Pashchaataap - 1 in Marathi Women Focused by Ankush Shingade books and stories PDF | पश्चाताप - भाग 1

Featured Books
  • आखेट महल - 19

    उन्नीस   यह सूचना मिलते ही सारे शहर में हर्ष की लहर दौड़...

  • अपराध ही अपराध - भाग 22

    अध्याय 22   “क्या बोल रहे हैं?” “जिसक...

  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

Categories
Share

पश्चाताप - भाग 1

पश्चाताप या पुस्तकाविषयी

'पश्चाताप' ही माझी सत्यान्नववी पुस्तक. एका कादंबरीच्या रुपानं ही पुस्तक वाचक वर्गापर्यंत पोहोचवतांना तेवढा आनंद नाही. कारण ही पुस्तक पाहिजे त्या प्रमाणात सरस बनली नसेल, असं मला वाटतं. त्याचं कारण म्हणजे माझा तो एक मित्र. मी त्याला फोन करुन यातील कथानक सांगीतलं. त्यावर तो म्हणाला,
"मित्रा, यातील कथानक हे तेवढंच भारदस्त दिसत नाही." त्यानंतर मी त्याला विचारलं,
"त्याचं कारण म्हणजे याचं कथानक हे सर्वसामान्य आहे. या कथानकातून कोणताच बोध होत नाही. यातील कथानक सर्वसामान्य आहेत. ज्या कथानकाची माहिती सर्वांनाच आहे. नवीन विचारही नाही व कथानकही नाही."
ते त्याचं बोलणं. परंतु ते बोलणं मला जरी वाईट वाटत असलं तरी मी ही पुस्तक बाजारात आणण्याचा मोह टाळू शकलो नाही. कारण पुस्तक ते पुस्तक असतं. ते आपलं बाळच असतं. आपलं बाळ जसं वाईटही असलं तरी त्याचेवर आपण प्रेम करतो. तेच मला माझ्या पुस्तकाच्या बाबतीत वाटलं व ते मी बाजारात उपलब्ध करुन दिलं. आता आपण वाचक या नात्यानं विचाराल की यातील कथानक काय? तर ते मी सांगणार नाही. त्याचं कारण तुमचं वाचन. कदाचीत मी कथानक सांगीतलं तर तुम्ही ही पुस्तक वाचणारच नाही. म्हणूनच मिही सांगत नाही. मात्र एक विनंती करेल की आपल्याला ही पुस्तक आवडलीच तर एक फोन अवश्य कराल. जर आवडली नाही तर कृपया फोन करुन माझ्या वाईट वाटण्यावर पुन्हा मीठ चोळू नये म्हणजे झालं.
आपला नम्र
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०

पश्चाताप (कादंबरी)
अंकुश शिंगाडे

ती पश्चाताप करीत होती आता. कारण तिच्यावर बेतलं होतं काल वागण्याचा परिणामानं. काल ती अल्लड वागली होती नव्हे तर तिला अल्लड वागणं तिच्या आईनंच शिकवलं होतं. ज्याच्या परिणामानं ती अल्लड वागणं शिकली होती. ज्याचा त्रास तिला तिच्या पुढील भविष्यात झाला होता.
रुपाली तिचं नाव. लोकं तिला प्रेमानं रुपाच म्हणत. रुपा लहान होती तेव्हा तिच्यावर संस्कार करणारी तिची आई, ती लहान होती. परंतु ती एकुलती एक असल्यानं व लाडाची असल्यानं त्या आईनं तिला काहीच म्हटलं नाही. ती जशी करेल, तसंच तिला करु दिलं. परंतु तिला किंचीतही टाकलं नाही वा एखादी चापटही मारली नाही. उलट ती आई तिला लहानपणापासून तोकडे कपडे घेवून द्यायची. ज्यात ती सुंदर दिसत नसली तरी तिला तिची आई, सुंदर दिसते असंच म्हणायची. हळूहळू याची सवय रुपाला जडली व ती लहानाची मोठी झाली.
रुपा लहानाची मोठी झाली होती. तिला कळत होतं काय वाईट व काय बरोबर. तरीही ती आपला पोशाख आपलं वागणं सुधरवीत नव्हती. त्यातच ती तरुण झाल्यानं सुडौल व अधिकच सुंदर दिसत होती. मग जसं एखाद्या झाडावर फुल येतं. ते आकर्षक दिसतं. त्यातच ते फुल तोडायला कोणीही हात पुढं करतो वा एखादा भुंगा जसा फुलांवर बसतो आणि तसं बसत असतांना त्या फुलावर बसण्यासाठी अनेक भुंगे जसे फुलांभोवती घिरट्या घालत असतात. तसंच तिच्या जीवनाचं झालं. ती तरुण झाली. परंतु ती आपल्या तरुणपणाची जबाबदारी विसरली होती. विसरली होती ती तरुणपणातील कर्तव्य. ते आपल्या आईला पोषणं. तिची म्हातारपणात काळजी घेणं. जिनं तिला आज लहानाचं मोठं केलं होतं. तिचं करीअर बनवलं होतं.
रुपाली भारतीय होती व ती भारतीय वातावरणात वाढली होती. परंतु भारतीय संस्कार शिकली नव्हती. त्याचं कारण होतं तिचं मित्रमंडळ आणि तिची आई. तसं पाहिल्यास तिच्या आईनंच तिच्यावर संस्कार टाकलेले नव्हते. ती तर नेहमी म्हणत असे की मुलीचा विवाह झाल्यानंतर ती आपल्या घरी आपल्या मनानं वागू शकत नाही. म्हणूनच तिला आपल्या घरी खुल्ल्या मनानं वागू द्यावं.
रुपाली तरुण झाली होती व तिला आताही कळत नव्हतं की आपण भारतीय आहोत. त्यातच भारताचे संस्कार हे तोकडे कपडे वापरायला लावणारे संस्कार नाहीत. असं तिला वाटत होतं. परंतु तिची आई तिला तोकडे कपडे घालून देई. त्यामुळंच तिला तिच्या आईचा भयंकर राग येत असे. यातूनच गुन्हे घडतात. असंही तिला वाटत असे.
अलिकडील काळात लैंगिक घटनात वाढ होतांना दिसत आहे. नागपूरातीलच एका पोलीस स्टेशनची घटना. सदर घटनेत एका ऑटोचालकानं एका शाळेत जाणाऱ्या मुलीला चक्कं धमकी दिली की मी तुझ्यासोबत कलकत्त्यासारखं अमानवी कृत्य करीन. सदर घटनेवरून हे दिसून येते की आज मुली सुरक्षीत नाहीत. कलकत्याला अशीच घटना घडली होती की ज्या घटनेत एका डॉक्टर मुलीवर तेथीलच एका कर्मचाऱ्यानं बलात्कार केला होता. शिवाय तिला चित्रविद्रूप करुन मारुनही टाकलं होतं. ती ओरडू नये म्हणून तिच्या तोंडात बोळे टाकले होते. शिवाय तिची थॉयराईड ग्रंथीही कापून टाकली होती. तशीच दुसरी घटना. बदलापूर नावाच्या एका गावची अशीच घटना. त्या घटनेत आपल्या आईला एका लहान कमीतकमी चार वर्षाच्या मुलीनं म्हटलं की आई मला लघवीच्या जागेवर मुंग्या चावल्यासारखं वाटतंय. त्यानंतर आईनं त्या भागाची तपासणी केली. तपासणी दरम्यान आढळून आलं की त्या शाळेत असाही एक व्यक्ती होता की ज्यानं तिच्या अजाणतेपणाचा फायदा घेवून तिला छळलं. अमानुष अत्याचार केला. तो व्यक्ती एका राजकीय पक्षाशी संबंधीत होता. ज्यानं छळ केला तरी त्याला तत्कालीन सरकारनं काहीही केलेलं नव्हतं.
अशा बऱ्याच घटना घडत असतात परीसरात. आज गुन्ह्यांना कोणीच घाबरत नाहीत असे दिसते. कारण चांगली माणसं विनाकारण आज गुन्हेगार बनवली जातात आणि चोर असे रस्त्यारस्त्यावर मोकाट फिरत असतात. त्यामुळं अशा अमानवीय घटना. या अमानवीय घटनांवर ब्रेक लावता येवू शकतो काय? होय. काही अंशी ब्रेक नक्कीच लावता येवू शकतो. त्याचं उत्तर आहे तक्रार पेट्या लावणे.
तक्रार पेटी. तक्रार पेटी ही प्रत्येक शाळेत असावी. तशीच ती प्रत्येक कार्यालयातही असावी. ती रस्त्यारस्त्यावर असावी. जशी स्वच्छता करायची झाल्यास कचराकुंड्या जशा असतात तशी. स्वच्छता करतांना कचरा हा कुंडीत टाकून ठेवला जातो व परीसर स्वच्छ राखला जातो. तशीच तक्रार पेटी जर रस्त्यारस्त्यावर, शाळेत वा कार्यालयात असेल तर नक्कीच त्यात असलेल्या सुचनांवर कारवाई होत गेल्यानं नक्कीच जनमत सुधरेल व गुन्हेगारी पाश्वभुमीचे विचार ठेवणाऱ्या वा बाळगणाऱ्या मनाची स्वच्छता होईल. मात्र तक्रार ज्या व्यक्तीसमुदायाची करायची असेल, त्याचे काही पुरावे तक्रार पेटीत अर्ज टाकण्यापुर्वी आपल्याजवळ असावे. कारण तसे पुरावे आपण देवू शकत नसाल तर त्या तक्रारीला काहीच अर्थ नसतो.
तक्रार अर्ज टाकण्यापुर्वी आपल्याजवळ पुरावे का असावेत? कोणी तक्रार करतांना पुरावे कसे काय बाळगणार? हा आपल्या मनात त्यासोबत तक्रार पेटीत अर्ज टाकतांना एक संभ्रमाचा प्रश्न निर्माण होवू शकतो. परंतु त्याचं उत्तर म्हणजे आजच्या काळात कोणीही कोणाला आपसी वादावर बदला घेण्यासाठी तक्रार पेटीत तक्रार जाणूनबुजून टाकू शकतात. ज्यातून चांगला सुस्वभावी व्यक्तीही गुन्हेगार ठरु शकतो. यासाठी पुरावे असणे गरजेचे आहे. शिवाय कोणी कोणी तर विनाकारणच तक्रार पेटीत तक्रार अर्ज टाकू शकतो. तसं पाहिल्यास काही किरकोळ स्वरुपाचे अर्ज हे तक्रार पेटीत टाकल्यावर त्याची शहानिशा व्हावी व तक्रार खोटी आढळून आल्यास तक्रार करणाऱ्यावरही कारवाई व्हावी. जेणेकरुन कोणीही पुराव्याशिवाय अर्ज तक्रार पेटीत टाकणार नाही.
शाळेत पत्रपेटी असावी? प्रश्न मोठा संभ्रमाचा आहे व सर्वांनाच आश्चर्यात टाकणारा आहे. त्याचं कारण असं की आजच्या काळात शाळेत घडत असणाऱ्या घटना. शाळेत विद्यार्थ्यांसोबत कोणता मुलगा कसा वागतो. कोणता शिक्षक कसा वागतो. कोणती शिक्षीका कशी वागते. तसाच कोणता शिक्षक आपल्या शाळेतील शिक्षीकेसोबत कसा वागतो? संस्थाचालक आपल्या शाळेतील शिक्षिकेसोबत कसा वागतो? हे पाहण्यासाठी शाळेत तक्रार पेटी असावी व ती उघडण्याचा अधिकार हा केवळ मुख्याध्यापक वा शालेय प्रशासनाला नसावा तर त्याची समिती असावी. ज्या समितीसमोर ती तक्रार पेटी उघडली जावी. ज्या समितीत जि. प. चे अधिकारी, मुख्याध्यापक, पालक, वस्तीतील गणमान्य नागरीक, पोलीस कर्मचारी असावे. त्या सर्वांसमक्ष ती तक्रार पेटी उघडली जावी. जेणेकरुन त्यात दोषी असलेल्या व्यक्ती किंवा मुलांवर तो जर गंभीर गुन्हा असेल तर कारवाई करता येईल. असं जर झालं तर शाळेत घडणाऱ्या लैंगिक छळाच्या घटना कमी करता येतील.
कार्यालयात असलेल्या तक्रार पेट्या उघडतांना त्याचीही तक्रार पेटी असावी. त्याठिकाणीही तक्रार पेटी उघडतांना समिती असावी. ज्या समितीत कार्यालय प्रशासन प्रमुख, एखादा पोलीस कर्मचारी, ते कार्यालय ज्या परीसरात आहे. त्या परिसरातील एखादा गणमान्य नागरीक, एखादा सामान्य कार्यालय कर्मचारी असे पदाधिकारी असावे.
रस्त्यारस्त्यावरही तक्रार पेटी असावी व ती तक्रार पेटी उघडण्याचा अधिकार हा केवळ पोलिसांनाच असावा. तो इतरांना नसावा. शिवाय पोलिसांनी त्या तक्रार पेटीत असलेल्या तक्रारीवर विचार करुन शहानिशा करुन घ्यावी. जर ती तक्रार योग्य वाटत असेल तर कारवाई देखील करावी.
पुरावे कसे गोळा करावेत. अलिकडील काळात पुरावे गोळा करणे अतिशय सोपे आहे. त्या व्यक्तीचे एखाद्यावेळेस लपून छपून व्हिडिओ रेकॉर्डिंग करता येते वा फोटोही काढता येतो. परंतु आजच्या काळात जी काही बलात्काराची प्रकरणं घडतात. त्या प्रकरणात असे आढळून आले आहे की सदरच्या कृतीचा पुरावा घटना घडण्यापुर्वी गोळा करता येत नाही. अचानकच कोणी येतो व बलात्कार करुन जातो. तसं पाहिल्यास बऱ्याच घटनेत मात्र बलात्कार करणारी व्यक्ती ही उमेदवाराच्या मागावर असते हे दिसून येते. तसं आढळूनही येतं. तरीही उमेदवाराला त्याची प्रत्यक्ष तक्रार करता येत नाही. कारण तक्रार पेट्या नसतात व भीती वाटते. जर तक्रार पेट्या असतील व पुरावेही नसतील तरी उमेदवार तक्रार पेटीत तक्रार करु शकतो.
महत्वाचं सांगायचं झाल्यास तक्रार पेटी ही स्वच्छतेच्या पेटीसारखी जागोजागी असावीच. कारण समाजातील बलात्कार पीडीत मनातील कुविचारांची स्वच्छता करावयाची आहे. ती जर असेल तर शंभर प्रतिशत नाही, परंतु जास्तीत जास्त टक्केवारीनं स्वच्छता करु शकतो. त्यासाठी शासनानं प्रत्येक चौकाचौकात, शाळेत, कार्यालयात टपालपेटीसारखी तक्रारपेटीही लावणे गरजेचे आहे. अन् खर्चच करायचा असेल तर लाडकी बहिण योजनेवर खर्च न करता अशा तक्रार पेट्या लावून स्री सुरक्षा करण्यावर खर्च करावा. जेणेकरुन महिलांची सुरक्षा होईल व प्रत्येक महिला देशात, गावागावात, शहराशहरात सुरक्षीत होईल हे तेवढंच खरं.
रुपालीला मुली सुरक्षीत वाटत नव्हत्या. त्यामुळंच तिला वाटत होतं की स्रियांची जर सुरक्षा करायची असेल तर तक्रार पेटी शाळेत असावी. जेणेकरुन त्यात आपली तक्रार टाकता येईल व त्यातून आपल्याला न्याय मिळू शकेल.
