Nikita raje Chitnis - 4 in Marathi Fiction Stories by Dilip Bhide books and stories PDF | निकिता राजे चिटणीस - भाग ४

Featured Books
  • انکہی محبت

    ️ نورِ حیاتحصہ اول: الماس… خاموش محبت کا آئینہکالج کی پہلی ص...

  • شور

    شاعری کا سفر شاعری کے سفر میں شاعر چاند ستاروں سے آگے نکل گی...

  • Murda Khat

    صبح کے پانچ بج رہے تھے۔ سفید دیوار پر لگی گھڑی کی سوئیاں تھک...

  • پاپا کی سیٹی

    پاپا کی سیٹییہ کہانی میں نے اُس لمحے شروع کی تھی،جب ایک ورکش...

  • Khak O Khwab

    خاک و خواب"(خواب جو خاک میں ملے، اور خاک سے جنم لینے والی نئ...

Categories
Share

निकिता राजे चिटणीस - भाग ४

 

निकिता राजे  चिटणीस

पात्र  रचना

 

1.       अविनाश ͬचटणीस                         चंदन इंजीनीǐरंग चे मालक

2.       नीतीन चीटणीस           अविनाश चिटणीसांचा मुलगा

3.       निकीता चटणीस           नितीन ची बायको

4.       शशीकला ͬचटणीस          नीतीन ची आई

5.       रघुनाथ (मामा) राजे        निकीताचे मामा

6.       पार्वती ( मामी )राजे       निकीता ची मामी

7.       मुकुंद देशपांडे             अविनाश चिटणीसांचे मित्र

8.       अनंत दामले             मुकुंद देशपांड्यांचे शेजारी  

भाग  ४

भाग 3 वरुन  पुढे वाचा ........

“हॅलो अविनाश मी मुकुंदा बोलतोय.”

“हुं , बोल काय परिस्थिति आहे?” – बाबा

“डॉक्टर म्हणतात की ऑपरेशन लगेच करावं लागणार आहे. तसे ३_४ तास आहेत हाताशी. तू येई पर्यंत, पण प्रश्न हा आहे की एवढा वेळ वाया घालवायचा का ?” - मुकुंद काका.  

“अरे तुम्ही लोकं आहात ना तिथे मग परिस्थितीचा सारासार विचार करून निर्णय घ्या. माझ्यासाठी थांबण्याचे काही कारण मला तरी दिसत नाही. वेळ घालवण्यात काही अर्थ

नाही. कारण ऑपरेशन तर अटळ आहे. आम्ही आता निघतोच आहोत. कोणच हॉस्पिटल म्हणालास राजवाडे हॉस्पिटल?” – बाबा

“हो.” – मुकुंद काका

“चल तर मग ठेवतो.” – बाबा.

 

निकिताला भेटून आलो. मुकुंद काका म्हणाले की बाबांशी बोलणं झालं. त्यांनी लगेच ऑपरेशन करा, म्हणून सांगितलं आहे तेंव्हा आता डॉक्टरांना सांगून ये. बरं आता कशी आहे निकिता ?

पेन थोड कमी आहे. औषधांचा परिणाम होतोय.

डॉक्टरांना सांगून आलो.

“काका डॉक्टर म्हणतायेत की ऑपरेशन पहायचं असेल तर येऊ शकता . फक्त मनाची तयारी करून या.”

“छे रे बाबा,  ते शरीराची चिरफाड करतांना बघवणार नाही. नकोच ते.” – मुकुंद काका

“हुं ss s”

दोन तास उलटुन गेले. डॉक्टर बाहेर आले. म्हणाले.

“ऑपरेशन व्यवस्थित पार पडलं. काळजीचण काहीच कारण नाहीये. कॉफी घ्या  नाश्ता करा.”

“आम्हाला भेटता केंव्हा येईल ?” मी विचारलं.

“अजुन दोन तासांनी . अजुन ती गुंगीत असेल.  चला.” असं म्हणून डॉक्टर निघाले.

“हॅलो” – बाबा.

“हॅलो बाबा ऑपरेशन झालं. सगळ ठीक आहे. डॉक्टर आत्ताच सांगून गेलेत. तुम्ही केंव्हा पोचता आहात”

“साधारण दहा  होतील.” – बाबा

“ठीक आहे.”

“हॅलो” – मामा

“हॅलो मामा मी नितीन”

“हं बोल नितीन, आम्ही तुझ्या फोनचीच  वाट पाहत होतो. आता कशी आहे परिस्थिति?” मामांच्या स्वरात काळजी होती.

