leather is cheap in Marathi Crime Stories by श्रीराम विनायक काळे books and stories PDF | चमडा सस्ता है

Featured Books
  • રેડ સુરત - 6

    વનિતા વિશ્રામ   “રાજકોટનો મેળો” એવા ટાઇટલ સાથે મોટું હોર્ડીં...

  • નારદ પુરાણ - ભાગ 61

    સનત્કુમાર બોલ્યા, “પ્રણવ (ૐ), હૃદય (નમ: ) વિષ્ણુ શબ્દ તથા સુ...

  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

Categories
Share

चमडा सस्ता है

चमडा सस्ता है

प्रियांकानं पगाराचं पाकिट उघडून आतले दिडशे रुपये काढून घेतले आणि दहाची नोट ठेऊन पाकिट पर्समध्ये ठेवलं. ती विद्यानगरीत डिस्टंटएज्युकेशनला लायब्ररीत गेलं वर्षभर डेली वेजीसवर जॉब करीत होती. तिला रोज सत्तर रुपये दराने महिन्यातल्या सुट्ट्या नी खाडे कापूनपगार मिळायचा. पगार झाला की सगळे पैसे मम्मीकडे द्यावे लागायचे. मम्मी बसचं तिकिट नी वरा खर्चासाठी दहा रुपये अशी नेमकी रक्कम द्यायची. त्याबाहेर महिनाभरात एक छदामसुद्धा मिळत नसे. उलट तिच्याबरोबर असणारी बहुसंख्य मुलं मुली मिळणा-या पगाराबाहेर वरखर्चासाठी म्हणून घरून जादाचे पैसेमागून घ्यायची. प्रिया या वरून कधि कद्हि मम्मीशी हुज्जत घालायची . पण मम्मी शांतपणे आपल्या कुटुंबाच्या फाटक्या परिस्थितीचं विदारक चित्र असं काही वर्णन करायची कि, तिला गप्प बसणं भाग पडायचं. या महिन्यापासून डेलिवेजीसच्या दरामध्ये पाच रुपयाची वाढ झाल्यामुळे प्रियाला अठ्ठावीस दिवसाचे एकशे चाळीस रुपये जादा मिळाले. आता मम्मीला कळू न देता दरमहा चैन करायला जादा पैसे मिळत राहणार या आनंदात प्रिया ऑफिसबाहेर पडली. मेंअ गेट बाहेर पडताच डाक्याबाजुला असलेल्या चायनिज कॉर्नरमध्ये ती आज पहिल्यानेच जात होती. काऊंटर लगतच्या टेबलवर दोन पॉश मुलं बसलेली होती म्हणून ती दोन टेबलं सोडून पलिकडे बसली.बसल्या बसल्या वेटरला फॅन्लावायला सांगून तिने शांतपणे मेन्यूकार्ड उघडलं.
एकेका पदार्थाच्या किमती बघितल्यावर आपली एकशेचाळीस रुपयांची पुंजी किती नगण्य आहे याची होऊन सगळ्यात स्वस्त मसाला नुडल्सची ऑर्डर तिने दिली. समोरच्या टेबलवर बसलेल्या पोरांपैकी घा‌-या डोळ्याचा ऋत्विक सारखा दिसणारा पोरगा पुन्हा पुन्हा तिच्याकडे पहातोय हे लक्षत येऊन ती भलतीच सुखावली. त्या हिरोने खिशातून मोबाईल काढला.सोनी कंपनीचा त्या हॅण्डसेटची मॎर्केट प्राईझ पंधरा हजाराच्यापुढे आहे हे ती ओळखून होती. मोबाईलशी चाळा करीत त्याच्या गप्पा सुरू होत्या. ऋत्विक समोर बसलेल्या पोराने काहीतारी निकड सांगून त्याच्याकडे वीस हजार रुपये उसने मागितले. क्षणभरविचार करीत ऋत्विकने बेदरकारपणे हॅण्डसेट बाजुला टाकून सॅक उघडली नी आतून हजाराच्या नोटांचं बंडल काढलं. बंडलाच्या पीनची टोकं बाईकच्या चावीने सरळ करून तो नोटा मोजू लागला. चाळीस नोटां ची चळत मित्रासमोर टाकित तो म्हणाला, “आजही डील हुवा .... पूरे एक लाख मिल गये.” प्रिया डोळे विस्फारून पहातच राहिली. एवढी मोठी रक्कम एतक्या जवळून ती प्रथमचपहात होती. असंच पुढे जावं नी हळूवार पणे ते बंडल उचलून हाताळावं नी पुन्हा पुन्हा त्या नोटा मोजाव्यातअसा मोह तिला झाला. ती एकटक पणे बंडल पहात आहे हे लक्षात येवून ऋत्विकने मित्राला डोळा मारला. मित्रांच्या गप्पांमधून त्याचा काही तरी प्रॉडक्ट विक्रीचा धंदा आहे नी त्यात त्याला दरमहा दोन ते अडिच लाख रूपये मिळतात एकधं प्रियाला कळलं. तेवढ्यात ज्यूस चे ग्लास ठेवलेला ट्रे घेऊन वेटर आला. तरीही टेबलवर पडलेलं बंडल न उचलता ऋत्विकने ज्यूसचा ग्लास तोंडाला लावला नी शांतपणे एक एक घुटका घेऊ लागला.
