Smashani killa - 2 in Marathi Horror Stories by Ankush Shingade books and stories PDF | स्मशानी किल्ला भाग 2

Featured Books
  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

  • ફરે તે ફરફરે - 66

    ફરે તે ફરફરે - ૬૬   માનિટ્યુ સ્પ્રીગ આમતો અલમોસામાં જ ગ...

  • ભાગવત રહસ્ય - 177

    ભાગવત રહસ્ય-૧૭૭   તે પછી સાતમા મન્વંતરમાં શ્રાદ્ધદેવ નામે મન...

  • કુંભ મેળો

    કુંભ પર્વ હિન્દુ ધર્મનો એક મહત્વપૂર્ણ પર્વ છે, જેમાં કરોડો શ...

Categories
Share

स्मशानी किल्ला भाग 2

स्मशानी किल्ला भाग दोन

हलधर सांगत होता आपली व्यथा. त्यानं कितीतरी माणसांचा बळी घेतला होता त्या किल्ल्यावर. परंतु आता स्वतःचा जीव जाईल या यातनेनं तो तळपत होता व पोपटासारखा बोलत होता तो सारंग, हेमलता व अतूलसमोर. तसं पाहिल्यास दयाही येत होती त्याची. सारंग आणि हेमलता तर डोळे विस्फारून पाहात होते. तशी हेमलता म्हणाली,
"आपण याची दया घेवूच नका. अहो आपण सोडून द्याल तर हा दुसऱ्याच किल्ल्यावर जावून तिथं आपलं बस्तान बसवेल आणि तिथंही पुन्हा भुताची खेळी खेळत पुन्हा लोकांना मुर्ख बनवेल व कित्येक लोकांचा बळी घेईल."
ते हेमलताचं बोलणं. त्यावर विचार करतच होता अतूल. तोच हलधर म्हणाला,
"नाही हो, मी आता असं अजिबात करणार नाही. माझे लहान लहान मुलं आहेत आणि पत्नीही आहे मला एक. मी त्यांचं पोट भरण्यासाठीच करतो हे सारं. मला सोडून द्या. माझ्यानंतर त्यांचं कसं होणार?"
ते हलधरचं म्हणणं परंतु त्यावर सारंग म्हणाला,
"मग हे तुला आधी नव्हतं समजत काय? अरे तू कित्येक पतीपत्नीचे जीव घेतले. त्यांचा जेव्हा जीव गेला, त्यानंतर त्यांचे मायबाप काय विचार करीत असावेत. विचार करीत असावेत की त्यांचा बळी एका भुतानं घेतला. अन् तेही त्यांना कळलं नसेलच. पत्ताच लागला नसेल त्यांना. हं, एक गोष्ट नक्की फिट्ट बसली असेल त्यांच्या मनात की त्यांच्या मुलांचं अपहरण केलं असेल कोणी. काहीजण तर बिचारे तळपत तळपत मरण पावले असतील बरं का?"
हलधर ते सगळं ऐकत होता. त्यानं हेमलतानं बोलणं ऐकलं होतं. तसंच बोलणं सारंगचंही ऐकलं होतं त्यानं. मात्र अतूल अजूनही बोलला नव्हता. तशी हेमलता व सारंगच त्याचेशी संवाद साधत होती. परंतु अतूल मौन बाळगून होता. शेवटी अतूल बोलता झाला. म्हणाला,
"हे बघा, यात याचा दोष नाही. दोष आहे तो नियतीचा आणि नियतीनंच हे सारं घडवून आणलेलं असेल. नियतीच घडवून आणते सगळं. आपण फक्त नियतीच्या हातातील एक कळसुत्री बाहुले आहोत. तेव्हा मला नाही वाटत की यात याचा दोष असेल."
ते अतूलचं बोलणं. त्यावर सारंग म्हणाला.
"परंतु मला हे म्हणायचंय की यानं एवढे बळी घेतले त्याचं काय? ते आमच्यासारखेच होते ना. कुणाचे तरी पुत्र होते ना ते?"
"होय, ते सगळं बरोबरच. परंतु त्यांचं मरणच या माणसाच्या हातून असेल. म्हणूनच ते इथंपर्यंत आले."
"मला नाही पटत आपलं म्हणणं. मला पटतं की आपण याला त्याच्या पापाची शिक्षा द्यायलाच हवी."
"मी आधीच म्हटलंय की आपण कोण आहोत याला शिक्षा देणारे. ना देव आहोत ना दानव. आपण माणसं आहोत. आपण जर याचा बळी घेतलाच तर आपल्यात व याच्यात काय फरक असणार. तो आणि आपण सारखेच होणार. शिवाय आपल्यालाही पापच लागणार. मी नाही घेवू शकत याचा बळी. हं, तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही घेवू शकता याचा बळी." अतूल म्हणाला.
अतूल म्हणाला. तसा सारंग व हेमलता विचार करु लागले. विचार होता की हलधरला ठार करावं. तसा तो शरणावरच होता. परंतु त्यांचीही हिंमत होत नव्हती. कारण आता शरणावर जीवंत माणसाला जाळणं होतं व ते कृत्य त्या दोघांनी कधीही केलं नव्हतं. तसे ते दोघेही अतूलला म्हणाले,
"आपणाला जे काही करायचं असेल ते करावं. मात्र आम्हाला तुम्ही करीत असलेलं कृत्य हे खरंच चांगलंच आहे हे पटवून द्यावं म्हणजे झालं."
ते सारंग व हेमलताचं बोलणं. त्यावर अतूल विचार करु लागला. विचार करु लागला की यांना ती गोष्ट कशी पटवून द्यावी. विचारांती त्याला शिवाजी महाराज आठवले व आठवला त्यांचा पराक्रम. शिवाजी महाराजांवर त्यांच्या मावळ्यांनी अति प्रमाणात विश्वास केला होता व असा विश्वास करुनच त्यांनी आपल्या प्राणांचं बलिदान केलं होतं. त्यावेळेस त्यांनी आपल्या मुलाबाळांची व बायकांचीही काळजी केली नव्हती. फक्त शिवाजीसाठीच ते मरण पावले होते. त्यानंतर शिवरायांनीही त्यांना अंतर दिलं नव्हतं. त्यांच्यासाठी बलिदान देणाऱ्या परीवाराकडे जावून त्यांचं पोट भरण्यासाठी त्यांना काही जमीनीचे तुकडे दिले होते. काहींना मनसबदारी दिली होती, तर काहींना गडावर नोकऱ्या. ती शिवरायांची आठवण येताच अतूल शिवरायांची माहिती सारंग व हेमलताला सांगू लागला.
"शिवाजी महाराज हे धर्मनिरपेक्षतेचे प्रतिक होते. ते विश्वास करणारे होते व त्यांच्यावरही लोकं विश्वास करीत असत. त्याच विश्वासाच्या भरवशावर लोकं आपल्या लेकराबाळाची व आपल्या पत्नीची तमा न बाळगता बलिदान करीत असत. म्हणत असत की आपल्यासाठी मरणं हे कोणाच्या भाग्यात आहे. ते हसतहसत मरत असत शिवरायांसाठी. ते जीव ओवाळून टाकत असत शिवरायांसाठी.
अलिकडील काळात शिवाजी महाराजांना हिंदूंचे राजे म्हणून गौरविण्यात येते. तसंच त्यांचा हिंदूंचा राजा म्हणून गौरव करण्यात येतो आणि हिंदू मुस्लीम वा मराठा मुस्लीम अशी समाजात तेढ निर्माण केली जाते. शिवाय ज्या महाराष्ट्रात हिंदू मुस्लीम समाज स्वातंत्र्यापुर्वी एकोप्यानं राहात होता. शिवाय ज्या मुस्लीमांनी स्वातंत्र्य संग्रामात मदत केली. त्याच मुस्लीमांचा द्वेष करुन राजकीय पोळी शेकणारे राजकारणी पाहिल्यास विचार येतो की जो देश मुस्लीमांचा द्वेष करतो. त्या देशात मुस्लीमांनी राहावं की राहू नये हा विचार, विचार करण्यालायक आहे. तसेच मुस्लीमांनी शिवरायांनाही आपला शत्रूच समजावं असाच आहे. महत्वपुर्ण गोष्ट ही की शिवराय हे धर्मनिरपेक्षता पाहणारे होते व ते धर्मनिरपेक्षतेचे प्रतिक होते. ते जसे हिंदूंचे राजे
होते, तसेच ते मुस्लीमांचेही होते. हे विसरुन चालणार नाही. त्यामुळंच मुस्लीम समुदायांनीही शिवरायांना आराध्य मानल्यास त्यात काही गैर ठरु नये.
दिनांक ०६/०६/१६७४ हा शिवाजी महाराजांना राज्याभिषेक सोहळ्याचा दिवस. या दिवशी म्हणजेच सन ०६/०६/१६७४ ला रायगडावर राज्याभिषेक सोहळा शिवरायांनी साजरा केला होता. त्याचं कारण होतं की शिवरायांनी अतिशय बलिदानानंतर व प्रयत्नानंतर निर्माण केलेल्या स्वराज्याला राजेरजवाड्यांनी मान्यता द्यावी. तसं पाहिल्यास स्वराज्य हे कितीतरी लोकांच्या बलिदानातून निर्माण झालेलं आहे. ज्यात केवळ हिंदूच नाही तर कित्येक मुसलमान देखील होते. केवळ मराठेच नाही तर कित्येक अस्पृश्यही होते. काही आदिवासी आणि काही ब्राह्मण पंडीतही होते. त्यात काही मंडळी अशीही होती की जी स्वतःला हुशार समजत होती. जी शिवरायांपुढं टिकली नाहीत. परंतु शिवाजी मरण पावल्यानंतर त्यांनी जणू आपली डाळ शिजवली व पुढं त्यांनी डाव खेळून शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर जवळपास पन्नास वर्षानं आपला एकछंत्री अंमल सुरु केला होता व भोसले घराण्यांचं नाही तर मराठ्यांचं स्वराज्य संपवून टाकलं होतं.
शिवाजी महाराज जेव्हा बाल्यावस्थेत होते, तेव्हा त्यांच्या मनात प्रेरणा निर्माण केली. ती त्या लहान लहान बालकलाकारांनी की ज्यात आदिवासी आणि अस्पृश्यच होते. ते पुण्याच्या लालमहालात राहात असतांना पुण्याची वस्ती काही आजच्या पुण्याएवढी नव्हती. त्या पुण्याच्या आजुबाजूला डोंगर, पर्वत व जंगलाचा भाग होता. ज्या जंगलात वाघ, सिंह, अस्वल व लांडगे यांचा सुळसुळाट होता. ते हिंस्र श्वापद कुणाला ऐकेनात. त्यावेळेस शिवरायांची आई जिजाबाई त्यांना त्या हिंस्र श्वापदाची भीती न दाखवता त्यांना त्यांच्या लहानपणीच घोड्यावर बसून जंगलाची रपेट मारायला लावायच्या. ज्यातून त्यांनी निरीक्षण केलं होतं. ते निरीक्षण होतं, 'लहान लहान जंगलातील आदिवासी व वेशीबाहेरच्या वस्तीत राहणारे अस्पृश्यच मुलं हे जंगली श्वापदांना न घाबरता त्यांची शिकार करणं.' हे निरीक्षण शिवरायांनी जेव्हा आपली आई जिजाबाई ह्यांना सांगीतलं. तेव्हा त्यांना त्यात कल्पकता दिसून आली. कल्पकता होती की जी मुलं हिंस्र श्वापदांना घाबरत नाहीत. ती मुलं उद्या चालून आपल्यावर अन्याय करणाऱ्या जुलमी राजवटीलाही नेस्तनाबूत करु शकतील. फक्त त्यांच्यात हिंमत भरावी लागेल. बस, कामात यशस्विता. असा विचार करताच तिनं विचार केला की या कामी कामात कोण येवू शकतो.
तो विचार......... तो जिजाबाईचा विचार राष्ट्रहितासाठी होता व राष्ट्रहितासाठी विचार करतांना जिजाबाईंनी ठरवलं की जो समाज शेकडो वर्षांपासून प्रामाणिक असतो आपल्या मायबापासाठी. त्याला अंतर देत नाही. त्याच समाजातील मुलांना आपण त्यांच्या अगदी लहानपणापासून आपलंसं केलं तर...... तर त्याच समाजातील मुलं आपल्या शिवाच्या जिवाला जीव देवू शकतील. तसं पाहिल्यास त्यांना आपल्या धर्मातील लोकांचा अभ्यास होताच. आपल्या धर्मातील लोकं कसे फितूरी करतात. हे त्यांना माहीत होतं. मग त्यांनी ठरवलं की आपण परधर्मातीलच मुलांवर प्रेम करायला शिवाजींना शिकवावं. जेणेकरुन त्या धर्मातील मुलं आपल्या शिवाला जीवनभर विसरणार नाहीत. मरायला पुढं जातील. परंतु दगाबाजी करणार नाहीत.
तो त्यांचा विचार. तो विचार रास्त होता. कारण त्यानंतर जिजाबाईंनी शिवरायांना हिंदूंसारखंच मुस्लीम धर्मावरही प्रेम करायला शिकवलं व तशीच मैत्रीही करायला शिकवली. ज्यातून हिरोजी फर्जद, इब्राहीम खान, दौलतखान, शिवा काशिद, मदारी मेहतर, मौलाना हैदर अली, काजी हैदर, नूरखान बेग इत्यादी मुस्लीम मंडळी पुढं आली ती शिवराय व जिजाबाई यांनी पुढं आणली. त्यांनी शिवरायांच्या जिवासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली व डगमगले नाहीत.
