स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काहीच खर वाटत नव्हतं...
"बर ऐक उद्या तू चल माझ्यासोबत, काय काम नाहीये बस एक conference attend करायची आहे मला, ते झाली की आपण थोडं फिरुया चालेल, म्हणजे तुला जरा बर वाटेल, Fresh feel होईल
ठीक आहे ना".... स्वरा जास्त काय बोलली नाही तिला माहीत होतं की समरला यासगळ्या वस्तूंवर विश्वास नाही
स्वरा रात्र भर झोपली नाही, ती मुलगी रात्र भर स्वरा समोर बघून हसत होती तर मधीच तिला ती बाई दिसत असे, स्वरा ची अवस्था खराब झाली होती,पण तिला समजणार अस सध्या कोण नव्हतं....
सकळ झाली समर स्वराला सोबत घेऊन गेला, स्वरा ऑफिस च्या अतितिथी कक्ष मध्ये बसली होती आणि समर conference मध्ये होता.....
★
स्वरा बागेत उभी होती, शांत वातावरण होता, तेव्हाच ती मुलगी स्वरा कडे आली.…..
"स्वरा ने तिला विचारलं काय हवं आहे तुला".... स्वरा
ती काहीच बोलली नाही बस एकटक स्वरा ला बघत होती आणि मग मागे फिरून चालायला लागली, स्वरा तिला मागून हाक मारत होती, "ऐ थांब.... कुठे जातेय, थांब".... पण त्या मुलीने काय ऐकलं नाही, स्वरा त्या मुलीच्या मागे मागे आली तिचा पाठलाग करत.....
ती मुलगी जंगलात एका जागेवर येऊन थांबली, तिथं गोल आकार मध्ये सगळीकडे मोठे मोठे झाडं होते आणि मधी एक छोट्या मैदानासारखी जागा होती, ती मुलगी तिथं बरोबर मडोमद येऊन थांबली, स्वरा पण तिथे त्या मुली समोर येऊन थांबली.....
"काय आहे हे.... मी तुला किती हाक मरते, कोण आहेस कोण तू , काय हवं आहे तुला".... स्वरा
तेव्हाच अचानक स्वराला पोटात खूप दुखायला लागलं, ती पॉट दाबून तिथंच बसली आणि अचानक तिला लहान बाळाचा रडण्याचा आवाज आला....
ती मुलगी जिथं थांबली होती, तिथं २ छोटे छोटे बाळ होते खाली जमिनीवर खूप जोरात रडत होते ते, जितकं त्यांचं रडण्याचा आवाज वाढत होता तितकाच जास्त स्वराला पोटात दुखत होतं....
हळूच ती मुलगी स्वराच्या जवळ आली आणि स्वराच्या चेहऱ्यावर तिने हाथ फिरवला, हाथ फिरवताच स्वराला दुखणं बंद झालं, स्वरा शांत झाली, ती हळूच उभी रहायली आणि बघते तर काय ती मुलगी अचानक तिच्या अंगावर धावत आली....
आणि स्वराचे डोळे उघडले, घामाघूम झाली होती स्वरा..... "नशीब स्वप्न होतं"....
स्वरा ने पाणी पिलं आणि शांत होऊन बसली, काही वेळा नंतर समर आला....
"सॉरी उशीर झालं, चल पटकन जाऊया"..... समर
स्वरा काहीच बोलली नाही बस्स एक सुरेख हसी देऊन ती उठली आणि दोघे पण तिथून निघाले, संध्याकाळ होणार होती समर तिला डोंगरावर सूर्यास्त दाखवण्यासाठी घेऊन आला....
स्वरा खूप खुश होती, अगदी मनमोहक नजरा होता, पांढऱ्या आकाशात कोणी केसर्या रंगाची शाही टाकल्यासारखं पूर्ण आकाश केसरी रंगाने शोभून दिसत होतं, दोघे पण बसून सूर्यास्त चा आनंद घेत होते....
थोडा वेळ बसून ते लोक तिथून निघाले, येताना समर ने बाजारात गाडी थांबवली आणि स्वरा साठी गजरा घेण्यासाठी उतरला...
