Avkashyatra - 1 in Marathi Adventure Stories by Ankush Shingade books and stories PDF | अवकाशयात्रा - भाग 1

Featured Books
  • એઠો ગોળ

    એઠો ગોળ धेनुं धीराः सूनृतां वाचमाहुः, यथा धेनु सहस्त्रेषु वत...

  • પહેલી નજર નો પ્રેમ!!

    સવાર નો સમય! જે.કે. માર્ટસવાર નો સમય હોવા થી માર્ટ માં ગણતરી...

  • એક મર્ડર

    'ઓગણીસ તારીખે તારી અને આકાશની વચ્ચે રાણકી વાવમાં ઝઘડો થય...

  • વિશ્વનાં ખતરનાક આદમખોર

     આમ તો વિશ્વમાં સૌથી ખતરનાક પ્રાણી જો કોઇ હોય તો તે માનવી જ...

  • રડવું

             *“રડવુ પડે તો એક ઈશ્વર પાસે રડજો...             ”*જ...

Categories
Share

अवकाशयात्रा - भाग 1

मनोगत

अवकाश यात्रा नावाची आणखी एक पुस्तक वाचकांना देत असतांना आनंद होत आहे. ही माझ्या साहित्यातील ९३ वी पुस्तक आहे. यात संदर्भ म्हणून गुगलवरील काही लेख घेतलेले आहेत. त्या काही लेखांना कथानकाची जोड देवून कादंबरी साकार केली आहे. त्यामुळंच गुगलवर माहिती देणाऱ्यांची लेख घेतल्याबद्दल सर्वप्रथम माफी मागून आभार व्यक्त करतो.
या पुस्तकाबद्दल सांगायचं झाल्यास सध्या पृथ्वीवर लोकसंख्या वाढत आहे. त्यामानानं जंगलं कमी होत आहेत. तसेच पृथ्वीवरील लोकं भोगत आहेत पृथ्वीवरील विनाश. तो विनाश ते आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहात आहेत. तो विनाश होत आहे, माणसानं माणुसकी सोडल्यानं हे त्यांनाही माहीत आहे. माणसानं जंगलं कापली आहेत. त्यामुळंच झाडं कमी झाले आहेत. प्राणीही संपले आहेत. झाडं संपली असल्यानं ऑक्सिजनचा साठाही संपण्यात गोळा आहे. त्यामुळंच ओझोन वायूचा थर पातळ झाला आहे व ओझोन वायूच्या थराला अनेक छिद्र पडून सुर्याची अतिनील किरणं पृथ्वीवर थेट पोहोचत असल्यामुळे तापमान वाढले आहे. अशा तापमानानं जलस्तर सुकला आहे. त्यातच माणसं होरपळून मरण पावत आहेत. जी काही वाचली आहेत आणि वाचणार आहेत. ती परग्रहांवर वस्ती करण्याचा विचार करीत आहेत. कदाचीत आता परीवर्तन होणार आहे सृष्टीचं. सृष्टी परीवर्तन करणार आहे. मात्र ती कोणतं पृथ्वीवर परीवर्तन करणार आहे? हे या कादंबरीत दिसेल. त्यासाठी आपण ही कादंबरी वाचणं गरजेचं आहे.
कादंबरीचं कथानक साधं सोपं आहे. भाषा आकलनीय आहे की सर्वसामान्यांना समजेल. कादंबरी मुळातच रहस्यमय आहे. आपण वाचावी व त्यातील गुढ जाणून घ्यावं. तसं पाहिल्यास ही कादंबरी आपलं मनोरंजनही करणार आहे. मात्र एक विनंती आहे की आपण ही कादंबरी वाचल्यावर एक फोन अवश्य करावा. जेणेकरुन माझ्या लिखाणाचं मला सार्थक झाल्यासारखं वाटेल.
धन्यवाद
आपला नम्र
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०

अवकाश यात्रा (कादंबरी) भाग एक
अंकुश शिंगाडे

पैसा हे जीवन आहे असं सर्वजण म्हणतात तसंच पैसे वाचवा असंही सर्वजण म्हणतात. कारण पैसा नसेल तर कोणतीही कामं होत नाही.
पैशाच्या बद्दल सांगायचं झाल्यास पैसा माणसानं कमवावा. तो तेवढाच कमवावा की जेवढा आपल्याला आवश्यक असतो. कारण कोणाजवळ कितीही पैसा असला तरी कोणताही व्यक्ती तो पैसा मृत्यूनंतर आपल्यासोबत नेत नाही. तसंच पर्यावरणाचंही आहे.
पाणी हे जीवन आहे असे सर्वजण म्हणतात. तसंच पाणी वाचवा असं सर्वजण म्हणतात आणि तसं म्हणावंच लागतं. पाणीच नाही तर पर्यावरणाचंही संरक्षण करायलाच हवं. पर्यावरणात वनस्पती, प्राणी, माणसं, नैसर्गिक संसाधनं, खनिज संपत्ती, लहानमोठे जीवजंतू, अंतराळ आणि इतर सर्व गोष्टींचा समावेश होत असतो. या सर्वांचं संरक्षण व्हायलाच हवं. त्याचं जर आज संरक्षण झालं नाही तर कालांतरानं त्या सर्वच वस्तू संपतील. त्याचबरोबर आपणही संपू हे तेवढंच खरं आहे.
पर्यावरणाच्या संरक्षणात मुख्य गोष्ट येते ती पाणी. पाणी वाचवायलाच हवं. कारण पाणी जर नसेल तर कोणताच जीवजंतू जीवंत राहू शकणार नाही. एवढं पाण्याचं महत्व निर्माण झालं आहे. आज पाण्याची गरज आहे. परंतु अलिकडील काळात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे, नव्हे तर होत आहे. याला जबाबदार आहोत आपणच.
जुनी मंडळी म्हणत नसत की झाडं लावा आणि ते झाडंही लावत नसत. तरीही पर्यावरण संतुलीत राहायचं. त्याचं कारण होतं लोकसंख्या. त्या काळात लोकसंख्या कमी होती.
लोकसंख्या कमी? आता यावर लोकं म्हणतील की लोकसंख्या त्या काळात कमी कशी राहील! एका एका परीवाराला दहाच्या वर लेकरं राहायची. मग त्या काळातील लोकसंख्या कमी कशी राहणार? तसं पाहिल्यास तेही म्हणणं खरं. एका एका व्यक्तीला त्या काळात दहा दहाच मुलं असायची. मग तरीही लोकसंख्या कमी असायची. त्याचं कारण होतं साथीचे रोग. गावागावात एखाद्या रोगाची साथ यायची व त्या साथीत गावचे गावं ओस पडायचे. एवढे लोकं मरण पावायचे की पुर्णतः गावच संपून जात असे. मग लोकसंख्या कमी व्हायची. असे ओस पडलेले गावं देशादेशात भरपूर होते. उदाहरण द्यायचं झाल्यास दुर्गाबाईचा रिठ किंवा इतर अनेक गावातील काही जागांना रिठ हा शब्द आलेला आहे. त्यातून लोकसंख्या कमी झालेली दिसून येते.
लोकसंख्या अशा आजारानंतर कमी होत असे. कारण त्यावर कोणतीच उपाययोजना नव्हती व आताच्या काळात जी रुग्णालये उघडली आहेत. ती रुग्णालये नव्हती आणि रोगांवर वा रोग्यांवर जसा उपचार अलिकडील काळात करता येतो. तसा उपचार त्या काळात करता येत नसे. म्हणूनच लोकसंख्या सिमीत असायची. म्हणूनच पर्यावरण संतुलनाचा प्रश्न नसायचा.
आज मात्र पर्यावरण संतुलनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. जरी लोकसंख्या सिमीत असली तरी. कारण आरोग्यमान व आयुष्यमान वाढलेले आहे. आज माणसं आजारी जरी पडली असली तरी त्या आजारावर मात करण्यासाठी रुग्णालये आहेत व या रुग्णालयात अनेक घनिष्ठ व गंभीर आजारावरही मात करता येते. म्हणूनच लोकसंख्या उपज जरी कमी असली तरी लोकसंख्या वाढली आहे. कारण मृत्यूदर घटला आहे.
आज मृत्यूदर घटला आहे. कारण आरोग्यासाठी असलेल्या सुविधा. त्या सुविधेनुसार मृत्युदर कमी झाला आहे. परंतु ते जरी खरं असलं तरी आजच्या काळात लोकांचं आरोग्य धोक्यात आले आहे. त्याचं कारण म्हणजे लाकुडकटाई आणि शहरीकरण. निव्वळ शहरीकरणच नाही तर शहरात जे सिमेंटीकरण करण्यात आलं. त्यानं तापमान वाढ झाली आहे. शिवाय वाढत्या तापमानानं ऋतू बदलले आहेत. पाण्याची पातळी कमी झाली आहे. एकंदरीत सांगायचं झाल्यास आजच्या काळात कोणता हिवाळा, कोणता उन्हाळा व कोणता पावसाळा हे ओळखायलाच येत नाही. दरदिवशी हे तीनही ऋतू सुरु असतात. महत्वपुर्ण बाब ही की आता आपली वाढती लोकसंख्या आता कुटूंब नियोजनानं मर्यादीत स्वरुपाची जरी असली तरी आपण जंगलकटाई केल्यानं, सिमेंटचे शहरात रस्ते बांधकाम केल्यानं, अवाढव्य कारखाने उभारल्यानं, वातावरणात कारखान्यातील सांडपाणी व धूर मिसळत असल्यानं, याचाच अर्थ निसर्गाला छेडल्यामुळं निसर्गाचा समतोल ढासळला व त्याची परीयंती ऋतूमानाच्या बदलात झाली. त्यामुळंच तापमान वाढले. ऋतू बदलले व संपुर्ण मानवजात नष्ट होण्याच्या कगारवर आहे.
आज आपण चंद्रावर तर पोहोचलो. सुर्यावरही जात आहोत. परंतु पृथ्वी आपली सुखी नाही आणि त्या पृथ्वीवर राहणारे आपण जीवही सुखी नाही. याचं एकमेव कारण आहे आपलं वागणं. जोपर्यंत आपण आपलं वागणं सुधरविणार नाही. तोपर्यंत पृथ्वी सुखी होणार नाही. म्हणूनच आधी आपण आपलं वागणं सुधारावं. एकतरी झाड लावावं. मगच देशाचा विकास करावा. सिमेंट रस्ते बांधावे. परंतु जमीनीतही पाणी मुरायला जागा ठेवावी. हवेत कारखान्यातील धूर अवश्य मिसळवावा. परंतु मधामधात वातावरण शुद्ध करणारी पावडर धुरळावी. सांडपाणी जमीनीवर अवश्य पसरु द्यावे. परंतु ते सांडपाणी जिथं उपजाऊ जमीन आहे, तिथं पसरु देवू नये. ज्यातून पर्यावरण समतोलता राखता येईल व आपण सुखी होवू. त्याचबरोबर आपली पृथ्वीही सुखी होईल. त्याचबरोबर पृथ्वीवर राहणारे संपुर्ण जीव सुखी होतील यात शंका नाही.
जॉन आणि जोल हे असेच दोन मित्र. दोघंही अंतराळवीरच होते. परंतु एकाला पृथ्वीवर राहाणं पसंत होतं तर दुसरा आकाशाला गवसणी घालू पाहात होता.
दोघंही जीवलग मित्र होते. परंतु विचारानं ते भिन्न होते. जोलला वाटत होतं की पृथ्वी आणि पर्यावरण वाचावं तरच अवकाश वाचेल आणि जॉनला वाटत होतं की पृथ्वी नाही वाचली तरीही आपल्याला अवकाशात जावून राहता येईल. त्यामुळंच जोलला चिंता होती पृथ्वीची आणि जॉन हा पृथ्वीबद्दल चिंता करीत नव्हता.
जोलचं चिंता करणं साहजीकच होतं. त्याला वाटायचं की पृथ्वीवर सर्वच लोकं श्रीमंत नाहीत की जे अवकाशात जावून राहू शकतील. कारण अवकाशयान बनवायला कितीतरी प्रमाणात पैसा लागतो आणि तेवढा पैसा पृथ्वीवासीय लोकं देवू शकणार नाहीत. शिवाय बनवलेल्या यानात दोनचार तेवढेच करोडपती माणसं जावू शकतील. मग बाकीच्यांचं काय? याच गोष्टी जोल जॉनला सांगत असे परंतु जॉन याकडे लक्ष देत नसे.
जॉन व जोल हे लहानपणचे मित्र होते. ते एकाच शाळेत जात असत आणि शाळेत एक पान वाटून खात असत. दोघंही सामान्य कुटूंबातील. परंतु परिस्थितीनं कोणाला सोडलंय. अशातच जोलचे आईवडील एका कार अपघातात मरण पावले व तो अनाथ झाला आणि त्याचबरोबर एकाकीही झाला. त्यावेळेस तो अवघ्या दहा वर्षाचा होता. तसं त्याचं शास्रज्ञ बनायचंही स्वप्न तुटलं होतं. परंतु सुदैवं असं की त्यालाही अंतराळात जाता आले होते. अंतराळवीर बनता आले होते.
जॉनचे वडीलही सामान्यच होते. परंतु ते सरकारी नोकरीवर असल्यानं नंतर श्रीमंत बनले. त्यांना श्रीमंत होता आलं. त्याच श्रीमंतीच्या भरवशावर त्यांनी आपल्या मुलाला उच्च शिक्षण शिकवलं व त्याच उच्च शिक्षणाच्या भरवशावर तो देशातीलच मोठ्या अंतराळ संशोधन केंद्रात लागला व अंतराळातील नवनवीन प्रयोग करु लागला होता. मात्र शिक्षणाची आस असलेल्या जोलला त्याचे मायबाप दोघंही मरण पावताच शिक्षण मधातच सोडावं लागलं व रस्त्यावर भीक मागत फिरावं लागत होतं.
**********************************************************

