Mala Spes Habi Parv 2 - 17 in Marathi Short Stories by Meenakshi Vaidya books and stories PDF | मला स्पेस हवी पर्व २ भाग १७

Featured Books
  • DIARY - 6

    In the language of the heart, words sometimes spill over wit...

  • Fruit of Hard Work

    This story, Fruit of Hard Work, is written by Ali Waris Alam...

  • Split Personality - 62

    Split Personality A romantic, paranormal and psychological t...

  • Unfathomable Heart - 29

    - 29 - Next morning, Rani was free from her morning routine...

  • Gyashran

                    Gyashran                                Pank...

Categories
Share

मला स्पेस हवी पर्व २ भाग १७

मला स्पेस हवी पर्व २ भाग १७

मागील भागात आपण बघितले ते नेहा कडे कोणीतरी आलंय.आता बघू पुढे काय होईल.

दारातील व्यक्तीला बघून नेहाचा चेहरा पडला, तिची पावलं लगेच थबकली. तिची ही अवस्था बघून सुधीरला काही कळलं नाही.

“नेहा कोणीतरी आलंय तुझ्या कडे.”

“अं हो “

म्हणत नेहा पुढे झाली. दारात अचानक रमणला बघून नेहा दचकली.

“या न रमण सर”

नेहा म्हणाली.

“हो “

म्हणत बावरलेला रमण आत आला.
“बसा”

नेहा म्हणाली.

रमण सोफ्यावर बसला. सुधीरला बघून रमण गोंधळून गेला. त्याला नेहा घरी एकटीच असेल असं वाटलं होतं. हा माणूस कोण आहे? नेहाचा नवरा असावा. रमणच्या डोक्यात विचारचक्र फिरत होतं.

‘रमण सर हे माझे मिस्टर सुधीर.”

नेहाने सुधीरची ओळख करून दिली.नेहाच्या बोलण्याने रमण विचारातून बाहेर आला.

“हॅलो मी सुधीर”

सुधीरने रमणच्या पुढे हात केला.रमणने शेकहॅंड केलं.

“कधी आलात?”
कसतरी रमणने विचारलं.

“काल आलो. आपण नेहाच्याच ऑफिसमध्ये आहात का?”

सुधीरने विचारलं.रमणने नाही ऊत्तर दिले

“सुधीर हे सत्यम ॲडव्हर्टायझिंग एजन्सी मध्ये आहेत. यांचीच एजन्सी आहे.”

“हो का?”

“आमच्या स्वस्तिक टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या सगळ्या जाहिरातींचं स्क्रिप्ट यांच्या एजन्सी कडून लिहून घेतल्या जातं मग हेच ती जाहिरात शुट करतात.”

“हो का? अरे व्वा!”

सुधीर म्हणाला.

“सर काही काम होतं का? “

नेहाने शांतपणे विचारलं असलं तरी तिच्या मनात रागाचं वादळ घोंघावत होतं. रमणला काहीच काम नाही हे ती जाणून होती. आपल्याला भेटण्यासाठी आला आहे आणि सुधीरला बघून बावचळला आहे हे नेहाच्या लक्षात आलं आहे.

नेहाला सुधीर असताना रमणचं येणं आवडलं नाही.

“सर काही काम होतं का?”
नेहाने पुन्हा विचारलं.

“अं हो. जरा बोलायचं होतं.”

“ठीक आहे नेहा तुम्ही बोला मी ऋषीला आत घेऊन जातो.”

सुधीरने असं म्हणताच रमणने देवाचे आभार मानले आणि त्याच्या चेहऱ्यावर आनंद लकेर उमटली. तेवढ्यात नेहा म्हणाली,

“सुधीर अरे आम्ही खूप महत्त्वाचं नाही बोलणार. त्यामुळे तू इथे थांबलास तरी चालेल. ऋषीला तोपर्यंत टिव्ही बघू दे.”

“ठीक आहे.मी आपला व्हाॅट्स ॲप बघतो.”

एवढं बोलून सुधीर दुसऱ्या बाजूला खिडकीजवळच्या खुर्चीवर बसला.

रमणला काय बोलावं सुचत नव्हतं.कारण तो आपल्या मनातील भावना बोलायला आला होता.ते सगळं सुधीर समोर कसं बोलणार होता? ऊठुन जायचं तर तेही बरं दिसलं नसतं. रमणचं मन प्रश्नांच्या डोहात गरगर फिरायला लागलं.

नेहा सुधीरच्या लक्षात येणार नाही अशी रागाने रमणकडे बघत होती. सुधीर मोबाईल बघत होता पण तिरक्या डोळ्याने रमणला निरखत होता. त्याला या अगांतुक माणसाचं खूप आश्चर्य वाटलं

“सर बोला”

“हो. मला ती जाहिरात कधी शूट करायची आहे ते विचारायच़ होतं.”
खूप धीर एकवटून रमण म्हणाला.