आज कलियुग आहे व या कलियुगात गुन्ह्याचे प्रमाण वाढत चाललेले आहेत. त्यातच बलात्काराचेही प्रमाण वाढत चाललेले आहेत. ज्यातून दिसून येत आहे की स्री ही सुरक्षीत नाही.
आज स्री समानतेच्या गोष्टी करणाऱ्या समाजानं स्रियांच्या बाबतीत समानता आणली. स्री इतरत्र वावरु लागली. अंतराळातही गेली. संधी मिळताच ती आपल्या कर्तबगारीनं मोठमोठी कार्य करु लागली. जशी पुर्वी करीत होती. तरीही अलिकडील काळात घडत असलेल्या बलात्काराच्या घटना पाहून असं वाटू लागलंय की स्री आज सुरक्षीत नाही.
स्री ही कालही सुरक्षीत नव्हती. कालच्या युगात स्रियांना तिचा पती मरण पावल्यानंतर नाना तऱ्हेच्या यातना भोगाव्या लागत. त्याही काळात घरची जवळच्या नात्यातील मंडळी, मग तो दीर वा भासरा का असेना, त्या स्रीवर बलात्कार करीत असे आणि त्याची वाच्यताही करता येत नसे. अशी वाच्यता केल्यास तिलाच कुलथा म्हणत घरातून हाकलून दिलं जाई. त्यानंतर ती समाजाचं भक्ष बनत असे व तिच्यावर समाज जेव्हा म्हणेल, तेव्हा बलात्कार करीत सुटत असे. त्याला कोणीच व्यक्ती विरोध करु शकत नव्हता. त्यामुळंच अशी स्री तिचा पती मरण पावताच आपल्याच परीवारातील आपल्या दीर वा भासऱ्याकडून होणारा बलात्काररुपी अत्याचार सहन करीत असे. अगदी निगरगट्ट होवून, नाईलाजानं. काही स्रिया यातही स्वाभिमानी होत्या. त्यांना त्या भासऱ्याकडून वा दिराकडून वा समाजाकडून होणार असलेल्या बलात्काररुपी अत्याचाराची कल्पना असायची. त्यामुळं त्या सती जात असत व त्या पतीच्या शरणावर स्वतः जळत असतांना शरणावरच्या अतीतीव्र यातना सहन करीत असत. ज्या यातना तिला त्या बऱ्या वाटायच्या. परंतु जीवंत राहून होणार असणाऱ्या संभाव्य बलात्काराच्या यातना तिला बऱ्याच वाटायच्या नाहीत. म्हणूनच सतीप्रथा जीवंत होती. ज्यात एक स्री ही स्वतःच्या इच्छेनं सती जाणं पसंत करायची. मात्र कधीकधी अपवादात्मक काही प्रकरणे घडत असतात. ज्यात त्या स्रिया सती जाणं पसंत नसतांनाही जाणूनबुजून जबरदस्तीनं सती दिलं जाई. ती हिंसाच होती, मानवदेहाची होत असलेली.
स्री ही सुरक्षीत नव्हतीच लहानपणापासूनच. ती नऊ वर्षाची झालीच तर तिचा विवाह केला जात असे. ज्याला बालविवाह म्हणत. या काळात अगदी खेळण्याचं वय असतांना तिला सासरी नांदायला जावं लागायचं. ज्यात एखादी सासू खास्ट भेटलीच तर तिच्यावर होणाऱ्या अत्याचाराला पारावार नसायचा. त्यातच केशवेपण आणा इतर बर्‍याच गोष्टी स्रियांचा अत्याचार करणाऱ्या होत्या. तसं पाहिल्यास त्या काळात युद्धात एखादा राजा हरल्यास विजयी झालेल्या राज्यांची प्रजा अर्थात मंत्री वा सैनिक हरलेल्या त्या राज्यातील इतर स्रियांवरच बलात्कार करीत असत. मात्र ते बलात्कार तेवढ्या प्रमाणात भयानक नसायचे. जसे आज भयानक स्वरुपात होतांना दिसत आहेत. आज तर बलात्काराचे प्रमाण वाढलेच आहे. व्यतिरीक्त त्याचे स्वरुपही वेगळे आहे. आज बलात्कार झाल्यानंतर एकतर तो माहीत होवू नये, म्हणून संबधीत स्रिलाच मारुन फेकलं जातं. गुप्तांग कापले जातात. चेहरा ओळखू येवू नये म्हणून विद्रूप केला जातो. उदा. द्यायचं झाल्यास कलकत्यातील प्रकरणाचं देता येईल. ती बोलू नये म्हणून तिची थॉयराईड ग्रंथीही तोडण्यात आली.
आज स्री सुरक्षीत नाही. कारण आज स्वतःचा बापच आपल्या मुलींवर वाईट नजर टाकतो. त्याला आपली मुलगीही ओळखू येत नाही. स्वतः जन्मास घातलेली. एवढी हैवानियतता आज लोकांमध्ये शिरली आहे. तिथं समाज तर वेगळाच. नागपूरातील एका प्रकरणात त्या रिक्षाचालकाला चार मुली असूनही त्यानं शाळेत जाणाऱ्या मुलीला कामवासनेची मागणी केली आणि ती जर तयार नसेल तर तिची गत कलकत्ता प्रकरणासारखी करायची धमकीही दिली. एवढी हैवानियतता शिरली आहे आज पुरुषात. आज शाळा असो की कार्यालय, आम रस्ता असो की कोणताही परीसर. स्रिया सुरक्षीत असल्याचं भासत नाही.
स्री सुरक्षितता व्हावी. तो एक ऐरणीचा प्रश्न आहे. त्या अनुषंगानं काही गोष्टी आपल्याला कळणे आवश्यक आहे. त्या गोष्टी प्रत्येक स्त्रीने लक्षात घ्याव्यात. त्या लक्षात घेणे गरजेचे आहे. जर आपल्याला तशी बाब आढळून आली व वाटलं की आपण सुरक्षीत नाही. अशावेळेस पोलिसांचा असलेला खुफीया क्रमांक एकशे बारा डायल करावा किंवा एक हजार एक्यान्नव क्रमांक डायल करावा. जेणेकरुन पोलीस मित्र आपल्याला मदत करतील व आपली सुरक्षा होईल व तसा फोन लावणंही आपल्यासाठी एक पुरावा होईल. या घटनेत पोलिसांनीही निष्क्रिय राहू नये. जेणेकरुन स्त्रियांची सुरक्षितता होणार नाही. तसाच दुसरा फोन आपल्या आई वा वडीलांना वा आपल्या नातेवाईकांना लावावा. त्याचा विशिष्ट कोड असावा. जो कोड संकटसमयी इतरांना कळणार नाही. तो कोड शब्दांचाही असू शकतो. तो कोड म्हणजे आपल्यावर आलेलं संकट असेल. आईवडीलांनीही लक्षात ठेवावं की आपल्या मुलींच्या फोनवरुन असे शब्द ऐकायला आलेच तर आपली मुलगी संकटात आहे असे समजून पोलिसांना फोन करावा. त्यानंतर आपल्या मुलीचा फोन क्रमांक पोलिसांना द्यावा. पोलीस तो क्रमांक ट्रॅकवर लावून त्या संकटस्थळी पोहोचू शकतात. शाळेत आपल्याला असे आढळून आलेच तर त्या गोष्टी आपण आपल्या वर्गशिक्षकांना सांगाव्यात किंवा शाळेतील तक्रारपेटीत तसं लिहून टाकावं. घरी किंवा परीसरात तसं काही दिसत असेल तर ते आपल्या आईला सांगावे. तसंच आपण कोणाच्या प्रलोभनास बळी पडू नये. कोणी चॉकलेट देत असेल किंवा एखादी वस्तू घेवून देत असेलच तर ती स्विकारु नये. आपलाही एक कोड क्रमांक असावा. जो आपल्या आईवडीलांशिवाय इतर कोणाला माहीत नसावा.
अलिकडील काळात प्रेम करणेही बरोबर नाही. कारण प्रेमाची आस दाखवून त्यात गुंतवून लोकं स्रियांना अशा ठिकाणी नेतात व सामुदायिक बलात्काराची शिकार करतात. ज्यात आपलं काय काय करतात, याची आपण कल्पनाही करु शकत नाही. शिवाय आपल्या प्रेमातून कधीकधी आपलीच नाही तर इतरांचीही हत्या होते. हेही स्त्रियांनी लक्षात ठेवावे. उदा. नागपुलातीलच मोनिका किरणापुरे हत्या प्रकरण. वरील सर्व गोष्टींपासून स्रियांनी अलर्ट राहावे. तसंच सर्वात महत्वाचं सांगायचं झाल्यास स्रियांनी कधीकाळी कोणत्याही पुरुषाला फसवू नये. कारण त्यातून बदल्याची भावना निर्माण होवू शकते आणि बदल्याच्या भावनेनंही बलात्कार होवू शकतो. असा बलात्कार की ज्याची आपण कल्पनाही करु शकत नाही. उदा. एखाद्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून पैसे मिळावे. म्हणून त्याला गुन्ह्यात गोवणे. असे प्रकार शाळेत होत असतात कधीकधी. संस्थाचालक शिक्षकांकडून पैसा वसूल करता यावा. म्हणून एखाद्या स्री शिक्षीकेला मोहरा बनवून एखाद्या पुरुष शिक्षकांचं जीवन उध्वस्त करु शकतो. अलिकडील काळात फेसबुकवर काही स्रिया पैसा कमविण्यासाठी मोबाईल माध्यमातून पुरुषांना फसवीत असतात. परंतु तसं फसवणं कधीकधी आपल्याच जिव्हारी लागतं.
महत्वाचं सांगायचं झाल्यास सर्व स्रियांनी स्वतःची सुरक्षा स्वतःच करावी. तसं करणं गरजेचं आहे. शिवाय अशी सुरक्षा करीत असतांना इतर पुरुषांचीही मदत घ्यावी. कारण सर्वच पुरुष वाईट नसतात. प्रेम करावे. परंतु प्रेम करतांना सहजासहजी कोणावर विश्वास करु नये. कारण बरीचशी बलात्काराची प्रकरणं ही प्रेमातूनच घडत असतात. विशेष बाब ही की आपण आपलीही सुरक्षा करावी आणि त्याचबरोबर इतरांचीही करावी. जेणेकरुन प्रत्येक स्री सुरक्षीत होईल. तसंच या प्रकरणात एखाद्या ठिकाणी समजा बलात्कार झालाच तर पोलीस आणि न्यायालयानं संबंधीत आरोपींबाबत बचावात्मक पवित्रा घेवू नये. त्यांना जबरात जबर शिक्षा द्यावी. जेणेकरुन त्यापासून बोध घेवून इतर कोणताही व्यक्ती बलात्कारासारखे कृत्य करणार नाही. जे कृत्य देशातील स्री सुरक्षेवर प्रश्नचिन्हं निर्माण करु शकेल.
रुपाली संस्कारी नव्हती व तिच्यावर संस्कार न होण्याचे कारण शेजारचा परीवार होता. ते घर विदेशी लोकांचं होतं. भारत देश स्वतंत्र झाला असला आणि विदेशी लोकं आपल्या आपल्या देशात निघून गेले असले तरी तिच्या शेजारी असलेला व्यक्ती विदेशात गेला नाही. जो इंग्रज होता.
रुपाली लहानच होती, तेव्हा तिचे वडील मरण पावले होते. जे शेतकरी होते. त्यातच रुपालीची आई तिच्या वडीलांच्या जाग्यावर काम करीत होती. ती काबाडकष्ट करायची. तशी दिवसभर तिची आई घरीच नसायची.
रुपालीचे वडील मरण पावताच रुपालीच्या आईनं शेती विकली होती व ती शहरात राहायला गेली. त्यातच तिनं एके ठिकाणी मोलकरणीची नोकरी पकडली. ती आता मोलकरीण म्हणून दुसऱ्याच्या घरी त्यांच्या मुलांची देखभाल करायला लागली होती. मात्र तो तिचा देखावा होता. ती त्यांची देखभाल करीत नव्हती. उलट ती मोलकरीण असली तरी सतत मेकअप करुन मोबाईलवर कुणाशी तरी चॅटींग करीत असायची.
रुपाली शाळेत जात होती. सायंकाळी रुपाली घरी यायच्या वेळेस ती मेकअप धुवायची व साधी मोलकरीण असल्यागत रुपालीच्या समोर प्रदर्शन करायची. हे मेकअपचे सामान रुपालीच्या लपवून असायचे.
ती मोलकरीण असलेली रुपालीची आई. तिचा आज स्वभाव पुर्णतः बदलला होता. ती काही चांगल्या स्वभावाची नव्हती. तिचा एक बॉयफ्रेंड होता व तो बॉयफ्रेंड रुपाली शाळेत जाताच कधीकधी घरी यायचा. त्या दिवशी रुपालीची आई कामावर जात नसे. कधीकधी रुपाली घरी राहायची. त्यावेळेस तो तिच्यासाठी खाऊ आणायचा व रुपालीला सांगायचा की तिनं ती गोष्ट आईला सांगू नये. तिनं जर ती गोष्ट तिच्या आईला सांगीतली तर तो तिच्यासाठी खाऊ आणणार नाही.
रुपालीचं लहानगं वय. त्यातच तिला खाऊ जास्त आवडत असे. तिला आपल्या आईच्या वागण्याचं काय करायचं होतं. ती खाऊ खात बाहेर खेळत बसायची. त्यातच तो तिच्या आईचा बॉयफ्रेंड त्या तिच्यासोबत आतमध्ये रंगरलिया मनवीत असायचा.
ते लहानगं वय. त्या वयात त्या तिच्या आईची ती मेकअपची सवय, कधीकधी तिलाही मेकअप आवडायचा व ती आईला विचारायची,
"आई, मी मेकअप करु काय?"
रुपालीनं तसा प्रश्न, तिनं आईला विचारताच ती आनंदानं होकार द्यायची. मग रुपालीही मेकअपनं सजायची.
आई मोलकरीण असली तरी ती रुपालीला फार आवडत असे. परंतु कधीकधी तिचं वागणं तिला आवडायचं नाही. तशी ती रुपालीच्या मनामनालायकही वागायची. शिवाय तिच्या हौसा मौजा पुरवायची. कारण तिलाही तिच्या बॉयफ्रेंड सोबत रंगरलिया मनवायला मिळत असे. ज्याचा रुपाली विरोध करीत नसे.
दिवसामागून दिवस जात होते. रुपाली तरुण होत चालली होती. त्यातच तिला बॉयफ्रेंड म्हणजे काय? हेही समजायला लागलं होतं. तरुणपण काय असतं. त्या तरुणपणातील भुमिका काय? या सर्व गोष्टी तिला समजायला लागल्या होत्या. त्यातच तिला आता तिच्या आईचाही राग यायला लागला होता. शिवाय आता ना तिच्या आईच्या बॉयफ्रेंडचा खाऊ आवडत होता. ना तिला तिची आई आवडत होती. मात्र आजही तिच्या आईचा तो बॉयफ्रेंड घरी येत असे आणि रुपालीही त्याला अतिशय आनंदानं घरी येवू देत असे. त्याचं कारण म्हणजे रुपालीला मोठे करायला व शिक्षण शिकवायला त्याची अतिशय मोलाची मदत झाली होती. कारण त्यानंच रुपालीच्या शिक्षणासाठी पैसाही लावला होता.
