भयाण" आरती .." तू पण ना आरती कसली भित्री आहेस..मी आहे न सोबत ." प्रकाश तिला समजावतो ..अखेर तासभर चालत ते जंगल पार करून त्यांच्या वाड्यापर्यंत येतात.आरतीच्या जीवात जीव येतो .न राहवून ती मागे वळून बघते तर समोर दिसणार ते जंगल खूप भयंकर दिसतं असते आरती घाबरून पटकन समोर बघते.घर आल्यामुळे तिच्या मनाला थोडा दिलासा मिळतो पण तो दिलासा काही क्षणापुरता असतो.. तो चिरेबंदी वाडा बघून तिला आणखी भीती वाटायला लागते. अंगणात पाऊल टाकताच अभद्र चाहूल तिच्या मनाला लागते. प्रकाश जवळच्या चावीने वाड्याच दार उघडतो तशी फट्कन एक पाल खाली पडते.त्या पालीला बघून आरती किंचाळते.घरात पाऊल ठेवल्या ठेवल्या अशी पाल खाली पडणे हे तिच्या मनाला खटकतं. प्रकाश मात्र तो भव्य वाडा पाहून आनंदी असतो. आतून वाडा खूप उदास वाटतो अनेक वर्षांपासून बंद असणाऱ्या त्या भयाण वाड्यात प्रकाश आणि आरती राहायला आलेले असतात.आरतीला मात्र त्या वाड्यात अनिष्ट शक्ती असल्याची जाणीव होते खरच तिथे काही अमानवी शक्ती असेल की आरतीच्या मनाचे खेळ????