Gulmohor in Marathi Crime Stories by Vrishali Gotkhindikar books and stories PDF | गुलमोहोर

Featured Books
Categories
Share

गुलमोहोर

गुलमोहर ... गुलमोहर गर तुम्हारा नाम होता मौसम ए गुल को हसाना भी हमारा काम होता ...हिंदी सिनेमातले एक लोकप्रिय गाणे ..         चैत्र महिना सुरु झाला की उन्हाचा तडाखा वाढतो माणसे हैराण होतात .पशु पक्षी प्राणी साऱ्यांचे च हाल चालू होतात आणी अचानक रस्त्याने जाताना जाणवते अरे आजूबाजूला लाल भडक पिसारा फुलवुन झाडे उभी आहेत नुसते त्यांच्या कडे पाहिले तरी मनाला समाधान होते .इतका सुंदर रंग डोळ्यांना पण थंडावा देऊन जातो खरे तर ही झाडे वर्ष भर तिथेच उभी असतात पण आपले कधी तिकडे लक्ष गेलेले नसते .आता मात्र फक्त ती आणी तीच झाडे दिसत असतात उन्हाळ्या च्या तडाख्याने माणसे जेव्हा हवालदिल होत असतात तेव्हा त्यांना थोडा तरी आनंद आणी थंडावा मिळावा म्हणुन निसर्गाने च ही योजना केली आहे !!म्हणुन च भडक रंगाची फुले असलेली झाडे उन्हाळ्यात आपले सौंदर्य दाखवत असतात .यात पण अनेक रंगाची फुले असलेली वेगवेगळी झाडे असतात बर का एक एकदम लिंबू रंगाचे फुलांचे घोस असलेले झाड असते त्याला “बहावा “म्हणतात ..सुंदर नाजूक घोस अंगावर बाळगणारा “बहावा “दिसता क्षणी डोळ्यात भरतो. हुबेहूब दागिन्या सारखे दिसतात हे घोस निसर्गाची नाजूक अशी कलाकारी पाहताना मन थक्क होते पिवळी धमक्क कांती ..घोस झुबकेदार पाहता क्षणी करतो सर्वाना  “दिवाणां “सर्वाना सुखावतो बहावाचा असा “बहाणा “हे सुंदर घोस  बहावा रोज नवीन घोस  अंगावर धारण करतो आणी जुने घोस सहजच आपल्या पायाशी टाकून देतो जणू काही रोज नवीन दागिने घालणारी एखादी ..सुंदरीच !खाली टाकलेले घोस सुध्धा इतके सुंदर दिसतात ना की असे वाटते त्या नाजूक गालिच्या वरून चालत जावे अलगद ..!पण चालत गेले तर गालीचा चुरगाळून जाईल ना ..म्हणुन मग नुसताच तो गालीचा “डोळ्यात “ साठवायचा .बहाव्या वर तर मी एक अख्खी कविता पण केलीय ..बर का !!चैत्राची चाहूल लागली की बहावा जागा होतो तरतरून निष्पर्ण त्याच्या खोडावर पालवी धरू लागते भरभरून सुंदर ..नाजूक आणी पिवळेधम्मक घोस बहावा वागऊ लागतो अंगा खांद्यावर निसर्गानेच केली असते जणू मुक्तहस्ते दागिन्यांची बरसात त्याच्या अंगावर ..दागिन्यांची फार आवड त्याला ..रोज नवे नवे घालत असतो जुन्या दागिन्यांना हलकेच ..मग तो पायाशी आपल्या टाकत असतो ऐन ग्रीष्माच्या तडाख्यात बहाव्याचे हे फुलणे..जणु माणसाच्या मनाला रीझवण्या चे च असतात हे  बहाणे निसर्गाचे हे उपकार माणसाला फिटता फिटत नाहीत्याचे ऋण..त्याचे देणे कोणीच फेडू  शकत नाही बहावा असाच नियमित पणे दर वर्षी फुलत रहातो माणसाच्या आनंदाने जगण्याचा तो एक भाग बनून राहतो ..      दुसऱ्या एका रंगीत झाडाचे नाव आहे “पळस “हिंदीत याला पलाश ..