यारो  मैंने  पंगा  ले   लिया .........  
             
               “कार्पोरेट  वर्डमें   तुम्हें   कभी  न  कभी  सरेंडर होना  ही   पडता है.  तुने   दुनिया  देखी  कहाँ है  गधे?  बेकारीसे   भुखे   मरोगे  तब होशमें  आओगे . तुमने तो  पानीमें  रहकर मछलीसे  बैर मोल  लिया  है, नतिजा  तो  भुगतनाही  पडेगा..... गेट  लॉस्ट  नाऊ” सोनी साहेबांच्या  केबिन बाहेर पडल्यावर  तो मुरुगनला  भेटून त्याला घेवून कॅण्टिन मध्ये गेला. कॉफी पिताना झलेला विषय  त्याला सांगून  आपण रिझाईन देवून  बाहेरपडणा र असल्याचं त्याला बोलला.  त्यावर, “ इन चोरोंको अपने पापोंकी सजा कभी  न कभी  तो भुगतनीही पडेगी.” अस मुरुगन त्राग्याने बोलला.  सेक्शनमध्ये गेल्या गेल्या  त्याने  रिझायनिंग लेटर  टाईप  करायला घेतलं.  पत्र पुरं झाल्यावर दोन प्रिंट  काढ्ल्या नी  त्यावर सह्या केल्या .  मग  इनवर्ड सेक्शनमध्ये ओ.सी.वर काउंटर साईन घेवून तो परत आला . पेंडिंग  काम काहीच नव्हतं आणि  उद्या इथे यायचं नव्हतं  म्हणून नवीन काम सुरु करण्यात काही  हशील  नव्हतं. ऑफिस अवर्स संपायला अजून दोन  तासाचा  अवधि होता. त्याने  आपला  लॉकर  नी  कपाट उघडलं. सगळे  कप्पे  तपासून  आपले   काही  पर्सनल  कागद राहिले नाही ना ? याचा  शोध घेतला. मिळालेल्या  कागदात  महत्वाचं  काही  काही   नव्हतच म्हणून ते   फाडून  डस्टबीम मध्ये टाकले. कॉम्प्युटर मध्ये डी ड्राईव्हला त्याचा  पर्सोनल  फोलियो  कट करून पेन  ड्राईव्ह वर घेतला नी  टाईमपास साठी मोबाईलवर  बबल  गेम  ओपन केला.     
       ऑफिस अवर संपायला पाच  मिनिटं  राहिलेली असताना  अकौंटस् सेक्शन मधल्या  जोशी काकांचा  फोन आला.  आज सोबत च  जाऊया  एवढं  मोघम बोलून त्यानी फोन कट केला.  प्रिमायसिस बाहेर पडताना,“काही  महत्वाचं  बोलायच आहे, राजदीप बारमध्ये  बसूया,  बीअर घेता घेता  निवांत  बोलू ” एवढं  बोलून दोघेही  पार्किंग  लॉटकडे  वळले. बार जवळ  स्कूटी  पार्क  करताना   मिसेसला  फोन  करून  आपल्याला  यायला अकरा वाजतील  नी   जेवायला   वाट  बघू  नको असा  निरोप जोशी  काकानी  दिला. दिलिप सडाफटिंग नी  तो कॉट बेसिस वर टू  बीएचके  मध्ये चार पार्टनर्स सोबत  रहायचा, त्याची वाट पहाणारं कोणीच  नव्हतं.  इथे  कधिच  फार  गर्दी  नसायची. कोप-यातल  टेबलं  गाठून  दोघेही  स्थानापन्न  झाल्यावर  जोशी   बोलू  लागले. “तुझं  रिझायनिंग लेटर  बघितल्यावर सोनी साहेबानी मला  बोलावून घेतलं.  तुला शहाणपणाचे चार शब्द सांगून  ताळ्यावर आणायची कामगिरी  त्यानी  माझ्या वर  सोपवलेली  आहे......   हॉटेलिंग साठी  अडिज हजार  कॅश दिलिय  त्यानी.... सगळी  भानगड  काय आहे ती  जरा  समजावून  सांग...” मग  दिलिपने  आपले  नी  साहेबांचे  क्लॅशेस कसे झाले  ते  जोशीना  मोकळेपणी कसलाही  आड पडदा न ठेवता सांगून  टाकलं.                                                        
            
            कंपनीत  जॉईन झाल्यावर दोन वर्ष  दिलिप  प्रॉडक्शन सेक्शनला होता.  सोनी  साहेबांचा  मेव्हणा सुजित पांडे  तिथे एच.ओ.डी.  च्या  पोस्टवर . हजर  झाल्यावर  दोन तीन  दिवसातच   दोघांचा  चांगला  दोस्ताना जमला. दर आठवड्याला  सेक्शनचा  रिपोर्ट  द्यावा  लागायचा. दोघांची   घसण  वाढली  नी  त्या  आठवड्यात सुजितने  दिलिपला  रिपोर्ट  बनवायला सांगितला. पूर्वीचे  रिपोर्ट नजरेखाली  घातल्यावर  दिलिपने  डाटा   कलेक्ट  केला .  मग  गुगलवर वर्क  रिपोर्टसची  सॅंम्पल्स वाचून दोन दिवस  राबून  विकली  रिपोर्ट  करून  दिला. सुजितचे रिपोर्ट्स  सोनी साहेबांचे स्टेनो दिवेकर चेक करून त्यातल्या कन्स्ट्रक्शन मिस्टेक्स, चुकीची  फ्रेझियॉलॉजी  दुरुस्त करून देत  नी मगच  तो सबमिट केला  जायचा.  यावेळीही  दिवेकरानी रिपोर्ट  वाचला. चूक एकही नव्हतीच  उलट  दिवेकरानाही  जमली  नसती  अशी टर्मिनॉलॉजी  वाचून  ते  चाट  झाले.  दिवेकरानी  चेक करून  दिलेला  रिपोर्ट  लाल रंगाच्या नक्षीने असा  काही  चितारलेला असे  की  टायपिंग  करणा-या  सिल्वियाला  काही वेळा  दिवेकराना  विचारून  घ्यावं  लागे. यावेळी एकही करेक्शन नसलेला  कागद बघून  सिल्वियाने दिवेकरना  इंटर कॉम  वर  विचारून त्यानी  तो चेक केला का?  ही  खात्री  करून घेतली.  
