१) नदी ग ..युगानुयुगे वाहत असतेस तुदोन्ही किनार्याना धरून कीती स्थित्यंतरे झाली जगात त्या साऱ्यांना सोबत घेऊन अनेक ऋतु आले आणी गेले तुझ्या प्रवाहात बदल नाही झाले आयुष्ये बदलत असतात काठावरच्या माणसांची तुला काहीच खबर नसते जणु कशाची आणी कुणाची .तुला पाहतात कुणी देव मुर्तीच्या रूपात आणी पुजतात मंदिराच्या गाभार्यात आला जरी कंटाळा कधी थांबायची “मुभा” नाही तुला कधी वाटले जर असे तुझ्या मनाला तर “आमंत्रण “च असेल ते तुझ्या मृत्यूला !विचार करते ना जेव्हा मी तुझ्या मनाचा खरेच ठाव च लागत नाही ग तुझ्या प्रवाहाच्या तळाचानवल वाट्ते पाहुन तुझे” उदंड “वाहाणे तुझ्या अस्तित्वाने तर “सुसह्य “होत असते माणसाचे जगणे !!२)शहर ..शहर पुर्वी जागे व्हायचे “झुंजुमुंजू “च्या सुवासाने “देवळातल्या घंटेच्या नादाने सुवासिनींच्या सडा रांगोळीने आणी देवळातल्या पुजार्याच्या लगबगीने दिवस भर मग चालु राहत असे थोडीशी धावपळ चाकरमान्यांची शहर तेव्हा लवकर उठायचे आणी झोपायचे सुध्धा लवकर मग ठरवले शहरातल्या लोकांनी शहराला “मोठ्ठे “करायचे जगाच्या नकाशा वर त्याला आणुन ठेवायचे आणी मग शहराची “भरभराट “चालु झाली ऑफिसे ,कारखाने ,गिरण्या यात काम करण्या साठी माणसांची “गर्दी “शहरात लोटली माणसाना जणु “झिंग “चढली शहराला वाढवायची शहराला मात्र काय वाटतेय कुणालाच पर्वा नव्हती त्याची आता शहराचे “वाढणे “इतके वाढले की ..शहराला “सुज” येऊ लागली . माणसांच्या गर्दीत रेल्वेच्या जंजाळात कारखान्यांच्या चक्रव्यूहात त्याची दमछाक होऊ लागली आता शहर झोपतच नाही मग जागे तरी कसे होणार ते ?पहाटेपासून रेल्वेच्या कर्कश्श शिट्ट्यात दुध पेपर डबे वाल्यांच्या कलकलाटात सीमेच्या अस्ताव्यस्त वाढलेल्या जंगलात त्याचा जीव घुसमटतो आहे “काळ्या “धंद्याच्या काळ्या हातांनी त्याला आपल्या मगर मिठीत घेतलेय शहर “धापा “टाकतेय आता त्याचा “जीव “ जीवात नाहीये माणसे मात्र धावतायत आपल्याच तालात त्याना शहराशी काहीच देण घेण नाहीये !!3)विठू माऊली ..पंढरीच्या पांडुरंगा तु उभा आहेस कधीतरी त्या नामदेवाने फेकलेल्या विटेवर फार आधीपासून भक्तांची गाऱ्हाणी ऐकत त्यांच्या “वारीच्या “कचाट्यात सापडलायस तु तुलाच नकळत कधीपासुन ..जवळच आहे रखुमाबाई पण तीला भेटायची बंदी ..पाहु शकत नाहीस बाहेर पडुन झुळझुळ वाहणारी चंद्रभागा नदी ..काकडा ,पुजा ,अर्चा ,धुप ,नैवेद्य ,आरती दिवसभर या भक्तांची “मांदियाळी “वावरत असते तुझ्या अवतीभवती ..कीती “डोळे “वटारलेस् तरी बडव्यांची “दादागिरी “संपत नाहीये दर्शना साठी रांग लागलीय भक्तांची .पण विआयपी ना कुठेच “आडकाठी “नाहीय जगातली वाढती गरिबी .........धाव रे पांडुरंगा !!दुनियेचे तंटे बखेडे ............... धाव रे पांडुरंगा !!अन्याय झाला कुणावर ......... धाव रे पांडुरंगा !!प्रत्येक गोष्टीवर अक्सीर इलाज .... धाव रे पांडुरंगा !!भक्तांचा “धावा” ऐकत कीती धावशील आणी कुठपर्यंत ?माहीत आहे तुला असेच राहणार आहे सारे जगाच्या अंतापर्यंत ..