Kitchen fun galore in Marathi Cooking Recipe by Vrishali Gotkhindikar books and stories PDF | स्वयंपाकघरातील गमती जमती

Featured Books
  • इश्क दा मारा - 79

    यश यूवी को सब कुछ बता देता है और सब कुछ सुन कर यूवी को बहुत...

  • HOW TO DEAL WITH PEOPLE

                 WRITERS=SAIF ANSARI किसी से डील करने का मतल...

  • Kurbaan Hua - Chapter 13

    रहस्यमयी गुमशुदगीरात का समय था। चारों ओर चमकती रंगीन रोशनी औ...

  • AI का खेल... - 2

    लैब के अंदर हल्की-हल्की रोशनी झपक रही थी। कंप्यूटर स्क्रीन प...

  • यह मैं कर लूँगी - (अंतिम भाग)

    (भाग-15) लगभग एक हफ्ते में अपना काम निपटाकर मैं चला आया। हाल...

Categories
Share

स्वयंपाकघरातील गमती जमती

खाद्य भ्रमंती😋 तशी मला शाळेत असल्या पासून  स्वयंपाकाची आवड होती लहान भावाला नवे नवे पदार्थ ..टेस्ट “करायला देणे .माझा आवडीचा उद्योग !!नंतर लग्न होईपर्यंत मी चांगलीच पारंगत झाले होते ..!!आजूबाजूचे लोक माझी आजी आई व सासुबाई यांच्या सारखी मी “सुगरण आहे असे म्हणू लागले ..(!)😀भावाच्या मित्राच्या सगळ्या पार्टी माझ्या घरीच होत असत ..आठ दहा वर्षापूर्वी ..एकदा आम्ही घरातले सारे सात आठ दिवस बाहेर गावी गेलो होतो घरी येताना हॉटेलमध्ये जेवूनच परतलो कारण बाहेरगावी जाण्यापूर्वी फ्रीज रिकामा केलेला होता ..दुपारी भावाचा फोन ..ताई मित्र आलेत चारपाच ..तुझ्याकडे जेवायला घेवून येतो काहीतरी वेगळे कर ..(तु गावाहून आलीस का....?तुझ्या कडे काय आहे ?..काही आणू का .?.अशी फालतू चौकशी नाही ..डायरेक्ट ऑर्डर😀😀 )..आता काय करावे ..भाजी आणायला पण सवड नव्हती .घर गावाबाहेर असल्याने भाजी आणायला जमणार पण नव्हते ..!आमचे डॉक्टर अहो पण त्या दिवशी तातडीने दवाखान्यात गेले होतेत्यामुळे त्यांनाही भाजीचे सांगता येत नव्हते थोडा विचार केला आणी बेत पक्का केला ..घरी तुरीची डाळ होतीच ती लावली कुकरला ..आणी मस्त आले लसूण पेस्ट लावून त्याची सुंदर दाल फ्राय बनवली ..सोबत टेस्टी जीरा राईस ..होताच नंतर परोठे करायचा बेत होता ..पण पाहिले तर काय कणिक डब्याच्या तळाशी जाऊन बसली .होती !..भावाचे दोन चार मित्र..(दोन का दोन अधिक चार हे माहीत नाही )..शिवाय सगळे तरुण आणी तगडे ..काय होणार परोठे ..??मग ..आयडिया केली ..घरातली सगळी पीठे एकत्र केली ..तांदळाचे ..डाळीचे ..भाकरीचे ..नाचणीचे ..थोडा रवा .शिवाय थोडी भाजणी सुध्धा होती दिवाळीतील उरलेली..सगळे एकत्र केलेतिखट मीठ बारीक कांदा ..मिरची वगैरे घालून त्याचे परोठे केले ..(मिस्सी रोटी म्हणले जाते त्याला😀 )..आता प्रश्न आला गोड काहीतरी करण्याचा .भावाचे सारे मित्र गोड खाण्यात पटाईत 😀..त्यात काहीतरी वेगळे करावे “ताईने ..अशी महाशयांची ..फर्माईश ..!!!!सुदैवाने जवळ एका दुकानात दुध मात्र मिळाले ..घरात शेवया होत्याच .