Bakasurache Nakh - 1 in Marathi Fiction Stories by Balkrishna Rane books and stories PDF | बकासुराचे नख - भाग १

Featured Books
  • ભાગવત રહસ્ય - 149

    ભાગવત રહસ્ય-૧૪૯   કર્મની નિંદા ભાગવતમાં નથી. પણ સકામ કર્મની...

  • નિતુ - પ્રકરણ 64

    નિતુ : ૬૪(નવીન)નિતુ મનોમન સહજ ખુશ હતી, કારણ કે તેનો એક ડર ઓછ...

  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

Categories
Share

बकासुराचे नख - भाग १

बकासुराचे नख भाग१

मी माझ्या वस्तुसहांग्रालयात शांतपणे बसलो होतो.आत्ताच  कोल्हापूर पुरातत्व विभागाचे संचालक सुधीर महोंतो भेट देवून गेले होते.त्यांना कुणीतरी माझ्या या छोट्या सहंग्रालयाची माहिती दिली होती.कुतूहल वाटून ते इथे आले होते.त्यांनी माझ खूप कौतुक केले.यक्ष (संदर्भ- तांडव कथा)व रंगांची वादळ उठणारा पारदर्शक गोल (संदर्भ -योगीनींचे बेट)या बद्दल त्यांनी विचारलं.मी त्यांना सगळं खर सांगून टाकलं.ते चकित झाले.पण त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला.ते म्हणाले त्यांच्या पुढच्या उत्खननात ते मला सहभागी करून घेतील.मी स्वतः ला खुप भाग्यवान मानत होतो.कारण भारत सरकारच्या विभागाकडून निमंत्रण मिळते हा खूप मोठा गौरव होता.   ' कुरीयर' बाहेरून आवाज आला." या, आत या!"कुरीयरवाल्याने एक बंद लिफाफा माझ्या हाती ठेवला. पोचपावती वर माझी सही घेतली.कुणीतरी योगेश पाटील या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी गावातल्या इसमाने पाठविले होते.मी ते पाकीट उघडले.त्यात एक लिहिलेला कागद होता वआत एक मलमलीच्या कापडात गुंडाळलेली एक वस्तू होती.मी गुंडाळी उघडली.आतली वस्तू बघताच मी थक्क झालो. ' काय होत ते?'ते एक अंगठ्याच नख होते.मग थक्क होण्यासारखंत्यात काय होत? होय ते नख अती विलक्षण होते.त्याचा रंग करडा होता.त्याची रुंदी जवळपास दहा सेंटिमीटर होती.त्याची लांबी पंधरा सेंटिमीटर होती तर जडी तीन सेंटिमीटर होती.ते उजव्या हाताच्या अंगठ्याचे नख होते. एवढा मोठा. अंगठा असणारा कोणता प्राणी असावा? ज्याचा अंगठा एवढा मोठा होता तर त्याचा पंजा केवडा मोठा असेल?मी सोबतची चिठ्ठी वाचू लागलो....'सर मी, योगेश काळके.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी या  तालुक्यातील ऐणारी गावात राहतो.गेले काही दिवस माझ्या सोबत काही विचित्र घडत आहे.पत्रात मी ते लिहू शकत नाही.एवढच सांगतो की कुणीतरी अज्ञात व्यक्ती किंवा जे काही असेल ते सतत माझ्या आसपास वावरत असते.कधी मला खुणावते किंवा मला बोलावत असते.मी घरात हे सांगितलं पण त्यांना काहीच जाणवत नाही.त्यांना माझ्या डोक्यावर परिणाम झाला असं वाटतंय.कालच मी ' त्याच्या' पाठूनगुपचुप गेलो.ऐणारीच्या घनदाट जंगलात बकासूराच्या गुहेजवळ ती व्यक्ती गायब झाली.मी गुहेच्या तोंडाजवळ पोहचलो होतो पण आत जायचं धाडस झाले नाही.