Rahashy - 2 in Marathi Horror Stories by Harshad Molishree books and stories PDF | रहस्य - 2

Featured Books
  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

  • ફરે તે ફરફરે - 66

    ફરે તે ફરફરે - ૬૬   માનિટ્યુ સ્પ્રીગ આમતો અલમોસામાં જ ગ...

  • ભાગવત રહસ્ય - 177

    ભાગવત રહસ્ય-૧૭૭   તે પછી સાતમા મન્વંતરમાં શ્રાદ્ધદેવ નામે મન...

  • કુંભ મેળો

    કુંભ પર્વ હિન્દુ ધર્મનો એક મહત્વપૂર્ણ પર્વ છે, જેમાં કરોડો શ...

Categories
Share

रहस्य - 2

सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, निदान दोन दिवस तिथं रहाऊन तो सोनू ला घेऊन परत त्याच्या घरी आला, हरीला घरी यायची अजिबात इच्छा नव्हती पण दुसरा काय मार्ग पण नव्हता....

सोनू ला घेऊन हरी घरी आला, रात्र झाली सोनू झोपली होती पण हरीला काय भीती मुळे झोप लागत नव्हती, तेव्हाच हरीला हसण्याचा आवाज ऐकू आला, हरीने पटकन सोनू ला उठवलं.....

"सोनू, सोनू उठ बघ हसण्याचा आवाज येतोय".... सोनू झोपेतून उठली
काय हरी झोपना.....

"अरे ऐ बाई उठणा बघ आपल्या बाहेरच्या खोलीतून हसण्याचा आवाज येतोय".... हरी

"कुठे काय हरी मला काहीच ऐकायला येत नाहीये"..... सोनू

"सोनू येतोय तू बघ ना एकदा".... सोनू रागात उठली आणि बाहेरच्या खोलीत गेली

"हरी बघ कुठे काय आवाज येतोय कोण नाहीये"....

"हरी हळू हळू सोनू जवळ आला.... हो कोणाचं नाहीये"....

सोनू हरी कडे रागात बघत होती, हरी सोनू ला काय तरी बोलायला जात होता तितक्यात सोनू बोलली....

"मी जातेय झोपायला आणि जर आता मला परत उठवलं ना तर मग इथं कोण हस्तय ते जाऊदे पण तू रडशील हे मात्र नक्की"....

"ते तर लग्न झाले तेव्हा पासून रडतोय".... हरी गालातल्या गालात बोलला

"काय...?? काय बोललास, देवा उचल मला"..... सोनू जाऊन झोपली
हरी पण बेडरूम मध्ये झोपायला जातच होता तितक्यात त्याला आवाज आला..... " हरी "

हरी आवाज ऐकताच घाबरला आणि धावत बेडरूम कडे पळाला पण बेडरूमचा दार बंद झाला....

हरी जोर जोरात सोनूला हाक मारत होता.....

"हरी कशाला एवढं ओरडतोय, तिला काहीच ऐकू जाणार नाही'..... स्वरा

"ऐ बघ ताई माफ कर मला, माझी आधीच जाम फाटते यार".... हरी

"हरी तुला मला बघून वाटतं का… ?? की मी तशी भूत आहे, तुझा जीव घेईन".... स्वरा

"हा म्हणजे नाही, तशी दिसायला टवका आहेस, म्हणजे चांगली आहेस पण आहेस तर भूत ना शेवटी".... हरी अगदी रडण्याचा पाळीवर आला होता

स्वरा एक मिनटासाठी हरी कडे चक्क नजरेने पाहत होती.....

"सोड टवका म्हटलास म्हणून thanks, पण बघ आता ऐक please माझा काम कर यार, त्यात तुझा पण फायदा आहे".... स्वरा

"मला एक सांग तू माझ्या मागे लागली आहेस ठीक आहे, माझं फायदा आहे पण त्यात तुझा काय फायदा आहे"..... हरी

स्वरा ने थोडा विचार केला मग बोलली..… "हरी ऐक बिल्डिंग च्या गच्चीवर चल मग मी तुला सगळं सांगते तिथं"....

"ऐ नाही, मी नाही येत कुठे"..... हरी नुसताच घाबरला

"ऐकना चल, please चल"....

हरी ऐकत नव्हता, तेव्हाच स्वरा जोरात ओरडली... "चल म्हटलं ना"...