शिवरायांच्या स्वराज्याचा पहिला सरनौबत नूरखान बेग होता. घोडदळातील अत्यंत महत्त्वाच्या पदावर सिद्दी हिलाल आणि सिद्दी वाहवाह होते. ते पन्हाळा वेढ्यातून शिवरायांची सुटका करण्यासाठी नेताजी पालकर यांच्या खांद्याला खांदा लावून लढले. शिवाय याच पन्हाळ्यातून शिवाजी राजे निसटून जाण्याचा बेत करीत असतांना त्यांनी गडावर त्यांच्याच सारख्या दिसणाऱ्या एका शिवा काशिद नावाच्या व्यक्तीवर जबाबदारी देवून त्याला म्हटलं की शिवा तू तर यातून शत्रूच्या हातात सापडताच मारला जाणार. त्यावर शिवा काशिद म्हणाला की राजे, मी शिवाजी म्हणून मारला जाणार याचा अभिमान आहे मला. त्यानंतर त्याची पालखी त्याचं पन्हाळ्याच्या कडेलाच असलेल्या त्यांच्याच गावाकडून म्हणजेच नेमापूरकडून निघाली. अशी पालखी पन्हाळ्यावर सभोवताल वेढा घातलेल्या सिद्धीच्या सैन्याने अडवली. ज्यात शिवा काशिद सापडला व त्याची सिद्धीच्या सैन्याने अतिशय निर्घूणपणे हत्या केली. त्यावेळेस ना सिद्धीनं विचार केला की शिवा काशिद हा मुस्लीम आपल्याच धर्माचा आहे. मारायचा कशाला आणि शिवा काशिदनंही विचार केला नाही की शिवाजी आपल्या धर्माचा नाही. मग मरायचे कशाला? फक्त विश्वास व त्याच विश्वासाने हुरळून जाणारा तो समाज. त्या समाजानं फक्त कर्तव्यदक्षता पाळली. धर्म पाळला नाही. उलट आपल्याच धर्मातील काही उच्च जातीतील माणसं की ज्यांनी आपला जीव जाईल या भीतीनं आपला धर्मबदल केला होता. एक संभाजी आणि त्यांच्या सोबत असलेला कवी कलश असेच दोन वीर होवून गेले की ज्यांनी मरणयातना स्विकारल्या. परंतु धर्मबदल केला नाही. मात्र आज त्यांना आपल्या धर्मातील माणसं विसरली आहेत.
शिवाजीराजांचे अंगरक्षकदल अत्यंत सक्षम होते. त्यांच्या अंगरक्षकदलात एकूण एकतीस अंगरक्षक होते. सिद्दी इब्राहिम हे शिवाजीराजांचे अंगरक्षक होते. शमाखान हे शिवरायांचे विश्वासू सरदार होते. मदारी मेहतर हे फरास असणारे स्वराज्यनिष्ठ होते. छत्रपती शिवरायांच्या सोबत ते आग्राभेटीप्रसंगीदेखील होते. अनेक संकटप्रसंगी शिवरायांसोबत ते निष्ठेने राहिले. शिवरायांचे आरमार हे इंग्रज, सिद्दी आणि पोर्तुगीजांनादेखील धडकी भरविणारे होते. सामुद्रिक तटबंदी सुरक्षीत ठेवण्यासाठी आरमारदलाची कामगिरी महत्त्वाची होती. अशा आरमारदलाच्या प्रमुखपदी शिवरायांनी दौलतखानाची नेमणूक केली होती, जो एक मुसलमानच होता. दौलतखान यांनी स्वराज्याची इमानेइतबारे सेवा केली. शिवरायांकडे अत्याधुनिक तोफखाना होता. इब्राहिमखान हे शिवरायांच्या तोफखान्याचे प्रमुख होते. शिवरायांच्या स्वराज्यात सातशे निष्ठावान पठाणांची फौज होती. हे सर्व मुस्लीम होते व ते शिवरायांशी निष्ठेप्रती अतिशय इमानदार होते. म्हणूनच स्वराज्य साकार करता आलं. शिवरायांच्या सोबत असणारे कित्येक मुसलमान, कित्येक आदिवासी, कित्येक अस्पृश्य, कित्येक रामोशी, कित्येक धनगर व कित्येक मराठे यांच्यामुळेच स्वराज्य बनवता आलं. ते हिंदवी स्वराज्य जरी असलं तरी त्या स्वराज्याला घडवितांना मुस्लीमांनाही विसरुन चालणार नाही. गतकाळातील शिवरायांसाठी मरणाला मीठी मारणारा शिवा काशिदनं मरण स्विकारलंच नसतं तर शिवाजी जीवंत राहू शकला नसता व त्यांना हिंदवी स्वराज्य स्थापन करताच आलं नसतं. आग्र्याच्या कैदेत असतांना शिवरायांना मदारी मेहतरनं मदतच केली नसती तर शिवाजी आग्र्याच्या कैदेतून निसटू शकले नसते व स्वतःचा राज्याभिषेक करु शकले नसते. शिवरायांच्या सगळ्या पराक्रमांना मुस्लीम, अस्पृश्य, आदिवासी व रामोशी या सर्वांनीच मदत केली. म्हणूनच स्वराज्य घडवता आलं. शिवाय शिवरायांनी या सर्वच लोकांना हाताशीच घेतलं नाही तर विश्वासात घेतलं. म्हणूनच त्यांना स्वराज्य साकारता आलं.
महत्वपुर्ण बाब ही की आज मात्र शिवरायांना हिंदवी स्वराज्याचे संस्थापक मानतात. ते हिंदूंचेच राजे असल्याचा युक्तिवाद करतात आणि त्यांची धर्मामध्ये वाटणीही करतात. त्यामुळंच प्रश्न पडतात की खरंच शिवाजी महाराज हे हिंदूंचेच राजे होते काय? खरंच ते मुस्लीम वा अस्पृश्यांचे वा आदिवासींचे राजे नव्हते काय? खरंच जो कोणता मुस्लीम व्यक्ती शिवरायांना मानत असेल, त्यांनी त्यांना मानू नये काय?
विशेष सांगायचं म्हणजे शिवाजी महाराज हे जसे हिंदूंचे राजे होते. तसेच ते मुस्लीमांचेही राजे होते यात शंका नाही. ते खरं तर धर्मनिरपेक्षता मानणारे राजे होते. त्यांनी कधीच हिंदू मुस्लीम हा भेदाभेद केला नाही. कधीच आदिवासी व अस्पृश्य असा वाद केला नाही आणि महत्वाचं सांगायचं झाल्यास त्यांनी कधीच जातीभेदही पाळला नाही, हे तेवढंच महत्वाचं. ते धर्मनिरपेक्षता पाळणारे होते व धर्मनिरपेक्षतेचे प्रतिक होते."
अतूलनं सारंगला शिवाजी महाराजांबद्दल सांगीतली होती माहिती. त्यावरुन विश्वास म्हणजे काय हे सारंगला पुरतं समजलं नव्हतं. त्यानंतर तो विचार करुन प्रश्न विचारु लागला की या शिवाजी महाराजांच्या माहितीत कुठं आला विश्वास?
तो सारंगचा प्रश्न. त्यावर अतूल म्हणाला,
"यात विश्वास नाही आला तर काय. अहो, शिवा काशिदनं अगदी विश्वास ठेवून शिवराय बनायचं ठरवलं व तो बलिदानास तयार झाला. अहो, मदारी मेहतरनं विश्वास करुन आग्र्यातून महाराजांचे पलायन केले. या दोन्ही घटनेत समजा मदारी मेहतरनं शिवरायांसोबत दगाबाजी केली असती तर चित्र काहीसं वेगळं असतं. बादशाहानं शिवाजीला पुन्हा पकडलं असतं व शिवरायांची दगाबाजी केली म्हणून संभाजीसारखी मानच कापून टाकली असती त्यांची आणि मदारी मेहतरला दरबारात मानाची जागा दिली असती. बादशाहात ती ताकद होती की त्या बादशाहानं गुरु गोविंद सिंहाचे वडील गुरु तेगबहाद्दूर सिंह यांचीही हत्या केली होती. परंतु बादशाहा समजून होता की जर शिवाजी महाराजांची हत्या त्यानं केली तर अख्खा मुस्लीम समाज चिडेल व तो औरंगजेब बादशाहाचं शासनच उलथून टाकेल. म्हणूनच पन्हाळा असो की आग्रा, शिवाजी महाराज कैदेत सापडूनही त्यांची हत्या त्याला करता आली नाही. याला विश्वासच म्हणता येईल. मदारी मेहतर आणि शिवा काशिदचा आणि त्याचबरोबर विश्वास होता शिवरायांचा मुस्लीम समाजावर. म्हणूनच संपुर्ण आरमारांचा प्रमुख दौलतखानाला बनवलं व संपुर्ण तोफखान्याचा प्रमुख इब्राहीम खानाला बनवलं आणि आपले काही अंगरक्षकही मुस्लीमच बनवले होते.
विश्वास ही महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. विश्वास जर नसेल तर मोठमोठे अपराध घडून येतात. म्हणूनच विश्वास हवा. विश्वासाचं एक उदाहरण देतो. कथा फेसबुकवरील आहे. उदाहरण पती पत्नीचं आहे. एका घरी त्याची पत्नी कामावर गेली की एक स्री त्याच्या घरी येत असे. त्याचं कारण होतं त्याचं आजारीपण. तो आजार फक्त त्याच स्रीला माहीत होता. शिवाय ती त्याला काही औषधी देवून लवकरच निघून जात असे. तसं पाहिल्यास तिचं त्याचेसोबत लपडं गिफडं असं काहीच नव्हतं.
तिला गंभीर आजार माहीत होता व ती त्याची फारच काळजी घेत असे एक डॉक्टर म्हणून. ती डॉक्टर व तो पेशंट एवढंच त्यांचं नातं होतं. तसाच तोही तो आजार आपल्या पत्नीला सांगू शकत नव्हता. कारण त्याला भीती वाटत होती की जर त्यानं तो आजार आपल्या पत्नीला सांगीतला तर ती त्याला चक्कं सोडून देईल. मात्र हे किती दिवस लपणार.
ती स्री, त्याची पत्नी गेल्यावर रोजच त्याचे घरी येते हे वस्तीतील आजुबाजूच्या लोकांना माहीत होतं. परंतु ती नेमकी त्याच्या घरी का येते. हे मात्र लोकांना माहीत नव्हतं. शेवटी त्याच लोकांनी तिला त्या गोष्टीची माहीती हवी म्हणून तिला सांगीतलं व ते माहीत होताच तिनं त्यावर पाळत ठेवली व तिला आपल्या गेल्यानंतर कोणीतरी महिला आपल्या पश्चात या घरी येते. असा संशयच नाही तर ती वास्तविकता वाटली. तिनं त्या प्रकरणाची शहानिशा न करता मनातल्या मनात संशय बांधला आणि ठरवलं, आपण अशा लबाड माणसाजवळ राहायचं नाही. मग तीच त्याला सोडून गेली व तिनं त्याला लागलीच घटस्फोटाची नोटीस पाठवली. शिवाय खावटीही मागीतली व ती केसही जिंकली. तिला खावटी मंजूर झाली. तसा तो त्याच्या जीवनातील शेवटचाच दिवस होता. तो जास्त काही जगणार नव्हता.
त्याची पत्नी जशी केस जिंकली आणि त्याचेजवळ आली. तसा तिनं एक कागद त्याचेसमोर केला आणि म्हणाली,
"तू व्याभीचारी निघाला नसतास, तर मी तुझ्यावर केसही टाकली नसती आणि खावटीही मागीतली नसती."
ते तिचं बोलणं. त्यावर विचार न करता व न बोलता तो चूप बसला. तशी तीच म्हणाली,
"आता बोल ना. आता का बोबडी वळली. आता बोल ना, देणार की नाही खावटी?"
ते तिचे शब्द. ते तिचे शब्द ऐकताच त्यानं एक फोन लावला. त्या एका फोनवर वकील व डॉक्टर सोबतच आले व वकीलानं एका कागदावर त्याची स्वाक्षरी घेतली. ज्यात लिहिलं होतं की मी काही जास्त दिवसाचा पाहुणा नसल्यानं ही संपुर्ण मालमत्ता आजपासून तुझीच असून या संपुर्ण मालमत्तेचा यथायोग्य वापर कर. त्यानंतर त्यानं वकीलाकरवी स्वतःचा स्वाक्षरी केलेला कागद तिच्याजवळ दिला व सोबत चाबीही. त्यानंतर तिनं कागद वाचला. त्या कागदावर लिहिलेला मजकूर वाचला आणि विचारलं की आपण खरोखरच आजारी आहात का? त्यावर तो म्हणाला,
"होय, मी खरोखरच आजारी आहे व मी दोन चार दिवसानं मरणारच आहे. मग ही मालमत्ता मी माझ्या नावावर ठेवून काय करु? ही मालमत्ता तुझीच आहे व तू या मालमत्तेचा योग्य सांभाळ कर."
"मग ती कोण? जी दररोज आपल्या घरी येत होती."
"ती डॉक्टर आहे. ती रोज मलाच तपासायला येत होती."
"मग ती लपूनछपून का येत होती तुम्हाला तपासायला?"
"मीच सांगीतलं होतं तिला की ही गोष्ट तुला माहीत होवू नये म्हणून."
"का? का बरं ती गोष्ट मला माहीत केली नाही?"
"मला वाटत होतं की तू मला सोडून जाशील हा आजार माहीत झाल्यावर आणि शेवटी तू सोडून गेलीसच. आता हे सारं तुझंच आहे. मी फक्त दोन चार दिवसाचाच सोबती आहे."
ती घटना....... ती घटना ह्रृदयाला स्पर्श करणारी आहे. अविश्वासाचं मुर्तीमंत उदाहरण आहे. कधीकधी आपण जे डोळ्यानं पाहतोय ना. तेही वास्तविकपणे खरं नसतंच. शिवाजी महाराजांवर संबंध मावळ्यांचा विश्वास होता व मावळ्यांचा शिवरायांवर.
विश्वास....... विश्वास फार मोठी गोष्ट असते. याच विश्वासासाठी स्वतःचा हातही तोडला होता जीवा महालानं आणि याच विश्वासातून पावनखिंडही लढवली होती बाजीप्रभूंनी. एवढंच नाही तर रायबाचा विवाह मागे टाकून कोंढाणा सर करायला गेला होता तानाजी आणि स्वतःच्या जीवावर मरण ओढवून घेतलं.
विश्वासाबाबत कितीतरी उदाहरणं देता येतील. विश्वास आहे म्हणूनच जग टिकून आहे. नाहीतर देशातील लोकांची केव्हाचीच खांडोळी झाली असती. कारण जिथं विश्वास तुटतो. तिथं भांडणं व वाद उत्पन्न होत असतात. म्हणूनच सर्वांनी विश्वास करायला शिकावं. विश्वासघात करु नये. कारण विश्वासातून पवित्र नातं निर्माण होवू शकतं. माणसं जोडता येवू शकतात आणि विश्वासघातातून. विश्वासघातातून नाती तुटतात. माणसं दुरावली जातात आणि जे न व्हायचं ते होतं. जीवनाचा सत्यानाश होतो आणि तेवढाच संसाराचा बट्ट्याबोळही.