जो येतोय तो गार्हाणे गातोय स्वताच्या सुखासाठी “पाप “लपवतोय आपले पोटात आणी पाढा वाचतोय कर्माचा दुसऱ्याच्या ..तुझ्या मनात काय आहे .तुला काय हवे आहे ..याचे काहीच “देणे घेणे “नाही तुझ्या भक्ताला जर कधी झाली “घुसमट “तुझी तर “दाद “मागशील बरे तु कोणाला ???जगरहाटी ...जगात राहायचे तर जगरहाटी प्रमाणे वागायचे लहानपणापासून हेच आपण ऐकत असायचे पण काय आहे ही जगरहाटी....कळणार कसे ?कळलेच नाही तर आपण वागणार तरी कसे ?कधी उपयोगी पडावे दुसऱ्याला काम होताच मात्र तो ढकलून देतो आपल्याला कधी आपल्या संकट काळी मदती साठी पहावे दुसऱ्याकडे तो निर्विकार राहून बोट मात्र दाखवतो तिसऱ्याकडेपरोपकार आपुलकी निर्व्याज प्रेम ..यांनी जागा सोडलीय आपली ..स्वार्थ कृतघ्न पणा दुष्प्रवृत्ती यांनी त्यांची जागा पकडली अनुभव आपला दुसऱ्याला “कवडीमोल “भासतो काही सांगु गेले प्रेमाने तर फुकटचा सल्ला वाटतो आपल्याच माणसासाठी आपले मन कायम तुटत असते त्यांना मात्र आपल्या भावनाचे काहीच सोयर सुतक नसते तरीही रहाट गाडग्या प्रमाणे अशीच जगरहाटी चालत असते माणसाला चालायला जमले नाही तर त्याला आपल्या बरोबर ओढत असते ...!!------------------------------------------------------------------------..एक प्रश्न ..?ऐकते आहेस ना ग सखे ?शंभर वर्षामागे तू होतीस एक “अबला “.डोक्यावर पदर ..नजर जमिनीवर .“अनोळखी “होते तुला सारे काही ..जे चालले होते तुझ्या घराच्या उंबरठ्या बाहेर ..तुझे “अस्तित्व “होते फक्त “चूल आणी मूल”..यातच बांधलेले “कोणताही” निर्णय “घेणे या प्रकारापासून तू अनेक कोस ...दूर होतीस त्यावेळी तू “सुखी “होतीस का नाही .हे तर तुला माहीतच नव्हते ..!!पन्नास वर्षामागे मात्र तू झालीस खरोखरच “सबला “.डोक्यावर असलेला तुझा पदर..सहजच खांद्यावर आला ..“पदर “बांधूनच तू उतरलीस आयुष्याच्या “धावपळीत ..जोडीदाराच्या खांद्याला खांदा लावून ..“लीलया “..उचल्ल्लीस जबाबदारी तू “अर्थार्जनाची ..तुझ्या संसाराची ...!“निर्णयाचे “हक्क मात्र अजून आले नव्हते तुझ्याकडे ..“चूल .आणी मुल”..हे सुध्धा सुटले नव्हते .!!त्या वेळी तू ‘सुखी “होतीस का नाही हा विचार करायला वेळच नव्हता तुला ...........आणी आता या “शतकात ‘..तुझ्यातल्या सुधारणेने “उच्चांक “गाठलाय !!!आता तर तू झालीयेस “सुपर वूमन “!!पदर घेणे ..पदर बांधणे....हे तर तू केव्हाच झुगारून दिलेयस् ..तुझे शिक्षण ..तुझी नोकरी तुझे कपडे तुझे वागणे सारे सारे काही तूच स्वत: ठरवतेस ..तुझ्या स्वातंत्र्याला आता काही “मर्यादाच नाहीत ग ..चुल आणी मुल हे निर्णय तर आता फक्त..तुझ्याच अखत्यारीत राहिलेत पण तरीही ............मला खरे सांग ..आता तरी तू “सुखी “आहेस का ग ??..................................****वृषाली गोटखिंडीकर------------------------------------------------------------------------------------------अस्तित्व !!!..तसे फार नाही जुने नाते तुझे माझे गुंतले होते जेव्हापासूनच श्वास तुझे माझे ..