.नेहा अग्रवाल ..आणी सौरभ पांडे हे नुकतेच बँकेत जॉइन झालेले दोन प्रोबेशनरी ऑफिसर्स दोघेही बिहारी .पाटना शहराचे रहिवासी सौरभ अजून अविवाहित तर नेहाचे नुकतेच लग्न झालेले तीचे पती पुण्यात नोकरीस तर सारे कुटुंब बिहार मध्ये स्थायिक एकंदर कोल्हापूर पासून खुपच दूर ..उत्तर भारतीय किंवा बिहारी बँकेत असणे ही आता आमच्या साठी काही नवीन गोष्ट नाही या पूर्वी पण “राहुल "म्हणून आमच्या कडे ऑफिसर होताच तो तर “मिर्झाचौकी ..येथून आला होता त्याला घरी जायला पण अख्खे दोन दिवस विमानाने लागत असत तो नुकताच पुढचे प्रमोशन घेवून गेला आणी नंतर हे दोघे आले खरे तर दोघेही माझ्या मुलाच्या आसपासच्या वयाची पण माझा स्वभाव पण मिळून मिसळून राहणारा असल्याने चेष्टा मस्करी .दंगा या मुळे ती दोघेही माझे ऑफिसर नसून मित्र जास्त आहेत आता तर थोडी फार मराठी भाषा पण शिकवली आहे त्यांना .डब्यातील नवीन पदार्थ शेअर करणे .एकमेकांच्या आयुष्यातील काही गोष्टी शेअर करणे हे नेहेमीचे झाले आहे मॅडम आप खाना बहोत टेस्टी बनाती हो .म्याडम आपका ड्रेस सेन्स बहोत ही अच्छा है .अशा कमेंट पण दोघे करीत असतात .आम्ही आता छान मित्र बनलो आहोत यापूर्वी माझ्या शाखेत असणाऱ्या “राहुल.ने पण माझ्या कडून मराठी भाषा शिकून घेतली होती आता त्याची ज्या खेडेगावात बदली झाली आहे तीथे तो छान मराठी बोलू शकतो मागील आठवड्यात नेहा काही घरगुती कार्यक्रम साठी पुण्यात गेली होती दोन दिवस खूप दग दग झाल्याने ती थोडी आजारी होती एक दिवस कसे तरी बँकेत काम केले ..आणी दुसऱ्या दिवशी आजारीच पडली सकाळीच मला मेसेज ..मॅडम मै बहुत बिमार हु ...बुखार है कल रातसे .शायद आज आ नही पाऊंगी मी म्हणले ठीक आहे तु घरीच राहा मी तुझ्यासाठी डबा आणते आणी जाता जाता तुला पाहायला येते तसे तीचे घर माझ्या बँकेच्या रस्त्यावर आहे मग चटकन उठून पोळ्याची परत कणिक भिजवली थोडी जास्त भाजी पण करायला घेतली तोपर्यंत तिचा परत फोन ..मॅडम मै बँक आ रही हु वैसे घरमे अकेली क्या करूंगी .?मी म्हणले ठीक आहे पण औषध वगैरे ..ती म्हणाली दवाई तो ली है हमने मगर खाया कुछ नही है कलसे मी म्हणांले ठीक आहे मी येतेच आहे डबा घेवून म्याडम आपको तकलीफ हो रही है ..मी हसून म्हणले वो देखेंगे बाद मे ..बँकेत गेले तेव्हा तिने घरी औषध घेतले होतेच मग लगेच तीला बँकेच्या जेवणखोलीत पाठवले आणी गरम पोळी, भाजी ,गाजराचे लोणचे खायला दिले .लगेच तीला खूप हुशारी वाटली कुणीतरी आपली काळजी घ्यायला आहे म्हणून तीला ..हाय से वाटले कारण ती कोणी पार्टनर न घेता अपार्टमेंटमध्ये एकटीच राहत असते नंतर थोड्या वेळाने तिच्या नवऱ्याचा विचारपूस करणारा फोन आला माझ्या शेजारीच ती बसते त्यामुळे फोन वरचे बोलणे मला पण समजत होते ती फोन वर बोलत होती जी मेरी तब्येत अबसे ठीक है जी हा दवाई भी ली है बुखार अभी तो नही है ..हा सुबह ही खाया है खाना मॅडमने मेरे लिये एकदम ताजा और टेस्टी खाना लाया था और प्यारसे परोसा भी ..जी मुझे तो मम्मी की याद आई असे म्हणून तिने माझ्याकडे पाहिले तिच्या डोळ्यांत पाणी दाटून आले होते❤असाच बँकेतील दुसरामित्र..