आज ती मोठी झाली होती. त्यातच आजही तिच्या आईचा बॉयफ्रेंड तिच्या आईसोबतच होता. मात्र आज ती मोठी झाल्यानं आपल्या आईचा असलेला बॉयफ्रेंड तिला आवडत नव्हता. तशी तो दिसताच ती रोष व्यक्त करीत होती. परंतु ती आपल्या आईला बोलत नव्हती.
रुपालीला आपल्या आईचा भयंकर राग येत होता. त्याचं कारणही तसंच होतं. त्याचं कारण म्हणजे तिच्या वडिलाचा झालेला मृत्यू. तिच्या वडिलाचा मृत्यू तिच्या बालपणीच झाला होता. बिचारा विषारी औषध पिवून शेतीतच मरण पावला होता.
रुपालीच्या आईचं नाव रुख्मा व वडिलांचं नाव बाळकृष्ण होतं. ती तसं पाहिल्यास क्रिष्ण व रुख्माची जोडी होती. बाळकृष्ण रुक्मिणीवर प्रेम करीत होता. परंतु रुख्मा काही बाळकृष्णवर प्रेम करीत नव्हती. असं रुपालीला आता जाणवू लागलं होतं. तिला आज वाटू लागलं होतं की तिची आई तर रुपाली जन्माच्या पुर्वीपासूनच दुसऱ्याच व्यक्तींशी हसून खिदळून बोलत असे. त्यातच मोबाईल हातात आल्यापासून तिची आई सतत कुण्या परपुरुषांशी सतत बोलत असायची. ते पाहात असायचा बाळकृष्ण. त्याला ते पाहिल्यावर वैताग यायचा.
बालकृष्ण नित्यनेमानं सकाळी उठायचा. तो सकाळीच शेतावर जायचा. तो शेतात जावून शेतात नांगरावखराची कामं करायचा. तसा तो कधीकधी दुपारी घरी यायचा.
बाळकृष्ण जेव्हा शेतात जायचा. तेव्हा ती मात्र अजुनही उठलेली नसायची. मग ती आरामात उठायची. त्यातच आपल्या मतानंच आरामात कामं करीत बसायची. त्यातही सारखा मोबाईल तिच्या हातात असायचा.
कधीकधी बाळकृष्ण घरी यायचा. तेव्हा रुख्माच्या हातात मोबाईल असायचा. तो ते पाहायचा. त्यातच त्याला संताप यायचा. वाटायचं की हा पुरे झाला आपल्या पत्नीचा नाद. तिनं दुपारच्याला आपल्यासाठी जेवनाचा डबा घेवून यायला हवं होतं. परंतु ती आली नाही आणि मोबाईलवर चॅटींग करीत बसली.
बाळृष्णनं समजावलं होतं रुख्माला बरेचदा. परंतु तिनं दुर्लक्ष केलं होतं त्यावर. त्यातच आज त्याचं तिच्याशी कडाक्याचं भांडण झालं होतं. वाटलं होतं की ती सुधारेल. परंतु ती सुधारली नव्हती.
ते भांडण. ते भांडण होतांना रुपालीनं पाहिलं होतं. तसं तिचं वय लहान असल्यानं ती बोलू शकली नाही. परंतु तिला ते सगळं कळत होतं.
बाळकृष्ण आज शेतावर गेला होता. तेही रुपालीनं पाहिलं होतं. आज तसं पाहिल्यास बाळकृष्ण रागातच होता व रागातच असतांना त्यानं पुरेसं जेवनही केलं नव्हतं.
बाळकृष्ण शेताच्या रस्त्यानं जात होता. तसे त्याच्या मनात विचाराचं काहूर सुटलं होतं. विचाराचे वावटळ सारखे सारखे त्याच्या मनात वादळाचे रुप घेवू लागले होते. त्यातच ते विचित्र विचार वाढायला लागले होते. वाटायला लागलं होतं की आपण शेतात जावून आपला जीव संपवून टाकावा. बेकार आहे ही आपली जिंदगी. असा विचार करता करता तो शेतावर पोहोचला.
बाळकृष्ण शेतावर पोहोचला होता. त्यानं कडेला बैल बांधले. तसा तो शेतावर पोहोचताच त्याच्या मनात आत्महत्येचे विचार ङोलू लागले होते. त्यातच त्याला वाटलं की आपण आत्महत्या करावी. ना रहेगा बास, ना बजेगी बासरी. आपली पत्नी दुसऱ्यांसोबत चॅटींग करते काय? आता तिला वाटेल आपण मरण पावल्यानंतर. पती कसा असतोय ते.
लागलीच विचारांती आत्महत्येचा विचार येताच त्यानं दोर शोधला. तसा त्याला दोर सापडेना. तो त्याचं लक्ष कडेला बांधलेल्या बैलांकडं गेलं. विचार केला की आता हा आपण दोरखंड सोडावा व यानंच आपल्या गळ्याला फास टाकावा.
विचारांती त्यानं त्या बैलाचे दोरखंड सोडले. त्यानंतर त्यानं ते दोरखंड आपल्याच शेतातील बाभळीच्या झाडावर चढून एका जाडजुड फांदीला बांधले. त्यानंतर त्यातीलच एक टोक आपल्याही गळ्यात बांधला व त्या फांदीवरुन उडी मारली आणि क्षणातच तो गतप्राण झाला.
बाळकृष्णनं आत्महत्या केली होती. तो संपला होता. परंतु त्यानं दोरखंडातून मुक्त केलेले बैल संपले नव्हते. ते दोरखंडातून मुक्त झाल्यानं ते चरायला दुसऱ्याच्या शेतात गेले होते. तोच शेजारचा शेतकरी ओरडत ओरडत बाळकृष्णच्या शेतात आला.
शेजारचा शेतकरी ओरडत ओरडत बाळकृष्णच्या शेतात येताच त्यानं पाहिलं की ते बाभळीचं झाड आणि त्या बाभळीच्या झाडावर बाळकृष्ण लटकलेला आहे. त्यानं दोरखंडानं शेतात फाशी घेतलेली आहे.
तो शेजारचा शेतकरी. ते दृश्य पाहताच तो अतिशय घाबरला व तोही आरडाओरड करायला लागला. बाळकृष्ण गेल्याची अफवा पसरली व लागलीच जाहीर झालं की बिचारा बाळकृष्ण शेतीच्या नापिकीला कंटाळून शेतात आत्महत्या करुन मरण पावला.
बाळकृष्ण मरण पावला. ती बातमी हा हा म्हणता त्याच्या पत्नीलाही माहीत झाली. ती बाळकृष्णला पाहायला शेतावर आली. त्यासोबतच तिची लहानशी असलेली मुलगी रुपालीही. त्यातच रुख्मा रडू लागली होती.
थोड्या वेळाचा अवकाश. कोणी म्हणालं, प्रेत आपण झाडावरुन काढू नये. आपण पोलीस पाटलाला सांगावे. ते पोलिसांना बातमी देईल. पंचनामा होईल शेतकरी आत्महत्येचे पैसे मिळतील व बिचाऱ्या बाळकृष्णच्या परीवाराला त्या पैशाची मदत होईल.
लोकांची ती कल्पना. आत्महत्या झाली होती मोबाईल चॅटींगवरुन घरी भांडण झाल्यानं. त्यात दोष शेतातील नापिकीचा नव्हताच. परंतु ती आत्महत्या शेतातच झाल्यानं त्याला शेतकरी आत्महत्येचा रंग भरण्यात आला. मग काय त्या बाळकृष्णच्या आत्महत्येची बातमी पोलीस पाटलाला देताच त्यानं पोलिसांना फोन लावला. तसे पोलीस आले व त्यांनी ते प्रेत खाली उतरवलं. त्यातच पंचनामा केल्या गेला व त्यानुसार गावातील सरपंच व ग्रामसेवक यांनी त्या प्रेताच्या योजनेनुसार रुख्माला शेतकरी आत्महत्येचा लाभ मिळवून दिला.
बाळकृष्ण मरण पावला होता विचार करुन की माझी आत्महत्या होताच माझ्या पत्नीला सगळं समजेल. पती नसल्याचं दुःख कळेल. ती सुधारेल. परंतु त्याच्या मृत्यूनंतर असं काही झालं नाही. घडलंही नाही. तिनं ते पैसे घेतले. शेतजमीनही विकली व शहरात जावून आलिशान जीवन जगू लागली. शिवाय घरखर्चाच्या थोड्याशा पैशासाठी ती मोलकरीण बनली. परंतु तो फक्त तिचा दिखावा होता. त्या मोलकरीणच्या रुपाच्या पदड्याआड ती आपलं शरीर विकत होती. ज्यातून तिला पैसा तर मिळत होता. व्यतिरीक्त तिची शारीरिक इच्छाही पुर्ण होत होती. शिवाय गिऱ्हाईक आणणारा ते बॉयफ्रेंड सोबतीला होताच.
रुपालीला आठवत होता तो तिच्या वडिलाचा झालेला मृत्यू. तिला आठवत होतं ते वडिलाचं आईशी झालेलं भांडण. तिला आठवत होतं ते भांडण मोबाईल वरुन झालेलं. तिची आई कुणाशी तरी चॅटींग करीत होती. त्यावरुनच भांडण झालं होतं. हे तिला त्यावेळेस कळलं नव्हतं. परंतु आज कळत होत. परंतु तिला ते केलं नव्हतं आईचं प्रेम. ज्या प्रेमासाठी तिनं मोबाईलवर चॅटींग केली होती व रुपालीला शहरात आणलं होतं. रुपालीवर प्रेम करीत होती तिची आई. तिला वाटत होतं की ती तिची मुलगी आहे. तिला लहानाचं मोठं करावं. तिचं चांगलं शिक्षण करावं व तिला तिच्या पायावर उभं करावं. त्यासाठीच ती वाममार्ग स्विकारुन पैसे कमवीत होती. परंतु त्या गोष्टी तिला जरी चांगल्या वाटत असल्या तरी त्या रुपालीला चांगल्या वाटत नव्हत्या. तिला वाटत होतं आपल्या आईनं चांगलं काम करावं. जेणेकरुन चांगल्या कामातून आपलं शिक्षण होईल.
*****************************

रुपालीची आई देहविक्री करु लागली होती. परंतु ते सगळं रुपालीला न दाखवता. तेही लपूनछपून. त्याचं कारण होतं, रुपालीच्या बालमनावर परिणाम होवू नये. शिवाय गावावरून जेव्हा ती शहरात आली. तेव्हा तिनं मोलकरीण म्हणून कामं करुन पाहिलं काही दिवस. परंतु ती कामं जास्त करुन कोणी देत नव्हते. शिवाय तुटपुंजं वेतन असायचं. त्यातच म्हटलं कोणाला की वेतन वाढव तर कोणी वाढवत नव्हतं. शिवाय काही कुरकूर केल्यास ते काढूनही टाकत असत नोकरीवरुन. त्यातच जे मोलकरीण म्हणून वेतन मिळायचं. ते वेतन पुरेसं नव्हतं की रुपालीला शिकवता येईल. जर चांगलं शिक्षण द्यायचं असेल तर बक्कळ पैसा हवा होता. तो मिळवायचा कुठून? रुपालीच्या आईनं विचार केला. विचार करताच तिला उपाय सुचला. आपण शरीर विकायचं व त्यातून बक्कळ पैसा कमवायचा. ज्या पैशातून आपल्या मुलीचं शिक्षण होईल. कारण त्यावेळेस कॉन्व्हेंटचे शुल्क फार वाढले होते.
रुपालीची आई रुख्मा. ती दुरदृष्टीची होती. तिला तिचा पती बाळकृष्णच्या मृत्यूनंतर पैसा मिळाला होता व शेतीही विकली होती. परंतु हा पैसा रुपालीच्या शिक्षणासाठी पुरेसा नव्हता. शिवाय रुपालीला वाटत होतं की तिला शिकवायसाठी पैसा लागतोच तर आपल्या आईनं दुसरी कामं करावीत. परंतु तिची आई तिचं ऐकेल, तेव्हा ना. ती कधीकधी आपल्या आईला त्याबद्दल सांगायची. परंतु तिची आई तिचं ऐकत नव्हती. ती आई रुपाली लहान असल्याचं समजून तिच्या गोष्टी टाळून देत असे. अशातच रागाच्या व बदल्याच्या विचारांचे ढग रुपालीच्या अंतर्मनात गोळा होत चालले होते.
ती गावची शाळा. ती गावची शाळा रुपाली लायक नव्हती. त्यातच आपली मुलगी चांगली शिकायला हवी म्हणून तिला चांगल्या शाळेत टाकायलाच हवं असं आईला वाटत होतं. त्यासाठीच ती गाव सोडून शहरात आली होती. त्यातच तिनं तिला सरकारी शाळेत टाकलं नव्हतं तर कॉन्व्हेंटच्या शाळेत टाकलं होतं. ज्याचं शुल्क अतोनात होतं. जे पुर्ण करतांना शरीर विकावं लागलं होतं.
रुपाली आता तरुण झाली होती. तिला सगळं कळत होतं. त्यामुळंच ती आता आपल्या आईला बोलणं बोलत होती. कधीकधी त्यांचं भांडणही व्हायचं. त्यात रुपाली आपल्याच आईची खरडपट्टी काढायची. परंतु त्यावर आई म्हणायची की चूक आपली नाही. चूक तिच्या वडिलांची होती. परंतु त्यावर रुपालीला वाटायचं की चुका आपल्या आईच्याच. परंतु ती दोष दुसर्‍याला देत आहे.
आजचा काळ असाच. स्रिया आजच्या काळात पुरुषांच्या बरोबरीनं खांद्याला खांदा लावून पदर खोचून पुरुषांइतकंच काम करु लागलेल्या आहेत. काही ठिकाणी तर त्या कितीतरी जास्त प्रमाणात काम करीत आहेत. तशाच त्या विकासाच्या क्षेत्रातही आघाडीवर गेलेल्या आहेत. त्यातच त्यांच्या सवयी आणि वागणंही बदललेलं आहे. ज्या सवयी आणि वागण्यातून इतरांना नक्कीच त्रास होवू शकतो. तो त्रास पुरुषांनाच नाही तर इतर कितीतरी स्रियांनाही होवू शकतो. असं त्यांचं वागणं आहे.
वागणं बदललं आहे? सवयी बदलल्या आहेत? असं त्यांचं वागणं आहे? यावरुन काय समजायचं? वागणं याचा अर्थ त्यांचा पेहराव. त्यांचा पेहराव हा संस्कृतीला धरुन नाही. पेहरावाच्या दृष्टीनं विचार केल्यास कालच्या स्रिया बरोबर भांगात कुंकू, गळ्यात मंगळसूत्र, कपाळाला कुंकवाचा टिळा व डोक्याला लुगड्याचा पदर असायचा. त्या स्रिया कोणाकडेही वाकडी नजर करुन पाहायच्या नाहीत. त्यांचं तसं वागणं पाहून चालणारा इतर कोणताही पादचारी त्या महिलेकडे नजर रोखून पाहात नसे. शिवाय कोणी पाहिल्यास त्याला अशी शिक्षा देत असे की तो पुन्हा इतर कोणत्याही स्रियांकडे पाहणार नाही. कदाचीत त्याच मंगळसूत्रातून वा त्या कपाळावरील कुंकवातून तिची सौजन्यशिलता अगदी हुबेहुब उमटून दिसायची. ती संस्कारी वाटायची व तिचा पतीही चांगला असेल. तो आपल्याला मारेल, पिटेल अशी भावना इतरांमध्ये निर्माण व्हायची. मात्र आज काळ बदलला व आज त्याच डोक्यावरील भांगातील कुंकवानं आपलं स्थान हद्दपार केलं. कपाळावरील कुंकू अदृश्य झाला. शिवाय आजच्या काळात गळ्यात मंगळसूत्रही दिसत नाही. साऱ्याच महिला विना विवाहाच्या दिसतात. शिवाय कपडेही कमी असतात. हे सर्व पाहिलं की साऱ्याच पुरुषांची नजर, मग तो कितीही चांगला असला तरी त्यांच्याकडेच जाते. अशातच जी महिला अशी वागते. तिला असले पुरुष मंडळी सोडतात व जी चांगली असते. तिलाच धरतात की ज्यातून इतर महिलांचं नुकसान होत असतं. मग त्याला प्रशासकीय दोष वा पुरुषांना दोषी धरलं जातं. आपला दोष लपवला जातो. उदाहरण द्यायचं झाल्यास मोनिका किरणापुरे या नागपूरच्या मरण पावलेल्या तरुणीचं देता येईल. बिचारीला विनाकारणच अशा इतर महिलेच्या वागण्यातून मरण पत्करावं लागलं होतं.
