Ti... in Marathi Classic Stories by Akshata alias shubhadaTirodkar books and stories PDF | ती.......

Featured Books
  • इश्क दा मारा - 79

    यश यूवी को सब कुछ बता देता है और सब कुछ सुन कर यूवी को बहुत...

  • HOW TO DEAL WITH PEOPLE

                 WRITERS=SAIF ANSARI किसी से डील करने का मतल...

  • Kurbaan Hua - Chapter 13

    रहस्यमयी गुमशुदगीरात का समय था। चारों ओर चमकती रंगीन रोशनी औ...

  • AI का खेल... - 2

    लैब के अंदर हल्की-हल्की रोशनी झपक रही थी। कंप्यूटर स्क्रीन प...

  • यह मैं कर लूँगी - (अंतिम भाग)

    (भाग-15) लगभग एक हफ्ते में अपना काम निपटाकर मैं चला आया। हाल...

Categories
Share

ती.......

ती चा जन्म झाला तेव्हा घर कसं बहरून गेलेलं  घरात लक्ष्मी आली म्हूण सगळे आनंदात होते पेढे वाटून सगळयांना संपत नव्हते तिला पाहण्यासाठी संगे सोयरे नातेवाईकाची रेलचेल चालू होती थोड्याच दिवसात बारसा पार पडलं तिला शोभेल असे नाव  ठेवण्यात आले 

 

 

ती आता शाळेत जाऊ लागली हुशार विद्यार्थिनी म्हूणन ती शाळेत नावाजलेली घरी हि एकुलती एक लेक म्हूणन तिचे लाड व्हायचे वर्ष सरत होती आणि ती दहावी उत्तीर्ण झाली तिनी यशाची पहिली पायरी सहज पार केली मग बारावी उच्च शिक्षण घेऊन तिनी पदवी मिळवली तिच्या कुर्तृत्वावर तिला चांगली नोकरी मिळाली आई बाबा दोघांना हि तिचा अभिमान वाटे 

 

 

ती  लग्नाची झाली आणि तिला स्थळ येऊ लागली आपली मुलगी चांगल्या घरात नांदावी अशीच तिच्या आई बाबा ची अपॆक्षा होती स्थळ येत होती पण मनासारखी नव्हती आपल्या एकुलत्या एक पोरीला कुठलाही त्रास नसावा असच त्याना वाटत होत त्यात एक स्थळ आलं मुलगा उच्च पदावर कंपनीत कामाला होता सगळ काही मनासारख दिसत होत आई बाबा नि ती ला  विचारले 

 

" मुलगा चागला आहे पसंद आहे ना तुला "?

 

तिचा  होकार येताच लग्नाचा बार उडाला  लग्नात कुठेही काहीही कमी पडू दिल नाही  एकुलत्या एक लेकीला भरलेल्या डोळ्यांनी आई बाबानी सासरी पाठवणं केली ...

 

ती सासरी पोहोचली नवीन स्वप्ने घेऊन ती आली होती पण खऱ्या आयुष्याची झळ तिला आता लागू लागली नवरा आपल्या विश्वात रमत असे ऑफिस   मीटिंग च्या नावावर बाहेर मित्रासोबत फिरणे रात्री उशिरा येणे चालू होते सासू सासरे आपला मुलगा किती काम करतो असेच म्हण्याचे सांगणार  कोणाला अशी परिस्थिती झाली होती आपल्या आई बाबा ना त्रास नको म्हूणन ती ने आपल्या घरी काहीच सांगितले नाही 

 

आई बाबा ना आपण खुश आहोत असेच सांगायची  ती चा नवरा पण तिच्या आई बाबाना आपण तुमच्या मुली ची खूप काळजी घेतो असेच दाखवायचं 

 

