Nikita raje Chitnis - 29 in Marathi Fiction Stories by Dilip Bhide books and stories PDF | निकिता राजे चिटणीस - भाग २९

Featured Books
  • You Are My Choice - 41

    श्रेया अपने दोनो हाथों से आकाश का हाथ कसके पकड़कर सो रही थी।...

  • Podcast mein Comedy

    1.       Carryminati podcastकैरी     तो कैसे है आप लोग चलो श...

  • जिंदगी के रंग हजार - 16

    कोई न कोई ऐसा ही कारनामा करता रहता था।और अटक लड़ाई मोल लेना उ...

  • I Hate Love - 7

     जानवी की भी अब उठ कर वहां से जाने की हिम्मत नहीं हो रही थी,...

  • मोमल : डायरी की गहराई - 48

    पिछले भाग में हम ने देखा कि लूना के कातिल पिता का किसी ने बह...

Categories
Share

निकिता राजे चिटणीस - भाग २९

निकिता राजे  चिटणीस

पात्र  रचना

 

1.       अविनाश ͬचटणीस                         चंदन इंजीनीǐरंग चे मालक

2.       नीतीन चीटणीस           अविनाश चिटणीसांचा मुलगा

3.       निकीता चटणीस           नितीन ची बायको

4.       शशीकला ͬचटणीस          नीतीन ची आई

5.       रघुनाथ (मामा) राजे        निकीताचे मामा

6.       पार्वती ( मामी )राजे       निकीता ची मामी

7.       मुकुंद देशपांडे             अविनाश चिटणीसांचे मित्र

8.       अनंत दामले             मुकुंद देशपांड्यांचे शेजारी  

9.   चित्रा पालकर             निकीताची कॉलेज ची मैत्रीण

10.    विशाखा नाडकर्णी          निकीताची कॉलेज ची मैत्रीण

11.  दिनेश कळसकर           निकिता चा कॉलेज चा मित्र

12.  वसंत कुलकर्णी            निकिता चा कॉलेज चा मित्र

13.    कार्तिक साने             निकिता चा कॉलेज चा मित्र  

14.  रघुवीर                  अविनाशचा ड्रायव्हर

15.    पंडित                   नितीन चा ड्रायव्हर

16.    वाटवे मॅडम              चंदन इंजीनीǐरंग ची administrative manager

17.    अंजिकर सर              चंदन इंजीनीǐरंग चे administrative officer

18.    साखळकर सर            चंदन इंजीनीǐरंग चे astt. administrative officer

19.    पांडे सर                 चंदन इंजीनीǐरंग चे astt. administrative officer

20.    बबन                   चपराशी

21.    साटोरे                  बबन चे वडील.

22.    चोरघडे सर              चंदन इंजीनीǐरंग चे accounts officer

23.    वाघूळकर सर             चंदन इंजीनीǐरंग चे financial controller ͬ

24.  चिंतामण चिटणीस         अविनाश चिटणीसांचा भाऊ

25.    विमल                  चिंतामण चिटणीसांची  बायको

26.    निखिल                 चिंतामण चिटणीसांचा मुलगा

27.    शशांक दामले             चंदन इंजीनीǐरंग चे जनरल मॅनेजर.

28.    पाटील                  पोलिस इंस्पेक्टर

29.    परब                   सब इंस्पेक्टर

30.    गवळी                  कॉन्स्टेबल

31.    मळेकर                 पोलिस इंस्पेक्टर (पाटील साहेबांच्या जागी )

32.    देसाई                   आर्किटेक्ट

33.  सारंग                   काँट्रॅक्टर

 भाग  २९   

भाग २८ वरून  पुढे  वाचा .........

