Nikita raje Chitnis - 34 in Marathi Fiction Stories by Dilip Bhide books and stories PDF | निकिता राजे चिटणीस - भाग ३४

Featured Books
  • એઠો ગોળ

    એઠો ગોળ धेनुं धीराः सूनृतां वाचमाहुः, यथा धेनु सहस्त्रेषु वत...

  • પહેલી નજર નો પ્રેમ!!

    સવાર નો સમય! જે.કે. માર્ટસવાર નો સમય હોવા થી માર્ટ માં ગણતરી...

  • એક મર્ડર

    'ઓગણીસ તારીખે તારી અને આકાશની વચ્ચે રાણકી વાવમાં ઝઘડો થય...

  • વિશ્વનાં ખતરનાક આદમખોર

     આમ તો વિશ્વમાં સૌથી ખતરનાક પ્રાણી જો કોઇ હોય તો તે માનવી જ...

  • રડવું

             *“રડવુ પડે તો એક ઈશ્વર પાસે રડજો...             ”*જ...

Categories
Share

निकिता राजे चिटणीस - भाग ३४

 निकिता राजे  चिटणीस

पात्र  रचना

 

1.       अविनाश ͬचटणीस                         चंदन इंजीनीǐरंग चे मालक

2.       नीतीन चीटणीस           अविनाश चिटणीसांचा मुलगा

3.       निकीता चटणीस           नितीन ची बायको

4.       शशीकला ͬचटणीस          नीतीन ची आई

5.       रघुनाथ (मामा) राजे        निकीताचे मामा

6.       पार्वती ( मामी )राजे       निकीता ची मामी

7.       मुकुंद देशपांडे             अविनाश चिटणीसांचे मित्र

8.       अनंत दामले             मुकुंद देशपांड्यांचे शेजारी  

9.   चित्रा पालकर             निकीताची कॉलेज ची मैत्रीण

10.    विशाखा नाडकर्णी          निकीताची कॉलेज ची मैत्रीण

11.  दिनेश कळसकर           निकिता चा कॉलेज चा मित्र

12.  वसंत कुलकर्णी            निकिता चा कॉलेज चा मित्र

13.    कार्तिक साने             निकिता चा कॉलेज चा मित्र  

14.  रघुवीर                  अविनाशचा ड्रायव्हर

15.    पंडित                   नितीन चा ड्रायव्हर

16.    वाटवे मॅडम              चंदन इंजीनीǐरंग ची administrative manager

17.    अंजिकर सर              चंदन इंजीनीǐरंग चे administrative officer

18.    साखळकर सर            चंदन इंजीनीǐरंग चे astt. administrative officer

19.    पांडे सर                 चंदन इंजीनीǐरंग चे astt. administrative officer

20.    बबन                   चपराशी

21.    साटोरे                  बबन चे वडील.

22.    चोरघडे सर              चंदन इंजीनीǐरंग चे accounts officer

23.    वाघूळकर सर             चंदन इंजीनीǐरंग चे financial controller ͬ

24.  चिंतामण चिटणीस         अविनाश चिटणीसांचा भाऊ

25.    विमल                  चिंतामण चिटणीसांची  बायको

26.    निखिल                 चिंतामण चिटणीसांचा मुलगा

27.    शशांक दामले             चंदन इंजीनीǐरंग चे जनरल मॅनेजर.

28.    पाटील                  पोलिस इंस्पेक्टर

29.    परब                   सब इंस्पेक्टर

30.    गवळी                  कॉन्स्टेबल

31.    मळेकर                 पोलिस इंस्पेक्टर (पाटील साहेबांच्या जागी )

32.    देसाई                   आर्किटेक्ट

33.  सारंग                   काँट्रॅक्टर

 भाग ३४      

भाग ३३  वरून  पुढे  वाचा .........

इंस्पेक्टर मळेकर

“जेंव्हा फायनल झालं तेंव्हा मामा होते?”

“नाही साहेब ते त्याच्याही बरेच आधी वारले होते. त्यांचा मुलगाच मला भेटायचा.” – साटोरे.

“आता कुठे आहे तो?”

“साहेब आता बारा वर्ष झालीत. मी ही कधी चौकशी केली नाही, त्यामुळे त्याचा

आताचा ठाव ठिकाणा मला माहीत नाही.” – साटोरे.

“आणखी काय माहीती आहे तुम्हाला ?”

“सगळं सांगून झालं साहेब. आम्ही नोकर माणसं मालक जस सांगतील तसं वागणार, पण साहेब मी आणि माझ्या पोराने काही गुन्हा केला नाहीये साहेब.” – साटोरे.

“ठीक आहे जरूर पडली तर पुन्हा येऊ.”

पुण्याला यायला पहाटेचे चार वाजले.

लिहिणं झाल्यावर गवळी म्हणाले –

“साहेब, आता पुढचं पाउल काय?”

“गवळी आता आपल्याला सगळी माहिती मिळाली आहे. शशिकलाबाईच गुन्हेगार आहेत हे पक्क झालं आहे. पण मला सांगा गवळी, आपल्या जवळ ठोस प्रूफ काय आहे?”

