Mala Spes Habi Parv 2 - 27 in Marathi Short Stories by Meenakshi Vaidya books and stories PDF | मला स्पेस हवी पर्व २ भाग २७

Featured Books
  • ભીતરમન - 59

    મુક્તારના જીવનમાં મારે લીધે આવેલ બદલાવ વિશે જાણીને હું ખુબ ખ...

  • ભાગવત રહસ્ય - 121

    ભાગવત રહસ્ય-૧૨૧   ધર્મ -પ્રકરણ પછી હવે -અર્થ -પ્રકરણ ચાલુ થા...

  • કૃતજ્ઞતા

      આ એ દિવસોની વાત છે જ્યારે માનવતા હજી જીવતી હતી. એક ગામમાં...

  • નિતુ - પ્રકરણ 53

    નિતુ : ૫૩ (ધ ગેમ ઇજ ઓન)નિતુને કૃતિ સાથે વાત કરવાની જરૂર લાગી...

  • સંઘર્ષ - પ્રકરણ 13

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

Categories
Share

मला स्पेस हवी पर्व २ भाग २७

मला स्पेस हवी पर्व २ भाग २७


नेहा ऑफिस मध्ये आपलं काम बघत असताना

“आता येऊ का?”

हे शब्द कानावर पडले तसं नेहाने मान वर करून बघीतलं. केबीनच्या दारात तिला छकू ऊभी असलेली दिसली. आता ही माझ्या कडे कशासाठी आली आहे हा विचार नेहाच्या मनात आला पण तरीही हसून नेहाने तिला वेलकम केलं.

छकू नेहा समोरच्या खुर्चीवर बसली.
थोड्या वेळ दोघीही काहीच बोलल्या नाही. छकू बोलायला कशी सुरवात करावी या विचारात होती तर तिला आता काय बोलायचय यांचा विचार नेहा करत होती.एकूतच दोघीही संदीग्ध मनस्थितीत होत्या. शेवटी नेहाच म्हणाली,

“ इकडे कशा काय आलात?”

“ हं. तुम्हाला हा प्रश्न पडणं सहाजिकच आहे. मी तुम्हाला धन्यवाद द्यायला आले.”

“कशासाठी?”

नेहाल काहीच कळलं नाही.

“धन्यवाद कशाला?”
नेहाने विचारलं.

“तुम्ही समजून वागल्या म्हणून. रमण फ्लर्ट आहे. पण तो कधी चांगल्या स्त्रीच्या मागे लागला नाही.त्याला स्वतःहून ज्या स्त्रिया आव्हान द्यायच्या. त्याच्या जवळ येण्याचा प्रयत्न करायच्या त्यांनाच रमणने फिरवलं. पण तुमची गोष्ट वेगळी होती. तुमच्या साध्या सरळ स्वभावाच्या, तुमच्या हुशारीच्या प्रेमात तो पडला. इतर स्त्रियांप्रमाणे तुमचं वागणं सवंग नाही हे त्याच्या लक्षात आलं. तुमच्या मैत्री साठी मात्र तो जीवापाड धडपडला. हे मला कळलं नव्हतं.कदाचित कधीच कळलं नसतं.त्या दिवशी तो अर्धवट शुद्धीत तुमच्या बद्दल बोललास तेव्हा मला कळलं. रमणच्या आजारपणाची कारणही कळलं.”

“यात माझी काही चूक नाही.”
नेहा म्हणाली.


“नाही तुमची चूक नाहीच. रमणच्या तोंडून तुमचं नाव ऐकल्यावर मी तुम्हाला मुद्दाम भेटायला आले. तुमच्याशी बोलले तेव्हा लक्षात आलं रमण का तुमच्या प्रेमात पडल ?म्हणून मला तुमच्या आयुष्यात वादळ येऊ नये ही इच्छा होती. याच कारणासाठी मी रमणला खूप समजावून सांगितलं. तो तुमची माफी मागायला आला होता हे मला माहीत नव्हतं. त्याने आल्यावर मला सांगीतलं. तुम्ही रमणला माफ केलं म्हणून त्याची तब्येत आता सुधारते आहे. त्याच्या मनात जे गिल्ट होतं ते निघालय. माझा रमण मला परत मिळाला आहे. तुम्ही जर त्याला माफ केलं नसतं तर त्याचं आयुष्य बरबाद झालं असतं. तो नैराश्याच्या दरीत कोसळला असता. तुमच्या एका वाक्याने या सगळ्या संकटातून फक्त रमण नाही आमचं कुटुंब वाचलं आहे म्हणून तुम्हाला धन्यवाद द्यायला आले आहे.”