************************************************

हलधर म्हणत होता की तो आता तसं करणार नाही. त्यातच अतूलनं सारंगला दिलेले विश्वासाचे धडे. ते धडे अतूलनं वेगवेगळी उदाहरणं देवून दिले होते. त्यानंतर सारंगचा विश्वास बसला व त्या सर्वांनी त्याला सोडून द्यायचं ठरवलं. तसं त्या सर्वांनी त्याला सोडून दिलं व शहानिशा केली की तो किल्ल्यावरुन निघून जातो की नाही. त्याला संपुर्णता पाहात पाहात अतूल थांबून होता. त्यानंतर ते परत किल्ल्यावर आले व निवांत झोपी गेले.
सकाळ झाली होती. तसे ते बरेच उशीरापर्यंत झोपलेच होते. ते किल्ल्यावरच झोपले होते व जेव्हा ते उठले तेव्हा सुर्य डोक्यावर आला होता. परीसरात थंड वारा सुटला होता. त्यानं परीसरही थंड झाला होता.
तो किल्ला....... त्या किल्ल्यावर रमणीय असंच वातावरण होतं व त्या वातावरणात करमणूक चांगलीच होत होती. त्याचं कारण होतं की त्या ठिकाणी झाडं भरपूर होती व ती झाडं आपल्या गार सावलीनं हवेत गारवा पेरीत होती.
त्या किल्ल्यावर झाडं विपूल प्रमाणात होती व ती झाडं असल्यानं उष्णतामान कमी जाणवत होतं. तसं पाहिल्यास किल्ला हा टेकडीवरच होता. परंतु त्या किल्ल्यावरचा संपुर्ण परीसर हा सपाट करुन त्यावर विपूल प्रमाणात झाडं लावलेली असल्यानं जाणवणारा थंडावा पाहून अतूलच्या मनात विचारचक्र सुरु झाले होते. कारण त्याच्या गावाकडील भागात अशी विपूल प्रमाणात झाडंच नव्हती व लोकं म्हणायचे की झाडं लावा. परंतु झाडं कोणीच लावत नव्हते वा लावायला तयार नव्हते. त्यामुळंच अतूलला वाटत होतं की लोकांनी वरवर बाता करण्याऐवजी झाडं लावावीत. परंतु अतूल लोकांना कितीही सांगत असला की झाडं लावा, तरी लोकं झाडं लावायला तयार नव्हते. त्यामुळंच अतूलला वाटायचं की झाडं लावणे हा उपक्रम सरकारनंच राबवावा. तेव्हाच जनता ऐकेल व कृती करेल. ती जनता सरकारनं जर म्हटलं तरच झाडं लावेल व त्यामुळं नक्कीच हवेतील उष्णतामान कमी होईल
झाडं लावण्यासाठी सरकारनंच पुढाकार घ्यावा. असं अतूलला सारखं वाटत होतं. जेव्हा तो किल्ल्याच्या माजघरावरुन किल्ला परीसराचं निरीक्षण करीत होता. तसा तो विचार करीत होता.
'आज उष्णतामान फारच वाढलं आहे. सकाळी उठलं की या उष्णतेनं झोप न लागत असल्यानं सतत मळमळ व उलटीसारखं वाटायला लागतं. त्यातच रात्रभर कुलर जरी आपण लावून झोपलो, तरी पुरेशी झोप होत नाही. त्याला कारण आहे आजची परिस्थिती. आज आमच्या भागात परीसरात झाडं नसल्यानं ही स्थिती आहे व ही स्थिती आजच एवढी भयावह आहे आणि संकेत देत आहे की जर अशीच परिस्थिती नेहमीसाठी सुरु राहिली तर उद्या तो दिवस दूर नाही की हीच परिस्थिती सर्वांना जाळत सुटेल.
काल रस्ते होते व रस्त्याच्या दोन्ही बाजूला डेरेदार झाडं होती. तसेच ते रस्ते डांबराचे असून ते जास्त गरम होत नसत. आज मात्र त्या डांबरी रस्त्याच्या जागेवर सिमेंटचे रस्ते आले व ह्या सिमेंटच्या रस्त्यानं तापमान वाढवलं. तापमान एवढं वाढवलं की त्या तापमानानं लोकांचा जीव धोक्यात आला.
आज उष्णतामान वाढलं आहे. याला कारणीभूत आहे मोठमोठ्या सडका बनवणे व त्यासाठी उभी असलेली झाडंची झाडं तोडणं. लोकांनी केवळ त्यासाठीच झाडं तोडली नाहीत, तर सरपण, घर बांधकाम आणि कागद बनविण्यासाठीही झाडं तोडलीत. रस्ते बनवितांनाही अशी झाडं तोडली गेलीत व सिमेंटचे रस्ते बांधकाम केले गेले. मात्र काल रस्त्याच्या दोन्ही कडेला असणारी झाडं तोडली. परंतु आज सिमेंट रस्त्याचं बांधकाम पुर्ण झालं तरी आमच्या भागात काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला आजही झाडं लावली गेली नाहीत. याला जबाबदार कोण? याला साहजीकच प्रशासन जबाबदार आहे. व्यतिरीक्त सर्व लोकं म्हणतात व झाडं नसल्याचे दुष्परिणाम सांगतात. परंतु स्वतः झाडं लावत नाहीत व झाडं लावण्यासाठी पुढाकार घेत नाहीत. ते फक्त बोलतात. कृती मात्र शुन्य असते.
काल अंगणात झाडं होती. कुलर वा एसी बहुतांश नव्हताच. तो अतिशय श्रीमंत माणसांकडे असेलही कदाचीत. परंतु गरीबांकडे तो अजीबात नव्हताच. त्यावेळेस घरातील सर्व मंडळी अंगणात असलेल्या झाडाखाली पलंग टाकत असत व रात्रीची निवांत झोपही घेत असत. आज मात्र तसं नाही. आज लोकांचं उन्हाळ्यातील आयुष्य कुलर आणि एसीमध्येच जात असतं. लोकांना आज अजीबात उष्णतामानाचे चटके सहन करायला वेळ नाही. समजा कुलर नसेल तर पंख्याच्या हवेची तरी मजा घेतात आजचे लोक. परंतु झाडाखाली झोपत नाहीत. कारण झाडंच नाहीत.
काल झाडाबाबत बरेच समज गैरसमज होते. जसं चिंचेच्या झाडाखाली झोपू नये. लावडीन येते. चिंचेच्या झाडाखाली झोपू नये. चिंचेचं झाड कार्बन डायऑक्साईड वायू सोडतो. जो वायू श्वसनाला मदत करीत नाही तर माणसाला मारतो. परंतु आज ते चिंचेचं झाडंही दिसत नाही. अशी चिंचेची झाडं गावांमध्ये चौकाचौकात दिसायची. आज ती तोडली असल्यानं अजीबात दिसत नाहीत. मग झाडंच नाहीत तर ऑक्सिजन येणार कुठून? मग माणसाला गुदमरल्यासारखं नाही लागणार तर कसं लागेल. महत्वपुर्ण बाब ही की आज तापमान वाढलं आहे असे सारेच जण म्हणतात. परंतु त्या वाढत्या तापमानावर कोणीच उपाययोजना करायला तयार नाहीत. झाडं लावावीत ही ओरड आजची नाही. त्याला कमीतकमी वीस पंचवीस वर्षाचा काळ झाला. परंतु कोणीच झाडं लावली नाहीत वा लावण्याचा प्रयत्न दाखवला नाही. हं, रस्ते रुंदीकरणासाठी झाडं मात्र तोडण्याचा नक्कीच प्रयत्न केला. सर्वत्र उदासीनता. याबाबत खरं सांगायचं झाल्यास आजच्या काळात आळसच भरला आहे लोकांत, असंच जाणवतं. काल घराघरामधील खिडक्या व दरवाजेही उघडे राहायचे. आज त्याला उघडं ठेवायला जागा नाही. फ्लॅटच्या जिंदगीत तर दरवाजे बंदच असतात. बेल वाजवूनही उघडली जात नाहीत दारं. मग कुठून मिळणार मोकळी हवा? म्हणूनच श्वास गुदमरतो आहे. अलिकडे तर खिडक्याही बंद असतात.
विशेष बाब ही की आज तापमान वाढले आहे, वाढते आहे. यावर एकमात्र उपाय म्हणजे झाडं लावणे व त्यांचं संगोपन करणे. आज जर झाडं लावली तर त्याची फळं उद्या नक्कीच मिळणार. शिवाय झाडं लावा असं सगळेजण म्हणतात. परंतु झाडं कोणीच लावत नाहीत. तेव्हा हा उपक्रम सरकारनं राबवावा. सरकार जर हा उपक्रम राबवेल, तर नक्कीच झाडं लावली जातील. जी तापमान वाढीला मर्यादा घालतील.'
अतूलचं विचार करणं साहजीकच होतं. कारण तो ज्या भागात राहात होता. त्या भागात बऱ्याच लांबपर्यंत झाडंच नव्हती. अन् झाडं नसल्यानं परीसरातील उष्णतामान वाढलेलं होतं. तसा अतूल जेव्हा सांगायचा की झाडं लावा. त्यावर लोकं म्हणत असत. झाडं कुठं लावावीत? जागा काय आपल्या बापाच्या मालकीची व्हय. त्यावर उत्तर देतांना अतूल म्हणायचा,
"झाडं ही ओसाड माळरानावर, रस्त्याच्या दोन्ही कडेला, आपल्या प्रत्येकाच्या घरी, शाळेत, ग्रामपंचायत मध्ये, स्थानीय, सरकारी, खाजगी अशा प्रत्येक इमारतीत तसेच जी जी मोकळी जागा असेल, त्या प्रत्येक ठिकाणी झाडं लावावीत. जेणेकरुन तापमान कमी करता येईल."
ते अतूलचं बोलणं. त्यावर शहाणपण करीत लोकं म्हणायची की उगाच शहाणपण शिकवू नका. झाडं कोणं कोणं लावावीत? आपण थोडं ना झाडं लावावीत. झाडं लावणंच आपलं काम नाही. शेवटी वैतागून अतूल म्हणायचा.
"झाडं लावण्याचा जो उपक्रम आहे. तो सर्वांनीच राबवावा. सर्वांनीच जिथं जागा मिळेल, तिथं झाडं लावण्याचा प्रयत्न करावा. झाडं असतील तर आपण सुखी होवू, हा एकच मुलमंत्र डोक्यात ठेवावा. बाकी सर्व विसरुन जावं. झाडं लावणं याला एक उपक्रमच समजावे व तो उपक्रम आपण जसे राबवणार. तसाच तो उपक्रम सरकारनंही राबवावा. याला प्रश्नाचे स्वरुप देवू नये. कारण जसे, इतर कोणी झाडं लावा म्हटलं तरी झाडं कोणीच लावत नाहीत. त्यासाठी झाडं लोकांनी लावली पाहिजेत. म्हणून सरकारनं योजना देतांना ज्यानं झाड लावलं त्यालाच योजनांचा लाभ द्यावा. इतरांना नको. शिवाय जे झाड लावलं. त्या झाडावर आपल्या नावाची पाटी असावी असं बंधन घालावं. सेल्फी काढता आला तर काढायला लावावा. तो व्हायरल करायला लावावा. जो इतरांना प्रेरणा देईल. झाडं जगली पाहिजे म्हणून शासनाने सर्वांनाच कठडे पुरवावे. शिवाय झाडं ही प्रत्येक घरी एक याप्रमाणे रचना असावी. ज्यात नगरपालिका, ग्रामपंचायत, महानगरपालिका, स्थानीय वसाहत, काही समाजसेवक, पोलीस प्रशासन या सर्वांनी पुढाकार घ्यावा. जेणेकरुन झाडं अति प्रमाणात लावली जातील व तापमान वाढीला मदत होईल."
ते अतूलचं बोलणं. ते बोलणं पटणारच होतं. तरीही लोकांना ते पटल्यासारखं वाटायचं नाही. त्यावर पुन्हा उपदेश म्हणून अतूल म्हणायचा,
"महत्वाचं सांगायचं झाल्यास तापमान वाढ हा भष्मासूरच आहे. याचे परीणामही दूरगामी होत आहेत. ते आपणाला पाहायला मिळत आहेत. तसाच जेव्हा जेव्हा उन्हाळा येतो आणि तापमान वाढ दिसते. तेव्हा तेव्हा आपणाला तापमान वाढीवर उपाय म्हणून झाडं लावण्याचा विचार करतो माकडाच्या कथेसारखा आणि उन्हाळा संपलाच तर आपली आठवण विसरुन जाते. मग वर्षभर उन्हाळा येईपर्यंत आपल्याला झाडं लावण्याची आठवणही येत नाही. जसं एक माकड पावसाळा लागताच ओला होतो व त्याला वाटते की आपण पावसापासून संरक्षण करण्यासाठी एक घर बांधायला हवं. परंतु जसा पावसाळा संपतो. तशी त्याची आठवण संपते. ती पुढील पावसाळा येईपर्यंत. आपलीही झाडं लावल्याबद्दल हीच गत आहे. उन्हाळा आला की झाडं लावण्याची आठवण येते आणि उन्हाळा गेला की ती आठवण संपून जाते. कारण आपणही माकडाचेच वंशज आहोत. म्हणूनच हे चालणारच. परंतु हे जरी खरं असलं तरी आज गरज आहे झाडं लावण्याची. माकडाचं ठीक आहे की त्याचं भागून जातं व तो एक प्राणी असल्यानं त्याला ते कळत नाही. परंतु आपण माणूस आहोत व आपल्याला जाणीव आहे. आपण झाडं लावू शकतो. तसंच ती झाडं लावून आपण आपलंच नाही तर कित्येक प्राण्यांचंही संरक्षण करु शकतो हे तेवढंच खरं आहे. म्हणूनच कोणी सांगायची वाट पाहण्याऐवजी आपण स्वतःच पुढाकार घेवून झाडं लावलेली बरी हे तेवढंच खरं आहे. कारण झाडंच आपल्याला मारणार आहेत आणि तीच आपल्याला तारणारही आहेत."
अतूल आज किल्ल्यावर होता आणि त्या गार हवामान असलेल्या किल्ल्याच्या भागात होता. परंतु त्याला आपला भाग आठवत होता आणि आठवत होते त्यानं लोकांना केलेले उपदेश. ते उपदेश तसं पाहिल्यास वाखाणण्याजोगेच होते.