"बर ठीक आहे, येतो पण बघ हां, तू भूत आहे तशी माझी बायको पण कमी नाही मला काय झालं ना तर ती तुला सोडणार नाही".....

"झालं, आता जाऊया"..... स्वरा

"देवा काय हे सगळे भूत भूतनी माझ्याच नशिबात का टाकलेस तू घरात एक ती बाई आणि एक ही बाई"..... हरी ला खूप भीती वाटत होती

हरी स्वरा सोबत गच्चीवर आलं.....

"बघ हरी आता मी जे काय सांगते ते नीट ऐक".....

"२ महिन्या आधीची गोस्ट आहे, माझी बहिण गायत्री खूप लाडकी आहे माझी, खूप मेहनतीने मी तिला शिकवलं आणि सगळं चांगलं चालू होतं, तेव्हाच तिला वन विभागात नौकरी लागली आणि तिला गुजरातच्या गीर या जंगलात कामासाठी जावं लागलं, सगळं चांगलं चालू होतं, ती मला तिथून पत्र पाठवायची आणि मी ही तिला पत्र पाठवत असे, पण एक दिवस".... "मला दुपारी तिचा पत्र भेटला, मी ते उघडून पाहताच होती तितक्यात मला नेण्यासाठी गाडी आली आणि मी ते पत्र बॅगेत ठेवला आणि गाडीत बसली"....

"गाडीत बसल्यावर मी तो कव्हर उघडला, त्यात एक नक्षा होता आणि सोबत एक पत्र".....

"ताई काय सांगू तुला आज मी काय बघितलं, इथं ना ताई खूप मोठा झोल चालू आहे आणि आज जेव्हा मी माझ्या टीम सोबत विश्लेषण साठी जंगलात फिरत होती ना तेव्हा आम्ही त्यांना बोलताना ऐकलं आता आम्ही ठरवलं आहे की उद्या जाऊन त्यांना हे काम करताना पकडू , ताई एक माहीत आहे का तुला जेवढं पैसांबदल हे लोक बोलत होते ना तितके पैसे जर चुकून भेटले ना मग आयुष्यभर काम करायची गरज नाही, मी ना तुला या पत्र सोबत एक नक्षा पाठवत आहे, असच बनवलं आहे मी ते ती जागा लक्षात ठेवण्यासाठी पुढे जेव्हा मी म्हातारी होईल ना तेव्हा परत येईल हा नक्षा घेऊन इथं खजाना शोदायला"....

"पत्र वाचून मी परत बॅगत ठेवला आणि इथं आली, साहिल माझी वाट पाहत होता, मी जेव्हा बाथरूम मध्ये गेली तेव्हाच साहिल ने माझ्या बॅगेतून तो पत्र काढला आणि वाचला आणि जेव्हा मी बाहेर निघत होती तेव्हा त्याने ते माझ्या भीतीने पत्र आणि तो नक्षा परत बॅगेत ठेवून दिलं".....

"मला बाहेर आल्यावर कळलं की त्याने माझी बॅगे चेक केली आहे, पण मी काय बोलली नाही त्याची ती नेहमी ची सवय होती, मी येऊन साहिल कडे बसली, वेळ निघून गेला नेहेमी प्रमाणे रात्र झाली आणि साहिल ने मला विचारलं"...

"स्वरा, गायत्री कुठे गेली आहे"....

"अरे ती वनविभागात काम करते ना मग गेलीय जंगलात, तिथं तितल्या प्राण्यांना वाचवण्यासाठी वगैरे भरपूर करताय ते लोक वरतून जंगलातून कुठले आयुर्वेदिक झाडं, वैगरे ते सगळं.... सोडना पण तू आज अचानक गायत्री बदल का विचारतोय"....

"कारण की मी तो पत्र वाचला आणि नक्षा पण बघितला"....

"साहिल तू".... ????

"बघ महत्वाचा हे आहे की, त्यात तिने लिहलं आहे पैसांबदल आणि मला ते पैसे हवे आहेत, स्वरा विचार कर तुझ्या बहिणीने तुला नक्षा का पाठवला कारण की आपण जाऊन तिथून ते पैसे आनु"...

"साहिल पण"...