             आता नेहेमीचे  रिपोर्टस  दिलिपच बनवून देऊ लागला  नी   दिवेकरांच्या मागचं एक झंझट  कमी झालं . सुजितमध्ये  एवढी  सुधारणा  कशी काय झाली  म्हणून त्यानी  खोलात शिरून  माहिती  काढल्यावर  त्याना अंदरकी बात उमगली.  पण  ते कार्पोरेट  जगात पुरते मुरलेले होते . आपलं  महत्व कमी होऊ नये म्हणून  ही  बाब  साहेबाला कळू  नये  याची पूरेपूर  दक्षता घेतली.  येणारा  ड्राफ्ट बरोबर असला तरी त्यात  एक दोन  दुरुस्त्या  ते  करीत .   कंपनीच्या  बोर्ड ऑफ डायरेक्टर्स  पैकी   वरूण  नागराज  आणि     टी .  सिल्वराज   वर्षातून एक वेळा  मॅनेजिंग डायरेक्टर, असोशि एट  डायरेक्टर  आणि  सगळ्या सेक्शंचे एच. ओ. डी.  यांची   जनरल मिटिंग  लावीत . तेव्हा  प्रत्येक  सेक्शनकडून  सुचना , रिक्वायरमेंटस  बाबत  रिपोर्ट मागवण्यात येत. या वेळी  जनरल मिटींगची  तारीख  कळल्यावर सगळ्या  सेक्शन्सकडून  सजेशन्स   मागवण्यात आल्या.  ही नोटिस  आली नी   हे कामही अर्थातच दिलिपकडेच  आलं.  दिलिपने  नीट विचार कंपनीच्या  प्रिमायसीस मध्ये  आंबा , जांभूळ नी  बकुळी  ही  झाड  लावायची  मागणी केली.  तसंच सेक्शनला दिलेल्या  कॉम्प्युटर सिस्टीम आऊट डेटेड  झाल्यामूळे त्या बदलून लॅपटॉप  ची  मागणी  केली. दोन्ही माग़ण्या कशा योग्यआहेत  याचं  तर्कशुद्ध जस्टिफिकेशन दिलं होतं. 
             नेहेमीच्या शिरस्त्याप्रमाणे कच्चा ड्राफ्ट  दिवेकरांकडे  गेला. त्यानी पांडेला तो दिलिपनेच केला का याची विचारणा करून  तो न वाचताच  फायनल करायला  सांगितला. नियोजीत दिवशी  मिटींग सुरु  झाली. सुजितचा टर्न आल्यावर  तो  पेपर्स वाचू  लागला. त्या वेळी शासकीय स्तरावर पर्यावरण संवर्धनाचा विषय खूप गाजत होता.  या पार्श्वभूमीवर  सुजीतने सुचविलेली झाडांची नावं  नागराज याना खुपच अपिल  झाली. पुण्यासारख्या  उष्ण वातावरणातली  ह्युमिडिटी मेंटेन करण्या साठी ही सदाहरित झाडं लावणं गरजेचं आहे. हे  रिझनिंग सगळ्यानाच भावलं. तसंच आऊट डेटेड  कॉम्प्युटर सिस्टीम   बदलून लॅपटॉप  ची  केलेली मागणीही  डायरेक्टर्सनी  अॅप्रिशिएट केली.  सिल्वराज  यानी आपल्या अध्यक्षीय  भाषणात , “वी हायली अॅप्रिशिएअट  द  सजेशन्स मेड बाय  यंग प्रॉमिसिंग  एच. ओ. डी. ” असे गौरवोद्गार काढले.  मिटिंग नंतर  नागराज यानी  त्याला  खास  बाब म्हणून  तीन इनक्रीमेंटस  द्यायला सांगितली. आउटडेटेड  कॉम्प्युटर सिस्टीम   बदलून लॅपटॉप  द्यायची सजेशन खरंतर  कंपनीच्या इंजिनिअर्सनी या पूर्वीच करायला हवी होतीअशी  नाराजीही व्यक्त केली.
          सुजितने वाचलेला रिपोर्ट  दिवेकरानी करून दिलेलाअसणार असं  सोनी साहेबाना  वाटलं होतं. पण दिवेकरानी यावेळी मात्र  सुजित कडून हे बिंग फुटेल हे ओळखून   स्वत:  श्रेय न घेता  दिलिप चं नाव  सांगितलं. तसच  अलिकडे  सगळे रिपोर्टस   दिलिप करून देतो त्यामुळे आपल्याला  फार लक्ष द्यावं  लागत नाही  हे ही सांगून टाकलं. या प्रसंगानंतर  महिनाभरात पर्चेसिंगचे फणसळकर जॉब सोडून गेले  त्या पोस्टवर  साहेबानी  सुजितची वर्णी लावली. आता मोठं कुरण  साहेबांच्या हातात आलं.  या सेक्शनला  रिपोर्ट वगैरे काहीच झंझट नव्हतं त्यामुळे  दिलिप वरचं अवलंबित्व  संपलं . अर्थात सुजितला पर्चेसिंगला अपलिफ्ट केल्यावर त्याजागी  साहेबानी दिलिपला प्रमोट केलं. हा सेक्शन  आपल्या अखत्यारीत आल्यावर  दिलिपने  जॉब  डिझाईन्स मिळाल्या पासून तो  संबंधित  जॉब पूर्ण होईतो   सगळ्या  प्रोसेसचा बारकाईने अभ्यास केला.  या प्रोसेसमध्ये  कोणत्या  स्टेजवर लेबर कशी  मखलाशी करतात  त्याचं बारकाईने  निरिक्षण केलं . ते टाळण्यासाठी लेबर लोकांशी  चर्चा करून वर्क शेड्युल  तयार केलं  त्या प्रमाणे  जॉब  पुरे करणारांसाठी  काही  तरी इन्सेन्टिव्ह देण्याची  आपण शिफारस करू  असंही आमिष  दाखवलं. 
               त्याची  वर्क  स्टॅटेजी  लागू पडली नी प्रॉडक्शनचा रेट  दहा टक्केपर्यंत वाढला. ही ग्रोथ इतर कोणाच्या लक्षात आली नाही तरी   नागराज यांच्या  नजरेतून सुटली  नाही. त्यानी स्वत: मशिन ऑपरेटर म्हणून करियर सुरु करून सिल्वराजशी  पार्टनरशीप मध्ये  स्वत:चं  स्वतंत्र  प्रॉडक्शन युनिट करीपर्यंत  मजल मारलेली असल्यामुळे या विश्वातली रॅट रेस  ते ओळखून होते.  म्हणून या  परिवर्तनामागे  नेमकी  कोणाची  वर्क स्ट्रॅटेजी आहे याचा  सतर्कतेने मागोवा घेतला तेव्हा  दिलिपचं  नाव त्याना कळल. यापूर्वी  वेगवेगळ्या तांत्रिक  सुधारणा केल्या.  अॅडव्हान्स  टूल्स नी  मशिनरी       उपलब्ध  करून दिली तरी प्रोडक्शन  रेट   जैसे थे च....  तो कधिच वाढला नव्हता .    या वेळी  पर्चेसिंग सेक्शन मध्ये रॉ मटेरियल  आणि आयटम्स मध्ये   रेट मध्ये   थोडी अॅबनॉर्मल  ग्रोथ त्यानी मार्क केली. पण या सेक्शनला  सुजित  नव्याने  आलेला  असल्यामुळे  सप्लायर्स  नी  स्ट्रॅटेजी बदलली असण्याची शक्यता अधिक होती. पूर्वी  रिलेशन्स  जुळलेली माणसं  बदलली की पूर्वी  दिलेल्या अॅश्यूरिटिज  मोडित  काढून  सप्लायर्स  पॉलिसी  बदलतात.