तुला माहीत नव्हते तेव्हा ..आहे मी कोण फक्त लागली होती मी येणार याची कुणकुण !मग आग्रह झाला तुला तपासणीचा ..आणी लागला पत्ता तुला मी मुलगी असल्याचा !!जणू पायाखालची जमीन सरकली वाटले तुझ्या मनात काय होईल .तेव्हा जेव्हा कळेल हे सारे जनात !!मग घ्यावा लागला निर्णय मला संपवून टाकण्याचा विचार सुध्दा केला नाहीस तेव्हा माझ्या मनाचा ..अजून आले नाही जगात ..पण आहे ग मी सजीव माझ्या पण इवल्याशा शरीरात आहे ग धगधगता जीव ..आई आई ग ..मी तुझी लाडकी कळीनको ना करू मला तुझ्या पासून वेगळी ...!!!------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------पिंजरा ..तुला सांगू का बये ..या पिंजर्यात आपली समदी दुनिया हाये ..या पिंजऱ्याला सोडून जाण.कुणाच्याच हातात न्हाय ..ह्यो पिंजरा सोडून भायेर जाशील .तर लयी पस्तावशील .भायेरचे “डोमकावळे”..तुला टोचून टोचून मारतील ..कवा इच्यार करशील ना ह्यो पिंजरा सोडण्याचा तवा इच्यार कर बये आपल्या “मरणाचा !!------------------------------------------------------------------------तिच्या घरातली तिची लाडकी “लेक आहे घरात “एकुलती एक ..माहेरात होती तशीच राहावी सुखात नांदावी “आनंदात म्हणून “घर “दिले पाहून ..“धान्य धुन्य भरलेले “कपड्या लत्त्यानी “भरलेले ..“पैश्या अडकयानी “भरलेले ..पण कुठे काय बिनसले कोण जाणे .तिच्या लेकीचे डोळेच असतात सदा “भरलेले ..!!!-------------------------------------------------------------------------------खोटे आणी खोटे ...का बोलतात लोक” खोटे” हे कधीच उमगत नसते कदाचित खोटे बोलू नये हे त्यांना कळत असते पण” वळत “नसते .छोट्या छोट्या गोष्टीत गोष्टीत पण माणसे खोटे बोलत असतात “सफाईदार पणे खऱ्या गोष्टीला “खोटे च ठरवत असतात !खऱ्या खोट्याची “सरमिसळ बेमालूम करत असतात असे लोक पावलो पावली आपल्याला भेटत असतात !!खरे कोणते “खोटे कोणते हेच कधी कधी उमगत नसते “गांधारी “सारखे डोळ्यावर पट्टी बांधून इथेच आपल्याला वावरायचे असते !“खोट्याच्या कपाळी गोटा असतो असे उगाचच म्हणत असतात वास्तवात मात्र “खऱ्या “लाच सारे टाळत असतात ..“खर्याची काय दुनिया नाही “.असे खोटे लोक पण बिनदिक्कत म्हणतात काय माहीत त्यांच्या मनात तेव्हा काय “विचार ‘असतात या खोट्या “दुनियेत राहून ही काही लोकांनी स्वताला खरे ठेवलेले असते मनाची “खोटी “समजूत काढून स्वताचे “स्वत्व जपलेले असते अशा या “खोट्या “दुनियेत मात्र खरा माणूस रहात असतो .“खोटे बोलायसाठी पण खऱ्या माणसात राहण्या व्यतिरिक्त त्याच्या कडे” पर्याय” नसतो !!----------------------------------------------------------------------------------------------------------------------------“क्षुल्लक ..ठेच लागता लागता .तो दाखवून देतो तुझ्या झालेल्या चुका आणी त्या चुकातून च तो शिकवत असतो अमुल्य धडे..आयुष्यातले म्हणुन काय झाले तो तर आहे एक “क्षुल्लक “दगड !