Blessed by God 🙏
वानवळा
याचा शब्दशः अर्थ नुकत्याच केलेल्या अथवा एखाद्या ताज्या गोष्टीचा नमुना देणे नवीन आलेले फळ, नवीन पदार्थ.. ताजा असतानाच देणे..यामध्ये देणाऱ्या व्यक्तीचे प्रेम अधोरेखित होते मित्रांचे प्रेम आणि आपुलकी ❤️ मिळणे ही अतिशय मौल्यवान गोष्ट आहे जी नशिबानेच मिळते.म्हणूनच पहील्या ओळीत देवाच्या आशीर्वादाचा उल्लेख आहे.अशाच काही आयुष्याच्या प्रवासातल्या मौलिक वानवळ्या च्या गोष्टी... एका मित्राच्या गुऱ्हाळ घरातलेहे एक एक किलोचे गुळाचे रवे घरी पोचवले जातात... याला "पिल्ल" म्हणतात .पुर्वी त्यांच्या गुऱ्हाळ घरात गेले की भरपूर रस पिऊन, गुळ खाऊन, गरम गुळाची साय खाऊन पाहुणचार घेतला की जाताना काही न बोलता असे रवे एका पिशवीत घालून सुपूर्द केले जात...किती हा गुळ?अहो एवढा कशाला?अशा वाक्याना मनाई होती😀सोबत किटली भर रस, साईच्या वड्या आणि काकवीची बाटली असे ..आजकाल गुऱ्हाळ घरे कमी आहेतएकतर त्याला खर्च खुप येतोतो परवडत नाही म्हणून शेतकऱ्याचा ऊस साखर कारखान्यात जातोयांच्याकडे मात्र गुऱ्हाळ घर लहान प्रमाणात का होईना असतेच आमचे त्यांच्या गुऱ्हाळ घरी जाणे आताशा थोडे कमीच झालेय ते मित्र मात्र वानवळा म्हणून दर गुऱ्हाळाला असा गुळ घरी आणून देतात..सोबत दोन बाटल्या काकवी पण असते ईथे ..त्याची किंमत विचारणे किंवा कशाला इतक्या लांबून आणून दिलात असे म्हणणे म्हणजे त्यांच्या भावनांचा अपमान होईल हे आपल्याला समजत असते...गेल्या तीस पस्तीस वर्षात एकदाही गुळ विकत आणला नाहीआणि फ्रिज मध्ये काकवीची बाटली नाहीये असेही कधी झाले नाहीअसेच एक मित्र कणसाच्या शेतात काढणी सुरू झाली की पहिल्यांदा एक मोठी पिशवीभर (खरे तर लहान पोतेच असते ते 😀)कणसे कामगारा कडून घरी पाठवणार..पहिला कोवळा कणसाचा माल तुम्हाला दिलाय बघाआणखी लागली तर सांगा असा निरोप सुध्दा फोन वर येतो कणसे खुप गोड असतात, भाजुन खाल्ली जातात, चिवडा केला जातोजास्ती असल्यानं आजूबाजूच्या गोतावळ्यात वाटली पण जातात फोन वर आवर्जून त्या कणसांच्या चवी विषयी आम्हीं सांगतोते खुष होतात..."मला माहीत आहे तुम्हाला आवडतात म्हणुन पहिला तोडा तुमच्याकडे पाठवतो बघा..असे समाधानाने सांगतात .एका मित्राकडे चार पाच म्हशी आहेतदुधाचा व्यवसाय आहेबऱ्याच वेळा चीकाचे दुध उपलब्ध असतें खरेतर आमच्या घरापासून लांब राहतात तेपण जेव्हा शक्य असेल तेव्हा पहील्या दिवसाचे चीकाचे दुध पाठवतात(आम्हाला फक्त पहील्या दिवसाचे आवडते हे त्यांना माहीत आहे)काही कारणाने शक्य नाहीं झाले तर तयार खरवसाचे त्यांच्या पद्धती प्रमाणे सुंठ आणि गुळ घातलेले पातेले घरी येते 🙂अपवाद आम्हीं गावाला गेलो असेल तरच यात खंड पडतो..काश्मिरी केशराची शेती असणारे आणि त्याचा व्यापार करणारे एक काश्मिरी मित्र व्यवसाया निमित्त सहा महिने काश्मीर मध्ये आणि सहा महिने पुणे ,कोल्हापूर येथे असतात इथे आले की आवर्जून भेटायला येतातइकडच्या तिकडच्या गप्पाचहा पोहे उप्पिट इतर काही नाश्ता आयटेम वगैरे. होतात.