“तसं म्हंटलं तर काहीच नाही.” – गवळी.

दुसऱ्या दिवशी मळेकर फाइल चालत होते आणि सगळा गोषवारा लिहीत होते. म्हणाले, “आत्ता सगळ्यांनी off the record माहिती दिली आहे. पण स्टेटमेंट घेतो म्हंटल तर त्यांचा वकील मध्ये येईल. आणि समजा दिलंही तरी कोर्टात ते फिरू शकतात. दबावाखाली लिहून घेतलं अस म्हणू शकतात.”

“साहेब दोघांनाही माफीचा साक्षीदार बनवलं तर?” – गवळी.

“हा एक मार्ग आहे. प्रयत्न करून बघू. पण या सगळ्या गोष्टिनी, फक्त एवढंच सिद्ध होतं, की शशिकलाबाईंनी बस्तर वरुन पार्सल मागवलं. त्यात  विष होतं हे कसं सिद्ध करणार. परत राधाबाईंचा भाऊ जर म्हणाला की बहिणीला गिफ्ट पाठवली होती. तर आपण काय करणार ? सगळ्यात महत्वाच हे आहे की शशिकलाबाईंनी खून केला आहे अस आपण म्हणतो. पण कसा ? त्याबद्दल तर आपण अजून अंधारातच आहोत. सगळा आधीचा तपास निकिताच्या भोवतीच फिरत होता पण तिचा, यात हात नाहीये हे सिद्ध झालं आहे. कार्तिकचाही काही संबंध आहे असं दिसत नाहीये.  शशिकलाबाईंना केंव्हा संधि मिळाली ते ही कळत नाहीये. वरतून नितीनचा खून झाला तेंव्हा तिघीही पुण्याच्या बाहेर होत्या. ऑफिस मध्ये असल्याने बबन सगळ्यांच्या डोळ्यासमोर होता. त्याचाही यात काही हात दिसत नाहीये.”

“मग आता?” – गवळी.

“जर शशिकलाबाईंनी कबुलीजबाब दिला, तर बाकीचे सुद्धा जे आपल्याला सांगितलं तेच कोर्टात सांगतील. आणि मगच त्यांना शिक्षा होऊ शकेल. मी आज SP साहेबांना update देतो. मग ते जस म्हणतील त्याप्रमाणे करू.”

संध्याकाळी मळेकर आल्यावर गवळींनी विचारलं

“काय झालं साहेब? काय म्हणाले मोठे साहेब? – गवळी.

“ते म्हणाले की कायद्या पेक्षा कोणीही मोठं नाही. सर्वांना कायदा समान आहे. सर्व सबूत गोळा करा आणि सावधगिरीने पावलं उचला. केस पक्की करून मगच charge sheet दाखल करा. डिपार्टमेंट वर ठपका येता कामा नये.”

“म्हणजे काय?” – गवळी.

“म्हणजे आधी ठोस सबूत गोळा करा. केस पक्की करा. मगच काय ते करा.”

“पण आपल्याजवळ तर काहीच नाही मग?” – गवळी.

“मग काय, आधी ठोस सबूत गोळा करा. केस पक्की करा. मगच काय ते करा.”

“साहेब, माफीचा साक्षीदार मिळवणं हा एकच मार्ग आहे. आपण आधी त्याचाच प्रयत्न करायचा का?” – गवळी.

“तेच करावं लागेल. पण गवळी जरा विचार करा, की बबन काय किंवा साटोरे काय, ह्या दोघांनाही शशिकलाबाई बद्दल कुठलाही राग नाहीये. उलट, त्यांच्या जगण्याचा तोच एक आधार आहे. आधीच चिटणीस कुटुंबानि जे उपकार करून ठेवले आहेत, त्यांच्या ओझ्या खाली ते दबून गेले आहेत. आणि अजूनही शशिकलाबाई त्यांना आयुष्याभरासाठी काहीतरी वचन देण्याची शक्यता आहे. बबन राधाबाईंचा मुलगा आहे हे कळल्यावर तर बबन आपलं ऐकण्यासाठी तयारच होणार नाही. त्याला राधाबाईंचे पांच टक्के शेअर्स मिळतील. कदाचित शशिकलाबाई अजूनही काही शेअर्स त्याला देतील. साटोऱ्यानां पण देतील. गवळी त्यांच्याकडे पैसा आहे आणि मुख्य म्हणजे हे सर्व लोक त्यांच्याशी भावनात्मक रीतीने जोडल्या गेले आहेत. त्यामुळे हे काम जमेल असं वाटत नाही. शशिकलाबाई हुशार आहेत. कदाचित गेल्या दोन दिवसांत त्यांनी ही सगळी सूत्र हलवली देखील असतील.”

“साहेब तुम्ही म्हणता आहात ते अगदी खरं आहे. सर्व आपल्याला माहीत असून, सर्व उलगडा झाला असूनही, आपल्या जवळ पुरावा म्हणता येईल अस आपल्या हातात काहीच नाहीये. फार अवघड वळणावर येऊन पोचलो आहोत आपण या प्रकरणात. मग आता काय करणार आहोत आपण?” – गवळी.