जोलला पैशाची चिंता नव्हती. परंतु कामाची चिंता होती. त्याला माहीतच होतं की अन्न जर खायचं असेल तर त्यासाठी पैसा लागतं. कपडे जर वापरायचे असतील तर त्यासाठी पैसा लागतो आणि घरात जर राहायचं असेल तर पैसाच लागतो. तसंच शिक्षण शिकतो म्हटल्यास पैसा. कालपर्यंतची परिस्थिती बरी होती की आपले मायबाप जीवंत होते. परंतु आज? आज आपले मायबाप नाहीत. मग जेवायचं कसं? त्यासाठी पैसे कुठून आणायचे? हाही एक प्रश्न होता जोलसमोर.
जोलला शिक्षण सोडावंसं वाटत नव्हतं. तसं पाहिल्यास मायबाप मरण पावताबरोबर त्यानं शिक्षण सोडलं नाही. शिक्षण सुरुच होतं. परंतु शिक्षणात मन लागत नव्हतं. तसं पाहिल्यास शाळेत खिचडी मिळत होती. परंतु ती एकवेळची होती. दुसरी वेळ. तशी त्याची परिस्थिती त्याच्या बाईला माहीत असल्यानं ती बाई त्याच्या डब्यात त्याची रात्रीची सोय म्हणून खिचडी जास्त भरुन देत असे.
जोलचे मायबाप जीवंत होते, तेव्हा जोलला फारच भीती वाटत असे आपल्या परीसरातील किड्यांची. तो साधा पालीला घाबरत असे आणि झुरळ जर त्याला दिसलाच तर तो मोठमोठ्या उड्याही मारत असे आणि साप जर दिसला तर...... तर मात्र त्याचा चेहरा व त्या चेहर्‍यावरील हावभाव पाहण्यासारखे असत. मात्र तो जेव्हा घाबरायचा. तेव्हा त्याचे मायबाप त्याच्यावर फार रागवत असत. म्हणत असत की अकाळी त्यांना कधी कमीजास्त झाल्यास तो कसा जगेल. परंतु तो काही मनातील भीती काढत नसे. कारण त्याला काय माहीत होतं की प्रारब्धच असा त्याच्याशी डाव खेळेल. आपल्या मायबापाला या जगातून घेवून जाईल.
ते लहानगं वय. त्याला त्या वयात साधं जेवनही बनवता येत नसे. कारण ते वय खेळण्याबागडण्याचं होतं. गप्पा मारण्याचं होतं. त्यामुळं तो स्वयंपाक तरी कसा बनवेल. साधी आगपेटीही त्याला पेटवता येत नसे.
जोलला एक बहीण होती. तिचं नाव जयश्री होतं. लोकं तिला जयाच म्हणत असत. जया लहान होती त्याचेहून तिचं नुकतंच नाव टाकलं होतं. ती सहा वर्षाची झाली होती.
जोलचे मायबाप मरण पावले. तसे आजुबाजूच्याच लोकांनी दोनचार त्याचे नातेवाईक बोलवून त्याच्या मायबापाची मैयत आटोपून टाकली. त्यानंतर दोनचार दिवस त्याचे नातलग त्याचेजवळच राहिले. परंतु ते तरी किती दिवस राहतील त्याचेजवळ. काही दिवसानं ते निघून गेले. आता मात्र जोल खऱ्या अर्थानं एकाकी झाला होता व त्याला मायबापाची आठवण यायला लागली होती. शिवाय मायबापानं पुन्हा एक ओझं त्याच्या उरावर टाकलं होतं. ते ओझं नसून एक जबाबदारीच होती. जी त्याची बहीण होती.
जोल व त्याची बहीण रोजच शाळेत जात असे. त्यांना रोजच खिचडी मिळत असे. परंतु निव्वळ खिचडीवर संपुर्ण घरचा खर्च भागत नव्हता. तसं पाहिल्यास जोलच्या खांद्यावर जबाबदारी होती.
आज त्याचे मायबाप मरुन दोनचारच दिवस झाले होते. त्याची बहीण जया खेळत होती अंगणातील पसरबागेत. तोच त्या परसबागेत जोलला एका सापाचं पिल्लू दिसलं. ते पिल्लू त्या जयाच्या जवळच होतं. तसं ते दिसताच जोलला आधी त्याची भीती वाटली. तशी त्याला त्याचे वडील जीवंत असतांना त्याला सर्वच लहानमोठ्या प्राण्यांची भीती वाटत असे. परंतु आता भीती बाळगून काही उपयोग नाही. आपण जर भीती बाळगली तर आपल्या मायबापासारखीच आपली बहीणही आपल्याला सोडून जाईल असा विचार करुन जोलनं त्या सापावर उडी मारली. तो आता तिला दंश करणार. तोच सर्व प्राण कंठात एकवटून त्यानं त्या सापाचं शेपूट पकडलं व त्याला अलगद उचलून ते सापाचं पिल्लू दूर लांबवर फेकून दिलं. त्यानंतर त्यानं आपल्या लहानग्या बहिणीला अलगद उचलून मीठी मारली व डोळे गच्च लावून घेतले. त्यानंतर त्यानं जेव्हा डोळे उघडले तेव्हा आजुबाजूला बघ्यांची गर्दी गोळा झाली होती व प्रत्येकच जण त्याच्या हुशारीची प्रशंसा करीत होता. त्यानंतर त्यानं डोळे उघडताच सर्वजण आपआपल्या घरी निघून गेले होते.
सापाचे पिल्लू अलगद उचलून फेकताच जोलची हिंमत वाढली होती व आता तो ना झुरळाला घाबरत होता ना तो पालीला घाबरत होता. तो त्यांची नित्यनेमानं शिकार करीत होता. मात्र त्याला एकदा कोणीतरी सांगीतलं की ते आपले रिश्तेदार असतात. त्यामुळंच ते आपल्या घरी असतात. ते आपले नातेवाईक आपल्या अवतीभोवती राहात असून आपलं जीवन न्याहाळत असतात. म्हणूनच त्यांना मारु नये. तर त्यांच्यावर प्रेम करावे.
आपल्या घरी किंवा परीसरात दिसणारे प्राणी आपले नातेवाईक असतात असं ऐकताच जोल आता प्राण्यांना मारत नसे तर त्यांना हाकलून देत असे.
जोल व जॉन शाळेत जात असत. तसं पाहिल्यास ती सरकारी शाळा होती. त्या शाळेत शिक्षक तेवढे शिकवीत नसत, ना शिक्षणाची गंगा शाळेत होती. ते शिक्षक सतत कोणत्या ना कोणत्या कामात व्यस्त असायचे. अशातच जॉनला त्याचे वडीलांनी दुसऱ्याच एका खाजगी शाळेत नेवून टाकलं. त्यानंतर जोल आणि जॉनची मैत्री तुटली होती.
जोलजवळ पैसा नव्हता. तसा तो दिवसभर शाळेत जात होता आणि त्याची बहिणही शाळेत जात होतीच. तशी खिचडीही मिळत असे त्याला. परंतु जोलला इतर सर्व गोष्टीसाठी पैसा हवा होताच आणि तेवढ्याच खिचडीनं रात्रीला भूक भागत नसे. मग काय जोलनं विचार केला. विचार केला की यापुढं शिक्षण शिकायचंच नाही. आपण भीक मागायची. भीकेतून पैसाही मिळतो आणि जेवनही. त्यात भागतं आपलं.
ती अडचणीची वाट. जोल आता प्राण्यांना भीत नसे. ते आपले पुर्वीचे मरण पावलेले नातेवाईक असल्याचं कोणीतरी सांगीतल्यानं त्याची भीती कायमची दूर पळाली होती. मात्र आताही त्याला स्वयंपाक बनवता येत नसल्यानं व आगपेटी जाळता येत नसल्यानं तो आता भीक मागायला लागला होता. अशातच कोणी कोणी त्याला काहीबाही बोलत असत.
जोलचं भीक मागणं सुरु झालं होतं. त्याचबरोबर शिक्षण शिकायची इच्छा जास्त असल्यानं तो शाळेतही जात असे. मात्र काही समवयस्क मित्र त्याच्या परिस्थितीचा विचार न करता त्याला चिडवीत असत. म्हणत असत की आला भीकारडा साला. तेव्हा तर तळपायाची आग मस्तकातच जात असे. हेही एक कारण होतं शाळा सोडण्याचं. जोल व त्याच्या बहिणीनं शाळा सोडली नव्हती. कारण त्यांची शिक्षण शिकायची इच्छा होती.
आपण घरी वावरतांना आपल्याला आपल्या घरी नेहमीच काही प्राणी वावरतांना दिसतात. कधी पाल दिसते तर कधी मुंग्या माकोडे दिसतात. कधी उंदरं दिसतात तर कधी नेहमीच आपल्या घरी येत असलेली मांजरं. कधी एखाद्या वेळेस सापही दृष्टीस पडतो तर कधी झुरळं. कधी डास आपल्याला चावत असतात तर कधी कुत्री आपल्या निदर्शनास येत असतात.
हे प्राणी...... या प्राण्यांपैकी काही प्राण्यांचा आपल्याला त्रास होत असतो तर काही प्राण्यांचा आपल्याला फायदा. फायदा देणारे आपल्या घरचे प्राणी म्हटल्यास सर्व पाळीव प्राण्यांची आपल्याला नावे घेता येतील. ज्यात गाय, बैल, म्हैस, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या यांचा उल्लेख करता येईल.
साप....... साप या प्राण्यांची भल्ल्या भल्ल्यांना भीती वाटत असते. काहींना उंदरांची भीती वाटते तर काहींना झुरळ आणि मच्छरांचीही. काही रातकिड्यांना भीत असतात तर काहीजणं साध्या पालीलाही. गोम वा कनेला नावाचे प्राणी तर आपल्या भीतीचे आधारस्तंभच असतात. त्यातच वाघ, सिंहाला आपण प्रत्यक्षात पाहिलेले नसते, तरीही एकंदर कोणी त्याचे वर्णन केल्यास आपण भीतच असतो.
कोण असतात हे प्राणी आणि आपण त्यांना का भीतो? हा एक प्रश्न प्रत्येकाच्या मनामनात असतो. त्याचं उत्तर आहे की ते आपले नातेवाईक असतात. आता नातेवाईक म्हटल्यास आतिशयोक्ती केली असं कोणीही म्हणेल. कारण जन्म पुनर्जन्मावर काही लोकांना विश्वास नाही व पुनर्जन्म म्हणजे एक अंधश्रद्धा असून ते आजच्या शिकलेल्या पाश्चात्य विचारसरणीच्या लोकांना थोतांड वाटते.
पुनर्जन्माबाबत विचार केल्यास पुनर्जन्म हा असेल का? तर याचं उत्तर असं निश्चीतच सांगता येईल. ते म्हणजे पुनर्जन्म असतो व आपल्या घरातील सर्व प्रकारचे प्राणी हे आपल्याच संबंधातील असतात. जे आपल्या आजुबाजूला वावरत असतात. ज्याच्याशी आपला संबंध आलेला असतो.
पुनर्जन्माबाबत एक बातमी काही दिवसापुर्वी वर्तमानपत्रातून वाचली होती. ती बातमी होती वर्धा जिल्ह्यातील. ज्या मुलीचा अपघातात वर्धा जिल्ह्यातील त्या छोट्याशा गावी मृत्यू झाला होता व तिनं यवतमाळ जिल्ह्यातील एका खेड्यात जन्म घेतला होता व ती थोडीशी मोठी होताच आपण पुर्वी कुठे राहात होतो हे सांगत होती. हे वास्तविकतेचं उदाहरणच होतं की ज्यावेळेस तिला वर्धा जिल्ह्यातील त्या लहानशा खेड्यात आणण्यात आलं. तेव्हा तिनं सांगीतलेल्या सर्व गोष्टी तपासण्यात आल्या व तपासाअंती कळलं की तिचा पुनर्जन्म झालाय.
पुनर्जन्म हे थोतांड आहे की नाही हे काही निश्चितपणे सांगता येत नाही. परंतु काही गोष्टी अशा चमत्कारीक दिसून येतात. एक अशीच गोष्ट उत्तरप्रदेशातही घडली होती पुनर्जन्माची. जी छापून आली होती वर्तमानपत्रात. ह्या बातम्या वाचल्या की चमत्कारच वाटल्याशिवाय राहात नाही. तसं पाहिल्यास पुनर्जन्माची माहिती ही महापुराणात लिहिली आहे. ज्या महापुराणांना आजचा समाज हा थोतांड समजतो.
महत्वपुर्ण बाब ही की पुनर्जन्माबाबत भाष्य नाही. परंतु जन्माबाबत भाष्य नक्कीच मला करता येईल आणि म्हणता येईल की आपल्याला मागच्या जन्मात ज्यानं त्रास दिला. त्या प्राण्यांना आपण या जन्मात त्रास देतो जशात तसे या नियमाप्रमाणेच. कारण बेडूक जर किड्याला खात असेल तर ते मरण पावल्यानंतर त्यालाही किडेच खातात हा निसर्ग नियम आहे. मग मागील जन्मात आपल्याला ज्या कोंबडीनं मानवरुपात खाल्लं असेल, त्या कोंबडीला आपण या जन्मात कापून खातो. ज्या एखाद्या माणसाला आपण मागील जन्मात त्रास दिला असेल, तो या जन्मात आपल्याच घरात प्राणी म्हणून येवून आपल्याला त्रास देत असतो हे सत्य नाकारता येत नाही. जसा मच्छर चावून रोग होणे. एखाद्या विषाणूनं आजार होणे. कुंत्रा, साप दंश होणे. शिवाय ज्या गोष्टीची या जन्मात आपल्याला सर्वात भीती वाटते. विचार करता येईल की त्याच गोष्टीनं मागील जन्मात आपला मृत्यू झाला असेल वेळोवेळी. जसा एकदा जन्म झाल्यानंतर साप दंश होवून मरणे, दुसऱ्या जन्मास मच्छर दंश होवून मरणे, तिसऱ्या जन्मात श्वान दंश. वेगवेगळ्या जन्मात वेगवेगळ्या प्राण्यांच्या दंश. ते आपल्या मरणाचे माध्यम. म्हणूनच या जन्मात त्यांची भीती वाटणे साहजीकच आहे आणि सर्वात जास्त भीती ज्याची वाटते. त्या प्राण्यानं लगतच्याच जन्मात आपलं काम तमाम केलं असेल असं वाटणंही साहजीकच आहे.
या पुनर्जन्माच्या तत्त्वानुसार विशेष म्हणजे आपल्या घरातील सर्व प्राणी जे आपल्याला दिसतात, ते जशास तसे या तत्त्वानुसार आपल्या घरातील परीसरात जन्माला आलेले असतात. ज्यांना आपल्या आपल्या मागील जन्माच्या कित्येक पिढीच्या जन्मात त्रास दिला असेल, ते प्राणी आपल्याला त्रास देण्यासाठी आणि ज्यांना आपण मागील पिढीजात जन्मात मदत केली असेल, ते आपल्याला मदत करण्यासाठी प्राणी रुपात जन्मास आलेले असतात. जे त्रास देतात आपल्याला. ते बदला घेण्यासाठी जन्मास आलेले असतात व जे त्रास देत नाहीत आपल्याला. ते मदत करण्यासाठी जन्मास आलेले असतात. त्यामुळंच कोणत्या प्राण्यानं आपल्याला त्रास दिला तर आपण त्यांना त्रास देवू नये वा त्याला मारु नये वा कोणत्याही स्वरुपाची हिंसा करु नये. ज्या हिंसेत कदाचीत मागील जन्मातील आपले नातेवाईकही असू शकतात वा आपले भाऊबंद वा आपले आईवडील. ज्या नातेवाईकानं वा भाऊबंदानं वा आपल्या आईवडीलांनी आपल्याला मदत करण्यासाठी आपल्या घरी जन्म घेतलेला असतो यात शंका नाही.
जोल त्या मुक्या प्राण्यांना आपले नातेवाईक समजत होता. त्या प्राण्यात त्याला त्याचे मायबाप दिसत होते. म्हणून तो त्यांची हत्या करीत नव्हता.
जोलच्या मनात शिक्षणाची आस जोर पकडून होती. परंतु भुकेचाही प्रश्न सोडवणं भाग होतं. त्यातच जेव्हा चांगले दिवस असतात. तेव्हा बरीचशी मंडळी वा नातेवाईक गुड तिथं माशी याप्रमाणेच येत असतात. तसंच जोलच्याही घरी झालं.
जोलनं पाहिलं होतं की काल जेव्हा त्याचे मायबाप जीवंत होते, तेव्हा बरेच नातेवाईक त्याच्या घरी येत असत. परंतु आता? आता मात्र प्रश्नचिन्हं उभं राहिलं होतं. कोणीही नातेवाईक त्याच्या घरी फिरकत नव्हते.
जोलच्या घरी माणूसकी दाखविणारी माणसं येत नव्हती. मात्र पशुपक्षांनी त्याची साथ सोडली नव्हती. काल त्याच्या घरी येणारी चिमणी आजही त्याच्या घरी येत असे. काल त्याच्या घरी येणारी कवडी आजही त्याच्या घरी येत असे व आपापलं घरटं बांधत असे आणि कावळा नेहमीच येत होता. शिवाय कावकाव करुन बातमी देवून जात होता.
जोल हा लहान होता अगदी दहा वर्षाचा. तो घर तरी कसं स्वच्छ ठेवणार होता? त्याचं तर छताला हातही पुरत नव्हतं. आज मायबाप मरायला सहा महिने झाले होते. घरचा उदरनिर्वाह भीकेच्या पैशातून चालत होता. बहिणीचं नाव पहिलीत टाकलं होतं. तिला खिचडी मिळतच होती. तशी त्यालाही मिळत होती खिचडी. परंतु आता तो शाळेत जात नव्हता. कारण त्याला पोटासाठी कुठंतरी काम करावं लागत होतं. भीक मागणे हेही कामंच होतं त्याचेसाठी.
जोल भीक मागत असे व आलेल्या पैशातून काही विक्रती जिनस आणत असे घरी. ते आपल्या बहिणीला चारत असे व स्वतःही खावून झोपत असे. हाच त्याचा नित्याचा दिनक्रम होता. अशातच ते प्रारब्ध त्याला सोडत नव्हतं. तसा तो एकदाचा प्रसंग ओढवला
जोल आता अकरा वर्षाचा झाला होता. आज दुपारी त्याची बहीण शाळेत जाताच तो भीक मागायला बाहेर पडला होता. तोच कोणीतरी ओरडलं, 'साहेब आले, साहेब आले '
'साहेब आले' कोणाचा तरी आवाज. तशी गाडी थांबली व ती गाडी थांबताच सर्व भिक्षेकरी सैरावैरा पळायला लागली होती. मात्र काय झालं हे जोलला समजेना. म्हणूनच तो एका ठिकाणी सर्वांचं निरीक्षण करुन चूप बसला होता.
ती गाडी थांबली होती रस्त्याच्या कडेला. त्यानंतर त्या गाडीतून एक व्यक्ती उतरला. त्याचा पोशाख भरजरी होता व त्यानं उंच हॅट वापरली होती. तसा तो जोलजवळ आला. म्हणाला,
"तू भीक मागतो काय?"
त्या माणसाचा प्रश्न. तसा प्रश्न करताच जोलनं त्याचं होकारार्थी उत्तर दिलं. तसं त्यानं आपल्या शेजारी उभ्या असलेल्या व्यक्तीला मुकपणानंच इशारा केला. तसं त्या व्यक्तीनं दहा वर्षाच्या इवल्याशा जोलला उचललं आणि गाडीत कोंबलं. ज्या गाडीत दोनचार तरी लोकं बसलेले होते. जे भीकच मागणारे होते.
जोलला त्या व्यक्तीनं पकडताच व त्या गाडीत कोंबताच जोल ओरडायला लागला होता. परंतु त्याची ओरड कोणालाच ऐकायला येत नव्हती. मात्र त्याला चिंता पडली होती ती त्याच्या बहिणीची. ती कशी राहील? कुणाकडं पाहील? काय खाणार? वैगेरे प्रश्न त्याला पडले होते. तशी ती गाडी सुधारगृहात गेली होती. जोल आज सुधारगृहात गेला होता जणू एक गुन्हेगार म्हणून. त्याची अवस्था एखाद्या निष्पाप झाडांसारखीच होती. जे झाड पाप करीत नसूनही कापलं जात होतं.