             पुढच्या  सहा सात महिन्यात  वाढलेला प्रॉडक्शन  रेट   स्टेबल  राहिला .  या दरम्याने  नेहेमी प्रमाणे   जनरल मिटींग  लागली.  या वेळी सोनी साहेब  अॅलर्ट  राहिले.  त्यानी दिलिपला बोलावून त्याला  सजेशन  रिपोर्ट  आपल्याकडे   प्रॉयर  सँक्शन करून   घ्यायला बजावले.  त्यांच्या सूचनेप्रमाणे  त्याने  आपल्या रिपोर्टचा ड्राफ्ट  तयार झाल्यावर  सोनी साहेबांकडे  सबमिट केला.   आपल्या  वर्क शेड्यूल मूळे  प्रॉडक्शन रेट वाढून तो कसा  स्टेबल झाला ते  नमूद करून  हा रेट आणखी  वाढण्यासाठी  अमेरिकेत  वापरली जाणारी  अॅ डव्हान्स  कॉ म्प्युटराइज्ड  मशिन  उपलब्ध करून  देण्याची सजेशन दिली होती.  ड्रॎफ्ट वाचल्यावर     सोनी  साहेब तीन फूट उडाला..... प्रॉडक्शन  रेट  वाढून तो स्टेबल  झाला  तरी  ही बाब आपल्या नजरेतून  कशी काय निसटली  याचं त्यानाच कोडं पडलं. सध्या होणा-या  जॉबवर तीन स्टेज मध्ये प्रोसेसिंग व्हायचं. दिलिपने सुचवलेल्या कॉ म्प्युटराइज्ड  मशिन मध्ये  या  तीन्ही  प्रोसेस एकत्रितपणे हो ऊन  असेंबल्ड जॉब  दोन तासात  मिळू  शकला असता आणि  एकच  ऑपरेटर लागला असता.  मात्र विद्यामान स्थितीत या प्रोसेस ना  चार ते पाच तास  लागत. शिवाय  तीन  मशिन्सवर  तीन स्वतंत्र मशिनऑपरेटर  लागत. 
               सोनी साहेबानी दिलिपचा ड्राफ्ट  वाचल्यावर त्याला बोलावून  त्याने रिफर केलेली सिस्टिम एक्सपेन्सिव्ह आहे  नी  यात  लेबर   कमी  लागत असल्यामूळे  युनियन प्रचंड  विरोध करील  असं  सांगून  बूच लावलं . दिलिपला डिझायनिंग सेक्शनला  ट्रान्सफर  करून  आपल्या  टीम  मधला तिवारी प्रॉडक्शनला  टाकला. त्यावेळच्या  जनरल  मिटिंग मध्ये  प्रॉडक्शन  सेक्शनमध्ये खुद्द सोनी साहेब  काही  एक्सपरिमेंटस राबवीत असून  त्याचे  फ्रुटफुल आऊट कम्स  मिळाल्यावर  सोनी सरच  मॅनेजमेंटशी  डिस्कस करतील  असं  रिपोर्टिंग  तिवारीने केलं. अर्थात  या मीटिंग पूर्वीच  दिलिपची उचल बांगडी  झाल्यामुळे मिटींग मध्ये झालेल्या गोष्टींची खबर  दिलिपला  लागणे  शक्यच नव्हते.  आपण  दिलेल्या ड्राफ्टमध्ये  काहीही  चूक नसताना  मॅनेजिंग डायरेक्टरनी आपली  डिझायनिंगला उचलबांगडी  कां  केली असावी  याचा दिलिपला काहीच अंदाज बांधता येईना. आपल्या  वर्क स्ट्रॅटेजीमूळे  प्रॉडक्शन रेट  मध्ये झालेली  ग्रोथ  ओळखून  त्याचं क्रेडिट  दुसराच कुणी  घेऊ पाहतोय  इतपत अंदाज मात्र त्याने बांधला.  
                 नवीन सेक्शन मध्ये मुरुगन,  तिवारी,   पाळ,  चोपडा  नी  बाहेती     पाच जणांची टीम  होती. त्यात तिवारी ऐवजी  दिलिप  आला.   या सेक्शनमध्ये  प्रॉडक्शन रिक्वायरमेंट  प्रमाणे डिझायनिंग  केली जात नी   हा सेक्शन   सोनी सरांच्या  अंडर काम  करायचा.  एका जॉबवर  दोघे तिघे  मिळून काम करीत. खरं तर या सेक्शनला   पाच लोकांची गरज नव्ह ती . टीम मधले  पाचही  मेंबर्स  टॉप  एक्झिक्युटिव   रँकचे  असल्यामुळे  गरजे प्रमाणे   सेक्शन  हेड  म्हणूनही  त्यांच्यावर  जबाबदारी सोपविली जात असे.  जी  पाच सहा प्रॉडक्टस  बनवली जात त्यांच  डिझाईन  ही टीम फायनल  करत  असे.  हे काही    तसं अवघड नव्हतं. पण  इथली स्ट्रॅटेजी काम पुरवून पुरवून करण्याची होती. पहिल्या  पाच सहा दिवसातच ही गोष्ट दिलिपच्या लक्षात आली. तो रिकाम टेकड्या  फाका मारून जाम कंटाळलेला. आलेलं नवीन ड्रॉईंग त्याने एकट्यानेच  करायला घेतलं. सोनी साहेबानी  मुरुगनला बोलावून  एक अर्जंट  रिपोर्ट  त्याच्याकडे  बनवायला  दिला. तो सहा महिन्यापूर्वीच को ईमतूरच्या ब्रॅन्च मधून पुण्याला  ट्रान्सफर होऊन आलेला , नागराज साहेबांच्या मर्जीतला म्हणून  सोनी साहेबांची त्याच्यावर मेहेरनजर असायची. खास कॉन्फिडेन्शल  कामं सर त्याच्यावर सोपवीत.  ते काम करीत असताना त्याला  काहीतरी रेफरन्स अडला म्हणून त्याने  दिलिपला विचारलं. त्याने मुरुगनच्या हातातले  रेफरन्स बघितले  नी त्याची कानशिलं गरम झाली...... तो  त्याने  रेकमेण्ड केलेला ड्राफ़्ट होता. त्याने मग मुरुगनकडे  मन मोकळं केलं.        