आजच्या काळात अगदी लहान लहान मुलींना त्या विद्यार्थी दशेत असतांना मायबाप अगदी कमी कपड्यात ठेवतात. त्यांच्या वेण्या घालायला त्रास होतो म्हणून त्यांच्या केसाची केससज्जा कमी ठेवतात. त्यांना विनाकारण लिपस्टीक लावायची सवय लावतात व त्यांच्या ओठाचं सौंदर्य हिरावून घेतात. त्यांना लहानपणापासूनच पुर्ण मेकअपनं ठेवतात. डोक्यावर टिकलीची सवय लावत नाहीत. शिवाय त्यांचे शिक्षकही कमी कपड्यात त्यांना वावरायला लावतात. सलवारवरील ओढणी सवारलेली नसेल तर ती शिक्षकांना दिसत नाही. ती सवारायला ते सांगत नाहीत. ते त्यांना संस्कार शिकवीत नाहीत. ते डोक्यावर टिकली लावायला सांगत नाहीत. अन् जे शिक्षक सांगतात. त्यांना दोष दिला जातो की संबंधीत शिक्षक स्री स्वातंत्र्यावर बाधा आणत आहे. अगदी बारीक नजर ठेवतात माझ्या मुलीवर ते शिक्षक. त्यांना काय गरज आहे. त्यामुळंच शिक्षक कशाला टोकतील त्यांना. कदाचीत अशा मुलींना कमीजास्त जर झालंच तर अशा शिक्षकांचे काय घोडे मरतील. अन् जे शिक्षक असे सांगतात आपल्या विद्यार्थ्यांना, ते शिक्षक त्या विद्यार्थ्यांना आपली स्वतःचीच मुलं समजतात. त्यांनाही वाटते की हीदेखील आपलीच मुलं आहेत आणि ही वाया जावू नये. यासाठीच टोकणं असतं. परंतु त्यावर काही लोकांचं जे मत असतं, ते मत अशा शिक्षकांच्या भुमिकेला शोभणारं नसतंच. त्यामुळंच जरी शिक्षकांना वाईट जरी त्यांच्या विद्यार्थ्यात दिसलं तरी ते टोकत नाहीत. घरीही त्या मुलींना जर तिचे वडील टोकत असतील तर आई ओरडते की मुलीनं आपल्या घरी तोकडे कपडे घालू नये तर कोठे घालावे? त्यावर वडीलांना चूप राहावं लागतं. ज्याचे पुढील काळात दुरगामी व गंभीर परिणाम आपल्याला पाहावयास मिळतात. त्यावेळेस वेळ निघून गेलेली असते.
एकंदरीत सांगायचं झाल्यास बदलाव व्हावाच. कारण काळ बदलत आहे. अशा बदलत्या काळानुसार आपल्यातही बदल हवाच. तो व्हायलाच हवा. परंतु असाही बदलाव नको की जो बदलाव आपलाच जीव घेईल वा आपल्यामुळं आपल्याचसारख्या इतरही आया बहिणींचा व मुलींचा जीव जाईल मोनिका किरणापुरेसारखा. आज अशाच बदलावानं कित्येक महिलांवर ॲसिड फवारणी झाली व कित्येक महिलांचा चेहरा विद्रूप केल्या गेला. कित्येक महिलांना चाकूनं भोपून यमसदनी धाडल्या गेलं. कित्येक महिलांवर बलात्कार केले गेले. कित्येक महिलांचे अपहरण झाले. ज्याचा दोष प्रशासनाला दिला गेला. ज्याचा दोष आम्ही पुरुषी मानसिकतेला दिला. ओरडलो की आम्ही स्वतःत बदलाव करु नये काय? स्वतःत बदलाव करुन वागू नये काय? यात द्वेषभावना का असावी? परंतु स्रियांमधील हा बदलाव पाहून त्यानं ज्या पुरुषांची मानसिकता बदलत असेल, तर त्या बदलणार्‍या विकृत मानसिकतेच्या लोकांना कोण सांगेल. कोण सांगेल की त्यानं तसं करु नये. असं करु नये. महत्वपुर्ण बाब ही की आपण दुसर्‍याला दोष देण्यापेक्षा स्वतःच सुधारलेलं बरं. जेणेकरुन आपल्यावर कोणीही ताशेरे ओढणार नाही. कोणीही आपल्याकडं वाकडी नजर टाकणार नाही. कारण सगळीच मंडळी ही चांगल्या मानसिकतेची नसतात. काही विकृतही मानसिकतेची असतात. अशाच लोकांपासून आपलं गंभीर नुकसान होत असतं. त्यामुळंच अशा लोकांपासून आपण सावधान राहिलेलं बरं. तसंच आपण इतरांनाही सावधान ठेवलेलं बरं. हे तेवढंच खरं. विशेष म्हणजे आपणही सुरक्षीत राहावं व इतरांनाही सुरक्षीत ठेवावं. तसंच आपलं वागणं असावं व सवयही असावी. जेणेकरुन आपणही सुरक्षीत राहू आणि इतरांनाही सुरक्षीत ठेवू शकू यात शंका नाही. महत्वाचं म्हणजे चुका आपल्या असल्यानं त्याचा दोष दुसर्‍यांना देवू नये म्हणजे झालं.
रुपालीची आई जरी देहविक्रीचं काम करीत असली तरी तिचं वागणं चांगलं होतं. तिला तोकडे कपडे आवडत नव्हते अन् तसे कपडे परिधान करणाऱ्या स्रिया तशाच मुलीही तिला आवडत नव्हत्या. हे संस्कार व विचार तिच्या मनात कुठून आले असावे. ही बाब अतिशय विचार करणारीच होती.
रुपाली महाविद्यालयात जावू लागली होती. ती आवडीनं शिकू लागली होती. तिला बॉयफ्रेंड आवडत नव्हते. कारण बॉयफ्रेंडच्या नादानं तिचे वडील तिच्या बालपणीच मरण पावले होते. असा तिचा संभ्रम असून तिला तिच्या वडिलाच्या अकाली मरणाचं कारण तिच्या आईचा बॉयफ्रेंडच वाटत होता. तिला वाटत होतं की असा बॉयफ्रेंड मिळविण्याऐवजी आपण आपल्या करीअरकडे लक्ष द्यावं. जेणेकरुन आपलं करीअर बनेल.
रुपालीचा तो विचार. ती महाविद्यालयात असतांना आपल्या करीअरकडेच जास्त लक्ष देवू लागली. मात्र बाकीची मुलं ही महाविद्यालयात येत व महाविद्यालयातील तासिका न करता महाविद्यालयातील मैदानावर गप्पागोष्टीत रंगून जात असत.
रुपाली महाविद्यालयात असतांना करीअरकडेच लक्ष देत होती. त्याचं कारण होतं महाविद्यालयातील वातावरणाचा मुलांवर होणारा परिणाम. तिला वाटत होतं की मुलांनी करीअर करावं. शिवाय करीअर करायचंय असेल तर प्रेम आणि मोबाईल आणि आधात्म्य सोडावं. ती नेहमी आपल्या महाविद्यालयातील मैत्रीणींना म्हणत असे, असं केल्यानं आपलंच भविष्य बनेल व आपण सुखी होवू.
अलिकडील काळात प्रेम म्हटलं की त्यात वासनाच आणली जाते. ज्यातून प्रेमाचा मुळ अर्थच नष्ट होत जातो. त्यातच ताकदही लुप्त होत जाते. ज्यातून विद्यार्थ्यांचं करीअर, संस्कार वा इतर गोष्टी आपोआपचं नष्ट होवून जातात.
प्रेम ही तरुणच नाही तर लहान आणि थोरांसाठी मुल्यवान अशी वस्तू आहे. परंतु प्रेमाचा संबंध हा केवळ तरुणांशीच जोडला जातो. म्हातारी मंडळी वा लहान बाळाशी त्या गोष्टीचा संबंध जोडला जात नाही.
प्रेम अशी वस्तू आहे की ते प्रेम नसल्याशिवाय माणसाचं जगणं कठीण होवून जात असतं. लहान मुलाला प्रेम मिळालं नाही की त्याच्या भावनेवर परिणाम होतो व त्या मुलात परीवर्तन होतं. जे परीवर्तन त्याला गुन्हेगारीकडे नेत असतं. तसंच म्हाताऱ्या व्यक्तींचं आहे. म्हातारपणात म्हातारे व्यक्ती असहाय्य असतात. त्यांना प्रेम मिळालं नाही तर ते दुःखी होतात. परंतु ते असहाय्य असल्यानं गुन्हेगारीकडे वळत नाहीत. वळतात ते शापवाणीकडे. कारण त्यांना फक्त त्या काळात शापच देता येतं. बाकी काहीच करता येत नाही.
प्रेम....... प्रेम अशी ताकद आहे की त्या प्रेमानं सर्वच प्रकारचं परीवर्तन आपण घडवून आणू शकतो. तरुण वयात तरुण तरुणीचं असलेलं प्रेम हे त्यांचं चांगलं करिअरही बनवू शकतं किंवा त्या करीअरला उध्वस्त ही करु शकतं. हे चित्रपटातूनही दाखवलं जातं. परंतु लक्षात कोण घेतो? कोणीच नाही. त्या वयातील प्रेमाचं एक उदाहरण तिच्या पुढे होतं. त्या एका महाविद्यालयातील मुलीचं ते उदाहरण.
सुवर्णा तिचं नाव होतं. ती पडली होती त्या मुलाच्या प्रेमात. जो अतिशय गरीब होता. तोही तिच्यावर प्रेम करु लागला होता. तशा त्यांच्या गोष्टी चालायच्याच. त्यातच त्यानं प्रेम एके प्रेम करीत आपला अभ्यास सोडला होता. तसं तिच्या लक्षात आलं व तसं लक्षात येताच ती त्याला म्हणाली,
"मला हुशार मुलं फार आवडतात. जर तू अभ्यास करशील तरच मी तुझ्याशी बोलेल वा प्रेम करेल." मग काय, मुलावर त्या गोष्टीचा परिणाम झाला व तो तिचं ऐकून त्या दिवसापासून फारच अभ्यास करायला लागला होता. पुढं तो आय पी एस झाला होता. ही आहे प्रेमाची ताकद. नाहीतर काहींचं प्रेम. काही तरुण तरुणी असे प्रेम करतात की त्या प्रेमात वासनेला स्थान देतात. ज्यातून अल्पवयातच ते अगदी सैराट चित्रपटासारखे पळून जातात. मग काय विवाह होतो व काही दिवसानं त्यांच्यात मतभेद होतात व फारकतही.
प्रेम यालाच म्हणावे काय की ज्यातून आपलं आयुष्य व भवितव्य उध्वस्त व्हावं. नाही, त्याला प्रेम म्हणता येणार नाही. प्रेमाच्या ताकदीनं तरुणाईत तरुणी तरुणाचं व तरुण तरुणीचं करीअर बनवू शकतात. त्यात आपण ठरवावं लागतं की प्रेमाचा वापर कसा करायचा. प्रेमाच्या ताकदीतून करीअर उध्वस्तही होतं आणि तेवढंच घडतंही.
प्रेम या संकल्पनेतून लहान बाळाबाबत सांगायचं झाल्यास त्यांचंही भवितव्य बनू शकतं. त्याच्यावर त्याच्या आईनं अतिशय प्रेम करुन त्याच्यातील वाईट गुण काढून त्याला चांगले गुण शिकवले तर मुलं नक्कीच चांगले गुण शिकतात. तसेच शिक्षकही आपल्या वर्गात अशात प्रेमपूर्वक वागणुकीतून विद्यार्थ्यांवर संस्कार फुलवू शकतात. आपल्या विद्यार्थ्यांवर जो शिक्षक केवळ अध्ययन अध्यापनाच्या निष्पत्तीचं प्रेम करतो. त्याची मुलं अभ्यासात अतिशय हुशारच असतात आणि जे काही थोडेसे बुद्धू असतात, तेही अभ्यास करायला लागतात. तशीच प्रेम हीच परिभाषा संकल्पनेतून वापरुन म्हाताऱ्या व्यक्तींबाबत विचार केल्यास त्यांचा आशिर्वादच मिळतो आपल्याला. कारण म्हातारी माणसं काहीच देवू शकत नाहीत. ते फक्त आशिर्वादच देवू शकतात आणि हा आशिर्वादच एवढ्या प्रमाणात लागतो की ज्यातून आपलं उर्वरीत आयुष्य अतिशय सुंदर व सुबक जात असतं.
प्रेमात ताकद आहे. प्रेम हे जीवनात चांगला बदलावही करु शकतो आणि तेच प्रेम आपल्या आयुष्याला धोकादायक वळणावरही नेवू शकतं. याबाबत आपल्याला माहीतच असेल की ज्याला प्रेमातून धोके मिळालेले असतात, ते वेडे पिसे झालेले आहेत. बरीचशी माणसं प्रेमातून धोके मिळाल्यावर आयुष्यभर विवाहच करीत नाहीत किंवा काही काही प्रेमवीर हत्या वा आत्महत्याही करीत असतात.
प्रेमाबद्दलची महत्वपुर्ण बाब ही की प्रेम करावं, त्यासाठी मनाई नाही. परंतु त्या प्रेमातून लहान मुलांवर संस्कार फुलवावे. तरुणांनी प्रेमाचा वापर करुन एकमेकांचं करीअर बनवावं आणि म्हाताऱ्यांवर प्रेम करुन त्यांचा आशिर्वादच घ्यावा. शिवाय शाळेशाळेत सर्व शिक्षकांनी अध्ययन निष्पत्तीसाठी अध्यापन निष्पत्तीचं प्रेम करावं. जेणेकरुन त्याच प्रेमातून विद्यार्थी घडतील. त्यांच्यात संस्कार फुलतील व त्याचंही जीवन बनेल यात शंका नाही.
दुसरी महत्वाची गोष्ट आहे मोबाईल. अलिकडच्या काळात काही काही मुलंच नाही तर सर्वच वयोगटातील मंडळी मोबाईलच्या नादात वेडीपिशी झालेली असून त्यातूनच ती पिढी बिघडत चालल्याचे चित्र दिसत आहे. ती मंडळी तासन्‌तास मोबाईल समोर बसतात व आपलंच करीअर बरबाद करीत असतात. घरची गृहिणी तर घरातील सर्व कामं सोडते व मोबाईलवर चॅटींग करीत बसते. विद्यार्थीही तेच करीत असतात. ज्यानं अभ्यास बुडतो. कारण ते विद्यार्थी मोबाईलचा चांगला व योग्य वापर करण्याऐवजी त्याच्या गैरवापर करण्याला जास्त प्राधान्य देत असतात.