************************************************

झाडानीही पापच केलेले असते असं जर कोणी म्हटलं तर आपल्याला आश्चर्यच वाटेल. कारण झाडाबद्दल आपल्या भावनाच मरण पावलेल्या आहेत. परंतु झाडांनीही दाखवून दिले की आम्ही किती उपयोगाचे आहोत. आम्ही जर नसलो तर या पृथ्वीतलावर पाणी पडू शकणार नाही. तापमानही वाढेल व सृष्टी नष्ट होईल. याबाबतीत एक कथा आहे.
प्राचीन काळात राजे पद्धती अस्तित्वात होती. त्यात सैनिक एकमेकांशी लढत व ते एकमेकांना मारत असत. ते पापच होत असे. कारण एकमेकांचा विनाकारण जीव घेणे हे पापच होते.
सैनिक हे आपल्या धन्यासाठी लढत. प्रसंगी आपल्या धन्यासाठी ते परकीय शत्रू सैन्याचा बळी घेत. यात दोष त्यांचा नसायचा. तो दोष राजाचा असायचा. ते बिचारे आपल्या पोटासाठी राजाकडे नोकरी करीत व आपल्या पोटासाठी ते आपला जीवही देत आणि जीवही घेत असत. परंतु त्याचा दोष राजाला लागत नसे. जेव्हा पापाची शिक्षा द्यायची वेळ यायची. तसं पाहिल्यास त्यात राजाचाही दोष नसायचाच. कारण तो राजा आपल्या प्रजेचा जीव वाचविण्यासाठी शत्रूंशी लढत असे.
ते सैनिक जेव्हा मरत असत आणि त्यानंतर ते यमनगरीत जात. तेव्हा न्यायिक देवता यम त्यांना शिक्षा सुनावीत असतांना फार कठीण शिक्षा देत असे. तेव्हा राजा म्हणत असे की दोष माझा कसला, मी तर कर्तव्य केलं. मग राजानं तसं म्हणताच यम न्यायिक भावनेतून सैनिकांनाच दोष देत त्यांना भयंकर मोठ्यात मोठ्या शिक्षा देत असे आणि राजाचा दोष असूनही त्यांना हलक्या दर्जाच्या शिक्षा.
एकदाचा तो प्रसंग. त्यावेळेस सर्व सैनिक एका जत्थ्यानं न्यायिक देवता यमाकडे गेले. म्हणाले,
"यम महाशय, आम्ही आमच्या पोटासाठी सैनिक म्हणून लढतो. स्वतः प्राण देतो आणि आमच्याच भरवशावर राजाची चांदी चांदी होते. त्यात आम्हाला काहीच फायदा होत नाही. उलट दोष आमचाच दिसतो. राजा आमच्याचमुळे विलासात जगतो. आम्ही जर नसतो तर राजाला विलासात जगता आलंच नसतं. परंतु आम्हाला हे मान्य की दोष आमचाच असतो. म्हणून आम्हाला अशी शिक्षा द्या की आमच्या दोषाचं क्षालन होईल व आम्ही शिक्षा तर भोगू. परंतु त्या शिक्षेनंतर दोषमुक्त होवू."
त्या मृत सैनिकांचं ते बोलणं. त्यांनी आपापल्या वेदना मांडल्या होत्या यमदेवतेसमोर. त्यावर यमदेवता विचार करु लागली. विचार करु लागली की यावर काही उपाय तरी निघू शकेल काय?
विचारांती यमदेवतेला आठवलं की आपण या सर्व सैनिकांना झाडं बनवू. ही मंडळी झाडं जर बनली तर यांचा दोष असल्यानं यांना सुर्याच्या कडक उन्हाचे चटके शोषावे लागेल. पळून जायची इच्छा जरी असली तरी ते कडेला पळून जावू शकणार नाहीत. शिवाय यांनी ज्यांना ज्यांना ठार केलं. ते सर्वजण यांचे अवयव छाटतील व यांना अमानुष वेदना देतील. ज्यातून यांना भयंकर त्रास होईल. त्यानंतर राजाकडे विचारांती वळून यमदेवतेनं विचार केला की राजानं एक राजा असल्यानं आपलं कर्तव्य जरी केलं असेल, तरी तोही दोषी आहे. त्यानं औषधीचं झाड बनावं. ज्या झाडाच्या खाली लोकं दिवे लावतील. दिव्यातील जास्तीचे भेसळयुक्त तेल जमीनीत जावून झाडांच्या मुळांना व्यवस्थीत पूरक खाद्य मिळणार नाही व ते मरतील. शिवाय सैनिकही झाड बनून लोकांच्या उपयोगी येवून लोकांची सेवा करीत व पापमुक्त होतील.
यमदेवतेनं तसा विचार करताच तथास्तू म्हटलं व सर्व सैनिक तेव्हापासूनच झाडं बनली व राजे हे औषधी झाडं. त्यानंतर ते दोषमुक्त होईपर्यंत सुर्याच्या तप्त उन्हात ऊन झेलत असतात आणि आपल्याला सावली देवून आपली सेवा करीत असतात नव्हे तर आपली सेवा करुन दोषमुक्त होत असतात. ते आपली सावली देवून सेवा करतात. तरीही आपण त्यांना चांगलं वागवत नाही. आपण त्यांच्या फांद्यारुपी अवयव मोडून त्यांना अतिशय वेदना देतच असतो. काही तर त्यांना कुऱ्हाडीनं तोडून त्यांची निर्मम हत्या करीत असतात. तेव्हा त्यांना अतिशय भीतीही वाटत असते. परंतु ते घाबरुन पळूही शकत नाहीत.
काही दिवसानं झाडं नष्ट होतात. ते नष्ट झाले की आपल्या पापरुपी दोषातून मुक्त होतात. तेव्हापर्यंत त्यांची घाबरुन पळून जायची इच्छा जरी असली तरी ते पळून जावू शकत नाहीत, दोषमुक्त होईपर्यंत.
काल सतत युद्ध होत असत. त्यामुळंच जास्तीत जास्त सैनिक मरत असत. त्यामुळंच झाडं जास्त होती. जंगलंची जंगलं होती व वातावरणात ऑक्सिजनची मात्रा जास्त होती. परंतु आज तसं नाही. आज युद्ध होत नाहीत. म्हणूनच झाडंही कमी होत आहेत. त्यामुळंच पर्यावरण ढासळत चालले आहे.
महत्वाचं सांगायचं झाल्यास आजचे लोकं याच दंतकथेच्या अनुषंगानं चालतात व मानतात की सैनिकच मरत नाहीत. मग झाडं कुठून असणार. परंतु महत्वपुर्ण गोष्ट ही की ही दंतकथा आहे. या दंतकथेचा आणि झाडं लावण्याचा दूरदूरचा संबंध नाही. झाडं ही अतिशय महत्वाची गरज आहे. त्यांच्यापासून बरेच फायदे आहेत. ते सावली देतात. जमीनीची धूप जास्त होवू देत नाही. पर्यावरण संतुलन राखता येतं. झाडं फळ फुल देतात, लाख व डिंक देतात. औषध्या देतात. सरपणही देतात. इमारती लाकूडही देतात. तशीच झाडं ही पाऊसही देत असतात.
झाडं ही ऑक्सिजन देतात. ऑक्सिजन हवेत प्रवाहीत करतात. तो ऑक्सिजन हवेत वर वर जात असतो. तो ऑक्सिजन वर गेल्यानंतर त्याचा संपर्क हायड्रोजनशी येतो व पाऊस पडतो. कारण हायड्रोजन हा हवेतील एक घटक आहे व तो हलका वायू असल्यानं पृथ्वीच्या कक्षेत नसतो. तो हवेच्या वरच्या भागात असतो. जेव्हा ऑक्सिजन वर जावून हायड्रोजनच्या संपर्कात येतो. तेव्हा पाऊस पडतो. परंतु हे जरी खरं असलं तरी मुख्य बाब ही की हवेत जास्तीत जास्त ऑक्सिजन प्रवाहीत व्हायला हवं. तेव्हाच पाऊस येणार. नाहीतर नाही. मग त्यासाठी पृथ्वीतलावर जास्तीत जास्त झाडं लावायला हवीत हेही तेवढंच खरं.
विशेष बाब ही की झाडं आपण लावायला हवीत. ते आपल्या हातात आहे. मग सैनिक शहीद होवो की न होवो. त्या गोष्टीशी आपला संबंध नाही. मात्र झाडं लावणं आपल्या हातात आहे. त्यामुळंच प्रत्येकानं एकतरी नाही तर दोनतरी झाडं लावलीच पाहिजेत. लावायलाच पाहिजेत. जेणेकरुन तापमान वाढणार नाही व सृष्टी जगेल. सृष्टी जगेल तरच, आपण जगू. नाहीतर सृष्टीसोबत आपणही काळाच्या ओघात केव्हा संपून जावू. ते आपल्याला कळणारही नाही. हेही तेवढंच खरं.
पशूपक्षांनाही पाणी पाजावे. कारण ते सृष्टीचे रक्षकच. ते आहेत. म्हणूनच आपल्याला कोणतेही आजार जास्त प्रमाणात शिवत नाहीत. हे तेवढंच खरं.
आपण लहान होतो, तेव्हा अंगणात नेहमीच चिमण्या कावळे दिसायचे. शिशीर संपताच वसंत लागला की हिरवे हिरवे राघू दिसायचे. सांज झाली की झुंडीच्या झुंडीनं बगळे चिंचेच्या झाडावर यायचे व अंगणातच चिंचेची झाडं असल्यानं त्यांच्या आवाजानं रात्रभर झोप लागायची नाही. रानात गेलं तर रानपक्षी अविरतपणे रानात हुंदडत असायचे आणि पावसाळ्यात डोबकं भरलंच तर त्या डोबक्यात नित्यनेमानं पाणकोंबड्या थयथय नाचायला येत. शिवाय टिटवीही टिवटिव करीत बैलांच्या अंगावर बसून किडे खात असायची. तुरीच्या झाडात अलगद लावेही दिसायचे व नजर जाताच ते लावे भुर्रदिशी उडून जायचे. त्यांना स्वतः पाहून गंमत वाटायची. मात्र आज तसे पक्षीही दिसत नाहीत. तशी गंमतही दिसत नाही. काळ बदलला व काळाच्या ओघात सगळे पक्षी नामशेष झाले.
पक्षी नामशेष झाले. त्याची कारणं बरीच आहेत. प्रदुषण, रेडीओ लहरी, मोबाईल लहरी आणि इतर बरीच कारणं. तसंच एक कारण आहे. ते म्हणजे पृथ्वीचे वाढते तापमान.
अलिकडील काळात पृथ्वीचे तापमान बरेच वाढत आहे. त्याचं कारण आहे ऑक्सिजनचा तुटवडा. ऑक्सिजन सध्याच्या काळात कमी प्रमाणात प्रवाहीत होतो, अर्थात उत्पन्न होतो. तो वायू कमी प्रमाणात उत्पन्न होत असल्यानं जी वातावरणात ओझोन वायूची परत आहे. ती कमी झालेली आहे व त्यामुळंच सुर्याची किरणं. हमखास पृथ्वीवर थेट पोहोचत असतात. ज्यानं तापमान वाढलेलं आहे. हे तापमान कमी होवू शकतं आणि ते तापमान कमीही करता येवू शकतं. त्यासाठी पृथ्वीतलावर ऑक्सिजन जास्त प्रमाणात उपलब्ध करणारी संसाधनं निर्माण करायला हवीत. मग ती संसाधनं कोणती? ती संसाधनं आहेत झाडं. झाडं जास्त प्रमाणात निर्माण व्हायला हवीत. कारण झाडंच ऑक्सिजन वातावरणात प्रवाहीत करीत असतात.
अलिकडील काळात लोकांनी झाडं तोडली. त्यामुळंच जगलं कमी झाली झाली व पृथ्वीला सावली देण्याची देण्याची प्रक्रियादेखील त्यामुळंच बंद झाली. आता पृथ्वीला सावलीच मिळत नाही. मग जमीन, जमीन कशी थंड राहणार. शिवाय शहराशहरात आणि गावालगत सरकारनं सिमेंटचे रस्ते उभारले असून आजुबाजूला पाणी मुरायला जागाच नाही. त्यामुळंच तापमान वाढलं व हे तापमान पक्ष्यांना सहन होत नसल्याने ते मरत आहेत नव्हे तर या वाढत्या तापमानानं काही काही पक्षीही नामशेष झाले आहेत. काही प्राणीही नामशेष झाले आहेत. जे उरले उरले आहेत, त्याचीही संख्या कमी कमी झालेली असून तेही नामशेष होणार की काय अशी भीती निर्माण होवू लागली आहे.
पर्यावरण बदल होत आहे व त्याचा परिणाम केवळ झाडावरच नाही तर प्राणी पक्षावरही होवू लागला आहे. त्याचबरोबर मानवावरही होवू लागला आहे. कारण काल दिसत असलेले पक्षी आज दिसत नाही आणि दिसतातही तर ते कमी प्रमाणात अर्थात अतिशय कमी प्रमाणात दिसतात. काल दिवसभर दारात चिवचिव असा येणारा आवाज आज जास्त प्रमाणात ऐकायला येतच नाही. अलिकडे बगळेही गावच्या चिंचेवर सांजेला बसायला येत नाही. तरीही झोप लागत नाही. कारण चिंचेवरच्या बगळ्यांची जागा आज मोबाईलनं घेतली. काल आसमंतात उडत दिसणारे कावळे आज दिसत नाहीत. काल दिसणारे राघू आज दिसत नाहीत आणि पावसाळ्यात अलगद दिसणाऱ्या पाणकोंबड्याही आज दिसत नाहीत. आज बैलाच्या अंगावर किडे खायला बसणाऱ्या टिटव्या दिसत नाहीत. कारण आज बैलच नाहीत. बैलं व गाई लोकांनी कसाबाला विकलेली असून ते ट्रॅक्टरनं शेती करतात. एकदंरीत सांगायचं झाल्यास लोकांनी पर्यावरणाचं रक्षण करणं सोडून पर्यावरणाला संपविण्याचा ध्यास धरला की काय? असंच चित्र पदोपदी पाहायला मिळत आहे.
महत्वपुर्ण गोष्ट ही की पर्यावरणाचा आपण ऱ्हास करण्याऐवजी पर्यावरणाचं आपण रक्षण करायला हवं. झाडं लावायला हवी. जितकी झाडं लावू. तितकं पर्यावरण सुरक्षीत राहील. कारण झाडंच पर्यावरणाचं होणारा ऱ्हास थांबवू शकतात. बाकी कोणत्याच गोष्टी पर्यावरणाचा ऱ्हास थांबवू शकत नाहीत हेच निर्वीवाद सत्य आहे यात शंका नाही.