नेहाला हे सगळं नवीन होतं. छकूच्या बोलण्यावर काय बोलावं तिला कळत नव्हतं. ती छकूकडे एकटक बघत होती.
छकूच्या लक्षात आलं की नेहा गोंधळली आहे.

“तुम्ही गोंधळला आहात. तुम्ही काय मनस्ताप सहन केला आहे याची जाणीव मी एक स्त्री असल्याने मला आहे. तुम्हाला पहिल्यांदा भेटल्यावर मला तुमचा साधेपणा भावला. तुमच्या चेहऱ्यावर जो शांत आणि स्थीर भाव आहे तो मला आवडला. याच कारणामुळे रमण तुमच्या प्रेमात पडला. आत्तापर्यंत त्याच्या आयुष्यात ऊत्छ्रृंखल बायकांचं आल्या.ज्यांना कधीच त्याने इतकं सिरीयसली घेतलं नाही. कारण त्या बायका रमणच्या देखण्या रूपावर भाळल्या आणि त्यांचं सर्वस्व त्यांनी रमणला अर्पण केलं हे रमण जाणून होता. पण तुमची गोष्ट वेगळी असल्याने त्याला तुमच्या बद्दल प्रेम वाटलं. प्रेम सांगून होत नाही. पण रमणचं हे प्रेम योग्य नाही हे मी त्याला समजावलं. माझं नशीब तो समजला आणि आता त्याच्या पूर्वायुष्यात वळला आहे. हे तुम्ही त्याला माफ केल्यामुळे घडलं. मी तुमची आयुष्य भर ऋणी राहीन.”

छकूने हात जोडले तसं नेहाने गडबडीने छकूचे हात हातात घेऊन म्हटलं

“मॅडम तुम्ही काय मीच तुमच्या ऋणात राहीन. बहुतेक वेळा स्त्रिया आपल्या नव-याची चूक असली तरी ती मान्य न करता त्या स्त्री ला दोष देतात.तिच्या मनाचा एक स्त्री असून विचार करत नाही जो तुम्ही केला. त्यामुळे तुम्ही रमण सरांना समजाऊन सांगू शकलात. म्हणून त्यांना त्यांच्या चुकीच्या वर्तनाची जाणीव झाली. ते माझी माफी मागायला आले तेव्हा त्यांच्या वागणूकीतला आणि बोलण्यातला सच्चेपणा मला जाणवला. हे सगळं तुमच्या सुसंस्कृत विचारांमुळे घडलं.म्हणून मीच तुमचे आभार मानते.”

यावर छकू हसून म्हणाली

“आपण दोघी एकमेकींना धन्यवाद देऊ हेच मला योग्य वाटतं.”

“हो खरय. आजचा हा क्षण आपण साजरा करुया. तुम्ही काय घेणार चहा,काॅफी की सरबत?”

“नको याची गरज नाही.आपल्या दोघींच्या मनाचा आरसा स्वच्छ झाला हे महत्त्वाचं आहे.”

“त्या नितळ आरशात आजच्या क्षणाचं प्रतिबिंब उमटू द्या.”

नेहा म्हणाली.

“बरं तुम्ही म्हणता तर मी लिंबू सरबत घेईन.”

“ठीक आहे.”

नेहाने इंटरकाॅमवरून कॅन्टीनमध्ये फोन लावला आणि दोन लिंबू सरबत पाठवायला सांगीतलं.

आज नेहाला मनावर ओझं दूर झाल्यासारखं वाटलं. रमणने जरी माफी मागितली तरी नेहाच्या मनात छकूबद्दल विचार यायचे. नेहाला वाटायचं की छकूला माझ्या बद्दल आकस निर्माण झाला असेल माझी काही चूक नसताना.नेहा या विचाराच्या दडपणाखाली वावरायची. आज ते सगळं स्वच्छ झालं.छकूच्या मनात आपल्या बद्दल कणभरही आकस नाही हे ऐकून नेहाला बरं वाटलं.