त्याच्या मित्राने मात्र एका दमात ग्लास रिकामं केलं . मग तो हात जोडीत बोलला, “अरे यार राकेश... तेरा बडा एहसान हुआ. मुझे जल्दी जाना है... ” नी तो उटःऊन जाऊ लागला. अच्छा , म्हणजे या हिरोचं नाव राकेशआहे तर..... प्रिया मनॎतल्यॎ मनात म्हनाली. वेटरने मसाला नुडल्सची प्लेट तीच्या समोर ठेवली. राकेशने खूण करून वेटरला जवळ बोलावलं नी शंभरची नोट दिली. प्रिया चवी चवीनं नुडल्स खात असता तो अधून मधून तिच्याकडे पहात होता ही बाब प्रियाने हेरली नी त्याने पुन्हा वळून पाहिल्यावर त्याला स्माईल दिलं. वेटरने बील पेड करून उरलेले पैसे नी बडिशेपेची प्लेट राकेश समोर ठेवली तेंव्हा दहाची नोट प्लेटमध्ये ठेवून सोपचे चार दाणे त्याने तोंडात टाकले. अर्धवट प्यालेलाज्यूसचा ग्लासात तसंच टाकून त्याने नोटेचं बंडल सॅकमध्ये टाकलं नी तो उठला. काऊंटर समोर गेल्यावर त्याने मागे वळून हसतच प्रियाकडे पाहिलं नी तो निघून गेला.”नुडल्स खावून झाल्यावर बिलाचे नेमके पैसे काढून वेटरकडे दिल्यावर शांतपणे अर्धा ग्लास पाणी पिऊन प्रिया उठली. ती राकेश बसला होता त्या टेबल जवळ आली नी तिने पाहिलं तर राकेश बसला होता त्या बाजूच्या खुर्चीत त्याचा हॅण्डसेट होता. तिने चौफेर नजर फिरवून पाहिलं. वेटर आत गेलेला होता नी गल्ल्यावरचा माणूस बाहेर पहात होता. तिने खुर्चितला मोबाईल उचलून पर्समध्ये टाकला नी ती हॉटेलबाहेर पडली.
बस स्टॉप गाठल्यावर तिने पर्समधून हॅण्ड्सेट बाहेर काढला. मेन्यू ओपन करून व्हिडीओ सोंगचा फोल्डर ओपन केला.सगळी लेटेस्ट गाणी भरलेली होती. तिनेआपल्या आवडीचं धूम मधलं गाणं सुरु केलं.पर्स मधून आपला ईअर फोन काढून त्याचा जॅक मोबाईल मध्ये खुपसून तिने व्हॉल्यूम मोठा केला नी ती गाणं ऐकू लागली. हे सुरू असता आजूबाजूची लोकं चोरट्या नजरेने आपला कॉस्टली हॅण्ड्सेट न्याहाळून पहात आहेत हे तिच्या लक्षात आलं. बस मधून जाताना कुर्ला स्तेशन येई पर्यंत. ती मजेत गाणी ऐकत राहिली. या दरम्याने राकेशचा कॉल येईल असं तिला वाटत होतं. तसा त्याचा कॉल आलाचअसता तर मोबाईल आपल्याकडे आहे हे ती सांगणार होती. हॅण्ड्सेट ढापायचाच असता तर उचलल्या उचल्यातो स्वीच ऑफ करायचा असतो हे तिलाचांगलं माहिती होतं. पण तसा विचारही तिच्या मनाला शिवला नाही.उलट तो परत देऊन राकेशशी चांगली मैत्री जमवायचा तिचा बेत होता. घरी गेल्यावर , “ मम्मी... आज ऑफिसमध्ये पार्टी झालिय्... मला चहा खाणं नकोय.” असं सांगून ती पाया धुवायला गेली. ऑफिसचे कपडे उतरून गाऊन चढवला . पर्स मधलं पगारचं पाकिट काढून तिने ओट्या पुढे काम करणा-या मम्मी समोर फेकलं. त्यासरशीआवाज चढवीत मम्मी बोलली, “काय गं हे भवान्ये? कष्टाने आणलेली लक्ष्मी अशी फेकायची नसते.... तिच्यासोबत समृद्धि येत असते, एवढी साधी अक्कल नाही का गं तुला? चार टिकल्या कमावायला लागलिस तर एवढा कसला माज आला गं तुला? चल पहिले ते पाकिट उचलून नेहेमी सारखं देवासमोर ठेव नी माफी माग.... ” मम्मी भडकली तर खाडकन मुस्काटित मारायला कमी करणार नाही हे ओळखूनप्रियाने मुकाट्याने पाकिट उचलून देवाच्या तसबिरीसमोर ठेवलं नी गालफडात मारूनघेत ....देवा मी चुकले मला माफ कर असं म्हणत पाकिट देवासमोर ठेवून नमस्कार केला. हे करीत असता ती मनातल्या मनात मम्मीला म्हणत होती.... महिनाभर रोज आठ आठ तास राबून कमावलेल्या या चार टिकल्या म्हणजे लक्ष्मी नव्हे .... चाननिज मॉल मध्ये राकेशने सॅक मधून बंडल बाहेर काढलंना ती लक्ष्मी... ही डेलीवेजीसच्या नावाने दिलेली भीक आहे भीक... नी हिच्या येतं ना ते दळिंदर..... मग पर्स मधला राकेशचा हॅण्ड्सेट घेत स्लीपर घालून ती बाहेर पडली.
कुर्ल्यातआठ बाय बाराच्या बैठ्या खुरड्या सारख्या खोल्या असलेल्या सरकारी कॉम्प्लेक्समध्ये रहाणारी सगळीच मुलं फक्त दोन बाय दोनच्या मोरीत आंघोळ, जेवण नी रात्री उशीरा बारा वाजता नाईलाजाने चार पाच माणासांच्या गर्दीत मिळेल त्या सांदि फटीत पोटाशी पाय घेऊन उजाडेपर्यंतआडवं होण्यापुरती घरात टिकायची. बाकी सगळा वेळ रस्त्याच्याकडेला कुठे मोकळी जागा मिळेल तिथे जागा मिळाली तर बसून नाहीतर उभं राहून वेळ घालवायची. रस्त्या पलिकडे कॉर्नरपाशी सहा बाय सहा च्या चबुत‌-यावर बाबासाहेबांचा अर्धपुतळा बसवलेला होता.तो चबुतरा मोकळा आहे हे पाहिल्यावर प्रिया तिथे जाऊन बसली नी विडिओ साँग सुरु केली. तिच्या हातातला तो कॉस्टली हॅण्ड्सेट पाहिल्यावर गल्लितली पोरं पोरी तिच्याबोवती जमली. तिथे राहणारी काही पोरं अधून मधून कुठून कुठून अशा चिजा ‘काढून’ विकायला आणायची. या धंद्यात पोरीसुद्धा कमी नव्हत्या. आणलेली वस्तू आपण कशी शिताफिने उडवली हे फुशारकीने छाती फुगवून सांगितलं जायचं . अर्थात अशा वस्तूला चोरलेली न म्हणता ती अमुक अमुक ठिकाणाहून ‘काढली’असं म्हटलं जायचं.मग तीची किंमत ठरवली जायची नी तिथे किंवा आजूबाजुला उभं राहून गि-हाईकं शोधून ती विकली जायची नी कमाई करणारा पोरगा दोस्त मंडळीना कुल्फी वडापाव .... काहीना काही खिलवायचा. गवारे कुटुंबातले राहुल नी प्रिया यांची अशी ख्याती नव्हती. उलट त्यांचे आई वडिल कडक शिस्तीचे, कुणाच्या अध्यात मध्यात न पडणारे, अर्वाच्य न बोलणारे, प्रामाणिक वागणारेम्हणून सगळेजण त्याना वचकून असायचे नी मान द्यायचे. गवारे काकी तर गल्लितल्या कोणाचही पोर गैर वर्तन करताना दिसलं तर कान धरून मुस्कट फोडायचा अधिकार असलेली. ती येताना दिसली की ओळखीची पोरं पोरी मान खाली घालून साळसूदा सारखी गप्प रहायची.