**********************************************************

गाडी जशी सुधारगृहात पोहोचली. तसं जोलला एका बंद कमऱ्यात इतरांसारखं कोंबलं. तो तिथं तळपत होता एखाद्या पिंजऱ्यात बंद केलेल्या हिंस्र श्वापदागत. परंतु त्याला तेथून सोडविणारं कोणीच नव्हतं.
जोल सुधारगृहात होता. तर त्याची बहीण जया ही घरी. सांज झाली होती. तशी जया घरी आली. परंतु जया जरी घरी आली असली तरी तिचा भाऊ जोल घरी आला नव्हता तर तो कुठं गेला हे काही कळत नव्हतं जयाला. तसा अंधार पडू लागला.
सायंकाळ झाली होती. जया घरी आली होती शाळेतून. तशी सांज आणखीनच गडद होत चालली होती व आता अंधार पडू लागला होता.
बाहेर परीसरात अंधार पडू लागताच जयाला भीती वाटायला लागली होती व जशी जशी तिला भीती वाटू लागली होती. तसतशी ती रडत होती व रडता रडता तिला भूक लागली होती.
आज ती फार रडली होती. त्यातच ती फार थकलीही होती परंतु ती तरी काय करणार? तिच्यासमोर कोणताच उपाय नव्हता. रडता रडता ती एवढी रडली की तिला भूकेपेक्षा झोप महत्वाची वाटली.
जयाला आता काय करावं ते सुचत नव्हतं. भाऊही अचानक गायब झाला होता. ती आईची कुस. ती आईची कुस तिला पारखी झाली होती. पहिलं आई गेली, तेव्हा तिला काहीच वाटलं नव्हतं. कारण भावानं सगळी बाजू सांभाळून घेतली होती. परंतु आता भाऊ दिसत नसल्यानं तिला फार मोठी गंभीर समस्या वाटत होती आणि का वाटणार नाही? तिचं वयही तेवढंच इवलसं होतं.
ती सहा वर्षाची. ते लहानगं वय. त्या वयात तिच्या आजुबाजूलाही काही लोकं राहात होते. त्यांना दयाही येत होती. परंतु तिच्याशी लाड दाखविल्यास वा तिच्याबाबत सहानुभूती दाखविल्यास हे दुखणं आपल्याच वाट्याला येईल असा विचार करुन कोणीही तिला सहकार्य दाखवीत नव्हते वा दाखवलं नाही. त्यामुळंच ती आता झोपी गेली होती.
रात्रीचे बारा वाजले होते. बाहेर भयंकर अंधार होता. ती काळोखी रात्र आणि तिचं ते अगदी लहानगं वय. ती उठली तेव्हा रात्रीचे बारा वाजलेले. विचार करायचंही वय नव्हतं ते. त्यातच त्या रात्रीच्या भयंकर अंधाऱ्या काळी ती उठताच व ती रडून रडून थकताच तिला झोप तर लागली होती. परंतु भूक कोण क्षमविणार. तशी तिला भुकेची वेदना जाणवताच ती उठली व तिला जाणवलं की काल शाळेतून डब्यात खिचडी आणलेली आहे. ती खावी.
खिचडीची आठवण येताच ती त्या अंधाऱ्याच रात्री कशीबशी भीतभीत आपल्या दप्तराजवळ गेली. तिनं दप्तर उघडलं व दप्तरातून तिनं डबा घेतला व त्यात असलेली उरलीसुरली खिचडी ती खाऊ लागली. थोड्याच वेळात खिचडी संपली. परंतु पोट काही भरलं नाही. त्यानंतर ती पाणी पेली व कशीबशी पुन्हा अंगाशी पाय घेवून झोप घेवू लागली. परंतु भुकेचे डोंब काळजात पेटून होते. अशातच सकाळ झाली होती.
सकाळ झाली होती. तशी तिला आठवली तिची भूक व सकाळीच उठून तिनं घरी असलेला एक कटोरा घेतला व तो कटोरा घेवून ती बाजूच्या घरी गेली. म्हणाली की तिला भूक फार लागली आहे. जरा जेवन द्यावं. परंतु ते शेजारचेही एवढे निर्लज्ज होते की हे दुखणं सतत आपल्याच मागं लागेल, या उद्देशातून तिची कोणतीच दया न घेता वा तिच्याबाबत कोणतीच सहानुभूती न बाळगता त्यांनी तिला हुसकावून लावलं. जसं कुत्र्याला हुसकावून लावतात तसं.
तिला त्या शेजारच्या बाईचा भयंकर राग आला. ती तरी काय करणार? तसं पाहिल्यास भूक ही काही थांबू देत नव्हती. तशी ती तीच थाळी घेवून घराच्या बाहेर पडली. ती त्या ठिकाणी पोहोचली. जिथं उकीरडं होतं.
ते उकीरडं. तिची नजर त्या उकीरड्यावर पोहोचली. तिनं पाहिलं की त्या उकीरड्यावर काही लोकांनी अन्न फेकलेलं आहे. त्या अन्नावर काही कुत्री व काही डुकरं चरत आहेत. त्यातच तिलाही भूक लागलीच होती आणि कोणी तिला अन्न दिलंही नव्हतं सकाळपासून. तशी ती त्या उकीरड्यावर पोहोचली व त्या कुत्र्या आणि डुकराच्या उष्ट्या अन्नावर ताव मारु लागली. ते अन्न जरी डुकराचं आणि कुत्र्याचं उष्ट असलं तरी तिच्या भुकेसमोर चालत होतं नव्हे तर ते अन्न तिला अधिक रुचकर वाटत होतं. आता तिनं ठरवलं की आपण आजपासून कोणाला अन्न मागूच नये तर आपण अन्नाचा शोध याच उकीरड्यावर घ्यावा.
सकाळचं जेवन. तिचं लहान वय की ज्या वयात तिला आगपेटीही उजळता येत नव्हती. परंतु तिला मार्ग सापडला होता. तो म्हणजे जेवनाचा. ती दररोज सकाळचं जेवन त्या उकीरड्यावर करीत होती आणि रात्रीच्या जेवनाची सोय म्हणून शाळेत जात होती. शाळेत मिळणारी खिचडी दुपारी जेवून व रात्रीसाठी भरपूर खिचडी डब्यात भरुन ती रात्रीच्या जेवनाची सोय करीत होती. ती कोणाला मागत नव्हती कोणत्याच गोष्टी.
ती ना शेजारच्यासमोर नतमस्तक झाली. ना शेजारच्यांनी तिच्या परिस्थितीत तिला अन्न दिलं. त्यामुळंच तिच्या मनात समाजाबद्दल असुया निर्माण झाली होती व तिला समाजाचा तिटकाराही वाटायला लागला होता.
ती शाळेत तर जात होती फक्त खिचडी मिळते व आपली सांज भागते म्हणून. ती घरी येतही होती आपल्या. कारण तेच घर तिला निवारा देत होतं म्हणून. तिचं लक्ष अभ्यासात लागत नव्हतं. सारखी भावाची आठवण यायची. कारण भावानं काही दिवस तिला आधार दिला होता. मायबाप आठवत नव्हते तिला. परंतु काही दिवस जाताच तिनं सवय पाडली होती स्वतःला. शिवाय काही उपायही नव्हता. मात्र उकीरड्यावरचं अन्न खाता खाता तिची मैत्री कुत्री व डुकरांसोबत झाली. कधी ती त्याच जहरी प्राण्यांशी खेळत असे. त्यांच्या कुशीत झोपत असे. ती उकीरड्यावरची जनावरं तिला आपलीशी वाटू लागली होती व ती त्यांचेवरच प्रेम करु लागली होती.
जया भोगत होती जी परिस्थिती. ती परिस्थिती काही केल्या तिच्या शाळेतील शिक्षकांपासून लपून राहिली नाही. ती परिस्थिती त्यांनाही माहीत झाली होती. जेव्हा शाळेतील विद्यार्थ्यांनी तिच्याबाबतची माहिती शाळेतील शिक्षकांना दिली. त्यातच आता शाळेतील शिक्षक कधीकधी तिला आपला डबाही खायला देत असत. तिच्यावर प्रेम करीत असत. परंतु त्यांचीही मजबुरी होती की ते तिला आपल्या घरी नेवू शकत नव्हते. परंतु एक मात्र निश्चीत की ते तिचं मन अभ्यासात लावू लागले होते.

**********************************************************

जोल सुधारगृहात होता. तो अतिशय मोठ्या प्रमाणात मासळीसारखा तळपत होता. त्याचं मासोळीगत तडपणं सुरु होतं. परंतु ते तडपणं इतर लोकांना दिसत नव्हतं. त्यांना वाटत होतं की जोल हा गुन्हेगारच आहे. एवढा गुन्हेगार आहे की त्याचा गुन्हा माफीच्या लायक नाही. ते त्याला शिकवीत असत की सुधारगृहात त्यानं सुधारण्याच्या गोष्टी शिकाव्या. परंतु त्याची मानसिकता होती की तो सुधारलेलाच असून त्याची परिस्थिती त्याला भीक मागायला लावत आहे. त्यानुसार तो भीक मागत आहे. परंतु ते कारण त्या सुधारगृहातील मंडळी ऐकून घ्यायलाच तयार नव्हते.
जोल सुधारगृहात असतांना त्याला शाळेतील शिक्षण शिकवलं जात होतं त्याला सुधारण्यासाठी. परंतु तो आणखी आणखी तसाच मुजोरी करायला लागला होता. तशा त्याच्या क्लुप्त्या पाहून सुधारगृह प्रमुखाने सांगीतलं की जर तो चांगला वागेल सुधारगृहात तर त्याला सोडून देण्यात येईल.
जोलला वार्डननं दिलेली धमकी. त्या धमकीनुसार जोल चांगला वागायला लागला होता. त्याला वाटत होतं की आपण जर चांगले वागलो नाही तर इथून आपली सुटकाच होणार नाही. तसं पाहिल्यास जोलचा काहीही गुन्हा नव्हता की त्याला पकडून नेलं. परंतु जोलला पकडून नेण्यापुर्वी सहा महिन्यापुर्वी एक गुन्हेगारी घडली होती व ती उजेडात आली होती. ज्यात एका भीक मागणाऱ्या मुलाचा वापर केला होता व तोही मुलगा जोलसारखाच दहाच वर्षाचा होता. ज्याच्या हातात कुणीतरी बॉंब दिला होता व त्याला अमूक अमूक ठिकाणी ठेव असे सांगून देशात बॉम्बस्फोट घडवून आणला होता. तेव्हापासून देशात अशा भीक मागणाऱ्या दहाच नाही तर बऱ्याच मुलांना आणि लोकांनाही पकडण्याचं धाडसत्र सुरु झालं होतं. त्यामुळंच जोलला पकडण्यात आलं होतं. त्यांना काय माहीत होतं की जोललाही एक लहान बहीण आहे व ती त्या जोलवर अवलंबून आहे व जिला जेवन बनवता येत नाही नव्हे तर आगपेटीही उजळता येत नाही. जिचे मायबाप मरण पावले आहेत व ती जोलसोबतच राहते. तसं पाहिल्यास त्यांनी कोणतीच शहानिशा केली नाही. तसं जोलनं सांगून पटवून देण्याचा प्रयत्न केला त्यांना. परंतु ते त्याचं ऐकायलाच तयार नव्हते. तसं त्याला केव्हा सुटतोय आणि केव्हा बहिणीला भेटतोय असं होवून गेलं होतं.
जोल काही बिघडलेला मुलगा नव्हता. तरीही त्याला भीक मागतांना पकडण्यात आलं व एक बिघडलेला मुलगा म्हणून त्याचेवर आरोपही ठेवण्यात आला आणि त्यानुसार त्याला सुधारगृहातही ठेवण्यात आलं. शिवाय त्याच्या कोणत्याच समस्येकडं लक्षही पुरवलं गेलं नाही.
जोलच्या मनात बरंच काही होतं. बरंच काहीतरी व्यक्त करावंसं वाटत होतं. परंतु ते कोणी ऐकणारं नव्हतं. कारण ते त्याचं गाव नव्हतं आणि तिथं माणुसकीही नव्हती. तसं पाहिल्यास जोलचं गाव काही लहान गाव नव्हतं. ते लोकसंख्येच्या दृष्टीकोनातून विशाल गाव होतं.
ते सुधारगृह सुधारगृहच होतं. त्या सुधारगृहात बरीच मुलं होती. जी गुन्हेगारी करता करता मोठी झाली होती व ती मुलं गुन्हेगारी करुनच या सुधारगृहात आली होती. तसं पाहिल्यास त्यांना सवयही नव्हती कोणत्याच स्वरुपाची.
जोल ज्यावेळेस तिथं आला. तेव्हा त्यानं तीनचार दिवस जेवनही केलं नव्हतं. सारखी त्याला जयाची आठवण येत होती. ती इवलीशी आपली बहीण....... कशी असेल, याची चिंता त्याला लागली होती. अशातच तीनचार दिवस निघून गेले होते. त्यालाही भूक फार लागली होती. वाटत होतं की घराशेजारचे कोणी ना कोणी तिची काळजी घेतीलच. असा विचार करुन तो आता जेवायला लागला होता.
जेवन तसं पाहता रुचकरच असायचं बाहेरच्या जगाच्या मानानं. कारण ना त्याला स्वयंपाक बनवता येत असे. ना आगपेटी उजळता येत असे. ते जीवनही त्याला आल्हाददायक व आरामदायकच होतं. कारण बाहेरच्या जगात त्याला जेवन देणारं कोणीही नव्हतं. तेवढी मात्र सोय त्याची झाली होती. परंतु ते जेवन जरी रुचकर असलं तरी त्याला जेव्हा जेव्हा जयाची आठवण येत असे. तेव्हा जीव अगदी कासावीस होवून जात असे.
ते सुधारगृह सुधारणा करण्याचं काम करीत असे. सकाळ सायंकाळ तिथं प्रार्थना होत असे. त्यानंतर कधी भजन तर कधी किर्तन होत असे. कधी प्रबोधनाचे कार्यक्रमही होत असत. त्यानंतर ज्या मुलांना काही बोलायचं असेल, त्याला बोलायची संधी दिली जात असे.
त्या सुधारगृहात तसं पाहिल्यास कोणताच मुलगा बोलत नव्हता विचारपीठावर. तेवढी प्रगल्भता नव्हती त्यांच्यात. तसं पाहिल्यास ज्याची कोणाची सुटका त्या सुधारगृहातून व्हायची. तोच फक्त काय तो आपले विचार व्यक्त करीत असे. बाकीच्यांना तसं बोलायची संधी असली तरी ते घाबरत असल्यानं बोलत नसत.
त्या सुधारगृहात काही नियमही बनवले होते व ते नियम मोडल्यास कडक शिक्षादेखील केल्या जात असत. त्याचा उद्देश होता धाक ठेवणे. अशा शिक्षा त्या सुधारगृहात जास्त दिवस राहात असलेली मुलं द्यायची. ती मुलं ज्याचं चुकलं त्याला पाठीवर चैन मारत असत. त्यामुळंच सगळी मुलं शिस्तीनंच वागत असत.
सुधारगृहात कोणालाच दयामाया नव्हती. शिवाय कोणी कोणाची इज्जत वा मानसन्मान करीत नसत. लहान लहानशी ती मुलं एकमेकांना अश्लील शिव्याही हासडत असत आणि राडाही करीत असत. त्यातच काहीजण जास्त मस्त्याही.
मुलांनी जास्त मस्त्या करु नये म्हणून त्याला शिक्षा ही कधी जेवनाचीही दिली जायची. कधीकधी तो सुधारायला हवा म्हणून त्याला जेवनही मिळत नसे. तसं पाहिल्यास सामान्य शिक्षा बऱ्याच होत्या.
जेवन हे प्रार्थनेनंतरच मिळायचं. जे प्रार्थनेला हजर असतील, त्यांनाच जेवन मिळायचं. बाकीचे उपाशी राहात. म्हणूनच कोणताच मुलगा प्रार्थना चुकवत नसे.
मुलांना सुधारगृहात निव्वळ जेवन व झोप एवढ्याच गोष्टी पुरवल्या जात नव्हत्या, तर त्यांच्या शिक्षणाचीही व्यवस्था सुधारगृहात केल्या गेली होती. शिक्षण हे शाळेसारखं नव्हतंच तर त्या शिक्षणात प्रात्यक्षिक ज्ञानावर भर दिला जात असे. प्रात्यक्षिक ज्ञान अर्थात त्याला काही वस्तू बनविण्याची कल्पना दिली जात असे. त्या वस्तू त्यांचेकडून बनवून घेतल्या जात होत्या. जेणेकरुन ते तेथून गेल्यावर आपल्या जीवनात तशा प्रकारचा उद्योग करुन आपलं पोट भरु शकतील. या सुधारगृहात क्रमशः मातीपासून विवीध वस्तू बनवणे, बांबूपासून विविध वस्तू बनवणे, कागदापासून वेगवेगळ्या कलाकृती बनवणे, चामड्यापासून कलाकृती बनवणे एवढंच नाही तर लाकडापासून वेगवेगळ्या वस्तू बनविण्याचं प्रशिक्षण सुधारगृहात मिळत होतं.
जोलला आज चार वर्ष झाले होते व तो सुधारगृहात रमला होता. शिवाय त्याच्या शिक्षणाची हौस पुर्ण झाली होती. जी आवड त्याच्या लहानपणी त्याच्या आयुष्यात होती.
जोल सुधारगृहात होता. तसा तो लहानपणीच्या आवडीच्या वस्तू बनवीतच होता. त्यातच तो निरीक्षणही करीत असे लहानपणी. तो दगडं पाण्यात मारत असे व त्या पाण्यात तरंग निर्माण होताच त्याचं निरीक्षण करीत असे. ते का निर्माण होतात? याचं त्याला कुतूहलही वाटत असे. तसं पाहिल्यास त्याला शास्रज्ञ बनावंसं वाटत होतं. परंतु ती आशा त्याची फोल ठरली होती. मात्र कल्पनेच्या भरवशावर तो त्या सुधारगृहात वस्तू बनविण्याचं तंत्रज्ञान शिकला होता. नव्हे तर त्या गोष्टीमध्ये तो तरबेज झाला होता.
जया लहान होती. तिलाही आता सवय पडली होती एकटं राहायची. विधात्यानं तिला जी बुद्धी दिली. ती बुद्धी तिची लवकरच विकसीत केली होती. आता ती, ती लहान जरी असली तरी सक्षमपणे एकटी राहू शकत होती.
जया आताही उकीरड्यावरचंच खात होती. कारण तिला आताही आगपेटी पेटवता येत नव्हती. आजही ती अंधारातच राहात असे. कारण तिला घरी उजेड करता येत नसे. तसं पाहिल्यास तिच्या झोपायचाही ठिकाणा नव्हता. कधी ती उकीरड्यावरच प्राण्यांच्या सानिध्यात झोपून जात असे तर कधीकधी ती घरी येत असे. शाळेत ती जात असे, तिही खिचडी मिळते म्हणून. तसं पाहिल्यास तिला स्वतःची अंघोळ स्वतःच करता येत नसल्यानं व केसंही नीट विंचरता येत नसल्यानं तिची अवस्था अतिशय बिकट झाली होती. मात्र तिच्या मनात आज प्राण्यांबद्दल सहानुभूती निर्माण झाली होती.
जयाचं घर कौलारु होतं. ते घर पडत चाललं होतं. कारण उन्हाळ्यात व हिवाळ्यात पाऊस नसायचा, तेव्हा माकडं यायची व ती माकडं त्या कौलारावर उड्या मारायची. त्यानं कौलाचा अक्षरशः चुराडा झाला होता. त्यातून पाणी गळत होतं व ते पाणी कौलाच्या खाली असलेल्या भींतीवर पडत होतं. त्या पाण्यानं भींती ओल्या होवून पडत चालल्या होत्या.
जयाला अंथरुण म्हणून जमीन होती आणि पांघरुण म्हणून आकाश. तसंच मित्रमंडळ म्हणून ते प्राणी. ज्या प्राण्यांवर प्रेम करायची त्या इवल्याशा वयात. त्यांची काडीनं पाठ खाजवून द्यायची. त्यामुळं ते प्राणी तिच्या अंगाखांद्यावर खेळत असत. ते दृश्य जेव्हा लोकं पाहात असत. तेव्हा ते हरहळत असत. परंतु कोणीही तिच्याबाबत सहानुभूती दाखवत नव्हते वा तिच्याजवळ जात नसत.
ते प्राणी मात्र दयाळू होते. त्यांना दया यायची व तेच प्राणी जयाची दया घेवून कधी तिला भाकरतुकडा वा कधी तिला एखाद्या घरची शिजलेली पोळी चोरी करुन आणून द्यायचे. त्यात ती भुमिका कधी मांजरी तर कधी कुत्री वा कधीकधी कावळ्यासारखे प्राणीही निभावायचे. जणू ती त्यांची मागील जन्मातील नातेवाईकच असेल.
जयाही हळूहळू मोठी होवू लागली होती. परंतु आताही ती आगपेटी उजळवणं शिकली नव्हती. ना आताही तिला स्वयंपाक बनवता येत होतं. कारण त्या गोष्टी तिला कोणीच शिकवल्या नव्हत्या वा कोणीच शिकवायला तयार नव्हतं. मात्र कधी उकीरड्यावरचं शिळंपातं, आंबटलेलं खावून तर कधी एखाद्यावेळेस कुत्र्या मांजरीनं चोरुन आणलेलं ताजं अन्न खावून ती दिवस काढत होती.
जयाला घर म्हणून नव्हतंच काही. कधी ती एखाद्या झाडाच्या खाली झोप घेत असे तर कधी एखाद्या रस्त्याच्या कडेला. तसं पाहिल्यास लहानपणी साधी झुरळालाही घाबरणारी जया आता कुठंही झोपत होती. कुठंही राहात होती. कुठंही खात होती आणि कुठंही अधिवास करीत होती. ती आता बावळट वाटू लागली होती व गावभर हिंडू लागली होती. परंतु असं कुठंही झोपतांना वा वावरतांना तिला कोणतीही वा कुणाचीही भीती वाटत नव्हती. लोकं जयाला वेडी म्हणू लागले होते. परंतु ती वेडी नव्हती. तर ती एक शहाणी मुलगी होती.