कधी जेवायच्या वेळीं आले तर आग्रह केला की सोबत जेवतात .त्यांना महाराष्ट्रीयन जेवण आवडतेमात्र दर ट्रिप ला आठवणीने तिकडच्या काश्मीर केशराच्या डब्या भेट म्हणून देतात हे केशर ईतके शुद्ध असते की त्यांनी बॅगेतून काढल्या काढल्या घमघमाट सुटतोअगदी त्या प्लास्टिक पिशवीला आणि हाताला सुध्दा वास लागतोजो खुप वेळ रेंगाळत राहतो....याचे पैसे किती असे विचारले की म्हणतात.."क्यो शरमिंदा कर रही हो बहनजी...अभी अभी तो आपके हाथ का लाजवाब खाना खाया है..."यावर आपण निरुत्तर होतोत्यांच्या मुळे माझ्या घरात नेहेमीच केशराचा मुबलक वापर होत असतो 🙂 एक मित्राने हौसेने आपल्या शेतात आंब्याची चार पाच झाडे लावली आहेतत्याच्या कैऱ्या खुप मोठ्या आणि खोबरी असतातत्यांच्याकडून सुध्दा नमुना येतोआणून दिल्यावर अगदीं हक्काने सांगतातवहिनी मला तुमची कैरीची डाळ, कढी, चित्रान्न खायचे आहेत्यासाठी या कैऱ्या बर कामाझा स्वार्थ आहे यात 🙂मग या मोसमात हे पदार्थ खायला आवर्जून त्यांना बोलावले जाते तेही येऊन खाऊन तारीफ करून जात असतातयांच्या झाडाच्या एका कैरीचे अर्धी बरणी भरुन लोणचे होतें..🙂🙂 असेच एक मार्केट यार्ड मधील आंब्याचे व्यापरी असलेले मित्र आम्हाला मालवण चा बिट्टी आंबा आवडतो म्हणुन जेव्हा या आंब्याच्या पेट्या मागवतात तेंव्हा आमच्या साठी एक वेगळी पेटी काढून ठेवली जातेत्यांच्याकडे आंबे खरेदी ला जातोतेंव्हा ती पेटी सुपूर्द केली जातेयाचे किती पैसे... असे विचारतामला तुमच्या झाडाचे आंबे पिकले की चार पाच आणून द्या म्हणजे झालं..हीच त्याची किंमत..असे म्हणून एक मनमोकळे हास्य...आमच्या बागेत दोन हापुस आंब्याची झाडे आहेतत्याला मोहोर थोडा उशिरा येतो त्यामूळे ते उशिरा पिकतात..त्यातले मग थोडे आंबे आम्हीं त्यांच्याकडे पोचवतोगेल्या गेल्या ते आंबे कापुन खायला घेतातव काय चव आहे... असा अभिप्राय ही देतात अशीच एक मैत्रीण जिचा चकलीचा आणि कुरडया करायचा घरगुती व्यवसाय आहेत्यामुळे मी तर कधीच या दोन्ही गोष्टी घरी करीत नाहीजेव्हा लागेल तेंव्हा तिच्याच कडून ऑर्डर देऊन मागवून घ्यायच्या..ती सुध्दा अधून मधून चकल्या आणून देते...कशाला ग इतकी धांदल करून आणून दिल्यास असे म्हणले की..."अग गरम ताजा घाणा निघाला होतातुला आवडतात म्हणून चार घेऊन आले..असे बोलून आपल्याला निरुत्तर करणारकुरडया चे काम सुरू झाले की मला गव्हाचा चिक आवडतो म्हणून दोन तीन वेळेस तरी डब्यातून तयार चिक पाठवणार....असे हे ऋणानुबंध गेले तीस ते पस्तीस वर्षे अव्याहत चालू आहेत ❤️कोणी काही आपल्याला दिले की तो डबा किंवा ती पिशवी परत करतानाती रिकामी न देता त्यात काहीतरी घालून द्यायचे ही आपली रीतमी सुध्दा असेच वड्या लाडू चिवडा असे पदार्थ परत देत असतेपण त्यामुळें त्यांचें प्रेम आपुलकी याची परतफेड मात्र कधीच होणार नसते याची मलाही जाणीव असते.मग रफी साहेबांच्या ओळी तोंडावर येतात...एहसान मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तो...ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों...🙏❤️