पण त्या बकाल वस्तीत राहून कोणाच्या वाह्यात संगतीला लागून कोणाची बुद्धि कधी कशी फिरेल याचा नेम नव्हता. खाली मुंडी घालून अब्रूदार पणे वागणारी बारावीतली किंवा कॉलेजला जाणारी बिंधास्तपणे कोणा कोणा बरोबर बेताल फिरू लागायची..... पर्स मधून नोटांची चळत काढून संगतीतल्या पाच सहा जणाना होटेलात न्हेऊन खिलवायची.... एखादा पोरगा खिशातून रामपूरी काढून आपण अमक्या तमक्याच्या गॅंगबरोबर फेरिवाल्यांकडून कसा हप्ता गोळा करतो ते फुशारकीने सांगू लागायचा. म्हणून प्रियाच्या हातात कॉस्टली हॅण्डसेट बघितल्यावर कही बेरकी पोरं अवाक् होऊन चौकशी करू लागली. त्यावर हा हॅण्ड्सेट ऑफ़िसमधल्या मॅडम गडबडीत विसरून गेल्या म्हणून आपण आणलेलाअसून उद्या तो परत नेऊन देणार आहोत असं प्रियाने सांगितल्यावर बाजुची गर्दी कमी झाली. तिचा भाऊ राहुल दहावीला नव्वद टक्के मार्क्स मिळवून पास झाला. तो आता बारावीला होता. तो घरी आल्यावर नेहेमी पुढच्याच चौकात गुलमोहराच्या झाडाखाली बसून अभ्यास करीत बसायचा. चौथी पाचवीत जाणा-या कुणीतरी छोट्या पोराने त्याला चुगली केली. प्रियादिदीने ऑफिस मधून भारी हॅण्ड्सेट काढून आणलाय नी पुतळ्याजवळ गाणी ऐकत बसलीय्...... हे ऐकताच राहूल तिरमिरी सरशी घराकडे जाऊ लागला.पुतळ्याजवळ मैत्रिणींच्या घोळक्यात बसलेली प्रिया नी तिच्या हातातला मोबाईल त्याला दिसला. त्याने घरी जाऊन मम्मीला ही गोष्ट सांगितली.
गवारेकाकी वेताची काठी घेऊनच बाहेर पडली नी तिच्या मागोमाग बारकी पोरंही धावली. मम्मी काठी घेऊन येताना दिसल्या बरोबर प्रियाने चबुत-या वरून खाली उडी मारली . मम्मी समोर येताच गडबडीने हा मोबाईल ऑफ़िसमधल्या मॅडम गडबडीत विसरून गेल्या म्हणून आपण आणलेलाअसून उद्या तो परत नेऊन देणार आहोत ... असं सांगून मोबाईल स्वीच ऑफ करून तिने मम्मीच्या स्वाधिन केला. मग मात्र काहीहीन बोलता मम्मी माघारी गेली. दुस-या दिवशी ऑफिस सुटल्यावर मेनगेट बाहेर आल्यावर प्रियांकानी आजूबाजूला पाहिलं. चायनीज कॉर्नरच्याबाजूला हिरो अपाचेला रेलून उभा असलेला राकेश दिसला.ती अगदीजवळ जाई पर्यंत त्याचं लक्षच नव्हतं. गडबडीने हॅण्ड्सेट समोर धरीत , “साब ...ये लो अपना हॅण्डसेट... कल शामको आप चायनीज कॉर्नरमें आप भूल गये थे... .. उना लोगोंका कुछ भरोसानहीं इसलिये मै लेके गयी.... मुझे लगा कि आप कॉल करेंगे... मै देर रात तक राह देखती रही ...” त्यावर “ओ हो तुम बडी वफादार हो..... जब मेरे समझ में आया तब मैंने यहाँ आकर चायनीज वालेको पूछा.... उसने ना कहने पर मै ने उम्मिद छोड ही दी...और आज नया मोबाईल खरिदने वालाही था... ” मग ती नको नकोप म्हणतअसतानाही त्याने तिला आग्रह करून समोरच्या वोक इन मध्ये नेले. आता रोज दुपारी लंच अवर मध्ये संध्याकाळी तो यायला लागला.घरून आणलेला पोळीभाजीचा डबा भिका‌-याला देऊन प्रिया वॉक इन मध्ये पंजाबी डिश खाऊ लागली . घरी जेवलं नाही तर मम्मीला संशय येईल म्हणून संध्याकाळी ती काहीही खाणं कटाक्षाने टाळून फक्त ज्यूस किंवा कोल्ड्रिंक घ्यायची. तो संध्याकाळी तिला अपाचे वरून कुर्ल्यापर्यंत सोडायचा. दहा बारा दिवस गेल्यावरएका शनिवारी प्रिया त्याला म्हणाली,“कल छुट्टी है, लेकिन मै ओव्हर टाईम का बहाना करके निकलूँगी..... शाम छह बजेतक हम खूब घुमेंगे... ...” ठरल्याप्रमाणे रविवारी ओव्हर टाईमचं कारण सांगून नऊ वाजता प्रिया बाहेर पडली. कुर्ला बस स्टँडवर राकेश उभा होता.आज त्याने बाईक ऐवजी कार आणलेली. प्रिया आनंदात कार मध्ये बसली. बारावाजेपर्यंत मनसोक्त फिरूनझाल्यावर राकेशने दिल्ली दरबार गाठलं. फॅमिली रूममध्ये बसल्यावर चिकनबिर्याणीची ऑर्डर दिली.खाना झाल्यावर राकेशने तिला आपल्या फ्लॅटवर चलण्याचा आग्रह केला. त्याच्या वैभवाने प्रिया थिजून गेलेली... त्यांच्या दैनंदिन भेटी व्हायला लागल्यावर राकेशने चुकूनही तिच्याशी जवळिक किंवा लघळपण करायचा प्रयत्न केला नव्हता. प्रिया पूर्ण विश्वासाने जायला तयार झाली. बाहेर पडल्यावर राकेशने मित्राला फोन करून त्याला कॉर्नर वर यायला सांगितलं.