“मामा, ऑपरेशन पार पडल. सर्व काही व्यवस्थित आहे असं डॉक्टर म्हणाले. अजून दोन तास तरी  ती  गुंगीत असल्यामुळे भेटता येणार नाही. भेटल्यावर तुम्हाला पुन्हा फोन करीन. चिंता करू नका. मी फोन करतो नंतर. आणि हो दोन तीन दिवसांत डिस्चार्ज पण मिळेल. त्यामुळे तुम्ही आत्ता येण्याचा विचार करू नका. पुण्याला गेल्यावर बघू. बर ठेवतो आता”.

डॉक्टरांनी सगळं व्यवस्थित आहे अस म्हंटल्यामुळे  नाश्ता करतांना सगळ्यांच्याच मनावर असलेलं चिंतेचं सावट दूर झालं होतं. दहा साडेदहा वाजे पर्यंत आई बाबा पण पोचले. तेवढ्यात नर्स आली. म्हणाली, “तुम्ही आता भेटू शकता. पण  एका वेळेला एक  जण आणि पाच पाच मिनिटं फक्त. अजुन तासाभराने रूम मध्ये शिफ्ट करु. मग तुमच्या वर बंधन नाही. पण पेशंट ला त्रास होईल इतक बोलू नका.” आणि तिने एका बाटलीत सोल्यूशन मध्ये ठेवलेले  अपेंडिक्स  चे तुकडे दाखवले.

 “निकीता कुठे आहे ?”

“रीकवरी रूम मध्ये. ती समोर जाऊन डावीकडे.” – नर्स

निकिताच्या चेहऱ्यावर थकवा होता पण नजर हसरी होती. तिचा हात धरुन थोपटले. बोलण्याची जरूर नव्हती. आम्ही एकमेकांकडे बघत होतो फक्तं. मला भीती वाटत होती की केंव्हाही डोळ्यात पाणी येईल. तिच्या ते लक्षात आले. हात हलवून हसली आणि डोळे मिटले. मी बाहेर आलो आणि मग आई बाबा आत गेले.

 

 

 

 

 

 

 

 

अविनाश चिटणीस

निकिताला भेटून बर वाटल. ही तिच्या जवळ बसली होती. हातात हात घेऊन धिराच काही बोलत होती. पाच मिनिटांनंतर नर्स नि खूण केली आणि आम्ही बाहेर आलो.

“मुकुंदा, अरे अनंतराव कुठे आहेत ओळख करून दे न.” मी मुकुंदाला विचारले.

“हे अनंतराव दामले, आणि अनंतराव, हा अविनाश चिटणीस, नितीन ह्यांचा मुलगा आणि सून निकिता.” थोडं बोलणं झाल्यावर मी मुकुंदाला म्हंटलं -

“तुझ बरोबरच आहे मुकुंदा. तुला आणि विनायकरावांना घरी जायच असेल. रात्रभर खूप दगदग झाली तुम्हा दोघांची. आता आम्ही आलोय तेंव्हा आता तुम्ही घरी जाऊन विश्रांती घ्यावी अस वाटत. आता अस करू, अनंतराव  तुम्ही तुमच्या गॅरेज चा फोन नंबर आणि ते कुठे आहे ते नितीनला सांगा, म्हणजे तो आमच्या ड्रायव्हरला घेऊन मेकॅनिक कडे जाईल आणि आमची बंद पडलेली कार दुरुस्त करून घेईल. तो पर्यन्त आम्ही इथे थांबतो. तो आल्यावर मग इथे जवळपास एखाद चांगल हॉटेल असेल तर आम्ही तिथे शिफ्ट होऊ. माझ बोलणं पूर्ण ऐकून घे मुकुंदा, मग बोल. तुझ घर दूर आहे आणि अश्या पावसात जाण येण जरा अवघड होईल. जवळ असेल तर फेऱ्या मारणं सोयीच असणार आहे. पुरुषाचं ठीक आहे पण आता ही पण बरोबर आहे तेंव्हा सोय प्रथम पाहायला हवी. अस मला वाटत.”

“अविनाशरावांच बोलणं मला पटतय मुकुंदराव. तुमचं घर असतांना तुमच्या मित्रांनी हॉटेल मध्ये राहणं तुमच्यासाठी अवघड आहे. पण जरा विचार कर, या लोकांची खूप धावपळ होईल, हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळाल्यावर राहतील की दोन दिवस तुमच्याकडे. काय अविनाशराव, राहाल न. म्हणजे आमच्या मित्राला पण बर वाटेल. दोन तीन दिवसांचा तर प्रश्न आहे. तीन दिवसांपेक्षा जास्त हॉस्पिटल मध्ये ठेवतील अस वाटत नाही. काय म्हणताय?” आनंतराव म्हणाले.

“नक्कीच. हा काय प्रश्न झाला” – अविनाश  

“हूं ठीक आहे. मग आता काय आपण घरी जायचं. चला तर मग अनंतराव दामले चला.” मुकुंदा म्हणाला. 