“कुठली जाहिरात?”

नेहाने विचारलं. तसा रमण गोंधळला. तो एकटक नेहाकडे बघायला लागला.ज्ञनेहाला रमणची ती नजर नकोशी झाली. ती चटकन म्हणाली

“सर आपण अजून जाहीरातीचं स्क्रिप्ट लिहीलेलं नाही. आज ऑफिसला सुट्टी आहे.परवा ऑफिसला आले की बघेन.”

“हो हो. तेच म्हणणार होतो मी. “

“आम्हाला बाहेर जायचंय तेव्हा…”

रमणला नेहा पुढे काय बोलणार हे लक्षात आलं तो चटकन उठून म्हणाला

“ठीक आहे मी परवा येतो ऑफीसमध्ये. “

“ठीक आहे.”

नेहा कोरडेपणाने बोलली.

“निघतो साहेब.”

सुधीरकडे बघत रमण म्हणाला.
सुधीर मोबाईल मध्ये होता. नाईलाजाने रमण नेहाच्या घरातून बाहेर पडला.रमण जाताच नेहाने पटकन दार लावलं आणि सुटकेचा निःश्वास सोडला.

किती तरी वेळ नेहाच्या अंगाला रमणच्या येण्याने बारीक कंप सुटला होता. ती कशीबशी स्वतःला सावरत बेडरूम मध्ये जाताना तिच्या कानावर सुधीरचं बोलणं पडलं.

“नेहा हा माणूस असा बावचळल्या सारखा का करत होता?”

“हं तसंच काम आहे त्यांचं”

नेहा आणखी काय स्पष्टीकरण देणार होती रमणच्या वागण्याचं.

“काम बरोबर करतो नं की त्यातही…?”

“ काम करतो व्यवस्थित. सोड ना त्याचा विषय. निघूया आपण. “

नेहाने रमणचा विषय वाढण्यासाठी झटकला.

“ओके.चल. मी कॅब बुक करतों.”


दोघं निघाले पण नेहाचा मूड काही परत येत नव्हता.
बंगलोर पासून चाळीस किलोमीटर वर असलेल्या वॅनडर या करमणूक पार्कमध्ये सुधीर आणि नेहाची कॅब येऊन थांबली.

तिघं कॅबमधून उतरले तसा कॅब ड्रायव्हर गाडी पार्क करायला निघून गेला.

कॅब ड्रायव्हर गेल्यावर मघापासून मनात असलेला प्रश्न सुधीरने नेहाला विचारला

“नेहा काय झालं? तुझा मूड का ऑफ झालाय?”

“नाही.मी ठीक आहे.”

“आपण निघण्यापूर्वी तू खूप खूष होतीस. मला वाटतं तो माणूस घरी येऊन गेला आणि तुझा मूड बिघडला.”

नेहाने चमकून सुधीर कडे बघितलं.

“खरं बोलतोय नं मी?”

सुधीरने नेहाच्या थेट डोळ्यात बघून विचारलं.नेहा जराशी घाबरली.

सुधीरच्या लक्षात आलं की याच गोष्टी मुळे नेहाचा मूड नाही. दोघंही आपल्या विचारात होते तेव्हा सुधीरचा हात जोर जोराने हलवून ऋषी म्हणाला

“बाबा मला त्या मोथ्या घसयगुंडीवय जायचयं.चला नं?”

“हो बाळा जाऊ आपण .मी आधी तिकीट काढतो मग आपल्याला आत जाता येईल होनं?”

“हो.तेव्हा तुम्ही तितीट ताढणार?”

‘तू आईजवळ थांब मी तिकीट काढून आलो. आईचा हात सोडून कुठेही जायचं नाही. कळलं?”

“हो.”

“नेहा ऋषीचा हात पकड मी तिकीट काढून आणतो.”

“हो “
नेहाने होकारार्थी मान हलवली.


नेहाचा मूड फारच गेला होता. तिच्या मनात आलं या रमणला कधी कळणार आहे मला त्याच्यात काडीचा रस नाही. सुधीरच्या समोर तो आला आणि आपला मूड गेलाय हे सुधीरच्या लक्षात आलं आहे हे चांगलं झालं की वाईट? नेहाला कळेना.

तिकीट काढून सुधीर आला तर त्याच्या लक्षात आलं ऋषी नेहाचा हात हलवून काहीतरी विचारतोय पण नेहाचं लक्षच नव्हतं. काय कारण झालं असावं नेहाचा इतका मूड जायला ?

सुधीर नेहाजवळ येताच ऋषी नेहाचा हात सोडून सुधीर कडे धावला.

“बाबा तितीट मिलालं?”

ऋषीला उचलून कडेवर घेत सुधीर म्हणाला,

“मिळालं आता आपण खूप मज्जा करायची नं?”

“हो. ऐ..”