गौरव शर्मा.काही दिवसापुर्वी गौरवने एक छान मोटरसायकल खरेदी केली बाईकचे वेड त्याला होतेच पण त्याच्या पप्पा नी इतके दिवस मनाई केली होती कारण गौरव खुप फास्ट बाईक मारतो हे त्यांना माहीत होते बिहार मध्ये राहून त्यांना त्याची काळजी लागायला नको होती ..मग गौरवने मला मध्यस्थ घालून पपांची परवानगी मिळवली होती त्याच्या पपांना पण मी म्हणजे त्याची तिथली पालक वाटत होते अधुन मधुन माझे त्यांचे गौरवच्या फोन वर बोलणे पण होत असे ..अशा तऱ्हेने एकदा गौरवला बाईक मिळाली ..स्वारी अगदी खुष होती ..स्वत वर बाईक वर आणी माझ्या वर सुद्धा ..❤️दुसऱ्याच दिवशी शनिवार होता .ऑफिस संपल्या वर राईड ला जाणार होती स्वारी !!दिवस पावसाळी होते त्यामुळे मी आधीच त्याला सांगितले होते जपुन जा ..बरोबर एक मित्र होता त्याचा .दोघे ही या गावात नवीन त्यामुळे या भागाची रस्त्यांची पण काही खास माहिती नाहीपण मुलेच ती नव्या पिढीची ..थोडीच ऐकणार आहेत ..मी पण काम आटोपून घरी निघुन गेले घरी गेल्यावर घरच्या व्यापात बँकेतला गौरवचा विषय बाजुला राहिला अचानक रात्री फोन वाजु लागला ..घड्याळ पहिले रात्री चे अकरा वाजले होते इतक्या रात्री कोण असावे .?..फोन घेतला तर फोन वर गौरव बोलत होता मॅडमजी हम् गौरव बात कर रहे है .अरे इतनी रात गये ?.क्या बात है ?मी विचारले म्याडम हम् फस गये है यहा ..बाईक फिसल गयी है ..अरे लेकिन तुम लोग तो दोपर को गये थे ..अभी तक क्या कर रहे हो और हो कहा ??माझी प्रश्नांची सरबत्ती संपत नव्हती ..म्याडम सुनो तो वो सब बाद मे बतायेंगे फीलहाल हम् कहा है ये हमे भी नही पता हे ऐकुन मी चकित झाले ..थोडी चौकशी केल्या वर समजले ..दुपारी बाहेर पडलेली गौरव आणी त्याचा मित्र ही जोडी राईड च्या नादात भलती कडेच गेली होती आणी जोरदार पावसात सापडल्याने बाईक स्लीप झाली होती दोघांच्या मोबाईल ची केव्हाच “वाट “ लागली होती पण नशीब म्हणजे गौरवला माझा नंबर आठवत होता ..जवळ असणाऱ्या एका दुकानातून त्याने हा फोन लावला होता दुकानदार हिंदी भाषा कळणारा नव्हता त्यामुळे तो त्यांच्याशी संवाद साधु शकत नव्हता मग मीच फोन वर विचारल्यावर मला समजले ते दोघे सातार च्या आसपास होते मग मी त्याला धीर दिला आणी तुमची व्यवस्था करते असे सांगितले सुदैवाने दोघांना थोडे फार खरचटले होते ..फार लागले नव्हते ..मग मी सातारला भावाला फोन केला तो त्या दोघांना घरी घेवून गेला .बाईक पण किरकोळ दुरुसती साठी दिली .दुसऱ्या दिवशी दुपारी गौरव आणी त्याचा मित्र सुखरूप त्यांच्याच बाईक वरून कोल्हापूरला पोचले माझ्या घरी आल्यावर गौरव म्हणाला म्याडम आपका शुक्रिया कैसे अदा करें समझ नही आता इतनी रातको हमे वहा कौन मदद करता .?आपने तो जैसे देवीमाता के माफिक हमे मदद पाहुचायी मी फक्त हसले ..गौरव ऐसा कुछः नही है .,.अपने रिश्ते ही ऐसे ही है ना मात्र त्याने माझ्या कडून त्या वेळेस प्रॉमिस घेतले की झाली गोष्ट मी पपा ना सांगणार नाही मी पण कबुली दिली कारण मी पण आईच होते ना एका मुलाची !😊😊