Koun in Marathi Thriller by Gajendra Kudmate books and stories PDF | कोण? - 19

Featured Books
  • My Wife is Student ? - 25

    वो दोनो जैसे ही अंडर जाते हैं.. वैसे ही हैरान हो जाते है ......

  • एग्जाम ड्यूटी - 3

    दूसरे दिन की परीक्षा: जिम्मेदारी और लापरवाही का द्वंद्वपरीक्...

  • आई कैन सी यू - 52

    अब तक कहानी में हम ने देखा के लूसी को बड़ी मुश्किल से बचाया...

  • All We Imagine As Light - Film Review

                           फिल्म रिव्यु  All We Imagine As Light...

  • दर्द दिलों के - 12

    तो हमने अभी तक देखा धनंजय और शेर सिंह अपने रुतबे को बचाने के...

Categories
Share

कोण? - 19

भाग – १९
तीने तो नंबर तीचा फोनवरून डायल केला. समोरचा व्यक्तीचा फोन वाजू लागला होता. फोनची रिंग संपूर्ण काळ वाजली परंतु समोरचा व्यक्तीने फोन उचलला नाही. सावलीने पुन्हा तो नंबर डायल केला पुन्हा फोनची रिंग वाजली आणि वाजत राहिली. मग अचानक त्या व्यक्तीने फोन उचलला आणि हेलो मिस्स सावली असे म्हटले. तो आवाज सावलीचा ओळखीचा नव्हता परंतु त्याने मिस्स सावली म्हटले होते. त्यामुळे सावली एकदम घाबरली होती. कारण कि या आधी निलेशने सुद्धा तीला याच प्रकारे मिस्स म्हणून संबोधले होते. तीला वाटू लागले होते कि निलेश जिवंत तर नाही आहे. तो पुन्हा तीचा आयुष्यात वीष तर मिळवणार नाही ना. मग तीने विचार केला, निलेश स्वतःचे फोटो कसे आणि काय काढू शकतो. त्यानंतर विचार आला कि निलेशने कुणाला सांगितले असेल त्यांचे फोटो काढायला आणि मग निलेश ते फोटो घेऊन मला त्रास देणार असेल. परंतु त्याचा स्वतःचा मृत्य झाल्यामुळे तो तीसरा व्यक्ती आता हे काम करत असेल. सावली संपूर्ण विचारात गुंग झाली होती. तर पुढून आवाज आला, “ हेलो, झोप झाली कि नाही मिस्स सावली, कसे वाटले तुझे फोटो. त्या फोटोत तू फारच सुंदर दिसत आहेस. यात तुम्हा दोघांची जोडी फारच छान दिसत आहे.” म्हणून तो हसू लागला. मग तो पुढे म्हणाला, “ अरे हे तर पोलिसांना माहितच नाही आहे कि तुम्ही दोघे भेटले होते. त्यांना सुद्धा हे सुंदर फोटो बघायला हवे असतील हो कि नाही, मिस्स सावली.”
मग सावली घाबरत्या आवाजाने बोलली, “ क कोण ! बोलतय.” तेव्हा तो व्यक्ती बोलला “मी ना तुझा काळ बोलतोय.”
असे म्हणून त्याने फोन ठेवला. सावली आता संपूर्ण घाबरली होती, परंतु तीला असे घाबरून चालणार नव्हते. तर तीने स्वतःला सावरून फोन काढला आणि सावंत साहेबांना फोन लावला. सावंत साहेबांनी फोन उचलला आणि बोलले, “ हेलो सावली आज बरेच दिवसांनी फोन केला. सगळ बर आहे ना पुन्हा कसला त्रास तर नाही न.” तेव्हा सावलीने थोडा विचार केला आणि मग ती उत्तरली, “ नाही सर तसे काहीच नाही असे सहजच मी तुम्हाला फोन केला. तसे मला तुम्हाला परस्पर भेटायचे होते म्हणून मी फोन केला.” तर सावंत साहेब बोलले, “ हो नक्कीच ये ना पोलीस स्टेशनला मी आहे उपस्थित. हो फक्त जेव्हा निघशील फक्त मला एकदा फोन करून सांगशील त्यानुसार मी तुला मी आहे कि नाही हे सांगणार. नंतरच तू माझ्याकडे येण्यासाठी नीघशील कारण कि मी नसणार आणि तू येथे त्रास करून येशील आणि तुझी वेळ व्यर्थ जाईल.” मग सावलीने म्हटले, “ हो नक्की साहेब मी जेव्हा येईल तुम्हाला आधी फोन करून कळवणार. तर येते मी साहेब.” असे म्हणून सावलीने फोन कापला.