तिसरी महत्वपुर्ण गोष्ट आहे आधात्म्य. आधात्म्य माणसाच्या अंगात असावं की नसावं हा संभ्रमाचा प्रश्न आहे. काही लोकं म्हणतात की देव हा पाषाणाचा बनलेला असून तो आपलीच रक्षा करु शकत नाही, मग तो इतरांची काय रक्षा करेल? त्याबाबत वादही होतात. कारण धर्म व देवधर्म, रितीरिवाज व परंपरा या सर्वांच्या बेरजेतून आधात्म्य बनत असतं. शिवाय असल्या स्वरुपाचा आधात्म्य सर्वांनाच आवडत असतो. ज्यात गुरफटून सर्वच मंडळी आपल्या करीअरचं नुकसान करीत असतात. याचा अर्थ आधात्म्य कोणी मानू नये काय? देव नाही काय?
देव आहे. परंतु तो पाषाणात नाही, तो प्रत्येक माणसात आहे. कणाकणात आहे. तो आहे म्हणूनच निसर्गसृष्टी चालते. परंतु तो असे म्हणत नाही की प्रत्येकानं माझ्याच जवळ बसून राहावं. काम करु नये. मीच सर्व देणार. तसा तो सेवेत आहे. परंतु त्यासोबतच तो कष्टातही आहे. मग कावड नेणे वा यात्रेला जाणे हे कष्ट नाहीत काय? ते तर देवाला भेटण्यासाठी कष्ट करणं झालं. होय, ठीक आहे कावड नेणं हे कष्टच झालं. यात्रा करणं हे कष्टच झालं. आरती करणं कष्टच झालं. परंतु त्या गोष्टी करणं म्हणजे आपल्याला परमेश्वराकडून मिळालेल्या संधीची वाट लावणं होय. देव आरती केल्यानं पावत नाही. मग आरती का करावी? तर त्यातून आपले स्वरतंतू ताणले जातात. आवाज सुधारतो. शिवाय पोटासाठी व्यायाम होतो. ज्यामुळं वेगळा व्यायाम करण्याची गरज नाही. यात्रेला पायी जाण्यातूनही शरीराचा व्यायाम होतो. कावड नेण्यातूनही शरीराचा व्यायाम होतो. परंतु या सर्व गोष्टी केव्हा करायच्या असतात. जेव्हा आपल्याकडे पुर्ण स्वरुपातच सवड असते. जर आपण दिवसरात्र एक करुन आरतीच करीत बसलो तर अभ्यास होईल काय? होणार नाही व उलट आपण आजारी होवू. तसंच एखाद्या वेळेस यात्रेला जाण्याचं ठीक आहे. ज्यातून आपल्या शरीरातील नसांमध्ये असणारा कोलेस्टेरॉल निघून जातो. रक्ताभिसरणाला वाव मिळतो व आरोग्य चांगलं सुदृढ बनतं. परंतु नेहमी नेहमी यात्रेला गेल्यानं आपल्या अभ्यासाचं नुकसान होतं. शिवाय आपल्या करीअरचंही. कावडीनंही तोच फायदा होतो. परंतु हे सर्व मर्यादीत राहून करावं. वेळ असेल तरच करावं. निव्वळ त्यातच गुरफटून ऐन अभ्यासाच्या वेळेस यात्रा, आरत्या वा कावडयात्रा करीत बसलो वा पुजा अर्चना करीत अख्खा कामाचा दिवस उध्वस्त करीत बसलो तर ऐन उमेदीच्या काळात आपल्या असे करण्यानं आपलं वय त्यातच निघून जाईल व आपल्याला आयुष्य, भवितव्य बनवता येणार नाही.
विशेष सांगायचं म्हणजे प्रेम, मोबाईल आणि आधात्म्य या अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत. त्या जीवनात नसल्या तर जीवन अगदी असह्य आणि कंटाळवाणं होतं. त्याचा वापर जीवन सुखकारक आणि शरीर समृद्ध करण्यासाठी नक्कीच करावा. परंतु तसा वापर करतांना मर्यादा पाळाव्यात. त्यात गुरफटून जावू नये. शिवाय त्या गोष्टींचा वापर जीवन घडविण्यासाठी करावा. जीवनात बिघाड करण्यासाठी नाही.
रुपालीला प्रेम, बॉयफ्रेंड, मोबाईल व आध्यात्म आवडायचं नाही. तिला वाटायचं की बरेचसे तरुण प्रेमाच्या आहारी जातात. त्यातच आपल्या भविष्याचं नुकसान करतात. तशाच तिला आध्यात्मिक गोष्टीही आवडायच्या नाहीत. तिला वाटायचं की आध्यात्मिक गोष्टीच्या आहारी जाऊन लोकं आपल्या अभ्यासाचा बहुमूल्य वेळ वाया घालवतात. ज्या वेळात अभ्यास करायला हवं. त्या वेळात ते आध्यात्मात गुरफटून राहतात. शिवाय अशीच बरीचशी मुलं राजकीय नेत्यांच्या आश्वासनाला बळी पडून एखाद्या ठिकाणी धार्मिक आंदोलनाची ठिणगी पडलीच तर तिथं सहभागी होतात व आंदोलन करु लागतात. मग काय पोलीस त्यांना पकडतात. त्यांच्यावर खटले दाखल करतात व त्यामुळंच ते नोकरीपासून वंचीतही होत असतात. ज्यात खटले लढता लढता आयुष्य निघून जाते. पैसाही जातो. शिवाय मानसिक व शारीरिक हानीही होत असते.
रुपालीला वाटत होतं की शिक्षणासमोर आणि योग्यतेसमोर खटले कुचकामी ठरावेत. त्याचं कारण होतं त्या त्या व्यक्तीची योग्यता. तिला वाटत होतं की ते बालवयच असतं व त्या बालवयात तेवढा समंजसपणा मुलांमध्ये आलेला नसतो. त्यामुळंच ती मुलं आंदोलनात सहभागी होत असतात.
आजच्या काळात न्यायालयीन परीसरात जावून पाहिल्यास खटले सुरु असलेले दिसत असून त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असलेली दिसत आहे. अलिकडील काळात भांडण होणे वा खटले दाखल होणे. ही काही आजच्या काळातील नवी गोष्ट नाही. कोणावर, केव्हा, कसे खटले दाखल होतील याची काही शाश्वती देता येत नाही. याबाबतीत एक उदाहरण आहे. उदाहरण सत्य आहे.
एका शहरात चोरांची टोळी सुटली होती. रात्री अपरात्री कुणाच्याही घरी चोरी व्हायची. चोर मंडळी दागदागीने घेवून जायचे. त्यातच समजा एखाद्याला जाग आलीच तर त्या व्यक्तीला ते चोरं यमसदनी पोहोचंवायचे. अशा बर्‍याच घटना त्या शहरात घडत होत्या. ज्यामुळं लोकांमध्ये भीती निर्माण होवून लोकं दहशतीत आले होते. कारण त्या गोष्टीनं कोणी कितीही मोठा पहलवान असला तरी त्याचा झोपेत केव्हा व कसा जीव जाईल याची शाश्वती देता येत नव्हती. कधी दिनदहाडे भर दुपारीच चोऱ्या होत असत. त्यामुळं लोकांनी वस्तीवस्तीत गस्त ठेवणं सुरु केलं होतं. ते रात्रीलाही गस्त देत असत. शिवाय विचार केला होता की जर अशी झोपमोड करणारा एखादा चोर सापडल्यास त्याला चांगलंच पिटावं.
विचारांती काही लोकांची टोळीही सक्रीय होती. जे चोर असावेत असा संशय होता. ही मंडळी त्या शहरातील नव्हती. ना ही ती त्या देशातील वाटत होती. ही मंडळी कसलेली होती व ती मंडळी आपल्या हातांना चक्कं तेल लावून असायची. शिवाय ही मंडळी दिवसा भर वस्तीत भिकारी बनून यायची. चार दोन आणे मागायची व निघून जायची. ती कोणाला काहीही म्हणायची नाही. मात्र त्यांचे तेल लावलेले दंड चमकायचे. जेव्हा त्यावर सुर्याचं उन्हं पडायचं.
लोकांमध्ये दहशत व भीतीयुक्त तसं वातावरण होतंच. त्यातच ते चोर शोधतच होते. अशातच एका अज्ञात व्यक्तीचं बारीक लक्ष त्या वस्तीवस्तीत येणाऱ्या एका भिकाऱ्याच्या दंडाकडे पडलं. ते चमकत असल्यानं त्याला विचार आला की आपले दंड चमकत नसतांना या व्यक्तीचे दंड का चमकत असावेत? प्रश्नार्थी त्यानं आधी दुर्लक्ष केलं. कारण त्याला ते दंड त्याच्या शरीरावरुन निघणाऱ्या घामानं चमकत असावं असं वाटलं. परंतु नंतर क्षणातच त्याच्या लक्षात आलं. लक्षात आलं की हे दंड तेल लावल्याशिवाय चमकतच नाही. मग काय विचारांती त्याला वाटू लागलं की या व्यक्तीचे दंड जर तेल लावल्यानं चमकत आहेत तर यानं हाताला तेल लावलंच कसं? विचार करता करता त्याच्या सहजच लक्षात आलं की हे भर दुपारी वस्तीवस्तीत येणारे व भीक मागणारे लोकंच चोर असावेत. त्यांच्या दंडाला तेल लावण्याचं कारण म्हणजे जर एखाद्यानं त्याला चोर समजून त्याचा दंड पकडल्यास तो त्या दंडाला लावलेल्या तेलाच्या सहाय्यानं सहजच निसटून निघून जाईल नव्हे तर त्याला निसटून जाता येईल. मग काय, तोही चोर शोधतच होता व त्यानंही चोर शोधतच असतांना बर्‍याचशा रात्री अशा जागलीतच काढल्या होत्या. विचारांती त्यानं ती गोष्ट आपल्या काही मित्रांना सांगीतली व त्यांच्या दंडाला तेल लावण्याचं कारणही सांगीतलं. मग काय लोकांनी त्याला पकडलं व त्याला झोडपण्यासाठी त्याच्यावर काठ्यांनी वार करणे सुरु केले. जेणेकरुन त्याला चोरी करण्यापासून अद्दल घडावी.
ते लोकांचं काठीनं त्याला मारणं. त्यातच त्या काठ्या दंडाला तेल लावल्यानं दंडावरुन निसटून जाणं. त्यातच ती गोष्ट इतर त्याच्या सोबत्यांनाही माहीत झाली व ते त्याला वाचवायला आले. ज्यांनीही दंडाला तेल लावलेलेच होते.
लोकं मारत होते एका व्यक्तीला, तेही त्याला धडा शिकवावा म्हणून. त्यातच ती मंडळी मारणार नव्हती त्याला जीवंत. परंतु जसे त्याला वाचवायला इतर त्याची मित्रमंडळी आली व ती त्यांच्यावर वार करु लागली. ते पाहून आधीच जागली असलेले व त्रासलेले लोकं संतापले. तसं त्यांनी त्यांच्या दंडाला तेल लावण्यानं त्यांनाच चोर समजून त्यांना मारुन टाकलं व ज्यांनी मारलं. ते पळून गेले. तसं पाहिल्यास ती माणसं खाली मरुन पडली होती व मारणारे पळून गेले होते. परंतु त्या मृतावस्थेत असलेल्या प्रेतांना पाहायला लोकांची बघ्याची गर्दी गोळा झाली होती. लोकं आजुबाजूला उभे राहून पाहात होते. ज्यात ती प्रेतं खुणावत होती की त्यांनाही न्याय मिळावा. ज्यांनी त्यांना मारलं. ती मंडळी पकडली जावीत. मग काय, थोड्याच वेळात पोलीस आलेत व त्यांनी त्या प्रेताजवळ जे उभे होते व ज्यांनी त्यांना मारलं नव्हतं त्यांना. त्यांनाच पकडलं. मग काय, त्यांच्यावर खटले दाखल करुन त्यांना तुरुंगात टाकून दिलं होतं. ज्यात काही विद्यार्थीही होते. काही उच्च शिकलेले तरुणही होते. काही शिक्षक, प्राध्यापकही होते तर काही डॉक्टर व इंजीनियरही होते आणि काही समाजसेवक होते. ज्यांचा त्या प्रकरणात कोणत्याही स्वरुपाचा दोष नव्हता.
प्रत्येकांवर खटले दाखल झाले होते. विद्यार्थी ती प्रेतं पाहायला गेल्यामुळं त्यांच्यावर खटला दाखल झाल्यानं गुन्हा नसतांनाही त्यांना शिकता आलं नाही. तरुण युवकांना ती उच्चशिक्षित असली तरी त्यांच्यावर खटला दाखल झाल्यानं गुन्हा नसतांनाही नोकरी लागली नाही. तसेच प्राध्यापक, डॉक्टर, इंजिनिअर व समाजसेवकांचा गुन्हा नसतांनाही त्यांच्यावर खटला दाखल झाल्यानं बदनामी झाली. शिवाय नोकरीही गेली. असे बरेच खटले असतात की ज्यात गुन्हा नसतोच लोकांचा. तरीही त्यांच्यावर जबरदस्तीचे आरोप लागून खटले दाखल होत असतात. याबाबत दुसरं उदाहरण आहे. एके ठिकाणी जुगार सुरु होता व एक व्यक्ती तिथून जात होता. तो जुगार रस्त्यानच सुरु होता व तो जुगार सुरु असल्यादरम्यान त्या ठिकाणी पोलीस आले. तशी पोलिसांची चाहूल लागताच सर्वजण सैरावैरा पळाले. मात्र जाळ्यात अडकला तो त्या रस्त्यानं जाणारा व्यक्ती. जो गणमान्य होता.
अशी बरीच उदाहरणं सांगता येतील. जी आपली इच्छा वा गुन्हा नसूनही आपल्यासोबत घडत असतात. कधीकधी एखादा चोर आपल्या घरी येतो व आपल्यावरच वार करीत असतो. त्यातच आपण स्वतःचे रक्षण करीत असतांना आपल्या हातून नकळत गुन्हा घडतो. ज्याची परियंती खटल्यात होते व खटल्यातून तुरुंगात. ज्यात आपला गुन्हा नसला तरी शिक्षा. विशेष बाब ही की अशा खटल्यात शिक्षाच होवू नये. गुन्ह्याचे प्रारुप पाहायला हवे. जर एखादा गुन्हा जरी गंभीर असेल, परंतु तो जर बचावात्मक परिस्थितीत झाला असेल वा स्वतःचं संरक्षण करण्यासाठी केल्या गेला असेल तर तो गुन्हा ज्या माणसाने गंभीरपणे केला. त्यास शिक्षा करुच नये. कारण त्यानं जर ऐनवेळेस बचावात्मक पवित्रा घेतला नसता तर तोच आज जीवंत उरला नसता. उदा. एखादा हत्यारबंद चोर आपल्या घरी येणे. या प्रकरणात आपल्या घरी हत्यार घेवून चालत आलेला चोर चोरी करतांना हा विचार करीत नाही की तो सहजासहजी आपल्या चोरीच्या आड येणाऱ्या लोकांना सोडून देईल. तो त्याच्या चोरीच्या आड जे जे येतात. त्याला यमसदनी पाठवीत असतात. अशांना मारुन टाकणे हा गुन्हा नसावा. परंतु कायद्यातील तरतुदीनुसार जरी आपल्या घरी चोर आला असेल व त्याचा आपल्या हातानं खुन झाला असेल तर आपण जरी तो खुन बचावात्मक परिस्थितीत केला असला तरी खुन तो खुनच असतो. आणखी एक महत्वाची गोष्ट सांगायची झाल्यास उच्चशिक्षण घेतलेल्या तरुणांवर जर खटले असले तर त्यांना नोकरी लागत नाही. परंतु हेही तेवढंच चूक आहे. कारण या प्रकरणात आजुबाजूची मंडळी अशा उच्च शिकणाऱ्या व्यक्तीचा द्वेष करीत असतात. ज्यातून कोणताही आरोप लावून प्रकरण घडवलं जातं. कधीकधी एखादा गुन्हा घडलाच तर खटले दाखल होणारच. ते दाखल होत असतात. ते चालत असतात. त्यातच काही लोकं ते चालत असतांना सुधरतात. त्यांना पश्चाताप होतो व ते सामाजीक कामं करीत असतात. याच सामाजीक कामातून ते उच्चकोटीला पोहोचतात. त्यांची समाजात चांगली प्रतिमा तयार होत असते. अशातच खटल्याचा निकाल जाहीर होतो. अमूकाला अमूक अमूक कालावधीसाठी कारावास. ज्यातून जेवढी इज्जत कमवली, तेवढी फोल ठरते. शिवाय कधीकधी तरुणपणात एखादा अपराध समंजसपणा नसल्यानं घडून जातो. जसं एखाद्या राजकारण्याच्या पुकारलेल्या आंदोलनात तरुणाईचं सहभागी होणं. परंतु यात राजकारण्यांचं काहीच नुकसान होत नाही वा तो कधीच मागे वळून बघत नाही. कधी शहानिशा करीत नाही. कधीच पैसेही देत नाही. मात्र खटल्यामध्ये तारीख वर तारीख करीत हाच कार्यकर्ता खेटा घालत असतो. योग्यता असली तरी त्याला त्या खटल्यानं पुरेशी झोपही लागत नाही. एकंदरीत सांगायचं झाल्यास त्याचं शिक्षण आणि त्याची योग्यता पुर्णतः धुळीस मिळत असते.