************************************************

गार हवा सुटली होती. तशी वाऱ्याची एक थंडगार झुळूक आली व ती हेमलता आणि सारंगच्या कमऱ्यात शिरली. तसे सारंग आणि हेमलता जागे झाले. त्यांनी लगेच आपली आवराआवर केली व ते अतूलला म्हणाले,
"चला आपण निघुयात. आपण वाचलो रात्री. नाहीतर आज आपण दिसलोच नसतो. कालच्या मानव रुपी भुतानं तर नक्कीच आपला जीव घेतला असता."
अतूल किल्ल्यावर उभा होता व तो किल्ल्याच्या खालील भागाचे निरीक्षण करीत होता. तोच ते शब्द त्याच्या कानात पडले. ते शब्द चिरुन गेले त्याच्या कानातून. तसा तो जागा झाला. आता तो दुसऱ्यांदा जागा झाला होता. ते शब्द जसे त्याच्या कानात शिरले. तसा तो म्हणाला,
"कुठं चाललात?"
"जावं म्हणतो घरला."
"अरे पण आपण थकलोय ना काल रात्रीला. याच किल्ल्यावरील भुतानं थकवलं ना आपल्याला. मग या किल्ल्याला असंच सोडून जायचं का? आपण हाकललं ना त्या भुताला अर्थात मानवरुपी भुताला? मग आपण पुन्हा एक रात्र याच किल्ल्यात काढू."
ते अतूलचं बोलणं. तोच हेमलता म्हणाली,
"नाही रे बाबा, मी एक सेकंदही थांबणार नाही या किल्ल्यावर. मला लय भीती वाटतेय. तुम्हाला राहायचं असेल तर तुम्ही राहा खुशाल. मात्र आम्हाला जावू द्या या किल्ल्यावरुन. आम्हाला अडवू नका म्हणजे झालं."
तिचं ते बोलणं. ते बोलणं पुर्ण होताच अतूल म्हणाला,
"जशी तुमची मर्जी. तुम्हाला जावंसं वाटते तर नक्कीच जा. मी मात्र आज इथेच मुक्काम करतोय. जरा फिरतोय हा किल्ला."
अतूलचं ते बोलणं. तसे सारंग व हेमलता निघाले आणि ते बसमध्ये बसून शहरात आले व एकमेकांसोबत बोलू लागले. सारंग हेमलताला म्हणाला,
"आपण जे केलं, ते बरोबर नाही केलं."
ते सारंगचं बोलणं. तशी हेमलता म्हणाली,
"म्हणजे?"
"अगं, आपण त्या अंकलना सोडून आलोय."
"मग काय झालं? त्यांची राहायची इच्छा होती. म्हणून राहिले ते. त्यात आपला दोष काय? काल माहीत आहे, आपण मोठ्या संकटातून वाचलोय."
"हो माहीत आहे आणि हेही माहीत आहे की आपल्याला त्या संकटातून त्यांनीच वाचवलं. ते जर नसते तर आपण आज दिसलोही नसतो. काय माहीत की ते कसे राहतील आज."
"कसे म्हणजे? मजेतच राहतील ते आज."
"ते कसे काय?"
"हे बघा, काल जो आपल्यासमोर कळसुत्री बाहुल्या नाचवत होता. तो निघून गेला ना. आज तो नाहीच त्या किल्ल्यावर. मग भय कसलं?"
"ते बरोबर आहे गं तुझं. परंतु दुसरं विपरीत घडलं तर......?"
"घडू दे. घडलं तर....... आपल्याला काय करायचंय. त्यांना चाला म्हटलं की नाही."
"हो, ते सगळं बरोबरच आहे. परंतु?"
"आता परंतु काय?"
तो विचार करु लागला. तसा थोड्या वेळानं म्हणाला,
"हे बघ, तुला माहीत नाही. त्याचे उपकार आहेत आपल्यावर. आपल्याशी त्यानं नातं जोडलंय. तुला मुलगी मानलंय आणि मला जावई. शिवाय आपल्याला वाचवलंही त्यांनी. त्यामुळंच एकतर आपण त्यांना सोडून यायलाच नको होतं. विचार कर की कदाचीत तो तुझाच बाप असता तर? काल आपण संकटात होतो आणि आज कदाचीत कोणतंही संकट त्यांच्यासमोर उभं राहिलं तर? नाही, नाही. आपण जायलाच पाहिजे. एक रात्र तरी त्यांच्या इच्छेनुसार त्या किल्ल्यावर काढायलाच पाहिजे. तू याबाबत नीट विचार कर."
"ते सगळं बरोबर आहे रे सारंग तुझं. परंतु मला तिकडे यायला फार भीती वाटतेय."
ते तिचं बोलणं. ते बोलणं रडक्या आवाजात होतं. तसा तो म्हणाला,
"ते तुझं सगळं बरोबर आहे. परंतु मी आहे ना. माझ्यावर तुझा विश्वास आहे ना. मग तर ठरलं. मी तुझ्या केसालाही धक्का लागू देणार नाही. ही शपथ आहे तुला. मग तर ठरलं आणि सोबतीला ते आहेतच आपले अंकल. तसा मिही आज भीतीमुक्त झालो आहेच."
"असं म्हणतोस. तर मग ठीक आहे. जावूया तिकडं. तिकडंच आपला हनीमूनही साजरा करुयात." ती म्हणाली. तसे ते निघाले थेट त्या किल्ल्यावर जायला. ज्या किल्ल्यावर त्यांनी गत रात्री एका काल्पनिक भुताचा थरार अनुभवला होता.