त्यानंतर ती पुन्हा विचार करू लागली होती. आता तो वीचार सावंत साहेबांचा सोबत काय आणि कसे बोलायचे. या फोटोचा प्रकरणाबद्दल त्यांना सांगायचे किंवा नाही. कारण कि त्यांना हे पुरावे सापडले नाहीत म्हणून त्यांनी न्यायालयात ते उपस्थित केले नाहीत. त्याचमुळे माझी त्या प्रकरणातून लवकर सुटका झाली होती. आता जर मी त्यांना हे सांगणार तर ते माझ्यावर शंका करतील आणि पुन्हा नव्या रीतीने त्यांचा तपास सुरु करतील. परंतु त्यांना भेटून निलेशचा मृत्यू बद्दल माहिती तर काढावीच लागेल. याबद्दल तीने फार वीचार केला, एक दोन तास नाही तर दोन दिवस विचार केला. नंतर तीने निर्णय केला कि सावंत साहेबाचा पुढे काही बोलायचे नाही या प्रकरणा बद्दल फक्त आणि फक्त निलेशचा मृत्यू झालेला आहे कि नाही याबद्दल पुरावा मागायचा आहे. मग दोन दिवसांनी सावलीने सावंत साहेबांना फोन लावला आणि सांगीतले कि मी तुम्हाला भेटण्यास येत आहे. तर साहेबांनी तीला येण्यास सांगीतले. ती नीघाली आणि थेट पोलीस स्टेशनला जाऊन पोहोचली. ती आत गेली तर साहेब त्यांचा सीटवर बसून फोनवर बोलत होते. साहेबांनी सावलीला बघीतले तर त्यांनी तीला हात हलवून आत येण्याचा इशारा केला. सावली मग आत गेली आणि साहेबांनी तीला बसायला सांगीतले.

साहेब अजून फोनवरच बोलत होते तर ती शांत बसून साहेबांचे बोलने संपण्याची प्रतीक्षा करू लागली. मग थोड्या वेळाने साहेबांचे बोलने झाले आणि ते म्हणाले, “ सॉरी, सावली तुला प्रतीक्षा करावी लागली. अग मोठ्या साहेबांचा फोन होता, ते आपल्या मागील प्रकरणा बद्दल विचारत होते.” साहेब बोलत होते आणि सावली विचार करू लागली. बरे आहे मला वेगळा विषय काढून व्यर्थ बोलावे नाही लागणार. तर साहेबांचे बोलने झाल्यावर सावली उत्तरली, “ नाही सर मला सॉरी म्हणू नका. आमचा पेक्षा जास्त मौल्यवान तुमची वेळ आणि तुमचे कार्य आहे.” मग ती पटकन मुद्यावर येऊन बोलली, “ साहेब ते प्रकरण अजून संपले नाही काय. मला पुन्हा कोठडीत बंद व्हावे लागेल काय.” तेव्हा सावंत साहेब बोलले, “ अग तसे नाही आहे, कुठलेही प्रकरण हे संपूर्ण तपास लाग्यावरच संपुष्टात येते. तुझ्या प्रकरणात आम्हाला काहीच असे साक्ष्य सापडले नाही तुझ्या विरुद्ध आणि कुणा तीसऱ्या व्यक्तीबद्दल.” हे ऐकून सावली मध्येच बोलली, “ काय माझ्या बद्दल, साहेब माझी सुद्धा तुम्ही चौकशी केली होती.”
ते ऐकून आता साहेब शांत झाले आणि विचार करू लागले.
शेष पुढील भागात...............