कीती तरी मैल प्रवास चालु असतो तुझा आता कीती राहिला पल्ला आणी कीती राहिले अंतर हे तोच तर सांगत असतो उभा राहून मैला मैला च्या अंतरावर म्हणुन काय झाले तो तर आहे एक “क्षुल्लक “दगड !घर उभे राहते तुझे सुंदर अगदी तुझ्या मना सारखे बळकट भिंती आकर्षक दरवाजे खिडक्या माहीत आहे ना तुला याच्या पाया वरच आहे उभा तुझा “डोलारा “ म्हणुन काय झाले तो तर आहे एक “क्षुल्लक “दगड !प्रत्येक गोष्टीला असे क्षुल्लक मानणाऱ्या माणसा तसे पाहायला गेले तर तुही आहेस् एक क्षुल्लक जीव जंतू ..या विश्वाच्या पसार्यात आणी शेवटी तुझी पण होणार आहे “क्षुल्लक “चीमुटभर माती मातीतच मिसळून जाणारी !!!!--------------------------------------------------------------------------------ती ..तुम्ही जन्माला येता तेव्हा तुमच्या बरोबर च येते ती तुमच्या भाळावर स्वताला “वागवते “ती तिची तुमची गाठ मग पक्की असते आयुष्य भर तुमच्या कोणत्याही चुकीचे तिच्याच माथ्यावर फुटत असते खापर !साध्या साध्या गोष्टीत पण तुम्ही तिलाच बोल लावत असता गाठी भेटी झाल्या नाहीत एकमेकांच्या तरी तिलाच दोष देत असता तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक वाईटाची धनी तीच असते चांगले काही घडले तर मात्र कुणाच्याच मुखी तीचे नाव नसते अशी असते कायमच तुमच्या सोबती कोणी काही म्हणोत ती तर असते तुमची “नियती”!!--------- नियती ..तसे आकाश साऱ्यांचे सारखेच असते पण काही काहींच्या च डोळ्यात मावतो “ताटलीभर चंद्र ..आणी आभाळभर चांदण्या प्रत्येकालाच हवा असतो एक जमिनीचा लहानसा तुकडा पण काहींच्याच नशिबात असते आकाशाला गवसणी घालणारी धरती रोंरावत असतो समुद्र दिवसभर सर्वांच्याच कानात ..पण काहीना च ऐकु येत असते त्याच्या हृदयीची “गाज . प्रत्येक जण शोधत असतो “काहीतरी “...आयुष्यभर कुणाला ते मिळणार आणी कोण “वंचित “राहणार .. हे तर अवलंबुन त्या “नियती “वर !!!दगड ..त्या उजाड माळराना वर तु होतास कित्येक वर्षे खितपत पडलेला आजुबाजुला वाळू मातीचे डोंगर आणी त्यात च तु “लपलेला “उन पाऊस धूळ मातीची पुटे तुझ्यावर चढत होती ..धुतली जात होती तुझ्या आजूबाजूच्या परिसरात तुझी कुणाला “दखल “..च नव्हती नंतर मात्र सारा बदल अचानक घडला बांधकामासाठी साफसफाई करताना सर्वाना तुझा पत्ता लागला सर्वांनाच आवडले तुझे सुंदर “घडीवपण “मग तुला मिळाले तुझे स्वतंत्र ठिकाण .तु पण आनंदुन गेलास स्वतच्या झळाळी ला पाहुन दिवस पालटले आपले म्हणुन मनोमन गेलास हरखून नंतर अनेक दिवस सरले पण काहीच नाही घडले बांधकामाची योजना ..सारे सारे काही बारगळले तुझ्या आनंदाला जणू गालबोट लागले दारूच्या बाटल्या आणी कुत्र्या मांजरांची विष्ठा पार धुळीला मिळवली त्यांनी तुझी प्रतिष्ठा नशिबा वर हळहळून पण फार काही उपयोग नव्हता तुझा शांतपणा ..हाच त्यावर उपाय होता काही दिवस असेच गेले ..