पण नुसती शेवयाची खीर ..(लगेच भावाने तोंड वाकडे केले असते .😀.)मग काय केल ......घरात मिल्क पावडर होती त्यात थोडा रवा घालून ..त्याच्या छोट्या गोळ्या करून ..मस्त तुपात तळून घेतल्या ..आणी मग खीर झाल्यावर त्यात त्या गोळ्या.सोडून एक उकळी आणली ..सोबत वेलची ..ड्रायफ्रूट वगैरेची ..पखरण .(काय बिशाद आहे ..खीर वाईट होईल!!! ).....😀असा सगळा बेत ..दोन तासात पार पडला ..मग आले सारे ..(नेहेमीप्रमाणे भुकेले होतेच )...बस !..”ताव “.मारला सर्वानी ..इतके आवडले ..इतके आवडले ..की खाताना .मस्त झालेय असे सांगायला वेळ च नाही मिळाला ..सर्वाना (?)..नंतर जेव्हा सर्व भांड्यांचे तळ दिसू लागले ..तेव्हा एक एक कमेंट येवू लागल्या “ताई ..काय छान केलयस ..!!ताई तुझ्या हाताला ..चव आहे बुवा ..!“ताई दाल फ्राय ..एकदम सही झाली बर का !!“ताई ..बेत एकदम “फंडू “(इति ..आमचे बंधुराज ...)!!..आणी मग नंतर ...भावाने विचारले ..ताई खीर खूप मस्त झालीय काय घातले होतेस ग ?..(काय सांगणार त्याला ..आणी कळणार तरी काय त्यातले त्याला ??)..होते ते आपले माझे “सिक्रेट ‘..मी म्हणले ..अशी ..ही गम्मत ..!  खाद्यभ्रमंती ..२ त्या वर्षी अधिक महिना होता माझी काकू आमचे कडे “अधिक वाण”देण्यासाठी येणार होती .आमच्या अहोना सुटी ..रविवारी ..म्हणून शनिवारीच ..काकू आणी माझी तीन चार भावंडे दाखल झाली ..रात्री साधेच जेवण झाले खरा कार्यक्रम रविवारी होता ..सकाळी सर्वांचे चहा नाश्ता पार पडला ..आणी सारे जण खरेदी ..देव दर्शन यासाठी बाहेर पडले ..आता मला स्वयंपाक करायला तीन चार तास तरी मिळणार.होते घरात इतकी गडबड चालू होती .सारे बाहेर निघून गेल्यावर शांत झाले !!मग म्हणले चहा करून घ्यावा ..पाहते तर काय ...सिलेंडर .संपलेला ..बाप रे .!!.तेव्हा माझ्या कडे दोन सिलिंडर पण नव्हते ..शिवाय रविवार ..गॅस च्या दुकानाला सुटी घरात फक्त एक जुना वातीचा स्टोव्ह होता ..कधीतरी मी तो मी वापरत असे ..जेवणाचा बेत खरे तर मी खूप “हटके “..ठरवला होता ..पण ...आता तर काय गॅस नसल्याने. स्वयंपाकाचा सारा मेनूच बदलायला हवा होता ..जरा विचार केला ...मग आली आयडिया डोक्यात !!आधी वरचा स्टोव्ह काढून साफ केला आणी दुध तापत ठेवले .माझ्या कडे एक चांगला राईस कुकर होता जो फक्त विजेवर चालतो आधी बेत ठरवला .श्रीखंड, पोळी कढी, मसाले भात, काकडीकोशिंबीर भरला दोडका भाजी ढोकळा..पापड श्रीखंड तर बाहेरून मागवले ..मग आधी कणिक भिजवून पोळ्या करून घेतल्या कारण आता स्टो मस्त तापला होता ..पापड भाजून पण घेतले ..एका भांड्यात फोडणी करून घेतली .निम्मा तर स्वयपाक झालाच म्हणायचा ..मग लावला राईस् कुकर .आधी ढोकळा करून घेतला .आणी तुपाची फोडणी करून कढी केली .कढी काढून ठेवली मग त्यातच ..भरल्या दोडक्याची भाजी टाकली भाजी झाल्यावर काढून ..मग त्यात मस्त मसालेभात टाकला ..आणी कुकर वार्मेर वर ठेवून दिला ..