************************************************

जॉन शहरात शिकायला गेला होता. त्याचं नशीब चांगलं होतं. कारण त्याचे आईवडील दोघंही जीवंत होते. त्याच्या आईवडीलानं त्याची चांगली परवरीश केली होती व आज तो चांगल्या गुणांकनानं पास होवून एका मोठ्या अवकाश केंद्रात नोकरीला लागला होता. आता त्याला ना ते गाव आठवत होतं. ना त्याला जोल आठवत होता ना त्याची बहीण जया.
जॉन एका कंपनीत काम करीत होता. जी कंपनी अवकाशाशी संबंधित होती. ज्या कंपनीतून अवकाशयान अवकाशात पाठवले जात असे.
ते अवकाश यान. त्या अवकाश यानात वातानुकूलीत सोयी होत्या. जॉनला वाटत होतं की पृथ्वीवर झाडं नाही. त्यामुळंच ओझोनची मात्रा कमी होत आहे. म्हणूनच तापमान वाढ होत आहे. शिवाय प्रदुषण होत आहे. त्याचाही परिणाम वातावरणीय सृष्टीवर होत आहे. सृष्टीचा विनाश होत आहे आणि हीच परिस्थिती जर अशीच सुरु राहिली तर कधी काही काळानं पृथ्वीवरील वातावरणच नाही तर पृथ्वीच नष्ट होईल. त्यासाठी देशानं आतापासूनच सुरुवात करायला हवी आणि अवकाशात पाऊल ठेवायला हवं. जेणेकरुन आपल्या पिढीला पुर्ववत आयुष्य जगता येईल.
जॉनला तसं वाटताच त्यानं अवकाश यान बनविणे व अवकाश यान प्रक्षेपण करण्याची संकल्पना डोक्यात आणली.
अवकाश यान बनविण्याची व प्रक्षेपण करण्याची त्याची संकल्पना. ती वृद्धींगत करण्यासाठी तो करीत असलेले प्रयत्न. त्यातच त्यानं. पृथ्वीपल्याडची पहिली मोहिम हातात घेतली व ती पहिमी मोहीम चांद्रयान एक होती. एक चांद्रयान, जो चंद्राच्या कक्षेत यशस्वीरित्या प्रवेश करणार होता.
चंद्र........ जॉन जेव्हा लहान होता. तेव्हा त्याची आजीआजोबा, त्याचे आईवडील एवढंच नाही तर नातेवाईक सांगायचे की तो आपला मामा आहे. मग जॉनला तो अगदी जवळचा वाटायचा. वाटायचं की तोही आपल्या पृथ्वीसारखाच असेल, तिथंही मानवी वस्तीच असेल.
जॉनला आवडायचा चंद्र. त्याचबरोबर आवडायचं तिथं जाणंही. परंतु कसं जाणार? तो अगदी लहान होता व त्याच्या बालपणात चांद्रयानाचा शोधही लागलेला नव्हता.
जॉन जेव्हा मोठा झाला. तेव्हा त्याला वाटलं की आपण आपल्या लहानपणी ज्या चंद्राला मामा म्हणायचो. त्या मामाच्या गावाला जायचं. परंतु त्या मामाचं गाव काही जवळ नव्हतं आणि तिथं कशा प्रकारचं वातावरण आहे तेही त्याला कळत नव्हतं. परंतु त्याच्या मनात इच्छाशक्ती अफाट होती. ज्या इच्छाशक्तीतून चंद्राला गवसणी घालता येत होती.
त्यानं चांद्रयान पहिलं बनवायची कल्पना मांडली. ती कल्पना पुर्ण रुपात आणण्यासाठी त्यानं सर्वप्रथम यान बनवायचं ठरवलं. परंतु यान बनविण्यासाठी कितीतरी रुपये खर्च येणार होता. ज्यात सामान तर लागणार होतं. शिवाय मनुष्यबळही लागणार होतं. जे मनुष्यबळ कमी पैशात काम करणारं नव्हतं. शिवाय साधनं तर उपलब्ध करताही येत होती. परंतु मनुष्यबळ कसं उपलब्ध करता येईल हा विचार होता.
जॉन चांद्रयान बनविण्यावर विचार करीत होता. परंतु चंद्रावर जाणार कोण हा विचार त्याच्या मनात होता. कारण चंद्राचा जरी दुरुन अभ्यास केल्या गेला असला तरी प्रत्यक्षात तिथं परिस्थिती कोणती आहे, त्याची कल्पना त्याला नव्हती. त्यासाठी त्यानं विचार केला. विचार केला की आपण चंद्रावर जे यान पाठवायचं. ते यान मानवरहीत पाठवायचं. जेणेकरुन ते यान ध्वस्त झालंच तर माणसांना क्षती पोहोचणार नाही. तसं पाहिल्यास जॉनला माहिती होती चांद्रयान मोहीमेतील. कारण त्यापुर्वी देशानं चांद्रयान मोहिमा व मंगळयान मोहिमा राबवल्या होत्या. परंतु त्याला पुन्हा चांद्रयान व मंगळयान मोहिमा राबवायच्या होत्या.
चांद्रयान मोहीम. त्या चांद्रयान मोहिमेचे काही टप्पे बनवले जॉननं. त्यात मुख्य दोन टप्पे होते. एक टप्पा होता, चंद्राला प्रदक्षिणा मारणारा तर दुसरा टप्पा होता, चंद्रावर आदळणारा अर्थात चंद्रावर थेट उतरणारा.
पृथ्वीवर होत असलेला विनाश व सृष्टीचा विध्वंस होण्याची भावना लक्षात घेवून जॉननं अवकाशात राहण्याची स्थळे शोधण्याची मोहीम सुरु केली होती. त्याला वाटत होतं की चंद्रावर पाणी असू शकतं. त्यामुळंच चंद्राचा अभ्यास करावा. त्यासाठी चंद्रावर आधी मानवरहीत यान पाठवायचं. त्यानंतर त्यानं विचार केला की ज्या ज्या ग्रहांवर पाणी व मानवाला जीवंत राहण्यालायक वातावरण असेल, त्या त्या ग्रहांचा अभ्यास करायचा. त्यासोबतच सुर्य आणि सुर्यमालेचा.
सुर्य हा एक विशालकाय तारा असून तो सूवयंप्रकाशीत आहे व त्या ताऱ्यापासून इतर ग्रहांना प्रकाश मिळत असतो. सुर्य व ते ग्रह आणि त्या ग्रहांचे सर्व प्रकारचे उपग्रह, हे सर्व धरुन सुर्यमाला तयार होत असते. तसं पाहिल्यास अवकाशात फक्त आपली एकच सुर्यमाला नाही तर अशा अनेक सुर्यमाला आहेत
सुर्यमाला ही सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्याच्या भोवती फिरणाऱ्या खगोलीय वस्तूंनी बनलेली असते. सूर्यमालेत आठ मुख्य ग्रह, त्यांचे आत्तापर्यंत माहीत झालेले १६५ चंद्र, पाच लघुग्रह प्लूटोसह, तसेच असंख्य छोट्या वस्तू यांचा समावेश होतो. छोट्या वस्तूंमध्ये उल्का, धूमकेतू, कायपरचा पट्टा, लघुग्रहांचा पट्टा तसेच ऊर्टचा मेघ यांचा समावेश होतो.
सर्वसाधारपणे, सूर्यमालेत एकंदर पुढील विभाग करण्यात येतात. सूर्य, पृथ्वी, शुक्र, बुध, मंगळ व गुरू यांमधील लघुग्रहांचा पट्टा, चार वायुमय बाह्यग्रह व कायपरचा पट्टा. कायपरचा पट्ट्यापुढे अतिशय विखुरलेली चकती व शेवटी ऊर्टचा मेघ. सुर्यापासूनच्या अंतराप्रमाणे ग्रह असे आहेत. बुध, शुक्र हे अंतर्ग्रह, पृथ्वी, मंगळ, गुरू, शनी, युरेनस (हर्षल) व नेपच्यून (वरुण) हे बाह्यग्रह. आठ पैकी सहा ग्रहांच्या भोवती नैसर्गिक उपग्रह आहेत तर बाह्य ग्रहांच्या भोवती कडी आढळतात. पाच बटुग्रह म्हणजे प्लूटो, लघुग्रहांच्या पट्ट्यातील सेरेस, कायपरचा पट्ट्यातील एरिस, हौमिआ व माकीमाकी. या पाच पैकी तीन बटुग्रहांभोवती चंद्र आहेत. सूर्याभोवती फिरणाऱ्या खगोलीय वस्तूंचे तीन मुख्य वर्गात वर्गीकरण केले जाते. ग्रह, लघुग्रह व सूर्यमालेतील छोट्या वस्तू. ज्यांना इतके वस्तुमान आहे की ती स्वतःच एका गोलात रूपांतरीत होऊ शकते, अशा वस्तूला ग्रह हे नाव दिले जाते. ग्रहाच्या जवळील अवकाशात सूर्याभोवती फिरणाऱ्या इतर छोट्या वस्तू नसतात. ते ग्रह असतात. त्यांना अनुक्रमे नावे आहेत. बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस उर्फ हर्शल व नेपच्यून उर्फ वरुण.
चोवीस ऑगस्ट २००६ ला आंतरराष्ट्रीय संघटनेने प्लूटोचे वर्गीकरण ग्रहांमधून बटुघुग्रहामध्ये केले. त्याच वेळी सेरेस व एरिस यांनाही बटुग्रहांचा दर्जा दिला गेला.
एका बटुग्रहाजवळील अवकाशात इतर खगोलीय वस्तूंचे अस्तित्व असू शकते. लघुग्रहांमध्ये गणना होणाऱ्या इतर खगोलीय वस्तू म्हणजे सेडना, ऑर्कस व क्वाओर.
प्लूटो हा त्याच्या शोधापासून म्हणजेच १९३० पासून सुर्यमालेतील नववा ग्रह मानला जात होता. पण वीसव्या शतकाच्या शेवटी सुर्यमालेतील बाहेरच्या भागात प्लूटोसारख्या अनेक वस्तू शोधण्यात आल्या. यापैकी मुख्य म्हणजे प्लूटोपेक्षा आकाराने मोठा असणारा एरिस. सुर्याभोवती फिरणाऱ्या इतर खगोलीय वस्तूंना एकजात छोट्या वस्तू असे म्हणतात. सुर्यमालेतील ज्या खगोलीय वस्तू सुर्याभोवती न फिरता ग्रह, लघुग्रह अथवा छोट्या वस्तूंभोवती फिरतात, त्यांना नैसर्गिक उपग्रह किंवा चंद्र म्हणतात. प्रत्येक ग्रह हा सूर्याभोवती फिरताना लंबवर्तुळाकार कक्षेत फिरतो. त्यामुळे ग्रहाच्या एका प्रदक्षीणेदरम्यान त्याचे सुर्यापासूनचे अंतर बदलत राहते. सुर्यमालेतील अंतरे मोजताना खगोलशास्त्रज्ञ साधारणपणे खगोलीय एकक हे एकक वापरतात. एक खगोलीय एकक म्हणजे सूर्य व पृथ्वी यांच्यातील सरासरी अंतर. हे अंतर जवळ जवळ १४,९५,९८,००० कि.मी. म्हणजेच ९,३०,००,००० मैल इतके आहे. याप्रमाणे गुरू ग्रहाचे सूर्यापासून अंतर सुमारे ५.२ ए यु आहे तर प्लुटोचे सुमारे ३८ ए यु इतके आहे. अंतरे मोजण्याचे दुसरे परिमाण म्हणजे प्रकाशवर्ष. एक प्रकाशवर्ष म्हणजे सुमारे ६३,२४० खगोलीय एकके इतके अंतर.
क्लेमेंटाईन यानाने चंद्राच्या मागून घेतलेल्या सुर्यमालेच्या छायाचित्रानुसार सुर्यमालेतील प्रमुख वस्तू म्हणजे सुर्य होय. सुर्याचे वस्तुमान सुर्यमालेतील एकंदर ज्ञात वस्तुमानाच्या सुमारे ९९.८६% इतके आहे. इतक्या प्रचंड वस्तुमानामुळेच सुर्याची गुरुत्वाकर्षण शक्ती इतर वस्तूंना त्याच्या भोवती फिरावयास लावते. उरलेल्या वस्तुमानाच्या ९०% पेक्षा अधिक वस्तुमान हे गुरू व शनी या ग्रहांमध्ये आहे. सुर्याभोवती फिरणाऱ्या जवळजवळ सगळ्या मोठ्या वस्तू एकाच पातळीत सुर्याभोवती फिरतात. ग्रहांची परिभ्रमणाची पातळी ही पृथ्वीच्या भ्रमणाच्या पातळीच्या जवळपास आहे तर धूमकेतू व कायपरचा पट्टा यांची परिभ्रमणाची पातळी ही पृथ्वीच्या भ्रमणाच्या पातळीशी काही अंशांचे कोन करते. सूर्यमालेतील वस्तूंच्या सूर्याभोवती फिरण्याची पातळी परिमाणात सुर्याच्या भोवती फिरणारे ग्रह व इतर अनेक वस्तू या सूर्याभोवती घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरतात. याला काही अपवाद आहेत, युरेनस, हॅलेचा धूमकेतू आदी सर्व ग्रह स्वतःभोवती अँटीक्लाॅकवाईज म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरतात, अपवाद शुक्र हा ग्रह. तो क्लाॅकवाईज म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेत फिरतो.