इंस्पेक्टर मळेकर

नको असलेल्या बातम्या, नेहमी संध्याकाळी घरी जाण्याच्या वेळेसच का येतात हे एक कोडच आहे. त्या दिवशी पण तसंच झाल. एका माणसाचा रस्त्यावरच मृत्यू झाला होता. आम्ही लगेच घटना स्थळी. आमचा एक शिपाई तिथे गर्दीला कंट्रोल करत होता. आम्हाला पाहून त्यांनी गर्दीला हटवायला सुरवात केली. मयत माणूस कचरा वेचणारा दिसत होता. त्याच्या जवळ पडलेल्या पोत्यांवरून ते कळत होत. तपासताना अस दिसलं की त्यांच्या शर्टाच्या खिशात injection ची syringe होती आणि सुई छातीत घुसली होती. आता काय समजायचे अपघात की हत्या. शेवटी आकस्मिक  मृत्यू म्हणून नोंद करायला सांगितलं आणि बॉडी पोस्ट माऱ्टेमला पाठवून दिली. सहकाऱ्यांना सांगितलं की आजू बाजूला आणि इतर कचरे वेचणाऱ्यांना हा फोटो दाखवा आणि बघा यांची ओळख पटते का.

दुसऱ्या दिवशी संध्याकाळ पर्यन्त मयताची ओळख पटली होती. तो कचरा वेचणाराच होता आणि त्यांच्या झोपडीत त्यांची लहान मुलगी, जेमतेम ७ , ८ वर्षांची असेल ती एकटीच होती. आईचा पत्ताच नव्हता. तिला बाल सुधार गृहात पोचवलं. आणि झोपडीची कसून झडती घ्यायला सांगितली. काही धागा  दोरा मिळाला तर बघा, असं सांगितलं.

६ दिवसांनी रीपोर्ट आला. मृत्यूच कारण विष बाधा अस दिल होत पण ती हत्या नव्हती. सिरींज खिशात घेऊन चालला असतांना बहुधा ठेच लागून पडला असावा आणि छातीत सुई घुसली. असा रीपोर्ट मिळाला. आता प्रश्न उभा राहिला की इंजेक्शन का गोळा केल या माणसांनी, ते विषारी आहे हे त्याला माहीत असण्याची शक्यताच नव्हती. कदाचित मुलीला खेळण्यासाठी घेऊन जात असेल. विचारांती मला हेच कारण पटलं.

दुसऱ्या दिवशी गवळीच माझ्याकडे आले. म्हणाले साहेब १० वर्षांपूर्वी अशीच एक चिटणीस डबल मर्डर केस झाली होती. दोन वर्ष तपास चालू होता पण त्याचा काहीच सुगावा लागला नाही. त्यामुळे फाइल क्लोज केली आहे. मी म्हंटलं की कोणाची केस होती ती, त्या केस ची फाइल काढा. 

दुसऱ्या दिवशी गवळीच माझ्याकडे आले. म्हणाले “साहेब १० वर्षांपूर्वी अशीच चिटणीस डबल मर्डर केस झाली होती. दोन तीन वर्षं तपास चालू होता पण त्याचा काहीच सुगावा लागला नाही. त्यामुळे फाइल क्लोज केली आहे.” मी म्हंटलं की “कोणाची केस होती ती, त्या केस ची फाइल काढा.” 

फाइल वाचून झाल्यावर थोडा विचार केल्यावर मी गावळींना म्हंटलं की “कचरा डेपो मध्ये कचरा कुठून कुठून येतो ह्याची विचारपुस करा. आणि मला ताबडतोब रीपोर्ट द्या. त्या दिवशी सुद्धा हा कचरा कुठून आला होता ते बघा. निघा आत्ताच.” दुपारी गवळी आले.

“साहेब डेपोवर कचरा ४ ठिकाणांवरुन येतो.  ही एरिया ची नाव.” – गवळी

“गवळी, यातल्याच एका एरिया मध्ये चिटणीसांच घर येत. बरोबर?”

“होय साहेब. मग आता पुढची अॅक्शन? चिटणीस बाईंना भेटायच ?” – गवळी.

“नाही नाही, ते सगळं पाटील साहेब करून चुकले आहेत. चिटणीस पिता पुत्रांना मारून कोणाचा फायदा होणार होता हे बघावं लागेल. निकितावर रिसर्च होऊन गेला आहे. आणि हातात काही लागल नाहीये. तरी सुद्धा शशिकलाबाई, राधाबाई  आणि निकिता यांच्या बद्दल जितकी मिळेल तितकी माहिती शोधून काढावी लागेल. गवळी याच कामाला लागा तुम्ही. पूर्वेतीहास खणून काढा. कदाचित काही धागे दोरे मिळतील.”