पण गुहेच्या बाहेर असलेल्या दगडांच्या खाचीत मला ही विचित्र वस्तू सापडली.मी ती वस्तू कुणालाच न दाखवता तुम्हाला पाठवतोय.तुमच्या  'तांडव ' या घटनेतली माहिती वाचून मी हा निर्णय घेतलाय.खाली योगेशने त्याचा फोन नंबर दिला होता.'मी ते पत्र वाचलं व त्वरित योगेशला फोन लावला.सुरूवातीला फोन लागेना कदाचित रेंजचा प्रश्न होता. योगेश खरं सांगतो होता हे नक्की! समोरच नख हा त्याचा पुरावा होता. पण त्याला दिसत असलेली व्यक्ती कोण असावी की त्याला भास होत होता? ते नख किती जुने असावे? असे काही प्रश्न मला पडले.कार्बन डेटींग करून नखाच निश्चित वय कळलं असतं.त्यासाठी सुधीर महंतोंची मदत घ्यावी असं मी ठरवले.वैभवाडीला उद्याच जायचं हे ही मी निश्चित केलं.मलाही  ' पांडवकालीन बकासुराची गुहा पहायची होती.'अचानक माझ्या डोक्यात एक विचार चमकून गेला.मी त्या विचाराने अक्षरशः थरारलो. ते नख महाभारतातल्या बकासुराच्या तर नाही ना?एवढे मोठे नख सामान्य माणसाचे असूच शकत नाही! एवढ्यात फोन आला. योगेश बोलत होता." बोल, योगेश मी रत्नाकर राजे....बोलतोय.""सर,तुम्ही ते पत्र वाचलात? आणि ते नख?" त्याने विचारले." हो. त्यावर आपण उद्या बोलूया."" तुम्ही उद्या वैभववाडीत येताय ?"  तो खूपच उत्तेजित झाला होता." वैभववाडी बस स्टँडवर उतारा मी तिथे येतो.कितीच्या बसने येणार?"" मी सहा वाजता बसमध्ये बसणार. नऊला वैभववाडीत पोहचेन."मी म्हणालो.ऐणारी गावात पांडवकालीन गुंफा आहेत असं मी वाचलं होतं पण पाहण्याचा योग आला नव्हता.तिथे बकासुराच्या वध भीमाने केला अस गावकऱ्यांचे मत होत. त्या बाबत अनेक कथा व दंतकथा परिसरात सांगितल्या जातात.आज या नखाच्या निमित्ताने तो योग जुळणार होता.मी बकासुराच्या नखाचे विविध कोनातून फोटो मारले.प्लॅस्टर आॉफ पॅरीसच्या उपयोग करून त्याचे ठसे तयार केले.मी ते नख व्यवस्थित एका लिफाफ्यात बंद करून ते भारतीय पुरातत्व विभागाच्या कार्यालयात नेऊन दिले.त्यापूर्वी मी महोंतोशी बोललो होतो.नखाविषयी ऐकून ते ही चकित झाले होते.त्यांनी माझ्यासोबत येण्याची इच्छा व्यक्त केली.   "उद्या सकाळी सहाच्या गाडीने जायचयं." मी त्यांना म्हणालो.******-------******-----******-----****------सकाळी आठ वाजता आमची गाडी गगनबावडा घाट उतरत होती.सकाळच्या  सोन पिवळ्या उन्हात गगनाला भिडणारी पर्वत शिखरे....दरीत पसरलेली धुक्याची चादर ..अन मस्त हिरवाई लक्ष वेधून घेत होती .महोंतो उजव्या बाजूने डोंगरकड्यावरून उड्या घेत ओघळणारे लहान लहान धबधबे बघत होते." किती सुंदर दृश्य आहे नाही?" ते म्हणाले." हो,पण तेवढेच रौद्र ..!" मी खोल दर्यांकडे बघत म्हणालो." या अश्या घनदाट जंगलात पूर्वी राक्षसांचा वावर निश्चितच असणार." ते म्हणाले." खरंच, मी प्रचंड उत्सुक आहे की आपल्याला त्या बकासुराच्या वाड्यावर काय सापडेल?" मी म्हणालो.बघत बघता घाटातल वळण घेत गाडी वैभववाडी बस स्थानकावर आली.निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे गाव आताश्या कुठे बाळस धरत होते.एवढ्यात एक विशितला तरुण आम्हाला समोर आला." रत्नाकर राजे?" त्याने प्रश्नार्थक मुद्रा करत विचारले." होय, मीच तो आणि हे सुधीर महंतो... पुरातत्व विभागाचे अधिकारी सध्या कोल्हापूर इथे असतात."" नमस्कार सर." त्याने दोघांना नमस्कार केला.योगेश कळके सावळा कुरळ्या केसांचा व शिकलेला दिसत होता." सर,मी एम. ए.करतोय.चला आमच्या घरी तुमची राहण्याची व्यवस्था केलीय." योगेश म्हणाला." रागवू नकोस.आम्ही इथल्या फॉरेस्ट रेस्ट हाऊस वर राहणार.महांतोनी कालच तिथे कळवले आहे.पण आम्ही जेवणासाठी आज रात्री तुझ्याकडे येवू."मी म्हणालो.तो थोडा निराश वाटला.पण त्याने लगेच रिक्षा बोलावली." वनविभागाच्या विश्रांती गृहाकडे चल "तो चालकाला म्हणाला.दहा मिनिटातच आम्ही रेस्ट हाऊसवर पोहोचलो.डोंगराच्या पायथ्याशी एक सुंदर अस टुमदार बंगला होता.सभोवती बदामाची झाडे होती.आवारात बगीचा होता. वविध आकारात कापलेली छोटी झाडे होती." अती सुंदर !" मी म्हणालो.आम्ही आमच्या बॅग खोलीत ठेवल्या .खिडकी उघडली.मागे झाडांची दाट झाडी होती. अचानक योगेशच्या चेहऱ्याचा रंग बदलला ." सर ,तो..तो...आहे तिथे.."योगेश कुजबुजत बोट खिडकीकडे करत म्हणाला.योगेश च्या चेहर्याचा रंग बदलला." सर..सर..तो.. तो.. तिथे आहे."तो खिडकी समोर बोट करत म्हणाला.मी खिडकीतून बाहेर पाहिले.सुरूवातीला मला काही दिसल नाही. मी मन व डोळे एकाग्र केले व पुन्हा निरखून पाहिले. मला काही तरी हलताना... सरकताना दिसल.झाडी पलिकडे दोन ते तीन फूट उंचीचा कुणीतरी प्राणी पळताना दिसला." काय आहे तिथे?" महंतोंनी आम्हा दोघांकडे बघत विचारले." कुठचा तरी प्राणी आहे." मी म्हणालो." नाही सर, तो एक बुटका राक्षस आहे. तीन फूट उंच... डोक्यावर कुरळ्या केसांचे दाट जंगल... जाडजूड हात-पाय....बोटभर लांबीचे सुळ्यासारखे दात..पण तो तुम्हाला दिसला?"तो माझ्याकडे बघत म्हणाला." होय, मला काहीतरी दिसलं.पण नक्की काय ते कळलं नाही.या युगात राक्षस ते ही बुटके? ." मी म्हणालो." सर, या पूर्वी मी सोडून तो कुणालाच दिसत नव्हता.... तुम्हाला दिसला म्हणजे मी खरं सांगत होतो हे तरी सगळ्यांना पटेल." योगेश म्हणाला. त्यांच्या चेहऱ्यावरचा ताण आता कमी झाला होता." हे सगळं अजबच आहे." महंतो म्हणाले.      "नाष्टा करून त्वरीत बकासुराच्या गुहेजवळ जाऊया." मी सुचवले.तेवढ्यात रखमा नाष्टा घेऊन आली.रेस्ट हाऊसवर येणार्या सगळ्यांच्या जेवणा खाण्याची व्यवस्था तीच बघायची.साठीकडे झुकलेली रखमा धडधाकट अंगकाठी ची होती. आल्या -आल्या ती योगेश कडे विचित्र नजरेने पाहू लागली." सायबांनू ,ह्येनी बलयल्यांन तुमका ' राक्षसाची गुहा 'बघूक? ह्यो पागल झालोसा."ती स्थानिक मालवणी भाषेत बोलत होती.पण तिच्या बोलण्याचा अर्थ मला समजला." आम्हीच आलोत... संशोधन करायला." मी म्हणालो.