“काही नाही, शशिकलाबाईंचं काय म्हणण आहे ते बघू. चला. उद्या चिटणीस वाडा.”

दुसऱ्या दिवशी पुन्हा मळेकर आणि गवळी चिटणीस वाड्यावर. जाता जाता, गवळी म्हणाले

“साहेब, इतक्या सहजा सहजी शशिकलाबाई कबूल करतील असं वाटत तुम्हाला?”

“नाही. पण आपल्या जवळ त्यांना बोलतं करण्या शिवाय, काहीच पर्याय नाहीये. त्यांचं समाजातलं स्थान पहाता, त्यांना आत्ता तरी हात लावता येणार नाही. कुठलीही जबरदस्ती आपण करू शकत नाही.”

“कदाचित मोठे दामले साहेब पण तिथेच असण्याची शक्यता असू शकते.” – गवळी.

“नाही गवळी मला असं वाटत नाही कारण हे प्रकरण त्यांच्या अंगावर शेकणार याची त्यांना आता पर्यन्त कल्पना आलीच असणार. आणि हे निकीता पर्यन्त पोचू नये या दृष्टीने त्यांनी पूर्ण मोर्चेबंदी  केली असणार. अगदी नाईलाज झाला तरच त्या दामले साहेबांना involve करतील.”

“म्हणजे साहेब, आपण काहीच करू शकणार नाही?” – गवळी.

“बघूया, त्या आपल्या trap मधे अडके पर्यन्त आपल्याला जरा गोडी गुलाबीनेच घ्यावं लागणार आहे. शशिकलाबाई म्हणजे साटोरे  किंवा राधाबाई नव्हेत. त्यांच्यावर अॅक्शन घ्यायची झाली तर वरून approval घेतल्याशिवाय शक्य नाही. आणि approval साठी केस full proof असणं आवश्यक आहे. त्या स्वत:हून कोणाला फोन करतील असं वाटत नाही. पूर्ण आत्मविश्वास असलेली बाई आहे ती. ज्या क्षणी त्या चुकतील, त्या नंतर मैदान आपलं असणार आहे. I am waiting for that moment. Let us see.”

“म्हणजे बिना शस्त्रांची लढाई करायची आहे.” – गवळी.

“हो. असच म्हणायला हरकत नाही.”

चिटणीसांच्या घरांपाशी जीप थांबली. दार राधाबाईंनीच उघडलं.

“या इंस्पेक्टर साहेब या. शशिकला बाई म्हणाल्या. या या तुमचीच वाट पहात  होतो. चौकशी अपूर्ण राहिली होती त्या दिवशी. म्हणूनच आला आहात न?”

“हो. त्या दिवशी तुम्हाला बरंच बोलायचं होतं आणि आम्हाला पण बरेच प्रश्न पडले आहेत त्याचं स्पष्टीकरण हवं होतं. तर आता शशिकला मॅडम आता बोला, जे जे तुम्हाला माहीत आहे ते ते सर्व बोला. राधाबाई म्हणताहेत की त्यांना काहीच कल्पना नाहीये. तेंव्हा तुम्हालाच  सर्व माहिती असेल. कालच बबन ने आम्हाला सर्व उलगडा केला आहे. विष तुम्ही मागवलं, राधाबाईंनी नाही. तुमचा आणि मामांच्या मुलांचा काय व्यवहार झाला आहे हे सर्व आम्हाला कळलं आहे. गवळी स्वत:च जगदलपुरला जाऊन आलेत. मुलाला भेटून आले त्यामूळे आता लपवा छपवी करण्यात काही अर्थच नाही. जे जे प्लॅनिंग असेल ते ते बोलून टाका. अजून एक गोष्ट, आम्ही धुळ्याला पण जाऊन आलो आहोत. साटोर्‍यांनी आम्हाला तुमच्या आणि राधाबाईंच्या मामाच्या संबंधा बद्दल अगदी इत्थंभूत माहिती दिली आहे. आता फक्त तुम्ही अविनाश चा खून नेमका कसा केला आणि का केला ते सांगा.” मी जरा आवाजात करडे पणा आणूनच म्हंटलं.

“ठीक आहे. आता वेळ आलीच आहे तर सांगते.” – शशिकलाबाई.  

“राधाबाई, एखादा बॉक्स घेऊन या.” राधाबाईंनी बॉक्स आणल्यावर, शशिकलाबाई म्हणाल्या की

“तुमच्या खिशात जे काही असेल ते या बॉक्स मधे ठेवा.” आम्ही आमच्या वस्तु बॉक्स मधे ठेवल्या. शशिकलाबाई हुशार होत्या precaution म्हणून त्यांनी आमचे मोबाइल बॉक्स मधे ठेवायला सांगीतले आणि बॉक्स उचलून दूर डायनिंग टेबल वर ठेवला.

क्रमश:..

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com