असे म्हणले जाते करंजीच्या आकाराची गडद भगवी फुले धारण करणारे हे झाड माळराना वर फुललेले असते इतके कडक उन अंगावर घेऊन पण सुंदर पणे फुलून माणसाला आनंद देणारे हे झाड पाहिले की फार छान वाटते वर्षभर पानांनी भरलेले हे झाड उन्हाळ्यात मात्र आपली सर्व पाने टाकून देते आणी फक्त फुलेच धारण करते आपल्या खोडावर हे त्याचे रूप फारच मोहक असते ..पायाशी हिरव्या पिवळ्या पानांचा पाचोळा आणी वरती सुंदर भगवी फुले !पळसाला पाने तीन अशी म्हण मला वाटते म्हणूनच असावी या पळसाला काही जण पांगारा पण म्हणतात त्या उजाड माळरानात ..त्या कोपर्यात ग्रीष्माच्या उन्हात “पांगारा ...फुलतोय ..अंगांगी “पेटलेला “तो ...जणु स्वत जळून ..आपल्या डोळ्यांना सुखावतोय !! मध्यंतरी हम्पीला गेले असताना खुप वेगवेळ्या पिवळ्या जांभळ्या रंगाची आकर्षक झाडे दिसली होती खुप आनंद देत होती ती येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना ..बेळगाव रस्त्यावर तर  सुंदर लाल रंगाचे घोस असलेली झाडे दिसली त्यांनी तर इतकी मोहिनी घातली की पुढे गेलेली गाडी मागे नेऊन त्याचे फोटो घेतले नंतर समजले की या झाडाचे नाव “बॉटल ब्रश “असे आहे म्हणजे बाटली धुण्या साठी जो ब्रश वापरतो ना तसे याचे स्वरूप असते     बऱ्याच ठिकाणी उंच च्या उंच झाडावर जांभळ्या फुलांचे ताटवे फुललेले दिसतात अशा फुलांचे झाड फक्त उन्हाळ्यातच फुलते आणी लोकांचे लक्ष वेधून घेते नागज फाट्या जवळ असलेल्या पेट्रोल पम्पा पाशी एकदा भरपूर फुललेलेजांभळे झाड पाहिले वेळे अभावी थांबून त्याचा फोटो घेता आला नाही पुढील वेळी घेवु असे ठरवले ..पण पुढील वेळेला त्याचा बहर संपला होता ..या फुलांच्या अस्तित्वाचा परीस स्पर्श लाभलेले असे कित्येक रस्ते माझ्या डोळ्या समोरून जातात एका हॉटेल च्या दारात पानाची छोटी टपरी आहे तीला दोन गुलमोहराच्या झाडांनी इतका सुंदर प्रेमाने विळखा घातला आहे की त्या गडद केशरी फुलांच्या घोसात ती निळी टपरी पाहताना अगदी विलक्षण वाटते !!!    एका बस स्टोप ला लगटून लाल गुलमोहर उभा आहे आणी फुलांचे घोस मात्र त्याने स्टोप च्या अवती भवती टाकले आहेत.    तसेच एका रस्त्यावर एक अत्यंत पडझड झालेले घर आहे तिथे जवळजवळ पाच सात गुलमोहर बहरलेले आहेत त्यामुळे ते पडके घर पण एखाद्या  महाला सारखे वाटते .     एका ख्रिश्चन स्मशान भूमीत इतकी झाडे फुललेली आहेत जणु ती थडग्या मधील आत्म्याशी गप्पा करीत आहेत असा भास होतो      एका वळणावर दोन्हीकडे गुलमोहराची झाडे आहेत जणु काही लोकांसाठी एक कमान च प्रेमाने उभी केलीय !!     