नाष्टा छान झाला होता. जीभेवरची चव दुपारच्या जेवणापर्यंत राहणार होती हे नक्की.      आम्ही तिघेही रेस्ट हाऊस मधून बाहेर पडलो.शेताच्या बांधावरून आम्ही चालत जंगलाच्या सीमेवर पोहोचलो.पुढे योगेश चालत होता मी व महंतों सोबतच चालत होतो. हळूहळू झाडांची गर्दी वाढू लागली.रानपाखरांचे आवाज कानात घुमू लागले.एका ऐनाच्या झाडावर साळुंक्याचा थवा कर्कश स्वरात ओरडत होता." झाडावर एखादा साप चढलाय पाखरांची अंडी खायला." योगेश म्हणाला." एक प्राणी दुसर्यांना खातो...हा जंगलाचा नियम आहे." महंतो म्हणाले.एवढ्यात हुप्प्या माकडांचा एक कळप आमच्या समोरून चित्कारत झांडावरून उड्या मारत पळला.आता जंगल अधिक गर्द झालं होतं.चढ वाढला होता. धाप लागायला सुरुवात झाली होती. वाटही अरुंद झाली होती.एक माणूसच चालू शकेल एवडीच वाट होती.अचानक योगेश थबकला. आम्ही आजुबाजुला नजर फिरवली.हातातल्या काठीने डावीकडे खुणा करत त्याने इशारा केला.आम्ही डाव्या बाजूला पाहिले.भितीची एक लहर नसानसात सळसळली.एक भलामोठा अजगर संथपणे सरकत आमच्या वाटेवर आडवा आला.तो वाट पार करेपर्यंत आम्ही स्तब्ध उभे राहिलो. आम्ही पुन्हा आमचा प्रवास सुरु केला.मला राहून -राहून वाटत होतं की कोणीतरी आमचा पाठलाग करत आहे.एकदा तर माझ्या डाव्या खांद्यावर धक्का देत कोणीतरी गेल्यासारखा मला भास झाला.     आता चढ संपला होता. अचानक माझ लक्ष समोर गेले.समोर मोठं गोल रिंगण दिसत होतं तिथे एकही झाड नव्हते.पण रिंगण सोडलं तर इतरत्र झाडांची दाटी होती.मी योगेश कडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहिले." सर,इथे बकासुर व भीम यांच युध्द झाले होते.त्यांनी असंख्य झाडे उपटून एकमेकांवर फेकली होती. त्यामुळे इथे झाडे नाहीत.अशी दंतकथा सांगितली जाते." तो म्हणाला.थोडं आणखी चालल्यावर आम्हाला समोर एका भल्यामोठ्या दगडात कोरलेल्या गुहा दिसल्या.सात ते आठ गुहा दिसत होत्या.गुहेंच्या बाहेर असंख्य छोट्या छोट्या बैलगाड्या (दोन फूट लांब व तेवढ्याच उंच) दिसल्या.तसेच मातीचे छोटे गढू पडलेले दिसले." गावातून दरवर्षी बकासुराच्या आत्म्याने त्रास देऊ नये म्हणून अश्या गाड्यांतून भात व मडक्यांतून पाणी व आमटी इथे पोहचवली जाते.प्रत्येक घरातून एक बैलगाडी इथे येते.सगळ सामान इथे ठेवल्यावर इथं कुणीच थांबत नाही.पण दुसर्याच्या दिवशी एकाही बैलगाडीत अन्न दिसत नाही." योगेश म्हणाला." हे सगळं मजेशीर आहे. कदाचित रानटी प्राणी ते अन्न खात असतील." महंतो म्हणाले." पण, या गुहांवर संशोधन झाले पाहिजे." मी म्हणालो.आम्ही आज गुहेत शिरण्यासाठी लागणारे साहित्य आणले नव्हते.    आम्ही एका गुहेत उतरायचे ठरवले.जमेल तेवढं आत जायच या इराद्याने आम्ही हळूहळू आत जायला सुरुवात केली.एक उंच माणूस आरामात जाईल एवढी त्या गुहेची उंची तोंडाजवळ होती.पण पाच एक मिनिटे चालल्यावर गुहेची उंची कमी होताना दिसली.आता थोडं वाकून जावे लागत होते.