Nikita raje Chitnis - 32 in Marathi Fiction Stories by Dilip Bhide books and stories PDF | निकिता राजे चिटणीस - भाग ३२

Featured Books
  • એઠો ગોળ

    એઠો ગોળ धेनुं धीराः सूनृतां वाचमाहुः, यथा धेनु सहस्त्रेषु वत...

  • પહેલી નજર નો પ્રેમ!!

    સવાર નો સમય! જે.કે. માર્ટસવાર નો સમય હોવા થી માર્ટ માં ગણતરી...

  • એક મર્ડર

    'ઓગણીસ તારીખે તારી અને આકાશની વચ્ચે રાણકી વાવમાં ઝઘડો થય...

  • વિશ્વનાં ખતરનાક આદમખોર

     આમ તો વિશ્વમાં સૌથી ખતરનાક પ્રાણી જો કોઇ હોય તો તે માનવી જ...

  • રડવું

             *“રડવુ પડે તો એક ઈશ્વર પાસે રડજો...             ”*જ...

Categories
Share

निकिता राजे चिटणीस - भाग ३२

  निकिता राजे  चिटणीस

पात्र  रचना

 

1.       अविनाश ͬचटणीस                         चंदन इंजीनीǐरंग चे मालक

2.       नीतीन चीटणीस           अविनाश चिटणीसांचा मुलगा

3.       निकीता चटणीस           नितीन ची बायको

4.       शशीकला ͬचटणीस          नीतीन ची आई

5.       रघुनाथ (मामा) राजे        निकीताचे मामा

6.       पार्वती ( मामी )राजे       निकीता ची मामी

7.       मुकुंद देशपांडे             अविनाश चिटणीसांचे मित्र

8.       अनंत दामले             मुकुंद देशपांड्यांचे शेजारी  

9.   चित्रा पालकर             निकीताची कॉलेज ची मैत्रीण

10.    विशाखा नाडकर्णी          निकीताची कॉलेज ची मैत्रीण

11.  दिनेश कळसकर           निकिता चा कॉलेज चा मित्र

12.  वसंत कुलकर्णी            निकिता चा कॉलेज चा मित्र

13.    कार्तिक साने             निकिता चा कॉलेज चा मित्र  

14.  रघुवीर                  अविनाशचा ड्रायव्हर

15.    पंडित                   नितीन चा ड्रायव्हर

16.    वाटवे मॅडम              चंदन इंजीनीǐरंग ची administrative manager

17.    अंजिकर सर              चंदन इंजीनीǐरंग चे administrative officer

18.    साखळकर सर            चंदन इंजीनीǐरंग चे astt. administrative officer

19.    पांडे सर                 चंदन इंजीनीǐरंग चे astt. administrative officer

20.    बबन                   चपराशी

21.    साटोरे                  बबन चे वडील.

22.    चोरघडे सर              चंदन इंजीनीǐरंग चे accounts officer

23.    वाघूळकर सर             चंदन इंजीनीǐरंग चे financial controller ͬ

24.  चिंतामण चिटणीस         अविनाश चिटणीसांचा भाऊ

25.    विमल                  चिंतामण चिटणीसांची  बायको

26.    निखिल                 चिंतामण चिटणीसांचा मुलगा

27.    शशांक दामले             चंदन इंजीनीǐरंग चे जनरल मॅनेजर.

28.    पाटील                  पोलिस इंस्पेक्टर

29.    परब                   सब इंस्पेक्टर

30.    गवळी                  कॉन्स्टेबल

31.    मळेकर                 पोलिस इंस्पेक्टर (पाटील साहेबांच्या जागी )

32.    देसाई                   आर्किटेक्ट

33.  सारंग                   काँट्रॅक्टर

भाग ३२      

भाग ३१ वरून  पुढे  वाचा .........

इंस्पेक्टर मळेकर

१४ तारखेला गवळी हात हलवत आले.

“काय गवळी काय झालं? तुम्ही एकटेच?”

“साहेब, राधाबाई यायला तयार होत्या पण शशिकलिबाईंनी त्यांना रोकलं. म्हणाल्या की कालच आम्ही आलो आहोत, आमचं वय झालं आहे, थकलो आहोत त्यामुळे  २-४ दिवसांनी येऊ.” – गवळी.