************************************************

दिवसभर अतूल किल्ल्यावर फिरत होता. तशी सायंकाळ झाली होती व सर्वजण पुन्हा एकदा किल्ला परीसरावरुन निघून गेले होते. असं वाटत होतं की किल्ल्यावर भूत वावरतं, ही घटना त्यांना कदाचीत माहीत असेल.
रात्र झाली होती. तसा तो झपाझप पावले टाकत किल्ल्यात गेला. तो जसा किल्ल्यात गेला. तशी लाईट आली व तो विचार करु लागला की ही लाईन कशी काय आली असेल. तसा तो एकटाच असल्यानं थोडा मनोमन घाबरला होताच. परंतु नंतर विचार केला की कदाचीत त्या लाईटाची फिटींगच आपल्या प्रवेशानुसार केली असेल. परंतु दुसऱ्याच क्षणी विचार आला की ह्या लाईटचा शोध थॉमस अल्वा एडीसननं लावला आणि ज्यावेळेस हा किल्ला बांधला. त्यावेळेस एडीसनचा जन्मही नसेलच. तसा विचार करुन त्यानंतर आपल्याला काय करायचंय असाच विचार करुन तो चूप बसला. तशी एक रात्र किल्ल्यावर काढायची आहे व तिही एकट्यालाच. त्यामुळं ती कशी काढावी याचा तो विचार करु लागला. तशी लाईन गेली.
ती लाईन गेली होती. आता संपुर्ण काळाकुट्ट अंधार पडला होता. तसं पाहिल्यास दिवसभर तो किल्ला परीसरात फिरला होता. परंतु ना त्यानं माहीती घेतली होती ना मेणबत्ती. ना त्यानं मोबाईल चार्जींग केली होती. तसं पाहता त्याला आज किल्ल्यावर तर राहायचं होतं. परंतु कोणतीच आठवण आली नव्हती.
लाईन गेली होती व म्हशाल कुठं आहे तेही त्याला माहीत नव्हतं. कालच्या रात्री लाईन गेल्यावर म्हशाल तरी पेटली होती. जणू ती हलधरनं पेटवली होती. जणू त्यानंच काल लाईनही बंद केली असेल. परंतु आज. आज कोणं लाईन बंद केली असेल. तो विचार करु लागला. तसा त्या कमऱ्यात आजुबाजूला काळाकुट्ट अंधार होता व काहीच दिसत नव्हतं. अशातच त्याची नजर त्या वस्तूकडे गेली. जी वस्तू चमकत होती. ते दोन डोळे होते व ते दोन डोळे चमकत होते. तशी भीती वाटली व तसा विचार आला. कोण असेल तो. तो विचारच करु लागला. तोच म्याँव म्याँव करीत मांजर तेथून उडी मारत पळाली. तोच पुन्हा अंधार झाला. तसं त्यानं डावीकडं पाहिलं.
डावीकडं पुन्हा दोन डोळे चमकतांना दिसले. तसा तो विचार करु लागला. विचार करता करता त्याला वाटलं की ही देखील एक मांजरच असेल. तसा तो तोंडातून शिटीचा आवाज काढत त्या दोन डोळे वाल्या प्राण्याला हाकलू लागला. परंतु ती मांजर वा एखादा प्राणी असेल तेव्हा ना. ते डोळे काही केल्या मिटेनात. तोच तो प्राणी कोणता हे पाहण्यासाठी तो सरकू लागला हळूहळू त्या प्राण्यांच्या दिशेनं. तोच त्याला जंगलातून वाघाची डरकाळी ऐकायला आली व तो घाबरला. त्याची छाती धडधड वाजायला लागली. तसा तो थोडा थांबला.
थोड्या वेळाचा अवकाश. तो पुन्हा त्या दोन डोळे असलेल्या प्राण्याच्या दिशेनं सरकायला लागला. तोच तो आता त्या डोळ्याजवळ पोहोचला. तसं त्यानं हात लावला त्या डोळ्यांना. त्यातच त्याला ते दोन डोळे बाहुल्याचे असल्याचे जाणवले व तो निश्चींत झाला. तोच तो स्वगत म्हणाला,
"सालं, हा बाहुला होय. मला तर वाटलं की एखादा प्राणीच असेल."
अतूल त्या किल्ल्यावर एकटाच होता आणि आता त्यानं तो बाहुला असल्याची शहानिशा करताच तो निश्चींत झाला होता. परंतु दुसऱ्याच क्षणी त्याचं लक्ष एका सांगाड्याकडे गेलं. जो मानवी सांगाडा होता व तो मानवी सांगाडा त्या अंधाऱ्या रात्री चमकत असलेला दिसला. तसं पाहात असतांना व त्या सांगाड्याचं निरीक्षण करीत असतांना त्या सांगाड्याच्या तोंडातून अग्नीज्वाळ व धुर निघायला लागला. तसा तो विचार करु लागला की हे कसं काय शक्य आहे. कदाचीत आज एखादं भूत तर चमत्कार करीत नाही ना.
**********************************************************
तो सांगाडा....... तो सांगाडा चमकत होता आणि त्या सांगाड्याच्या तोंडातून अग्नीज्वाळ व धूर निघत होता. त्यातच क्षणभरातच त्या सांगाड्याच्या डोळ्यातच लाल लाईट लागले. तसाच एक लख्ख प्रकाश पडला त्या अंधाऱ्या रात्री. तसा संपुर्ण कमराच लख्खं प्रकाशाने भरुन गेला. ते पाहताच अतूलची बोबडीच वळली व तो घाबरला. कदाचीत त्याला ते प्रत्यक्षात भूतच असल्याची जाणीव झाली. तोच त्या सांगाड्याचा एक हात गळून पडला व त्यातून लाल रंगाचं रक्त वाहात असलेलं दिसलं.
अतूल ते सगळं पाहात होता. तसं त्यानं ते दृश्य काल पाहिलं नव्हतं. काल वेगळंच काही पाहिलं होतं. जे हलधरनं आपल्या हातचलाखीनं कृत्य केलं होतं व किल्ल्यावर भूत असल्याचा देखावा केला होता. परंतु आज? आज त्याला प्रत्यक्षात भूतच दिसत होतं त्या कमऱ्यात.
ते रक्त, ती धूर व त्या अग्नीज्वाळा तो पाहातच होता. तोच त्यानं पाहिलेला रक्तस्राव. त्यानंतर त्या हाताचं गळून पडणं. ह्या सर्व गोष्टी कधीही त्यानं प्रत्यक्षात म्हायदूसोबत जातांनाही पाहिल्या नव्हत्या. त्या आज दिसत होत्या. तोच तो सांगाडा माणसासारखा चालायला लागला आणि तो अतूलच्याच दिशेनं चालायला लागला होता. मात्र त्याची चाल ही कासवासारखी होती.
तो सांगाडा चालत होता आणि तो अतूलच्याच दिशेनं चालत होता. तो अतूलजवळ येतच होता. तोच त्या लख्खं प्रकाशात अतूल पळायला लागला.
अतूल पुत्र होता व तो सांगाडा त्याच्यामागे चालत होता. तो सांगाडा त्याला पकडण्याचा प्रयत्न करीत होता. अशातच अतूल त्या सांगाड्याच्या हातात सापडला. मग काय, त्या सांगाड्यानं आपल्या उरलेल्या एका हातानं अतूलच्या मानेचा वेध घेतला आणि तो ती मान तीव्र गतीनं दाबू लागला. आता त्याचा जीव जाईल तोच आवाज आला. "अंकलऽऽ"
तो आवाज. तो आवाज जोराचाच होता. त्यामुळंच तो सांगाडा सावध झाला व तो सांगाडा जैसे थे त्या अवस्थेसह जिथं होता तिथं जावून उभा राहिला. तसा अतूल उठला व त्यानं आपल्या मानेला पिरवसलं. तसा आवाज दिला.
"कोण?"
"मी हेमलता."
"आहे मी. मी इथं आहे."
"झोपलात का?"
"नाही. अजून झोपायचा आहे."
अतूलनं हेमलताचा आवाज ऐकला. तो आवाज ऐकताच तो भानावर आला. तसा त्याला थोडा धीरही आला. त्यापुर्वी तो अंतर्मनातून घाबरला होता. सारंगही तिच्यासोबत आला होता.
हेमलता आणि सारंग. ते कसे काय परत आले असतील. ते सकाळीच तर निघून गेले होते. असा विचार तो करु लागला होता. तसं त्याला वाटत होतं की आपण जणू स्वप्नातच आहोत. त्यानं चिमटीही घेवून पाहिली, आपल्या शरीराला आणि तो स्वप्नातच नसल्यानं त्याच्या घेतलेल्या चिमटीनं त्याच्या शरीराची आग होवू लागली व वाटलं की आपण स्वप्नात नाही. हा आपला भास होय.
सारंग व हेमलता जसे आले. तसा त्याला जीवात जीव आला व तो लगबगीनं त्या कमऱ्याच्या बाहेर आला. वाटत होतं की ही घटना सांगावी, ताबडतोब सारंग आणि हेमलताला. परंतु परत अतूलनं दुसरा विचार केला. तो विचार होता की जर त्यांना ही घटना सांगीतली, तर ते कदाचीत घाबरुन जातील. त्यांना निर्भय ठेवलेलं बरं. परंतु आपण जरी त्यांना निर्भय ठेवलं तरी रात्रभर हे भूत सतावणार नाही कशावरून? परंतु जेव्हा सतावेल, तेव्हा पाहू असा विचार करीत अतूल चूप बसला.
ती अंधारी रात्र. त्या अंधाऱ्या रात्री सारंग व हेमलता परत आले होते किल्ल्यावर. जणू अतूल नावाच्या एका अज्ञात व्यक्तीनं आपल्याला मदत केली. त्या उपकाराची परतफेड करण्यासाठी. शेवटी तीच गोष्ट लक्षात घेवून ते जसे किल्ल्याच्या कमऱ्यात प्रवेशले. तेव्हा लाईन आली. जणू त्या प्रवेशद्वारावरच लाईटचं कनेक्शन केलं असावं असं वाटत होतं.
सारंग व हेमलता जसे आत आले. तसं त्यांनी डोळ्याला पाणी मारलं. प्रथम हेमलता डोळ्याला पाणी मारायला गेली. ती जशी पाणी मारणार. जशी नळ सुरु करणार. तोच त्या नळातून रक्तच यायला लागलं होतं. ते पाहून ती एवढ्या जोरात ओरडली की तो आवाज त्या संपुर्ण किल्ल्यातच गुंजला. तसा सारंग धावतच तिथं आला. म्हणाला,
"काय झालं? अशी ओरडतेय का?"
सारंगचा तो प्रश्न. तो प्रश्न स्वाभाविकच होता. तशी उत्तर देत व घट्ट डोळे लावलेल्या अवस्थेत ती त्या नळाकडे बोट दाखवत म्हणाली,
"त्या नळाकडे पाहा. रक्त वाहात आहे नळातून."
सारंगनं नळाकडे पाहिलं. तसं तिथं काहीच नव्हतं. त्यानंतर त्यानं नळही सुरु करुन पाहिलं. नळाचंही पाणी स्वच्छ होतं. तसा तो म्हणाला,
"तू आधी डोळे उघड व पाहा त्या नळाकडे. पाणी स्वच्छच आहे व इथं कुठंही रक्त नाही. तू माझ्या समोर तोंड धू बघू. मी आहे इथेच. कदाचीत तो तुझा भ्रम असेल व तुला भास झाला असेल."
हेमलतानं सारंगच्या म्हणण्यानुसार डोळे उघडले व त्यानंतर सारंगनं नळ सुरु केला. त्यानं त्यानंतर त्या नळाच्या धारेकडे बारीक लक्ष ठेवलं. तसे तिनं हातपाय धुतले. प्रथमदर्शनी पाणी स्वच्छ व गारेगार होतं.
तिनं हातपाय धुतले त्या नळावर व ती आत गेली. त्यानंतर त्यानं त्याच नळावर हातपाय धुणं सुरु केलं होतं. त्यावेळेस प्रथमदर्शनी पाणी स्वच्छ आलं. त्यानंतर पुन्हा नळाच्या धारेतून रक्त टपकायला लागलं. तसा एक आवाज त्याच्या कानात गुंजला. "कोण आहे आमच्या नळावर तोंड धुणारा?"
तो आवाज व ते रक्त पाहून सारंगही घाबरला. परंतु आपण जर ओरडलो तर हेमलता व अतूल दोघंही घाबरतील असं त्याला वाटलं व तो चूप बसला. त्यानं नळ बंद केला होता व तो ताबडतोब आपल्या कमऱ्यात आला.
रात्रीचे दहा वाजले होते. पोटात कावळे ओरडतच होते. तसं दहावाजेपर्यंत काहीच घडलं नव्हतं. तसं पाहिल्यास सारंग आणि हेमलतानं रस्त्यानं परत येतांना जेवनही आणलं होतं व किल्ल्यावर मजा करीत खावू असा विचार करुन त्यांनी जेवनाचा डबा उघडला. त्यानंतर जेवन सुरु झालं. तसा अतूल म्हणाला,
"तुम्ही गेले होते ना. मग कसे आलात परत?"
तो अतूलचा प्रश्न. त्यावर उत्तर देत सारंग म्हणाला,
"गेलो होतो. परंतु तुमची आठवण आली. वाटलं की ज्या माणसानं आपला जीव वाचवला. त्या व्यक्तीच्या संपर्कात निदान एक रात्र तरी काढावी. म्हणून परत आलो."
सारंग बोलून गेला व त्या खमंग जेवनावर ताव मारु लागला. त्यावेळेस त्याचं सभोवताल लक्ष नव्हतं. लक्ष होतं जेवनात. त्याच दरम्यान जेवनाच्या ताटात तिथं असलेलं भूत उतारचढाव करीत होतं. परंतु भुकेनं पोटात आगडोंब पेटलेला असल्यानं त्या भुताच्या कोणत्याच हालचालीकडं तिघांचही लक्ष नव्हतंच.
************************************************