“ठीक आहे साहेब.” – गवळी.

दोन हप्त्या नंतर गवळी आले.

“काय गवळी बराच वेळ घेतला.”

“साहेब बराच काळ मागे जाऊन माहिती काढायची होती म्हणून वेळ लागला. पण बरीच माहिती गोळा झाली आहे.”- गवळी.

“बरं. मग सांगा सविस्तर आता.”

“साहेब कारखाना शशिकला बाईंच्या वडीलांचा. त्यांच्या कडे चिटणीस कामाला होते. तिथेच त्यांच लग्न झाल. करखानीसांचा मृत्यू झाल्यानंतर कंपनीची पूर्ण मालकी शशिकलाबाईंचीच होती. त्यांनीच नंतर अर्धे शेअर्स चिटणीसांच्या नावे केलेत. त्यानंतर चिटणीसच सर्व कारभार पाहत होते. शशिकलाबाईंनी कधी ढवळाढवळ केली नाही. ती थेट त्यांच्या मृत्यूपर्यंत. ते गेल्यावर नितीनची अवस्था फार वाईट होती म्हणून त्या आणि निकिता दोघी कारभारात लक्ष घालू लागल्या. नितीन पुन्हा जॉइन झाल्यावर त्या पुन्हा दूर झाल्या. नितीनच्या मृत्यूच्या नंतर दोघी पुन्हा कंपनीत आल्या. मग निकिता आणि त्यांचा मॅनेजर शशांक दामले यांच लग्न झाल आणि त्यांनी आपल्या शेअर पैकी ४० टक्के त्याला लग्नाची भेट म्हणून दिले. आता दामलेच सर्व कारभार पाहतात. आणि आता त्या आणि राधाबाई  दोघी भारत भ्रमण यात्रेला गेल्या आहेत. आत्ता दोघीही पुण्यात नाहीत.” गवळींनी सविस्तर आपल्या तपासणीचा अहवाल दिला.

“अच्छा. राधाबाई विषयी काय माहिती मिळाली ?”

“राधाबाई त्यांच्या आई बरोबर कऱ्हाड ला राहत होती. त्यांची आई एका कपड्यांच्या दुकानात काम करायची. राधाबाई कॉलेज शिकली. B.A. झाली आणि एका ऑफिस मध्ये लागली. राधाबाई ची आई संध्याकाळी कॉलेज च्या पोरांसाठी छोटेखानी खानावळ चालवायची. चिटणीस तिथे जेवायला जायचे. दिसायला नाकी डोळी नीटस राधाबाई आणि स्मार्ट चिटणीस यांच लवकरच सूत जमलं. त्यांच्या लग्नाच्या आणा भाका पण झाल्या होत्या. राधाबाईंना चिटणीसांपासून दिवस पण गेले होते. डिग्री घेतल्यावर चिटणीस पुण्याला आले आणि शशिकलाबाईंशी लग्न करून मोकळे झाले.” गवळींनी राधाबाई विषयी काय माहिती मिळाली ते सांगितलं.

गवळींनी थोडे टिपणं लिहिलेले कागद चाळले आणि, पुढे म्हणाले  “राधाबाईंच्या मुलाचं काय झाल ते मात्र कळलं नाही. कारण तिच्या आईनी तिला आपल्या भावाकडे बस्तर मधे पाठवून दिल. राधाबाईंनी  बाळाला जन्म दिला की अबॉरशन  ते कळलं नाही. राधाबाईंची आई आदिवासी, दूर छत्तीसगड मध्ये जगदलपुर जवळ त्यांच गणगोत होत. नाग सापाशी खेळणारी, त्यांची जमात आहे. त्यांच्यामध्ये लग्न न करता वर्ष दोन वर्ष बरोबर राहून मग पटलं, तर लग्न करतात. त्यांनी आपल्या भावाला बोलावून घेतल. तो भाऊ आणि चिटणीसांमद्धे काय ठरलं हे कळू शकलं नाही पण तेंव्हा पासून राधाबाई त्यांच्याकडे राहायला आल्यात. त्यांच्या जमातीत कोणालाच आक्षेप नव्हता. शशिकलाबाईंनी त्यांना अगदी बहिणीचा दर्जा दिला. पण त्या चिटणीसांची बायको कधीच बनू शकल्या नाहीत. त्या स्वयंपाकीण म्हणूनच वावरल्या.”