फोडणी तयार होतीच ती थोडी भाजीत मिसळली आणी उरलेली ढोकळ्या वर घातली ..काकडीची कोशिंबीर मात्र बिन फोडणीची केली फक्त त्यात जिरे आणी हिंग वरून घातला झाला स्वयपाक तयार ..!!दोन तीन तासानी मंडळी बाहेरून आली ..जेवायला बसली मस्त जेवण झाल्यावर त्यांना समजले की .सिलेंडर संपला होता ..सर्वाना नवल वाटले ..काकूने पण खूप कौतुक केले ..अहो मिस्कील हसले .!!अशी टाळली..मी होणारी “फजिती “..!!!तरी मी हा सारा स्वयपाक केला ..खाद्यभ्रमंती ..३चित्रा स्वराजशी लग्न करून शेजारी राहायला आली आणी लगेच आमची पक्की मैत्री पण झाली ..तशी काही ओळख आधी नव्हती पण काय कोण जाणे..कायम ताई ताई करून माझ्या मागे मागे असायची वेळ मिळाला की गप्पा मारायला पण यायची तशी ती एका कॉलेजमध्ये .होती प्रोफेसर म्हणून ..माहेरची लहान कुटुंबातली.. त्यात लाडकी ..मग स्वयपाक शिकायची कधी वेळ नाही आली इथे मात्र सासुबाई सुगरण त्यामुळे स्वयंपाक शिकत..चुकत चुकत करून पण पाहू लागली मला छान येत होते सगळे पदार्थ पण मला तसे काही ती स्वयंपाकातले विचारत नसे एकदा मात्र गंमत झाली तिच्या सासुबाई दोन दिवस बाहेरगावी गेल्या होत्या आणी अचानक तिच्याकडे सासरच्या नात्यातले चार पाहुणे येणार असे समजले सासुबाई घरी नव्हत्या पण आत्तापर्यंत आलेला स्वयंपाकाचा थोडा अनुभव होता !!.त्यावर तिने ठरवले होते बटाटा परोठे आणी गोड शिरा करायचा अचानक ती सकाळी माझ्याकडे आली ..डोळ्यात पाणी ..ताई खूप मोठा प्रॉब्लेम झालाय हो ..अग काय झाले सांग बर ..अहो मी परोठे करायला बटाटे उकडले तर चुकून जास्त शिट्या झाल्या आणी कुकर मधले पाणी पण त्यात मिसळले ..शिरा करायला घेतला तर त्यात पण जास्त पाणी झालेय आता काय करायचे ..तासाभरात ते पाहुणे लोक येतील . घरी.अग एवढेच ना .मी म्हणले ..काही काळजी करू नकोस ..मग आम्ही दोघी तिच्या घरी गेलो ..तीला म्हणले आता कणिक भिजवली आहेस ना पोळ्या करून टाक ..मग मी त्या उकडलेल्या बटाट्याचा चांगला बारीक लगदा करून घेतला ..कांदा बारीक चिरून फोडणीत टाकले .चांगला गुलाबी झाला मग बटाटा फ्लॉवरचे  बारीक तुकडे बारीक चिरलेला टोमॅटो.टाकले त्यात  आले लसून पेस्ट आणी गरम मसाला टाकला ..मस्त खमंग वास आला ..वर कोथिंबीर पेरली मस्त कुर्मा तयार झाला आता शिऱ्याकडे बघितले तर खरच शिरा ..म्हणजे खूप पाणीदार झाला होता मग तिच्याकडून दुध घेतले आणी त्या शिऱ्यात घातले छान उकळी आल्यावर खीर तयार झाली त्याची ..मग त्यात बदाम, वेलची पावडर घातली झाला तिचा प्रॉब्लेम सुटला ..वरण भात ,कुर्मा ,खीर ,पोळी ..मस्त मेनू तयार झाला !पाहुणे यायच्या आत जेवणाची जय्यत तयारी झाली चित्रा एकदम खुष ....”ताई मी कधी नाही विसरणार हा प्रसंग खरेच माझी चांगलीच फजिती झाली असती सासरच्या पाहुण्यांसमोर तुम्ही आज  वाचवले मला मी फक्त हसले ..😊😊----------------------------------------