ऑनलाईन मतदान
"सुभाष! ए सुभाष उठ लवकर! सुधाला लेबर पेन सुरु झाले आहेत.", सुभाष ची आई, सुलेखा बाई रात्री एक वाजता सुभाष ला उठवत म्हणाल्या.
सुधा, सुभाष ची लहान बहीण. ती माहेरी बाळंतपणा साठी आली होती. तिला रात्री कळा येणं सुरु झालं असल्याने तिच्या आईने तिच्या भावाला उठवलं होतं. सुभाष ने लगेच कार काढली आणि जवळच्या हॉस्पिटल मध्ये सुधा ला ऍडमिट केलं. बरोब्बर सकाळी तीन वाजता एका गोड मुलीला सुधाने जन्म दिला आणि सगळीकडे आनंदी आनंद झाला.
नेमकं दोन दिवसांनी इलेक्शन होतं. त्यामुळे सुभाष, सुलेखा बाईंनी सुधाचा दवाखाना सांभाळून मतदान उरकून घेतलं. पण सुभाष ची बायको सुनंदा तिचे नाव तिच्या माहेरच्या गावी नोंदलेले असल्याने व बाळंतपणासाठी सुलेखा बाईंनी तिला मदतीसाठी थांबवलं असल्याने तिला काही मतदान करता आलं नाही.
सुधाचा नवरा बाळ बघायला सुधाच्या माहेरच्या गावी आला होता पण त्याला उन्हाचा फटका बसल्याने तो आजारी पडला त्यामुळे त्याला बायकोच्या माहेरी काही दिवस आराम करावा लागला. त्यात इलेक्शनची डेट निघून गेली त्यामुळे त्याला सुद्धा मतदान करता आलं नाही. आणि सुधाचं नाव तिच्या सासरच्या गावी ट्रान्सफर केलं होतं आणि बाळंतपणासाठी ती माहेरच्या गावी आली होती त्यामुळे ती सुद्धा मतदान करू शकली नाही.
इकडे सुधाचा लहान दीर कंपनीच्या कामासाठी लंडन ला गेला होता व तीन महिन्यांनी भारतात वापस येणार होता त्यात इलेक्शन ची डेट निघून गेली म्हणून तो ही मतदान करू शकला नाही.
सुनंदा चा मोठा भाऊ डॉक्टर असून एका खेडेगावी त्याचे शिबीर सुरु होते त्यात काही इमरजन्सी आली व डॉक्टरांची संख्या कमी असल्याने त्याला शिबिराच्या गावाहून हलता आलं नाही आणि त्यामुळे त्याला सुद्धा मतदान करता आलं नाही.
जनाबाई, ताराबाई,शिला बाई एकाच गावाच्या. कामासाठी शहरात आल्या पण मतदानाचे नाव मात्र गावीच होते. त्यांची मतदानाला जायची खूप इच्छा होती पण गावी जायला त्यांच्याजवळ पैसाच नव्हता. जे काही पैसे त्यांच्याजवळ होते ते खोलीचं थकलेलं भाडं भरण्यात निघून गेलं त्यामुळे त्या सुद्धा मतदान करू शकल्या नाही.
राकेश फार आनंदात होता कारण आज त्याचं लग्न होतं. राकेश रिया फार सुंदर दिसत होते. महाबळेश्वर ला त्यांचं डेस्टिनेशन वेडींग होतं. लग्न तर दणक्यात पार पडलं पण झालं काय ह्यात इलेक्शन ची डेट निघून गेली आणि दोघांचं ही मतदान राहून गेलं.
वरील सगळे उदाहरणं बघितले की राहून राहून वाटते की ह्या ऑनलाईन च्या जमान्यात जिथे सारं काही ऑनलाईन आहे तिथे मतदान ऑनलाईन का असू नये?
जर ऑनलाईन मतदानाचा पर्याय उपलब्ध असता तर सगळे जण घर बसल्या मतदान करू शकले असते.
का बनवल्या जात नाही एखादं सॉफ्टवेअर जे इन्स्टॉल केल्यावर ज्यांना जाता येत नसेल बूथवर ते आपल्या मोबाईल वरच आधार नंबर, epic नंबर टाकून, फिंगर प्रिंट स्कॅन करून, फोटो अपलोड करून मतदान करतील.
वाटल्यास त्यात ऑनलाईन मिटिंग करून ती व्यक्ती खरी असून जिवंत आहे ह्याचा पुरावा सुद्धा मिळेल आणि अश्या पर्यायामुळे अनेक जण जे हकनाक मतदानासाठी मुकतात ते होणार नाही.
ह्या पर्यायाने जास्तीत जास्त मतदान व्हायला मदतच होईल. निपक्षपाती मतदान होईल. एकच व्यक्ती पुन्हा पुन्हा मतदान करण्याचा प्रश्न पण निर्माण होणार नाही. उपलब्ध असलेल्या उमेदवारांच्या लिस्ट मधून जे ऑपशन निवडायचं ते ती व्यक्ती निवडू शकेल. मतदानाबद्दल गुप्तताही राखल्या जाईल. अश्या सगळ्याच विधायक बाबी ह्या पर्यायाने साध्य होतील असं मला वाटते.
सरकार नी ह्या पर्यायाचा गांभीर्याने विचार केला तर सगळ्यांच्याच पथ्यावर हे पडेल. मग सुनंदा, सुनंदाचा भाऊ, सुधा, सुधाचा नवरा,सुधाचा दीर,जनाबाई, ताराबाई, शिलाबाई, राकेश, रिया ह्यांसारखे सगळेजण विनासायास मतदान करू शकतील.
आधुनिक काळानुसार आता मतदानाचा पर्याय सुद्धा आधुनिक आणि सर्वांच्या सोईचा नको का व्हायला?
तुम्हीच विचार करा.
🙏🏻🙏🏻🙏🏻