Tisara Majala Mrutyucha - 2 in Marathi Short Stories by Neel Mukadam books and stories PDF | तिसरा मजला मृत्यूचा - भाग 2

Featured Books
  • નિતુ - પ્રકરણ 52

    નિતુ : ૫૨ (ધ ગેમ ઇજ ઓન)નિતુ અને કરુણા બંને મળેલા છે કે નહિ એ...

  • ભીતરમન - 57

    પૂજાની વાત સાંભળીને ત્યાં ઉપસ્થિત બધા જ લોકોએ તાળીઓના ગગડાટથ...

  • વિશ્વની ઉત્તમ પ્રેતકથાઓ

    બ્રિટનના એક ગ્રાઉન્ડમાં પ્રતિવર્ષ મૃત સૈનિકો પ્રેત રૂપે પ્રક...

  • ઈર્ષા

    ईर्ष्यी   घृणि  न  संतुष्टः  क्रोधिनो  नित्यशङ्कितः  | परभाग...

  • સિટાડેલ : હની બની

    સિટાડેલ : હની બની- રાકેશ ઠક્કર         નિર્દેશક રાજ એન્ડ ડિક...

Categories
Share

तिसरा मजला मृत्यूचा - भाग 2

 

शिवशंकर पॅलेस इमारतीतील आमच्या ऑफिसवर दुःखाची छटा पसरली होती. वातावरणात एक प्रकारचे भय आणि निराशा जाणवत होती. ऑफिसातील प्रत्येक जण श्रीधरच्या गंभीर अवस्थेबद्दल चर्चा करत होता.

इकडे पालनपूरचे जिल्हाधिकारी सातपाल आपल्या केबिनमध्ये चहा पीत बसले होते. आज त्यांच्या मनात आपल्या काही महत्त्वाच्या कामांचे विचार घोळत होते. तेवढ्यात त्यांच्या मागे त्यांचा पी. ए. जय एक देशभक्तीपर गाणे गात आला व सातपाल साहेबांची केबिन पुसायला लागला.

सातपालसाहेब जयशी गप्पा मारत होते तेवढ्यात त्यांना एक फोन आला. साहेब, शिवशंकर पॅलेसमधील एका कर्मचाऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे. सातपाल म्हणाले, “काय??.. शिवशंकर पॅलेस इमारतीमध्ये माझा भाऊ श्रीधर काम करतो. त्याला नाही ना झाली आहे दुखापत?” फोनवरचा माणूस काही बोलला नाही आणि फोन कट झाला.

सातपाल साहेबांनी गाणे गुणगुणणाऱ्या जयकडे पाहिले व त्याला तसेच ठेवून ते केबिन मधून बाहेर गेले.

जय आपल्याच नशेत गाणे गुणगुणत होता, “हमको जीते जी मारके क्यों रोने लगे तुम, दिल की साझा करके बाते, क्यों ना तुमको याद आये हम”. जरा वेळाने त्याच्या लक्षात आलं की सातपाल साहेब बाहेर गेले आहेत आणि तोही केबिनच्या बाहेर गेला.

आमच्या ऑफिसमध्ये सातपाल साहेबांचा भाऊ श्रीधर गंभीररित्या जखमी झाला होता, आणि सातपाल साहेब आमच्या ऑफिसच्या मॅनेजरला, रामनाथला जोरजोरात ओरडत होते.

"माझा भाऊ कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहे?" सातपाल साहेब ओरडले. त्यांच्या आवाजातून आपल्या भावाविषयी वाटणारी चिंता आणि आमच्यावरचा राग स्पष्ट व्यक्त होता.

एक कर्मचारी धावत आला आणि घाबरत म्हणाला, "तो ‘आय’ हॉस्पिटलमध्ये ICU मध्ये आहे, साहेब. त्याची परिस्थिती खूपच गंभीर आहे”.

सातपाल साहेबांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. त्यांचे डोळे लाल झाले होते, आणि त्यांच्या मनात शेकडो विचार एकाच वेळी येत होते. त्यांनी काही क्षण थांबून खोल श्वास घेतला आणि तात्काळ हॉस्पिटलला निघाले.

रस्त्यात त्यांना श्रीधरसोबत घडलेल्या घटनेचे विचार सतावत होते. श्रीधरने तिसऱ्या मजल्यावर काय पाहिले असेल? कोणत्या गोष्टीने त्याला इतके घाबरवून सोडले असेल? त्या तिसऱ्या मजल्यावर खरंच काहीतरी भयावह आहे का? या प्रश्नांची उत्तरं त्यांच्या मनात घोळत होती.

सातपाल साहेब ‘आय’ हॉस्पिटलमध्ये पोहोचले. तिथे पोहोचताच त्यांनी तेथील डॉक्टर्सना श्रीधरची स्थिती विचारली. डॉक्टरांनी गंभीर चेहऱ्याने सांगितले, "सातपाल साहेब, श्रीधरची स्थिती खूपच गंभीर आहे. त्याला शारीरिक जखमा कमी, पण मानसिक धक्का जास्त बसलेला दिसतो आहे. त्याचे मन स्थिर नाही, आणि तो सतत काहीतरी पुटपुटतो आहे."

सातपाल साहेबांनी ICU च्या खिडकीतून श्रीधरला पाहिलं. श्रीधर अर्धवट शुद्धीत काहीतरी बोलत होता. त्याच्या चेहऱ्यावर भय स्पष्ट दिसत होतं. तो सतत एकच वाक्य बोलत होता, "ती... ती येईल..." सातपाल साहेबांनी त्याच्या जवळ जाऊन विचारलं, "श्रीधर, कोण येईल? काय झालं तिसऱ्या मजल्यावर?"

श्रीधरने फक्त एकच उत्तर दिलं, "ती... भूत..." आणि थरथर कापू लागला. सातपाल साहेबांचा चेहरा पांढराफटक झाला. त्यांनी डॉक्टरांकडे वळून विचारलं, "आता काय करायचं?"

डॉक्टरांनी उत्तर दिलं, "आम्ही आमच्या परीने प्रयत्न करत आहोत. पण श्रीधरला जो मानसिक धक्का बसला आहे, त्यासाठी मानसिक उपचारांची गरज आहे."

सातपाल साहेबांच्या मनात एकच विचार घोळत होता. तिसऱ्या मजल्यावरील भूताच्या कहाणीचा सत्यतेशी संबंध आहे का? जर आहे, तर त्याच्या रहस्याचा उलगडा कसा करायचा? या प्रश्नांची उत्तरं शोधण्याची त्यांना आता तीव्र आवश्यकता वाटत होती.

पुढील भागात वाचा --------

श्रीधरवर झालेल्या हल्ल्यानंतर सर्वजण भयभीत झाले होते. ऑफिसमध्ये एक प्रकारची चिंता आणि भीतीची लाट पसरली होती. प्रत्येक जण मनातल्या मनात तिसऱ्या मजल्याविषयी विचार करत होता, पण कोणीही त्यावर उघडपणे बोलण्याचं धाडस करत नव्हतं.

लवकरच येत आहे कथेचा पुढील भाग

रामनाथने आम्हाला तिसऱ्या मजल्यावर जाण्याची सक्त मनाई केली होती. "कुणीही तिसऱ्या मजल्यावर जाणार नाही," रामनाथने कडक आवाजात सांगितलं होतं. त्याचा आवाज त्याच्या मनातल्या भीतीचं प्रतिबिंब होता. पण जितकी मनाई केली जात होती, तितकीच आमची उत्सुकता वाढत होती.