जेवन झालं होतं. त्यानंतर ते तिघंही आपापल्या कमऱ्यात झोपण्यासाठी गेले. त्यातच अतूल झोपण्यासाठी आडवा झाला होता. परंतु त्याला पुरेशी झोप येत नव्हती. त्याला कारण होतं. त्याला ती परिस्थिती आठवत होती की सारंग व हेमलता येण्यापुर्वी भुतानं त्याच्या नरडीचा घोट घेतला होता व ते भूत त्याचा जीव घेणार होते.
सारंग आणि हेमलताही आपल्या कमऱ्यात पहुडले होते. त्यांचा हनीमून सुरु होता. अशातच रात्रीचे बारा वाजले व घड्याळाचा काटा रात्री बाराच्या ठोक्यावर पोहोचला. तोच लाईट बंद झाले.
"हट् सालं. पुन्हा लाईन गेलीच तर......." सारंग स्वतःशीच पुटपुटला. तो त्याचा हनीमून जागच्या जागीच विरला व तो उठला. त्यानं सोबत आणलेली मेणबत्ती शोधली. ती कशीबशी लावली आणि पुन्हा त्यानं हनीमून सुरु केला. तोच मेणबत्ती पुन्हा विझली. तसा तो परत उठला व पुन्हा चिडल्या स्वरात स्वगत म्हणाला,
"चायला लाईनच्या. सारखी बंदच होते येथली लाईन."
ती लाईन बंद होताच त्यानं परत आगपेटी व मेणबत्ती शोधली. तसा तो पुन्हा मेणबत्ती पेटवू लागला. परंतु ती मेणबत्ती पेटेल तेव्हा ना. आगपेटी पेटत होती. परंतु क्षणातच ती विरुन जात होती. शिवाय परीसरात असलेल्या जंगलातून वाघ, सिंहाच्या डरकाळ्या ऐकायला येत होत्या. अशातच त्याच कमऱ्यात असलेलं एक काळ्याच रंगाचं मांजर म्याँव म्याँव करीत निघून गेलं व हेमलताला थोडी भीती वाटायला लागली.
हेमलता ताबडतोब अंथरुणातून उठली. तसे तिनं लगबगीनं कपडे सवारले. हनीमून जागच्या जागीच विरला. तसे तिनं कपडे सवारताच ती जोरानं ओरडली. "कोण हाय?"
तो तिचा आवाज. तो तिचा आवाज किल्ल्यावर गुंजला. तसा तो आवाज गुंजताच अतूलही लगबगीनं जागा झाला व तो तिच्या कमऱ्याकडे यायला लागला. तोच ती काळी मांजर त्याला आडवी गेली. ते पाहताच तो स्वगत म्हणाला,
"म्हणजे काही विपरीत नक्कीच घडणार तर......."
ते त्याचं बोलणं. तोच त्याची टक्कर एका भीमकाय असलेल्या पाषाणी पुतळ्याला लागली. जो स्वतः एक शैतानच होता. त्या पुतळ्याला अतूलनं पाहिलं व तो म्हणाला,
"सालं, कोणीही मधात उभं असतं तर........"
अतूलनं आपला मार्ग बदलला आणि तो चालायला लागला. तोच तो पाषाणी पुतळाही त्याच्या मागोमाग चालायला लागला. तसे त्याच्या पावलाचे ठसे स्पष्टपणे त्याच्या कानात ऐकायला यायला लागले होते. तसं त्यानं मागं वळून पाहिलं.
अतूलनं मागं वळून पाहताच त्याला ते भूत दिसलं. जे त्याच्या मागोमाग येत होतं. ते पाहून तो घाबरलाच. परंतु तरीही आपली हिंमत विचलीत होवू न देता त्यानं त्याकडं दुर्लक्ष केलं व तो सारंगच्या कमऱ्याची वाट चालू लागला होता. क्षणातच सारंगचा कमरा आला. कमरा उघडलाच होता. तसा त्यानं दरवाजा ठोकला. तोच हेमलता पुरती घाबरली. म्हणाली,
"कोण आहे?"
"मी....... मी अतूल."
"तुम्ही होय. या आत या. इथं तर मेणबत्तीही लागत नाही. सारखी विझून जाते. यांनी बरेचदा मेणबत्ती लावण्याचा प्रयत्न केला. परंतु विझून गेली आणि लाईटही गेली."
हेमलता बोलत होती. तोच तिच्या कमऱ्यात एक वटवाघूळ तिला स्पर्शून गेला. तशी ती घाबरली व चूप बसली. तोच सारंग म्हणाला,
"अगं बोलणं. काय झालं?"
"काहीतरी मला स्पर्शून गेल्याचा भास झाला."
"काय आहे? काहीच तर नाही." सारंग म्हणाला.
तो कमरा. त्या कमऱ्याला एक दरवाजाही होता व तो विशालकाय पाषाणी पुतळा त्या लहानशा दरवाज्यातून आता येवू पाहात होता. तसं पाहिल्यास तो दरवाजा लोखंडीच होता व त्या दरवाज्यातून त्याला आत येताच येत नव्हते. परंतु तरीही तो आत येण्याचा प्रयत्न करीत होता. तसं त्याला आत येता येत नसल्यानं त्यानं तो दरवाजाच आपल्या विशालकाय हातानं साधा दरवाजा तोडतो तसा तोडून टाकला व तो आत आला. तसे ते तिघंही सावध झाले व विचार करु लागले की काल याच किल्ल्यात काल्पनिक पुतळे होते. जे वर बसलेल्या एका माणसाच्या हातानं नाचत होते. परंतु हा पुतळा नाही. हा भूतच आहे. हा भूत जर नसता तर तो लोखंडी दरवाजा तोडूच शकला नसता.
तो पाषाणी भूत रुपातील पुतळा दरवाजा तोडून आत आला होता. तसे ते तिघंही बाहेर पडले होते. त्यांना बाहेर पडतांना पाहून तो पुतळाही कमऱ्याच्या बाहेर आला व कासवगतीनंच त्या तिघांच्याही मागोमाग चालू लागला. अशातच त्या किल्ल्यातच असलेला तो मानवी सांगाडाही जीवंत होवून मनुष्यासारखा चालू लागला. शिवाय त्या क्रिया घडत असतांना प्रचंड आवाज व लख्खं प्रकाश सारंग आणि हेमलता व सोबतच अतूलच्याही कानठिळ्या बसवत होते. आता किल्याच्या आत राहाणं बरं नाही असा विचार करुन सारंग, अतूल व हेमलता किल्ल्याच्या बाहेर पडले होते. त्यातच त्या किल्ल्यातून सारेच भुतं बाहेर पडले होते. ते पाठलाग करीत होते सारंग, हेमलता आणि अतूलचा. तसे ते तिघंही पळत होते त्या किल्ल्यावरुन. तोच अतूलची टक्कर त्याला लागली. जो हलधर होता व त्या लख्खं प्रकाशात तो ओळखू येत होता. तसा आश्चर्यचकीत होत अतूल म्हणाला,
"तू ! तू हलधर ना. कालचाच गडी. तुला तर सोडलं होतं काल आणि तू तर गेला होता इथून. मग तू इथं कसा काय आलास?"
"आलोय मी तुम्हाला धडा शिकविण्यासाठी. तुम्ही माझी एवढ्या वर्षातील या किल्ल्यावरील सत्ता नष्ट केली ना. वाटलं होतं की तुम्ही जाणार. परंतु तुम्ही गेले नाहीत. म्हणूनच सापडलात माझ्या तावडीत. आता तुम्ही आज माझ्या तावडीतून कधीच सुटून जाणार नाही. माहीत आहे हे कोण आहेत? ही खरोखरची भुतं आहेत. मी उठवलंय यांना. मी मंत्रविद्या जाणतोय."
"परंतु आम्ही तुझं काय बिघडवंलय? आम्हीतर तुला काल बऱ्या बोलानं सोडून दिलंय."
"होय, परंतु माझी सत्ता तर समाप्त केली होती ना काल आणि आज जर मी तुम्हाला सोडून दिलं, तर तुम्ही मला सोडणार नाही. मला माझा राज गुप्त ठेवायचा आहे. तो कुणालाही माहीत होवू नये. नाहीतर कोणीही या किल्ल्यावर येईल व कोणीही या किल्ल्यात आश्रय घेईल उद्यापासून. म्हणूनच तुम्हा तिघांनाही संपवायचं आहे मला आणि मी तुम्हाला संपवणार नाही. तुम्हाला संपवतील, माझेच हे जागलेले प्याधे. जा, पळा आता. नाहीतर ते पकडतील तुम्हाला. पळा, केव्हापर्यंत पळता तर...... समजा सापडलेच त्यांच्या हाती तर समाप्त झाले म्हणून समजा. जा पळा."
ते त्याचं बोलणं. तोच सारंग अतूलला म्हणाला,
"तरीही कालच म्हटलं होतं मी तुम्हाला की याला सोडू नका म्हणून. आता बघा बरं. तो किती हावी झाला आपल्यावर. विचार करतोय का तो की यांनी आपली दया घेवून सोडून दिलं आम्हाला म्हणून. शिवाय बड्या अभिमानानं सांगतोय कसा की मीच या भुतांना उठवलंय. मला मंत्रविद्या येते. आता पळा. नाहीतर एकदा सापडले की काम तमाम झालं म्हणून समजा."
सारंग बोलतच होता. तोच तो शैतानी पुतळा जवळ आला. तसे बोलता बोलताच ते तिघंही पळायला लागले होते.
ते सैरावैरा पळत चालले होते. जिकडे रस्ता मिळेल, तिकडे ते पळत होते. अशातच कालचं स्मशान आलं होतं व त्याच स्मशानात त्या दोन तीनही भुतानं अतूलला पकडलं व त्याचे हातपाय बांधून काल जसं हलधरला शरणावर लोटवलं होतं. तसंच लोटवलं व त्यातील एक भूत म्हणू लागला. "आदेश, आदेश." त्यावेळेस एका भुताच्या हातात म्हशाल होती. मात्र ते कोणाला आदेश मागत होते. ते कळत नव्हतं. अशातच काही वेळ गेला व काही वेळानं त्या स्मशानात सारंग व हेमलता पोहोचली. ते तेथील संपुर्ण परिस्थिती पाहून लपून बसले.
सारंग व हेमलता लपून बसले खरे. परंतु त्यांनी पाहिलं की तो पाषाणी पुतळा स्मशानात पोहोचलेला आहे. तसे स्मशानात सर्व भुतं जागे झाले आहेत. ते सर्व भुतं त्या स्मशानात गोळा झाले आहेत व एक भूत आदेश आदेश असा सारखा म्हणतांना दिसत आहे. शिवाय एक शरण रचलेलं आहे व त्या शरणावर अतूलला हातपाय बांधून झोपवलेलं आहे व अतूल जीवांच्या आकांतानं वाचवा वाचवा असे ओरडत आहे आणि ते दृश्य तिथंच लपून बसलेले हेमलता व सारंग पाहात होते. ते पाहात होते की त्या भुतात किल्ल्यावर मरण पावलेले सर्व मेलेले मृतात्म्ये आहेत.
सारंग विचार करीत होता त्या अतूलला सोडविण्याचा. ती जोखीम होती. तसं पाहता ते काल सांजच्याला येतांना अगदी विचार करुनच आलेले होते. तसा सारंग स्वार्थी नव्हताच. शिवाय ज्या अतूलवर त्यांनी विश्वास केला होता. त्या अतूलनं त्या सारंगला वाचवलं होतं आणि आज त्याच उपकाराची परतफेड करण्याची वेळ आली होती. तसा अतूल झोपलेला होता शरणावर व त्याला त्या भुतांनी सर्व मिळून शरणावर झोपवलं होतं. शिवाय कोणत्याही क्षणी त्या अतूलला झोपवलेल्या शरणाला आग लागण्याची चिन्हं दिसत होती. मात्र आता त्या सर्व भुतांना कोणाचीतरी वाट होती वा कोणाच्या आदेशाची तरी ते वाट पाहात होते. अशातच हलधर तिथं येतांना दिसला. जणू त्या भुतांना त्याचीच वाट असल्याची चिन्हं दिसत होती.
हलधर जसा तिथं आला. त्यानंही पाहिलं की तिथं एका भुताच्या हातात एक जळती म्हशाल असून तो आदेश आदेश असंच म्हणत आहे. तसा तो तिथं पोहोचताच सर्व भुतांनी आपल्या माना खाली टाकल्या व आपले हातही गुंडाळले व ते चुपचाप स्तब्ध उभे राहिले. तसा हातपाय बांधलेल्या अवस्थेत शरणावर अंतिम श्वास घेत असलेला अतूल विचार करायला लागला. विचार होता की भुतं राहात नाहीत. मग ही भुतं कुठली असावीत की ही आपल्याला आज प्रत्यक्षात अनुभवता आली आणि दिसलीही. काल म्हायदूसोबत काम करीत असतांना कधीही आपल्याला भूत दिसलं नाही आणि आज अचानक एवढी सारी भुतं. तेही किल्ल्यावर. तो विचारच करु लागला आणि स्वतःच्या सुटकेचा मार्ग शोधून लागला होता.
अतूल विचारच करीत होता सुटकेचा. तोच हलधरनं त्या एका भुताच्या हातची म्हशाल आपल्या हातात घेतली व जोरानं ओरडला.
"बघ, तू माझं किल्यावरील साम्राज्य नष्ट करु पाहात होता ना. म्हणूनच मी काल तू किल्ल्यावर थांबताच ठरवलं होतं की मी तुला संपवूनच मोकळा श्वास घेईल आणि आता माझी ती इच्छा पुर्ण होणार आहे."
असं म्हणत तो पुढं जात होता शरणाजवळ. तशी लपून बसलेल्या सारंग व हेमलताच्या काळजात धकधक व्हायला लागली होती. शिवाय उपकाराची परतफेड कशी करायची व अतूलला कसं वाचवायचं हा प्रश्न त्यांच्या मनात होता.
हलधरचं शरणाकडं जाणं आणि त्या अतूलच्या जीवंत शरीराला आग लावणं ही कृती पाहात असलेल्या सारंगला अचानक मराठ्यांची आठवण झाली. मराठेही जीवंत असतांना गनिमी काव्याअंतर्गत शत्रूंवर तुटून पडत व वेळप्रसंगी मरणालाही घाबरत नसत. तसं सारंग व हेमलताला ताराबाई व राजाराम आठवला आणि आठवलं की बिचाऱ्या ताराबाईनं व राजारामानं संपून गेलेल्या मराठेशाहीला जीवंत ठेवलं.
हेमलताला जशी ताराबाई आठवली. तसंच आठवलं तिनं केलेलं कार्य. तिला आठवत होती महाराणी येशूबाई व ती विचार करु लागली होती. विचार करु लागली होती की आपण ताराबाई बनावं. येशूबाई नाही. ताराबाई बनून लढावं. येशूबाईसारखी शरणागती पत्करून आपलं संपुर्ण आयुष्य खराब करु नये. कारण आज अतूल मरण पावला तर उद्या आपल्याला काळ माफ करणार नाही. तो उद्या आपल्याला हिशोब विचारेल व बदला घेईलच.