"तू बस मी येतो".... म्हणत समर गेला आणि गाजर घेऊन परत आला
"काय झालं काय बोलत होता तो गजरावाला एवढं वेळ"..... स्वरा
"काही नाही ग, तेच ह्या गावच्या लोकांना काय सुचत नाही भूत वगैरे सोडून, मला म्हणतो की राव तुम्ही वाड्यात जाऊ नका तुमच्या भला साठी सांगतोय तिथं, सुवर्णा ताई ची आत्मा फिरतेय...... bloody nonsense, वाडा माझा आणि मलाच म्हणतो की जाऊ नको"..... समर
"समर पण तो काही तरी विचार करून बोलला असेल ना, असच का कोण आपल्या वाडा बदल उलट बोलेल".... स्वरा
"स्वरा तू पण ना यार आता परत सुरवात करू नकोस, ते लोक काहीही बदबडतात आणि तुला ते खरं वाटतं".... समर
"समर ही सुवरणा ताई कोण आहे"......??? स्वरा
"How do i know..... जा त्या गाजऱ्यावल्याला विचार, स्वरा तू पण ना आता मला कसं माहीत, मी पण आज पहिल्यांदाच नाव ऐकलं आहे".... समर
स्वराच्या डोक्यात सारखा तेच तेच विचार चालू होता आणि आता नाव ऐकल्यानंतर पासून तर तिला अजून भीती वाटत होती, समर पण ह्या वस्तू वर विचार करत होता, नेमकं गावात आल्यानंतर पासून त्याला बऱ्याच लोकांनी सावध केलं होतं, सुवर्णा हे नाव त्याने आधी पण ऐकलं होतं लोकांकडून, समर ला ही आता भीती वाटायला लागली, की जे काय स्वरा सांगते तिच्या सोबत झालं आणि हे जे गावचे बोलतायेत ते खरं नको निघायला....
रात्र झाली.... ९ सुमारे दोघे वाड्यात पोचले, श्रीधर आला होता....
"बाबा आले तुम्ही"..... समर
"हो मी तर आलो, कुठे फिरायला गेले होते का....???? छान छान".... श्रीधर
"हो बाबा असच जरा, ही पण जरा वैतागली होती बसून बसून, म्हणून म्हटलं जरा फिरून यावं".... समर
"बर चला जेवून घेऊया"... श्रीधर
गणुकाका ने जेवण वाढलं, जेवण करून स्वरा आणि समर बेडरूम मध्ये आले... आज काय समरला झोप लागत नव्हती, त्याला ही खात्री झाली होती की कायतरी गडबड आहे, वाड्याला घेऊन इतकी चर्चा, बाबांचं त्याला इथं येऊ न देणं.... समरला आता सगळं खटकत होतं, पण त्याने स्वराला काही सांगितलं नाही..... त्याला वाटत होतं की तिला जर काय सांगितलं तर ती अजून घाबरले
रात्रीचे २ वाजले होते, स्वरा निवांत झोपली होती, समरला पण झोप येत होती पण तो झोपत नव्हता त्याला नेमकं बघायचं होतं की काय होतं, पण शेवटी त्याचे डोळे बंद झाले आणि तो झोपला....
सगळं शांत होतं.... श्रीधर नेहमी प्रमाने बागेत फिरत होता, तेव्हाच तिथे गणूकाका आले....
"अरे गणू एवढं रात्री इथं काय करतोय, काय झालं".... श्रीधर
"राव तुम्हाला काय तरी सांगायचं होतं"..... काका
"हा बोल की"... श्रीधर
"राव, सुनबाई जेव्हा पासून आली आहे तेव्हापासून काय नीट वाटत नाहीये वाड्यात, आधीपेक्षा प्रकरण आता जास्त वाढले आहेत, मी माझ्या नजरेने पाहिलं आहे, त्यांचं सोबत काय तरी विचित्र घडतंय, लवकर काय तरी करा".... काका
"गणू , मला ही कळतंय, सुनबाई सध्या गरोदर आहे, काय करू कसं करू तेच सुचत नाहीये".... श्रीधर
"राव जे करायचं आहे ते लवकर करा नाहीतर खूप उशीर होऊन जाईल"... काका
श्रीधरराव ने यावर काय उत्तर दिलं नाही, गणू काका एवढं सांगून तिथून निघून गेले....
"सुनबाई गरोदर आहे तीच भीती आहे, २० वर्ष आधी "गायत्री" जस बोलली होती तसच होतंय, पण यावेळेस मी अस काय होऊदेणार नाही".... श्रीधर मनातच बोलला
सकाळ झाली, समर ऑफिसला निघून गेला, रात्री नीट झोप भेटली नाही या मुळे त्याला सारखी झोप येत होती... तेच समरला स्वराची काळजी वाटत होती म्हणून त्याने घरी फोन करून तिला विचारलं... पण सगळं ठीक होतं....
