Niyati - 2 in Marathi Fiction Stories by Dilip Bhide books and stories PDF | नियती भाग २

Featured Books
Categories
Share

नियती भाग २

नियती  भाग  २

भाग 1 वरून पुढे ..

                                     

तुम्ही अगदी नी:संकोच बोला.” - एक अधिकारी.

हे ऐकल्यावर आता प्रकाशच्या चेहऱ्यावर तरतरी आली. आम्ही पण जरा relax झालो. प्रकाशनीच बोलायला सुरवात केली

“माहिती as such काहीच नाही. पालिकेच पत्र आल्यावरच कळल. हे पहा.” प्रकाश ने पत्र दिल.

त्यांच्या पैकीच  एक जण बोलला

“ते सर्व आम्हाला माहीत आहे. पण मला सांगा की तुमचं घर जवळ जवळ 100 वर्ष जुनं आहे, तुमचे वडील, आजोबा कोणीतरी तर काहीतरी बोललं असेल जरा प्रयत्न करा, आठवून बघा.”

“आजोबा काय आणि वडील काय कोणी या बाबतीत बोललं नाही. हां पण आजोबा एकदा गोष्ट सांगत असतांना घराण्या बद्दल विषय निघाला तेंव्हा म्हणाले होते की दोन हजार वर्षांपूर्वी वाकाटक साम्राज्याच्या राणीने ही जमीन आपल्या पूर्वजांना दिली होती. कुठल्या तरी लढाईत अतुलनीय पराक्रमा बद्दल हे बक्षीस होत. पण आता आमच्याकडे जमिनीचा एवढाच तुकडा राहिला आहे. आणि आता तर तो ही गेला. सम्राट समुद्रगुप्ताची मुलगी असावी कदाचित अस आजोबा म्हणाले होते. रांणीच नाव त्यांनी सांगितलं होत, पण आता आठवत नाही. इतर गोष्टीं सारखीच  ही गोष्ट म्हणून विसरून पण गेलो.” – प्रकाश

“पहा इतकी महत्वपूर्ण माहिती दिलीत तुम्ही.” एक अधिकारी बोलला. “अजून आठवा. तुमच्याकडे कोणाचा जुना पत्र व्यवहार वगैरे आहे का ? म्हणजे ऐतिहासिक कागद पत्रे  किंवा वस्तु ?”

प्रकाश थोडा वेळ विचार करत होता. पण मग प्रकाशची आईच म्हणाली की

“अरे प्रकाश, त्या लाल कपड्यात बांधून ठेवलेल्या चामाड्यांच्या पिशया आहेत त्या साहेबांना दाखव. साहेब, प्रकाश च्या वडीलानी एकदा त्यातली एक पिशवी उघडून पाहिली होती. पण कुठल्या तरी अगम्य भाषेत आणि लिपीत  लिहिलेल्या त्या पोथ्या काही वाचता आल्या नाहीत. म्हणून पुन्हा बांधून ठेवल्या.  मी लग्न करून आले तेंव्हा पासून त्या पोथ्या पाहते आहे.”

प्रकाश ने मला खूण केली आणि आम्ही दोघांनी आतल्या खोलीतल्या माळ्यावरच्या पोथ्या काढल्या आणि ते १० गठ्ठे त्यांच्या समोर नेऊन ठेवले.

त्यांनी एक गठ्ठा उघडला. पानं जीर्ण शीर्ण झाली होती. हात लावला तर तुकडे पडतील अशी अवस्था होती. पहिल्या पानावर त्यांची नजर फिरली अन  आपसात थोडी चर्चा केली आणि एकमत झाल्यावर म्हणाले की

“हा पहिलाच गठ्ठा आहे. अनमोल ठेवा आहे हा प्रकाशराव. तुमच्या मागच्या सर्व पिढ्यांनी हा जतन  करून ठेवला ही तुमच्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. एक फार मोठ राष्ट्र कर्तव्य केलं आहे तुम्ही. ही पोथी ब्राह्मी लिपीत आहे आणि जवळ जवळ १८०० ते २००० वर्षांपूर्वी लिहिल्या गेली असावी असा आमचा प्राथमिक अंदाज आहे. बाकीच्या सर्व पोथ्या नंतर लिहिल्या असाव्यात. बहुधा प्रत्येक पिढीने त्यात भर घातली असावी. अर्थात ते अभ्यास केल्यावरच आम्ही निश्चितपणे सांगू शकू. आता हे जस होत तसंच ठेवून द्या. आमच्या कार्यालयातून रीतसर पत्र घेऊन माणूस येईल आणि हे सर्व गठ्ठे घेऊन जाईल. आणि तुम्हाला रीतसर पावती देईल.” त्यांच्यापैकी जो मुख्य होता त्यांनी समारोप केला.

