Kripi Filej - Khari Drashy Bhitichi - Season - 1 - Part 2 in Marathi Horror Stories by jay zom books and stories PDF | क्रीपि फाईलज - खरी दृष्य भीतीची ... - सीजन 1 - भाग 2

The Author
Featured Books
  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

  • ફરે તે ફરફરે - 66

    ફરે તે ફરફરે - ૬૬   માનિટ્યુ સ્પ્રીગ આમતો અલમોસામાં જ ગ...

  • ભાગવત રહસ્ય - 177

    ભાગવત રહસ્ય-૧૭૭   તે પછી સાતમા મન્વંતરમાં શ્રાદ્ધદેવ નામે મન...

  • કુંભ મેળો

    કુંભ પર્વ હિન્દુ ધર્મનો એક મહત્વપૂર્ણ પર્વ છે, જેમાં કરોડો શ...

Categories
Share

क्रीपि फाईलज - खरी दृष्य भीतीची ... - सीजन 1 - भाग 2

व्हिक्टोरिया 405


भाग 2 ..


..


भाग 2


तपकीरी रंगाचा मातीचा रस्ता कापत गाडी वीस पंचवीस मिनिटांत हव्या त्या ठिकाणी पोहचली.



दुकानात खुप गर्दी होती.


एकटा वाण्या जास्ती जास्त एक जण संभाळु शकत होता.

पन दुकानात मात्र वीस -पंचवीस गि-हाईक होते.

गि-हाईंकाचा आवाज कानांवर ऐकू येत होता.
तू- तू मैई,मैई सुरु होती.

" ओ वाणी पावशेर डाळ द्या."

" ओ वाणी कांदे दा अर्धाकीलो!"

" मला टोमेटो द्या हो अर्धाकीलो."
गर्दीतून गि-हाईकांचा बोलण्याचा आवाज येत होता.

" ओ वाणी काका !" सुजय गर्दीतून आत घुसला.


" काय सुजय ईकड कुठे ? "
सुजय वाण्याचा ओळखीचा असावा.

" अहो वाणी काका -आमच्या गावातली सर्व दुकान बंद झाली हो! मग आलो इकडे."

" बर..बर.. काय पाहिजे ?" वाणी कसलीतरी पुडी बांधत म्हंणाला.

" अनारस्यांच पीठ हवय !"

" अनारस्यांच पीठ होय? थांब देतोच."
वाणी अस म्हंणतच दुकानाच्या आतल्या खोलीत गेला.

तिथे तेळाचे डबे, साबण,बिस्कीचे बॉक्स, बटाट्यांची पिशवी, कांद्यांची पिशवी, अस वेगवेगळ सामान ठेवल होत - तिथूनच एका फळीवरून त्याने अनारस्यांच्या पीठाचे दोन पाकिट घेतले- कापडी पिशवीतल्या थैलीत टाकले.पुन्हा दुकानात आला.

" घे सुजय!"

" हा द्या!"


सुजयने वाणीकाकांकडून अनारस्यांच पीठ घेतल - त्यांना पैसे देऊन - तो गर्दीतून बाहेर येऊ लागला-

तेव्हाच त्याचवेळेस एका गि-हाईकाचा धक्का त्याला लागला- नकळत गि-हाईकाच्या हातून लसणाचा एक बार सुजयच्या कापडी थैलीत पडलात -

" सॉरी सॉरी ..!"
सुजयने माफी मागितली गर्दीतून बाहेर आला.


दोघेही गाडीवर बसले.. पुन्हा परतीच्या वाटेला लागले.





9:10 pm

रात्रीचा प्रहार सुरु झाला होता .काळयाभोर अंधारात जीव घेण्यासाठी मृत्यु घात घालून बसला होता.


जंगलातल्या झुडपांचा कळप दिसून येत होता. त्या कळपापासून पूढे मातीचा तपकीरी रस्ता दिसत होता.



जहरी धुक्याने बाहेर पडायला सुरुवात केली होती.
पुर्णत जंगलात त्याने पहारा द्यायला सुरुवात केली होती.

त्याच धुक्याला चिरत एक हेडलाईटचा प्रकाश बाहेर आला- ती एक टू- व्हीलर होती.

गाडीवर सुजय आणि भाविक, मामा भतीज्या बसले होते.



" ए मामा ?" मागून भाविक बोलत होता.
मध्येच आजूबाजूला पाहत होता.

" काय ए रे ?"

" अरे हे जंगल तुझ्या स्टोरी मधल्या जंगलांसारख का वाटतंय मला !"

" म्हंणजे?"

" अरे थोड्यावेळापुर्वी हा रस्ता किती साफ होता ? आणि आता बघ ? धुक्याची नुस्ती चादर अंथरलीये.! सगळीकडे नुस्त धुकच धुक पसरलंय."

" भाविक! अस काही नसत रे ! त्या गोष्टी काल्पनिक असतात !" सुजय बोलत होता. पन त्याच्या शब्दांत सत्यता नव्हती - विश्वास नव्हता.

काळ्या झाडांच्या शेंड्यांवरून वटवाघळांचे थवे उडत जात होते.

" मामा , ते बघ ड्रेक्युला ! " भाविक पटकन ओरडला.


त्याच्या वाक्यावर सुजय किती दचकला होता.भित्र्या नजरेनेच त्याने आकाशातून उडत जाणारे वटवाघळे पाहिली.