ठरल्याप्रमाणे बांद्रा क्रॉसिंग जवळ त्याचे दोन मित्र उभे होते. “ हाय चिकने......” सलामी झाडित एकाने ड्रायव्हिंग सीट चा ताबा घेतला. दुसरा मित्र त्याच्या बाजूला बसला नी प्रिया राकेश मागच्या सीटवर बसली. कार सुरू झाल्यावर .... हाय चिकने म्हणत प्रिया त्याच्या गळ्यात पडली. कार सुसाट पळत होती. तासाभराने एका नवीन इमारती समोर कार थांबली . “दो कॉफी लेके आओ ” असं फर्मान सोडून राकेशने तिला चलण्याची खूण केली. तो एरियाप्रियालाअजिबात ओळखताआला नव्हता. दोघं लिफ्ट्मध्ये चढली. सातव्या मजल्यावर लिफ्ट थांबली. तो म्हणाला, “मेरा फ्लॅट उपर है वहाँ तक लिफ्ट नहीं जाती.” दोन जिने चढून गेल्यावर तीन नंबरचा फ्लॅट उघडून तो आत शिरला.ए.सी. सुरू करूनत्याने टीव्हीचा रिमोट प्रियाकडे दिला . सराईतपणे चॅनेल्स बदलित तिने म्युझिक चॅनेल सुरु केलं. दहा मिनिटातच मित्र कॉफी घेऊन आले. प्रिया चवी चवीने कॉफीचा आस्वाद घेऊ लागली . अर्धा तास उलटला नी टीव्ही बघता बघता प्रियाला झापड येऊ लागली... प्रयत्ना करूनही पापण्या मिटू लाग्ल्या अन् बघता बघता ती सोफ्यावर आडवी झाली. ती बेहोश झाल्याची खात्री झाल्यावर मित्राना टाळी देत राकेश म्हणाला, “काम हो गया.... अब चार दिनोमें हम मालामाल हो जायेंगे” मित्रानी तिलाउचलून आत बेडरूम मध्ये नेऊन ठेवलं नी ते बाहेर आले.
पहाटे दोनच्या सुमाराला प्रियांक ला जाग आल्री. डोक कमालीच ठणकत होत नी सगळ्या अंगाचा गोळा झाला होता. बाथरूमची अनावर कळ अॎल्यामूळे नाईलाजाने ती उठून बसली. आपण पूर्ण निर्वस्त्र आहोत हे लक्षात येवून ती चांगलीच चपापली पण खोलीत आपण एकट्याच आहोत नी हॉल मध्ये जायचा दरवाजा बंद आहे हे उमजल्यावर सुस्कारा टाकीत ती बाथरूमच्या दिशेने जाऊ लागली. दाराच्या उजव्या बाजूला असलेल्या बोर्डवरची दोन्ही स्वीच ऑन करून ती बाथरूममध्ये घुसली. तोंडावर सपासप पाण्याचे सपकारे मारून डाव्या हाताच्या कुळच्याने डोक्यावर पाणी थोपटल्यावर डोक्याचा ठणका कमी झाला. हॅंगरशिफ्ट वरच्या टॉवेलने तोंड पुसून तोच टॉवेल पांघरून ती बाहेर आली. रूममधला लाईट लावला. तीची अंतर्वस्त्रं कॉटखाली पडलेली दिसली पण टॉप नी सलवार कुठेच दिसेना. बाथरूम लगतच्या भिंतीत एका बाजूला वॉर्डरोब नी कडेला रायटिंग टेबल होत. तिने टेबलावर ठेवलेला बॉक्स उघडला , त्यात बिर्याणी होती. नी जवळ अर्धी संपवलेली कोकोकोला ची बाटली होती, प्रियाने वॉर्डरोब उघडला. आतल्या दांडीवर एक लुंगी नी जेण्टस् बुशशर्ट मिळाला. तिने सगळे ड्रॉवर उघडून बघितले . पण तिचे कपडे मिळाले नाहीत. मग लुंगी गुंडाळून बुश शर्ट घालून ती हॉलमध्ये जायच्या दाराजवळ गेली. दाराला आतून कडी किंवा टॉवर बोल्टही नव्हता. तिने दार लोटून पाहिलं ... दाराला बाहेरून कडी घातल्याच लक्षात आल्यावर तिने नॉकिंग केल ... मग दाराला जोर जोराने धक्के मारले... मग राकेश्ला हाका मारून पाहिल्या पण बाहेरून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी हताश होवून ती कॉटवर जाऊन आडवी झाली.
राकेशच्या मित्राने सिलेनॉरच्या चार गोळ्या टाकलेली कॉफी प्याल्यावर वीस मिनिटातच प्रियाला इतकी निश्चल नी गाढ झोप लागली की , तिला मित्रानी उचलून बेडरूमध्ये कॉटवर नेऊन टाकल. नंतर राकेश रूममध्ये गेला. तिला पूर्ण निर्वस्त्र करून रात्री अकरा वाजेतो तिचा उपभोग घेऊन तो रूम बाहेर पडला. त्या दोघांचे असंख्य फोटोही मित्रानी घेतले ले होते. सगळा कार्यभाग उरकल्यावर तिची सलवार, टॉप नी ओढणी हॉलमधल्या वॉर्डरोबमध्ये टाकून दरवाजा लॉक करून चिकना नी त्याचा कंपू बाहेर पडले. जो तो साळसूद पणे आपल्या घराकडे निघाला.आता दुस-या दिवशी नऊ साडेनऊ पर्यंत कोणीही त्या फ्लॅटकाडे फिरकणार नव्हत. साऊंडप्रूफ फ्लॅट मध्ये प्रिया कितीही बोंबलली असती तरी कुणीही तिच्या मदतीला येणेशक्य नव्हते. फ्लॅट ची खिडकी लॉक्ड होती. त्याहीपेक्षा आपण किती भीषण दुष्टचक्रात सापडलोय याची पुसटशीही जाणीव नसलेली कोणतीच मुलगी आरंभीच्या स्टेजवर जीवावर उदार होवून कसलेही दु:साहस करणे शक्य नाही हे चिकना नी त्याचा कंपू पुरते ओळखून होता.