आणी परत तुझे दिवस बदलले कुणा भक्ताला तुझ्यात देवाचे रूप दिसले शेंदूर फासला त्याने तुला आणी रुपडेच बदलले तुझे येणार्या जाणाऱ्या प्रत्येकाला “देवत्व “जाणवले तुझे हळदी कुंकू आणी फुलांनी पुजन केले तुझे नशीब पालटले तुझे आणी दुखः ही आता संपलेय तुझ्या भोवताली आता म्हणे “देऊळ बांधायला काढलेय ..----------------------------------------------------------------------------------------- रंकाळारंकाळा.. कधी होता कोल्हापूरच्या गळ्यातील “ताईत “सुंदर स्वच्छः “निळे “ पाणी खळाळणारा आवाज जणु गातोय “गाणी “नजरेच्या पलीकडे पोचणारी “व्याप्ती “ पाण्याची पाहून त्याचे “रुपडे “ आठवण येत असे समुद्राची कोल्हापूरचा “मान “ कोल्हापूरची “शान “सारेच होते रंकाळा पोरा पासून थोरा पर्यंत सर्वानाच वाटत असे “जिव्हाळा “हळूहळू काय झाले कोण जाणे पण “वैभव “त्याचे ओसरू लागले “जलपर्णी च्या विळख्याने त्याला वेढून टाकले रोगावर इलाज म्हणून ..किडे सोडले पाण्यात कीती पैसे खर्च झाले कीती गेले “खाण्यात “..रंकाळा तडफडत राहिला” योग्य “उपचारा वीना आता आजार गेलाय थोडासा पण मागे राहिल्यात “खुणा “रंकाळ्याच सार “तेज “च ओसरलेय ..पाण्याने त्याच्या आता “हिरवे “..रूप धारण केलेय आजुबाजुला वावरत असतात “सुगंधी “कपड्यातील माणसे स्वताच्या “दुर्गंधी “ने रंकाळ्याला मात्र होत असते कसेनुसे “गणपती “चा सण आला की धडकी भरते रंकाळ्याला निर्माल्य ,..फुले , ..प्रसाद इतकेच नव्हे तर दाबून बुडवतात गणपतीला देवाचे इतके “हाल “करतात मग आपली काय कथा असा विचार करून बिचारा मनात च ठेवतो आपली “व्यथा “गाई म्हशी धुतायत रंकाळ्यात ..सांडपाणी पण सोडलेय ड्रेनेज चे लोकांचे धुणपाणी तिथेच चालु आहे हाल ..हाल चाललेत रंकाळ्याच्या जीवाचे कीती उपचार केले रंकाळ्याचा तब्येतीत सुधारणा नाहीये पावसाळ्या पुरते बरे वाटते त्याला नंतर मात्र आजार बळावत आहे रंकाळ्याला आता आपले भविष्य “ समजलेय त्याचा प्राण गुदमरतोय ..इथे आपल्या स्वार्था पुरते जो तो पहातोय ..रंकाळ्याच्या व्यथेचा कोण कशाला विचार करतोय ?रंकाळ्याला कळून चुकलेय सारे काही त्याचा जीव जीवात नाहीये स्वताच्या स्वताच बरे व्हायला हवे त्याला त्याशिवाय दुसरा उपाय नाहीये ...................................................................................वेडी ..!झाडांना पाणी घालताना त्याच्या अवती भवती साठलेला कचरा काढताना मी हळूच त्यांच्या अंगावरून हात फिरवते माझ्या स्पर्शाने आनंदाने शहारतात ती मग मीही त्यांची विचारपुस करते ..जोन्जारते प्रेमाने बाहेरून पाहणारे मात्र “वेडी “म्हणतात मलाभाजीची डेखे कधी उरली सुरली पोळी भाकरी घेऊन जाते गायी म्हशीना प्रेमाने चारायला कधी कधी पण नियमाने भेटणाऱ्या मला पाहून हंबरू लागतात सारी .