           पुढच्या आठवडाभरात ब-याच उलथा पालथी  झाल्या.  दिलिपने केलेल्या सजेशन्स  त्याच्या   ड्राफ्टसह  सोनी साहेबानी  हायजॅक केल्या होत्या.  बोर्ड ऑफ डायरेक्टरनी  प्लान मंजूर केला होता नी  तो वर्क आऊट ही झाला होता. पाच   मशिन्स   बुक झाली होती .  नवीन मशिन  ऑपरेट करण्याचं  दोन आठवड्यांचं  ट्रेनिंग  घेण्यासाठी  साहेबांचा मेहुणा  नी  आहुजा   याना  अमेरिकेला  पाठवण्यात आलं . त्यांच्या जागी  तिवारीला प्रॉडक्शन कडे आणि  दिलिपला पर्चेस कडे  ट्रान्सफर करण्यात आलं. दिलिपकडे  चार्ज आला  त्याच दिवशी   सेक्शन्मध्ये हजर झाल्या झाल्या   पर्चेसिंगचं  कंपनीने  आखून दिलेलं   प्रोसिजर  त्याने वाचून  काढलं . लंच अवर झाल्यावर  सुपरिटेण्डण्ट  खन्नासाहेबांनी  कॉन्टॅक्ट  करून   टेल्कोची खूप मोठी ऑर्डर मिळाल्याचं सांगितलं.   त्यांच्या रिक्वायरमेंट  प्रमाणे  जे जॉब  बनवायचे त्यासाठी  लागणारं रॉ  मटेरियल    दोन तीन दिवसात पर्चेस करायला  हवं , हे  मटेरियल  सप्लायर  करणारी रिलाएबल पार्टी  माझ्या  माहितीची आहे,  अशीही टीप त्यानी  दिली. तेवढ्यात  मटेरियल ची  डिमाण्ड नोटही  आली.   
           दिलिपने  पुन्हा एकदा मॅन्युअल  रेफर केलं . डिपार्टमेंटच्या  सिस्टीम मध्ये ऑर्डर  हिस्टरी  ओपन केली.   टेल्कोच्या जॉब साथी जे रॉ   मटे रियल लागणार होतं तशा प्रकारचं  मटेरियल  पुरवणारे  तीन  रेग्युलर सप्लायर्स सापडले.  त्यांच्या जोडीला  गुगलवर  सर्च  करून  किर्लोस्कर,   जेके मशिन टूल्स ,  कासवट  हे  तीन  रेप्युटेड लोकल   सप्लायर्स  निवडले . सर्वाना काँटॅक्ट करून  रिक्वायरमेंटचे तपशील  देवून  टेंडर्स नी  सँपल  मागवली. एवढी मोठी ऑर्डर पदरात पाडून घेण्यासाठी  सगळ्यानी काय काय  ऑफर्स दिल्या. वाजवी दर आणि  सँपलची क्वालिटी  याचा विचार करूनच  ऑर्डर मिळेल , आपल्याला एक रुपयाही  कमिशन किंवा गिफ्ट नको असं निक्षून बजावलं. मात्र किर्लोस्कर कडूनअशी काही ऑफर आली  नाहे.  रेग्युलर सप्लायर्स नी   पूर्वानुभव गृहित धरून रेट  सांगितले.  नवीन सप्लायर्सनी  मात्र  रागरंग रिनाऊण्ड  कंपनीशी  रिलेशन्स डेव्हलप व्हावी  म्हणून वाजवी दर  सांगितले  .  जुने आणि  नवे  सप्लायर्स  यांच्या रेट मध्ये खूपच तफावत होती. दिलिपने सर्वांची   सँपल्स कंपनीच्या  क़्वालिटी कंट्रोलसेल कडे चेक करायला दिली.  रेग्युलर पैकी  एक नी  तीन्ही नवीन  सप्लायर्स ची सँपल  क्वॎलिटी सेलने  सर्टिफाय केली.  दिलिपने नवीन सप्लायर्स पैकी किर्लोस्करआणि जे.के. यांचे  रेट सेम होते म्हणून दोघाना   ऑर्डर विभागून दिली. रेग्युलर सप्लायर्स चे  लागेबांधे होते.  ती एक चेनच होती.  मोठी ऑर्डर असली  की  सुपरीटेंडण्ट खन्ना  , हेड अकौंटंट बारगीर  आणि असोशिएट मॅनेजर राव  साहेब कुणीतरी   पर्चेसिंग ऑफिसरशी   संगनमत करून घपला  करीत असत. कोणताही  पर्चेसिंग ऑफिसर कंपनीमॅन्युअल  न वाचता    अकौण्ट सेक्शनला किंवा   डिमांड नोट देणा-या  सेलला च विचारित असे.मग  अमूक सप्लायर अमूक पर्सेण्ट  कमिशन देतो, अशी टीपही  द्यायचा  नी  त्याच्याकडे  आगावू संधान साधून  कोणालाही कळू न देता हात धुवून मोकळा व्हायचा.   