कुर्ला चेंबूरच्या हद्दीवर अगदी एका बाजूला असलेल्या त्या अपार्टमेंटमध्ये सात मजले अधिकृत नी आठवा अनधिकृत होता. बाहेरून पहाणा-याला याची कल्पनाही येण्यासारखीनव्हती. लिफ्ट फक्त सातव्या मजल्या पर्यंतच होती. आठव्या मजल्यावरच्या सहा टू बीएचके नी चार वन बीएचके मध्ये कोणी कुटुंब वत्सल कायम निवासी ओनर नव्हते. तस पाचवा ,सहावा नी सातवा तीन्ही मजले गबरगंड पैसेवाले, मंत्री, कॉर्पोरेटर, मंत्रालयातले सचीव, पी एस आय, फ़ॉरेनला जॉब करणारे ...... ज्यानी एक्सेसिव्ह पैसा कुठेतरी अडकवायचा म्हणून फ्लॅट घेतलेल्या हाय फाय असामींनी अडवलेले होते. सुपर डिलक्स या श्रेणीत मोडणा-या त्या अपार्टमेंट मधिल फ्लॅटचे दर ब‌-या पैकी कमाई करणा-यालाही परवडणारे नव्हते. आठव्या मजल्यावरच्या बहुसंख्य फ्लटस् मध्ये गैर कानूनी धंदे चालायचे. तथा कथित चिकन्या सह पाच जणांच्या कंपूत तिघेजण चिकना, गोरा नी लंबू लेडि किलर होते. कंगाल कुटुंबातल्या देखण्या पोरीना कटवून या फ्लॅटवर आणल जायच. पाचहीजण यथास्थित हात धुवून झाल्यावर कामाठीपुरा, गोलपीठा, फोरासरोड वरच्या घरवालीकडे अडीच- तीन लाखा पर्यंत तीचा सौदा करून कमाई करायचे. महिनाभरात अशा आठ दहाजणी तरी गळाला लागायच्या.कंपूतले सगळे जण पुरे पोचलेले नी त्यांचे राजकारण्यांपासून तो सनदि अधिका-यांपर्यंत लागे बांधे.... कधि कधि मंत्री, व्हीआयपी अफसर यानाही ते कोरा माल पुरवायचे.
जसजसा वेळ जाऊ लागला तसतशी प्रिया हताश होवू लागली. तिने खिडकी उघडायचा प्रयत्न केला पण तो निष्फळ झाला. मग तिने वॉर्डरोबचे ड्रॉवर धुंडाळायला सुरुवात केली. एका खणात पोर्न मॅगझिन्स होती. लॉकर उघडल्यावर आत तीन चार बँक पास बुक नी चेक बुक मिळाली. तिने पासबुक उघडले. अकौंट होल्डर राकेश किशन खुराना नी मुकेश बच्छाव वलीचा दोघांची नावे नी फोटो होते. तिने एकेक पासबुक उघडून पाहिल्यावर ती अचंबित झाली. पास बुका मध्ये हजारो रुपये देवघेवी झाल्याच्या नोंदी नी शिल्लक रक्कमा ही खूप मोठ्या होत्या. मात्र एका पासबुकावर बुलगानी दाढी राखून डोक्यावर मुसलमानी जाळीदार पांढरी टोपी घातलेला चिकन्याचा फोटो नी त्याचे वसीम अ.रऊफ कादरी अस नाव वाचल्यावर प्रियाच्या छातीत धडधडू लागल. भीतीने लटलटा कापू लागली. सकाळी सव्वानऊ वाजता राकेश भेटल्यापासून तो पहाटे तिला जाग येईपर्यंतच्या अनुभवांची संगती लावता तीचा पुरता धीर सुटला.... आपले सर्वस्व गमावून पुढे आणखी काय दुर्दैव ओढवतेय की काय या अशुभाच्या चाहुलीने ती घामाघूम झाली. आपण कुठल्यातरी अनाकलनीय दुष्ट चक्रात सापडलोय या जाणीवेने ती सुन्न झाली.
एक एक मिनिट संपता संपत नव्हते. नशीब एवढेच तिचे रिस्टवॉच त्याने सोडून घेतलेले नव्हते म्हणून वेळ तरी समजत होती. चार...पाच.. सहा ...सात.... आठ... नऊ एकेक तास तिला युगा युगा सारखा वाटला. राकेश किंवा त्याचा कुणी मित्र येवून दार उघडील म्हणून ती डोळ्यात प्राण आणून वाट पहात बसली . अखेर साडे नऊला हॉल चा दरवाजा उघडल्याचा आवाज आला तशी प्रिया दाराजळ जावून दारावर बुक्के मारू लागली. मिनिटभरात लंबूने मित्राने दार उघडले. चवताळलेल्या प्रियाने त्याला बाजूला ढकलून हॉल च्या मेन दरवाज्याकडे धाव घेतली. अशा विविध अनुभवाना सरवलेले ते पूर्ण सावध होते. दोघेजण धावत पुढे येवून त्यानी प्रियाला जखडून धरले. एकाने तिच्या झिंज्या खेचीत छातीवर , पोटावर कचाकच गुद्दे हाणले . मार सहन न होवून कळवळत प्रिया त्यांना धमकावू लागली. “ प्लीज प्लीज राकेश को बुलाओ...... मुझे यहाँ बंद करके कहाँ गुम हो गया है वो...... उसे आने दो...... एक एक को ऐसा सबक सिखाऊँगी....... मै उसकी मंगेतर हूँ...... तुमने मुझे बेरहमीसे पीटा है..... तुम्हे छोडुँगी नहीं ” तिला फरपटत नेवून बेडरूम मध्ये ढकलून एकजण बोलला. “ ए लौंडी..... फिर ऐसी हरकत की तो हड्डियाँ तोड डालेंगे ...... जो भी होगा , वो चुपचाप सहती रहो .... अगर एक लब्ज भी निकाला ना तो तेरी जुबान काटकर गुंगी बनाएँगे...”