दोन्ही हात उंचावून ऋषी ओरडला

“नेहा चलतेस नं? तिकीट काढून आणलय.”

“अं हो चल.”

तिघं चालू लागले. ऋषी आजुबाजुला असलेल्या गडबड गोंधळ आरडाओरडा यांची मजा घेत होता. मध्येच तो दोन्ही हात उंचावून ओरडायचा आणि सुधीर कडे बघून हसायचा.

नेहा आपल्याच विचारात चालली होती.
सुधीरला कळेना की आपल्या समोर तो माणूस आलेला नेहाला आवडलं नाही की नेहाला तो माणूसच आवडतं नाही. नेहाला मोकळं करायला हवं. काय आहे ते तिने सांगायला हवं. नेहा तयार झाल्यावर किती आनंदात दिसत होती. तो माणूस येऊन गेल्यावर सगळं बदललं

नेहाला कसं बोलतं करायचं याचा विचार सुधीरच्या मनात चालू होता.

“बाबा तुम्ही बोलत ता नाही?”

“काय झालं ऋषी केवढ्यांदा ओरडतो आहेस?”

“बाबा मी तीनदा तुम्हाला हात मारली.”

आपल्या हाताची तीन बोटं सुधीर समोर नाचवत ऋषी म्हणाला.

“कारे ? बोल आता?”

“त्या तितके जी मोथी घसयगुंडी दिसते नं तिच्या वय आदी बसायचं आहे.”

ऋषी ठामपणे म्हणाला.

“बरं आपण आधी त्या मोठ्या घसरगुंडीवर बसू.ऋषी खूष?
ऋषी गोड हसला तशी सुधीरने त्याच्या गालाची पापी घेतली.”

“ नेहा ऋषीला या मोठ्या घसरगुंडीवर राइडवर मी घेऊन जातोय तू इथेच थांब.

हो नेहा म्हणाली सुधीर ऋषीला घेऊन गेला. नेहा पुन्हा आपल्या विचारात घडली. हा रमण कधी माझा पिच्छा सोडणार आहे? असं तिच्या मनात आलं त्याच वेळेला तिचा फोन वाजला. फोनवर अपर्णाचं नाव बघून नेहाने ताबडतोब तिचा फोन घेतला.

“हॅलो “

“हां नेहा कुठे आला आहात ?”

अपर्णांनी नेहाला विचारलं

“आम्ही वॅनडरला आलो आहोत”

“अरे वा छान मस्त फिरून या. एन्जॉय करा. अपर्णा म्हणाली “हो नक्कीच”

नेहाच्या कोरड्या आवाजातलं हे उत्तर ऐकून अपर्णांनी विचारलं

“नेहा तुझा मूड का गेला आहे ?”

नेहा म्हणाली माझा घरून निघेपर्यंत खूप छान मूड होता पण आम्ही घरातून निघताना तो मूर्ख रमण शहा घरी आला.
‘ काय?” अपर्णा जोरात ओरडली.

“अगं तो काही बडबडला नाही ना?”


अपर्णाने काळजीने विचारलं

“नाही. मला ह तीच भीती वाटत होती. पण काही बोलला नाही. लगेचच गेला तो पण सुधीरच्या लक्षात आलंय की तो येऊन गेल्यावर माझा मूड गेलाय मला नाही या माणसापासून कसा आपला इच्छा सोडवावा तेच कळत नाही”

“ हे बघ सध्या तो विचार करू नकोस.छान एन्जॉय कर पुढे बघू.”

“ हं”
नेहाच्या आवाजात नाराजी होती.

“ हे बघ नेहा रमणचा टाॅपीक विसरून सुधीर आणि ऋषी बरोबर एन्जॉय कर.मधला सगळा ताण घालवलास की तुला बरं वाटेल.”

“ हो.”

“ नेहा मी तुम्हा तिघांना आमच्या घरी ऊद्याचं आमंत्रण देण्यासाठी फोन केला.”

“ अगं एवढी गडबड कशाला करतेस?”

“ गडबड कसली? तू फक्त हो की नाही ते सांग. आपली छान मैत्री झाली आहे.आपल्या नव-यांना भेटू दे एकदा.त्यांची मैत्री झाली की मग छान होईल.“
हसत अपर्णाने म्हटलं.

“ सुधीरला विचारून सांगते चालेल नं?”

“ बिलकुल चालेल.आज रात्री पर्यंत कळव.ऊद्या तुम्ही तिघांनी आमच्या कडे जेवायला यायचय.”

“ बरं.”

“ ठेऊ फोन?”

“ हो ठीक आहे.”

अपर्णाचा फोन आल्याने नेहा थोडीशी रमणने दिलेल्या ताणातून बाहेर आली.पण तेवढ्यात पुन्हा तिचा फोन वाजला.फोनवरचं नाव बघून नेहाच्या कपाळावर आठ्या पडल्या.

_________________________________&
क्रमशः