आत अंधुक दिसत होतं.आम्ही मोबाईलची टॉर्च चालू केली.आत अनेक छोटेमोठे काळे दगड पडले होते." थांबा, तिकडे पहा .त्या दगडांच्या खाचीत एक हाडांचा सापळा आहे." महंतो उत्तेजीत होत म्हणाले.आम्ही तत्काळ तिकडे वळलो." अरे बापरे !केवडा मोठा हा सांगाडा आहे? ते बघा फक्त मांडीचे हाड जवळपास जवळपास सहा फूट आहे." मी जवळ जवळ ओरडलोच.महंतोनी त्या सांगाड्याचे विविध कोनातून फोटो घेतले."उद्या हा सांगाडा व्यवस्थितपणे इथून हलवला पाहिजे.याची कार्बन डेटिंग करून अभ्यास करावा लागेल."  या पुढे गुहेत जाणे शक्य नव्हते.सायंकाळी सर्व तयारीनिशी जाण्याचे ठरवले." गुहा बरीच लांब आहे.तिचा  शेवट नेमका कुठं आहे हे कुणालाच माहीत नाही." योगेश म्हणाला.आम्ही माघारी फिरलो.गुहेच्या तोंडावर येता येता मला एक अजब बुटका माणूस ओझरता दिसला. मी धावतच बाहेर आलो पण तोपर्यंत तो गायब झाला होता .पानांची सळसळ...माकडांचा चित्कार ऐकू आला." काय झालं?" मंहतोंनी धापा टाकत टाकत विचारले." कुणीतरी... माणूस किंवा अन्य कोणीतरी ..तीन फूट उंच असावा ... भलंमोठं डोके...मानेपर्यंत पोचलेले दाट कुरळे केस...मला एवढंच दिसल." मी म्हणालो." तोच तो! मला अनेक वेळा दिसलाय .बुटका राक्षस...त्यांचा चेहरा राक्षसां सारखा आहे. तो मला काहीतर सांगण्याचा प्रयत्न करतो पण मला काहीच कळत नाही." योगेशने सांगितले.' तो रहस्यमयी मानव कोण व त्याचा या गुहेची संबंध काय हे आपण शोधूयाच, पण आता खूप भूक लागलीय रेस्ट हाऊसवर जाऊया." मी सुचविले.आम्ही खाली उतरायला सुरुवात केली.मध्येच मी मागे वळून बघितले आणि मी दचकलो. एक भला मोठ नाग जातीचा साप गुहेत शिरत होता.सात ते आठ फूट लांब असलेल्या त्या नागाचे शरीर सोनं पिवळे होते उन्हात ते चकाकत होते. ..नजरही त्यावर टिकत नव्हती.साधारण अर्ध शरीर आत गेल्यावर ती विलक्षण घटना घडली आणि माझे धाबे दणाणले. त्या...त्या सापाच्या ठिकाणी एक विलक्षण सुंदर स्त्री उभी होती.तिच्या अंगावर लखलखते दागिने होते.कमरेला रत्नखचित कमरपट्टा होता. क्षण दोन क्षण तिने माझ्याकडे बघितले व नंतर कुत्सितपणे हसून ती गुहेत शिरली.तिच्या पाठीवर नाग किंवा नागीणीच्या पाठीवर असतात तसे जाड टिपके होते.     मी घामाने थबथबले होते छातीत धडधड होत होती. योगेश व महंतों आपल्याच धुंदीत चालत बरेच पुढे गेले होते. ही जागा व त्या गुहा सारेच रहस्यमयी होत. भयावह व ..गूढ रहस्ये इथे लपलेली असावीत. खूप जपून व सावधगिरीने काम करावं लागणार होत. तो बुटका माणूस...ही स्त्री...! कोण होती ती गूढ स्त्री....यक्षिणी..आसरा ...हडळ की एखादी नागीण...? या  परीसरात अद्भुत शक्ती वावरताहेत असं मला वाटलं.मी झपाझप पावले टाकत खाली उतरायला लागलो.आता मला मागे वळून बघियचीही हिंमत होत नव्हती.--------******------*****-------*****----बाळकृष्ण सखाराम राणे घटना काल्पनिक आहेत.त्याचा वास्तवाशी काहीही संबंध