The story of the human stomach in Marathi Children Stories by Balkrishna Rane books and stories PDF | कथा मानवी जठराची

Featured Books
  • એઠો ગોળ

    એઠો ગોળ धेनुं धीराः सूनृतां वाचमाहुः, यथा धेनु सहस्त्रेषु वत...

  • પહેલી નજર નો પ્રેમ!!

    સવાર નો સમય! જે.કે. માર્ટસવાર નો સમય હોવા થી માર્ટ માં ગણતરી...

  • એક મર્ડર

    'ઓગણીસ તારીખે તારી અને આકાશની વચ્ચે રાણકી વાવમાં ઝઘડો થય...

  • વિશ્વનાં ખતરનાક આદમખોર

     આમ તો વિશ્વમાં સૌથી ખતરનાક પ્રાણી જો કોઇ હોય તો તે માનવી જ...

  • રડવું

             *“રડવુ પડે તો એક ઈશ્વર પાસે રડજો...             ”*જ...

Categories
Share

कथा मानवी जठराची

कथा मानवी जठराची
हर्ष सकाळी उठला तो पोट धरुन व तोंड वेडेवाकडे करतच.
"असं तोंड वेडेवाकडे का करतोस?" आईने विचारले.
" पोटात प्रचंड दुखतेय. काहीतरी औषध दे.आई..आई..ग्..." हर्ष वेदनेने कळवळत म्हणाला.
"काल गौरीच्या वाढदिवसाला मिळेल ते हादडल असणार. खाताना जरा विचार करून खायचं ना!"
आई वैतागली
" खाताना कोण विचार करत काय?"
हर्ष रडकुंडीला आला होता.पोट धरून गडाबडा लोळाव असं त्याला वाटत होतं.
आईने घरातून गुळ चिंच आणून दिली.
" छी..छी...हे खायचं?"
" गुपचूप खा...पोट दुखायचे थांबेल... नाहीतर बाबा आल्यावर डाॅक्टरांकडे जावं लागेल."
हर्षने नाईलाजाने गूळ व चिंच खाल्ली. त्यावर थोड पाणी पिल्यावर त्याला बरं वाटलं.
अरे यार, हे पोट नसतं तर किती बरं झालं असतं! पोटदुखी, पोटफुगी,मळमळणे,उलट्या असली झंझटच राहीली नसती.
" आधी पोटोबा...मग विठोबा, कशासाठी.. पोटासाठी, पापी पेट का सवाल है, गोगलगाय पोटात पाय, असले वाक्य प्रचार मराठीत आलेच नसते. हर्ष मनातल्या मनात बडबडला.
" वारे...वा.! हर्ष; पोटावरच
जग चालत .पोट माणसासोबत अनादी काळापासून आहे. तू असा विचार करून बघ....जर पोट नसतं तर..?..."
" आता हे कोण बोलतोय? आत्ता कुठे बरं वाटायला लागलंय. थोडं गप्प बस ना...!"
" मी...तूझ पोट म्हणजेच जठर बरं..का! तूला आता माझं ओझं वाटतंय...पण इतरवेळी दे दणादण खात असतोस व सारं मला निस्ताराव लागत. "
" तू कसं काय निस्तारतोस....?"
" ऐक,....
माझा आकार इंग्रजी अक्षर J (जे) सारखा आहे.अन्न जे स्नायूंचे आकुंचन व प्रसरण होत हळूहळू जठरात उतरत ते तिथे स्थिरावते.विचार कर , जर जठर अगदी सरळ असलं असतं तर काय घडलं असतं. जठराचा पाण्याच्या पखाली सारखा आकार अन्नावरील पुढील प्रक्रिया करण्यासाठी उपयोगी पडतो.अन्न जठरात उतरल्यावर तिथे ते दोन ते तीन तास असते. बटाट्या सारखे पदार्थ दोन तासात तर मांस ,मटण पचायला तीन तास लागतात."
" मजेशीर माहिती आहे.पण या कालावधीत नेमके काय घडते?" हर्षने विचारले.
"पहिल्यांदा आलेले अन्न जे दातांनी चावून बारीक केलेले असते.लाळेतील टायलीनमुळे अन्न बुळबुळीत झालेले असते.मी हे अन्न चांगले घुसळून काढतो व अतिशय बारीक करतो.तूझी आई मिक्सरला वाटप लावते अगदी तसेच.अगदी पातळ लगदा होतो बरं का."
" अरे ,व्वा...!पण मला कसं कळत नाही?"
