काकभूशुंडी रामायण
हे पक्षी राज झालो कृतार्थ मी आपल्या दर्शनाने,
आज्ञा करावी आपण पाळीन मी ती आदराने ,येणे केले काय निमित्ताने ,गरुड बोलले मृदू वाणीने ,स्तुती आपली तर केली आहे शिवशंकराने, ऐकावे आता मी आलो कोणत्या कारणाने,
कार्य तर झालेच आहे असे वाटते ,आपल्या दर्शनाने ,संशय मोह भ्रम असे सर्व दूर झाले ,पवित्र आश्रमात मी जसे पाऊल ठेवले,
ईच्छा आहे दुःखहारक भक्तीपूर्ण कथा श्रीरामांची ऐकायची, विनंती करतो कथा सांगायची, विनम्र प्रेम भावनेने भरलेले सुखदायक असे हे गरुडाचे ऐकून बोलणे, कागभुशुंडीजी सांगू लागले कथा ,
ज्यात असती श्रीरामाची गुणवर्णने,
प्रथम ऐकविले त्यांनी रामचरितमानसाचे रूपक , नंतर सांगितले रावण व नारदाचे कथानक. मग केले श्रीरामांच्या बालक्रिडाचे वर्णन, ऐकून त्या बालक्रिडा मन गेले मोहून ,
मग कसे झाले विश्वामित्रांचे आगमन, ते सांगून केले मग श्रीरामांच्या विवाहाचे वर्णन, करण्या रामाला राज्याभिषेक राजा दशरथ झाला आतुर ,पण अभिषेक तर नाही झाला पण दशरथाला झाले दुःख अपार, विरहाच्या भीतीने राजाचे मन झाले कातर,
नगर जनपण झाले दुःखी विरहाने ,आता केले वर्णन श्रीरामांचे वनात झाले गमन, जाताना केवटाने केले नमन ,प्रयाग मध्ये झाली प्रथम वस्ती मग चित्रकूट झाले वस्तीस्थान, मंत्री गणांनी केले अयोध्येकडे प्रस्थान, आणि राजा दशरथाचे झाले कसे देहावसान ,आता आले वर्णन भरताचे ,
भरत निघाला चित्रकुटाला भेट घेण्या श्री राम प्रभूंची ,श्रीरामांनी समजावले भरताला, खडावा घेऊन अयोध्येला परतला तो राज्य करायला ,भरताने खडावा ठेवल्या सिंहासनावर, पाहू लागला अयोध्येचा राज्यकारभार , इकडे वनात इंद्रपुत्र जयंतानी केली सीतेची आगळीक, सजा पावला तो , प्रभू आणि अत्री ऋषींची झाली भेट, आता कथा विराध वधाची, अगस्त्य ऋषींच्या सत्संगाची, दंडक वनात वस्ती करून पवित्र केले वन, पंचवटीत साधुसंतांना केले भयमुक्त, कथा सांगितली मग लक्ष्मणाला केलेल्या उपदेशाची, मग कशी केली दशा त्या त्रास देणाऱ्या शुर्पणखेची, कसा केला वध खरदूषणाचा ,आणि शुर्पणखेकडून कशी पोहोचली कथा खरदुषणाच्या वधाची ,
पुढे कथा आली रावण मारीचाची, आणि सीता हरणाची, राम सीता विरहाची. मग कथा कबंध वधाची आता कथा पंपा सरोवराची ,हनुमान सुग्रीव भेटीची वालीच्या वधाची , सुग्रीवाच्या राज्याभिषेकाची, राहिले तेथे आणि सुग्रीव कसा मोहाने झाला धुंद ,
आणि श्रीरामांनी कसा केला त्याला सावध, सुग्रीवानी पाठविले वानरांना सीता शोधाला, संपातीच्या भेटीने सीतेचा शोध लागला, हनुमान समुद्र पार करून गेले लंकेला, भेटून सीतेला धीर त्यांनी दिला, अशोक वाटिकेचा विध्वंस केला, येऊन परत सर्व वृत्तांत रामाना विदीत केला, श्रीराम व सैन्य पोहोचले समुद्र तटावर, भेट झाली विभीषणाची. सेतु बांधला समुद्रावर, झाली वानर राक्षसांची घोर लढाई,
मग कथा कुंभकर्ण मेघनाद पराक्रमाची, व त्यांच्या वधाची, मग कथा रावण वधाची ,मंदोदरीच्या शोकाची ,विभीषणाच्या राज्याभिषेकाची .राम सीतेची झाली भेट पुष्पक विमानातून परतले अयोध्येला ,मग झाला राज्याभिषेक श्रीरामांचा.
.गरुड म्हणाले हे काकभुशुंडी तुमच्या कृपेने मी रामकथा ऐकलीआणि श्रीरामांच्या भक्तीत लीन झालो. समाप्त.
लक्ष्मण गीताआपल्या प्रारब्धात जे सुख संपत्ती यश आहे ते कोणी थांबवू शकत नाही तसेच जे दुःख किंवा त्रास होणार असतील ते भोगावेच लागतात.मित्र शत्रू हे निमित्त मात्र आहे आणि या मान्यतांमुळेच आपल्या मनात द्वेष उत्पन्नहोऊन आपण त्याप्रमाणे वागतो आणि शुभाशुभ कर्मात गुंतत जातो. जसे प्रवासात बरेच लोक एकत्र असतात त्यांचा परिचयही नसतो, पण ते एकत्र असतात व नंतर वेगळे होतात. तसेच एका देशात राहणारे लोक एकमेकांना भेटत पण नाहीत परंतु ते राष्ट्रीय भावनेने एकत्र जोडलेले असतात.सुख व दुःख हे मनाचे धर्म आहेत प्रत्येकाच्या मान्यतेनुसार ते बदलत असतात एखाद्याला थोडेसे पैसे मिळाले तरी तो अगदी आनंदाने फुलून जातो तर एखादा आपल्याकडे आता काही कोटी रुपये आहेत असे समजून दुःखी होत असतो. दारूचा स्वाद एखाद्याला आवडतो तर एखाद्याला नाही .सौंदर्य विषयक कल्पना पण निरनिराळ्या देशात भिन्न असतात. एखादा अन्नपदार्थ रुचकर आहे किंवा नाही, , ,,एखादी वस्तू असल्याने त्रास होतो आहे तो एखादी वस्तू नसल्याने त्रास होतो आहे, हे सर्व भ्रम आहेत. आपली आवड किंवा परिस्थिती वस्तूला सुख देणारी अथवा दुःख देणारी ठरवत असते. वस्तूमध्ये सुख किंवा दुःख देण्याची शक्ती नाही. माणूस काय मानतो यावर ते अवलंबून असते. एखादा करोडपती सर्व काही असूनही दुःखी असतो तर एखादागरीब त्या परिस्थितीतही आनंदी असतो.