महत्वाचं सांगायचं झाल्यास असे काही गुन्हे हे गंभीर गुन्हे ठरवू नये की जे गुन्हे अनवधानानं घडत असतात. जसं तरुणाईनं आंदोलनात घेतलेला सक्रीय सहभाग. असे गुन्हे की जे रक्षात्मक असतात. आपल्या घरी चोर येणे वा एखाद्यानं एखाद्या तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न करणे. असे गुन्हे की ज्यात व्यक्ती आपल्या सामाजीक कार्यानं योग्यता प्राप्त करतो. जसा. एखादा वैज्ञानिक, कलाकार वा साहित्यीक. परंतु अलिकडील काळात गुन्हा तो गुन्हाच धरला जातो. जरी एखाद्यानं जबरन बलात्कार करण्याचा प्रयत्न केला तरी, त्याला आमचे कायदे मारुन टाकण्याचा सल्ला देत नाही. एखादा चोर जरी घरात आला आणि त्याने आपल्याला जरी मारुन टाकण्याचा प्रयत्न केला तरी आमच्याकडील कायदे त्याला मारुन टाकण्याची परवानगी देत नाही. कारण आमच्याकडील कायदे हे बचावात्मक स्वरुपाचे नाहीत तर कोणत्याही चांगल्या व्यक्तीस गुन्हेगारच ठरवणारे आहेत. इथं जे खरे गुंड असतात. ते बाहेर मोकाट फिरत असतात आणि जे खरे गुंड नसतात. ते खटल्यामध्ये गुंतून असतात. परंतु त्यानं गुन्हा का केला? याची कोणतीच शहानिशा केली जात नाही. त्याचं कारण असतं वेळ. आमच्या न्यायालयात एवढे रोजचे खटले दाखल होत असतात की ते सोडवता सोडवता नाकी नव येत असतं. समजा एखादा खटला न्यायालयात गेलाच तर त्या खटल्यात आरोपीला शिक्षा सुनावण्याची वेळ म्हातारपणात येते आणि कायदा असा म्हणतो की आरोपी हा जेष्ठ नागरिक आहे. त्याला सोडून द्यावे. शिवाय न्यायालयात न्यायकक्षेचं मोजमाप होतांना जे गुन्हेगार नसतात, तेच गुन्ह्यात लटकतात आणि जे मुळ रुपातील गुन्हेगार असतात, ते मोकळे.
न्यायालयीन प्रक्रियेनुसार महत्वपुर्ण बाब ही की आज योग्यतेनुसार खटले कुचकामी ठरावेत. ते वेळीच संपवावेत. शिवाय जे गुन्हेगार खटले सुरु असतांना सामाजीक कामं करीत असतील आणि त्याची गोळाबेरीज ही जास्त असेल, गुन्ह्याच्या स्वरुपापेक्षाही, तर त्याला सोडून देण्यात यावे. खटल्याचा निकाल लावतांना ज्यानं खटला दाखल केला, त्याही व्यक्तीची रूपरेषा तपासावी. तो जर चांगल्या स्वभावाचा असेल वा तो सामाजीक कार्यकर्ता असेल तर आरोपीला खटल्यात शिक्षा अवश्य द्यावी. तेही आरोपींचे चरीत्र पाहून. अन्यथा बिचाऱ्यांना शिक्षा देवून गुन्हेगार बनण्यास बाध्य करु नये. कारण एखाद्याला जर शिक्षा झालीच, तर तो कधीच सुधारत नाही. उलट त्याच्यात बदल्याची भावना निर्माण होत असते व तो अट्टल गुन्हेगार बनत असतो. यात शंका नाही.
रुपालीला आठवत होता तिच्या बालपणीचा काळ. तेव्हा स्मार्टफोनचा नुकताच जन्म झाला होता. लोकं वेडेपिसे झाले होते स्मार्टफोन घेवून. तासन्‌तास ते त्याच स्मार्टफोनवर बसायचे. चॅटींग करायचे. त्यावेळेस त्यांना गंमत वाटायची. तसा रुपालीच्या आईनंही स्मार्टफोन घेतला होता व ती त्या स्मार्टफोनच्या आहारी गेली होती. त्यातच तिनं आपला विनाश केला होता स्मार्टफोनच्या आहारी जावून. ज्यात तिचा पती मरण पावला होता.
आज पाश्चात्य संस्कृती आपल्या देशात शिरु पाहात आहे. महिला सक्षमीकरण व समानतेच्या हत्यारानं विवाहासारखा एक चांगला संस्कार तुटू पाहात आहे. पाश्चात्त्य संस्कृतीच्या नादाला लागून लोकांनी कमी कपडे वापरायला सुरुवातच केली नाही तर विवाहासारखा चांगला संस्कारही मोडायला सुरुवात केली आहे. त्यातच महिलाच्या महिलाही आज नशेच्या अति आहारी गेल्याची चित्रे दिसत आहेत. आजची तरुणाई रात्रभर डॉन्सबारमध्ये नशा करीत झिंगत असलेली दिसते. ज्यात तरुणच नाहीत तर तरुणीही दिसतात. ज्या शिक्षणाच्या नावावर मायबापापासून कितीतरी दूर राहावयास गेलेल्या असतात. मोबाईलचा शोध लागल्यानं मायबाप येतीलच तर फोन करुन येणार, याचा अंदाज बाळगून. ज्यातून विवाहबद्ध होण्यापुर्वीच लिव्ह इन रिलेशनशीप तरुण तरुणीच्या नसानसात भरत असलेली दिसते. ज्याचा परिणाम विवाहबद्ध झाल्यानंतर तो करार स्वरुपाचा वाटतो व तो विवाह विवाहाच्या शपथा घेतल्यानंतरही पटकन तोडावासा वाटतो. ज्यातून कौटूंबीक न्यायालयात असंख्य कौटूंबीक खटले जोर पकडू पाहात आहेत. लोकं लिव्ह इन रिलेशनशिपचा रस्ता धरु लागलेले आहेत. परंतु लोकं हा विचार करीत नाहीत की आपण भारतीय आहोत. भारतात राहणारे, संस्कारी असलेले. आपल्या भारतात संस्काराचा खजिना असल्यानं आपल्याकडील वातावरण या संस्काराला टिकविण्यास साजेसे नाही. येथील वातावरण विदेशांसारखं आपल्या शरीरातील असुरक्षीत हार्मोन्स वाढू देत नाही. त्यामुळंच आपण चांगलं राहावं. संस्कारी राहावं व संस्काराची जपवणूक करुन आपण स्वतःला, आपल्या परिवाराला व आपल्या देशालाही बदनाम करु नये म्हणजे मिळवलं.
पती आणि पत्नी. गाडीचे दोन चाकच. यापैकी एक चाक जरी नसेल तरी गाडी चालत नाही. मात्र आजच्या काळात हीच चाकं डगमगायला लागलीत. कारण पती पत्नी नात्याचा अर्थच कुणाला समजलेला दिसत नाही.
अलिकडील काळात न्यायालयात वेगवेगळ्या स्वरुपाचे खटले अति प्रमाणात उभे राहात आहेत. त्या खटल्यात काही कौटुंबिकही आहेत. ज्याचे प्रमाण कितीतरी जास्त प्रमाणात अतिशयच आहे. याचे कारण काय? याचे कारण आहे पती पत्नींचं परस्परात न पटणं. शहाणी माणसं म्हणतात की दहा माणसं परवडली. परंतु एक बाई परवडत नाही. त्याचं कारण काय? त्याचं कारण एक उदाहरण देवून देतो.
दोन सख्खे भाऊ. त्या घरात एका भावाचा विवाह होईपर्यंत दोन्ही सख्ख्या भावाचं अतिशय चांगलं पटतं. परंतु जेव्हा त्या घरात एका भावाचा विवाह होतो व एक महिला घरात प्रवेश करते. तेव्हा पटणं कठीण जातं. याचं कारण काय? याचं कारण आहे ती महिला. ती महिला सारखी कुरघोडी करीत असते. सर्वच महिला द्रोपदीसारख्या जुळवून घेणाऱ्या नसतात. जसं द्रोपदीनं तिच्या पाचही पतींना अंतर दिलं नाही. जुळवून घेतलं. याचा अर्थ असा नाही की सर्वच महिला अशा वागतात आणि ज्या वागतही असतील, त्यांच्यात महिला सक्षमीकरणाचं वारं शिरलं असं समजण्याची गरज आहे.
आज महिला स्वतंत्र्य आहे. तिला पुरुषांसारखेच अधिकार मिळाले आहेत. त्यातच समानता असल्यानं समानतेच्या चक्करमध्ये बसून महिला पुरुषांवरच अधिराज्य गाजवत असते आणि असंच तिचं वावरणं असतांना कधी कधी कुटूंबात हलकेसे वावटळ उठतात. ज्यात कधी स्री तर कधी पुरुषांना त्या वावटळाशी जुळवून घ्यावं लागतं. तेव्हाच संसार टिकतो. परंतु अशा जुळवून घेण्याची गोळाबेरीज केली तर त्याचं प्रमाण अलिकडील काळात पुरुषात जास्त असतं. मग एखाद्या वेळेस पुरुषांनाही वाटतं की आपणच का सतत जुळवून घ्यायचं. तिनं का जुळवून घेवू नये. त्यानंतर तो संधी पाहात असतो. तद्नंतर पुन्हा एखाद्या वेळेस वावटळ उठतं. ज्यात पुरुष स्रीकडून जुळवून घेण्याची आशा करतो. परंतु ती महिला जुळवून घेत नाही. मग वितुष्ट निर्माण होत असतं. ज्याची परियंती पुन्हा एखाद्या तीव्र स्वरुपाच्या भांडणात वा एखादा संभाव्य विपरीत प्रसंग ओढवण्यात होतो. ज्यातून महिला आणि पुरुष यापैकी एकाचं जास्त नुकसान होत असतं.
पतीपत्नीच्या नात्यातही तसंच आहे. एक अनोळखी स्री व एक अनोळखी पुरुष, दोघंही जेव्हा विवाहबद्ध होतात. तेव्हा नाना तऱ्हेच्या शपथा टाकतात. त्यावेळेस दोघेही म्हणतात की मी तुला कधीच अंतर देणार नाही. परंतु जसा काळ ओसरत जातो. तसे पती व पत्नी असलेले ते जोडपे आपापसात भांडत असतात. कधीच जुळवून घेण्याचा प्रयत्न करीत नाही. त्यातच मीच का जुळवून घ्यावं? असाही प्रश्न निर्माण होतो. खरं म्हणजे एक महिला वा एक पुरुष जेव्हा पती पत्नी म्हणून विवाहबद्ध होतो. परंतु तसं विवाहबद्ध होण्याआधी त्यांनी वारंवार विचार करायला हवा की मी कोणत्याही परिस्थितीत परिस्थितीशी जुळवून घेईल व कधीच आमच्या नात्यात फारकत येवू देणार नाही. महिला असेल तर तिनं विचार करावा की मी माझ्या पतीच्या इच्छेविरुद्ध वागणार नाही व पुरुषांनी विचार करावा की मी माझ्या पत्नीच्या इच्छेविरुद्ध कधीच वागणार नाही. त्यानंतर समजा एखाद्या वेळेस भांडणाचं वावटळ उठलं आणि पतीचा आवाज तीव्र झाला तर पत्नीनं गप्प राहावं व कधी पत्नीचा आवाज तीव्र झालाच तर पतीनं गप्प राहावं. तेव्हाच नातं टिकतं. अन् तेवढंही करता येत नसेल तर आपल्या लेकरांकडं पाहावं. त्यांचा विचार करावा. त्यांच्या भविष्याचा विचार करावा. जेणेकरुन नातं टिकवता येईल. शिवाय विवाहबद्ध होण्यापुर्वी बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड असल्या तरी चालतील. परंतु विवाहानंतर त्या नसाव्यात. जेणेकरुन नातं टिकवता येईल. परंतु आज महिला सक्षमीकरणच्या व महिला समानतेच्या हत्याराने संपुर्ण पती पत्नीच्या नात्यांची वाटच लावून टाकलेली असून आज पती पत्नीचे नाते म्हणजे एक करार ठरत चाललेला आहे. केव्हाही करार करुन विवाहबद्ध व्हा आणि केव्हाही तो विवाहाचा करार मोडून विलग व्हा. परंतु ही गोष्ट निदान भारतासारख्या देशाला तरी शोभणारी गोष्ट नाही. कारण भारत हा संस्कारी देश आहे. येथील लोकांच्या नसानसात संस्कार कुटकूट भरलेला आहे. येथील लोकं विवाहाला करार मानत नाहीत. त्याला एक संस्कार मानत असून सोळा संस्कारामध्ये त्याला विशेष स्थान आहे. शिवाय तशी परिस्थितीही भारतात आहे. कारण भारत सुजलाम सुफलाम आहे. मात्र विदेशात भारतीय स्वरुपाची परिस्थिती नाही. म्हणूनच विदेशात विवाहाला संस्कार समजला जात नाही. एक करार समजल्या जातो. त्याचं कारण तेथील वातावरण. तेथील वातावरण हे विवाह टिकविणारं वातावरण नाही. कराराचंच वातावरण आहे. ज्यातून शरीरातील हार्मोन्सची संख्या वाढते. म्हणूनच करार करावा लागतो. परंतु भारतात तसं वातावरण नाही की माणसांना करारबद्ध होवून विवाह करावा लागेल. शिवाय इथं बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंडला थारा नाही. तरीही आजच्या काळातील काही मंडळी पाश्चांत्यांचं अनुकरण करतात आणि विवाहाला संस्कार न मानता त्याला करारबद्ध समजतात. ज्यातून अलिकडील काळात भारतातही लिव्ह इन रिलेशनशीपचे वारे वाहू लागले आहेत. अशी मंडळी विवाहाला एक करार मानू लागले आहेत. ज्यातून विवाहासारख्या संस्काराचे उच्छेदन होवू लागले आहे. यातूनच देशाचीही बदनामी होवू लागली आहे.