बहुधा कारण विचारतात मला का आली नाहीस इतके दिवस भेटायला मग मी ही सांगते नाही रें राजा आले खुप दिवस रागावु नका माझ्यावर .. बाहेरून पाहणारे मात्र “वेडी “म्हणतात मलाबागेत येतात पक्षी खुप सकाळ पासुन त्यांना खायला ठेवते तांदूळ गहू पाणी पण असते जवळच प्यायला येतात आनंदाने चिवचिवत आणी किलबिल करतात मला सांगत असतात बहुधा इकडच्या तिकडच्या गोष्टी मग मी पण रमुन जाते त्यांच्यात आणी करते कुजबुज त्यांच्या बरोबर माझ्या भाषेत बाहेरून पाहणारे मात्र “वेडी “म्हणतात मलाकाम करता करता घरात तुझी आठवण असते मनात तु काहीतरी म्हणलेलं आठवत असते मागच्या भेटीत तुझ्या विचारात इतकी गुंगून जाते ना आणी मनातल्या मनात तुझ्याशीच गप्पा करीत रहाते आणी अकारण हसत आणी लाजत राहते .. बाहेरून पाहणारे मात्र “वेडी “म्हणतात मलापण सांगु का हे असले “वेड “आहे म्हणुन तर हे सारे जग सुंदर वाटत असते ..आणी “वेडी “ माणसेच तर इतिहास घडवत असतात म्हणे ..!!-------------------------------------------------------------------------नदी ग ...युगानुयुगे वाहतेस तु दोन्ही किनार्याना धरून कीती तरी स्थित्यंतरे झाली या जगात त्या साऱ्यांना सोबत घेऊनअनेक ऋतु आले आणी गेले तुझ्या प्रवाहात बदल नाही झालेआयुष्ये बदलत असतात काठावरच्या माणसांची तुला काहीच नसते खबरबात जणु कशाची ..आणी कुणाची तुला पाहतात कुणी देव मूर्तीच्या रूपात आणी पुजतात मंदिराच्या गाभार्यात आला जरी कंटाळा कधी थांबायची मुभा नाही तुला कधी वाटले जर असे तुला तर ते आमंत्रण असेल तुझ्याच मृत्यूला . विचार करते ना जेव्हा मी तुझ्या मनाचा खरेच ठाव च लागत नाही ग तुझ्या प्रवाहाच्या तळाचानवल वाटते पाहुन तुझे अखंड वाहाणेतुझ्या अस्तित्वाने तर सुसह्य होत असते माणसाचे जगणे .!!--------------------------------------------------------------------बाजार ..बाजार फुलांचा भरलेला पाहिला सुंदर सुगंधी लोकांचे मन मोहवणारी फुले काही देवाच्या चरणी ,तर काही प्रेतावर तर काही लोकांच्या पायदळी सुध्धा .. बाजार फळांचा भरलेला पाहिला स्वच्छः ताजी रुचकर फळे काही आवडीने लोकांनी घरी नेलेली तर काही विक्रीअभावी नासुन कुजुन गेलेली बाजार पुर्वी भरायचा गुलामांचा विकणारी माणसे विकत घेणारी पण माणसेच आणी विकली जाणारी पण माणसेच दुर्दैवाने आयुष्यभर “गुलामी “पत्करणारी बाजार शिक्षणाचा भरताना पाहिला भले धनाढ्य लोक सरस्वतीची बोली लावुन तीला विकत होते आणी विकत पण घेत होते आणी सरस्वती पण बिचारी चुपचाप सहन करीत होती मात्र बाजार देहाचा जेव्हा पहाते ना उभ्या देहावर शहारा येतो ज्या कुशीत जन्म घेतला त्या कुशीचा व्यापार करणारा ..माणुस नावाचा पशु ..माते समान असणाऱ्या स्त्रीला भोगदासी करून तीच्या शरीराशी गालीछ् चाळे करून पुन्हा तीलाच रस्त्यावर फेकणारा माणुस स्त्रीला बेइज्जत करून तीलाच इज्जतदार लोकाना विकणारा माणुस ..या माणसाला पशु म्हणावे तर ..पशु पण असले हिडीस काम कधी करीत नाहीत बाजार भरत आलेत अनादी कालापासूनआणी भरत राहतील जगाच्या अंतापर्यंत माणसांनी माणसाला बाजारात आणून उभ्या माणुसकीचा बाजार मांडलाय नंतर कधीतरी ..या बाजाराचा पण एक “बाजार “होईल ..पाऊस..