“मोठे दामले साहेब होते तिथे?”

“नाही. त्या दोघीच  होत्या.” – गवळी.

“चला त्यांना घरीच interrogate करू.”

दार राधाबाईंनीच उघडलं.

“मी इंस्पेक्टर मळेकर आणि हे गवळी. आम्हाला काही चौकशी करायची आहे. तुम्ही सहकार्य कराल अशी अपेक्षा आहे.”

“बसा तुम्ही. कशाची चौकशी करायची आहे तुम्हाला?” शशिकलाबाईंनी विचारलं.

“अविनाश आणि नितीन च्या खूनाची.”

“आत्ता इतक्या वर्षांनंतर काय चौकशी करणार तुम्ही? आम्हाला तर वाटलं की खूनी सापडत नाही म्हणून फाइल बंद झाली.” – शशिकलाबाई.

“मॅडम फाइल अशी बंद होत नाही. फाइल का बंद झाली त्या प्रत्येक गोष्टीच

justification द्यावं  लागतं. तेच करण्यासाठी आलो आहोत. ती उत्तरं,

समाधान कारक मिळाली की फाइल बंद होईल. मग विचारू?”

“विचारा.” – शशिकलाबाई.  

“प्रथम राधाबाईंना विचारतो. तुम्ही मध्ये बोलू नका त्यांनाच बोलू द्या.”

“हं राधाबाई, तुमचा मुलगा कुठे असतो?”

“तुम्हाला कोणी सांगितलं की मला मुलगा आहे म्हणून? मला मूलबाळ नाही. हीच तर खंत आहे. मुलगा असता  तर त्याच्याकडे राहिली नसती का?”

शशिकलाबाई मध्येच बोलल्या की “अहो असले विचित्र प्रश्न विचारून तुम्ही त्यांच्या दु:खात भर घालता आहात. राधाबाई, असल्या प्रश्नांची उत्तरं देऊ नका.”

“शशिकलाबाई तुम्ही मध्ये बोलू नका. तुम्हाला पण आम्हाला बरंच काही विचारायचं आहे तेंव्हा त्या वेळी बोला. आता यांना बोलू द्या.”

“आमच्या माहिती नुसार, तुमचा मुलगा इथेच पुण्यात असतो. राधाबाई तुमचा मुलगा इथेच पुण्यात असतांना तुम्ही त्याच्याकडे का राहत नाही?”

“अहो आत्ताच सांगितलं ना की मला मूलबाळ नाही म्हणून.” – राधाबाई.

“रायगडला जेंव्हा तुमचं बाळंतपण झालं तेंव्हा तुमच्याबरोबर कोण होत?”

“अहो, माझं लग्नच झालं नाही मग बाळंतपणाचा प्रश्नच येत  नाही तुम्हाला कोणी तरी चुकीची माहिती दिली.” – राधाबाई.

“आमच्या जवळ रायगड च्या दवाखान्याचं लिखित मध्ये पत्र आहे की तुमचं बाळंतपण तिथेच झालं आणि तुमच्या बरोबर धुळ्याहून आलेलं साटोरे कुटुंब होत. आमचे हे गवळी, तुमच्या मामेभावाला बस्तर मधे जाऊन भेटले आणि तुमच्या मामे भावाने पण याची पुष्टि केली आहे. आता बोला.”

राधाबाईंचा चेहरा पडला. शशिकलाबाईंची अवस्था पण काही वेगळी नव्हती.

“बबन साटोरे तुमचाच मुलगा आहे हे तुम्हाला माहीत होत. हे तुम्ही लोकां पासून का लपवलं?”

राधाबाई रडायलाच लागल्या.

शशिकलाबाई मधेच बोलल्या

“साहेब, राधाबाईंना मुलगा आहे किंवा नाही याच्याशी खूनाच्या चौकशीचा काय संबंध आहे? मला कळत नाही की तुम्ही त्यांच्या वर्मावर बोट ठेऊन त्यांना उगाच त्रास का देता आहात. आणि मुळात गुन्हेगारांची चौकशी करायचं सोडून आमचीच चौकशी चालवली आहे. हा काय प्रकार आहे.?”