“निकिता विषयी काही भर पडली नाही . फक्त एकच की दामल्यांचे वडील माजी पोलिस कमिश्नर अनंत दामले आहेत. पण दामले आणि चिटणीसांची ओळख नितीनच्या लग्नानंतर झाली.” गवळींनी पूर्ण रीपोर्ट दिला.  

“गवळी, जरा चौकशी करा की चिटणीसांच्या घरून काही जुना पुराणा कचरा त्या दिवशी फेकल्या गेला होता का?” 2-3  तासांनंतर गवळी आले.

“साहेब चिटणीसाचं घर renovation ला काढल आहे. त्यामुळे जूनं पानं  निरूपयोगी सामानाची विल्हेवाट लावली असेल. त्या दिवशी बरंच रद्दी सामान आणि कचरा फेकला होता असं कळलं.” गवळी म्हणाले.  

“आणि त्याच्यातच इंजेक्शन पण असू शकेल. म्हणजे अस बघा गवळी, पोस्ट मार्टेम रीपोर्ट मधे एक गोष्ट अशी आहे की जी आताच्या संदर्भावरून वेगळाच इशारा करते. हे पहा यात लिहिल आहे की ग्लुकोमिटर ची सुई दोनदा टोचल्या गेली. हे त्या वेळेस नॉर्मल वाटल असेल पण कालच्या घटने वरुन असा निष्कर्ष निघू शकतो की दुसरी सुई इंजेक्शनची पण असू शकते.”

“म्हणजे साहेब, तुमचा असा अंदाज आहे, की कोणी तरी विषाचं इंजेक्शन दिलं चिटणीसांना?” – गवळी

“हो. आणि हे राधाबाई, शशिकलाबाई आणि निकिता यांच्या शिवाय इतर कोणाला शक्य नव्हत. किंवा आपण असंही म्हणू शकतो की यांनाच फक्त शक्य होत. कारण घरात हेच तिघं होते.”

“पण साहेब त्या वेळेला आम्ही जो काही तपास केला आणि त्याच नोटिंग पण फायलीमद्धे आहे. शशिकला आणि अविनाश चा संसार अत्यंत सुरळीत चालू होता. कुठेही वाद विवाद किंवा भांडणं झाल्याचं कोणीही सांगितलं नाही. शेजारच्या पाजारच्या सर्व लोकांची अगदी कसून चौकशी केली आहे साहेब. राधाबाई विषयी सुद्धा सर्वांच अतिशय चांगलं मत होतं. निकिता बद्दल तर सगळ्यांना कौतुकच होत साहेब. हे सर्व फाइल मध्ये आहे साहेब. मग हे लोक का अविनाश चा खून करतील? त्यांचा काय फायदा असणार आहे?” गवळी आता विचारात पडले होते.

“हेच तर शोधून काढायच आहे गवळी. एक शक्यता अशी असू शकते की डोक्यावर एक सवत जन्मभर आणून बसवली म्हणून शशिकलाबाई अविनाशला मारायला उद्युक्त झाल्या. त्यांनी कुठूनतरी जालीम विष  मिळवलं आणि कार्यभाग साधला. निकिताशी संगनमत करून कार्तिक कडून ते मिळवलं असण्याची संभावना पण नाकारता येत नाही. त्यासाठी कॉलेजला भेट द्यायला हवी.”

क्रमश:..

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com  

जर माझं लेखन आवडलं असेल तर जरूर शेअर करा, फॉलो करा.