महत्वपुर्ण बाब ही की भारत देशात राहणाऱ्या तमाम विवाहबद्ध होणाऱ्या जोडप्यांनी विचार करावा की आपण भारत देशात राहात असून आपल्या भारत देशात हा संस्काराचा खजिना आहे. तो आधीपासूनच असून त्या संस्काराच्या खजिन्याला आपण पाश्चात्यांच्या नादी लागून व लिव्ह इन रिलेशनशीपचे वावटळ आपल्या मनात भरुन पाण्यात बुडवू नये की ज्यातून आपलंच नाही तर आपल्या कुटूंबाचं, आपल्या मुलाबाळाचं व आपल्या देशाचं नुकसान होईल. संस्काराचा खजिना नेस्तनाबूत होईल. एकंदरीत सांगायचं झाल्यास आपल्याही देशातील वातावरण असे संस्कार तुटल्यानं गढूळ होईल. मग आपले देशांतर्गत संस्कार तुटल्यानं भारत व पाश्चात्य यात फरक उरणार नाही. ज्यातून माणूसकी संपेल. पुत्र, आईला आई व भाऊ, बहिणीला बहिण म्हणणार नाही. हा सर्व परिणाम पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण केल्यानं होईल. हे तेवढंच खरं.
विदेशी संस्कृती व त्याला बळी पडलेली तिची आई रुख्मा. तिच्याचमुळं रुपालीच्या वडीलाची घडलेली आत्महत्या. सारं काही आठवत होतं रुपालीला. लोकांनी जरी तिच्या वडीलांच्या आत्महत्येला शेतकरी आत्महत्येचा दर्जा दिला असला तरी तिला ती आत्महत्या का झाली? याचं कारण माहीत होतं. ती विदेशी संस्कृती व त्या संस्कृतीचा हव्यास करणारी तिची आई. तिच्या आईच्या मनात संस्कार जरी असले तरी ते संस्कार पाहिजे त्या प्रमाणात तिच्या आईत नव्हते. तिची आईही विवाहबद्ध होण्यापुर्वी अशीच तरुणांसोबत रात्रभर राहायची. नशा करायची. त्याचं कारण म्हणजे तिचं शिक्षण. तिच्या वडीलांनी रुख्माला शिक्षणासाठी असंच कितीतरी दूर नेवून टाकलं होतं. ज्या ठिकाणी तिच्या वागण्यावर एवढासाही वचक नव्हताच.
रुख्मा या शहरात तिचा विवाह होण्यापुर्वी तरुणांशी लगट करीत फिरायची. जणू तिच्या मनात विदेशी वारे शिरले होते. रुख्माचे आईवडील तिला भेटायला जेव्हा जात असत. तेही फोन करुनच जात असत. त्यामुळंच तिला आईवडीलांपश्चात तरुणांसोबत अश्लील चाळे करायला फारच वेळ मिळत होता. रात्रभर नशा करतांना तिला कधीकाळी काहीच वाटलं नाही. मात्र उच्च शिक्षणाच्या नावावर तिचं सगळं खपत गेलं आणि अशातच विवाहाचं वय वाढलं. मग काय, ते विवाहाचं वय वाढताच तिच्यासोबत विवाहबद्ध होणारा कोणताच जोडीदार मिळेनासा झाला. तशी रुख्माची विवाहबद्ध होण्याची इच्छा नव्हतीच. परंतु ती देशात राहात असल्यानं व देशात विवाहाच्या संस्काराला प्राधान्य प्राप्त असल्यानं तिनं आईवडीलांच्या इच्छेखातर नाईलाजानं विवाह केला. तोही एका शेतकऱ्याशी. परंतु विवाहबद्ध झाल्यानंतर ना तिचं संसारात मन रमत होतं. ना ती संसारात पडली होती. अशातच तिला विवाहबद्ध झाल्यानंतरही लिव्ह इन रिलेशनशीपच आवडत होती. तिला विवाहबद्ध होणे म्हणजे बंधनात अडकणे वाटत नव्हते तर तिच्या दृष्टीकोनातून विवाहबद्ध होणे म्हणजे स्वतःच्या शरीरातील शरीर अवयवांचं मनोरंजन करणे होते. अशातच तिला गर्भ राहिला व तिला एक कन्या झाली. जिचं नाव रुपाली ठेवण्यात आलं होतं.
रुख्मा जेव्हा गरोदर होती. तेव्हा तिला गरोदरपण आवडत नव्हतं. ते एक तिला बंधनच वाटत होतं. त्यातच तिनं तो गर्भ पाडण्यासाठी दोनचार वेळेस गर्भनिरोधक गोळ्याही घेतल्या होत्या. परंतु त्याचा तिच्या गर्भावर कोणताच परिणाम झाला नाही. शेवटी जे व्हायचं तेच झालं व रुख्मानं एका कन्येला जन्म दिला.
सुरुवातीला रुख्मानं आपली कन्या रुख्माचं पालनपोषण व्यवस्थीत केलं. परंतु ते पालनपोषण करतांनाही तिनं आपलं दूध पाजलं नाही. सौंदर्याचा ऱ्हास होतो म्हणून तिनं गाई म्हशीचं दूध आपल्या लेकीला पाजलं होतं. त्यानंतर फालतूची कटकट नको म्हणून ती आपल्या मुलीला वसतीगृहात टाकू पाहात होती. परंतु तिचा पती बालकृष्णाला वाटत नव्हतं की आपल्या एकुलत्या एका मुलीला वसतीगृहात टाकावं. तो तसा विरोधच करीत होता.
दिवसामागून दिवस जात होते. आता बालकृष्ण जगात नव्हता. तो केव्हाच आत्महत्या करुन कितीतरी दूर निघून गेला होता. त्यातच तिही घरदार व शेती विकून शहरात आली होती. त्यातच तिनं आपले छंद जोपासले होते. परंतु आपल्या मुलीलाही सोडलं नव्हतं.
रुपालीच्या आईचं आपल्या मुलीवर निरतिशय प्रेम होतं. ती तिला शिक्षण शिकवू पाहात होती. परंतु ते शिक्षण शिकवितांना तिला फार मोठी अडचण येत होती. त्यातच तिला वाटत होतं की शिक्षण निःशुल्क करावं. मात्र सरकार शिक्षण निःशुल्क न करता बाकी साऱ्या गोष्टी निःशुल्क करीत होते. त्यांनी पंच्याहत्तर वर्षे वयाच्या वयोवृद्ध लोकांना एसटी बसमध्ये प्रवासाची व्यवस्था निःशुल्क केली होती. लाडली बहिण योजना आणून महिलांना दिड हजार रुपये महिना केला होता. सुशिक्षीत बेरोजगारांना वेतन देणं सुरु केलं होतं. शिवाय तसंच वयोश्री योजनेअंतर्गत पासष्ट वर्षावरील लोकांना तीन हजार रुपये महिनाही सरकार देत होते. त्यातच सरकार राशनकार्ड धारकांना मोफत धान्य देत होते. ज्यामुळं लोकं आळशी झाले होते. त्यामुळं करायचंच असेल तर शिक्षण निःशुल्क करावं, असं रुख्माला वाटत होतं.
एका ठिकाणचं भाषण. शिक्षणमंत्र्यांनी केलेलं वक्तव्य. एका प्रसिद्ध वर्तमानपत्राला छापून आलेली बातमी. ते वक्तव्य विद्यार्थी दृष्टीकोनातून अतिशय सुंदर आणि शिक्षक दृष्टीकोनातून अतिशय हानीकारक अशा स्वरुपाचं होतं. जे वर्तमानपत्रातून झळकलं होतं. ज्यातून शिक्षकांच्या अस्तित्वाचीच हत्या दिसून येत होती.
शाळा ही शाळेसारखी असावी. तिथं शिकवितांना शिक्षकांनाही करमावं व विद्यार्थ्यांनाही करमावं. जर विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना करमत नसेल तर ती शाळा, शाळा राहात नाही. ती खायला धावत असते.
शाळा खायला का धावते? शाळा खायला धावत असते. त्याचं कारण असतं शाळेचं प्रशासन व प्रशासनातील माणसांचं वागणं. आताच्या काळात शाळेला जे व्यवसायीक महत्व प्राप्त झालेलं आहे. त्यातून शाळेतील मुलांना शिकवणं वाटत नाही व शिक्षकांनाही शिकवावसं वाटत नाही. ज्यातून शिक्षकांचं नाही. परंतु विद्यार्थ्यांचं अतोनात नुकसान होत असतं.
शिक्षकांना का शिकवावंसं वाटत नाही? त्याचं कारण असतं प्रशासनाचं त्यांचेशी वागणं. शिवाय त्याला शाळेतून जो त्रास असतो. त्यातून त्याचं शिकवायला मन लागत नाही.
शिक्षकांना शिकवावसं वाटत नाही. त्याचं कारण त्याला असलेला त्रासच. हा त्रास अलिकडील काळात शाळेला व्यवसायीक स्वरुप प्राप्त झाल्यानं त्या शाळेतील व्यवस्थापन प्रमुख हा पैसे कमविण्यासाठी संबंधीत शिक्षकांना पैसे मागत असतो. शिवाय तो पैसा त्या शिक्षकानं न दिल्यास त्याला त्रासच देत असतो.
शिक्षक हा असा व्यक्ती आहे की त्याला कितीही त्रास असला तरी तो विचलीत होत नाही. तो प्रामाणिक असतो व आपले कार्य व्यवस्थीत आणि इमानीइतबारे पार पाडत असतो. त्याला सत्य बोलणं आवडतं व असत्य गोष्टीचा तो त्रागा करीत असतो. शिवाय आज जरी शाळेला व्यवसायीक दर्जा प्राप्त झाला असला तरी तसं व्यवसायीक स्वरुप आजच्या शिक्षकाला आवडत नाही.
पुर्वी शाळा अशा स्वरुपाच्या नव्हत्या. त्यात सेवाभावाचा दृष्टिकोन होता व प्रत्येक जण शाळा या सेवेसाठीच उघडत होते. ज्यातून विद्यार्थी साक्षर करणे हेच महत्वाचे उद्दीष्ट होते. आज मात्र तसं नाही. आज पोट भरण्यासाठी शाळा आहे. त्यातच शिक्षकांचं पोट भरावं. म्हणून तेही शाळेत शिकवीत असतात.
विशेष बाब ही की शाळा, शाळेसारखी असावी. ती कोणाचं पोट भरण्याचं साधन नसावी. सेवेचा दृष्टिकोन असावा. त्यातून जास्त अतिरिक्त पैसा कोणीही कमवू नये. शिवाय त्यातून अतिरिक्त पैसा कमवू नये आणि तोही वाम मार्गानं कमवू नये. त्यातच कोणाचेही मन दुखवून तो कमवू नये. परंतु ऐकतो कोण? आज शासन अनुदान देत असतांनाही बरेचशा खाजगी शाळेतील संस्थाचालक त्यांच्याकडे भरपूर पैसा असूनही ते देण म्हणून शिक्षकांकडून जबरन पैसा वसूल करतात. शिवाय विद्यार्थ्यांकडूनही परीक्षेच्या शुल्काच्या स्वरुपात पैसा घेतच असतात. त्यातच पोशाख, पुस्तके, वह्या शाळेतच देत असतात व त्यातून पैसा कमवीत असतात. समजा शिक्षक वा विद्यार्थी यांनी अशा अतिरिक्त शुल्काच्या स्वरुपात पैसा न दिल्यास त्यांना अतिरिक्त वेदनादायी त्रास देत असतात. ज्यातून विद्यार्थ्यांचं नुकसान होतं.
मूल्यांकनाच्या बाबतीतही असंच खाजगी शाळेचं वागणं असतं. मूल्यांकन जसं विद्यार्थ्यांचं होतं. तसंच मूल्यांकन शिक्षकांचंही केलं जातं. ते गोपनीय अहवालाच्या स्वरुपात. गोपनीय अहवाल मुख्याध्यापक भरत असतांना तो संस्थाचालकाला विचारुन भरतो. ज्यात असे असे ताशेरे ओढलेले असतात की ते ताशेरे बदलवता येत नाहीत. असे ताशेरे हे गुणांवर आधारीत नसतात. ते देणगीवर आधारीत असतात. ज्यात संस्थाचालक व मुख्याध्यापक एक गुंड म्हणून शिक्षकांसमोर दाखल होत असतो. तो त्या शिक्षकांना विद्यार्थ्यांची परिक्षाही घेवू देत नाही. प्रसंगी कधीकधी शिकवूही देत नाही. ती परिक्षा तोच एखाद्या शिक्षकामार्फत घेतो. त्याच शिक्षकांना तपासायला लावतो. शिवाय निकालही दुसरेच शिक्षक लावतात. शेवटी आरोप लावला जातो की संबंधीत शिक्षक त्या वर्गाला शिकवीत नाही. अशा एकंदर समस्याग्रस्त वातावरणातून शिक्षक जात असतात. त्या शिक्षकाला शाळेत जावेच वाटत नाही. त्या शिक्षकांना शिकवावेसे वाटत नाही. काही शिक्षकांना वेतनही अत्यल्प असतं. तेही बरोबर शिकवीत नाही. जरी शिक्षण ही प्रक्रिया सेवाभावी पणाची असली तरी. तसंच काही खाजगी शाळेत नातेवाईक मंडळीही शिकवीत नाहीत.
शाळेतील विद्यार्थी हे निष्पाप घटक. ते वयानं लहान असतात व त्यांना शाळेतील वातावरण कळत नाही. शाळेतील राजकारणही कळत नाही. भांडणं, देणग्या, नात्यातील माणसं, अत्यल्प वेतन या सर्व गोष्टींपासून विद्यार्थी दूर असतात व त्यांचा शाळेतील राजकारणाशी काही घेणं देणं नसतं. त्यांना हवं असतं चांगलं शिकविणं. जे चांगलं शिकविणं त्यांना आवडतं. त्यासाठीच ते शाळेत येत असतात व त्यांना शाळा आवडत असते. परंतु वरील सर्व प्रकारातून अत्याचार ग्रस्त असलेला शिक्षक जर आपल्या विद्यार्थ्यांना शिकवू शकत नसेल तर ती शाळा त्याला कंटाळवाणी वाटते. त्याला शाळेत शिकावसं वाटत नाही व तो आपल्या शाळा सोडण्याचा दाखला मागून दुसऱ्या चांगल्या शाळेत जात असतो. अशानंच शाळेची पटसंख्या कमी होते व शाळा तुटते. परंतु आता शाळेत विद्यार्थी दाखवा अशी पद्धत आल्यानं बरेचसे मुख्याध्यापक अज्ञानी पालकांना मुर्ख बनवून टिस्याच देत नाहीत व नाईलाजानं विद्यार्थ्यांची इच्छा नसतांनाही व पालकांची इच्छा नसतांनाही त्या पालकांना अशा न आवडणाऱ्या शाळेत शिकावं लागतं. त्यातच अशा विद्यार्थ्यांनाही त्या शाळेत शिकावं लागतं. ज्यातून विद्यार्थ्यांचं अतोनात नुकसान होतं.