सुर्याच्या भोवती फिरणाऱ्या वस्तू या केप्लरच्या सिद्धान्ताप्रमाणेच फिरतात. प्रत्येक वस्तू ही एका लंबवर्तुळाकार कक्षेत फिरते. त्या कक्षेच्या एका केंद्रस्थानी सुर्य असतो. सुर्याच्या जितक्या जवळ ती वस्तू येईल, त्याप्रमाणात तिचा फिरण्याचा वेग वाढतो. ग्रहांच्या कक्षा या जवळ जवळ वर्तुळाकार आहेत. म्हणजे दोन्ही केंद्रस्थाने खूप जवळ आहेत, तर धूमकेतू व कायपरचा पट्ट्यातील काही वस्तूंच्या कक्षा या फारच लंबवर्तुळाकार आहेत.
सुर्यमालेतील असणारी खूप लांब अंतरे दाखविण्यासाठी अनेक जण ग्रहांच्या कक्षा या सारख्या अंतरावर दाखवितात. पण प्रत्यक्षात मात्र ग्रह सुर्यापासून जितक्या दूर तितकीच आधीच्या ग्रहापेक्षा त्याची कक्षा लांब अंतरावर आढळते. उदा. शुक्र हा बुधापासून ०.३३ ए यु अंतरावर आहे, तर शनी हा गुरूपासून ४.३ ए यु इतका दूर आहे. तसेच नेपच्यूनची कक्षा ही युरेनसपेक्षा १०.५ ए यु इतक्या अंतरावर आहे. अनेक जणांनी या अंतरांमधील संबंध शोधण्याचे प्रयत्‍न केले आहेत, पण अजूनतरी याबद्दल समाधानकारक स्पष्टीकरण उपलब्ध नाही.
सूर्यमालेची निर्मिती ही तेजोमेघ सिद्धान्ताप्रमाणे झाली असल्याचे. या सिद्धान्ताप्रमाणे ही निर्मिती एका मोठ्या रेणूंच्या ढगाच्या कोसळण्यामुळे सुमारे ४.६ अब्ज वर्षांपूर्वी झाली असे शास्रज्ञच मानतात. ते पुढे म्हणतात की हा रेणूंचा ढग कित्येक प्रकाशवर्षे अंतरावर पसरला होता व त्यापासून अनेक ताऱ्यांची निर्मिती झाली. जुन्या धूमकेतूंचा अभ्यास केला असता असे प्रकर्षाने जाणवते की त्यांच्यावर फक्त मोठ्या फुटणाऱ्या ताऱ्याच्या गाभ्यात आढळणारी मूलद्रव्ये सापडली आहेत. यामुळे सूर्य हा जवळपास झालेल्या तारकासमूहातील स्फोटामुळे तयार झाल्याचा निष्कर्ष निघतो. या स्फोटामुळे तयार झालेली ऊर्जा ही या तेजोमेघाच्या कोसळण्याला कारणीभूत असण्याची शक्यता आहे. म्हणतात की सुर्यमाला ज्या तेजोमेघापासून तयार झाली, त्याचा व्यास सुमारे सातहजार ते वीसहजार खगोलीय एकके इतका होता. तसेच त्याचे वस्तुमान हे सुर्यापेक्षा थोडेसे जास्त म्हणजेच सुमारे १ ते १०% होते. हा तेजोमेघ जेव्हा कोसळला, तेव्हा कोनीय बलामुळे त्याचा फिरण्याचा वेग वाढत गेला. जसेजसे त्याच्या केंद्रस्थानी वस्तुमान वाढत गेले, तसे त्याचे केंद्रस्थान इतर भागांपेक्षा जास्त गरम होत गेले. त्यानंतर त्या तेजोमेघावर गुरुत्वाकर्षण, वायूंचा दबाव, चुंबकीय प्रभाव तसेच त्यांच्या सतत फिरण्याने येणारे बल, यांचा प्रभाव वाढला व तो एका तबकडीमध्ये रूपांतरीत झाला. या तबकडीचा व्यास सुमारे दोनशे खगोलीय एकके इतका होता. तसेच त्याच्या केंद्रस्थानी एक उदयोन्मुख तारा होता.
टी टौरी तारे सूर्यापेक्षा तरुण आहेत. त्यांच्या भोवतीसुद्धा अशाच तबकड्या आढळतात. या तबकड्यांचा व्यास काही किलोमीटर असून त्यांचे कमाल तापमान हे सुमारे १००० केल्व्हिन म्हणजेच सुमारे ७२७° सेल्सियस इतके आहे.
सुर्य दर सेकंदाला चार कोटी टन हायड्रोजन अणुइंधन वापरतो. सुर्य सतत जळत राहतो. सुर्याचे तापमान हजारो अंश सेल्सियस आहे. सुर्य हा तारा आपल्या सुर्यमालेच्या केंद्रस्थानी आहे. पृथ्वी व सुर्यमालेतील इतर पदार्थ जसे, ग्रह, उल्का, लघुग्रह, धूमकेतू आणि धूळ. हे सर्व घटक सुर्याभोवती प्रदक्षिणा घालत असतात. सुर्य हा सुर्यमालेतील एक तप्त गोळा आहे. सुर्यमालेतील एकूण वस्तुमानापैकी ९९% पेक्षा जास्त वस्तुमान एकट्या सुर्यामध्ये आहे. सुर्यापासून पृथ्वीचे सरासरी अंतर जवळजवळ १५ कोटी किलोमीटर किंवा ९ कोटी ३० लाख मैल आहे. सुर्यप्रकाशाला पृथ्वीवर पोचायला ८.३ मिनिटे लागतात. या प्रकाशाच्या ऊर्जेमुळे प्रकाश-संश्लेषण नावाची एक जैव-रासायनिक अभिक्रिया होते. ही अभिक्रिया पृथ्वीवरील जीवनाचा आधार आहे. सुर्याचा पृष्ठभाग हायड्रोजन, हेलियम, लोह, निकेल, ऑक्सिजन, सिलिकॉन, सल्फर, मॅग्निशिअम, कार्बन, नियॉन, कॅलशियम, क्रोमियम आदी घटकांपासून झाला आहे. यापैकी हायड्रोजनचे प्रमाण ७४% आणि हेलियमचे प्रमाण २४% आहे.
मंगळ व गुरू या दोन ग्रहांच्या दरम्यान काही अवकाशस्थ दगड व ग्रहसदृश अवकाशीय वस्तू आहेत. परंतु त्यांचे वस्तुमान व कक्षा या ग्रहांसारख्या नसल्यामुळे त्यांना लघुग्रह असे म्हणतात. या लघुग्रहांना एकत्रितपणे लघुग्रहांचा पट्टा असे संबोधतात. ४.६ अब्ज वर्षांपूर्वी, सुर्यमालेच्या निर्मितीच्यावेळी ग्रह न होऊ शकलेले गुरू अणि मंगळाच्या कक्षांमधल्या रिकाम्या जागेत फिरत असणाऱ्या अशनींना लघुग्रह म्हणतात. ९४५ कि.मी. व्यासाचा सेरेस हा सर्वांत मोठा लघुग्रह आहे. १०० कि.मी. पेक्षा अधिक व्यास असलेले एकूण ७ लघुग्रह आहेत. शास्रज्ञांनी आतापर्यंत सुमारे ७,८९,०६९ लघुग्रह शोधले आहेत. सर्व लघुग्रहांचे मिळून एकूण वस्तुमान पृथ्वीच्या चंद्राइतके आहे.
धूमकेतू म्हणजे उल्केसारखाच असणारा पण बर्फापासून बनलेला झाडूसारखा दिसणारे अवकाशातील एक घटक आहे. धूमकेतू अतिलंबगोलाकार कक्षेत सुर्याभोवती फिरत असतात व फिरताफिरता ते प्लूटोच्याही पुढे जातात. धूमकेतूंमध्ये घन कार्बन डायऑक्साईड, मिथेन, पाणी आणि इतर बरेच क्षार असतात.
कायपरचा पट्टा किंवा एजवर्थ-कायपर पट्टा हा नेपच्यूनच्या कक्षेपासून पुढे म्हणजे सूर्यापासून सुमारे तीस खगोलशास्त्रीय एकक ए यु. ते ५० खगोलशास्त्रीय एकक यामध्ये पसरला आहे. हा पट्टा लघुग्रहांच्या पट्ट्यासारखाच आहे, मात्र त्यापेक्षा बराच मोठा, म्हणजे जवळपास २० पट रुंद व २० ते २०० पट अधिक वस्तुमान असलेला असा आहे. लघुग्रहांच्या पट्ट्याप्रमाणेच ह्या पट्ट्यातसुद्धा मुख्यत्वे सूर्यमालेतील छोट्या वस्तू आहेत. जवळपास सर्व लघुग्रह हे पाषाण रूपात असले तरी कायपर पट्ट्यातील जवळपास सर्व वस्तू ह्या गोठलेला मिथेन, अमोनिया व पाण्याचा बर्फ ह्यांच्या बनलेल्या आहेत. प्लूटो, हौमिआ व माकीमाकी हे तीन बटु ग्रह या पट्ट्यात आहेत. सुर्यमालेतील काही ग्रहांचे उपग्रह जसे, नेपच्यूनचा ट्रायटन व शनीचा फीबी. हे याच पट्ट्यात बनले आणि नंतर त्या ग्रहांच्या गुरुत्वाकर्षणामुळे या पट्ट्यात अडकले. कायपरच्या पट्ट्यातील ज्ञात खगोलीय वस्तू, सोबत ४ बाह्य वायुग्रह दाखविले आहेत.
१९९२ च्या सुरुवातीपासून खगोलशास्त्रज्ञांना नेपच्यूनच्या पुढे अनेक छोट्या बर्फाळ वस्तू सापडू लागल्या. यांची केवळ कक्षाच नव्हे तर आकार व संरचना पण प्लूटोसारखी होती. या पट्ट्याला जेरार्ड कायपर यांच्या नावावरून कायपरचा पट्टा असे नाव देण्यात आले. कायपर हे नेपच्यूनपलीकडील वस्तूंच्या गुणधर्माबद्दल भाकीत करण्याच्या पहिल्या काही खगोलशास्त्रज्ञांपैकी एक होते. हा पट्टा अनेक धूमकेतूंचे उगमस्थान मानला जातो. खगोलशास्त्रज्ञ आता प्लूटोला कायपरच्या पट्ट्यातील सर्वात मोठी वस्तू म्हणून गणतात. कायपरच्या पट्ट्यातील वस्तूंमध्ये व धूमकेतूंमध्ये अनेक समानता आहेत. जसे, सौरवाऱ्यामुळे धूमकेतूंप्रमाणे प्लूटोचाही पृष्ठभाग अंतराळात भिरकावला जात आहे. जर प्लूटोला सुर्यापासून पृथ्वीइतक्या अंतरावर ठेवले तर त्याचीसुद्धा शेपटी तयार झालेली दिसते. जरी प्लूटोला कायपरच्या पट्ट्यातील सर्वात मोठी वस्तू मानण्यात येत असले तरी....... प्लूटोपेक्षा थोड्या मोठ्या असलेल्या ट्रायटनचे वातावरण, तसेच त्यावरची भूरचना, यांबाबतीतील अनेक गुणधर्म प्लूटोसारखेच आहेत. यामुळे अनेक शास्त्रज्ञांची अशी समजूत आहे की ट्रायटन आधी कायपरच्या पट्ट्यात होता व नंतर तो नेपच्यूनच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्याच्या भोवतीच्या कक्षेत अडकला.
ऊर्टचा मेघ हा अब्जावधी बर्फाळ वस्तूंचा एक काल्पनिक गोलाकार ढग आहे. हा ढग सर्व दीर्घ कक्षेच्या धूमकेतूंचा स्रोत असल्याचे आणि सुर्याला सुमारे ५०,००० ए यु सुमारे १ प्रकाश-वर्ष (ly)) ते १००,००० ए यु (१.८७ प्रकाश-वर्ष) पर्यंत वेढत असल्याचे मानले जाते.
सुर्याचा शोध तेव्हा लागला, जेव्हा बिगबँग नावाची भौतिक घटना घडून आली तेव्हा सूर्य आणि त्याच्याभोवती आठ ग्रहांचा उगम झाला त्याला सुर्यमाला असे संबोधिले गेले. त्यानंतर बटुग्रह नावाच्या नवीन ग्रहाचा सुर्यमालेमध्ये समावेश केला गेला. सध्याच्या अभ्यासकांमध्ये सूर्य आणि त्याभोवती नऊ ग्रह अशी सुर्यमाला आहे.
जॉननं सुर्य, सुर्यमाला, धुमकेतू, बटुग्रह, ग्रह, लघुग्रह, कायपरचा पट्टा, ऊर्टचा मेघ इत्यादी गोष्टी जाणून घेतल्या होत्या. त्यासाठी त्यानं अनेक पुस्तके चाळली होती. तसंच त्यानं स्मार्टफोनमधील गुगलचा वापरही केला होता. त्यात बऱ्याच गोष्टी दिल्या होत्या. ज्यातून त्याला बरीच माहिती मिळालेली होती. परंतु त्यानं ती सर्व माहिती जी वाचली होती. त्या संशोधनात त्याला शास्रज्ञांना आलेलं अपयशच दिसत होतं. तो तर मानवरहीत यान बनवून चंद्रावर पाठवू पाहात होता. परंतु जेव्हा त्यानं संशोधन करतांना पुस्तका चाळल्या. तेव्हा त्याला आढळलं की बऱ्याच देशानं आपआपले स्वतंत्र यान मंगळावर व चंद्रावर पाठवले होते. ज्यात मानवही गेला होता पाणी आणि वातावरण शोधण्यासाठी. परंतु त्यांना त्या यानांवर काहीच गवसलं नव्हतं. तसेच शास्रज्ञ सुर्याचा अभ्यास करण्यासाठी सुर्याच्याही जवळ गेले होते परंतु त्यांना पृथ्वीवासीय जीवसृष्टीला ठेवण्यासाठी कुठेच पृथ्वीसारखं वातावरण मिळालं नाही.
आज जॉन मोठा झाला होता व त्यानं जरी वाचलं होतं की चंद्र आणि मंगळावर माणूस गतकाळात गेला आहे. मंगळयान व चांद्रयान मोहीमा राबविल्या आहेत. परंतु तेथे मानवाला राहण्यालायक पोषक वातावरण मिळालं नाही आणि त्या शास्रज्ञांना अपयश आले. तरीही त्यानं प्रयत्न सोडले नव्हते. तो लागूनच होता अंतिम ध्येयापर्यंत. जे ध्येय होतं अवकाशात पाणी व पृथ्वीवासीय लोकांसाठी पृथ्वीसारखं वातावरण शोधणं. जेणेकरुन पृथ्वी नष्ट जरी होत असली तरी पृथ्वीवासीय लोकांना सुरक्षीत स्थळी पोहोचवता येईल.

