Pahil Prem aani Anubhav - 2 in Marathi Love Stories by Monika Suryavanshi books and stories PDF | पहिल प्रेम आणि अनुभव - 2

Featured Books
  • आखेट महल - 19

    उन्नीस   यह सूचना मिलते ही सारे शहर में हर्ष की लहर दौड़...

  • अपराध ही अपराध - भाग 22

    अध्याय 22   “क्या बोल रहे हैं?” “जिसक...

  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

Categories
Share

पहिल प्रेम आणि अनुभव - 2

भेटायच ठरवल मी शेवटी आणि ती पहिली भेट माझी ही आणि त्याची पण,भेटताना खुप मनात आल नकारात्मक विचार पण तरी भेटायच ठरवल.घरात कधी खोट न बोलणारी मी खोट बोली.पण ते म्हणतात प्रेमात खोट बोलण चालत.त्याच्या गाडीवर बसली दोघे ही शांत फोन वर खुप बोलायचो पण भेटल्यावर गप होतो.त्याने एका मंदिरात गाडी थांबवली आत गेलो भोटो काढले.तिथुण बोलण चालु झाल. माझ्यापासुन लाब जरा बसुण खुप बोलत होता तेव्हा मला समजल सगळीच मुल सारखी नसतात.मला त्याचा स्वभाव खुप आवढला.मन मोकळेपणा आणि खरे पणा जास्त आवढला.नंतर त्याने मला घरी सोडल.

मनात एकच विचार चागला आहे मुलगा मग लग्न कराव.सगळ चागल चाल‌ होत बोलत होतो मन जुळत होती.काही बोलायच्याआधी त्याला समजायच मी काय बोलणार आहे एवढ मन जूळल होत.पण किती दिवस हे अस चागल राहणार ना प्रेमात तिसरी व्यक्ती आली कि नांत तुटत किवा मग घरातल्यामुळे...

आमच्यात तिसर नाही आल पण घरातली आली.घरात समजल जवळ राहत असल्यामुळे लगेच गावात ही समजल.घरातली खुप बोली मला आणि त्याला मारायची धमक्कि ही दिली.मला समजत नव्हत मुलगा व्यसण करत नाही,कोणत्या मुली कडे बघत नाही,नोकरी ही आहे मग का नाही आवढला.नंतर मला समजल का नाही म्हणत्यात सगळ चागल होत पण जात मधी आली.

ही का जात आहे रक्त तर सगळ्याच ही एकच आहे मग का ? अजून‌ही जात आहे पळून झाऊ शकत नाही घरतल्याची इज्जत झाइल काय कराव समजत नव्हत.घरातली कि प्रेम काय निवढाव.पण नंतर विचार केला घरातली आपल्याला लहाणपण पासुन सभाळलय त्याच्यासाठी एवढ तरी कराव.आणि त्याला ही समजवल पण त्याला हे समजण खूप अवघड जात होत. त्याच रडण सहम होत नव्हत पण पर्याही नव्हता.

दोघाचही पहिल प्रेम ते ही 7 वर्षाच विसरण अवघड झाल होत सवय खुप वाईट गोष्ठ आहे.कस ह़ोणार होत आमच समजत नव्हत पण बोलण थांबल होत.एवढ्या सगळ्या आठवणी विसरण अवघढ होत.जीव द्यावा एवढा विचार चाला होता पण घरातली समोर यायची.कसे कसे दिवस घालवयाचे चाले होते.

का घरातली समजुण घेत नाहीत.ज्याच प्रेम त्याला का भेटत नाही.त्याच्या मुळे मी खुप काही शिकली.कवीता करु लागली,अभ्यास करु लागली ती व्यक्ती गेली पण मला चांगली व्यक्ती करुण गेली.रोज आठवण यायची पण काय करायच समजत नव्हत.सगळ्याच असच असत का? प्रेम करण पाप असत का? देवाला रोज बोलायची त्याला आनंदात ठेव पण तो माझ्याशिवाय असेल का? 

प्रेम विसरण खुप अवघड असत तेव्हा समज.अस वाटत होत उगच प्रेम केल.पण काय तसच दिवस ढकलत होती.समोर राहयचा तो त्यामुळे पुण्यातुन आला कि दिसायचा.दोघे ही बघायचो आणि नजर चोरायचो डोळ्यात आलेल पाणी लपवायचो.

असेच दिवस गेले आणि पुढे अजूण एक सकट आल.‌ते म्हणजे लग्न त्याचाही घरातली बघत होती आणि माझ्याही पण बोलण थांबल होत तरी दोघेही लग्न करत नव्हतो.मनात एक असतना लग्न दुसरी कडे करण अवघढ जात होत

शेवटी त्याच्या घराच्यानी त्याला मुलगी पाहायला नेहलच.मला हे समजताच सुचण बंद झाल पण तो नव्याने आयुष्य चालु करेल असा विचार करायची,आनंदात बघण हे ही प्रेम असत ना...

राधा कृष्णानी कस केल असेल पण ते शेवटी देव त्याना पुढच्या जन्मात भेटेल पण आपल...पुढचा जन्म भेटला तरी ती व्यक्ती असेल तेव्हा कोणी बघितलय.प्रेमात माणुस होशार होतो पण खुप काही गोष्टी समजतात. Mature होतो पण प्रेम भेटला तर नाहीतर जिवत पणी मरण दिसत.त्या व्यक्ती ला दुसऱ्यां सोबत बघण कठीण असत.पण काही गोष्टी अपुर्ण च असतात.आणि त्रास ही त्याच गोष्टी देतात.जे होत ते चागल्यासाठी अस म्हणला तरी मन काही एकत नाही.आधी वाटयच काय माणस प्रेमात मरतात पण जेव्हा प्रेम करतो तेव्हा समजत एक‌ व्यक्ती नसली कि सगळ आयुष्य अपुर्ण असत.तो जिथे असेल तिथे खुश असावा एवढच वाटत.

प्रेम करताना विचार करून कराव.जर भेटणार असेल तरच कराव कारण माणुस जवळ नसला तरी आठवणी जवळ असतात.