            दिलिपने मॅन्युअल चा  अभ्यास करून  कोणाचाही सल्लॎ न घेता   संबंधिताना    सँक्शन ऑर्डर काढल्या.  काऊंटर साईन साठी  फोलिओ  राव साहेबांकडे   गेल्यावर   त्यानी  दिलिपला बोलावून घेतलं.  एवढी मोठी ऑर्डर  द्यायची तर कंपनी प्रोसिजर फ़ोलो करायला हवं .  टेल्को सारख्या रिनाऊण्ड  क्लायण्टशी   गाठ आहे. ते लोकं रॉ  मटेरियलच्या क्वालिटी बद्दलही  कीन असतात. उद्या क्वालिटीचं  रिझन देवून  त्यानी जॉब रिजेक्ट केला  तर तुझ्यावर ब्लंट येईल अशी  भीती  दाखवली. दिलिपने शांतपणे कंपनी  मॅन्युअल प्रमाणे   प्रोसिजर   सांगितलं .  निवडलेल्या दोन्ही सप्लायर्स ची  हिस्टरी नी  रेप्युटेशन  चेक केल्याचंही बोलला.  मग  रेग्युलर सप्लायर्स ना  कां  डावललं    असाही आक्षेप  त्यानी  घेतला. त्यांचे रेट  जास्तआहेत नी त्यानेआपल्याला   कमिशनची ऑफर दिल्याचं  तो बोलला.  पण  ती  प्रत्येक सप्लायर ची ट्रेड पॉलिसीच असते,रिलेशन्स  डेव्हलप करण्यासाठी  अशा गिफ्ट देणं   ही कॉमन  फॅक्ट आहे, ही काही ब्राईब नव्हे. दोन्ही सप्लायर्सची  सोनी सरांशीही  रिलेशन्स आहेत. पहिजे तर मी त्याना बोलावून घेतो. त्याना रेट अॅडजस्ट करायला सांगूया ......  त्यानी अशी सजेशन  केल्यावर  अत्यंत  विनम्रतेने  तो म्हणाला, “सर ,  मी आणखी  काही  एक्स्प्लनेशन  देऊ  इच्छित नाही,  तुमची सँक्शननोट मी फॉलो करीन .”  हा  इंजिनीअर  टॅलण्ट  आणि   स्ट्रेट फॉर्वर्ड ही आहे  ,   हा  कसाही बधणार नाही  हे त्यानी ऑळखलं  .   प्रॉपर रेट  ची  ऑर्डर  देवून हा इतरांचेही मार्ग बंद  करू  पहातोय.... ये घाटी लोग साले ऐसेही स्टबर्नहोते है .... इन्हे रास्तेसे हटानाही  पडता है , असं मनोमन ठरवून,   काऊंटर साईन  करून   फोलिओ त्याच्याकडे सरकवला.   
         फर्म मधल्या  अडिजशे  वर्कर्स साठी  युनिफॉर्म्स , मशिन टूल्स , स्टेशनरी   आणि  पॅकिंग   मटेरियल  अशा   मोठ्या रिक्वायर मेंटस्  गेले पंधरा वीस दिवस  पडून राहिलेल्या  होत्या,  त्यांचा कम्प्लायन्स त्याने   करायला घेतला.   अकरा वाजता इंटरकॉमचा  बझर वाजला.  सुपरिटेण्डण्ट खन्नासरां चा कॉल होता.  युनिफॉर्म्सची ऑर्डर  कंपनीचे  नेहेमीचे सप्लायर   लामोण्ड  गार्मेंट यानाच  द्यायला हवी  गेली  दहा वर्ष  तेच  युनिफॉर्म सप्लाय  करतात  आणि त्यांची सिल्वराज साहेबांशी  रिलेशन्स आहेत. असा साहेबांचा  निरोप सांगून नवीन सप्लायर्सना  दिलेली ऑर्डर  कॅन्सल करून  लामोण्डला द्यायची    द्यायची  गळ  घातली. आपण  वर्क प्रोसिजर प्रमाणे पर्चेस करू, रिलेशन्स  जपण्यापेक्षा रेट आणि क्वालिटी  महत्वाची आहे. म्हणूनच दिलेली  ऑर्डरही कॅन्सल  होणार नाही ,  सरानी  लेखी ऑर्डर दिली  तर आपण  जरूर  फॉलो  करू  असं दिलिपने  उत्तर दिलं. “आय डोण्ट हॅव एनी ऑब्जेक्शन,  यू आर फ्री  तू टेक  डिसिजन्स अॅज यू विश,  आय् जस्ट कनव्हेड मेसेज ऑफ  रेस्पेक्टेड  एम. डी. सर.”असं सांगून  त्यानी  रिसीव्हर ठेवला. दिलिप  बाहेर पडला  तेंव्हा  मुरुगन समोरच होता. दोघेही  कॉफी प्यायला गेले. कॉफी पिताना  त्याने ही गोष्ट  मुरुगनला सांगितली .   त्याने ही   “  डोण्ट   बॉदर , माय फ्रेण्ड  . डोण्ट सरेण्डर बिफोर  देम.”असाच सल्ला  दिला.      आपल्या  शिरस्त्या प्रमाणे  लामोण्ड  गार्मेंट सोबत बिन्नी,  रेमंड   असे  स्टॅण्डर्ड  गार्मेण्ट सप्लायर्स  आणि  पुण्यातल्या नामांकित टेलरिंग फर्म्स शी  कॉण्टॅक्ट करून ताबडतोब रेट  नी  सम्पल्स  पाठवायला  सांगितली.  लामोण्डशी  कॉन्टॅक्ट केल्यावर  त्यांचा   मॅ नेजर  म्हणाला , “आपण  कोण बोलताय सर?  मी गेली दहा वर्षं  फर्मच्या युनिफॉम्सचं कॉण्ट्रॅक्ट  घेतोय.   सोनी  सराना  विचारा हवं तर. .....  मेजर्स घ्यायला  टीम कधी पाठवू  तेवढं सांगा.” त्यावर  “ तुम्हाला  कॉण्ट्रॅक्ट  घ्यायचं  असेल  तर आज संध्याकाळ पर्यंत  ग़ार्मेंट सँपल्स   नी  रेट पाठवा. ” असं सांगून त्याने फोन ठे वला. 
           लामोंड च्या मालकाने  फर्म मध्ये  फोन लावला , सोनी सर  नाहीत हे कळल्यावर  मात्र तासाभरातच  गार्मेंटची सँपल्स  नी  रेट  चार्ट  पाठवून दिला.     नवीन गार्मेण्ट  सप्लायर्स  नी  टेलरिंग  फर्म्सचे  रिप्रेझेण्टिटिव्ह  एक एक करून  लेटर नी सॅम्पल  घेवून समक्ष भेटून गेले.  कारण  अशा मोठ्या  डिल मध्ये   पर्सेण्टेज  बेसिसवर  कमिशनची   डिमाण्ड असते. मात्र  या वेळचा अनुभव वेगळा होता.  दिलिपशी बोलल्यावर आलेले  एजंट  मालकाला कॉल करून  या गोष्टीची कल्पना  देत नी मग रेट च्या फिगर्स  टाकून  पत्रं देत. त्याने प्रोसिजर प्रमाणे  सॅम्पल्स  क्वालिटी  कंट्रोल सेल कडे दिली. मशिन टूल्स , स्टेशनरी   आणि  पॅकिंग   मटेरियल  यांचीही  सॅम्पल्स  आणि  रेट मागवले.  दुस-या  दिवशी क्वालिटी  कंट्रोल सेल कडून  रिपोर्टस् आले.  युनिफॉर्म्स ची टेण्डर्स  गार्मेण्ट सप्लायर्स आणि  टेलरिंग फर्मना   स्वतंत्रपणे  दिलेली असल्यामूळे  लामोण्डचे  रेट  पर आयटम चारशे रुपयानी  जादा होते. त्याने दहा वर्षाची पर्चेस रेकोर्ड पाहिली तर  रेट मध्ये दर वर्षी  वीस टक्के वाढ  केलेली  असे.  गेली दोन तीन वर्ष तर  त्यानी गार्मेण्टचा ब्रॅण्ड  ही  डिस्क्लोज  केलेला  नव्हता.  या वेळी ही  त्यानी  गार्मेण्ट ऑफ स्टॅण्डर्ड  ब्रॅण्ड  असा मोघम उल्लेख केलेला  होता. पूर्ण विचार करून दिलिपने रेमण्ड गार्मेण्ट सप्लायर  आणि   रायझिंग स्टार टेलरिंग  फर्म  सिलेक्ट करून  त्याना  ऑर्डर कन्फर्मेशन लेटर्स  रवाना केली.               