************************************************

जया आज थोडी मोठी झाली होती. त्याचबरोबर तिचं संपूर्ण आयुष्यच कचराघरात गेलं होतं. ती शिकतही होती शाळेत शिक्षणाचे वारे. खिचडीच्या निमीत्यानं का होईना, आज ती शिक्षणाबरोबरच थोडी हुशारही झाली होती. शिवाय आता तिला आगपेटीही पेटवता येत असे व चूलही फुकता येत होती.
ती थोडी मोठी होताच तिला समजदारीपणा आला होता व ती गावातच कोणाचीही भांडीकुणी करायला लागली होती. त्यात जो काही थोडासा पैसा येत होता. त्या पैशात ती खायच्या प्यायच्या वस्तू आणत होती. शिवाय आता तिचे दारिद्र्याचे व उकीरड्यावरच्या खानपानाचे जीवन पुरते संपलेच होते व आता ती खाण्यापिण्यासोबतच पुरेसे कपडेलत्तेही चांगले घेत असे.
जया एकटीच राहात होती. तिला आता झुरळाची भीती वाटत नव्हती. ना वाटत होती माणसाच्या मेलेल्या भावनांची भीती. जी माणसं माणुसकीत नव्हती. त्या माणसांबद्दल व जास्त करुन नातेवाईकांबद्दल तिच्या मनात प्रेम नव्हतं. कारण त्यांनी जेव्हा तिला गरज होती, तेव्हा तिला मदत केली नव्हती. आज ती शिकली व दहावीही पास झाली होती.
ती शाळा....... ती शाळा दहावीपर्यंतच होती. तसं पाहता जयाला पांघरायला आकाशाचं पांघरुण व अंथरायला जमीनीची शालच होती. घर पुर्णतः पडलेलं असून ती पाऊस आल्यास एखाद्याच्या घराच्या आडोशालाच झोपायची किंवा एखाद्या झाडाखालीच. परंतु तिनं शिक्षण सोडलं नव्हतं. हळूहळू खिचडीनं पोट भरतं. म्हणून ती शाळेत जायची. तशीच त्या खिचडीतूनच तिची शिक्षणाची ओढ वाढवली होती व आज ती दहावी झाली होती.
जया दहावी झाली होती. परंतु तिची शिक्षणाची हौस पुर्ण झाली नव्हती. तिला शिकायचं होतं पुढंही. तसं तिनं अकरावीला प्रवेश घेतला होता. मात्र अकरावी ही गावात नसल्यानं ती शहरात शिक्षण शिकायला आली होती. आता शहरात तिनं अकरावीत प्रवेश तर मिळवला होता. परंतु राहायला घर नसल्यानं ती आता फुटपाथवर राहू लागली होती आणि तेथूनच ती शिकू लागली होती परंतु तिथंही कधीकधी पोलिसांची गाडी यायची. ती मंडळी विनाकारणचा त्रास द्यायची. कधी रात्रीच्या वेळेस तरुण मुलगी पाहून नराधम यायचे. वाकडी नजर फिरवून जायचे. तेव्हा थोडी भीती वाटायची.
जया आज महाविद्यालयात जायला लागली होती. परंतु त्यात बरीच मोठी समस्या होती. ती म्हणजे तिला अभ्यास करता येत नसे. रस्त्यावर लाईट असायचे. परंतु अभ्यास करतांना लाज वाटायची. शिवाय हे शहर होतं व त्या शहरात कुणी ओळखीचे नसल्यानं कामं देत नव्हते. शेवटी ती विचार करु लागली. विचार होता की जगायचं कसं? तसं पाहिल्यास लहानपणी तिनं उकीरड्यावरचंही खाल्लं होतं. परंतु आता ते अन्न आवडत नव्हतं. शिवाय पैसा कमवायचा तर....... कोणी कामंही देत नव्हते. त्यामुळं उपाय नव्हता. शेवटी तिनं ठरवलं. आपण फुटपाथवर भीकच मागावी. परंतु भीक तरी मागणार कशी? कोण देणार भीक आणि ही जागा तरी सुरक्षीत तरी आहे का? याचा विचार करता करता ती जगत होती. तसं तिला ती ज्याठिकाणी स्थिरावली होती. तिथं कोणीतरी सांगीतलं होतं की तिनं रेल्वेस्टेशनचा आधार घ्यावा. तिथं भीकंही चांगली मिळते आणि चांगला अभ्यासही करता येतो.
तो कोणीतरी तिला सांगीतलेला विचार. तो विचार तिच्या मनात येताच बिचारी रेल्वेस्टेशनकडे पलायन करु लागली.
ती रेल्वेस्टेशनकडे आली होती. तिनं पाहिलं की रेल्वेस्टेशनवर बऱ्याच लोकांची गर्दी असते व बरेच लोक कडेवर लेकरु धरुन भीक मागतांना दिसतात. मग काय, ती त्याच रेल्वेस्टेशनवर भीक मागून आपले दिवस काढू लागली. तशी ती दिवसभर आपला नकाब बदलवून ठेवू लागली. इथं मात्र सुरक्षितता होती. कोणीही भुरटा व्यक्ती तिला त्रास द्यायला येत नव्हता. त्या रेल्वेस्टेशनवर अधिवास करीत असतांना दिवसभर लोकांची नजर चुकवून ती आपलं सामान रेल्वेच्या एका कोपर्‍यात ठेवत असे. तशी ती याच रेल्वेस्टेशनवर अंघोळ करुन दिवसभर शाळेत जात असे आणि सांजच्याला घरी आल्यावर आपल्या चेहर्‍यावर काळ्या रंगाचं वंगण लावत असे. ज्यातून कोणी तिला ओळखणार नाही. शिवाय एखाद्या शहरातील ओळखीच्या माणसानं ओळखलंही, तरी ती त्याला ओळख दाखवीत नव्हती. आजही ती सुखी नव्हती. कारण कधीकधी तिला भीकेतून पैसे मिळत नसत. त्यामुळंच खायचे वांदे निर्माण व्हायचे. त्यामुळंच कधीकधी रात्रभर उपासानंच तळपत पाणी पिवूनच राहावं लागायचं.
आज पावसाचा हंगाम सुरु झाला होता. रेल्वेस्टेशनवर जास्त गर्दी दिसत नव्हती. काही लोकं कमी प्रमाणात प्रवास करीत असत. शिवाय भीक म्हणून पैसे मागायला गेल्यास काही लोकं जाणूनबुजून देत नसत तसा पैसा. शेवटी विचार यायचा की बेकार हे भीकेचं जीणं. परंतु आज उपाय नव्हता. कारण दुसरे कामं तरी शहरात नव्हती आणि होती, परंतु त्या कामाच्या ठिकाणी नराधमं वसली होती. त्यांच्यात माणूसकी नव्हती. ज्या माणुसकीतून माणूसपणाची हत्या केली जात होती.
आठवीपर्यंतच्या खिचडीनं का होईना, परंतु माणुसपणाची आस निर्माण केली होती. ज्या आसेनं तिला शिक्षणाचं महत्व कळलं होतं व तिच्या मनात शिक्षणाबद्दलची आवड निर्माण झाली होती.
ते तिचं भीक मागणं. परंतु तरीही शिक्षण न सोडणं अगदी वाखाणण्याजोगंच होतं. ती घरी आली की गालावर काळा रंग लावून गालाला ओबडधोबड करायची. केसं अस्ताव्यस्त करायची व भीक मागत फिरायची आणि शाळेत जायच्या वेळेस चेहरा चांगला स्वच्छ पाण्यानं धुवायची. गालावरील काळा रंग काढायची. त्यानंतर चेहर्‍यावर पावडर लावून व केससज्जा करुन ती महाविद्यालयात जायची. कधी तिला तिच्या वर्गातील मुली रेल्वेस्टेशनवर दिसायच्या तर कधी कुठंतरी भीक मागतांना आढळायच्या. त्यावेळेस ती एकतर त्यांच्या नजरेतून ओझल व्हायची किंवा ओळख दाखवायची नाही. अशाप्रकारचं तिचं शिक्षण सुरु होतं.
शिक्षणाची आस त्यातच त्या शिक्षणाबद्दलची उत्सुकता तिला आता स्वस्थ बसू देत नव्हती. अशातच तिच्या वर्गमैत्रीणीनं एकदा तिला सल्ला दिला की तिनं एखादी अशी परीक्षा द्यावी की ज्यातून तिचं नाव होईल व तिला सरकारी नोकरी लागेल. त्यातून तिचं जीवन पालटेल.
जया शिकत होती महाविद्यालयीन शिक्षण. त्यातच त्या एका मुलीच्या सल्ल्यानुसार ती परीक्षाही देवू लागली होती. अशातच ती, ती सरकारी परीक्षा पास झाली व ती अंतराळ निरीक्षक म्हणून रुजू झाली. ज्यानुसार ती आता संशोधन करु लागली होती. मात्र ती आजही जुने दिवस विसरली नव्हती. ज्या खिचडीतून तिचं भवितव्य बनलं होतं.
जयाला लागलेली नोकरी. जी सरकारी नोकरी होती. तसं पाहिल्यास तिच्याकडे वेगळाच असा विभाग होता. ज्या विभागात जॉन काम करीत होता व जॉनही तिच्याच कंपनीत उच्च पदावर होता. तोही संशोधनाचंच काम करीत होता. मात्र ते दोघंही एकमेकांना ओळखत नव्हते.
ते एक अंतराळ संशोधन केंद्रच होतं व त्या अंतराळ केंद्राची संयोजक म्हणून जया पदावर बसली होती. सर्व फाईली तिच्याच हातातून स्वाक्षऱ्या करुन जात असत. आता तिनं रेल्वेस्टेशनवर भीक मागणंही सोडलं होतं व तिनं आता रेल्वेस्टेशनवर राहाणंही सोडलं होतं. परंतु जो परीक्षेचा अभ्यास तिनं रेल्वेस्टेशनवर केला होता. आज ती रेल्वेस्टेशनलाही विसरली नव्हती.