ते दोघ गेल्यावर नितीनला म्हंटलं की “ड्रायव्हरला घेऊन जा. आता पाऊस पण थांबला आहे. आणि अकरा वाजले आहेत म्हणजे गॅरेज पण उघडल असेल.” नितीन पण गेला. ही निकीताच्या खोलीत. मी पण निकीताच्या खोलीत डोकावलो ती  झोपली होती. अजून गुंगीचा परिणाम ओसरायला बहुधा वेळ लागणार असावा. थोडा वेळ हिच्याशी बोलत बसलो.

टेंशन तस उतरलं होत. सिगरेट ची तलफ आली, पण जवळ काहीच नव्हत. बाहेर आलो. एखादी पानाची टपरी दिसते का बघत होतो. बाहेर वॉर्ड बॉय होता त्याला विचारल. त्यांनी टपरी तर दाखवली, पण म्हणाला साहेब आत मध्ये सिगरेट नाही नेता येणार. पाकीट पण नाही. तसा इथला नियमच आहे. म्हंटल ठीक आहे ठेल्या वर जाऊन तलफ भागवली, थोडा टाइम पास पण झाला. कुठे इकडे तिकडे फिरू म्हंटलं  तर सागळीकडे चिखल राडा झाला होता. फिरणं कॅन्सल. वेळ कसा घालवायचा हा एक प्रश्नच होता. आत गेलो. निकिता झोपलीच होती. सौ. चिटणीस रामरक्षा म्हणत होत्या हातात अंगार्‍यांची वाटी होती. थांबण्याचा प्रश्नच नव्हता. पुन्हा बाहेर. लॉबी मध्ये बसलो. पेशंट यायला लागले होते. लॉबी जवळ जवळ भरली होती. बसण्याचाही कंटाळा आला. पुन्हा बाहेर. टपरी, चहा. सिगरेट, वापस लॉबी, रूम अश्या येरझारा. शेवटी त्याचाही कंटाळा आला. रूम मध्ये येऊन खुर्चीवर बसलो. बायको म्हणाली जरा शांतपणे बसा. काय सारखं, सारखं आत बाहेर करता.

खुर्चीवर  बसल्या बसल्या डोळा लागला. तास भर कसा गेला पत्ताच लागला नाही. डोळे उघडले तेंव्हा नितीन आला होता. निकिताशी हलक्या आवाजात बोलत होता.

“काय रे गाडी ठीक झाली का ? काय झाल होत ? आणि तू केंव्हा आलास ?”

“मी आत्ताच पाच मिनिटांपूर्वीच आलो. बॅटरी गेली होती. नवीन टाकली. बस, गाडी सुरू झाली. नो प्रॉब्लेम नाऊ.” – नितीन उत्तरला.

निकिता चा चेहरा बराच टवटवीत दिसत होता. रिकव्हरी चांगली होती. थोड्या वेळाने मी आणि नितीन हॉटेल शोधण्यासाठी बाहेर पडलो. थोडी चौकशी केल्यावर कळल की जवळच एक हॉटेल आहे. जाऊन पाहिल, ठीकच होत. दोन तीन दिवसांचाच मुक्काम होता, फिक्स करून टाकल. मग नितीनला म्हंटलं की

“तू इथेच थांब. मी जाऊन ड्रायव्हर बरोबर समान पाठवून देतो. तुमच्या बॅगा गाडीतच असतील न, त्या काढून घे.” तर म्हणाला

“सगळ्यांच्याच बॅगा गाडीतच आहेत.”

हॉटेल मध्ये चेक इन केलं सगळं सामान ड्रायव्हरला सांगून रूम मध्ये आणून घेतल. आणि नितीन ला म्हंटल

“तू आटपून घे, फ्रेश हो. जेवायची वेळ आहे. जेउन घे. आणि मग हॉस्पिटल मध्ये ये. हवं तर थोडी झोप काढ. रात्रभर जागरण झाल असेल. आणि मग तिकडे ये. तो पर्यन्त आम्ही बसतो.”

मग मी नितीनला तिथेच सोडून हॉस्पिटलला परत आलो. निकिताला संध्याकाळ पर्यन्त पाणी सुद्धा द्यायच नव्हत. मग आम्हीच कॅंटीन मध्ये जाऊन जेवून आलो. जेवण झाल्यावर इतकी झोप येत होती की मी पाय लांब केले. ही बसली होती निकिता जवळ रामरक्षा म्हणत. तशी तिला दुपारी झोपायची सवय नाहीच आहे. मला पण नाहीये कारण दिवसभर मी ऑफिस मध्येच असतो. पण आज झोपलो थोडा वेळ. चार च्या सुमारास नितीन आला. fresh दिसत होता. बहुधा एक डुलकी काढून आला असावा.

क्रमश:.......

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com     

जर माझं लेखन आवडलं असेल तर जरूर शेअर करा, फॉलो करा.