              चार दिवसानी  साहेब  आले   आणि   नवीन  मशिन्स पण  आली.   जुनी  मशिन्स   काढून त्या जागी  ही  नवीन  मशिन्स  बसवायचं काम युद्धा पातळीवर  सुरु होतं. साहेब त्या गडबडीत असतानाच  टेलरिंग फर्म ची टीम येवून युनिफॉर्म्स ची  मेजर्स  घेवून गेली. पण पूर्वीच्या सप्लायर ऐवजी  नवीन सप्लायरला  काँट्रॅक्ट दिलेलं  आहे ही बाब  सोनी साहेबांपर्यंत  पोचली नाही.  तिवारी प्रॉडक्शनला आला नी   वर्कर्सचे   परत ‘मागचे पाढे पंचावन्न’ सुरु झाले.  तिवारी  वर्कर्स  काय करतात ते ढुंकूनही  पहात नसे त्यामूळे ते ही पाट्या टाकायला  लागले. ट्रेनिंगला गेलेली टीम परत आली. पाच निवडक  वर्कर्सचं  ट्रेनिंग सुरु झालं. दहा बारा दिवसानी   त्यानी   जॉब  बनवणं  सुरु केलं.  पूर्वी  तीन मशिन्स वर  फिरून  जॉब बनायचा .  तेव्हा जेवढा वेळ मोडे  त्यात नवीन मशिन  फारसा फरक  पडला नाही. एकदा  ड्रॉईंग फीड  करून रॉ  मटे रियल सेट केलं  की जॉब  पुरा होईतो  फक्त लक्ष ठेवून राहिलं  कि  सगळ्या प्रोसेस  प्रोग्रेमिंगप्रमाणे  होत रहायच्या .  पण लेबर मखलाशी करीत.  मशिन सुरु  ठेवून प्रोग्रॅ मिंग  पॉज घेत.  त्यांच्यावर सुपरव्हिजन  नव्हतं.  महिनाभरात पूर्वी  स्टेबल झालेला प्रॉडक्शन रेट  आता खाली आला. टेक्निशियन्सचा हात बसला की प्रॉडक्शन वाढेल ,  नवीन  मशिन्स बसविण्या साठी   जुनी   मशिन्स  रिप्लेस केली  त्याचा ही  परिणाम  होतोय असं समर्थन  सोनी साहेब करीत  राहिले. 
                 कोईमतूरच्या   हेड  ब्रँचमध्ये  संपूर्ण  जुनी मशिनरी  बदलून  काँम्प्युटरईज्ड  युनिट  बसवायचा मॅनेजमेंटचा  डिसिजन झाला  होता.  मॉडिफिकेशन  अर्थातच सोनी साहेबांच्या  देखरेखी खालीच करायचं होतं  म्हणून  मॅनेजमेंटने त्याना  कोईमतूरला    बोलावून घेतलं. आता तो  प्रोजेक्ट  पूर्ण होईपर्यंत महिना दीड महिना  सोनी साहेब तिथेच तळ ठोकून  रहायचे होते.  टेलरिंग  फर्मने  कॉन्ट्रॅक्ट कण्डिशन  प्रमाणे वीस दिवसानी  युनिफॉर्म चा  पहिला  लॉट  डिस्पॅच  केला.गार्मेण्ट आणि  स्टिचींग  दोन्ही ची  क्वालिटी   कसोशीने राखलेली असल्यामूळे  कसलाही  इश्श्यू  झाला नाही. या  महिन्यातही  प्रॉडक्शनची परिस्थिती फारशी सुधारली  नाहीच  मॅन्युअल  जॉब नी अॅटोमेटिक जॉब  यात  पाच दहा मिनिटं एवढा  नगण्य फरक  असायचा. प्रॉडक्शन  रेट  पंचवीस टक्के कमी झाला होता.  पण सोनी साहेब ब्रँचमध्ये जॉईन होईपर्यंत या गोष्टीची कोणीच फिकिर करणार नव्हतं. कोईमतूरला  युनिट बसवून झाली नी  सी.एम. जयललितां च्या हस्ते  उद् घाटन  ठरलं...  दरम्याने चार दिवस सवड  होती म्हणून  सोनीसर पुण्याला हजर झालेले.                                                                                                 
                       सुपरिटेंडंट  खन्ना साहेब  केबिनमध्ये आले. फोलिओ  उघडून  साहेबांच्या  सहीसाठी समोर ठेवल्यावर  युनिफॉर्मची   ऑर्डर लामोण्ड ऐवजी  नवीन टेलरिंग फर्मला दिल्याची खबर त्यानी सराना दिली.  तसेच  दिलिप  ने  सगळ्याच  रेग्युलर सप्लायर्स  ऐवजी  नवीन सप्लायर्सना  ऑर्डरी द्यायचा  सपाटा  कसा  चालवलेला आहे  याचीही तपशिलवार माहिती  देवून सह्यांचा फोलिओ  घेवून  ते बाहेर पडले.  सोनी सर चांगलेच  गरम झालेले. युनिफॉर्मच्या   ऑर्डरमध्ये 10 ते 15 %   सराना  मिळायचे. मग त्यानी अकौटण्ट , असोशिएट  डायरेक्टर  याना बोलावून दीड दोन महिन्यातला पर्चेसिंगचा तपशिल  पाहिला.  योग्य  प्रोसिजर  फॉलो केल्यामूळे त्यात आक्षेप घेता येणारा  नव्हता. पूर्वीच्या तुलनेत रेट ही कमी होते.  केलेल्या खरेदीमध्ये  दर्जाच्या बाबतही  दोष द्यायचा तरी  ते सिद्ध करणंही अवघडच होतं. मात्र हे असं चालू देणं   म्हणजे सर्वांचेच मार्ग बंद  करण्यासारखं  होतं. कंपनी त वरच्या स्तरावरही  या बाबींचा  बभ्रा झाला असता.युनिफॉर्मची खरेदी तर  चटकन लक्षॎत येणारी .