काही ठिकाणी गुलमोहोराचे घोस इतक्या खाली आले आहेत की असे वाटते ती झाडे  येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या गळ्यात हात घालून मैत्री पुर्ण संबंध प्रस्थापित करीत आहेत        काही ठिकाणी फुलांच्या ओझ्याने वाकलेली झाडे पाहून त्यांच्या गळ्यात गळा घालून फोटो घ्यायचा मोह आवरत नाही     एका मोठ्या कोबीच्या शेताच्या एका कोपर्यात लालभडक गुलमोहर फुलला आहे त्या शेताचा तो राखणदार च आहे म्हणा ना       एका वळणावर द्राक्ष वेलीच्या तिन्ही कोपर्यात गुलमोहर आहे वेगवेगळ्या रंगातला आहे असे वाट्ते रंगांच्या कॉम्बिनेशन साठी निसर्गाने च ही योजना केली असावी  मिशन हॉस्पिटल च्या आवारात इतकी वेगवेगळ्या प्रकारची आणी रंगाची झाडे आहेत की कीती पाहिले तरी मन भरत नाही या साऱ्या झाडांचे एक विशेष म्हणजे फुलांचे घोस बरोबर त्या झाडावर शेंगा पण धरलेल्या असतात ..हो ..पुढच्या मोसमात प्रजोत्पादना साठी ही आधीच सोय करून ठेवलेली असते निसर्गाने .या शेंगा इकडे तिकडे पडून वार्याने त्यातील बिया सर्वदूर पसरतात आणी मग त्यातुन च नवी रोपे नवी झाडे तयार होतात      त्या नंतर च्या एका वळणा वर तर चक्क गडद लाल गुलमोहोर आणी पिवळा धमक बहावा यांची “युती “ झाली आहे अगदी “अजब सोहळा “ ..असे वाट्ते पहिले की ..!!!       एका शाळेच्या फाटका पाशीच गुलमोहोराच एक सुंदर आणी प्रचंड झाड आहे .आल्या आल्या मुलांचे स्वागत करायला अगदी उत्सुक असते ते .       कोल्हापूरला एका मैत्रिणी कडे अगदी तिच्या घराच्या तिसऱ्या मजल्या पर्यंत चढलेले झाड आहे घरी जाताना पाहिले तर एक मोठी फुलांनी भरलेली फांदी चक्क तिच्या गच्चीत उतरली होती मग ठरवले जायचे आणी त्या फुलांना प्रेमाने गोंजारून यायचे  ..पण पहा ना  दुसऱ्या दिवशी खुप कचरा होतो म्हणून तीने ती फांदी तोडुन टाकली खुप वाईट वाटले मला मी म्हणले पण तीला ..अग का बरे काढलीस ती फांदी ?तोंड वेंगाडुन ती म्हणाली ..शी ग बाई कीती कचरा होतो या झाडामुळे अगदी वैताग आलाय नुसता ..मनाशी म्हणले बघा मला कीती हौस या फुलांची आणी ही त्याला चक्क कचरा म्हणते !!!      कडक उन्हाळ्याच्या दिवसात रस्त्यावरून जाताना अशी अनेक झाडे त्यांचे रंग आणी त्यांची सावली या मुळे कीती पण मैलाचा परिसर असु दे प्रवास अगदी सुखकर वाटतो .!!!असे वाटते यांचे आभार मानावे तितके थोडेच आहेत मग आपण जसे आपल्या वडीलधार्या माणसांच्या छायेत अगदी सुखाने राहतो आणी मग त्यांच्या प्रती प्रेम व्यक्त करायला जसे  त्यांच्या अंगावर मऊ मऊ शाल घालतो ना तसेच या झाडांच्या पण अंगावर एक एक शाल घालून त्यांचे उपकार थोडे तरी फिटतात का ते पहावे आणी त्यांना ही कीती आनंद वाटेल हे ही अनुभवावे कारण ती ही सजीव च आहेत आपल्या सारखी भावभावना असलेली !!          आता हळूहळू पावसाळ्याचे दिवस जवळ येऊ लागतात आणी या सर्व रंगीत झाडावरील फुलांचे आस्तित्व संपायची वेळ जवळ येते वळवाच्या पावसाने या फुलांचे घोस झाडावरून पडुन जातात आणी मग ही फुले आपला निरोप घेतात पुन्हा या झाडा वर हिरवी पानेच फक्त राहतात आणी मग ही झाडे  पुढील मोसमाची वाट पाहत राहतात आपल्या फुलांनी लोकांना रीझवायसाठी ..!!