" रातकीड्यांची कीरकीर वाजतीये मामा , तुझ्या स्टोरीत पन अशीच वाजते ना ?"

" भाव्या गपतो लेका ! काय स्टोरी ? स्टोरी लावल नुस्त - "

भाविक गालात हसत होता.
त्याला माहिती होत - सुजय मामाची भीतिने जाम फाटली आहे.


" मामा तूझी फाटली ना! किखिखिखिखी..!"


" भाव्या , भीति असायलाच हवी ! " सुजय गुढस्वरात बोलत होता.

" हे जंगल काही साधारण नाही भाव्या ! - "

" सांग ना मामा काय आहे असं ह्या जंगलात !"

" भाविक ह्या जंगलात भुल्या नावाच भुत आहे असं माझे आजोबा बोलायचे. हा भूल्या - समोरच्या मांणसाला वेगवेगळे भयानक दृष्य दाखवून मारतो."

" अरे मामा पन तूच तर आता म्हंणालास की अस काही नसत ते ..?"

" हो म्हंणालो मी ! पन काही गोष्टी असतात ! ज्या आपल्या कल्पनेत बसत नाहीत !"

" म्हंणजे ?" न समजून भाविकने विचारल.

" हे बघ आता तो विषय सोड ! आपण घरी गेल्यावर बोलू ..!"

सुजय अस म्हंणाला आणि अचानक धक्के खात गाडी बंद पडली..
सुजय- भाविक दोघांच्या पोटात गोळा आला.
रस्त्याबाजुला गाडी थांबून
दोघेही गाडीवरून खाली उतरले - अनारस्यांच्या पीठाची पिशवी तशीच हेंन्ड़लला लटकत होती.


" मामा - हे जंगल तर जयेश झोमटेंच्या हॉरर ट्रिप मधल्या जंगलासारखच वाटतंय - इथे जर ती मांणस खाणारी भुत आली तर !"

" भाव्या!" सुजय जरासा खेकसलाच.

" गप्प बसतोस का ! "

सुजयला रागावलेल पाहून भावीक जरासा शांत झाला.

" ह्या गाडीला काय झालं अचानक बंद व्हायला."
सुजय स्वत:शीच श्रासिक स्वरात म्हंणाला.


" मामा तुझ्या स्टोरीत पन अशीच गाडी बंद पडते न ? " भाविकच्या वाक्यावर सुजय पुढेच पाहत होता.


भाविकच बोलण सुरु होत.


" आणी अचानक समोरुन दिसत - की धुक्याला चीरत एक घोडागाडी आपल्याच दिशेन येतीये.. काळ्या कलरचे दोन घोडे-असलेली घोडा गाडी " भाविकच्या वाक्यावर सुजय तोंडाचा आ-वासून समोर पाहत होता -समोरून तपकीरी रंगाच्या रस्त्यावरून आजुबाजुच्या धुक्याला चिरत एक घोडागाडी खरच येतांना दिसत होती.


घोडागाडीच्या ड्राईव्हसीटवर बाहेर - एक काळा कोट घातलेली उंचपूरी साडेपाच फुट उंचीची आकृती बसली होती.


भाविक पुढे बोलू लागली.


" त्या गाडीच्या घोड्यांची लगाम - एका ड्रेक्युलाने पकडलीये..! हळुच गाडी जागेवर थांबली- आणी आता तो ड्रेक्युला जागेवरून उठला..त्याने जागेवरूनच खाली उडी घेतली ."

भाविकच्या वाक्यावर तसंच झाल.

सुजयच्या पायांतून जिव निघुन गेला - तोंड रडकूंड्यासारख करत तो मान हा..हा करत हळवत होता.

" भ....भ....भाव्या ....!"
सुजयने भाविकला हाक दिली.

तस त्याने मागे वळून पाहिल..

" काय आहे मामा , कशाला वरडतो - " भाविकने सुजयकडे पाहिल..तो टूण- टून करत उड्या मारत होता .

" तू तर कैरेक्टर मध्ये घुसला मामा हाहाहाहाआ!
अशी एक्टींग करतोय जस की समोर बघितल्यावर काळ्या कोटातला ड्रेक्युला दिसणार आहे."
सूजयने जोर जोरात मान हळवली.
भाविकने समोर पाहिल - आणी जस समोर पाहिल.त्याच्या उभ्या मणक्यातून थंडगार उष्म लाठ सर्रकन दौडून गेली- घश्यात दुष्काळ पडला.

समोरून तपकीरी मातीच्या रस्त्यावरून
साडे पाचफुट उंचीचा तो काळ्या कोटातील आकार - ह्या दोघांच्या दिशेने झप झप पावले टाकत येत होता.

त्याच्या डोळ्यांतली दोन बुभळ रात्रीच्या अंधारात लेझर लाईटप्रमाणे चमकत होते.

" आssssssss..! " भाविकच्या गळ्यातून घंटा वाजली.

"मामाsssss पळssss!"
दोघेही गाडी तिथेच ठेवून हिरव्या वनात धावले -


गुढघ्यां एवढ्या गवतांतून दोघेही धावत पळत सुटले होते.

सोबतीला भय होता - भयाचा थरार होता.
छाती रेल्वे इंजिनसारखी धडधड करत होती.
मागून मृत्यु आला होता- कोणत्याही क्षणी मरण येणार होत - डसणार होत. विषारी लुचाईने आपल्यासारख बनवणार होत.


क्रमश