साडेतीन मुहूर्तापैकी अर्धा दिवस ( मुहूर्त) मानला जाणारा आजचा दिवस... या दिवशी कोणतेही कार्य हाती घेतले तर ते नक्कीच यशस्वीपणे पूर्ण होत असतं...
म्हणूनच या दिवसाला भारतामध्ये खूपच महत्त्व आहे...
महाराष्ट्रात याच दिवशी त्रेतायुगाचा प्रारंभ झाला असेही म्हणतात..
याच दिवशी सूर्याने पांडवांना अक्षय पात्र दिले होते. ।
अक्षय तृतीया सर्वश्रेष्ठ पर्व असून याच दिवशी भगवान परशुराम यांचा प्रकट दिन आहे..
असं म्हणतात याच दिवशी श्री भगवती गंगामैया या पृथ्वीतलावर अवतरली. . .
या अक्षय अशा शिवमुहूर्तावरच श्रीकृष्ण भगवंतांना त्यांचा परममित्र सुदामा भेटण्यास आले होते.
अक्षय म्हणजे ज्यांचा कधीच क्षय होत नसतो.. असेच अक्षय पुण्य आपण पदरात पाडून घेण्यासाठी या दिवशी पूजा करावी...
वैशाख शुक्ल तृतीया म्हणजेच अक्षय तृतीया...
यादिवशी शुभमुहूर्तावर सकाळी लवकर उठून शुचिर्भूत होऊन घराची स्वच्छता करून सडा-सारवण करायचीअसते.. सुबक रांगोळी दारास आंब्याच्या पानाची तोरणे बांधले जातात.. या दिवशी सुर्यास अर्ध्य देण्याचे देखील महत्त्व आहे...
या दिवशी ची पूजा मांडताना पाठावर लाल रंगाचे कोरे वस्त्र असावे... यावर तांदळाची आरास घालून श्री हरी विष्णूची व माता लक्ष्मीची प्रतिमा देखील स्थापन केली जाते...एकीकडे श्री गणपतीची मूर्ती नसेल तर लाल सुपारी ठेवावी..
तर मध्यभागी धान्याची आरास घालून त्यावर मातीची केळी(माठ) व त्यावर असलेला करा ठेवला जातो... तो पाण्याने पूर्ण भरलेला असतो... ही आपल्या पूर्वजांचे किंवा पितरांचे प्रतीक असते...त्यावर कुंकवाने स्वस्तिक काढून पाच बोटे काढावी.. लाल रंगाच्या धाग्याने केळीच्या काठावरती साडेतीन वेळेस दोरा लावावा..त्याला पुरणपोळी व आमरसाचा नैवेद्य दाखवला जातो...
गो पुजा किंवा गोड घास देखील बाजूला काढला जातो...
तांब्याचा कलश,त्यावर नारळ स्थापन करून, तुपाचा दिवा लावावा... जल, फुल ,तुळशीपत्र हातात घेऊन आपल्या कुळ,गोत्र यांचा उच्चार करावा...
रांगोळीने अष्टदल कमल काढून त्यावर आपल्या घरात असलेले सोन्याने इत्यादी ठेवून माता लक्ष्मीची पूजा करावी...याच दिवशी श्री शक्ती पाठ, महालक्ष्मी स्त्रोत किंवा विष्णुसहस्रनाम, राम रक्षा स्तोत्र नक्की वाचायला हवा..
ग्रामीण भागाकडे याला आकिती किंवा आखिजी असेही म्हणतात... आपल्या कुलदेवतेचे स्मरण करून तिची पूजा करावी.. देव्हाऱ्यात नैवेद्य दाखवावा...
याच दिवशी आपल्या पितरांना घास देण्याचा ,स्मरण करण्याचा व त्यांना मुक्ती मिळवून,प्रार्थना करण्यासाठी आजचा दिवस असतो...
ओम पितृ देवताय नमः
दुपारी मध्यान्न झाल्यानंतर 11 ते 1 च्या दरम्यान पितरांसाठी नैवद्य दाखवून प्रार्थना करावी.. या नैवद्यमध्ये दही भात आणि काळे तीळ यांचा समावेश असावा... .
हा नैवेद्य विशेष करून कावळ्यांनी खाल्ला तर आपल्या पितरांना पोहोचला असे मानले जाते..
आपल्या पितरांच्या स्मरणार्थ अवश्य दानधर्म करावा ..
या दिवशी चांगल्या कामाचा संकल्प करावा आपलेही काम नेहमीच दुपटीने वाढत जाते असे म्हणतात. ।
कधीच क्षय न होणारी म्हणजेच अक्षय..
या दिवशी अवश्य वेगवेगळे ग्रंथाचं वाचन करावं जेणेकरून आपले पुण्यही वाढत जाईल तसेच या दिवशी आपण काही चांगल्या कामाचा संकल्प करावा..
आपल्याला अनावद पणाने अनावदनाने आपल्याकडून जर काही वाईट कामे झालीच तर ते देखील दुप्पट होतात असे म्हणतात बरं का म्हणून काळजीपूर्वक करायला पाहिजे. ..
शक्यतो हा योग वर्षातून फक्त तीन वेळेस येतो हा सगळ्यात मुहूर्तापैकी चांगला मुहूर्त मानला जातो म्हणून याच दिवशी बरेच जण आपल्या नवीन कामाची सुरुवात करतात किंवा आपल्या व्यवसायामध्ये समृद्धता येण्यासाठी प्रार्थना करून पूजा देखील करतात. .
त्यानिमित्ताने का होईना आपला हिंदू धर्म हिंदू संस्कृती प्रथा परंपरा जपल्या जातात आणि हाच संदेश आपल्या पुढील भावी पिढीच्या वाटचालीस अधिकच सुकर आणि चांगला ठरतो नाही का. ..
म्हणून येणाऱ्या अक्षय तृतीयेला आपण सगळ्यांनी नक्कीच पूजा करावी व या चांगल्या शुभ मुहूर्ताच्या वेळेचा मान ठेवून आपल्या आयुष्याचा सदुपयोग करा. .
माझ्या माहेरी व सासरी दोन्हीकडे ही पूजा केली जाते.. तुमच्याकडे ही पूजा कशी करतात हे मला नक्की सांगा.. काही चुकले असल्यास क्षमस्व...✍️✍️💞Archu💞