अवघाती मार खाऊन वेदनानी विव्हळत आणि अपमानाने अंतर्बाह्य पेटून निघालेली प्रिया स्फुंदून स्फुंदून रडत राहिली. तासाभराने बेडरूमचा दरवाजा उघडून राकेश आला. “ कमिने कुत्ते...... मुझे कॉफीमे नशेकी दवा पिलाकर तूने मेरी मर्जी के खिलाफ़ जबर्दस्ती की है...... मेरे कपडे छिपाकर मुझे यहाँ बंद करके रक्खाहै ..... तेरे दोस्तोने मुझे बेरहमीसे पीटा है ...... मै तुम्हे छोडूँगी नही.....तू राकेश नही है ...... मैंने लॉकरमे रख्खे हुवे बैंक पासबूक देखे ..... तू तो वसीम काद्री है....मैं तेरे झूठ का भांडा फोडकर तुझे जेल भिजवाऊँगी.....” तिचे बोलणे ऐकून रागाने बेभान झालेला चिकना ...... त्याने फाडकन तिच्या अशी मुस्कटात मारली की तिने भीषण किंकाळी मारली. मग तिला कॉटवरून खेचून त्याने दणादण लाथा मारीत दमबाजी सुरु केली. “ सुव्वर की औलाद ... तेरी ये औकात? तु क्या मेरा भांडा फोडेगी? तु मेरी चुँगल में ऐसी फँसी है की अब मौत के बाद ही तू छुटेगी...... मेरे साथ ...मेरे दोस्तोंके साथ तेरे ऐसे फोटु निकाले है हमने की तु किसिको मुँह दिखानेके काबिल नहीं रहोगी.... मै वसीम हुँ या राकेश हुँ तु क्या जानेगी? मेरे और भी कई नाम है..... मै तुम्हें कामाठी पुरामें घरवालीको बेचकर रंडी बाना दूँगा...”
त्याचे मित्र मधे पडले नी त्याला बाजूला घेत म्हणाले.... “ अब बस्स भी करो चिकने ... सालीकू भूखी मरने दे...... पेटमे चूहे दौडने लगेंगे ना तब काबूमें आएगी लौंडी....” टेबलावर ठेवलेल बिर्याणीच पार्सल नी पासबुकं उचलून ते खोली बाहेर गेले नी दरवाजा बंद झाला. आता मात्र प्रिया पुरती हताश झाली. रागाच्या भरात आपण स्वत:च्या सुटकेचा मार्ग कायमचा बंद केला हे उमगून ती खचूनच गेली. आपण बेअकली पणाने शत्रूला सावध करून आपल्या हातानेआपला घात करून घेतला याचा तिला पश्चात्ताप झाला. आता या पुढे त्याना विरोध करून आत्मघात करून घेण्या ऐवजी सुटकेची संधी पहात मूग गिळून गप्प रहायच असा निर्धार तिने केला,
चार वाजता दार उघडलं नी एकजण आत आला . त्याच्या सोबत अर्ध्या वयाची धिप्पाड नेपाळी बाई नी तोंडावर देवीचे वण असणारा काळा कभिन्न हबशी होता. प्रियाकडे बोट दाखवीत तो म्हणाला, “ये लौंडी देखो ..... एकदम चिकना माल है ... आज सुबह ही लाये है .... ” आलेल्या दोघानीही तिला नीट निरखून पाहिले. काळा माणुस बोलला, “ देखो खाला , चमडा सुफेद लेकिन उमरसे मोटी लगती है ....” नी तिघेही खोलीबाहेर पडली. दहा मिनीटानी पुन्हा दार उघडले .कागदात गुंडाळलेले दोन समोसे नी चहाचा कप घेऊन खाला आत आली होती ...... प्रियासमोर समोसे नी चहाचाकप ठेवून
“तुम्हारा सुखा हुवा मूं देखकर मैं समझी की इन शैतानोने तुम्हे खानेकू कुछ नहीं दिया है .... इसलिये मै ये लेके आयी..... तूने इन शैतानोंको नहीं पहचाना ..... इनसे बाते लडाओगी तो पछताना पडेगा .... जो भी होगा चुपचाप सहती रहो .... मैं तुम्हें जल्दही इन दरिंदोंसे छुडाऊँगी .....”
खालाने ऐंशी हजाराची बोली लावली. पण ते दोन लाखांवर अडून बसले. बराच वेळा अगदी हमरा तुमरीवर येत गळा फाटेस्तोवर सौदेबाजी चालली. पंधरा मिनीटा नंतर राकेश च्या मुसलमान मित्राने, “सुलेमान जरा इधर आ .....”म्हणत काळ्या हबशाला बाजूला घेतले नी बराच वेळ त्यांचे गुफ्तगू झाल्यावर सुलेमान खालाच्या कानाशी लागत काहीतरी समजवू लागल्यावर नकारार्थी मान हालवीत खाला म्हणाली, “ जादासे जादा ग्यारा हजार और दूँगी..... इससे जादा एक पाई भी नहीं दूँगी.....साला इस धंदेमे तो आजकल बहोत मंदी चल रही है..... गि-हाक तो कम होता जा रहा बिन बदिन.... पुलिसका हप्ता भी बढ गया है.... बंबई में तो चमडा बहोत सस्ता मिल रहा रे आज कल...... इस्कूल कोलेज की बच्ची लोग तो सस्तेमें मिल रही ना और डांस बार वाले बरकतमे है आज कल ..... पैसेवाला जवान लोग तो कोठेमें आताच नहीं आजकल... . देना है तो दे दे वरना हम चले .... मेरे पास जादा टैम हैच कहाँ ” सौदा जमला नाही. सुलेमान नी खाला बाहेर पडल्यावर अर्ध्याजिन्यातून सुलेमान माघारी आला... “देखो भाय पोक्या, आखरी जुबान है.... वसीम आनेपर सब मिलकर सोचो ...... एक लाख बीस हजार र्मे जमता है तो कल दोपहर तक चमडा कोठीपर केले आओ .... रोकडा पैसा लेके जाओ ” नी तो निघून गेला.