“या पोथ्यांचं तुम्ही काय करणार ?” प्रकाश म्हणाला.

“यांचा आम्ही अभ्यास करू. त्यात जर काही महत्वपूर्ण माहिती मिळाली तर उत्खननाला योग्य दिशा मिळेल. आणि तसंही हा ऐतिहासिक दस्तावेज आहे. यांचा संपूर्ण अभ्यास करायचाच आहे.” एक अधिकारी.  

“त्याला किती वेळ लागेल ? म्हणजे आम्हाला केंव्हा परत मिळतील ?” – प्रकाश.

“नाही आता ही राष्ट्रीय संपत्ति आहे. ती आता सरकार कडेच राहील.” - अधिकारी.

“म्हणजे आमचं घर आणि जमीन आधीच सरकारजमा झाली, आणि आता हा  पिढीजाद वारसा पण तुम्ही घेऊन जाणार ? आम्ही नकार दिला तर ?” – प्रकाश बोलला.

“नाही तुमच्याकडे तो अधिकारच नाहीये.” - अधिकारी.  

प्रकाश हताश. त्याला जरी त्या पोथ्यांचा काहीच उपयोग नव्हता तरी आपली पिढ्यानपिढ्या चालत आलेली वस्तु सरकारजमा होतेय म्हंटल्यांवर वाईट वाटणारच. दुसऱ्याच दिवशी त्यांच्यापैकी एक जण आपल्याबरोबर दोन माणसं घेऊन आला आणि रीतसर पावती देऊन ते गठ्ठे घेऊन गेला.

नंतर आम्ही उत्सुकतेपोटी एक महिन्यानी गावी जाऊन पाहिलं. excavation अगदी हळू हळू चाललं होत. तिथे प्रकाश कडे जे लोकं आले होते, त्या पैकी पैकी दोघं होते. त्यांना विचारलं तर म्हणाले की हे असच चालतं. आम्ही वापस आलो. नंतर वर्ष असच गेलं. पूर्वापार चालत आलेली जमीन गेल्यामुळे प्रकाशच्या आईने हाय खाल्ली आणि त्यातच ती गेली. दवाखाने आणि औषधोपचार यात खूप खर्च झाला. प्रकाशला लोन काढाव लागलं आणि बऱ्याच लोकांकडून हातउसने पैसे पण घ्यावे लागले. त्याची आर्थिक परिस्थिति खूप खालावली. मी बरीच मदत केली पण मला सुद्धा मर्यादा होत्या. प्रकाश ने आता जमिनीची आशाच सोडली होती. पण त्यांची मन:स्थिति विचित्र झाली होती. खूप चिडखोर झाला होता. हे ही दिवस जातील अस सांगून मी त्याला धीर देण्याचा प्रयत्न करत होतो. पण एकूण अवस्था कठीणच होती. असेच काही दिवस गेल्यावर मी प्रकाशला म्हंटलं की एकदा आपण पुन्हा गावी जाऊन बघू. त्यांची इच्छा नव्हती पण कसा बसा तो ही तयार झाला.

आम्ही नंतरच्या रविवारी गावी गेलो. पण यावेळी परिस्थितीत बराच बदल झाला होता. चारही बाजूंनी काटेरी तारेचे कुंपण घातले होते आणि एकदम कडक सुरक्षा दिसली. चांगला १०० x १०० फुटांचा आणि जवळ जवळ ५० फुट खोल खड्डा झालेला दिसत होता. २५ - 30 माणसे कामाला होती. आश्चर्य म्हणजे विहिरी इतका खोल खड्डा असून एकही थेंब पाणी कुठूनही झिरपतांना दिसत नव्हतं. चारही संशोधक तिथे होते आणि मोजमाप करून पुढची कामं सांगत होते. त्यांच्यापैकी एकाचं आमच्याकडे लक्ष गेलं त्यांनी आमच्याकडे बघून हात हालवला. सगळे वरती आले. आम्हाला म्हणाले चला तिकडे साइट ऑफिस मध्ये बसू. बाहेरून जरी तात्पुरत पत्र्याच ऑफिस दिसत असलं तरी आतून सर्व सोई केल्या होत्या. थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर प्रकाश म्हणाला

“साहेब हे किती दिवस चालणार आहे ? आमचा प्लॉट आम्हाला कधीच मिळणार नाही का ?”