पण काय यार विचार कर, परत तुला पण पैस्यांची गरज आहे, जर एकदा पैसे भेटले तर तुला पण हे असलं काम करायची गरज नाही.... Just think about it"....

"साहिलच बोलणं ऐकून मी थोडा विचार केला, पण शेवटी मी त्याला नाही म्हटलं पण साहिल ने माझ्यासोबत जबरदस्ती केली आणि आमची आपसात मुदभेड झाली त्यातच मी साहिलच्या डोक्यात काचेचा ग्लास मारला आणि तो बेशुद्ध पडला"....

"मी घाबरून तिथून धावत खाली आली आणि ड्राइवर ला फोन करून बोलावलं,पण माझं फुटक नशीब गाडीचं अकॅसिडेंट झालं आणि मी".....???

"पण एक चांगला होतं मला माहित होतं की साहिल आता काय मला सोडत नाही म्हणून मी निघायचं आधी तो नक्षा आणि पत्र तिथं वर माळ्यावर टाकून दिलं"....

"साहिल ला सकाळी कळलं की मी मेली, त्याने तो नक्षा शोधला पण त्याला ते भेटला नाही पण त्याला नेमकं माझ्या बहिणी बदल माहीत होतं, म्हणून त्याने तिथं त्याच्या माणसांना पाठवलं, हरी माझ्या बहिणीला त्याने कुठे तरी लपवून ठेवलं आहे तिथंच जंगलात कुठल्यातरी गुफा मध्ये, please माझी मदत कर"....

हरी ने सगळं शांत पणे ऐकून घेतलं मग तो बोलला.... "एक एक मिनट तू तर भूत आहेस मग तू स्वतः का वाचवत नाहीस तिला, म्हणजे तुझ्या बहिणीला"...

"हे जर शक्य झालं असतं तर मी केलं असत हरी, पण समाज please माझी मदत कर"....

"बघ आधी ना मी बायकोला विचारतो मग तुला सांगतो, पण मला एक सांग तुला घरात बोलायला काय अडत होतं, इतक्या रात्री मला तू इथं का आणलंस"....

"कारण की तुझ्या घरात कॅमेरे लागले आहेत"....

"काय कॅमेरे, माझ्या घरात... कोणी"...

"साहिल ने, तुला घर विकण्याआधी साहिल ने घर एका फॅमिली ला भाड्यावर दिलं होतं, मी तेव्हा ही त्या मुलासोबत बोलण्याचा प्रयत्न केलं होतं पण नेमकं तो घाबरून घर सोडून गेला..... साहिलला त्याने जाताना सगळं सांगितलं जे काय त्याच्या सोबत घडलं आणि साहिल ला खात्री झाली की परत जर कोण रहायला आलं तर मी परत असं करेन म्हणून त्यांनी तुला घर विकण्याआधी घरात सगळी कडे कॅमेरे लावले"....

"च्या मारी म्हणजे माझी बायको मला मारते ते पण रेकॉर्ड झाला असेल".... हरी

स्वरा रागात हरी कडे बघायला लागली.... "हरी काय बोलतोय तू, तेवढच नाही पण बरच काय रेकॉर्ड झालं असेल"....

"काय म्हणतेस तू , ह्याच्या आयला सोडणार नाही मी याला"... हरी

"हरी चुकून पण जर तू त्याला ह्या विषयात बोलला तर तो तुला आणि तुझ्या बायकोला मारून टाकले".... स्वरा

"ऐ मारून टाकेल म्हणजे हलवा आहे का"... ??? हरी घाबरत म्हणाला

"हो, त्याचासाठी मारणं हे हलवा आहे म्हणून बोलते मी जे सांगते ते कर'..... स्वरा

"अच्छा आणि जर मी नाही केलं तर".... हरी

"तर मग मी तुला मारून टाकले"... स्वरा

हरी हे ऐकताच स्वरा कडे भीतीने बघायला लागला, स्वरा अगदी रागात हरीला पाहत होती....

"देवा कुठे फसलो मी.... त्याला काय बोललो तर तो मारून टाकले आणि हिचं नाही ऐकलं तर ही मारून टाकले काय करू काय देवा".... हरी

हरी एकदम फसला होता, त्याला नेमकं सुचत नव्हतं की आता पुढे काय करावं.....

------------------------------------------------------- To Be Continued -------------------------------------------------------------------