• सखी --------
कदाचित सखी या शब्दात खूप मोठा आर्थ सामावलेला आहे. आयुष्याच्या या रींगणामध्ये खूप लोक आपल्याला प्रिय असतात. मात्र त्या मधला एक व्यक्ती मात्र आगदी प्रिय होऊन जातो. अखाद्य रंगा प्रमाणे, येवढे रंग आहे पण त्याच रागाचे कपडे किंव्हा वस्तू आपल्याला खूप आवडतात. म्हणून तो रंग , ती वस्तू आपल्याला खूप म्हणजे फारच खूप आवडते ती वस्तू किंव्हा तर व्यक्ती भेटली की आपला आनंद आगदी गगनात मावेनासा होतो.
मनी दाटल्या लाख भावना
तू सोबती असताना!!
आंधरल्या स्वप्नांना
तू शितल झळाळी असताना!!
सहस्त्र रगंतूनी तो रंग हा वेगळा
डोळ्याच्या कोपऱ्यातून मज वाटतो आपला!
भेदूनी साऱ्या सृष्टी मनी सांज गुंपला
होणूनी त्या सवे पाखरांचे गीत मनी गुंजला!!
भेटला मज तो आता भाव मनी सजला
घेतला मी तुझ्या सोबती श्वास हा मोकळा!!!
*****. ..,..........
कदाचित ती व्यक्ती भेटली की आपण सगळं ओझ आगदी त्याच्या शिरावर टाकून देतो. श्री कृष्णाच्या कृष्णलीले मध्ये आपण डोकावून पाहिलं की समजेल सखी या शब्दाचं सामर्थ्य. सखी या शब्दा मध्ये मनाचं एक रहस्य आहे.
न बोलता समोरच्याच मन ओळखण्याची क्षमता ही सखी मध्ये असते. '''''आंधरलेल्या रात्रीस, तू साथ चांदण्याची ! """"
अशीच असते , ती सखी !
सखी ..... सोबत एकाट्याची !
सखी...... सोबत भटक्या मनाची!
सखी...... उन्हात नवा गारवा!
सखी...... नवी आशा मनाची!
सखी..... झरा थंड पाण्याचा!
सखी.... म्हणजे कधी न तुटणारी मैत्री!
खूप काही बोलता येत. ज्याला जसा आनुभव आला तसा त्याने त्याचा उल्हेख केव्हा. मन केव्हा कोणाला मोजता आलंय का. मन आगदी अखाद्य फुलपाखरा प्रमाणे आल्हाड तर हिऱ्या पेक्षा ही कठीण आहे.
समोरच्याच्या भावनांचा विचार करणं म्हणजेच समोरच्याला ओळखन म्हणता येईल. आगदी लहान पण पासून मी तिला पाहत आलोय. आगदी निराळी होती . स्वच्छंदी मनाची ! गोड स्वभाव!
खुप दिवसांनी आम्ही भेटलो होतो आगदी योगा योग! बाजारात फिरता फिरता समोर आली. आगदी डोळे ३६० डिग्री विस्पतले. जशी होती तशी होती, मी दिसताच तिचा चेहरा फुलून गेला. तिचा तसा लहान पणा पासून मी तिचा फेवरेट होतो. लहान पणी आम्ही सोबत खूप मस्ती करायची. दिवस भर माझ्या मागेच असायची. थोड कुणी काही बोललं की लगेच माझ्या कडे मला येऊन सांगायची. आज ही ती मी दिसताच क्षणी आगदी धावत माझ्या जवळ आली. तिचा चेहरा आगदी आनंद नाचत होता.
"".
एक प्रकारे ती माझी लहानपणीची मैत्रीण होती. तिच्या लग्न नंतर आम्ही पहिल्यांदा भेटलो होतो. खुप बदलली होती. तिच्या चेहऱ्यावर मला एक न सुटणार कोड दिसत होत.
""भावनांच्या गावा मध्ये शब्द भेटला नाही!
आश्रुंच्या च्या त्या ओढ्या मध्ये बांध जिराला नाही!
पाणी कमी ना कधी समुद्राला
पण तहान मिटण्या काळवा भेटला नाही!""
चेहऱ्यावर विलक्षण आनंद होता. ते स्मित हास्य जणू शुक्राची चांदणी असल्याचं भासत होत. खूप काही मनात दिसत माता चेहऱ्यावर वेगळच होता. चेहऱ्यावरचा आनंद डोळ्यातून अश्रू याच्या मधला बंधन काही समजून येत नव्हतं खरं तर डोळे हा माणसाचा चरित्र असतो आणि या डोळ्यांतून वेगळेपणा दिसून येणं म्हणजेच माणसाच्या मनात काहीतरी वेगळा परिणाम असतो. तोच परिणाम आज तिच्या डोळ्यांत मला दिसत होता.
कवी प्रत्येकाच्या जीवनामध्ये अशी एक व्यक्ती येते की समोर येताना तिच्या किंवा त्याच्या चेहऱ्यावरचे अहवावरून त्याच्या मनामधून चाललेला आहे ते आपल्या लक्षात येतं कधी ते प्रत्येकाला समजत नाही परंतु ज्याला समजतं त्यांनी ते समजून घेणं महत्त्वाचं असतं परिणामी खूप काही गोष्टी आपल्याला टाळता येतात.
" सांग तुझ्या भावनांची सांगड कशी बांधावी
मनामधले शब्द कधीचे ओटी माळ कशी बांधावी "
कधी भावनांच्या विळखा एवढा मजबूत असतो की त्यामध्ये आपण स्वतः खूप अटकत जातो आणि आपण घेतलेला निर्णय कधी घेतला चुकतो असंच झालं होतं कॉलेजला असताना तिचा प्रेम एका मुलावर होता. तिने वडिलांच्या विरोधामध्ये लग्न केलं आणि आपला संसार चालू केला लग्नाला काही दिवसच झाले होते.
' जसं दिसत तस नसतं ' परिस्थितीची जाणीव त्यांना झाली कोणत्या प्रकारचा निर्णय घेणे हे खूप मोठी गोष्ट असते, आणि ही जाणीव जेव्हा झाली ते खूप दिवस निघून गेले होते. कदाचित ती चूक झाली होती असं त्यांचं म्हणणं होतं, तेही असू शकतो. कारण संसार म्हणजे केवळ प्रेमावर आधारित नसतो आणि प्रेम म्हणजेच बंधन असू शकत नाही.
प्रेम म्हणजे जाणीव आपल्या व्यक्तीची,
जळणाऱ्या निखळ विस्तवाची!!
प्रेम म्हणजे विश्वास डोळ्यांतील अश्रुचां
मंद. जळणाऱ्या हृदयाचा