सात वाजता वसीम की राकेश आला. “अरे भाय , दो घंटा पहले वो नेपाली खाला आयी थी..... एक लाख बीस हजार बोलके गयी.... पटता ही तो कल दोपहर तक चमडा उस्की कोठीपर छोडके आओ... रोकडा मिलेगा.. वो बोली , आज कल इस्कूल कोलेज की बच्ची लोग तो सस्तेमें मिल रही ना..... पैसेवाला जवान लोग तो कोठेमें आताच नहीं आजकल कोठेपे, धंदेमें मंदी चल रही है ...... ” त्यावर तो म्हणाला, “आपूनका तो लक खुल गया ...... कोठेवाली क्या खाक देंगी... पूरे पाँच लाख गिन लेंगे हम लोग..... केकिन जरा होशियारीसे करना चाहिये.... बडा जोखम का काम है... ” मग त्याने सगळा मामला खोलून सांगितला. त्याला कर्नाटकातून दोस्ताचा फोन आला होता. सौदी च्या शेखसाहेबाला किडनी मिळवून देण्यासाठी 3 लाख रुपयाची ऑफर होती.पन्नास हजार अ‍ॅडव्हान्स ही द्यायचीही तयारी होती. डोनरला कर्नाटक मधल्या पत्त्यावर न्यायच होत. तिथे पोचल्यावर पुढची सगळी फिल्डिंग लावून तयार होती. दोन दिवसात काम फिनिश नी रोकडे तीन लाख कॅश.... फक्त आधी डोनरचा ब्लड ग्रूप कळवायचा होता. खूशीत शीळ घुमवीत चिकना बोलला..... “ अब तू देखतेही रह... ये तो साला आसान धंदा है.... काला बुरा कैसाभी माल चलेगा ... अपनेको तो बस किडनीसे मतलब... मै तो रोजाना पाँच छे लडकिया पटाऊँगा..... जा जरा कुल्फी लेके आ .... रंडी को खुस करेंगे...”
कुल्फीचा कुल्हड घे ऊन चिकना बेड रूम मध्ये घुसला... “ लो कुल्फी खाओ मेरी रानी.... जादा चिढाएगी ना तो आपुन खतरनाक है... ” प्रियाने कुल्फी हातात घेतली नी लाडिक पणे त्याचा हात धरून जवळ ओढित बोलली, “ देखो चिकने हमरी भूल हो गयी.... तेरे दोस्तोने मेरे साथ बुरा बर्ताव किया .... उनका गुस्सा तुमपर निकाला मैंने.... मुझे कोठीवाली को मत बेच... मै तेरे साथ शादी करनेकू तैय्यार हूँ? ” मिळाला एवढा दणका खावून प्रिया शहाणी झाली आहे हे ओळखून चिकना नि:शंक झाला. “मेरी इक बात मानोगी तो मै तेरे साथ शादी करूँगा ....दो तीन दिनोमें मै तुझे बंबई के बाहर मेरे गाँव मे ले जानेवाला हूँ... खा ... कुल्फी खा.....तेरा ब्लड ग्रूप कौनसा है... ” “ बी प्लस..... ” प्रिया वीना विलंब उत्तरली. “मुझे नहाना है .... मेरे कपडे दे दो ना ” तासाभराने सलवार टॉप नाही पण दोन बुरखे तिला देण्यातआले. त्या नंतर दोन दिवस विना त्रासात गेले. मतलब साध्य करायचा तर झगडा बखेडा करून उपयोगाचा नाही हे प्रिया नी चिकना गँग दोघही पुरेपूर ओळखून होती.
राकेश गँग ने पद्धतशीरपणे सगळा प्लॅन आखला. प्रियाने वाटेत काही गडबड करू नये म्हणून तिचा उजवा हात बँडेजमध्ये जखडबंद करून गळ्यात टांगला. फक्त अंतर्वस्त्र घालून त्यावर बुरखा घालायला दिला. चिकन्याने आखूड पजामा ढग़ळ कुर्ता नी डोकीवर सफेद जाळीदार टोपी असा टिपीकल मुसलमानी पेहेराव केला. रात्रीआठ वाजता तिला सिलेनारच्या दोन गोळ्या घ्यायला लावल्या नी दहा मिनीटातच लंबूच्या मित्राची सेव्हन सीटर एनोव्हा क्रिस्टा गँगला घेऊन सुसाट निघाली. थंडगार एसी नी सिलेनॉर चा असर होऊन पंधरा मिनीटातच प्रियाची विकेट पडली . रिस्क टाळण्या साठी थेट बेळगाव न गाठता सातारा हॉल्ट करून ब्रेक जर्नी करायचा प्लॅन होता. दुस-या दिवशी संध्याकाळी सातारा सोडून पहाटे राकेश गँग बेळगावला दाखल झाली. मुंबई ते बेळगाव संपूर्ण प्रवासात दोन चेक पोस्ट वर पोलिसानी गाडीत डोकावून जुजबी चेकिंग केले. बाकी पूर्ण काहीही अडथळा आला नाही. कंपनी वसतीला झोपडपट्टी सारख्या घरात थांबली. कोणता प्रदेश असावा काही थांग पत्ता तिला लागला नाही पण बाहेरून येणारे शब्द ऐकूनआपण कानडी मुलुखात आहोत असा अंदाज तिने बांधला. बाहेर पडताना तिच्या डोळ्यावर नी तोंडावर पट्टी बांधूनच तिला फिराव लागे. तिला मेडिकल चेक अप साठी नेताना राकेश ने तिला सज्जड धमकी दिली, “ये देखो प्रिया, वैसे तो तुम्हे फोरास रोड या कामाठी पुरा में कोठी वालीको बेचना था, लेकिन तुमपे रहम खाकर उसके बजाय तुम्हारी एक किडनी निकालकर तुम्हें छोड देनेवाले है... क्या मंजूर है?’’