" हिच तर गंमत आहे.बर तू काल दोन आईस्क्रीम खाल्लीस ना? कोणताही थंड पदार्थ खाल्ला की जठर ३० ते४० मिनिटे आपलं काम थांबवते.याच कारण काय असेल?"
" नाही बुवा मला नाही सांगता येणार." हर्ष मान हलवत म्हणाला.
" मला आपलं काम चोख पार पाडण्यासाठी शरीराएवडच तापमान लागत थंड पदार्थ खाल्ल्याने
जठराच तापमान खूपच कमी होत ते पुन्हा शरीराच्या तपमानाएवढ होईपर्यंत मला वाट बघावी लागते.म्हणजे जेवल्यानंतर थंड पदार्थ खाल्ला तर अन्न पचायला जवळपास साडेतीन ते चार तास लागतात." जठर म्हणाले.
" यापुढे मी हे लक्षात ठेवीन" हर्ष म्हणाला.
" आता तूझ पोट दुखतंय म्हणून तूला आईने गूळ चिंच दिली पण त्याऐवजी तूला वेदनाशामक गोळी दिली असती तर मला प्रचंड त्रास झाला असता...माझं अस्तर जे गुलाबी रंगाचे असते ते काळसर झालं असतं . कोणत्याही वेदनाशामक गोळीने मला प्रचंड त्रास होतो."
" याचा अर्थ नको असलेल्या गोष्टी आपल्याकडे येवूच नये असं तूला वाटत तसंच तूझा रंगही बदलू शकतो होय ना?" हर्षने विचारले.
" होय, तू जेवताना आनंदी असलास तर मी पण आनंदी असतो अश्यावेळी माझ्या अस्तराचा रंग छान गुलाबी असतो.तू वैतागत जेवत असलास तर रंग गडद लाल होतो....निराश अवस्थेत किंवा रडत रडतच जेवलास तर तो तपकिरी होतो."
" म्हणजे दूरदर्शनवरच्या रडव्या....भांडा भांडीच्या मालिका बघताना
जेवू नये हेच खरं, होय ना?"
" अगदी बरोबर, आनंदी व प्रसन्न वातावरणात जेवावे.माझ्या आत जहाल असं हायड्रोक्लोरीक आम्ल भरलेल आहे. त्याचा सामू सुमारे दोन ते तीन एवढा असतो. अन्न पचन व इतर रासायनिक प्रक्रिया होण्यासाठी ते आवश्यक आहे. या आम्लात
अन्नातील जीव जंतू जीवंत राहू शकत नाहीत.तसेच चूकून गेलेला माश्यांचा काटा ...धातूची अतिशय पातळ तार किंवा किस विरघळून जातो."
" म्हणजे ही नैसर्गिक सुरक्षाव्यवस्था आहे."
" पण काही वेळा तुम्ही जीभेचे चोचले पुरवण्यासाठी काहीही व कितीही खाता मग आम्लतेचे प्रमाण वाढते.याला तूम्ही ॲसिडिटी म्हणता.मग पोट दुखते...उलट्या ... डोकेदुखी होते.मग ते प्रमाण कमी करण्यासाठी आम्लारी पदार्थ खाऊन उदासीनकरण करावं लागतं.गूळ व चिंच त्यासाठीच तूला आईने दिली. या शिवाय माझ्यात पेप्सीचे पाचक रस तयार होतो ज्यामुळे प्रथिनांचे पचन होते.प्रथिन शरीर बांधणी व वाढ होण्यासाठी आवश्यक आहेत.दुध पचवण्यासाठी रेनीन नावाचा विक्रमी तयार होतो."
" व्वा,आईला हे ठाऊक आहे तर."
" परंपरेने सगळ्या आईंना हे माहित असते. तूला भूक लागली की माझ्या अस्तराचे स्नायू हालचाल करू लागतात(जठराग्नी प्रदिप्त होतो).हा संदेश मेंदूकडे जातो व भूक लागल्याचे कळते. एक लक्षात ठेव. मानवी शरीरातील प्रत्येक गोष्ट ही अगदी काटेकोरपणे घडवून आणली जाते.तूम्ही थोडी काळजी घेतल्यास तुमचं शरीर दिर्घ काळासाठी कार्यक्षम व रोगांपासून दूर राहिल.मग काय लक्षात ठेवलेस तू?"
" जेवताना घाई गडबडीत जेवू नये.जेवताना आनंदी असल पाहिजे.थंड पदार्थ खाताना काळजी घ्यावी.खूपच गरज लागली तरच वेदनाशामक औषध घ्यावीत." हर्षने उत्तर दिले.
" शाब्बास!चला आता मला थोडी विश्रांती घ्यायची आहे. शुभ -सकाळ बरं का!"

बाळकृष्ण सखाराम राणे