“शशिकलाबाई तुम्ही मध्ये बोलू नका अस मी सांगितलं होतं. तुम्हाला जर हे मान्य नसेल तर आम्ही राधाबाईंना दुसऱ्या खोलीत नेतो. आणि ते ही मान्य नसेल तर महिला पोलिस बोलावून, ठाण्यावर घेऊन जाऊ. आम्हाला, तुम्हाला त्रास द्यायचा नाहीये पण जर तुम्ही सहकार्य करणार नसाल तर आम्हाला दुसरे मार्ग चोखाळावे लागतील. Choice is yours.” मी जरा जरबेनेच बोललो. त्याचा परिणाम झाला. शशिकला आणि  राधाबाईंनी माझ्या स्वरातली धार ओळखली.

“ठीक आहे मी नाही बोलणार.” – शशिकलाबाई.

“हं. राधाबाई आता रडणं थांबवा आणि माझ्या प्रश्नांची, चटाचट आणि खरीखुरी उत्तरं द्या. एकाच प्रश्नावर तास तास घालवायला आमच्या जवळ वेळ नाहीये.”

“काय सांगू साहेब माझी कहाणी, शशिताईंनी बहिणीची माया दिली नसती तर मला जीवच द्यावा लागला असता. अविनाशने तर,  मला ओळखायचंच नाकारलं होतं. मग मामा आलेत. मामा, अविनाश आणि शशिताईंचं काय बोलण झालं ते मला माहीत नाही. पण मग सर्व सुरळीत झालं. त्यांनीच साटोरे कुटुंबांला बबन ची देखभाल करायला सांगितलं. धंदा काढायला भरपूर पैसे दिलेत आणि नंतर बबन मोठा झाल्यावर  कंपनीत नोकरी दिली.” – राधाबाई.

“तुम्ही मामांना विष मागीतलं होत?”

“हो साहेब फार निराश झाले होते मी. विष खाऊन जीव देणार होते. पण मग मामा आले आणि सगळं ठीकठाक करून गेले, मग त्या नंतर विषाचं काही कारणच उरलं नाही.” – राधाबाई.

मी डोळ्यांच्या कोपऱ्यातून शशिकलाबाइन्कडे पहात होतो. त्या पूर्णपणे हांदरल्या होत्या.

“तुम्ही बबनची आई आहात हे बबनला माहीत आहे?”

“नाही साहेब.” – राधाबाई.

“अस कस शक्य आहे? खोटं बोलू नका. आमच्या  जवळ सर्व माहिती आहे. पण तुमच्या कडून ते ऐकायचं आहे. बोला त्याला तुमचं नातं, माहीत असलंच पाहिजे. त्याशिवायच का त्यानी एवढी धोका दायक कामगिरी अंगावर घेतली?”

“कसला धोका, कसली कामगिरी? मला काहीच कळत नाहीये, तुम्ही काय बोलताहात ते. माझं आणि त्याचं बोलणं सुद्धा होत नाही मग मी त्याला काम कस सांगणार ?” राधाबाई म्हणाल्या.

“राधाबाई आता खोटं बोलून काही उपयोग नाही. आम्हाला सगळं माहीत आहे. तो तुमचा मुलगा आहे म्हणूनच तो जगदलपुर वरुन विष आणायला तयार झाला. त्यानी विष आणलं म्हणूनच तुम्ही तुमचा कार्यभाग साधू शकलात. बबन चा पण यात सक्रिय सहभाग दिसतो आहे. तुम्ही आणि तो दोघांनाही जन्मभर खडी फोडायला पाठवू. राधाबाई आता सरळ सगळी कबुली द्या.”

“काय बोलता आहात साहेब, हे सर्व खोटं आहे. मला या बाबतीत काहीच कल्पना नाहीये. शशी ताई तुम्ही तरी काही बोला ना.” राधाबाई आता रडकुंडीला आल्या होत्या.

नेमका, तेव्हडयात मोबाइल वाजला. आमचा एक शिपाई बोलत होता. हायवे वर टँकर उलटा झाला आहे आणि ट्राफिक जाम झाला आहे. टँकर मधून डीजल गळते आहे आणि परिस्थिति चिघळते आहे. मी म्हंटलं

“आत्ता तर आम्हाला लगेच निघायला हवं पण आम्ही उद्या येऊ. तुम्ही तयारीत रहा. चला गवळी हायवे वर.”