हेमलता विचारकरीतहोती. 'जिनं आपल्या पतीची औरंगजेबाकडून अतिशय निर्घुणपणे हत्या झालेली पाहून तशी हत्या आपली व आपल्या लेकराची होवू नये व तसा त्रास आपल्याला होवू नये म्हणून स्वतः शरणागती पत्करली आणि मराठेशाही जीवंत राहावी म्हणून आजारी असलेल्या व कमकुवत असलेल्या राजारामाला आणि महाराणी ताराबाईला अगदी निक्षून सांगीतलं की त्यांनी मरुन जावं. परंतु शरणागती पत्करु नये. शिवाय महाराणी ताराबाईनही तोच महाराणी येशूबाईचा शब्द पाळत रायगड सोडल्यावर जेव्हा विशालगडाकडे प्रस्थान केलं. त्यानंतर तिच्यावर बरीच संकटं आली. अशातच आजारपणानंतर ती तरुणच असतांना तिचा पती मरण पावला. त्यावेळेस तिचा मुलगाही लहानच म्हणजे अवघ्या चार वर्षाचा होता. ती खचली होती मनानं आणि धीरानं. परंतु तिला महाराणी येशुबाईचे शब्द आठवत होते, ते निक्षून सांगितलेले की मरुन जाल. परंतु शरणागती पत्कराल नको. तेच शब्द लक्षात घेवून महाराणी ताराबाईनं स्वतःच्या अवघ्या चार वर्ष वय असलेल्या मुलाला गादीवर बसवलं व न्यायनिवाड्यासह ती औरंगजेबाला शह देवू लागली. याच दरम्यान येशूबाई एकप्रकारे औरंगजेबाच्या नजर कैदेत अगदी सुखाचे दिवस काढत होती. त्याचवेळेस औरंगजेब स्वतः जातीनं छत्रपती शाहू महाराजांना तलवारबाजी व राज्यकारभाराचे धडे देवू लागला नव्हे तर जणू मराठेशाही संपविण्याचे विष त्याच्या मनात पेरु लागला होता. याच दरम्यान पती मरण पावल्यानंतर ताराबाई मात्र स्वतःचा जीव धोक्यात घालत वणवण भटकत होती या गडावरुन त्या गडावर. कधी कधी ती पन्हाळ्यासारख्या किल्ल्यात नजरकैदेत पडत असे तर कधी कोणत्या किल्ल्यात. मात्र तिनं जी औरंगजेबाला आपल्या पराक्रमानं धुळ चारली होती व औरंगजेबाला लंगडे केले होते. ती गोष्ट वाखाणण्याजोगीच होती. परंतु तरीही ज्यावेळेस औरंगजेब मरण पावला. त्यावेळेस औरंगजेबाच्या कैदेतून सुटलेल्या शाहू महाराजांनी व ताराबाईची सवत असलेल्या राजसबाईनं व मातब्बर सरदारांनी हा विचार केला नाही की ताराबाईनं आपल्या प्राणाची पर्वा न करता औरंगजेबाला शह दिला व मराठेशाहीला जीवंत ठेवलं. व्यतिरीक्त आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी स्वतः छत्रपती शाहू महाराजांनी काही असंतुष्ट मराठे सरदारांना एकत्र करुन १७०८ मध्ये ताराबाईशी लढाई करुन स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं. पुढं सन १७१३ व १४ दरम्यान ताराबाईची सवत असलेल्या राजसबाईनं ताराबाईशी युद्ध करुन तिचं अस्तित्वच संपवून टाकलं व स्वतःच्या मुलाला म्हणजेच दुसऱ्या संभाजीला गादीवर बसवलं. पुढं छत्रपती शाहू व छत्रपती संभाजी द्वितीय यांनी राज्य करता यावं म्हणून वारणेचा तह केला व कोल्हापूर आणि सातारा अशा स्वरुपात दोन स्वतंत्र गाद्या तयार झाल्या. त्यातच छत्रपती शाहू महाराजांनी पेशव्यांना जास्तीचे अधिकार देत महाराष्ट्रातून मराठेशाहीच संपवून टाकली होती. जी मराठेशाही टिकविण्यासाठी महाराणी ताराबाई विरश्रीनं लढली होती औरंगजेबासोबत. काय गरज होती तिला औरंगजेबासोबत लढायची? तरीही ती लढली. परंतु पुढं तिच्यासोबत जे घडलं. ते पाहून असं वाटतं की यातून औरंगजेबाला जीवंतपणी जो डाव साधता आला नव्हता. तो डाव औरंगजेबाच्या मृत्यूनंतर तब्बल पन्नास वर्षातच मुघलांनी साकार केला होता. खरं तर वास्तविक गोष्ट म्हणजे महाराणी ताराबाई हीच गादीची खरी वारस होती. परंतु स्वार्थीपणानं तिचं अस्तित्वच मराठेशाहीत आलेल्या तद्नंतरच्या वारसांनी संपवून टाकलं होतं. हे कृत्य तत्कालीन शासकांना अशोभनीय असंच होतं.'
हेमलताला महाराणी ताराबाई आठवली होती व आठवला होता तिचा इतिहास. तसाच आठवला होता गनिमी कावा. तिनं विचार केला. विचार केला की आपण ताराबाई सारखी झडप घालावी व या हलधररुपी औरंगजेबाला धडा शिकवावा. काल आपण सोडून दिले त्याला. आज सोडू नये. मग कित्येक अतूलसारखी माणसं मधात आडवी आली तरीही. ह्या माणसानं कदाचीत माझ्या सारख्या कित्येक मुलींना आपल्या हवसेची शिकार केली असेल. तशीच कित्येक अतूलसारखी व माझा पती सारंगसारखी माणसं मारुन टाकली असेल.
हेमलतात ताराबाई सारखी विरश्री संचारली होती व ती त्वेषानं पुढं आली. तशी तिनं लागलीच हलधर बेसावध असतांना त्याच्याजवळून ती जळती म्हशाल हिसकावली आणि त्याच्या गुडघ्यावर एक जोराचा प्रहार करुन तिनं त्याला खाली पाडलं. त्यानंतर तिनं आपला एक पाय त्याच्या छातीवर ठेवला व ती जळती म्हशाल त्याच्यावर रोखत म्हणाली,
"सावधान. याद राख, गाठ माझ्याशी आहे. मी आताच्या आताच तुला या म्हशालीनं जाळून टाकेल. नाहीतर तर हे समदं नाटक बंद कर."
ते हेमलताचे शब्द. ती तिची कृती. ते पाहून स्तब्ध झालेल्या हलधरनं त्या सगळ्याच भुतांना आदेश दिला. आदेश दिला की त्यांनी आता काही वेळ शांत राहावं. जरी मी काही त्यांना आदेश दिले तरी ते त्यांनी पाळू नये.
ती हेमलता....... त्या हेमलतेत ताराबाईसारखी शिरलेली ती वीरश्री. ती वीरश्री पाहून सारंगच्याही अंगात बळ आलं व तोही पुढं सरसावला. त्यातच त्यानं शरणावर बांधून असलेल्या अतूलला बंधमुक्त केलं. त्यानंतर त्या तिघांनीही हलधरला बांधून टाकलं व त्याला शरणावर ठेवलं. तसा तो ओरडायला लागला. तो त्या भुतांनाही आदेश देवू लागला की त्यांनी मौन सोडावं व त्या तिघांनाही पाहून टाकावं. परंतु आधीच मी काहीही आदेश दिले तरी शांत बसायचं, असं हलधरनं भुतांना म्हटल्यानुसार ती भुतं शांतपणे उभी होती.
अतूल, सारंग व हेमलतानं काल जे केलं नव्हतं, ते आज केलं. त्यांनी काल अतूलच्या म्हणण्यानुसार हलधरला सोडून दिलं होतं. परंतु आज त्यांनी हलधरला सोडलं नाही. त्यांनी हलधरला जीवंत असतांनाच बांधलं व त्याला शरणावर ठेवून त्याच्या जीवंतपणीच त्याला आग लावून दिली आणि हलधर ओरडत ओरडत त्या शरणावर गतप्राण झाला तेही तेवढ्याच रात्री. त्यानंतर त्या तिघांनीही त्या स्मशानातील सर्व मृतात्म्यांच्या अस्थी गोळा केल्या. त्यांना योग्य विधीनुसार जाळलं व त्याची झालेली राख शेजारच्याच नदीत शिरवली. त्यानंतर ते त्या किल्ल्याच्या तटावरुन खाली आले होते. त्यांनी पाहिलं की त्या किल्ल्याच्या तटाखालीही काही मानवी सांगाडे पडले आहेत. त्यांनी त्या किल्ल्यालगतच्या गावाला त्याबद्दल सांगीतलं. सुरुवातीला गावकऱ्यांनी बराच विरोध केला. परंतु नंतर ते गाव समजलं व त्यांनी अतूल आणि सारंगला मदत करायचं ठरवलं. त्यानंतर सारंग आणि अतूलनं गावकऱ्यांच्या मदतीनं ते सर्व सांगाडे गोळा केले व त्या सर्व सांगाड्यांना यथोचीत अग्नी दिला. त्यानंतर त्याही सांगाड्यांची झालेली राख योग्य विधीनुसार नदीत शिरवली. त्यामुळं आज तो किल्ला शापमुक्त झाला होता.
सारंग, अतूल व हेमलतानं तो किल्ला गावकऱ्यांच्या मदतीनं शापमुक्त केला होता. त्यामुळंच त्यांचं आभार गाव मानत होतं व गावानं त्यांना आणखी आपल्या गावात दोनचार दिवस पाहुणे म्हणून ठेवलं होतं. असेच पाहुणे म्हणून राहात असतांना हेमलताच्या मनात एक प्रश्न उद्भवला. तो प्रश्न होता की किल्ला शापीत कसा झाला? त्यावर एका बुजुर्ग व्यक्तीनं छानसं उत्तर दिलं. तो इतिहासच होता व तो व्यक्ती त्या किल्ल्याचा इतिहास सांगू लागला होता. त्यानंतर अतूल, सारंग आणि हेमलता त्या किल्ल्याचा इतिहास शांतपणे ऐकू लागले होते.
"भुतं नव्हती ती. ती माणसं होती व ती माणसं असंतृष्ट होती. कारण त्यांचं प्रेम होतं त्या किल्ल्यावर. त्या किल्ल्यावरील शासक जेव्हा मरण पावले होते. त्यावेळेस त्यांची इच्छा पुर्ती झाली नव्हती असा इतिहास होता.
तो किल्ला........ तो किल्ला आजही सतावत होता तिथं अधिवास करणाऱ्या लोकांना. कारण कोण्या एके काळी त्या किल्ल्यावर राहणारे शासक सुसंप्पन्न होते. भरपूर मोठं कोठार होतं की जवळपास वर्षभर जरी किल्ल्याला वेढा पडला. तरी किल्ल्यावरील धान्यसाठा संपणार नाही. परंतु काळाचं दृष्ट्रचक्र त्या किल्ल्याला लागलं आणि कोण्या एका परकीय शासकानं त्या किल्ल्याला वेढा दिला. तो वेढा एवढे दिवस चालला की किल्ल्यावरील धान्यसाठा संपला. त्यानंतर तिथं जे सैनिक होते, त्यांना खायलाही धान्य मिळालं नाही. रसद येणं तशी बंदच झाली होती. त्याचा परिणाम हा झाला की त्या सैनिकांसह ते सर्व शासक व त्यांच्या राण्याही उपासानं मरण पावल्या. परंतु ते सर्व स्वाभीमानी असल्यानं झुकले नाहीत वा झुकण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांनी मरण पत्करलं. परंतु शरणागती पत्करली नाही. शेवटी ज्या शासकानं त्या किल्ल्याला वेढा दिला होता. त्याही शासकाला त्या किल्ल्यावरील सर्व शासक मरण पावले होते हेही माहीत नव्हतं. कालांतरानं तोही शासक थकला व त्या शासकाला वाटलं की आपण उगाचंच किल्ल्याला वेढा देवून आहोत. यात आपलाच पैसा खर्च होत आहे. त्यापेक्षा वेढा उठवलेला बरा व आपण आपल्या राज्यात परत जायला हवं.
तसा विचार करताच त्या शासनानं वेढा उठवला व त्या किल्ल्याच्या शासकांची साधी चौकशी न करता तो निघून गेला. त्यानंतर बऱ्याच दिवसानं आमच्या तसेच लगतच्या गावातील लोकं किल्ल्यावर गेले असता त्यांना कळलं की किल्ल्यावर कोणताही शासक वा मनुष्य वाचलेला नाही. तो उपासानं व भुकमरीनं मरुन गेलेला आहे. त्यानंतर आम्हाला रात्री अपरात्री असे बरेच आवाज ऐकायला येत असत. मग आम्ही ठरवलं की किल्ल्यावर भुतं असतात. तिथं सांजच्याला वा रात्रीला फिरकू नये. मात्र आज आपल्या प्रयत्नांनी हा किल्ला शापमुक्त झाला आहे."
तो किल्ला शापमुक्त झाला होता. आता ना त्या किल्ल्यावर कोणता आवाज येत होता ना कोणती अनुचीत घटना घडत होती. आज त्या किल्ल्याचा दर्जाही वाढला होता व गावातील माणसंही अगदी बिनधास्तपणे किल्ल्यावर राहू लागली होती. काही गावकऱ्यांनी आणि उद्योगपतींनी तर त्या किल्ल्यावर वसाहतीच बांधल्या होत्या पर्यटकांसाठी. आता पर्यटक येत असत भरपूर मोठ्या प्रमाणात. किल्ल्यात फिरकत असत. कधी मुक्कामही करीत असत. ते खुश होत असत किल्ल्याला पाहून आणि त्यांची खुशी पाहून ते शेकडो मृतात्म्येही खुश होत असत.
आज किल्ला डोंगरावर नव्हता वा किल्ल्यावर डोंगर शिल्लकच राहिलेलं वाटत नव्हतं ना त्या किल्ल्याला गावकऱ्यांनी वेगळं पाडलं होतं. तर त्या किल्ल्यावर लोकांनी वसाहती निर्माण केल्या होत्या. आता ना किल्ल्यावर रात्री अपरात्री कोणती भुतं वावरत होती. ना कोणाला तिथं कधीही कोणतंच भूत दिसत होतं.
************************************************