“किडनी के एक लाख रुपिए मिलेंगे. पचास हजार तुम्हे और पचास हजार गँगको. अगर चुपचाप हमारा स्सथ दिया तो कल तेरी किडनी निकालकर दो दिनोके बाद कॅश के साथ तुम्हे कुर्ला छोडेंगे.” तिच्या गल्लितच एकाने अरबाला किडनी डोनेट करून तीन लाख रुपये मिळवले असं बोललं जायचं. ही गँगही आपली किडनी विकून तीन चार लाख रुपये मिळणार आहे. कोठेवाली एवढे पैसे देनार नाही म्हणून आपली किडनी विकून मोठी कमाई करून आपल्याला सोडायला हे तयार झालेत हे तिने ओळखलं. हयातभर कुंटणखान्यान सडत राहण्या पेक्षा किडनी दे ऊन त्या बदल्यात सुटका करून घेण प्रियाने मान्य केलं. राकेश तिला घेऊन नियोजीत प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये दाखल झाला. तिथे तीन चार वेगवेगळ्या फ़ॉर्म्स वर तिच्या सह्या घेतल्या.मग दोन तीन टेस्ट केल्या नी अकरा वाजतातिला ऑपरेशन थि एटर मध्ये नेण्यात आलं.
प्लॅन प्रमाणे सगळं काही बिन बोभाट उरकलं. प्रियाच्या पोटावर दीड इंच जखम होती. खूप थकवा जाणवत होता. पण इतर काही त्रास जाणवला नाही. त्या कैदेतून जीवानिशी बाहेर पडायला ती आतुर झालेली होती. काही न बोलता ती गप्प राहिली होती. पार्टीने ठरल्या प्रमाणे अ‍ॅडव्हान्स वजा जाता दिलेली चार लाख कॅश घेऊन गँग परतीच्या प्रवासाला निघाली. वाटेत चेकिंग झालेच तरी काय वांधा नको म्हणून त्यानी तीन लाख रुपये प्रियाच्या पर्समध्येच ठेवले नी उरलेले पाचही जणानी वाटून घेतले . कोणताही पोलीस बुरखाधारी नी बँडेज मध्ये हात गळ्यात टांगलेल्या निद्रिस्त मुस्लिम महिलेची पर्स उघडून पहायची आगळिक करू धजावला नसता . याची त्याना पूर्ण खात्री होती. परतीचा प्रवास विना ब्रेक व्हायचा होता. वाईला एका निर्जन जागी एनोव्हा थांबली. अर्धवट झोपेत असलेल्या प्रियाला बहिर्दिशेला नेऊन आणल्यावर पुढचा प्रवास सुरु झाला. वाशीला येऊन लंबूच्या फ्लॅट वर गँग पोचली तेंव्हा सकाळचे सात वाजले होते. प्रिया अद्यापही गुंगीतच होती. तिच्या हाताच बँडेज सोडून तिला कॉटवर आडवी करून ती जागी व्हायची वाट पहात त्यानी तिपानीचा डाव मांडला. चिकन्याने प्रियाच्या पर्समध्ये पाच हजाराच्या नोटा कोंबल्या, तिची सलवार टॉप नी पर्स उशाशी ठेवून प्लॅन प्रमाणे तो गुल झाला. अकरा वाजता प्रिया जागी हो ऊन उठून बसली. सलवार टॉप घेऊन ती बाथरूममध्ये घुसली .
कपडे घालून बाहेर आल्यावर “ अरे ओ लंबू भाय... चिकना कहाँ है?” तिचा आवाज ऐकताच हातातला डाव तसाच टाकून लंबू उठला. “चिकना तो अपने घर गया ... आब वो यहाँ नही आयेगा. और ध्यानसे सुन .... हम तुम्हे रिहा करनेवाले है... आँखोमे और मूँह पर पट्टी बांधकर हम तुम्हे रिक्षा मे बिठा देंगे रिक्षा चालू होनेकेबाद तुम पट्टी खोल सकती हो..... तेरे पर्समे तुम्हारे शेअर रखा है.... ” खर तर तिला चार पावल चालायचही त्राण उरलेल नव्हत... पण सुटका होणार हे ऐकताच तिच्या अंगात घोड्याच बळ संचारल... तिच्यातोंडा वर नी डोळ्यांवर पट्टी बांधून बुरखा घेतल्यावर लंबू नी तिचा हात धरून चालायला लागला. लिफ़्ट थांबल्या वर एकजण लगबगीने रिक्षा आणायला गेला. हळू हळू चालत ती गेट मध्ये पोचल्यावर पाचच मिनिटात रिक्षा आली. “ भाभीको स्टेशन छोडो ” म्हणत तिला रिक्षात बसवून लंबू सह चौकडी पसार झाली. अकस्मातपणे सुटकेची संधी मिळाल्यामुळे हरखून गेलेल्या प्रियाला चटकन डोळ्यावरची नी तोंडावरची पट्टी सोडायच ही उशिरा सुचल. वाशी स्टेशन आल नी रिक्षा थांबली .... “किराया कितना हुआ भैय्या?” “किराया दिया है तुम्हारे देवरने ” रिक्षावाला उत्तरला.
रिक्षातून उतरल्यावर मात्र तिच उसन अवसान गळून पडल नी तिला हुंदका फुटला. महत्प्रयासाने रडू थोपवीत मंद मंद पावल टाकीत ती पाय-या चढली. गेट मधून आत जाऊन रिकाम्या बाकड्यावर ती जवळ जवळ कोसळलीच . दु:खाचा कड आवरून ती सावध झाली नी तिने तिकीट बारीवर जाऊन तिकीट काढल. बारा वाजत आले होते नी गर्दीचा भर ओसरला होता. ट्रेन आली नी ती लेडिज डब्यात शिरली. सीट वर बसल्या बसल्या तिने बुरखा काढून हातात घेतला. बुरखा आड धरून तिने पर्स मधल्या नोटा मोजून पाहिल्या, फक्त सहा हजार आठशे रुपये भरले. भाड खाऊनी पन्नास हजार द्यायचं मान्य करून शेवटी फसवलंच... ती मनात चरफडली. गत घटनांची संगती लावताना तीला एक प्रश्न सतॎवीत राहिला .... आपल्याला भवफासात टाकून चकमा देणारा तो हरामजादा वास्तवात कोण असेल बरं? राकेश की वसीम.......?
**********