आणि असेच एक दिवशी निशुल्क कारणावरून भांडणांत तिच्या नवऱ्याने तिला  ढकले त्यात तिला  मार  लागला सासू सासरे गावी गेलेले तिच्या आतली अग्नी पेटून उठली तिनी आपले सामान घेऊन आपले घर गाठले आई बाबा ना सविस्तर  सगळे सांगितले आपल्या पोरीला एवढे सहन करायला लागले म्हूणन दोघे हि त्याला जाप विचारण्यासाठी बाहेर पडले तिने त्यांना रोखले आणि डिवोर्स  हाच या वर उपाय आहे असे सांगितले कालांतरात दोघांचा डिव्होर्स झाला  ती आई बाबा बरोबर  राहू लागली आपल्या गुणी लेकीची झालेली दुर्दशा पाहून त्याच मन  पिळवटून उठे दुसऱ्या लग्नाचा तिनी विचार करावा असे त्याना वाटे पण आपल्या ला लग्न करायचं  नाही असे तिनी त्याना सांगितले ....‌

 

कस्तुरीने पेन खाली ठेवले तिला भरून आलेले ती नी चेहरा धुतला आणी ती परत रुम मध्ये आली पाहत तर रेवा म्हणजे कस्तुरी ची मुलगी तिचे लिखाण वाचत होती 

 

"रेवा काय करतेस ?"

"मम्मा काय भारी लिहिलंय आहेस तु पण ती कोण आणी कशी सुचली तुला ही स्टोरी आणी तिचं नाव का नाही टाकलं तु  अगं पुढे काय लिहिणार आहेस तु आय एम टु इक्साटेट "

"हे बघ रेवा ते सोड तुझा अभ्यास कर जा "

"अगं झालाय अभ्यास हे सांग ना "

"तुला एकदा सांगितलेले कळत नाही जा म्हणुन "

"अगं सांग ना"

"रेवा एकदा सांगितले ना जा म्हणुन कशाला राग आणतेस मला "

"मम्मा तु माझ्या वर ओरडतेस ना जाते मी नाही येणार तु बोलावल्या शिवाय "

(रेवा आपल्या रूम मध्ये निघून जाते)

"रेवा थांब बेटा ऐक.. उगीच रागावले मी तिची काही ही चुक नसताना "

(कस्तुरी रेवाच्या रूम मध्ये जाते )

"बेटा ऐक ना ..."

"साॅरी साॅरी माफ कर मम्माला ..पिल्झ तुझ्या शिवाय काहीच कोण मला रागवायला .."

"म्मा पिल्झ "

(दोघीही रडु लागतात )

"बरं बेटा ऐक मी सांगते ते ऐक तुला त्या स्टोरी बद्दल तिच्या बद्दल ऐकायचं आहे ना मग ऐक...ती म्हणजे मी  माझी गोष्ट आहे ती"

"काय ... मम्मा म्हणजे तु बाबाला डिव्होर्स दिला तु तर मला सांगितले की बाबा बेपत्ता आहे म्हणून कोण आहे माझा बाबा"

"बेटा तुझे जन्माचे आई-वडील कोण आहेत मला नाही माहीत पण तु माझी मुलगी आहेस हे मात्र तेवढंच खरं आहे "

"मम्मा काय मला नाही कळत नाही आहे "

"बेटा मी तुला दत्तक घेतले एका आश्रमातुन" 

"काय"?

"हो कधी न सांगणार सत्य तु माझ्या तोंडून वदवून घेतले पण बेटा त्या दिवसापासुन मी तुला माझ्या हृदयात जन्म तिला आयुष्य खुप भरकटलेले आई-बाबा दुसऱ्या लग्नाचा विचार करत होते पण मी ठरवलं आता परत त्या बेड्या न घालता जगायचं तेही कोणाचं तरी आयुष्य सावरुन आती तु माझ्या नशीबात आली ती कायमची पण एक विनंती करते सत्य कळल्यावर मी परकी आहे हे वाटुन घेऊ नकोस मी तुझी मम्मा होती आती सदैव राहणार आणी मला कोण आहे तुझ्या शिवाय" 

"नो मम्मा खुप सहन केलस ना तु आणि मी तुला परक कसं म्हणणे एका अनाथ मुली ला तु छान आयुष्य दिलंस मम्मा तु माझी मम्मा होती आहे आणि राहणार आणी मी तुला नेहमी खुश ठेवणार लव यु मम्मा "

(दोघीही एकमेकींना मिठ्ठी मारून रडु कोसळल्या)