राना वनातुन दर्या खोर्यातून बागडत निघालेला पाउस खेड्या पाड्यात पोचला त्याची चातकासारखी वाट पाहणारा शेतकरी सुखावला इवली रोपे ,मोठी मोठी झाडे ,प्राणी पशु पक्षी सार्याना प्रफुल्लीत करीत पाउस पुढे निघाला सर्व प्राणीमात्रांचा आनंद पाहून पाउस खूष होऊन गेला !!मग शिळ घालीत जोमात तो शहराच्या दिशेने निघाला पाउस शहरात पोचला तेव्हा शहरात एकच “दंगल “उसळली होती घरे ,दुकाने बंद करून भयभीत लोक घरात बसले होते ..रस्त्यारस्त्यावर काचा .दगड यांचा “सडा “पडला होता संतप्त जमाव झुंडी झुंडी ने वाहने ,दुकाने याची फोडाफोड करीत होता पाउस एकदम” बावचळून” गेला !!इकडे तिकडे थोडा कानोसा घेतला तेव्हा समजले त्याला दंगली चे कारण काहीही असले ..तरी ती आता “जातीय दंगल “बनली होती !अचानक भगवे झेंडे घेतलेला एक हिंदू लोकांचा घोळका पावसाच्या समोर ठाकला ..पावसाला त्यांनी “मुसलमान “समजून चांगले झोडपून काढले जखमां अंगावर वागवत पाउस पुढे निघाला आणि मुसलमान लोकांच्या “तावडीत “सापडला पावसाला वाटले आता आपल्याला “नागवा “करतात की कांय त्यांची नजर चुकवून पाउस तेथून सटकला कसाबसा पाउस शहरातून बाहेर पडला पाउस कधीच नव्हता “हिंदू “किंवा “मुस्लीम “!!तो तर फक्त ..प्रेमी जणांच्या प्रणयात डोकावणार होता त्यांच्या भावनांना “उधाण “देणार होता ..त्यांच्या “रोमांटिक”आठवणी जागवणार होता अनुभवायचा होता त्याला प्रीतीचा “थरार “!पहायची होती त्याला प्रियकराच्या डोळ्यातील “ओढ “आणि प्रियतमेच्या गालावरली लज्जेची “लाली “! खूप नाराज होवून पाउस स्वताशीच म्हणाला आता पुढील वर्षी येताना “विचार “करायला हवा !!!!वृषाली गोटखिंडीकर राष्ट्रीय सेवा योजना ..(N S S )काळ बदलतो आहे आपणही बदलायला हवे “समाज सुधारणेचा “वसा घेऊन पुढे पुढे चालायला हवे स्वच्छता तर आहे “गुरुकिल्ली “सर्व सुखाची आपला परिसर स्वच्छ ठेऊन इतरांना “जागृत “करण्याची असतील कही वाईट सवयी आपल्याला जडलेल्या पुर्वीपासुन प्रयत्नांती त्याचे “उच्चाटन” करूया आत्तापासूनबालकांचे “लसीकरण “”डोस “वेळच्या वेळी पुर्ण करूया नव्या पिढीच्या निरोगी आयुष्यासाठी आपण सारेच प्रथमपासून झटूया “विधवा विवाह “,”दत्तकविधान “ या प्रथांना आपलेसे करूया जगण्याचा “समान “हक्क सर्वाना याचे कायम स्मरण ठेवूया अंधश्रद्धा तर शब्दातच “अंध “आहे “डोळस “पणे तिला दूर करूया भूत बाधा लागीर या सर्वाना फाटा देऊया “जुनाट “चालीरीती रूढी ,परंपरा यांना नव्याने छेद देऊया अकारण होणारे आर्थिक नुकसान आपण सर्वच टाळू या रस्ते बांधणी ,परिसराचे आरोग्य “श्रमदान “करून जपूया भागाचा आणि शहराचा विकास सगळे एकत्रितपणे करूया मैत्रीतले “सहजीवन “जगताना एकमेकांचे मान राखूया मने जुळता जुळता मैत्रीबंध हि घट्ट करूया आपत्काल व्यवस्थापन, रक्तदान शिबीर ,उच्चशिक्षण वर्ग अशा अनेक गोष्टींची “सांगड “घालूया फक्त मीच नाही मिळून आपण सारे ब्रीदवाक्य घेऊन जबाबदार नागरिक बनूयासरकारी सहकार्याने आणि युवा पिढीच्या एकत्रीकरणाने “राष्ट्रीय सेवा योजनेचे “हे कार्य पार पाडूया आपण घेतलेला हा “वसा” असाच पुढे चालवत राहूया वृषाली गोटखिंडीकर