समर ने सुखाचा स्वाश घेतला आणि मग बसल्या बसल्या त्याला ऑफिस मध्येच झोप लागली..... जेव्हा त्याने डोळे उघडले त्याने काय वेगळच ड्रिष्य त्याच्या नजरेसमोर पाहिलं.....
त्याने पाहिलं की त्याची आई... म्हणजेच मालिनी खुडचिवर बसली आहे आणि ६ वर्षाचा समर मालिनी समोर बसला होता, हा तोच दिवस होता ज्या दिवशी मालिनीची मृत्यू झाली होती....
मालिनीचा डोळ्यात पाणी होतं.. "मला माहित आहे मी तुझ्यासोबत चुकीचं केलं, माफ कर मला".... मालिनी रडत रडत म्हणाली
"माफी पाहिजे"..... समर (बोलत मात्र समर होता पण समोरच्या आवाज वरून हे स्पष्ट कळत होतं की ते समर बोलत नाहीये त्याच्या अंगात जे काय होतं ते बोलत होते)
इतकं बोलून समर जोरात ओरडला..... "आईईईईईईईईई"....
तो आवाज इतका मोठा होता की त्या आवाजा मुळे मालिनीच्या कानाचे परदे फाटले, तिच्या कानातून रक्त यायला लागलं आणि तितच तिची मृत्यु झाली....
समर हे बघून घाबरला, काय करावं त्याला काहीच सुचत नव्हतं तो काय करेल त्या आधीच तिथं श्रीधर धावत आला...
श्रीधर ने बघितलं की मालिनी मेली आहे, समर त्याच्या समोर बघून हसत होता..... श्रीधरच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती, तेव्हाच समर बोलला....
"बाबा मी आईला मारून टाकलं"..... आणि जोर जोरात हसायला लागला
समर झटकन उठला, तो ऑफिस मध्ये होता, हे नेमकं स्वप्नं होतं की काय त्याला काहीच कळत नव्हतं, २० वर्षांमध्ये समर सोबत असं पहिल्यांदा झालं होतं...
समर ने गेल्या २० वर्षांमध्ये कधीच तिचा आईला स्वपण्यात पाहिलं नव्हतं आणि आज पाहिलं तर हे अस,समरला काहीच कळत नव्हतं.....
संध्याकाळी समर घरी आला, येताच त्याने स्वराला विचारलं...
"ठीक आहेस ना, आज काय झालं नाही ना"....???? समर
"नाही मी ठीक आहे, का काय झालं".... ???? स्वरा
"काय नाही.... सोड जेवण वाढ".... समर
रात्र झाली होती, स्वरा गार झोपेत होती पण आज काय समरला झोप लागत नव्हती तो सारखं आज जे त्याने बघितलं त्याचं विचार करत होता, समर बेड वरून उठला त्याने पाहिलं की स्वरा झोपली आहे शांत निवांत, तो हळूच बेडरूम च्या बाहेर गेला आणि बागेत आला...
बागेत त्याने पाहिलं की त्याचे बाबा बसले होते बाकड्यावर.... तो जाऊन त्यांच्या सोबत बसला तिथं....
" काय झालं बाबा झोपले नाही".... समर
"हो बाळा झोप लागत नाहीये".... श्रीधर
"बाबाकीती एवढ्या वर्षांत मला आठवतं आपण पहिल्यांदा अशे एकत्र बसलो आहोत"..... समर
हो बाळा, माहीत आहे मला पण, तू होता अमेरिकाला आणि मी इथं, मग करायचं तरी काय... आज वेळ आहे तर बस्स बसून गप्पा मारुया".... श्रीधर
"बाबा आज आईची खूप आठवण येत आहे".... समर
हे ऐकून श्रीधर शांत झाला, पण मग तो बोलला....
"काय नाय बाळा, आई नेहमी आपल्या सोबतच आहे".... श्रीधर
"बाबा एक विचारू का"...??? समर
"हा बाळा विचार ना".... श्रीधर
"बाबा आईला मी मारलं होतं ना"....??? समोरच्या डोळ्यातू पाणी आलं अस बोलताना
"म्हणून मला तुम्ही पटवून दिलंना इथून".... समर
श्रीधरला हे ऐकताच धक्का बसला, तो चक्क नजरेने समर कडे पाहायला लागला, समर च्या सगळ्या प्रश्नांचा त्याच्या कडे उत्तर होता पण त्याच्या कडे तेवडी हिम्मत नव्हती की तो समरला सांगू शकेल.....
------------------------------------------------------ To Be Continued --------------------------------------------------------------------