“ छान आहे लिंबू सरबत.”
छकू म्हणाली आणि नेहा तंद्रीतून जागी झाली.

“ हो.छान आहे लिंबू सरबत.”

“ आपलं आयुष्य या लिंबूसरबता सारखंच असतं.”

“ म्हणजे?”
नेहाने विचारलं.

“ आंबटगोड चवीचं लिंबू सरबत प्यायला किती छान वाटतं. आपलं आयुष्य असच आंबटगोड असतं. रमण आत्ता जसा वागला ते वागणं म्हणजे आंबट चव होती पण कडवटपणाकडे जाणारी.मनाला त्रास देणारी. लिंबू खूप पिळलं तर आंबट चव जाऊन कडवट चव येते. मध्यंतरी आमच्या आयुष्यात ही कडवट चव आली होती आता मात्र गोड चव आली आहे.”

एवढं बोलून छकू हसली.नेहाही हसली.

“ मला तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं.माझ्या मनावरचा ताण ऊतरला.”
नेहा म्हणाली.

“ कसला ताण?”

छकूने विचारलं.


“ तुमच्या मनात माझ्या बद्दल आकस असेल असं वाटत होतं त्यामुळे मला चैन पडत नव्हतं. तुमच्या मनात माझी प्रतिमा वाईट झाली असेल ही भावना माझ्या मनाला सतत टोचायची. आज तुम्ही मोकळेपणाने बोललात त्यामुळे माझ्या मनाला लागलेली टोचणी दूर झाली. रमण सरांना मी सांगीतलं पण ते लक्षात घेत नव्हते त्यामुळे माझी खूपच विचित्र अवस्था झाली होती.”

“ मला कळतंय. तुम्हाला भेटल्यावर मला जाणीव झाली की रमण तुमच्यात गुंतला आहे पण याचा तुम्हाला खूप त्रास होत असेल.तुम्ही खूप वेगळ्या आहात हे माझ्या लक्षात आलं. इतर बायकांसारखा तुम्हाला रमणच्या देखणेपणाचा मोह झाला नाही. यातूनच तुमचे संस्कार कळतात.तुमच्या मनात आता काही वेगळे विचार आणू नका.”

“हं. नाही आणणार. “

“ ठीक आहे.मी निघते. छान होतं लिंबू सरबत
“ तुम्हाला आवडलं छान वाटलं.”

छकू केबीन बाहहेर पडली.
नेहा छकूच्या पाठमोऱ्या आकृती कडे कितीतरी वेळ बघत होती. तिच्या मनात आलं आपलं नशीब चांगलं म्हणून छकूसारखी स्त्री भेटली. जर ही आकांडतांडव करणारी असती तर आपण काय करू शकलो असतो?

रमणचं विचित्र वागणं आणि छकूचा आक्रस्ताळेपणा यात आपण भरडून निघालो असतो परमेश्वरा तुझीच कृपा आहे. छकूसारखी समजूतदार स्त्री रमणची बायको आहे.

नेहाच्या केबीनमधून बाहेर पडल्यावर छकूच्या चेहे-यावर एक समाधान झळकत होतं. नेहा सारख्या समजूतदार गुणी मुलीच्या आयुष्यात येणाऱ्या वादळाला रोखण्यात आपण यशस्वी झालो ही भावना छकूला आनंदीत करून गेली.

परमेश्वराची कृपा आपण रमणला समजावलं आणि त्याला ते पटलं. परमेश्वरा तू माझ्या बरोबर नसतास तर हे एवढ्या जबाबदारीचं आणि महत्त्वाचं काम मी योग्य रितीने पूर्ण करू शकले नसते.

एक मोठी कामगिरी फत्ते केल्याचा आनंद छकूच्या मनात साठला होता. त्या आनंदात छकूची पावलं झपझप तिच्या घराच्या दिशेने पडू लागली

नेहा ही आज आनंदात होती कारण तिच्या मनाला सतावणारी चिंता आज दूर झाली होती. प्रसन्न मनाने तिने तिच्या समोरचा लॅपटाप उघडला आणि कामाला लागली. ती जरा कामात गुंतली असेल तेव्हाच तिचा फोन वाजला.फोनच्या स्क्रीनवर नाव बघून नेहाचा चेहरा हसरा झाला.
__________________________________
क्रमशः. नेहाला कोणाचा फोन आला असेल?