**********************************************************
जॉन तिच्याच कार्यालयात होता. तो आता अंतराळ यान बनविण्याच्या कामात व्यस्त होता. तो आता संपुर्ण अवकाशाचं मुल्यमापन करणार होता. त्यासाठी सगळं अवकाश फिरणार होता. ज्यात ती एकच आकाशगंगा नव्हती तर अशा अंतराळातील अनेक आकाशगंगा होत्या आणि अनेकच सुर्यासारखे तारेही होते.
जॉन जयाला ओळखत नव्हता व जयाही जॉनला ओळखत नव्हती. अशातच तिची मैत्री एका अब्दुल नावाच्या मुलाशी झाली. तिलाही आसरा हवा होताच. तो तिच्याशी गोडगोड बोलत असे. ती त्याला आपलं सुखदुःख सांगत असे व तोही त्याचं सुखदुःख सांगत असे.
अब्दुल नोकरीवर नव्हता. तसाच तो जास्त शिकलेलाही नव्हता. मात्र अब्दुल तिला सांगायचा की तो उच्चशिक्षीत आहे व मोठ्या हुद्द्यावर नोकरीवर आहे.
ते बोलणं वाढत होतं व बोलणं वाढत गेलं. तसा तिनं त्याचा इतिहासही माहीत करुन घेतला नाही व माहीत करुन घेण्याचा प्रयत्नही केला नाही. तसं बोलता बोलता तिच्या मनात अब्दुलबद्दल प्रेम निर्माण झालं. ते प्रेम वृद्धींगत होत गेलं. शेवटी तिनं निर्णय घेतला की आपण अब्दुलशी विवाह करावा.
अब्दुलशी विवाह? काही समविचारी लोकं समजवीत होते तिला की तिनं अब्दुलशी विवाह करु नये. कारण तो एक मुसलमान आहे व मुस्लीम मंडळी चांगली नसतातच. परंतु ती फक्त माणूस समजत असे सर्वांना. शिवाय तिला वाटत असे की जो समाज स्वतःला हिंदू समजतो. तो तरी चांगला असतो काय? त्याचं कारण होतं. ते हिंदू....... ज्या हिंदू लोकांची तिला तिच्या लहानपणी मदत व्हायला हवी होती. त्या हिंदू लोकांनी तरी तिला मदत केली काय? त्याचं उत्तर तिच्याजवळ नाही असंच होतं. ती त्याबद्दल लोकांना म्हणायची. तरीही लोकं तिला समजवायचे की तिनं विवाहासारखा निर्णय हा घेतांना हिंदूच मुलांशी विवाह करावा. कारण ती हिंदू आहे.
लोकांनी सांगीतलेला सल्ला. तो सल्ला काही तिला पटत नव्हता. तशी ती उच्च शिकलेली होती. शिवाय ती चांगल्या पदावर कार्यरत होती. त्यातच तिला अब्दुलही उच्च शिकलेला असून उच्च पदावर कार्यरत असलेला जाणवत होता. शेवटी तो तिचा विचार होता आणि शेवटी तो तिचा निर्णयही. त्यातच ते प्रेम होतं व प्रेम आंधळं असल्यानं जसा प्रेमात व्यक्ती आंधळा होतो, तशी तिही आंधळीच झाली होती प्रेमात. शिवाय तिचं प्रारब्धही वाईटच होतं.
प्रेमामध्ये आंधळी झालेली जया. तिनं अब्दुलशी विवाह केला व ती अब्दुलसोबत विवाहबद्ध झाली. त्यानंतर चार सहा महिने चांगले गेले. परंतु नंतर अब्दूलनं आपला रंग दाखवायला सुरुवात केली. कारण जसं लोकांनी जयाला विवाहापुर्वी समजावलं होतं की मुस्लीम लोकं चांगले नसतात. तसं त्यालाही सांगीतलं होतं की त्यानं हिंदू मुलीशी विवाह करु नये. कारण हिंदू लोकं चांगले नसतात. तशी ती नेत्यांची व राजकारण ज्यांच्या घरात असायचं. त्यांची चाल होती. शेवटी अब्दुलच्या परीवारानं विचार केला. विचार केला की आपण मुलांचीच जात. आपली बाजू मुलांचीच. पाहू, वाकवून टाकू तिला. असा विचार करुन अब्दुल तिच्याशी विवाहबद्ध झाला होता.
अब्दुव व जयाचा विवाह पार पडला होता. तसा तो सहा महिने चूप बसला. त्याच सहा महिन्यात त्याचं वास्तविक रुपही जयाला समजलं.
अब्दुल हा एक वाह्यात मुलगा होता. विवाह होताच तो एक महिना दारुही प्यायला नाही आणि कामावरही व्यवस्थीतपणानं गेला. तसं पाहिल्यास ते त्याचे दाखवायचे दात होते. परंतु एक महिना ओलांडताच तो दारुही प्यायला लागला व कामावरही जाईना झाला. तसा तो पुर्वी दारु पीत नाही म्हणायचा. परंतु आता तो सकाळ सायंकाळ दारुच्या नशेतच राहायचा.
सहा महिने झाले होते. जया नोकरीवर जात असे नित्यनेमानं. शिवाय तीच पोषत असे त्याला. ती त्याला दारुला पैसे देत नसे. तेव्हा घरात भांडणं होत. तेव्हा तो तिला सतत मारपीटही करायचा. कधी रक्तही निघायचं. परंतु ती ते सगळं सहन करीत असे आणि घरच्या भांडणाच्या गोष्टी ती कोणाला सांगत नसे. त्याचं कारण होतं की तिला लोकांनी म्हटलं होतं की प्रेमविवाह जरी करायचा असेल तर तो आपल्याच बिरादरीतील माणसांशी कर. नाही जातीतील मिळाला तरी चालेल. परंतु आपल्याच धर्माच्या माणसांशी कर. नाहीतर तुला पश्चाताप नक्कीच होईल.
सहा महिने झाले होते व या सहा महिन्यानंतर सतत कुटूंबातील ही मारझोड, त्यानं ती तंग आली होती. काय करावं सुचत नव्हतं. त्याचं कारण होतं की ती गर्भवती होती. तिच्या पोटात बाळ होतं. बाळाची ती आस. त्यामुळंच ती गर्भवती राहिली होती व त्याचमुळं ती चूप होती.
ती कमावती होती व आताही ती कामावर जात होती आणि तो तिच्याच पैशाची दारु प्यायचा व कामावरही जायचा नाही. वरुन तिला मारझोड करायचा. ते पाहून ती वैतागली होती व वाटत होतं की त्याला सोडून द्यावं. आपलं खुशाल जीवन जगावं. कधीकधी तो शुद्धीवर असायचा. तेव्हा ती त्याला म्हणत असे की त्यानं सुधरावं व कामाला जावं. तेव्हा तो म्हणत असे की तिनंच नोकरी सोडावी. ती जेव्हा नोकरी सोडेल, तेव्हाच तो कामावर जाईल.
जयाची होत असलेली ससेहोलपट. ती काही नोकरी सोडत नव्हती. कारण तिला माहीत होतं की ती एक सरकारी नोकरी आहे व तिनं नोकरी सोडल्यास तिला खुप साऱ्या समस्या येणार आहेत. तसं पाहिल्यास तिचं बरोबरच होतं आणि ती सरकारी नोकरी का बरं सोडणार? प्रश्न होता.
नोकरी सोड हा विषय होता अब्दुलचा. परंतु ती काही नोकरी सोडत नव्हती. त्यामुळंच तो कदाचीत कामालाही जात नव्हता. अशातच एक दिवस शुद्धीवर असतांना तो तिला म्हणाला,
"आमच्या धर्मात स्रियांनी नोकरी केलेली चालत नाही. तुला मी वारंवार सांगीतलं की नोकरी सोड. परंतु तू काही सोडत नाहीस. मात्र मी हे अजिबात खपवून घेणार नाही. कारण मलाही काही बंधन आहेत. माझा परीवार मला माझ्या पत्नीनं नोकरी करावी याची परवानगी देत नाही. तुला नोकरी सोड म्हणतो तर सोड नोकरी."
अब्दुल आज रागात होता. त्याला तिच्या नोकरीचं काही घेणं देणं नव्हतं. तिच्या भावभावनांचं काही घेणं देणं नव्हतं. त्याला वाटत होतं की तिनं आपलाच कायदा सांगण्यापेक्षा माझं ऐकावं व नोकरी सोडावी. शेवटी तो तिचा विचार व तो त्याचा विचार.
जया नोकरी सोडत नाही, असं ठाम होतं व ती गोष्ट त्यालाही माहीत झाली होती. नोकरीतून तिची सोडवणूक करीत असतांना तो तिला मारायचा. परंतु ती टस ची मस होत नव्हती. शेवटी त्यानं ठरवलं की तिला आपल्या पुर्वजांच्या राज्यात अर्थात विदेशात न्यावं. त्यानंतर तिला तेथून कधीच परत आणू नये. तिला एका कमऱ्यात बंदीस्त करावं.
अब्दुलचा तो विचार. तसा विचार करताच तो तिच्याशी गोडगोड बोलू लागला. विचार करु लागला की हिच्याशी गोड बोललो नाही तर, ती विदेशात येणार नाही. मग काय, तो गोडगोड बोलताच तिही त्याचेशी गोडगोड बोलू लागली. मात्र तिला त्याच्या मनातील कळ समजली नाही व अशाच गोडगोड बोलण्यातून त्यानं काही दिवसात तिचं मन जिंकलं व तो लागलीच आपल्या पुर्वजांच्या गावी निघून गेला तिला घेवून. तेव्हापर्यंत तिला एक बाळ झालं होतं व ते बाळ लहान होतं.
तो विदेशी भाग. त्या भागाची तिला काही जाणीव नव्हती. ना तिला त्या भागाची माहितीही होती. शेवटी अब्दुलनं तिला एके ठिकाणी नेलं. तिथं तिला एका कमऱ्यात बंदीस्त करुन ठेवलं. तेथून तिला तो बाहेर काढत नसे. यातूनच तिची नोकरीही गेली होती.
जयाची नोकरीही गेली होती आणि आता ती तळपत होती मासळीसारखी. शिवाय तिची नोकरी जाताच आणि ती बंदीस्त होताच ती हतबल झाली होती. तसे दारुचे शौकं सुरुच होते अब्दुलचे आणि जवळ पैसा नव्हता. तशीच पाठीला एक मुलगी होती. उपासमार होत होती. त्यातच एक दिवस तिनं त्याला म्हटलं की कमीतकमी मी जर इथे आले आणि मला नोकरी सोडायला लावली तर तुम्ही पोषावं. घरी उपासमार होते आहे. मुलीलाही उपाशी ठेवावं लागतं. त्यावर एक दिवस तो घराच्या बाहेर पडला. सायंकाळी जेव्हा तो घरी आला. तेव्हा तो नशेत धृत होता व त्याचेसोबत कोणीतरी एक सोबती होता. त्यातच त्यानं अर्ध्या रात्री त्या सोबत आलेल्या माणसाला तिच्या कमऱ्यात पाठवलं. ज्यातून तिच्यावर तिची इच्छा नसतांनाही पाशवी अत्याचार झाला होता.
तो पाशवी अत्याचार. तसे रोजरोजचे अत्याचार. रोजच त्याचं कोणाला तरी आणणं व रोजच तिच्या अब्रुचे धिंडवडे निघणं. पैसा कमविण्याचा त्याचा तो अनैतिक मार्ग. त्याला सोडून द्यावं असं कधीतरी वाटायचं. परंतु ती त्याला सोडू शकत नव्हती. कारण ती ज्या ठिकाणी बंदीस्त होती. तिथून कुठेही जाता येत नव्हते वा तेथून पलायन करायला बंदी होती. ती कैदच होती तिथं आणि अब्दुल जेव्हा बाहेर जात असे. तेव्हा तो तिला आतमध्ये ठेवून बाहेरुन कुलूप लावून जात असे.
जयाचं ते दुर्दैवी जीवन. तिला आठवत होते ते जुने दिवस. ती उकीरड्यावरच जगली होती लहानपणी. परंतु ते तरी दिवसं बरे होते. कारण त्याही काळात ती स्वतंत्र्य होती. असा रोजरोज कुणाचा अत्याचार तर होत नव्हता. तिला त्याही गोष्टी आठवत होत्या. ज्यावेळेस लोकांनी तिला समजावलं होतं की एखादा बिरादरीतील पाहा. जो चांगलाही नसला तरी आपल्या धर्माचा असेल. परधर्माच्या मुलाशी विवाह करु नकोस. आज तिला त्याच गोष्टीवर पश्चाताप होत होता. परंतु आज काही त्यावर उपाय नव्हता.
जया आज पैसे कमविण्याची मशीनच बनली होती अब्दुलची. तिनं नोकरीत जेवढं कमवलं नसतं. तेवढे पैसे कमवले होते त्यानं असल्या प्रकारचा तिच्यावर अत्याचार करुन घेवून. शिवाय इच्छा नसतांनाही तिला एकामागोमाग एक मुलं पैदाही करायला लावली होती त्यानं. त्यात त्यानं मुलाबाळांच्या शिक्षणाचाही विचार केला नव्हता. फक्त मुलं पैदा कर. हेच त्याचं सांगणं होतं व हाच त्याचा विचार होता.
ते जयाचं बंदीस्त जीवन. ते जीवन सांभाळता सांभाळता व मुलं पैदा करता करता तिचं जीवन जात होतं. काय करावं सुचत नव्हतं. तसं पाहिल्यास ती सर्व शिक्षणही विसरली होती. परंतु एक गोष्ट तिला प्रकर्षानं जाणवत होती. ती म्हणजे तेथून पलायन करणे.
ती विचार करीत होती तेथून पळण्याचा. कारण रोजरोज तिच्यावर लोकांचे होणारे अत्याचार सहन होत नव्हते. परंतु तिलाही एक विचारच होता. तो म्हणजे मुलांचा. आपण पळून गेल्यावर मुलांचं काय होणार? कारण मुलं ही तिचीही संपत्ती होतीच. शेवटी तिनं विचार केला. विचार केला की आपण पळून जायचं. मुलांचा विचार करु नये. मुलांना सांभाळेल तो, नाहीतर नाही सांभाळणार. जगतील ती कशीही. परंतु आपण आपलं पाहायचं. कारण आता ती त्रासली होती व लोकांचे तिच्यावर होणारे अत्याचार सहन होत नव्हते.
एकदा अशीच तिला एक मोठी नामी संधी आली. जेव्हा तिच्या कक्षात एक हिंदुस्थानी व्यक्ती आला. तोही मुस्लीमच होता. त्याच्या हावभावांवरून तो हिंदुस्थानीच वाटत होता. तसा तोही हिंदूस्थानीच बोलत होता.
त्यानंही तिची कैफियत ऐकली. तसा तो म्हणाला,
"माझं नाव रहिम. मला तू हवं तर आपला भाऊ समज. मी तुला या देशातून तुझ्या मायदेशात नक्कीच पोहचवून देईल."
तो रहिम होता व जातीनं मुसलमान होता. परंतु त्यानं तिच्यावर अत्याचार केला नाही. उलटपक्षी तिला बहीण मानत तिला आपलं पत्त्याचं कार्ड दिलं होतं व तिची स्वतःचा पती म्हणून असलेल्या अब्दुलच्या कचाट्यातून मुक्त केलं होतं.
रहिम आला होता तिच्यावर अत्याचार करण्यासाठीच. परंतु तिनं आपल्या कक्षात तो असतांना एक विचार मांडला. विचार मांडला की ती ज्याचेसोबत विवाहबद्ध झाली. त्याच पतीनं तिला एक चांगली नोकरी असतांनाही तिला ती नोकरी सोडायला भाग पाडलं. ती गुणवंत असून ती एक शास्रज्ञ होती आणि तिची देशाला अतिशय गरज होती. असे असतांना तिची नोकरी सुटावी म्हणूनच तिला त्यानं विदेशात आणलं आणि इथं विदेशात पैसे कमवायचे साधन नसल्यानं तो कोणतेही गिऱ्हाईक आणतो व तिच्या कमऱ्यात तिच्यावर अत्याचार करायला पाठवतो. परंतु आता तिला ते सर्व सहन होत नाही व तिला तिच्या मायदेशात जायचं आहे. त्यासाठी काहीही झालं तरी चालेल. ती तो बदल स्विकारायला तयार आहे. कृपया त्यानं तिला मदत करावी. त्यानंतर तिनं तसं विचारताच सुरुवातीला त्यानं काही आढेवेढे घेतले. परंतु नंतर तिला त्यानं आपलं कार्ड दिलं व तो तिथून निघून गेला होता.
ते कार्ड...... ते त्याच्या पत्त्याचं कार्ड होतं. ते कार्ड ती अगदी जपून ठेवत होती व संधी पाहात होती तिथून निघून जाण्याची. तसा अब्दूल एक दिवस एकदा फारच आजारी पडला. परंतु तो दवाखान्यात जाईना व तिलाही काही जावू देईना. तशी ती तिला नामी संधीच वाटली पळून जाण्याची.
त्याचं आजारपण तिला पळून जाण्यात यशस्वी ठरलं. तशी ती त्याच आजारादरम्यान म्हणाली की ती त्याचेसाठी औषध आणायला जात आहे. जर त्याचेसाठी औषध नाही मिळाली तर तो सुधरुही शकणार नाही.
जया आपल्या पलायनासाठी थोडीशी खोटीच बोलली. तसं पाहिल्यास तिला तसं खोटं बोलणं भागच होतं. शेवटी त्यानं विश्वास ठेवला व त्यानं तिला औषध आणायला सांगितल्यानुसार ती बाहेर पडली.
जया बाहेर पडली होती. ती मुख्य रस्त्यावर आली होती. तशी थोड्याच वेळात तिनं आपल्याजवळील कार्ड काढला. त्यात पत्ता शोधला व ती त्या पत्त्यावर गेली. त्यानंतर तिनं त्या कार्ड देणाऱ्या व्यक्तीलाही शोधलं. तसा त्याचा पत्ता मिळताच तो व्यक्तीही मिळाला. त्यानं तिला पाहताच घरात घेतलं होतं.
जया रहिमच्या घरी आली होती. तेव्हा तिच्या काखेत एक लहानगं लेकरुही होतं. तिला अब्दुलनं मुलं पैदा करण्याची मशीन समजत सोळा मुलांना जन्माला घातलं होतं व तो त्याच मुलांच्या भरवशावर व जयाच्या भरवशावर ऐयाशी करीत होता. आताही तिच्या काखेत एक लहानगं बाळ होतंच.
रहिमनं तिला आतमध्ये घेतलं. तसं पाहिल्यास तिला आतमध्ये घेवून त्यानं दरवाजा लावून घेतला. मग बोलणं सुरु झालं. रहिम म्हणाला,
"दीदी, आपको थोडा रुकना पडेगा. जबतक माहौल शांत नही होता ।"
रहिम बोलून गेला. ते अगदी बरोबरच. कारण त्याला माहीत होतं की ती अब्दूलला न सापडल्यास अब्दुल संतापेल व तिचा शोध घेईल. शिवाय व्हिसा बनवायलाही वेळ लागेल. म्हणूनच सर्वप्रथम त्याला बेसावध करावं लागेल. तेव्हाच तिची मुक्तता करता येईल. त्यानंतर रहिमनं तसं म्हणताच ती म्हणाली,
"मग माझा खर्च मी तुला कसा द्यायचा? मला का इथंही अत्याचाराची शिकार व्हावं लागेल काय? तशी जर गोष्ट असेल तर मी तिथंच बरी आहे."
तिचं ते बोलणं. ते बोलणं ऐकताच तो म्हणाला,
"तोबा तोबा. अल्लाह भी माफ न करे मुझे। मैने आपको दिले बहन बोला है। खुदा गवाह, मै ऐसा करने के पहले अल्लाह मुझे यहाँ से उठा ले।"
रहिमनं म्हटलं, तशी ती म्हणाली,
"मग आम्हाला पोषायचा पैसा?"
"आपने हमे भाई जो कहॉं। फिर हम भाई अगर है तो आपसे पैसा क्यो मॉंगे। हमे यह बात शोभा देगी?"
जया ते सर्व ऐकत होती. तिनं त्याचेवर विश्वास ठेवला व ती त्याचेसोबत राहिली. तसे काही दिवस गेले व काही दिवस जाताच सर्व वातावरण शांत झाल्यावर ती तेथून निघून गेली. त्यावेळेस रहिमनं तिला केलेली मदत वाखाणण्याजोगीच होती व ती रहिमचे उपकार विसरु शकत नव्हती. काही दिवसानंतर रहिमनं तिचा व्हिसा बनवला. त्यात तो तिचा भाऊ मानत असतांनाही पासपोर्टमध्ये त्याची ती पत्नी असल्याचा हवाला दिला होता. तेवढी कागदोपत्री त्यानं हेराफेरी केली होती. मात्र त्यानं मनातून तो मुसलमान असूनही बहीण मानत तिला एकप्रकारे मदतच केली होती.
जया मायदेशात परत आली होती. ती मनोमन रहिमचे उपकार मानत होती. गाठीला आता तिच्या एक लेकरु होतंच. ती मायदेशात येवून रुळावली होती. परंतु पुन्हा तिला प्रश्न पडला होता तो तिच्या अधिवासाचाच आणि खानपानाचाच. शिवाय पैसाही नव्हता तिच्याजवळ. ना आता ती आपल्या वस्तीतही जावून राहू शकत होती, ना ती आपल्या शहरातही जावू शकत होती. शिवाय तिची आता तशी फारशी नव्या शहरात ओळख नसल्यानं तिला ना कोणी कमरा देणार होतं ना तिला कोणी काम. त्यामुळंच पुन्हा तिनं ठरवलं की आपण जेव्हापर्यंत आपली परिस्थिती अद्ययावत होत नाही. तेव्हापर्यंत फुटपाथचाच आधार घ्यावा. शिवाय भीकही मागावी लागली तरी चालेल. तशी तिला भीक मागण्याची आधीपासूनच सवय होती.
जया भीक मागू लागली शहरात. ती काखेत लेकरु ठेवून भीक मागू लागली. त्या भीकेत जे चार दोन पैसे यायचे. त्या पैशात आपला व आपल्या मुलीचा खर्च करु लागली होती ती. शिवाय दोन पैसे गाठीलाही वाचवत होती. अशातच ती जुन्या गावी जावून आपल्या शिक्षणाची प्रमाणपत्र बनवू लागली होती. विचार होता की आपलं जसं जीवन गेलं. तसं आपल्या मुलीचं जीवन जावू नये.
काही दिवस बरे गेले. काही दिवसानं तिनं एक जाहीरात वाचली वर्तमानपत्रातून. जाहीरात होती की देशाला अंतराळाचा अभ्यास करण्यासाठी अंतराळात एका महिलेला पाठवायचे आहे. जी महिला तयार असेल अंतराळात जायला. तिनं फॉम भरावा.
अंतराळ मोहीम. अंतराळात जाणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणं होतं. भल्याभल्यांची भंबेरी उडत असे केवळ अंतराळात जाण्याचं नाव काढून. त्यात महिलांनी अंतराळात जाणं आणि त्याची जाहीरात. मात्र बरेच दिवस झाले तरी कोणीही तयार झालं नव्हतं. तशी ती जाहीरात बऱ्याच दिवसापुर्वीची होती.
जयानं ती जाहीरात वाचताच ती त्याचा शोध लावत ती कार्यालयात गेली. त्यानंतर तिनं तेथील अधिकाऱ्याला आपली कागदपत्र दाखवली व ती कागदपत्र पाहून अधिकारी म्हणाला,
"आपण तयार आहात का अंतराळात जायला? माहीत आहे का अंतराळ म्हणजे काय? अंतराळ म्हणजे प्रत्यक्षात मृत्यूलाच आमंत्रण. वाचून यायचा काही भरवसा तरी नाही."
त्या अधिकाऱ्याचं ते बोलणं. त्यावर विचार करीत काही वेळ ती स्तब्ध झाली. त्यानंतर ती म्हणाली,
"सर, माहीत आहे मला अंतराळ म्हणजे काय? शिवाय मी आजपर्यंतचे दिवस मृत्यूशीच झुंज देत आले. मला काय भीती त्याची? परंतु तरीही माझी एक अट आहे. अट फारशी मोठी नाही."
"कोणती अट आहे?"
"माझी एकच अट आहे. ती म्हणजे समजा मी जर जीवंत परत नाही आले, तर माझ्या मृत्यूपश्चात माझ्या मुलीची आबाळ होवू नये. तिचं संगोपन चांगलं व्हावं म्हणजे झालं."
अधिकाऱ्यानं ते तिचं बोलणं ऐकलं. काही वेळ तोही गप्प होता. मग म्हणाला,
"ठीक आहे. आपण जर देशासाठी एवढा मोठा त्याग करायला तयार आहात. मग आम्ही एवढंही करु शकणार नाही? आपण त्याबद्दल निश्चींत राहावं म्हणजे झालं."
तो अधिकारी बोलून गेला. परंतु तो बोलून जाताच तिला अगदी हायसं वाटत होतं.
**********************************************************

जॉन बनवीत होता प्रक्षेपण अवकाशयान. त्यासाठी लागणारी साधनसामुग्री उपलब्ध झाली होती. मात्र मनुष्यबळ अजुनही उपलब्ध झालं नव्हतं आणि जे बाहेरून मनुष्यबळ आणलं जाणार होतं. त्याचे पैसे हे परवडणारे नव्हते.
अवकाश यान बनविणं फार कठीण गोष्ट होती. परंतु ती कठीण गोष्ट असली तरी ती सरकारी गोष्ट होती. त्यातच निर्माण झालेली मनुष्यबळाची समस्या. तिला लागणारा खर्च. तो खर्च परवडण्यासारखा नसल्यानं सरकारनं त्या कामाला संपुर्णतः तुरुंग प्रशासन लावलं होतं. ते यान बनविण्याचं काम तुरुंगातील कैदी करीत होते. ज्यात जोलचाही समावेश होता. जोल आतापर्यंत सुधारगृहातून सुटला नव्हताच.
सरकारनं जॉनच्या योजनेनुसार तुरुंग प्रशासनाला कामाला लावलं व लवकरच तुरुंग प्रशासनाच्या मदतीच्या कार्यानुसार प्रक्षेपण यान तयार झालं आणि आता ते अवकाशयान अवकाशात पाण्याचा शोध घेण्यासाठी संपुर्णतः तयार झालं होतं.
सरकारनं जयाच्या मुलीची संपुर्णतः काळजी घेतली जाईल. असं शपथपत्र तिला लिहून दिलं होतं. त्यानुसार जयाही अवकाशयानद्वारे अवकाशात जायला तयार झाली होती.

************************************************************************************************