त्या दिवशी स्थिति नियंत्रणात आणायला बरीच रात्र झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी मी गवळींना म्हंटलं की बबनला बोलाऊन घ्या. आधी त्याच्याशी बोलू आणि मग राधाबाईंशी.

“साहेब तुम्हाला खरंच अस वाटतंय की राधाबाईच दोषी असाव्यात म्हणून?” -गवळी.

“नाही, दोघीही असाव्यात. किंवा कदाचित कोणीतरी एक. पण बबन काय म्हणतो ते बघू आधी. बबन आल्यावर आधी त्याला तोडा मगच त्यांच्याशी बोलू.”

दोन तासांनी गवळी सांगत आले. “साहेब बबन बोलायला तयार आहे.”

बबन आल्यावर, मी सूत्र आपल्या हातात घेतली. “बबन तू कंपनी मध्ये नोकरीला कसा लागला?”

“साहेब माझे वडील सरांकडेच कामाला होते त्यामुळे बाबांनी सरांना सांगितल्यावर मला लगेचच ही नोकरी मिळाली.” – बबन  

“तू तुझ्या वडीलांचा व्यवसाय का सांभाळत नाहीस ?”

“मला ते जमणार नाही  म्हणून.” – बबन.

“तू अस काय काम करतोस की तुला तुझे सर ३०००० रुपये कॅश देत होते?”

“माहीत नाही. मला अस वाटतं की सगळ्यांनाच देत असावेत. माझा मित्र म्हणतो की टॅक्स वाचवण्यासाठी ते असं करत असावेत.” – बबन  

“तुझ्या मित्राला पण मिळतात?”

“नाही साहेब.” – बबन  

“का?”

“माहीत नाही.” – बबन  

“तुला जगदलपुरला कोणी पाठवलं?”

..

“सोमनाथ इथेच आहे. तू बोलला नाहीस तर तो बोलेल. सोमनाथ ....”

“नको नको साहेब, सांगतो.”

“कोणी पाठवलं तुला, राधाबाईंनी?”

“राधाबाई कशाला पाठवतील ? त्या सरांच्याकडे बरीच वर्ष कामाला आहेत. माझी आणि त्यांची फक्त ओळख आहे. त्या मला का काम सांगतील? मला मॅडम नी पाठवलं.” – बबन.

“कशाला?”

“त्यांना एक छोटसं पार्सल आणायचं होतं म्हणून. ते आणलं.” – बबन.

“ज्यांच्या कडून आणलं तो कोण माणूस होता? नाव, पत्ता?”

“माहीत नाही साहेब.” बबन बोलला. जगदलपुरला जाणाऱ्या बस मध्येच तो माणूस होता, मला पार्सल दिलं आणि पुढच्या फाट्यावर उतरून गेला. बस मला एवढंच माहिती आहे.”

“त्यानी तुला बरोबर कसं ओळखलं? आधी तुझी आणि त्यांची भेट केंव्हा झाली होती?”

“कधीच नाही. मी त्या माणसाला पूर्वी कधीच पाहीलं नव्हत.” – बबन.  

“मग एका अनोळखी माणसाकडून तू पार्सल कसं घेतलं, गवळी, तुम्ही घ्याल?”

“नाही. साहेब. नक्कीच नाही.” – गवळी.

“बघ. असं काय झालं की न बोलता त्यांच्याकडून तू पार्सल घेतलं? कोण होता तो. तुला नक्कीच माहिती आहे. बऱ्या बोलाने बोल. सोमनाथ इथेच आहे.”

“खरं सांगतो साहेब मी त्याला ओळखत नाही. त्यांनीच मला विचारलं की माझं नाव बबन साटोरे आहे का? मी मान डोलावली. मग तो म्हणाला शशिकला चिटणीस बाईंना द्यायचं पार्सल त्याच्या जवळ आहे, आणि ते त्यांनी मला दिलं. मग तो पुढच्या फाट्यावर उतरून गेला. त्याच्या जवळ माझा फोटो होता साहेब. त्यावरूनच त्यांनी मला ओळखलं.” – बबन.

क्रमश:..

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com