                 असला अस्तनीतला निखारा  संधी साधून विझवलाच पाहिजे याबद्दल दुमत नव्हतं. मात्र  तशी संधी येईतो  किमान युनिफॉर्मची  पावती  तरी  वाढवून घ्यायला हवी  नी त्यासाठी दिलिपलाच  चुचकारून  हाताशी धरायला  हवा होता.मग सोनी सरानी  दिलिपला बोलावून  त्याला चांगला  फायर केला. आपण  योग्य निर्णय घेतले असून  कंपनीचा  आर्थिक फायदा कसा करून दिला  हे त्याने साधार पटवून  द्यायचा  प्रयत्न केला. युनिफॉर्म, स्टेशनरी  यांच्या क्वॎलिटी   बद्दल  तक्रारी  आहेत, तसेच काहीजुन्या सप्लायर्सची  मॅनेजमेण्टशी  रिलेशन्स आहेत  ही बाब   त्याचं  करियर धोक्यात आणू शकते  असाही  दम त्यानी भरला.  तासाभरातच दिलिपने  रिझायनिंग  लेटर  सबमिट केलं. तो  स्वत:   कटत  होता  हेएका अर्थी  चांगलंच  आहे असं सोनी  सराना वाटलं.  पण  युनिफॉर्मची  रिसिट मॅनेज केल्यानंतर ...... तो पर्यंत  तो रहायलाच हवा होता .  दिलिप  गेला असता  तरी  ऑर्डर देवून झालेली होती नी  एव्हिडन्स राहणारच   होता. म्हणून त्यानी  जोशीनी  मध्यस्ती करून  रिझाईन मागे घेवून  त्या बदल्यात  लो बजेट ऑर्डर ची  रिसिट  दर वाढवून   नव्याने घ्यावी,  असा सौदा  करायची   गळ घातली .     
                                                                                                                                                                
                     दिलिपचं सगळं  बोलणं ऐकल्यावर साहेबानी दिलेली ऑफर  उच्चारायचीही    जोशीना  लाज वाटू लाग़ली. नाईलाजाने   त्यानी  सगळा विषय  दिलिपला सांगितला.   एवढ्या मोठ्या पदावर  असलेल्या   माणसाशी पंगा घेणं धोक्याचं आहे . इतपत सावधगिरीची सुचना देवून जोशीनी आवरतं घेतलं. “हे बघ ,   परिस्थिती वश  प्रवाह पतित होणं   भाग आहे.  मात्र  त्यासाठी  वाम मार्गाचा  अवलंब  करणं  हे ही अयोग्यच.  मंजूर  केलेली रिसिट  रद्द  करून  जादा  रक्कमेची   रिसिट    देणं  म्हणजे आपल्यॎ विरूद्धचा  पुरावाच आयता त्याना दिल्यासारखं  आहे.त्या पेक्षा  तू  घेतलाहेस  तोच निर्णय  मला  योग्य वाटतो. पण  आत्ता हातची नोकरी  गमावून कसं चालेल.”    असं सांगून  जोशीनी साहेबानी रिजेक्ट केलेलं  रिझायनिंग लेटर त्याच्या कडे दिलं.  “काका , तुम्ही  काही काळजी करू  नका. माझा वार वर्मी  बसलेला आहे.  इत:पर    दैवाने  साथ दिली तर  चोराना  अद्दल  घडेल ...  मात्र  प्राप्त परिस्थितीत  माझा कंपनीतला  शेर संपला  एवढं   नक्की.   मी  दुस-या  जॉब च्या  शोधात  आहे.नशिबात असेल ते होईल. मी दिलेला राजिनामा  आता परत घेणार  नाही त्यामूळे  कसली   तडजोड करायचा प्रश्नच  नाही ” असं सांगून दिलिप  उठला.  
                 दुस-या  दिवशी  सकाळीच  आंघोळ वगैरे उरकून  त्याने  कात्रजला  बहिणीचं   बि-हाड  गाठलं. त्याचे  मेव्हणे प्रमोदराव  विप्रोमध्ये  इंटर्नल  ऑडिटर  च्या पोस्टवर होते.  चहापाणी  झाल्यावर त्याने  सगळी  घटना  मेव्हण्याना सांगितली. त्याने  घेतलेला  निर्णय  योग्य आहे असं सांगून  कुठे ना कुठे  जॉब नक्की मिळेल,  आता तीन वर्षांचा अनुभव गाठीला  आहे, दोन तीन दिवस इथेच  आराम कर , तुझा  रिझ्यूम  देऊन  ठेव. संध्याकाळी  बाहेर  जेवायला  जावूया . ”  असं सांगून  ते ऑफिसला जायच्या तयारीला लागले . संध्याकाळी  आल्यावर   दिलिपला पुन्हा जॉब  मिळेपर्यंत   कॉट  बेसिस्वर भाडं  भरीत राहण्या पेक्षा   आपल्या सोबतच रायची गळ घतली.   अडिच  महिने  कालावधि  लोटला.  मात्र    बहिणीने  आणि  प्रमोदरावानी  या काळात  त्याच्या श्रद्धा   नी  तत्वनिष्ठा  यांच कौतुक  करीत  त्याचं  मनोधैर्य  शाबूत राखण्याचं  महत्वाचं  काम केलं. जॉब टिकवण्यासाठी  भ्रष्टाचा-यां बरोबर शेण खात न राहता तो   बाहेर पडला याचा आपल्याला अभिमान आहे, असं ते  कायम  सांगायचे.  अडीज महिन्यानंतर  मात्र कोंडी  फुटली.  दोन तीन वर्षांपूर्वी   हिंजवडीला    सुरु   झालेल्या  एका   फर्म  मधून   ऑफर आली. दिलिप  एम डी ना  समक्ष भेटायला  गेला.  कंपनी नव्याने सुरु झालेली  तरीही सॅलरी  पूर्वीपेक्षा  पाच हजार  अधिक मिळणार     होती.  दिलिपने  होकार दिल्यावर  चार  दिवसानी अपॉइंटमेंट लेटर  देतो असं  एम डी म्हणाले.  दिलिप    हवेत तरंगत   घरी पोचला.   संध्याकाळी   प्रमोदरावांशी   गप्पा  सुरु  असताना अकस्मात   जोशी  काकांचा  कॉल आला. 