महत्वाचं म्हणजे शाळा ही विद्यार्थ्यांचं भवितव्य बनविण्याचं एक महत्वाचं माध्यम आहे. ज्यातून देशाचं भवितव्य तयार होत असते. देश विकासाच्या क्षेत्रात आघाडीवर जात असतो. परंतु अशा प्रकारच्या शाळा असतील आणि ज्यातून शिक्षकांना त्रास असेल, विद्यार्थी व पालकांना त्रास असेल तर खरंच विद्यार्थ्यांनी काय शिकावं त्या शाळेत? जे त्या विद्यार्थ्यांच्याच कामाचं नाही, ते देशाच्या तरी कामात येवू शकेल काय? शिवाय खरंच विद्यार्थ्यांचं भवितव्य तरी उज्ज्वल बनेल काय? असे अनेक प्रश्न आहेत.
अलिकडील काळात शाळा व महाविद्यालयीन शुल्क ही चिंतेची बाब आहे. साधारण डॉक्टर, इंजिनिअर वा इतर तत्सम पदव्या शिकविणाऱ्या महाविद्यालयातील शुल्क हे कितीतरी लाखाच्या वर आहे. जे शुल्क गरीब परीवारातील लोकं देवू शकत नाहीत. मग गरिबांच्या मुलांनी त्यांना आवड असेल तर डॉक्टर, इंजिनिअर बनू नये काय? त्यांनी काय केवळ हमालीचीच कामं करावी? गरीब घरातील मुलींनी श्रीमंत घरातील कपडे धुणे व भांडे धुण्याचेच काम करावे काय? शिकू नये काय? हे सर्व प्रश्न अधोरेखीत करणारे आहेत.
वरील बाबतीत मात्र शिक्षणमंत्र्यांनी एके ठिकाणी भाषणादरम्यान म्हटलं की मुलांना एखाद्या गुरुंजींनी चांगले न शिकविल्यास त्यांना सहा महिने प्रशिक्षण देणार. यादरम्यान पुर्ण वेतन देणार. त्यातही तो सुधरला नाही तर त्याला सुधारण्याची संधी देवून त्याला अर्धे वेतन देणार. त्यातही त्याच्या सुधारण्याची चिन्हं दिसली नाही तर त्याला नोकरीतून काढून टाकणार.
मा. शिक्षणमंत्र्याचं ते बोलणं. ते बोलणं विद्यार्थी दृष्टीकोनातून रास्त आहे व विद्यार्थ्यांना न्याय देणारं आहे. परंतु मा. शिक्षणमंत्र्यांना खाजगी शाळेतील शिक्षकांचे हाल माहीत नसावेत असे वाटते की त्यांनी तसं वक्तव्य केलं. ज्यातून शिक्षक जरी दोषी नसला तरी तो दोषयुक्तच वाटतो नव्हे तर त्याला बनवलं जातं, जाणूनबुजून व जबरदस्तीतून. जरी त्याचं बरोबर असलं तरी. कारण खाजगी शाळेत शिक्षण प्रक्रिया राबविणारा घटक हा संस्थाचालक असतो, जो कोणत्याही शिक्षकाला देणसाठी बदनाम करीत असतो. तोच इतर शिक्षकांच्या सहकार्यातून चांगल्या शिक्षकालाही बदनाम करुन त्याचं संपुर्ण जीवन उध्वस्त करीत असतो हे तेवढंच खरं.
विशेष सांगायचं झाल्यास जर शिक्षण मंत्र्यांना थोडीशीही या विद्यार्थ्यांची दया येत असेल वा त्यांच्या ह्रृदयात विद्यार्थ्यांबाबत थोडासा जरी कळवळा असेल तर त्यांनी शिक्षणासारख्या पवित्र गोष्टीला संस्थाचालकाच्या हातात देवू नये की जो संस्थाचालक स्वतःला शिक्षण सम्राट म्हणवितो. परंतु पदड्याआड त्या शिक्षणातून अतोनात पैसा कमवतो. ज्यातून शिक्षणाची मुल्यच समाप्त होवून जातात. हं, शिक्षणाबद्दलचा खरा विचार शिक्षणमंत्र्यांना करायचाच असेल तर त्यांनी महाविद्यालयातील सर्वच पदवींचं शिक्षण सर्वांसाठीच निःशुल्क करावं. तोच एक भेदभाव नष्ट करावा. ज्यातून गरीबांचीही मुले उच्च शिक्षण घेवू शकतील. शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यात गरीब श्रीमंत अशी दरी निर्माण होणार नाही व प्रत्येकच मुलगा डॉक्टर, इंजिनिअर वा तत्सम उच्चतम पदवीधारक बनून देशाची सेवा करु शकेल.
शिक्षण निःशुल्क होवो की न होवो. त्याची झळ काही उद्योगपत्यांना पोहोचणार नव्हती. ती गरीबांना पोहोचणार होती. त्याचाच विचार करुन शिक्षक आतातरी थांबा, आम्हाला विद्यार्थी घडवायचेय. असे म्हणत होते.
विद्यार्थी शिकवा अशा अर्थाची सरकारची आरोळी. ते शिकले पाहिले व त्यांना सर्वांगीण ज्ञान आले पाहिजे म्हणून सरकारचे प्रयत्न. ते राबवीत असलेले उपक्रम. त्यातच नुकताच शालेय साप्ताहिक उपक्रमाअंतर्गत आठवड्याभराचा एक शैक्षणिक उपक्रम पार पडला. ज्यात विद्यार्थ्यांचे दोन तीन दिवस वाया गेलेत. ज्यात नाटिका, खेळ, निबंध, कथाकथन, नृत्य यावर भर दिल्या गेला होता. त्यातच तीन दिवसाची पायाभूत चाचणीही घेण्यात आली. त्यातही एक दिवस वाया गेलाच आणि आता पुन्हा शासनानं माझी शाळा या उपक्रमाअंतर्गत महिनाभर आणखी उपक्रम राबविण्याचे ठरवले आहे. उद्देश आहे की विद्यार्थी सर्वकष शिकायला हवा.
शिक्षणाच्या बाबतीतील इतिहास थोडक्यात असा आहे. शासनानं मुख्यमंत्री माझी शाळा हा उपक्रम राबविला होता. ज्यात मातीच्या वस्तू बनविणे, वृक्षारोपण करणे, शाळा व परीसर स्वच्छ करणे, इत्यादी गोष्टी केल्या होत्या. ज्यात पंच्यान्नव प्रतिशत शाळातील दोन कोटी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. उरलेल्या पाच प्रतिशत शाळेतील विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला नाही. कारण त्या कॉन्व्हेंटच्या शाळा होत्या व काही शाळेत काही अपरिहार्य कारणानं उपस्थित झालेले नसल्यानं त्यांना सहभाग घेता आला नाही. त्यातच निवडणूक साक्षरता करणे, नवसाक्षर शिकविणे, शाळाबाह्य विद्यार्थी शोधणे, बी एल ओची कामे करणे इत्यादी कामं देखील शिक्षकांच्या वाट्याला येत असतात.
खरं सांगायचं झाल्यास ही संकटं आहेत. विद्यार्थ्यांना सर्वकष ज्ञान देत असतांना त्यात येणारी संकटं. त्यातच सर्वच शिक्षकांनी वर्षभर विद्यार्थ्यांना काय शिकवायचं, काय नको. याचं नियोजन तयार केलेलं असतं. त्यातच शासनाचे असे उपक्रम आलेच की शिक्षकांच्या शिकविण्यात व्यत्यय निर्माण होतो. नियोजन कुठेतरी बिघडतं. ते बिघडत असतांना शालेय अभ्यासक्रम मागे पडतो व सर्वात शेवटी विद्यार्थी हा घटक शालेय अभ्यासक्रम बरोबर शिकू शकत नाही. अन् सर्वात शेवटी शासन विचारतं, 'आपल्या विद्यार्थ्यात किती प्रगती झाली?' काय बोडकं प्रगती होणार?
विद्यार्थी शिकविण्यात चूक शासनाची असते. शासनाच्या काही काही चुकीच्या ध्येयधोरणानं शिक्षक पुरेपूर आपल्या विद्यार्थ्यांना शिकवू शकत नाही. कारण त्यांना पुरेसा वेळच मिळत नाही. शिवाय सध्याच्या काळात ऑनलाईन कामाचीही सरबत्ती. तासन्‌तास नेट बरोबर न चालत असल्यानं शिक्षकाला जशा राशनच्या दुकानात रांगा लावाव्या लागतात. तशाच रांगा नेट कॅफेमध्ये लावाव्या लागतात. तरीही कामं पुर्ण होत नाहीत. शासनाला फक्त कामं हवीत. ती कामं कोण कशी करतो? त्या मार्गात कोणकोणत्या अडचणी येतात? त्याचं काही घेणंदेणं नसतंच. शिवाय काही शासनाविरोधात खुलेआम बोलतो म्हटल्यास संबंधीत शिक्षकाला उजागीरीही नसतेच. त्यावर कारवाई होवू शकते.
असा आमचा शिक्षक शासनाचा अन्याय झेलत झेलत नोकरी करीत असतो. तो त्याही संकटांवर मार्ग काढून आपल्या विद्यार्थ्यांना शिकवीत असतो. कारण तो आपल्या विद्यार्थ्यांना केवळ विद्यार्थी समजत नाही तर आपलं मुलच समजतो. ज्यातून जसा तो आपल्या स्वमुलाचे नुकसान चाहात नाही, तसंच नुकसान विद्यार्थ्यांचंही चाहात नाही. यात महत्वपुर्ण बाब ही की विद्यार्थी व शिक्षकांच्या या कार्यात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा करायचा? याची कल्पना शिक्षकांना असतेच. कारण ते स्वतः राबतात. त्यांची अख्खी हयात जात असते विद्यार्थी शिकविण्यात. त्यांना त्या गोष्टी सांगण्याची गरजच नाही. अमूक अमूक गोष्टी करा, अमूक अमूक गोष्टी करु नका. कारण ते काही एसीच्या कमऱ्यामध्ये बसून अभ्यासक्रम वा शासन निर्णय तयार करीत नसतातच. शिवाय त्यांना जे वेतन मिळतं. ते वेतनदेखील त्यांच्या मेहनतीचं फळ असतं. शिवाय त्यांचं काम फक्त विद्यार्थी शिकविणं. अशावेळेस काय गरज आहे त्यांना निवडणूक साक्षरता ही मोहीम राबवायची? प्रत्येक मतदारयादीतील व्यक्ती शोधायची? हं, ठीक आहे की निवडणूक आहे व ती निवडणूक पार पाडली जात असतांना कर्मचारी अपुरे पडत असल्यानं त्या जागी दोन तीन दिवसासाठी नियुक्ती करणं व ते नियोजन राबवणं. परंतु निवडणूक साक्षरता ही मोहीम ना त्या शिक्षकांची मोहीम आहे, ना त्या विद्यार्थ्यांची. कारण फायद्याची गोष्ट केल्यास त्याचा फायदा हा राजनेत्यांनाच होतो. कोणताही व्यक्ती निवडून आला तरी. शिवाय मतदानाची टक्केवारी विचारात घेतल्यास ज्याला मतदान करायचे तो करतोच आणि ज्याला मतदान करायचे नाही, त्याला कितीही वेळा समजावून सांगितले तरी तो मतदान करीत नाही. हे मागील लोकसभेच्या मतदानाची प्रक्रिया राबवितांना प्रत्यक्षात दिसलंच. मग काय गरज आहे या कामी विद्यार्थी व शिक्षकांना गुरफटून घ्यायची आणि त्यातून विद्यार्थ्यांचं नुकसान करण्याची. असाच दुसरा मुद्दा असा की नवभारत साक्षरता. होय, शिक्षकांचं काम आहे शिकविणं. तो कोणालाही शिकवू शकतो. परंतु त्याचा अर्थ असा नाही की त्यानं शाळा सोडलेल्या, वय मोठे झालेल्या तसेच शिकूनही व्यवहार ज्ञान न शिकलेल्या लोकांना शिकविणे. ज्यात वेळ जाईल व जे त्याचं कार्य आहे, तेही कार्य त्याला करता येणार नाही.
महत्वाचं म्हणजे शिक्षकांचं काम आहे शिकविणे. त्या कोवळ्या कळ्यांना शिकविणे, त्यांच्यात योग्य ते संस्कार भरणे. त्यांना उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच तयार करणे. जेणेकरुन ते जर तयार झालेच तर उद्या तेच विद्यार्थी आपल्या ज्ञानाचा वापर करुन आपल्या देशाचा विकास करु शकतील. शिवाय जे शिकले ते शिकले. त्यांना आता नवभारत साक्षरतेच्या नावानं शिकवून काही उपयोग नाही. कारण कालच जे शिकू शकले नाहीत. ते आज काय शिकणार? हं, शाळाबाह्य विद्यार्थ्यांचं ठीक आहे की बिचाऱ्यांवर संकट आल्यानं ते शिकू शकले नाहीत. त्यांना शोधून त्यांच्या खानपानाची व्यवस्था लावून त्यांचं शिक्षण केलं गेलं तर कदाचीत त्यांचा देशाला उपयोग तरी होईल. राहिली गोष्ट असे विविध शालेय उपक्रम राबवायची. ते शिक्षकांवर सोडावं. ते बरोबर राबवतात. आपआपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावून. जसा वेळ मिळेल तसा. त्यांना अमूक अमूक उपक्रम राबवा. तरच विद्यार्थी शिकतील. हे सांगण्याची गरज नाही. कारण ते स्वतः शिक्षक आहे व त्यांनाच विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबत काय करायचं, ते सगळं कळतं.
विशेष सांगायचं म्हणजे जसं आपल्या घरी आपण काय खावं आणि काय खावू नये. हे कळत असतं. तसंच शिक्षकांनाही काय आणि कसे शिकवावे हे सारंच कळतं. तेव्हा अमूक अमूक असे उपक्रम राबवा. विद्यार्थी घडतील हे सांगण्याची व ते सांगत असतांना ते विशिष्ट कालावधीतच राबवायची काहीही आवश्यकता नाही. कारण वेळेच्या पुर्वी व वेळेच्या नंतर काहीच गोष्टी घडत नाहीत. वेळ आल्यावरच सर्व गोष्टी घडतात. त्यातच अध्ययन प्रक्रियादेखील. शिवाय असे जर उपक्रम वेळेआधी राबवले तर नक्कीच खेळखंडोबा झाल्याशिवाय राहणार नाही. मग ना त्यावेळेस विद्यार्थी शिकतील, ना शिक्षक बरोबर शिकवू शकतील. अशावेळेस नुकसानच होईल. जे नुकसान पुढील काळात कधीच भरुन निघणार नाही. अन् तसंच जर झालं तर उद्या जे आज विद्यार्थी आपल्या हातात आहेत. तेच विद्यार्थी शाळाबाह्य होतील. ज्यांना शोधून नवभारत साक्षरता अभियानांतर्गत शिकवावे लागेल, यात शंका नाही. तेव्हा आज जी परिस्थिती आहे. त्या परिस्थितीत शासनानं आतातरी थांबावे. उपक्रमाचा तगादा लावू नये. कारण शिक्षकांजवळ भरपूर कामं आहेत. ऑनलाईन कामंही पुरेशी आहेत. त्यामुळं कोणत्याही शिक्षकांच्या शिकविण्यात आणि कोणत्याही विद्यार्थ्यांच्या शिकण्यात उपक्रमाअंतर्गत व्यत्यय आणू नये व त्यांना त्यांच्या मताने शिकवू द्यावे. विद्यार्थी घडवू द्यावे. म्हणजे झालं. वाट पाहू नये त्या शिक्षकांची. जेव्हा शिक्षक ओरडतील व निक्षून शासनाला सांगतील की पुरं झालं उपक्रम राबवणं. आतातरी थांबा, आम्हाला विद्यार्थी घडवायचेय.