“हे पहा या सगळ्या गोष्टींना वेळच लागतो. पण तुमची मालमत्ता ही तुमचीच आहे. थोडं विस्तारपूर्वक सांगतो की अस बघा की उत्खननात जर शीलालेख किंवा तत्सम गोष्टी सापडल्या की ज्या उचलून संग्रहालयात नेता येतील तर तुम्हाला तुमचा प्लॉट वापस मिळेल. पण जर काही शिल्प किंवा भित्ति चित्र किंवा एखादा पुरातन इमारतीचा अवशेष अस जर काही मिळालं की जे उचलून नेता येणार नाही तर ही जागा सरकार घेईल, पण तुम्हाला त्याचा योग्य तो मोबदला मिळेल. अर्थात याला किती वर्ष लागतील हे सांगता येणं हे अवघड आहे.” – अधिकारी.

प्रकाश पुरता निराश झाला. थोडा वेळ गेला मग म्हणाला की “आत्ता काय स्थिति आहे उत्खननाची ?”

“तुमच्याकडून जी कागद पत्रे म्हणजे ते १० गठ्ठे, आम्ही घेतले, त्यात अतिशय सुयोग्य रीतीने सर्व नोंदी केल्या आहेत. आणि त्यात लिहिल्या प्रमाणे आम्हाला त्या, त्या  खुणा मिळताहेत. आणि त्या दिशेनेच उत्खनन चाललं आहे.” – अधिकारी.

“पण तुम्ही तर म्हणाले होते की भलत्याच कुठल्या तरी लिपि मध्ये लिहिलं आहे म्हणून. तुम्हाला ते वाचता येत ?” – मी विचारलं.

“नाही. डॉक्टर रामलिंगम नावाचे अतिशय प्रज्ञावान  इतिहासकार आहेत. ते या भाषांचे तज्ञ आहेत. ते हे अर्थ लावण्याच काम करताहेत. आणि त्यांच्याच सूचने नुसार आम्ही excavation करतो आहोत.” – अधिकाऱ्याने माहिती पुरवली.

“पण इथे ठिकठिकाणी पावला पावलावर पोलिस दिसताहेत ते कशाला ? आम्हाला आमच्याच जमिनीवर काय चाललंय ते बघायला मनाई करताहेत. प्रकाशला विचारल्याशिवाय राहवलं नाही.” – प्रकाश

“हे बघा तुम्ही ही गोष्ट फक्त तुमच्याच जवळ ठेवाल याची खात्री देणार असाल तर सांगतो. ही गोष्ट जर फुटली तर law and order चा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. म्हणून अगदी तुमच्या बायकोला सुद्धा सांगणार नाही यांची खात्री द्या.” – अधिकारी.

“ठीक आहे we promise.” – प्रकाश.

“काय आहे की तुमच्या कडील पोथ्या वाचल्यावर अस लक्षात आलं की इथे उत्खननात बऱ्याच पुरातन आणि मौल्यवान वस्तु मिळण्याची शक्यता आहे. अश्या वस्तूंना जगाच्या बाजारात खूप मागणी असते. जर ही गोष्ट फुटली तर सुरक्षा यंत्रणा आहे त्यापेक्षा अजून खूप मजबूत करावी लागेल. आणि आम्हाला जबाबदार धरण्यात येईल. तेंव्हा ही गोष्ट फक्त तुमच्याजवळच ठेवा. हे राष्ट्रकर्तव्यच समजा. ही जमीन तुमची आहे म्हणून तुम्हाला सांगितलं. आणखी तुम्ही इथे पुन्हा येउच नका. कारण तुमच्या येण्यावर कुणाच तरी लक्ष असू  शकतं.” – अधिकाऱ्याने समज दिली.

साइट वरून वापस येतांना मी प्रकाशला म्हणालो की “अरे त्यांचं काम झाल्यावर तुझा प्लॉट तुला वापस मिळेल मग काळजी कशाला करतोयस. माझ्या मते तू आता एखादी जास्त पगाराची नोकरी मिळतेय का ते बघ. म्हणजे सर्व कटकटी संपतील.”

क्रमश:.......

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com