                    काही  महत्वाचं बोलण करण्यासाठी  जोशी ना    त्याची  समक्ष  भेटच हवी होती.  प्रमोदरावांना  सोबत घेवूनच  दिलिपने जोशींचं फेव्हरिट ठिकाण    ‘राजदीप बार’   गाठलं.   बसल्या  बसल्या जोशी म्हणाले, “यावेळी  खुद्द  नागराज  सरांची ऑफर मी  देणार आहे.   मागच्या वेळी   सोनी सरानी  बील स्पॉन्सर केल  होतं.....  नागराज सरानी मात्र तसं काहीच बजेट  दिलेलं नाही....पण  डील  तुझ्या फायद्याचं आहे  .....  तू  बील पेड करायला  हरकत नाही. तुला मान्य नसेल  तर मात्र  बटालियन कॉण्ट्रिब्युशन  करूया !”   त्यावर  “मला  हिंजवडीला   फर्म मध्ये पूर्वीपेक्षा  पाच हजार जादा सॅलरीवरऑफर आहे  , तेंव्हा  आजची पार्टी माझ्यातर्फे ” दिलिपने डिक्लेअर केलं नी  तिघेही खो खो हसू लागले. जोशी नी जे सांगितलं  ते ऐकल्यावर  दिलिपला  फार आश्चर्य वाटलं. 
                       सोनी साहेब , खन्ना , राव आणि  बारगीर  संगनमताने  करप्शन  करतात अशी  इन्फर्मेशन  मॅनेजमेण्टला  मिळालेली होती.  डिझायनिंगला   हेड ऑफिस वरून पाठवलेला मुरुगन हा  नागराज यांनी  खास हस्तक पाठवलेला. फर्ममध्ये घडणा-या  घटनांवर बारकाईने  लक्ष ठेवून  त्याने मॅनेजमेण्ट कडे  रिपोर्टिंग केलं. चार दिवसांपूर्वी  अकस्मात  मॅनेजिंग डायरेक्टर नागराज,  टी. सिल्वराज,  लिगल अॅडवायझर  अॅडव्होकेट स्वामी   आणि  मेन  ऑफिसचे  इंटर्नल ऑडिटर  केतन घाग  अशी  चौघांची टीम दाखल  झाली. पाच सहा महिन्यात  घडलेल्या  सगळ्या  घटनांच फॅक्ट फायंडिंग  करून   झाल्यावर  पुढे नेमकं काय घडलं हे  तपशीलवार   कोणालाच  कळलं  नाही पण   सोनी, खन्ना ,राव,बारगीर आणि   त्यांचे पित्त्ये  तिवारी,   पाळ,  चोपडा, पांडे    दोन दिवसात  रिझाईन करून कंपनी सोडून निघून गेले. असा  धक्कादायक  रिपोर्ट देऊन जोशी काका म्हणाले, “  उद्या  नागराज आणि सिल्वराज साहेबानी तुला भेटायला बोलावलेलं आहे.  मला  अचूक  सांगता येणार नाही  पण  तुझ्यासाठी  कंपनी काहीतरी खास ऑफर देणार हे नक्की. सोनी  सरांची  कृष्णकृत्यं  उघडकिला  आलियत  नी  तुला कंपनीतजॉ ईन  करून घेणार  असं  देवेकरही  म्हणाले मला.  उद्या अकरा वाजता  तुला सरांची भेट घ्यायचं  निमंत्रण द्यायला  मी  तुझी खास  भेट  घेतोय.”   जोशी काकानी  दिलेली माहिती एवढी धक्कादायक  होती की,  दिलिप नी प्रमोदराव अक्षरश: सुन्न झाले.   
                    दुसरे दिवशी  प्रमोदरावाना सोबत  घेऊनच दिलिप मॅनेजिंग डायरेक्टरना  भेटला. दोघेही  केबिनमध्ये  गेल्यावर दिलिपने प्रमोदरावांची  ओळख़ करून दिली. तिथे  नागराज नी  सिल्वराज दोघेच उपस्थित होते.  सिल्वराज बोलू  लागले,  “इन्व्हेस्टीगेशन टीम    ऑफ अवर  कंपनी  हस ग़ॉन थ्रू  इन्सिडेण्टस हॅपण्ड  विदिन लास्ट  सिक्स मंथ्स. युवर कॉण्ट्रिब्युशन  ड्युरिंग  दिस पिरियड इज  रेण्डर्ड बाय मॅनेजमेण्ट.  यू  हॅव  प्रूव्हड्  युवर  वर्क स्ट्रॅटेजी बाय इंप्रुव्हिंग अॅण्ड  मेण्टेनिंग  प्रॉदक्टशन रेट. वी  हॅव कम टू नो दॅट  कॉम्प्युटराईज्ड  मशिन सिस्टम टू   वॉज युवर  रेकमेंडेशन दॅट  वाज हायजॅक्ड बाय मिस्टर सोनी. पर्चेसिंग मेड बाय यू  इज द  चिपेस्ट  अॅण्ड  स्टॅण्डर्ड . वी  हॅव  मार्कड् युवर ऑनेस्टी ,   सो वी कॉर्डिअली इन्व्हाईट  यू  टू  रिजॉईन अवर फर्म!  यू  हॅव सफर्ड   मच  फॉर लॎस्ट टू  अॅण्ड हाफ़  मन्थ्स. वी विल कॉम्पेनसेट  बाय  पेईंग  यू  अॅट  द   डबल रेट  फॉर दिस पिरियड.   लेट मी नो व्हेदर यू आर विलिंग.”
                हे  सगळं  एवढं  अनपेक्षित घडलं  की ,  दिलिपला काय बोलावं ते सुचेच ना.  प्रमोदराव अनुभवातून  गेलेले  , क्षणाचाही विलंब न लावता ते म्हणाले, “इटस् हिज प्लेझर,  ही  इज  अॅस्टॉ निश्ड   नाऊ,  बट  आय  प्रॉमिस यू सर ऑन हिज   बिहाफ . हे हॅज अॅक्सेप्टेड  युवर ऑफर  फ्रॉम  दिस  वेरी  मोमेंट सर.”  मग  त्याने जॉब रिझाईन केल्या पासून तो  काल  आलेल्या हिंजवडीच्या ऑफरची माहिती ही त्यानी सांगितली. “ओ  यू   नॉटी बॉय,हौ  यू डेअर्ड  टू  रन अवे  फ्रॉम पीच ....... ?”  नागराज म्हणाले, “ वी ब हॅव कॉट  यू इन टाईम,   यू आर गो ईंग टू बी  प्रमोटेड अॅज  द  मॅनेजिंग डायरेक्टर   ऑफ दिस  फर्म......! ”       
                                                                                           **************