किल्ल्याला शापमुक्त केल्यानंतर अतूल, हेमलता व सारंग दोन तीन दिवस गावकऱ्यांसोबत राहिले. त्यांनी गावकऱ्यांसोबत राहून यथोचीत आनंद घेतला. तसा त्यांच्या आग्रहानं पाहूणचार स्विकारला व ते मार्गस्थ झाले. हेमलता व सारंग हे आपल्या जन्मगावी परतले आणि अतूल आपल्या गावी.
ते आपआपल्या गावी आले होते व आपआपल्या संसारात रममाण झाले होते. मात्र कधी काळी त्यांचं फोनवर बोलणं व्हायचं आणि त्या रात्रीच्या आठवणी निघायच्या. ज्या आठवणींनी आताही त्यांच्या शरीरावर शहारे उठत असत व आताही त्यांच्या मनात भीतीचे थरकाप फुटत असत.
आज अतूल म्हातारा झाला होता व त्याचं जाणं आजपर्यंत तरी झालं नव्हतं त्या भुताच्या किल्ल्यावर. परंतु तो किल्ला अजुनही त्याच्या डोक्यात होता. त्याला कधीकधी वाटायचं की आपण कधीतरी आपल्या जीवनाच्या अंतिम टप्प्यावर जावून यावं व त्या किल्ल्याला भेट देवून यावी. तसा तो यावेळेस निघाला होता. तसं पाहिल्यास सारंग व हेमलता नेहमी त्या किल्ल्यावर जायचे आणि त्या आठवणी सांगायचे अतूलला. त्यामुळं तर अतूलला नेहमीच तसं वाटायचं की आपणही या जीवनाच्या अंतिम समयी एकतरी भेट अवश्य द्यावी त्या किल्ल्याला. तसा तो म्हातारा झाल्यानं व त्याला प्रवास निःशुल्क असल्यानं तो किल्ल्याच्या भेटीला निघाला होता एकटाच आणि आता याहीवेळेस त्याला किल्ल्यावर सारंग व हेमलतासारखंच एक जोडपं भेटलं होतं. जे सारंग आणि हेमलताच्याच वयाचं होतं. त्यांचाही नुकताच विवाह झाला होता. परंतु नावात बदल होता. ते किल्ल्यावर फिरायलाच आले होते. मात्र आज त्याच गतकाळातील भुतांच्या इतिहासाची पुनरावृत्ती होणार नव्हती. कारण आता किल्ला अगदी शापमुक्त झाला होता. मात्र त्यांना पाहून अतूलला गतकाळातील हेमलता व सारंगची आठवण येत होती.
किल्ला पार बदलला होता. तो आता एकाकी नव्हता. त्याला लोकांनी एकाकी ठेवलं नव्हतं. त्याचं रुप पालटलं होतं. थेट बस जात होती आता किल्ल्यावर. शिवाय कालचे दगडांचे रस्ते जावून आता डांबराचे व सिमेंटचे रस्ते बनले होते किल्ल्यावर. जणू किल्ल्यात गाव शिरलं होतं आणि निर्माण झाल्या होत्या खानावळी.
अतूल त्याही गावात गेला होता. ज्या गावातील गावकऱ्यांनी त्याचा किल्ला शापमुक्त केल्यानंतर आदरसत्कार केला होता नव्हे तर त्या तिघांनाही पाहूणचार घेतला होता. आज ते गावंही आनंदात होतं. परंतु गाव त्याला ओळखत नव्हतं.
अतूलनं किल्ल्याची चौकशी करुन पाहिली, तिथं एकेकाळी भूत वावरत असल्याबाबत. परंतु गावातील म्हातारी मंडळी मरण पावली असल्यानं व गावात नवनवीन मुलं, तिही शिक्षण क्षेत्रात आघाडीवर असल्यानं भूत म्हणजे काय? ते त्यांना समजत नव्हतं. ना त्यांनी आपल्या हयातीत त्या किल्ल्यावर भूत पाहिलं होतं. त्यामुळंच ते विश्वास ठेवत नव्हते व अतूलच्या विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी हसत उत्तर दिलं व मनात विचार केला की बावाजीला वेड लागलं की काय?
गाव पुर्णच बदललं होतं. गावात सुधारणा झाली होती व ते गाव त्या किल्ल्यापर्यंत वसत जावून मोठं झालं होतं. मात्र आज गावाची एक खंत होती. ती म्हणजे त्यांचा रोजगार. आज गावातील माणसांना किल्ला पर्यटनाचं स्थान असूनही रोजगार नव्हता. तो रोजगार कुण्या उद्योगपतींनी हिरावून नेला होता. त्यांनी कमाई करण्यासाठी गावात आपल्या खानावळी उघडल्या होत्या. त्यातच ती मंडळी गावच्याच काही लोकांकडून किल्ल्याची माहिती मिळवून त्या माहितीत स्वतःच्या कल्पकतेनं खोटी नाटी सर्व माहिती जोडून येणाऱ्या पर्यटकांना मार्गदर्शन करीत असत. ज्यात खरी माहिती लपली जात होती नव्हे तर लुप्त होत जावू लागली होती.
आज किल्लाही शाबूत नव्हता. त्याचे काही बुरुज खचले होते. परंतु तो किल्ला जणू अतूलला ओळखल्याबद्दल हसत होता गालातल्या गालात. जणू तो किल्ला त्याला भुतापासून शापमुक्त केल्याबद्दल अतूलचं अभिनंदनच करीत होता.
किल्ल्यावर राहायची सोय होती. परंतु अतूल काही किल्ल्यावर फारसा थांबला नाही. त्याला तसा आज वेळही नव्हता. तो लगबगीनं निघाला. त्यानंतर तो रत्नागीरीमार्गानं गणपतीपुळेला निघाला.
गणपतीपुळे...... पुर्वी गणपतीपुळे हे निसर्गरम्य ठिकाण होतं व भाविकांच्या नजरेतून दर्शनाचं ठिकाण. या ठिकाणी पुर्वी कोणताच व्यक्ती फेरफटका मारायला यायचा नाही. तो भावीकता मनात ठेवून यायचा तर इथं असलेल्या गणपतीचं दर्शन घेवून कृतार्थ व्हायचा.
अतूल यापुर्वी गेला होता त्या गणपतीपुळेला. जेव्हा त्यानं भुताचा किल्ल्यावर थरार अनुभवला होता. मात्र आज बऱ्याच दिवसानं तो गणपतीपुळेला आला होता व त्या गणपतीपुळेतीलही चित्र पार बदलून गेलं होतं. आता तिथं भावीक हे नावालाच येत होते. कारण आता त्याठिकाणी बरेच बीच व चौपाट्या तयार झाल्या होत्या. ज्या पर्यटकांचे मनोरंजन करीत होत्या. शिवाय पर्यटकांच्या मनात भावीक भावना नव्हती तर ते या गणपतीपुळेला केवळ मनोरंजन करण्यासाठीच येत असावेत असं वाटत होतं अतूलला. कारण ते पर्यटक इथं आल्यानंतर दोनचार दिवस मुक्कामी असतात असं कोणीतरी सांगत होतं व त्या दरम्यान येथील समुद्रात सापडणाऱ्या मासोळ्यावर खमंग ताव मारत असतात असेही लोकं म्हणत होते. शिवाय ते तोकड्या कपड्यात समुद्रात निव्वळ पाण्याचा आनंद घेत बसत असतात व त्यावेळेस ते दारुचाही आश्वाद घेत असतात असेही बरेच जण सांगत होते. शिवाय तेच वास्तविक स्वरुपात अतूलला पाहायला मिळालं होतं व त्याला क्षणातच गोव्याची आठवण आली. कारण तो गतकाळात गोवा फिरुन आला होता व त्या गोव्याला तोकड्या कपड्यात वावरणारे स्री पुरुष जणू तिथं विदेशी संस्कृती वसलेली असल्याची जाणीव त्याला खुणावत होती. तोच गोवा जणू आज गणपतीपुळे पाहतांना याच महाराष्ट्रात अवतरला असल्याची चिन्हं अतूलला साक्षात दिसून येत होती.
पुर्वी या ठिकाणी गणपतीपुळेतील मंदीर परीसराचा भाग सोडला तर दुसरीकडे कुठंच चौपाट्या नव्हत्या. परंतु आज अतूलला गणपतीपुळेतील संपुर्ण वातावरणच बदललेलं दिसलं. काल गणपतीपुळेला केवळ भावीक लोक यायचे. त्यात काही नवश करणारेही असायचे. फिरायला येणारी मंडळी फार कमी असायची. आज फिरायला येणारी मंडळी भरपूर होती व त्यातील काही मंडळी अतूलला मांस खावूनही गणपतीबाप्पाच्या दर्शनाला जातांना दिसली. ते पाहून अतूलला किळस वाटली व तो माघारी फिरला.
रात्र बरीच झाली होती व रात्रीचे नऊ वाजले होते. अतूल रत्नागीरीला पोहोचला होता. त्याला कोल्हापूरात यायचे होते. परंतु तिथं गाड्या नव्हत्या. रत्नागीरीवरुन कोल्हापूरात येणाऱ्या महाराष्ट्रातील गाड्या साडेसातलाच बंद झाल्या होत्या. तसं कोणीतरी सांगीतलं की कर्नाटकमधून एक गाडी येईल. त्या गाडीनं कोल्हापूरात जा. अर्जंट असेल तर....... नाहीतर उद्या सकाळची गाडी आहे. सकाळी जा.
ती नव वाजताची गाडी. ती गाडी कोल्हापूरात येणार होती. परंतु ती गाडी महाराष्ट्रातील नव्हती. त्यात अतूलला निःशुल्क प्रवासाची सुविधा चालत नव्हती. तिकीट काढावी लागणार होती. तसा अतूलनं विचार केला. विचार केला की फालतूची वेळ का बरं घालवावी. असा विचार करीत तो कर्नाटकमधून येणाऱ्या गाडीतून कोल्हापूरात येण्याचा विचार करु लागला. तोच कर्नाटकमधून कोल्हापूरात जाणारी गाडी आली व अतूल कोल्हापूरात जाण्यासाठी त्या गाडीत बसला. तसा कन्डक्टर म्हणाला,
"हे रत्नागीरी जिल्ल्ह्याचं ठिकाण व गणपतीपुळे हे पर्यटनाचं ठिकाण. परंतु येथून कोल्हापूरात जाणाऱ्या गाड्या नसणं शोकांतिकाच आहे. तसं पाहिल्यास कोकणातील रत्नागीरी हे महत्वपुर्ण जिल्ह्याचे ठिकाण असून कोकणात पिकणाऱ्या विविध वस्तू जसे काजू, हापूस आंबे, बदाम, सुपारी या गोष्टी जिल्ह्याच्या विविध भागात पाठवाव्या लागतात. त्या अल्प किंमतीत पाठवण्याचं साधन बसच आहे आणि त्या वस्तू रात्रीला पाठवाव्या लागतात. ज्या वस्तू साडे सात पुर्वी शेतकऱ्यांना पाठवणे शक्य होत नाही. तेव्हा रात्रीच्या एकदोन गाड्या असाव्यात. परंतु त्या नाहीत. ज्यामुळं आमचा फायदा होत असतो. आम्ही महाराष्ट्रातून बराच पैसा यारुपानं नेत असतो. जो पैसा महाराष्ट्राला मिळायला हवा."
अतूलला त्या कन्डक्टरनं म्हटलेलं पटलं होतं. तसंही त्याला वाटत होतं की गणपतीपुळे आज तरी पर्यटनाच्या क्षेत्रात आघाडीवर असून सध्या त्यांना रत्नागीरीवरुन कोल्हापूरात जावं लागतं. त्याशिवाय पर्याय नसतो. परंतु कोल्हापूरात रत्नागीरीवरुन जायची गाडीच नसल्यानं लोकांना विनाकारण गणपतीपुळेला एक रात्र थांबावं लागतं. त्यामुळंच विनाकारणचे पर्यटकांचे पैसे जात असतात. त्यामुळंच एखादी गाडी जर रत्नागीरी प्रशासनानं कोल्हापूरात जाण्यासाठी सुरु केली तर भाविकांसाठी चांगलीच पर्वणी होईल. तसाच पैसाही वाचेल.
अतूल कर्नाटकच्या गाडीत बसून कोल्हापूरात आला. त्यानंतर तो लागलीच परत फिरला माघारी. शेवटी तो आपल्या स्वगृही परतला होता. शिवाय यावेळेस त्याला कृतार्थ झाल्यासारखे वाटत होते. कारण आता ना त्या किल्ल्यावर भूत होतं ना ती माणसं भुताच्या गर्दीत होती. मात्र आज किल्ल्यावर जरी भूत नसलं तरी आजही त्याला भुतांची भीती वाटत होती. शिवाय गतकाळात त्या किल्ल्यावर जाण्यापुर्वी भूत नसतातच असा मानणारा अतूल आज जरी किल्ल्यावर भूत वावरत नसलं तरी भूत मानायला लागला होता.
ते सारंग आणि हेमलता कुठं होते आज ते कळत नव्हतं त्याला. कारण काळाच्या ओघात मुलाचं व सुनाचं राज्य आलं होतं अतूलच्या घरात. त्यामुळं त्याला मोबाईल बोलायला मिळत नव्हता. तसा कधीकाळी मोबाईल मिळायचाही. परंतु त्यात सारंग व हेमलताचा क्रमांक नव्हता. त्यामुळंच बोलणं होत नव्हतं. मात्र आजही अतूलला सारंग व हेमलता आठवायची गतकाळात किल्ल्यावर भेटलेली. कारण ते दोघे होते म्हणूनच तो वाचू शकला होता. ते जर पुन्हा परत आले नसते तर चित्र काहीसं वेगळं असतं. ना तो जिवंत असता, अन् ना त्या किल्ल्याच्या आठवणीही. ना आज तो किल्ला शापमुक्त दिसला असता लोकांना. ना आज त्या किल्ल्यावर वसाहती निर्माण झाल्या असत्या. आजही तो किल्ला त्याच भुतांच्या छायेत असता. अन् आजही तोच भुतांचा थरार रोजच गावातल्या लोकांना अनुभवावा लागला असता. यात शंका नाही. शिवाय भूत असतं का नसतं हेही अतूलला माहीत झालं नसतं.
अतूलला आठवत होता तो महाराष्ट्र भुषण पुरस्कार. त्या भुतांच्या नादी लागून त्याची महाराष्ट्र भुषण पुरस्काराची आठवण विसरुन गेली होती. अशातच तो पुरस्कार त्याच्या हातून निघून गेला होता. ती अजुनही खंत मनात होती. परंतु ती खंत जरी मनात असली तरी त्याला झालेला एक नवा आनंद अजूनही त्याच्या मनात होता. तो आनंद म्हणजे किल्ल्याची भुतांपासून सोडवणूक. आज त्या किल्ल्याला भुतांपासून मोकळं केल्यानं त्याला झालेला तो असीम आनंद गगनात मावेनासा असाच होता व तोच आनंद महाराष्ट्र भुषण पुरस्कारापेक्षाही मोठाच होता.

********************************************************************************समाप्त***********